Maharashtra Breaking News LIVE :छत्रपती संभाजीनगर : रुग्णाच्या नातलगांची डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचे काम बंद

| Updated on: Jun 17, 2024 | 10:47 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 17 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE :छत्रपती संभाजीनगर : रुग्णाच्या नातलगांची डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचे काम बंद
Follow us on

रायबरेली की वायनाड कोणता मतदार संघ निवडावा, याबाबत राहुल गांधी आज घोषणा करणार आहेत. 18 जूनपर्यंत लोकसभा सचिवालयाला राहुल गांधी यांना उत्तर द्यावे लागणार आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे राहुल गांधी यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा पुनर्विकास आराखडा दुरुस्तीसह राज्य सरकारकडे सादर केला आहे. १५४० कोटी रुपयांचा सुधारित पुनर्विकास आराखडा लवकरच मंजूर होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची आज पुण्यात बैठक होत आहे. बैठकीत महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवावर चर्चा होण्याची शक्यता आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य सरकारने भूसंपादनासाठी अधिसूचना काढली आहे. त्याल कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Jun 2024 08:58 PM (IST)

    धुळ्यात जोरदार पावसाला सुरुवात

    धुळ्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.  वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडत आहे. आठ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर धुळे शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागातील बत्ती गुल झाली आहे.

  • 17 Jun 2024 07:29 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिवेशन काळात संबोधन करणार

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिवेशन काळात संबोधन करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलैला लोकसभेत तर 3 जुलैला राज्यसभेत संसदेत संबोधन करणार आहेत.  येत्या 24 जून पासून संसदेचे विशेष अधिवेशन आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अधिवेशन होणार आहे.


  • 17 Jun 2024 03:53 PM (IST)

    जातीय जनगणना करण्यात यावी – छगन भुजबळ

    जातीय जनगणना करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. निधी मिळण्यासाठी ही जनगणना महत्त्वाची आहे. एससी, एसटी प्रमाणे ओबीसी समाजाला फंड येत नाहीत. असं देखील भुजबळांनी म्हटले आहे.

  • 17 Jun 2024 03:23 PM (IST)

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उद्या अहमदनगर जिल्हाच्या दौऱ्यावर

    लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच आढावा घेण्यासाठी सुनील तटकरे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. अहमदनगर आणि श्रीरामपूर येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चाचपणीसाठी सुनील तटकरे येणार आहेत. विधानसभेच्या अहमदनगर जिल्ह्यातील बाराही जागा लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती आहे. जिल्ह्यातील बारा जागा लढणार असल्याचं जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांची म्हटले आहे.

  • 17 Jun 2024 03:21 PM (IST)

    शरद पवार उद्यापासून पुन्हा बारामती दौऱ्यावर

    शरद पवार उद्यापासून 3 दिवस बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहे. 3 दिवसात शरद पवार घेणार 11 शेतकरी मेळावे. शरद पवार पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी गावांचा दौरा केला होता.

  • 17 Jun 2024 02:14 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर : रुग्णाच्या नातलगांची डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचे काम बंद

    छत्रपती संभाजीनगरच्या  घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्यामुळे डॉक्टरांचे काम बंद आंदोलन झाले होते. आरोपीला अटक केल्यानंतर डॉक्टरांकडून आपत्कालीन सेवा सुरू केली आहे.

  • 17 Jun 2024 01:57 PM (IST)

    पुण्यातील औंधमध्ये चोरी…

    पुण्यात औंध परिसरात पहाटेच्या सुमारास दुकान फोडत चोरी करण्यात आली आहे. मिठाईच्या दुकानातील काउंटरमध्ये असलेली बारा हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. सीसीटिव्हीची वायर तोडून टाकली. तर त्याच शेजारीच असलेल्या एका चष्म्याच्या दुकानाचे शटर उचकटून आतील दरवाजा उघडता न आल्याने चोरीचा प्रयत्न फसला. चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली याबाबत पुढील तपास चतु:शृंगी पोलिस करत आहेत.

  • 17 Jun 2024 01:45 PM (IST)

    सिक्कीम भूस्खलनात अडकलेले पर्यटक सुखरूप

    सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनात अडकलेले पर्यटक सुखरूप आहेत. बागडोंगरा ते गंगटोक दरम्यान भूस्खलन झालं आहे. या मार्गावरून जाणारे नाशिकचे पर्यटक सुखरूप आहेत. नाशिकहून जवळपास 50 हून अधिक पर्यटक या भागात पर्यटनासाठी गेले होते. नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून गेलेले सगळे पर्यटक सुखरूप आहेत.

  • 17 Jun 2024 01:30 PM (IST)

    त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मारहाण धक्काबुक्की

    त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मारहाण धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दर्शनासाठी गेलेल्या नाशिकच्या भाविकांचा आरोप आहे. भाविकांकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ४ ते ५ सुरक्षा रक्षकांनकडून धक्काबुक्की मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नाशिकच्या सूर्यवंशी कुटुंब त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले असता हा प्रकार घडला.

  • 17 Jun 2024 01:15 PM (IST)

    आळंदीमध्ये भीषण अपघात…

    आळंदी जवळील वडगाव घेणंद गावात अल्पवयीन कार चालकाकडून महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समोरील जमावाला चिरडण्यासाठी अल्पवयीन तरुणाने कार पाठीमागे घेऊन जात पुर्ण वेगाने चालवत महिलेसह नागरिकाना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा थरार मोबाईल कॅमेरात कैद झाला. अंगावर काटा आणणार हा थरार मनात धडकी भरवणारा आहे. हा अपघाताचा थरार झाल्यानंतर हा तरुण कारच्या छतावर बसुन शिवीगाळ करत होता. पुर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याबाबत आळंदी पोलीसांत फिर्याद देण्यात आली. नाजुका थोरात यांच्या फिर्यादीवरुन आळंदी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 17 Jun 2024 12:50 PM (IST)

    जळगाव पोलीस दलात भरती प्रक्रिया १९ जून रोजी

    जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलासाठी 19 जून रोजी भरती प्रक्रिया होणार आहे. 137 जागांसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 6 हजार 557 अर्ज आले आहेत.

  • 17 Jun 2024 12:35 PM (IST)

    विधानसभा जागा वाटपावरुन काँग्रेसची नरमाईची भूमिका

    पुण्यातील विधानसभा जागा वाटपावरुन काँग्रेसची नरमाईची भूमिका आहे. जागा वाटपाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे.

  • 17 Jun 2024 12:15 PM (IST)

    अश्विनी वैष्णव तातडीने पश्चिम बंगालला रवाना

     

    कांचनजंगा एक्स्प्रेस अपघातानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तातडीने पश्चिम बंगालला रवाना झाले आहे.
    ते दार्जिलिंगमधील अपघातस्थळाला भेट देणार आहे. अपघात स्थळाची ते पाहणी करणार आहे. तसेच जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहे.

  • 17 Jun 2024 11:50 AM (IST)

    ओबीसी आंदोलनाची दखल घेतली जात नाही- लक्ष्मण हाके

    ओबीसी नेत्यांच्या आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधी गेले नाहीत. राज्यातील सरकार ओबीसींचं नाही का? आमच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही. ओबीसी आंदोलनाची लोकप्रतिनिधींकडून कोणतीही दखल घेतली जात नाही, अशी तक्रार लक्ष्मण हाके यांनी केली आहे. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत.

  • 17 Jun 2024 11:46 AM (IST)

    केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तातडीने पश्चिम बंगालला रवाना

    केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तातडीने पश्चिम बंगालला रवाना झाले आहेत. दार्जिलिंगमधील रेल्वे अपघाताच्या घटनास्थळाला ते भेट देणार आहेत. अपघातस्थळाची ते पाहणी करणार आहेत. रुग्णालयात जाऊन ते जखमींची भेट घेणार आहेत.

  • 17 Jun 2024 11:40 AM (IST)

    आदित्य ठाकरेंनी ईव्हीएमवरील वक्तव्यावर माफी मागावी- संजय निरुपम

    “आदित्य ठाकरेंनी ईव्हीएमवरील वक्तव्यावर माफी मागावी. विरोधकांनी खोट्या बातमीच्या आधारे निवडणूक आयोगाची बदनामी केली,” असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

  • 17 Jun 2024 11:34 AM (IST)

    संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला

    शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.

  • 17 Jun 2024 11:30 AM (IST)

    विधानसभेला प्रत्येकाला जास्त जागा हव्या आहेत- नाना पटोले

    “विधानसभेला प्रत्येकाला जास्त जागा हव्या आहेत. जास्त जागा मागण्यात काही हरकत नाही. काँग्रेसनं महाराष्ट्रात लोकसभेच्या जास्त जागा जिंकल्या आहेत. सरकारला दुष्काळी परिस्थितीची काळजी नाही. राज्यात शेतकऱ्यांची लूट सुरू आहे,” असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

  • 17 Jun 2024 11:20 AM (IST)

    नागपूर हिट अँड रनप्रकरणी एकाला अटक

    नागपूर हिट अँड रन प्रकरणात कारमध्ये 5 जण असल्याची माहिती समोर येत आहे. पाचही जण दारू पिऊन असल्याचा संशय आहे. पोलिसांनी सर्वांची वैद्यकीय तपासणी केली असून अहवाल येणार आहे. यातील एकाला अटक केली असून भूषण लांजेवार अस आरोपीचं नाव आहे. यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

  • 17 Jun 2024 11:10 AM (IST)

    नागपुरात हिट अँड रन; फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना भरधाव कारने चिरडलं

    नागपुरात हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं. यामध्ये दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • 17 Jun 2024 10:55 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नासंदर्भात शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    पुणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीलं आहे.

    पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी गांभीर्याने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्याची विनंती पवार यांनी पत्राद्वारे केली. 
  • 17 Jun 2024 10:43 AM (IST)

    काय कमावलं आणि गमावलं हे 13 जुलैला कळेल – मनोज जरांगे पाटील

    कोणत्याही ओबीसी नेत्यांना माझा विरोध नाही . धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न करावा. आम्हाली ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध कशाला करता ?

  • 17 Jun 2024 10:28 AM (IST)

    लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा ॲक्शन प्लॅन, पराभूत मतदारसंघातील कारणांचा घेणार आढावा

    लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा ॲक्शन प्लॅन,  राज्यातील पराभूत मतदारसंघातील कारणांचा आढावा घेतला जाणार आहे.  प्रमुख नेत्यांवर मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

    तर होमग्राऊंड राखू न शकलेल्या विखे पाटलांवर नांदेडच्या विश्लेषणाची जबाबदारी आहे तर बीडची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे, बारामती मंगलप्रभात लोढा तर श्रीकांत भारतीय चंद्रपुरचा आढावा घेतील.   महायुतीने गमावलेल्या 33 मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.   22 जूनपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना  अहवाल
    द्यावा लागणार आहे.

  • 17 Jun 2024 10:18 AM (IST)

    पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्स्प्रेसचा अपघात, अनेक प्रवासी जखमी

    पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्स्प्रेसचा अपघात झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. एक्स्प्रेसची एका मालगाडीला धडक बसून भीषण अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त.

     

  • 17 Jun 2024 10:04 AM (IST)

    रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखलं पाहिजे – संजय राऊत

    मुंबई उत्तर -पश्चिममधील निकाल हा अत्यंत संशयास्पद आहे. रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखलं पाहिजे

  • 17 Jun 2024 10:01 AM (IST)

    Maharashtra News | मुंबई उत्तर – पश्चिममधील निकाल हा एक आदर्श घोटाळा – संजय राऊत

    मुंबई उत्तर – पश्चिममधील निकाल हा एक आदर्श घोटाळा… वायकरांचा निकाल हा एक आदर्श घोटाळा… निकाल घोटाळ्यातील आदर्श घोटाळ्याचं उदाहरण मुंबईत आहे… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 17 Jun 2024 09:47 AM (IST)

    Maharashtra News | पब आणि बारमध्ये जाण्यासाठी वयाचा पुरावा द्यावा लागणार

    पब आणि बारमध्ये जाण्यासाठी वयाचा पुरावा द्यावा लागणार… पब आणि बारमध्ये जाण्यासाठी सरकारी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आला आहे. पुणे कल्याणीनगर अपघातानंतर महसूल विभागाचा निर्णय…

  • 17 Jun 2024 09:33 AM (IST)

    Maharashtra News | विधानसभेसाठी 80 ते 90 जागा मागायची आमची तयारी – प्रफुल्ल पटेल

    विधानसभेसाठी 80 ते 90 जागा मागायची आमची तयारी… वाटाघाटीत जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रस्ताव… सगळ्या पक्षांनी 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवावी… वाटाघाटीदरम्यान जागा निश्चित होतील, मात्र तयारी सगळीकडे हवी… असं देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले.

  • 17 Jun 2024 09:27 AM (IST)

    Maharashtra News | अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची विधानपरिषदेवर वर्षी लागणार?

    अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची विधानपरिषदेवर वर्षी लागणार असल्याची शक्यता आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास विटेकर होते इच्छुक… जानकारांना दादा गटाच्या कोट्यातून तिकीट… विटेकरांची संधी हुकली…

  • 17 Jun 2024 09:15 AM (IST)

    Maharashtra News | पुण्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आज अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना सादर होणार

    पुण्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आज अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना सादर होणार… जयंत पाटलांकडे करणार ६ जागांची मागणी… पुण्यातील ८ विधानसभेपैकी ६ जागांची मागणी ही शरद पवार गटाची आहे… आज जयंत पाटलांना अहवाल दिला जाणार

     

  • 17 Jun 2024 09:05 AM (IST)

    Maharashtra News | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज साखर संकुलात बैठक

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज साखर संकुलात बैठक… सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक… राज्यातील सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत घेणार आढावा… जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेवून मदतीची शक्यता… भाजपचे प्रवीण दरेकर पण राहणार बैठकीला उपस्थित… विधानसभेच्या आधी सहकार खात अलर्टवर !

  • 17 Jun 2024 08:57 AM (IST)

    Marthi News : माकपकडून विधानसभेसाठी १२ जागांची मागणी

    मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. महाविकास आघाडीतील विधानसभा जागा वाटपात सोलापूरमध्यसह राज्यातील 12 जागेची मागणी केली आहे. माकपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह इतर नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.

  • 17 Jun 2024 08:42 AM (IST)

    Marthi News : राज ठाकरे दोन दिवशी नाशिक दौऱ्यावर

    राज ठाकरे दोन दिवशी नाशिक दौऱ्यावर असणार आहे. 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहे. 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणाऱ्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. राज ठाकरे सहकुटुंब संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे दर्शन घेणार आहे.

  • 17 Jun 2024 08:30 AM (IST)

    Marthi News : सोने, चांदीच्या दारात बदल

    गेल्या महिन्याभरात चांदीचे दर प्रतिकिलो ९० हजारांच्या पुढे होते. ते शुक्रवारी प्रथमच ८८ हजारांवर घसरले. त्यानंतर शनिवारी पुन्हा एक हजारांची वाढ होवून ८९ हजारांवर गेले. रविवारीही हेच दर कायम होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक कारणांसाठी मागणी वाढल्याने चांदीचे दर महिनाभर ९० हजारांवर होते. शुक्रवारी ते दोन हजाराने खाली आले. पुन्हा शनिवारी एक हजाराने वाढले.

  • 17 Jun 2024 08:23 AM (IST)

    Marthi News : कोल्हापुरात उद्या महामोर्चा

    शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारने भूसंपादनासाठी अधिसूचना काढली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि राधानगरी तालुक्यातील शेतकरी संतापले आहे. सरकारच्या निर्णयास विरोध दर्शवण्यासाठी उद्या कोल्हापुरात महामोर्चाचे आयोजन केले आहे.