मुंबई : एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा अँक्शन मोडमध्ये आले आहेत. एनसीबीच्या टीमने आज अंधेरी परिसरातून 700 ग्राम हिरोईन जप्त केलं आहे. NCB ने मुंबईतील अंधेरी भागातील सहार इंटरनॅशनल एअर कार्गो कॉम्प्लेक्समधून हेरॉईन हस्तगत करण्यात आले आहे. कुरिअर पार्सलमधून मुंबईत सापडलेल्या या खेपेत सुमारे 700 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे चार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईमध्ये दिवाळीच्या रात्री बऱ्याच ठिकाणी आगीच्या घटना घडल्या
दिवाळीच्या निमित्ताने मुंबई शहरात मोठ्या संख्येने फटाखे फोडण्यात आलं
त्यामुळे मुंबईच्या अनेक ठिकाणी आगीच्या घटना पाहायला मिळाल्या
अंधेरीच्या पाईपलाईन परिसरात, बीएमसीच्या मोकळ्या जागेत, कचऱ्याच्या ढिगारात भीषण आग लागली होती
तसेच वरळी बोरिवली , दहिसर आणि मीरा रोडमध्ये आगीच्या घटना पाहायला मिळाल्या
या आगीच घटनेत कुठल्याही जीवितहानी झाली नाही
परंतु साहित्याचं मोठे संख्येने नुकसान झालं
बोरिवलीतील गोराई भीम नगर प्लॉट क्रमांक 38 म्हाडा वसाहतीला लागलेली आग आटोक्यात
घराचा वरचा भाग जळून राख झाला,
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही
आग कशी लागली याचा तपास अग्निशमन दल आणि पोलीस करत आहेत
लक्ष्मीपूजनानंतर पवारांच फॅमिली डिनर,
गोविंदबागेतील हिरवळीवर एकत्रित येतं कुटुंबातील सदस्यांनी केलं फोटोसेशन,
प्रतिभा पवार,सूनेत्राताई पवार, सुप्रिया यांच कुटुंबासोबत फोटोसेशन
पवार परिवार दिवाळीच्या निमित्ताने बारामतीत एकत्र !
फटाका मार्केटला आग,
आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली,
फटाका मार्केटमधील 50 हून अधिक दुकाने जळून खाक,
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल,
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु
गुरसराय पोलीस स्टेशन हद्दीतील फटका मार्केट
ईडीकडून अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना समन्स
उद्या समन्स देऊन चौकशीला बोलावलं
मनी लौंदरिंग प्रकरणात ईडीकडून झालीय अनिल देशमुख यांना अटक
देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत
ऋषिकेश देशमुख उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता
– मरोळ पाईपलाईन इथे विजय नगर परिसरातील मैदानात मोठी आग
– परिसरात दहशतीचं वातावरण
– फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना
– स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं
– आग विजवण्याचं काम सुरू
जळगाव
माजी मंत्री गिरीश महाजन यांची नवाब मालिकांवर टीका
नवाब मलिक यांनी खालचे कपडे काढले नाही तर बरं…
मलिकांनी बोलण्यावर तारतम्य बाळगावे.
नवाब मलिक हे बेछूट झाले असून मनात आले ते बोलत आहेत आज बुट सॉक्स पँट पर्यंत येवून गेले उद्या पर्यंत खालचे कपडेही काढले नाही तर बरं , अशी खोचक टीका माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली असून आई बाप बहीण काढून अतिशय खालच्या थराचे राजकारण नवाब मलिक करत असल्याचे ही गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे , बोलतांना मलिकांनी तारतम्य बाळगाव असा सल्ला ही गिरीश महाजन यांनी मलिकांनी दिला आहे.
बारामती : शरद पवार यांच्या गोविंद बागेत लक्ष्मीपूजन..
– खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या हस्ते झालं लक्ष्मीपूजन..
– लक्ष्मीपूजन कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंबाची हजेरी..
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्लाबोल
देवेंद्र फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याऐवजी दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं
लोकांची काम तरी होतील
पवार कुटुंब ईडी, सीबीआय , अशा कारवायांना बधणार नाही
कोणतरी शरद पवारांच्या विरोधात ट्रक भर पुरावे घेऊन येणार होते त्याचं काय झालं
शरद पवार योद्धे आहेत त्यांच्या मागे जनतेची ताकद आहे
पवार कुटुंबावरती होत असलेल्या कारवायांकडे आम्ही लक्षही देत नाही
रोहित पवारांची देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जळजळीत टिका
राज्यात महाविकास आघाडी चांगल काम करतीये त्यासाठी विरोधकांचा पोटसूळ उठलाय
पवारांना पाडव्यानिमित्त भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते येतात
अनिल देशमुख यांची सुमारे चार तास नोंदवण्यात आला जबाब
आज दुपारी दोन ते सहा या वेळेत नोंदवण्यात आला जबाब
मनी लोंदरिंग प्रकरणात नोंदवण्यात आला जबाब
ऍड इंदरपाल सिग यांच्या उपस्थितीत नोंदवण्यात आला जबाब
या प्रकरणात अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख ही आरोपी आहे
ऋषिकेश ही लवकरच ईडी समोर राहणार हजर
वकिलांची माहिती
या प्रकरणात लवकरच काही लोकांना दिल जाणार समन्स
समन्स देऊन अनिल देशमुख आणि साक्षीदार यांचा समोरा समोर केला जाणार तपास
या प्रकरणात अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना करण्यात आली आहे अटक
सध्या हे दोघे जेल मध्ये आहेत
या दोघांना ही ताब्यात घेऊन समोरासमोर तपास केला जाण्याची शक्यता
मी प्रत्येक दिवाळी जवानांसोबत साजरी केली
इथला वर्तमान सैनिकांच्या शौर्याचं प्रतिक आहे
नौशेरातील मातीच्या कणाकणात शौर्याचा जयघोष
देशासाठी बलिदान देणाऱ्यांना मी नमन करतो
It fills every Indian with pride on the role this brigade played during the surgical strike: PM Modi to army jawans at Nowshera in Jammu and Kashmir pic.twitter.com/LO1GTxSxRp
— ANI (@ANI) November 4, 2021
Our soldiers are the ‘suraksha kawach’ of ‘Maa Bharti’. It is because of you all that people of our country can sleep peacefully and there is happiness during festivals: Prime Minister Narendra Modi at Nowshera pic.twitter.com/m74unRjFUm
— ANI (@ANI) November 4, 2021
पंतप्रधान नरेंद्र जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी नौशेरा येथे पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींनी ब्रिगेड मुख्यालयात सैनिकांसोबत चहा घेतला, दुापरी जेवणही करणार आहेत. सैनिक त्यांना सशस्त्र दलांच्या तयारीबद्दल माहिती दिली जाईल. पंतप्रधान जवानांना संबोधित करतील. 2019 मध्येही पंतप्रधान मोदींनी राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) सैनिकांसोबत सण साजरा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये
तुमच्यामुळे आम्ही आनंदात आहोत
सैनिकांच्या परिश्रमामुळे आज देश सुरक्षित आहे
मी इथे कुमच्या कुटुंबातील एक भाग म्हणून आलोय
दरवर्षीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करातील जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यादरम्यान ते जम्मू-काश्मीर किंवा लडाखच्या सीमावर्ती भागालाही भेट देतील.
I have spent each Diwali with soldiers guarding our borders. Today, I have brought along with me the blessings of crores of Indians for our soldiers here: PM Modi addresses soldiers at Nowshera, J&K pic.twitter.com/h8kC6CWy67
— ANI (@ANI) November 4, 2021
– संजय राऊत
राहुल गांधींनी शाहरुख खानला एक पिता म्हणून पत्र लिहिलं असेल
शाहरुख खान एक पिता होता ज्याचा मुलगा जेलमध्ये होता, तो सुटेल की नाही याचीही शाश्वती नव्हती
म्हणून राहुल गांधींनी त्यांना पत्र लिहिलं असेल
पोट निवडणूक हरल्यानंतर जाग आली
१०० रुपये वाढवायचे आणि ५ रुपये कमी करायचे
महाराष्ट्र सरकारने सतत महागाईविरोधात आंदोलन केलं
कमीत कमी केंद्राने २५ रुपये कपात करायला हवी
इंधन कपात करण्याबाबत राज्य सरकार विचार करेल
राज्यभर भाजपकडून काळी दिवाळी साजरी होणार
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाहीच
प्रत्येक विषयी केंद्राकडे बोट दाखवायची ही परंपरा आहे
डेलकरांचा विजय हा सहानुभूतीच्या लाटेमुळे झाला आहे
डेलकर सातवेळा वेगवेगळ्या चिन्हांवर लढले
डेलकर कोण आहेत? ही मतं शिवसेनेची आहेत? डेलकरांच्या विजयानंतर चंद्रकांत पाटलांचा सवाल
सोलापtर –
शनिवार पासून सोलापूर -पुणे सोलापूर -हुतात्मा एक्सप्रेस रोज धावणार
आठवड्यातील पाच दिवसाऐवजी आता रोज धावणार
सोलापूर ते पुणे प्रवास आता पाच तासावरून चार तासांवर
दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे रेल्वे गाड्यांना आला वेग
क्रॉसिंगसाठी गाड्या थांबत नसल्याने वेळेची होणार मोठी बचत
– देशात सर्वाधिक महाग सीएनजी नागपुरात
– नागपूरात सीएनजीचा दर प्रतिकिलो ९९.९९ रुपये
– इंधनाचा पर्यावरणपुरक पर्याय असलेल्या सीएनजी च्या दरात वाढ झाल्याने वाहनचालक त्रस्त
– सप्टेंबरमध्ये सीएनजीचे दर प्रतिकिलो ७० रुपये होते
– दोन महिन्यात सीएनजीच्या दरात ३० टक्के वाढ
कोल्हापूर
दिवाळीनिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी
स्थानिक भाविकांसह राज्यभरातील भाविकांचा समावेश
सणाच्या दिवशी देवीच्या दर्शनाला भाविकांनी सकाळपासूनच लावली रांग
– दिवाळी खरेदीत कमी वजनाचं साहित्य देऊन ग्राहकांची फसवणूक
– वजनात घोळ करणाऱ्या नागपूरातील १४४ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल
– कमी वजनाची मिठाई देणाऱ्या २७ व्यापाऱ्यांवरंही खटले दाखल
– वैधमापन विभागाकडून मोठी कारवाई
– नागपूरच्या फुलबाजारात मोठी गर्दी
– लक्ष्मीपूजनासाठी फुल खरेदी करायला मोठ्या संख्येनं ग्राहक बाजारात
– नागपूरातील ठोक फुलबाजारातून शहरभर फुलांचा होतो पुरवठा
– कोवीडचे मियम धाब्यावर बसवत बाजारात मोठी गर्दी
– झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी, ठोक बाजारात दर ६० ते ७० रुपये किलो
– नागपुरात रात्री 10 नंतर फटाके फोडल्यास होणार गुन्हा दाखल
– फटाके फोडण्याची वेळ रात्री ८ ते १० आहे
– नियम तोडणाऱ्यांवर नागपूर पोलीसांची करडी नजर
– नागपूर पोलिसांनी नेमलेले ३० पथकं आज घालणार गस्त
– फक्त ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी
– बाजारात कोवीड नियम न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई
पुणे
पुण्यात आज पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी
साधे पेट्रोल 109.50 रुपये लिटर, पॉवर पेट्रोल 113.50 रुपये लिटर तर डिझेल 92. 50 लिटर
सीएनजीचे दरात कोणताही बदल नाही, सीएनजी 62.10 रुपये
– नागपुरातील वंजारी नगर येथे ‘दिवाळी पहाट’
– वंजारी नगर क्रिकेट क्लब आणि कुटूंब कट्टा द्वारे दिवाळी पहाटचं आयोजन
– सादरकर्ते – निलेश सावरकर, विशाल नहारकर, गौरी शिंदे, राखी शिपोरकर, पंकज सिंग आणि विनोद चौधरी
बुलडाणा
भाजप आमदार श्वेता महाले यांनी साजरी केली काळी दिवाळी,
शेतकाऱ्यांसोबत पिठलं भाकर खाऊन आणि काळे कंदील दाखवून सरकारचा केला निषेध,
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी
सोलापूर –
सोलापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा होणार बरखास्त
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये राबविण्यात येते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
नवीन वर्षापासून हा विभाग करण्यात येणार बंद
घरकुल, बचत गटाच्या योजना जिल्हा परिषदेकडे होणार वर्ग
केंद्र सरकारचे सचिव संजय कुमार यांनी याबाबतचे परिपत्रक केले जारी
केंद्र शासनामार्फत ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा होती कार्यान्वित
नाशिक –
ऐतिहासिक काळाराम मंदिरात नरक चतुर्दशी साजरी
श्रीराम,लक्ष्मण, सीते च्या मूर्तींना अभ्यंगस्नान
तेल,उटणं लावून श्रीं च्या मूर्तींना अभ्यंगस्नान
वर्षातील महत्वाच्या दिवसांपैकी आजचा दिवस
अभ्यंगस्नान झाल्यानंतर श्रींची महापूजा
वंशपरंपरागत पुजारी वर्गाकडून श्रीराम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्तींचा अभिषेक आणि महापूजा
दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दोन वर्षानंतर भाविकांच्या उपस्थितीत श्री रामांना अभ्यंगस्नान..
पंढरपूर –
आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असल्याने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिराला पाना फुलांची सजावट करण्यात आलीये
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गर्भगृहात कार्नेशियन, गुलाब, ऑर्किड, गुलछडी अशा विविध पाना फुलांसह फळांनी आकर्षक सजावट करण्यात आलीये
ही सजावट बीड येथील विठ्ठल भक्त करण पिंगळे यांनी केलीये
परभणी
आजचे दर
पेट्रोल – 113.17 रुपये प्रति लीटर
पावर पेट्रोल – 117.39 रुपये प्रति लीटर
डिझेल – 95.82 रुपये प्रति लीटर
परभणीत पेट्रोल 5 रुपये 82, तर डिजेल 12 रुपये 18 पैशांनी कमी, तर पॉवर पेट्रोल 5.8 पैशांनी कमी