महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
नागपूर : स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांना संविधान चौक नागपूर येथील अन्नत्याग सत्याग्रहादरम्यान पोलिसांनी घेतले ताब्यात
– नागपूर पोलीस रविकांत तुपकरांसह कार्यकर्त्यांना अमरावती पोलिसांच्या ताब्यात देत आहेत
– पोलीस कस्टडीमध्ये अन्नत्याग आंदोलनावर रविकांत तुपकर ठाम
– नागपूरात आज सकाळी सुरु केलं होतं अन्नत्याग आंदोलन
यवतमाळ- शरद पवार यांचा यवतमाळ आणि वर्धा जिल्हा दौरा रद्द
चंद्रपूर दौरा करून शरद पवार नागपूरहून जाणार परत
प्रकृतीच्या कारणास्थाव दौरा रद्द केल्याची माहिती
चंद्रपूर:- शहरात भर दुपारी उच्चभ्रू वस्तीत दरोड्याची घटना
मूल मार्गावरच्या अरविंदनगर येथील ठोक अंडेविक्री व्यावसायिक खालिद कोळसावाला यांच्या घरी पडला दरोडा
संध्याकाळी घरी 2 वृद्ध महिला असताना घडली घटना
तोंडावर मास्क बांधून असलेल्या 5 दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत वृद्ध महिलांना मारहाण करत लुटली रक्कम
बेडरूममध्ये तिघांनी थेट दिवाणातील 3 प्लास्टिक पिशव्या उचलून तातडीने केला पोबारा
एका पांढऱ्या चारचाकी वाहनातून पसार झाले दरोडेखोर
व्यापारी शहरात नसल्याने नक्की किती रक्कम गहाळ झाली याबाबत प्रश्नचिन्ह
पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी ठसे तज्ज्ञ आणि पथकासह घटनास्थळी दिली भेट
काही तासात संपूर्ण घटनेचा खुलासा होण्याची शक्यता
बीड: 32 लाखांचा गुटखा जप्त
गुटखा प्रकरणात शिवसेना जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल
जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेसह चार जणांवर गुन्हा दाखल
केज पोलिसांत गुन्हा दाखल
गुन्हा दाखल झाल्यावर जिल्हाप्रमुख खांडे फरार
अमरावती – अमरावतीमध्ये आम्ही शांतता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत
हिंदू-मुस्लीम सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावत आहोत
अमरावतीमध्ये घडलं तो एक कट होता, कट रचला गेला होता
ऍक्शनला रीऍक्शन देण्याच्या नादात हा सगळा प्रकार घडला आहे
ज्यांनी घडवलं तेच आरोप करत सुटले आहेत
सरकारचा प्रयत्न परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सुरू आहे
ब्रॉड बँड सेवा आज किंवा उद्यापर्यंत सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे
परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले
अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने गुन्हे शाखेतर्फे केलेल्या अर्ज़ाला दिली मंजुरी
गोरेगाव वसूली गुन्ह्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केला होता अर्ज , हा अर्ज न्यायल्याने केला मंजूर
30 दिवसाच्या आंत परमबीर सिंह हजर न झाल्यास त्यांची संपती जप्त केली जाणार
या प्रकरणात परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह हे तिन्ही फरार घोषित
पुणे कोरोना अपडेट
दिवसभरात 106 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 69 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 2 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 0.
-100 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 505613.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 843.
– एकूण मृत्यू -9088.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 485682.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5176
विदर्भ काय अनिल बोंडेंच्या बापाचा आहे काय ?
– अंकुश काकडेंचा अनिल बोंडेंवर हल्लाबोल
– शरद पवार महाराष्ट्रात कुठेही फिरू शकतात
– भाजपला राज्यातले वातावरण बिघडवाचे आहे
– एका माजी मंत्र्याला असं वक्तव्य करणं शोभत नाही.
पुणे : राज्यातील 2 हजार 296 रोजंदार कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाची सेवा समाप्तीची नोटीस
एसटी महामंडळानं घेतला मोठा निर्णय
सेवा समाप्तीची नोटीस बजावायला सुरुवात
25 चालक तर 2 हजार 101 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस
एसटी महामंडळानं दिली माहिती
पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी करणार पत्रव्यवहार
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, या मागणीसाठी अण्णा हजारेंना भेटले एसटीचे कर्मचारी
शिरूर तालूक्यातील कर्मचाऱ्यांनी घेतली भेट
एसटी कर्मचाऱ्यांना अण्णा हजारेंचं आश्वासन
राळेगणसिद्धीत जाऊन भेटले कर्मचारी अण्णा हजारेंना केलं आवाहन
समीर वानखेडे जन्मापासूनच मुस्लिम
मुंबई महापालिकेकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे
उद्या उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे
शिवसेना खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला
संजय राऊत मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी
– मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार
– पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
– अनिकेत विश्वासरावसह सासू, सासरे यांच्याविरोधात पत्नी स्नेहा विश्वासराव यांनी दिली तक्रार
– अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती
अमरावतीत हिंसाचार प्रकरण
शहरातील संचारबंदीचा आज 5 वा दिवस
अमरावती शहरात संचारबंदीत शिथीलता
जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आता दुपारी 12 ते 4 वेळेला परवानगी
अमरावती पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंग यांचे आदेश
कोल्हापूर
Vis on hotline
चालत्या गाडीला टेंबलाई मंदीराजवळ ओमणीला आग
कोल्हापुरातील टेंबलाईवाडी इथली घटना
कोल्हापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीला लागलेली आग विझवली
गाडीतील सर्व प्रवासी सुरक्षित
शॉर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती
आता काही राज्यात निवडणूक आहे
त्यावेळी सामान्य लोकांना जी आवश्यकता आहे, लोकांशी संवाद आम्हाला साधायचा आहे
देशाला भाजपची हुकूमशाही नको आहे, त्यामुळे लोकांना पर्याय हवा आहे
पण त्यासाठी आपलं घर मजबूत करायला हवं
दिल्ली शहरात आणि इतर शहरात आमच्या पक्षाचे काम सुरू आहे
देशाच्या राजधानीत राष्ट्रीय पक्षाची जी ताकद आहे, ती वाढवण्यासाठी शास्त्री जे माजी विधानसभा अध्यक्ष आहेत,
शास्त्री यांनी कामातून आदर्श घालून दिलाय
मी अध्यक्ष म्हणून शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मी स्वागत करतो
दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची पत्रकार परिषद
योगानंद शास्त्रींचा आज राष्ट्रवादीत प्रवेश
– नागपूर शहरात कलम 144 लागू असतानाही शरद पवार यांच्या सभेला परवानगी?
– शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पोलीसांच्या भुमिकेवर उपस्थित केला प्रश्न
– रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पोलीसांचा नोटीस
– शरद पवार यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती
– सायंकाळी पाच वाजता वर्धमान नगर येथील सातवचन लॅान येथे पवारांची सभा
पुणे
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज वाडेश्वर कट्ट्यावर
वाडेश्वर कट्ट्यावर सकाळच्या नाष्ट्यासह रंगणार रुपाली चाकणकरांशी गप्पा
कोल्हापूर
कोल्हापूरातील पन्हाळ्यावर पुन्हा बिबट्याचे दर्शन
डॉ. राज होळकर यांच्या घरात घुसला बिबट्या
होळकर यांच्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न
हा प्रकार लक्षात येताच होळकर यांनी आरडाओरड करून बिबट्याला पिटाळले
ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
वारंवार बिबट्याच्या अधिवासामूळे होळकर कुटुंबासह ग्रामस्थ भयभीत
नाशिक –
कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या भरती प्रक्रियेसाठी आज विशेष महासभा
भाजपची आज महासभेत परीक्षा
क आणि ड वर्गातील मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रयत्न
सरळसेवे साठी मानधनावरील कर्मचाऱ्यांची भरती करता येते की नाही याबाबत संभ्रम
विरोधकांच्या भूमिकेकडे संपूर्ण शहराचे लक्ष
पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचं काम रखडणार,
रस्त्याचं आधी रुंदीकरण करा त्याशिवाय काम सुरू करणार नाही पीएम आरडीएचं महापालिकेला पत्र,
प्रस्तावित प्रकल्पात रस्ता हा 45 मीटर रूंदीचा आहे मात्र प्रत्यक्षात रस्ता 36 मीटरचाच आहे,
रस्त्यावर बँरीकेडींग केल्यास अडथळा निर्माण होऊ शकतो,
त्यामुळे शक्य तितक्या जागा लवकर ताब्यात घ्या आणि रस्त्याचं रुंदीकरण करा,
पीएम आरडीएच्या मागणीनंतर उड्डाणपूलाचं काम रखडण्याची शक्यता आहे,
सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारला जातोय उड्डाणपूल
नाशिक –
हळदीला वाजवले वाद्ये आणि घराबाहेर धडकले पोलीस
विना परवानगी हळदीला वाद्य वाजवल्या प्रकरणी नवरदेवासह ढोल ताशा वादकांवर गुन्हे दाखल..
नाशिकच्या मल्हारखानी झोपडपट्टीत घडला प्रकार
विना परवाना वाद्य वाजवून गर्दी जमवल्याचा आरोप..
त्यामुळे नवरदेवाची वरात,पोलोसांच्या दारात असा प्रकार घडला
पुणे
पुण्यातील मुळा मुठा नदी स्वच्छ करून पालिका नदीकाठचा विकास करणार आहे
हा प्रकल्प राबविण्यासाठी 365 कोटीची पहिल्या टप्प्यात निवीदा काढण्यात आलीये
विकसन प्रकल्पासाठी 12 कंपन्यांनी तयारी दर्शविलीये
मुठा मुठा नदीच्या 44.कि.मी पर्यंत विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे
या प्रकल्पासाठी 4 हजार 567 कोटींचा खर्च येणार आहे
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीचे सदस्यांची उद्या बैठक
धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात बैठकीचे नियोजन
पालकमंत्री सतेज पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,खासदार संजय मंडलिक राहणार उपस्थित
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्यांची महत्वाची बैठक
– स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरी यांचं आजपासून ‘बेमुदत अन्नत्याग आंदोलन’
– कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी अन्नत्याग आंदोलन
– नागपूरच्या संविधान चौकात थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात
– नागपुरात जमावबंदीचे आदेश असल्यानं तुपकर यांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांचे तुपकरांना पत्र
– संविधान चौकात चोख पोलीस बंदोबस्त
– नागपुरात कलम १४४ लागू असल्याने कारवाई होऊ शकते
पुणे
-पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भात कापणी आणि झोडपनी अंतिम टप्प्यात
-भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यात पारंपरिक भात वाणाबरोबर संकरित भाताच्या वाणाला मोठी पसंती मिळत आहे
-मावळचा इंद्रायणी वाण राज्यभर प्रसिद्ध आहे
-आंदर मावळ,नाणे मावळ,पवन मावळ या सर्व भागात भात कंपनी आणि झोडपनीची कामे अंतिम टप्प्यात आलीत
रत्नागिरी –
पश्चिम महाराष्ट्र- कोकण दरम्यानच्या दळवळणाला मोठा दिलासा
चार महिन्यांपासून बंद असलेला आंबा घाट अवजड वाहनांना सुरू
20 टनापर्यतच्या वाहनांना आता आंबा घाटातून करता येणार वाहतूक
प्रवाशी वाहतुकीसह माल वाहतुकीला देखील मोठा दिलासा
कोल्हापूर
विधानपरिषद निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एक ही अर्ज दाखल नाही
मात्र 8 उमेदवारी अर्जांची झाली विक्री
दोन व्यक्तींनी प्रत्येकी 4 असे आठ अर्ज नेले
महा विकास आघाडीचे उमेदवार गृहराज्यमंत्री सतेज पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
इच्छुक उमेदवाराला दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार
मतदार यादीतील दहा सुचकांची नाव स्वाक्षरीसह आवश्यक
– स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरी यांचं आजपासून ‘बेमुदत अन्नत्याग आंदोलन’
– कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी अन्नत्याग आंदोलन
– नागपूरच्या संविधान चौकात आजपासून आंदोलनाला सुरुवात
– 18 नोव्हेंबर ला मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक गावात प्रभात फेरी, धरणे आणि ठिय्या आंदोलन
– 19 नोव्हेंबर ला मराठवाडा आणि विदर्भात रास्तारोको आंदोलन
– दरम्यान शहरात जमावबंदी चे आदेश असल्यानं तुपकर यांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांचे तुपकरांना पत्र
– राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आजपासून चार दिवस विदर्भ दौऱ्यावर
– शरद पवार यांचे आजपासून चार दिवस ‘मिशन विदर्भ’
– नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा
– कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार
– निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा दौरा
– भाजपच्या गडात राष्ट्रवादीचं ‘मिशन विदर्भ’
– आज एक वाजता नागपूरात आगमन, व्यापाऱ्यांसोबत बैठक, पत्रकार परिषद आणि कार्यकर्ता मेळावा
– पवार यांच्या दौऱ्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, पक्षाला बळ मिळणार
चंद्रपूर –
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.
हा आदेश 16 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपासून तर 30 नोव्हेंबर 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंत लागू असेल
मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) आदेश लागू करण्यात आले आहे
– विदर्भवादी नेते राम नेवले यांचं निधन
– हार्ट अटॅकने मध्यरात्री झालं निधन
– राम नेवले यांनी स्वतंत्र विदर्भासाठी अनेक आंदोलनं केलीत
– राम नेवले यांच्या मृत्यूने स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीचं मोठं नुकसान
सामना अग्रलेख –
महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते
त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले
हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांनी मांडली, पण त्यांनी हिंदूंना सर्वधर्मभावची शिकवण दिली
मातृभूमीला वंदन करणारा प्रत्रेक धर्मीय आपला देशाचा असे ठासून सांगितले
विस्कळीत विचारांचे हिंदुत्व एका अवाढव्य ढिगाऱ्याप्रमाणे पडले होते
त्या अवाढव्य ढिगाऱ्याला शिवसेनाप्रमुखांनी एका वास्तूचे रूप दिले
त्या वास्तूत शिरलेले नेभळट आज शिवसेनेवर
हिंदुत्वावर लेक्चर देतात, तेव्हा लोक म्हणतात आज बाळासाहेब हवेच होते!
शिवतीर्थावर बाळासाहेब विसावले आहेत, पण ते विसावणेही प्रेरणा देत आहे
एक योद्धा शिवतीर्थवरून बळ देत आहे! ते महायोध्दाच होते!!
यवतमाळ –
मनसेने विदर्भात सुरु केली मोर्चे बांधणी
यवतमाळ जिल्ह्यातील अति दुर्गम वणी विधानसभेतील झरी भागात
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत 1500 लोकांचा मनसेत प्रवेश
राजू उंबरकर च्या नावाने विधानसभा निवडणुकीत मनसेला साथ द्या असे केले आवाहन
ठाण्यातील बाळकुम येथील दुर्गा अंकुर इमारती जवळील भंगार मालाच्या गोडाऊनला अचानक पणे रात्रीच्या 12 : 15 वाजता लागली आग.
घटनास्थळी आपतीव्यवस्थापन ,एक अग्निशमन दल ,एक पाण्याचा टँकर दाखल .
कोणतीही जीवितहानी नाही..