महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
अकोला : अकोल्यात 25 नोव्हेंबरपर्यंत रात्रीची संचारबंदी
23 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी
आता 25 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे रात्रीची संचारबंदी
शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अकोला शहरात कलम 144 जारी करण्यात आले
रात्री दहा ते सकाळी पाच या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे
या कालावधीत आरोग्य सेवा सुरू राहणार आहे
गडचिरोली : जिल्ह्यात 172 ग्रामपंचायतीत 351 जागांसाठी 21 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत पोटनिवडणूक होणार
निवडणूक आयोगाने आज जाहीर केले गडचिरोली जिल्ह्यातील पोटनिवडणुकीचे कार्यक्रम
सदर 351 जागा विविध कारणामुऴे रिक्त झालेल्या आहेत
21 डिसेंबर रोजी सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत होणार मतदान
22 डिसेंबरला 351 जागांसाठी मतमोजणी होणार
यात नक्षलग्रस्त भागातील काही तालुक्यातही मतदान संपन्न होणार
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील बाबा पेट्रोल पंपाचे अखेर सील काढले
कोविड नियमांचे पालन करण्याच्या अटीवर काढले पेट्रोल पंपाचे सील
जिल्हाधिकाऱ्यांनी सुनील चव्हाण यांनी स्वतः येऊन काढले पंपाचे सील
लसीकरणाचे प्रमाणपत्र न पाहता पेट्रोल दिल्याने पंप केला होता सील
स्वतः जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत सील केलेला पेट्रोल पंप करण्यात आला खुला
ग्राहकांकडून नियमांचं पालन करून घेण्याच्या अटीवर खोलले पंपाचे सील
औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर कडक नियमावली जारी
नागपूर : नागपूरच्या शासकीय वैदयकिय महाविद्यालयाच्या मेडिकलमध्ये इंटर्न महिला पॅरामेडिकल कर्मचाऱ्याला दाखवली पिस्तूल
गोळी झाडण्याचा प्रयत्न, मात्र फायर झालं नाही
आरोपी हा मुलीला ओळखत असून प्रेम प्रकरणाची पार्श्वभूमी असण्याची शक्यता
विक्की चकोले अस युवकाचं नाव
आरोपी घटना स्थळावरून पळून गेला
पोलीस घटनास्थळी दाखल
मुंबई : मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील शिवसेना उमेदवार सुनील शिंदे उद्या सकाळी अकरा वाजता मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय इथं उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी शिवसेना नेते खासदार आमदार आणि नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
पुणे : एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांची प्रकृती बिघडल्याने PSI 2019 च्या जाहीरातीमधील शारीरिक चाचण्या आणि मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलला
एमपीएससीनं परिपत्रक काढून दिली माहिती
नाशिक, पुणे, आणि कोल्हापूर या केंद्रावर शारीरिक चाचण्या घेतल्या जाणार होत्या
मुलाखत कार्यक्रम अध्यक्षांची प्रकृती बिघडल्यानं पुढे ढकलण्यात आलाय
नवीन शारीरिक चाचणी मुलाखत कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार, एमपीएससी आयोगाची माहिती
मुबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते आज न्यायालयासमोर मोठं आव्हान होतं. मला तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं होतं. जीवावर गोळी घ्यायची आणि लोकांना न्याय द्यायचा असं आमचं कुटुंब आहे. माझा छोटा भाऊ गोपीचंद पडळकर आलेले आहेत. आंदोलन होत आहे. कष्टकऱ्यांची इज्जत आणि इभ्रत महत्त्वाची आहे. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत पावसात बसले होते. येथे पावसात लाईट नाही. हा कसला जुलूम आहे. हे मी न्यायालयात सांगितले आहे. क्यांना सुरक्षा पुरवण्याचे काम राज्य सरकारचे नाही का, असे सदावर्ते म्हणाले.
नांदेड :मुंबई एनसीबीची नांदेडमध्ये दुसरी मोठी कारवाई
डोडा पावडर बनवणाऱ्या कारखान्यावर धाड
लाखो रुपयांच्या अंमली पदार्थासह 50 किलो डोडा पकडला
तब्बल 25 लाख रुपये रोख जप्त केल्याची माहिती
गेल्या सोमवारी एनसीबीने नांदेडमध्ये पकडला होता कोट्यवधीचा गांजा
पुणे कोरोना अपडेट
दिवसभरात 95 कोरोना रुग्णांची वाढ
– दिवसभरात 75 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधित 4 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 2
-102 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 505961
ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 867
– एकूण मृत्यू -9096
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज-49598
अहमदनगर : अहमदनगर शहरात जोरदार पावसाला सुरुवात
सकाळपासून होते ढगाळ वातावरण
तर दुपारी ऊन पडल्यानंतर देखील जोरदार पाऊस
पावसामुळे सखल भागात पाणी साचलं
तर फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता, द्राक्ष बागांना बसणार फटका
पुणे : 23 आणि 24 ला महाबळेश्वरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा
शरद पवार आणि अजित पवार लावणार हजेरी
आगामी महापालिका निवडणुकांसदर्भात युवकांचा महत्वाचा मेळावा
स्वतः अजित पवार आणि शरद पवार करणार मार्गदर्शन
शरद पवार 24 ला करणार समारोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे मंत्री राहणार उपस्थित
जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व
जळगावात भाजपला मोठा धक्का
21 पैकी 20 जागा जिंकून सिद्ध केले वर्चस्व
एका जागेवर भुसावळातून भाजपचे आमदार संजय सावकारे विजयी तर यावलमधून भाजपचे दुसरे उमेदवार गणेश नेहते पराभूत
राष्ट्रवादीकडून माजीमंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे हे दिग्गज विजयी
21 जागांमध्ये 11 राष्ट्रवादी काँग्रेस, 7 शिवसेना, 2 काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झालाय
पुणे –
स्टाफ सिलेक्शनच्या पेपरला उशीर झाल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडलं नाही,
एसटीचा प्रवास बंद असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणं झालं अवघड,
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे वेळेवर पोहोचायचं कसं ? विद्यार्थ्यांचा सवाल,
पुण्यातील रामवाडीतील परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी आक्रमक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कामकाज ठप्प
शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी पुकारले कामबंद आंदोलन
विद्यापीठातील शेकडो कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी
विद्यापीठाच्या लॉनवर एकत्र येत कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी सुरू
कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू करण्यासाठी विद्यापीठ कर्मचारी आक्रमक
शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या वरळी सेंटर हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली असल्याचं कळतं
एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचं मुंबईत आंदोलन सुरु आहे दुसरीकडे शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्यात बैठक सुरु
गेल्या तासाभरापासून शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्यात वरळी सेंटर हॉटेलमध्ये बैठक सुरु आहे
एसटी कामगारांचे विविध प्रश्न आहेत, एसटीचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे.
मात्र, अनिल परब यांनी या प्रश्नावर ठामपणे माहिती दिलेली नाही. अनिल परब हे या प्रश्नी देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटले
नाशिक –
भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
अमरावती,मालेगाव दंगली नंतर भाजप आक्रमक
भाजपच्या वतीने घोषणाबाजी
आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा
– थोड्याच वेळात भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे भरणार उमेदवारी अर्ज
– नागपूर जिल्हा विधानपरिषद निवडणूकीसाठी भरणार अर्ज
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भरणार अर्ज
– बावनकुळेंचा अर्ज भरताना भाजपचं शक्ती प्रदर्शन
– नागपूरातील आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय भाजपची रॅली
जळगाव जिल्हा बँकेतील 10 जागांच्या मतमोजणी पैकी 3 जागांचा निकाल जाहीर
भुसावळ येथील भाजपा आमदार व भुसावळ विकास सोसायटी चे उमेदवार संजय सावकारे यांचा विजय
तर महाविकास आघाडी च्या सहकार पॅनल चे उमेदवार शांताराम धनगर यांचा पराभव
चोपडा येथे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनल चे घनःश्याम अग्रवाल विजयी
यावल महाविकास आघाडीच्या सहकार पॅनल चे विनोद पाटील
एसटी कर्मचाऱ्यांनंतर आज राज्यभरातील विद्यापीठ, महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच कामबंद आंदोलन
सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी
राज्य सरकारने आश्वासन देऊनही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत रुजू करून घेतलं नाही, कर्मचाऱ्यांचा आरोप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचारी आज करणार आंदोलन
कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप
बीड :
गुटखा तस्करी प्रकरण
शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांना पदावरून काढले
लवकरच नवीन जिल्हा प्रमुख जाहीर होणार
शिवसेना कार्यालयातून खांडे यांच्यावर कारवाई
खांडे यांच्यावर अनेक अवैध धंद्याचे होते आरोप
केडीएमसीतील 4 भाजप नगरसेवक व नगरसेविका शिवसेनेच्या वाटेवर..
डोंबिवलीत भाजप माजी नगरसेवक महेश पाटील भाजप माजी नगरसेविका सुनीता पाटील,भाजप माजी नगरसेविका सायली विचारे शिवसेनेत करणार प्रवेश..
आज 4 वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश होण्याची शक्यता..
इतर 2 माजी नगरसेवक नगरसेविका शिवसेनेत जाण्याची शक्यता..
कल्याण मधील 2 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत जाण्याची शक्यता..
नागपूर ब्रेकिंग –
अधिवेशन चार आठवड्याचे घ्या, नाही तर विदर्भासाठी विशेष निधी द्या, जनमंचची रोख ठोक भूमिका
हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यावरून राज्य सरकार ची भूमिका अजूनही स्पष्ट नाही
अधिवेशन झालं तरी ते चार ते पाच दिवसांच होत
त्यामुळे विदर्भाचे प्रश्न सुटत नाही
त्यामुळे अधिवेशन चार आठवड्याचे घ्या ,नाहीतर विदर्भाला विशेष निधी द्या
अशी मागणी करण्यात आली
पालघर –
पालघर शहरात कुबेर शॉपिंग सेंटरमध्ये लागली भीषण आग,
कपड्याची एका दुकानाला लागली भीषण आग,
आगी चे कारण अस्पस्ट
स्थानिकांना पासून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू
पुणे
पुण्यात आजपासून तीन रुपयांची रिक्षा भाडे वाढ लागू
पुणेकरांना जादा पैसे मोजावे लागणार
सध्या, पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी 18 रुपये दर आकारण्यात येत होते
आजपासून तीन रुपयांची वाढ असून, आता 21 रुपये मोजावे लागणार
रिक्षा चालकाने ऑटोरिक्षांचे मीटर पुन: प्रमाणीकरण करणे बंधनकारक असताना अनेक जण मीटर पासून वंचित
पुणे
पुण्याजवळील रिंगरोडची रूंदी जवळपास निम्म्याने घटणार,
राज्य सरकारकडे पीएम आरडीएनं पाठवलेल्या प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास विभागाची मंजूरी,
प्रस्तावित रिंगरोडला शेतकऱ्यांचा मोठा विरोध होता, यासंदर्भात शेतकऱ्यांनी आंदोलनही केलं होतं,
मात्र आता 110 मी रूंदीऐवजी तो 90 मीटर रूंदीचाच करण्याचा निर्णय घेण्यात आलाय,
एकुण 128 किमीचा हा रिंगरोड असणार आहे…
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांसाठि हा रिंगरोड महत्वाचा ठरणार आहे…
नाशिक – भाजपच्या वतीने आज आंदोलन
सकाळी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
अमरावती,मालेगाव दंगलीच्या पार्शवभूमीवर भाजप आक्रमक
आंदोलनाला पोलिसांच्या परवानगी बाबत साशंकता
घटनेचा निषेध करून जिल्हाधिकार्यना देणार निवेदन
– भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आज भरणार उमेदवारी अर्ज
– नागपूर जिल्हा विधानपरिषद निवडणूकीसाठी भरणार अर्ज
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भरणार अर्ज
– बावनकुळेंचा अर्ज भरताना भाजप करणार शक्ती प्रदर्शन
– काँग्रेसकडून छोटू भोयर यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता
– विदर्भात दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा
– काल दुपारपासून विदर्भाच्या बऱ्याच भागात ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस
– अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता
– गहू, चणा, तूर आणि भाजीपाला पिकाला अवकाळी पावसाचा फटका
– अवकाळी पावसाने वाढवली शेतकऱ्यांची चिंता
भिवंडीत एक 5 मजली इमारती मधील लिफ्ट कोसळल्याने लिफ्ट मधील 4 जण जखमी ,1 फॅक्चर
नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसच्या 15 खासदारांचे शिष्टमंडळ नवी दिल्लीत दाखल
त्रिपुरामधील तृणमूलवरच्या कारवाईबाबत खासदार करणार धरणे आंदोलन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता
केंद्र सरकारला तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा घेरण्याची शक्यता
अधिवेशनापूर्वी राजधानीत तृणमूल काँग्रेस आक्रमक होणार