महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
नागपूर : नागपुरात कलम 144(1) लागू
आज रात्री 12 वाजेपासून कलम 144 (1) लागू
अमरावती आणि इतर शहरात घडलेल्या घटनेचे पडसाद नागपुरात उमटू नये यासाठी घेण्यात आला निर्णय
शहरात शांतता राहावी म्हणून आरोग्याच्या कारणाव्यतिरिक्त 5 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्रित येण्यास मनाई
पंढरपूर : शहर व परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात
पंढरपूर शहरात धुवादार पाऊस
कार्तिक यात्रेमुळे श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली धांदल
फुटपाथवर बसलेल्या व्यापारांचे अचानक आलेल्या पावसामुळे झाले नुकसान
मनमाड : मनमाड-नांदगाव मार्गावर ईनोव्हा-ट्रॅक्टरची समोरासमोर धडक
भीषण अपघातातात 6 जण गंभीर जखमी
अपघात इतका भीषण की कारचा झाला चक्काचूर तर ट्रॅक्टर फेकला गेला खड्ड्यात
मुंबई : काही दिवसांपासून एसटी कामगारांनी आजाद मैदानामध्ये आंदोलन सुरू केले आहे. आज करुणा शर्मा यांनी या कामगारांना भेट दिली. आमच्याकडे शंभर-दीडशेपेक्षा जास्त एसएमएस मेसेज आणि लेटर दिलेले आहेत. त्याच्यासाठी मी आज भेट देण्यासाठी आले आहे, असे करुणा शर्मा यांनी सांगितले.
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय.
तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नक्षलवादविरोधी पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केलं. त्यांनंतर आता पोलीस माध्यमांशी संवाद साधत आहेत. नक्षलवाद्यांच्या घरच्यांना त्यांचे मृतदेह सोपवले जातील, तेलतुंबडे याच्यावर इतर राज्यातील पोलिसांनीदेखील बक्षीस जाहीर केलेलं होतं. आम्ही राबवलेल्या मोहिमेवेळी 100 पेक्षा जास्त नक्षलवादी असल्याचां संशय आहे. तेलतुंबडे गेल्यानंतर नक्षल चवळवळीला मोठे नुकसान झाले. ठार करण्यात आलेले सगळेच नक्षल वर्दीमध्ये होते. साध्या वेशात कोणीही नाही. त्या ठिकाणाहून बरेच सामान आणि साहित्य जप्त करण्यात आले. बाहेरून येणाऱ्या लक्षलवाद्यांची संख्या वाढली आहे.
पुणे : राज्यभरात एसटीचे कर्मचारी कामावर परतायला सुरुवात
आज दिवसभरात विविध आगारांत 821 कर्मचारी कामावर परतल्याची महामंडळाची माहिती
काल 3 हजार 166 कर्मचारी कामावर होते, तर आज 3 हजार 987 कर्मचाऱ्यांची हजेरी पटलावर नोंद
महामंडळाकडून एसटीचा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न ? की कर्मचारी स्वतःहून कामावर परतायला लागले
कोल्हापुरात एसटी बसवर दगडफेक
संप सुरू असताना एसटी सुरू केल्याने अज्ञातांकडून दगडफेक
दगडफेकीत एसटी चालक जखमी झाल्याची माहिती
हातकणंगले तालुक्यातील हलोंडी गावाजवळील घटना
घटनास्थळी पोलीस दाखल
मीरजवरून प्रवासी घेऊन कोल्हापूरच्या दिशेने येत होती बस
यवतमाळ- 4 दिवसांपासून सुरू असलेले शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन मागे
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी डीन डॉ गवारले यांनी लेखी आश्वासन देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे
रुग्णालयाचे दोन्ही मुख्य प्रवेशद्वार उघडले
4 दिवसापासून होते प्रवेशद्वार बंद, फक्त अत्यावश्यक रुग्णासाठी सुरू होते रुग्णालय
यवतमाळ – आर्णी नगरपरिषदेच्या नगरसेविकेची आत्महत्या
राहत्या घरी केली आत्महत्या
काँग्रेस पक्षाची सुरेखा मेडंके असे आत्महत्या केलेल्या नगरसेविकेचे नाव
नगरसेविकेच्या आत्महत्येने खळबळ
नाशिक : कर्मवारी काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा 39 वा गळीत हंगाम शुभारंभ थोड्याच वेळेत
– केंद्रीय माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याहस्ते उसाची मोळी टाकून होणार शुभारंभ
– पालकमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, निफाडचे आमदार दिलीप बनकर राहणार उपस्थित
भाजप नेते आशिष शेलार आझाद मैदानात दाखल
ही लढाई एसटी कर्मचाऱ्यांची लढाई नाही, ही लढाई समाजाला न्याय देण्याची
ठाकरे सरकारचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे
कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवायला एवढा वेळ लागतोच कसा
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात
25 जागांसाठी साठी 4615 उमेदवार
शहरातील 11 केंद्रावर होत आहे परीक्षा
परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील एंट्री पॉइंट ला पोलिसांचे मार्गदर्शन केंद्र
परीक्षेसाठी पाचशे पोलीस कर्मचारी आणि 60 अधिकारी तैनात
कडक तपासणी करून परीक्षार्थींना परीक्षा केंद्रांमध्ये दिला जात आहे प्रवेश
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात वारकरी दाखल व्हायला सुरुवात,
दोन वर्षानंतर पंढरपूरात भरतीये कार्तिकी एकादशी,
आजच पंढरपूरात मोठ्या प्रमाणावर वारकरी दाखल,
पंढरपूरात उत्साहाचं चैतन्याचं वातावरण,
उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शासकीय पुजेसाठी राहणार उपस्थित,
पंढरपूरात जमली वैष्णवांची मांदियाळी
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक घटली
गेल्या 24 तासात फक्त जिल्ह्यात 50 रुग्ण पॉझिटिव्ह
तर मृत्यू संख्या आली आटोक्यात
ग्रामीण भागात वाढत्या रुग्ण संख्यने आरोग्य विभागावर पडला होता ताण
मात्र नागरिकांना नियम पाळण्याच प्रशासनाकडून आवाहन
अंदमान आणि थायलंडच्या किनाऱ्यावरजवळ कमी दाबाच क्षेत्र तयार
कमी दाबाच्या पट्टयांच चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता
पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता
18 नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
17 नोव्हेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता
पुणे हवामान वेधशाळेने वर्तवला अंदाज
नाशिक पोलीस अकादमीत पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव
नाशिक पोलीस अकादमीत 22 प्रशिक्षणार्थी कोरोनाबधित
प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांपैकी 22 भावी उपनिरीक्षक पॉझिटिव्ह
बधितांवर नाशिकच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरु
दिवाळी साजरी करून परतलेल्या प्रशिक्षणार्थींची केली होती चाचणी
887 पैकी 22 जणांना कोरोना लग्न झाल्याच आलं समोर
इतर प्रशिक्षणार्थींना काळजी घेण्याच्या सूचना
कोल्हापूर
कोल्हापुराच्या पाडळी गावातील पूरग्रस्तांचा पूरबाधित अनुदानावर सामुदायिक बहिष्कार
पूर बाधित ऊस क्षेत्रासाठी देण्यात येतय प्रतिगुंठा 135 रुपये अनुदान
2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी
नाकारलेल अनुदान परस्पर खात्यावर जमा केल्यास रक्कम पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचा ग्रामस्थांचा इशारा
गावातील राजर्षी शाहू सेवा संस्थेच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी घेतला आक्रमक पवित्रा
नागपूर –
महापालिकेचे कर वसुलीचे अभियान जोरात
दररोज 1.78 कोटी वसुली चे उद्दीष्ठ
100 टक्के कर वसुली साठी करण्यात आले नियोजन
651. 75 कोटी ची जुनी थकबाकी वसूल करण्याच मोठं आवाहन
झोन निहाय कर वसुली चे उद्दीष्ठ
यावर्षात आता पर्यंत झाली 96 कोटी ची कर वसुली
मात्र अजून मोठं उद्दिष्ट गाठण्याच प्रशासन समोर आवाहन
कोल्हापूर
सातारा-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे मंगळवारपासून सुरु होणार
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद होती या मार्गावरील रेल्वे सेवा
कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे पॅसेंजर सुरू करण्याची प्रवाशांमधून होती मागणी
प्रवासी नोकरदार यांचा सातारा कोल्हापूर पॅसेंजर ला असतो सर्वाधिक प्रतिसाद
तर मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर ही उद्यापासून सुरू होणार
लांब पल्ल्या नंतर आता पॅसेंजर रेल्वे ही सुरू होत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान
पुणे
पुण्यातील हडपसरमध्ये साडेसतरा नळी इथं एका गोडाऊनला लागली होती भीषण आग,
आगीचं कारण अस्पष्ट,
अग्निशमन दलाच्या जवानांंनी आग आणली आटोक्यात,
आगीत कोणतीही जिवीतहानी नाही,
पुण्यात आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ
सोलापूर –
सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच
बस सेवा पूर्णपणे ठप्प
खासगी वाहतुकीला प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी
आता खासगी वाहतुकीकडे सुद्धा प्रवाश्यानी फिरवली पाठ
कोल्हापूर
कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू
कोल्हापूरातील एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूने हळहळ
अनिल मारुती कांबळे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव
2015 साली कामावर रुजू झाले होते
गारगोटी जवळील मडीलगे खुर्द गावचे रहिवासी
सध्या सावंतवाडी आगार चालक कम वाहक म्हणून काम करत होते
संप असल्याने ते मडीलगे येथे राहायला होते.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
नागपूर –
काँग्रेसचे आजपासून शहरात जनजागरण
महागाई विरोधात उठविणार आवाज
सकाळी 10 वाजता देवडिया काँग्रेस भवन मधून करणार अभियानाची सुरवात
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार जनजागरण अभियानाला सुरवात
माजी केंद्रीय मंत्री तारीक अनवर सुद्धा राहणार उपस्थित
26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या गडचिरोली पोलीस आणि सी 60 जवानांचं मनापासून अभिनंदन
एकनाथ शिंदे यांनी ट्विटकरून केले अभिनंद