महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
सिंधुदुर्ग : जिल्हयात पावसाची हजेरी
गेल्या अर्ध्यातासापासून ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी
ऐन दिवाळीत जिल्हयात पाऊस
भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता.
नवी दिल्ली : दिवाळीनिमित्त केंद्र सरकारचा मोठा निर्णय
इंधनाचे दर होणार कमी
पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त होणार
डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होणार
आज रात्रीपासून नवे दर लागू होणार
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात ऐन दिवाळीत पाऊस
सावंतवाडीनंतर कणकवलीत दमदार पाऊस
कणकवलीच्या काही भागात दमदार पाऊस
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची उडाली तारांबळ
पावसाचा व्यापाऱ्यांना फटका
दादरा आणि नगर हवेली येथील पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्या मागे लोकांचा, शिवसेनेचा आशीर्वाद होता. विजयानंतर आम्ही उद्धव ठाकरे यांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आलो होतो. विकास, बेरोजगार तसेच या मुद्द्यांना घेऊन आम्ही समोर जाऊ. या विषयावर काम करू.
पुणे कोरोना अपडेट
दिवसभरात 98 कोरोना रुग्णांची नोंद
– दिवसभरात 69 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधीत 03 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 1
-94 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 504495
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 687
– एकूण मृत्यू – 9076
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 494732
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5269
सांगली : मीरज तालुक्यातील स्टोन क्रशरमधून उडणारा धुळीमुळे नागरिक हैराण
75 एकरावरची शेती आणि शेकडो कुटुंबाचे राहणीमान, आरोग्य धोक्यात
मीरज तालुक्यातील भोसे गावच्या हद्दीतील धक्कादायक प्रकार
धुळे : शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी तापी जलवाहिनी फुटली
हजारो लिटर शुद्ध पाणी वाया, बाभळे गावाजवळ पाईपलाईन फुटली
एका तासापेक्षा जास्त वेळ होऊनही प्रशासन झोपेतच
भाजपची पत्रकार परिषद – केशव उपाध्याय
गडाख यांच्या संस्थेतील कामगाराने आत्महत्या केली
आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडीओ बनवला
गडाख यांची चौकशी नाही ही एक मोठी शोकांतिका
हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे
आमची मागणी आहे की
प्रतिक काळेला न्याय द्यायचा असेल तर गडाख यांनी राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजुला करावे
नाव घेऊनही कारवाई का होत नाही?
नाशिक –
नाशकात एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
कळवण तालुक्यात घडली घटना
विषारी औषध घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न
मानधन,पगार,बोनस मिळून फक्त 4500 रुपये आल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न
एसटी चालक म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत
प्रमोद सूर्यवंशी अस कर्मचाऱ्याचे नाव
सूर्यवंशी यांची प्रकृती गंभीर
अमितेश कुमार, नागपूर पोलीस आयुक्त
– फटाके फोडण्याची वेळ रात्री 8 ते 10 आहे
– रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
– नागपूर पोलिसांनी नेमले विशेष पथक
– ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी
– बाजारात कोवीड नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई सुरु
– ग्रीन फटके नसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई
– कारवाईसाठी ३० विशेष पथकं नेमले
– चार केसेस दाखल
शिवप्रतिष्ठानच्या वतीने समीर वानखेडेंचा सत्कार
चंद्रपूर –
कोरोनातील मृत परिवाराला शासनातर्फे आर्थिक सहाय्य
वरोरा तालुक्यातील कोरोनामुळे मृत परिवारातील कुटुंबांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रशासनीक स्तरावरून प्रयत्न सुरू आहे.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून वरोरा तालुक्यातील 22 परिवाराला अर्थसाह्य करण्यात आले.
हे अर्थसहाय्य आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यामार्फत गरजूंच्या घरी स्वतः भेट देऊन त्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये चेक व दिवाळीची भेट म्हणून साडी वितरित करण्यात आले.
पिंपरी चिंचवड
-पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 17 महिन्यांनी सक्रिय रुग्ण संख्या 500 च्या आत येत ती 493 पर्यंत खाली आलीय
-दिवसभरात कोरोना रुग संख्या दिलासादायक दिसून आली केवळ 41 नवीन रुग्ण आढळले तर एकही मृत्यू झाला नाही
-एकून सक्रिय रुग्ण संख्या कमी झाल्याने शहरासाठी ही समाधानाची बाब मानली जात आहे
सातारा –
पाडेगाव येथे विजेच्या खांबावरील शॉर्टसर्किटमुळे 3 एकर ऊस जळून खाक
स्थानिक युवकांच्या सतर्कतेमुळे उसाच्या शेजारील मधला उस तोडल्यामुळे उसाचे 12 एकर क्षेत्र वाचले…
आग लागून नुकसान झालेल्या 2 शेतकऱ्यांची महावितरणने नुकसान भरपाई देण्याची मागणी..
नाशिक –
नाशिक विना परवानगी वृक्ष तोड केल्यास 1 लाखांपर्यंत दंड
यासोबतच फौजदारी कारवाई देखील केलं जाणार
वृक्ष प्राधिकरण च्या बैठकीत झाला निर्णय
शहराच्या 33 टक्के क्षेत्रावर वृक्ष लागवडीचा देखील निर्णय
शहरातील वाढती वृक्ष तोड रोखण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाचा महत्वपूर्ण निर्णय
नाशिक –
नाशिक दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून ज्यादा बसेस
नाशिकच्या ठक्कर बाजार,मुंबई नाका बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी
दिवाळी निमित्त एस टी कडून ज्यादा बसेस
तोट्यात असलेल्या एसटी ला दिवाळी फायद्याची ठरणार
नवी दिल्ली
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत दाखल
पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान भारतात दाखल
ग्लासगो मधून पंतप्रधान नवी दिल्लीत दाखल
सोलापूर –
सोलापूर जिल्ह्यातील नऊ साखर कारखाने गाळप परवान्याच्या प्रतीक्षेत
गाळप हंगाम सुरू होऊन 20 दिवस उलटले तरी नऊ साखर कारखाने परवान्याच्या प्रतीक्षेत
मागील वर्षाच्या हंगामातील 76 कोटी आठ लाख रुपये 8 कारखान्यानी थकवले
एफआरपी देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना देण्याचे साखर आयुक्तांचे धोरण
जिल्ह्यातील 34 साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी केला होता अर्ज
पुणे
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर अपघाताचे प्रमाण वाढले
जानेवारी ते सप्टेंबर यादरम्यान गंभीर, किरकोळ अशा एकूण 147 अपघातांमध्ये 65 मृत्यू
सर्वाधिक अपघात बोरघाटातील उतरत्या वळणदार रस्त्यांवर
मागील वर्षी 9 महिन्यात 104 अपघातांमध्ये 46 मृत्यू
तर संपूर्ण वर्षभरात 160 एकूण अपघात होऊन 66 मृत्यू
यातुलनेत कोरोनाच्या पूर्वी 2019 मध्ये वर्षभरात 306 अपघातांमध्ये 92 लोकांनी आपला जीव गमावला
गोवा –
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुंबईसाठी रवाना
फडणवीस होते दोन दिवस गोवा दौर्यावर
गोवा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीस आले होते गोवा दौर्यावर
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोवा निवडणूक प्रभारी म्हणून आहे कार्यभार
सोलापूर –
सोलापुरातील दरोड्यातील आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी
दरोडा टाकण्यासाठी जात असताना बार्शी तालुका पोलिसांच्या पथकाने नऊ जणांना घेतले होते ताब्यात
राज्यात विविध ठिकाणी व कर्नाटक राज्यात दरोड्याचे गुन्हे दाखल असलेले नऊ आरोपी
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने बार्शी कडे एका वाहनात हत्यारे घेऊन येत असताना पोलिसांनी घेतले होते ताब्यात
बार्शी न्यायालयाने सुनावली पाच दिवसाची पोलीस कोठडी
नागपूर –
– नागपुरात 16 जलकुंभावरुन पाणीपुरवठा बंद
– कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावरुन येणारी मुख्य पाईपलाईन फुटली
– 900 मिटर व्यासाची पाईपलाईन फुटल्याने 16 जलकुंभावरुन पाणीपुरवठा बंद
– महारेलचे खोदकाम करताना फुटली पाईपलाईन
– लकडगंड आणि नेहरूनगर जलकुंभातील पाणीपुरवठा राहणार बंद
नागपूर –
– मनसेचा महावितरणच्या मुख्य अभियंतल्याला घेराव
– दिवाळीत ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणे थांबवण्याची मागणी
– मुख्य अभियंता दिलीप दोडके यांना घेराव
– महावितरण कंपनीच्या धोरणाचा मनसेकडून निषेध
– महावितरणच्या निषेधार्थ मुख्य अभियंत्यांना दिला कंदील भेट
– मनसेचे नेते हेमंत गडकरी यांच्या नेतृत्त्वात आंदोलन
कोल्हापूर
कोल्हापुरातील पन्हाळगड हजारो दिव्यांनी उजळला
कोल्हापूर हायकर्स ग्रुप च्या वतीने किल्ले पन्हाळ्यावर साजरा करण्यात आला दीपोत्सव
एक सांज पन्हाळगडावर उपक्रमांतर्गत पार पडला दीपोत्सव
कोल्हापूर हायकर्स दीपोत्सवाच्या उपक्रमाचा हे आठव वर्ष
पैसे पडल्याचा बहाणा करून माथाडी कामगाराची दीड लाखांची बॅग चोरट्याने हातोहात लांबवली
कोल्हापुरातील नेहमी गजबजलेल्या दसरा चौकातला प्रकार
काल सायंकाळी घडला चोरीचा प्रकार
सीसीटीव्ही चोरटा कैद
ऐन दिवाळीत पैशाची बॅग चोरीला गेल्याने माथाडी कामगार हवालदिल
लक्ष्मीपुरी पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू
रायगड –
पनवेल मार्गावरील जासई नजीक गर्डर कोसळला
पुलाच्या बांधकामातील लोखंडी सांगाडा कोसळला
आकस्मात घडलेल्या घटनेमध्ये एकुण 7 जण जखमी आणि 1 ठार
जखमींना पुढील उपचारा करीता रुग्णालयात दाखल करण्यात आले
नेरळमधील उडान सोसायटीत लहान मुलांनी सिंधुदुर्ग किल्ला तयार केला
दिवाळीच्या निमित्ताने तयार केला किल्ला
इचलकरंजी –
शहरातील वृषाली ट्रॅव्हल्सच्या ऑफिसला लागली आग जनता बँक चौकातील घटना
शहरामध्ये दिवाळीचा बाजार बसल्यामुळे अग्निशामक दलाला येताना मोठ्या अडचणी छोट्या व्यापारी मोठे नुकसान
वृषाली ट्रॅव्हल्स ऑफिस ला आग लागून ऑफिस संपूर्ण भस्मसात लाखो रुपयांचे नुकसान
दिवाळी बाजारपेठ मध्ये नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात आले होते आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
घटनास्थळी अग्निशामक च्या चार गाड्या दाखल बघ्यांची मोठी गर्दी
आग विझवताना बघ्यांची मोठी गर्दी लाईट बंद केल्यामुळे वि जवताना मोठ्या अडथळे