सध्या मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज त्यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारकडून पहिल्यांदा एक पाऊल पुढे येत अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव देण्यात आलाय. सरकारच्या या प्रस्तावाबाबत एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन भूमिका स्पष्ट करणार असल्याचं पडळकर आणि खोत यांनी सांगितलं आहे. तर, दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. ज्यामध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवला. तर आजदिवसभरात काय घडणार, महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज सर्व माहिती एकाच ठिकाणी
नवी दिल्ली
ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर
शरद पवार , उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
ममता 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
30नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी मुंबई दौरा
ममतांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
नागपूर
विधान परिषद निवडणुकी पूर्वी नागपुरातील भाजप नगर सेवकांची डिनर बैठक असल्याची माहिती
नागपुरातील रेडिसन ब्लु हॉटेल मध्ये बैठक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,बैठकीला उपस्थित
भाजप चे विधान परिषद चे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे ही बैठकीला उपस्थित
नागपुरातील सगळे नगर सेवक उपस्थित असल्याची माहिती
सगळ्या नगर सेवकांना सूचना दिल्या जाण्याची शक्यता ..
चंद्रपूर
वाघाच्या हल्यात ग्रामस्थ महिला ठार, पोंभूर्णा तालुक्यातील कसरगट्टा येथील घटना,
शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी अन्य महिलांसह गेली होती महिला,
देवीबाई हनमंतु धोढरे 50 असे महिलेचे नाव, घटनेमुळे ग्रामस्थांत तीव्र संताप,
वन कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल
शरद पवार
– पक्ष स्थापनेनंतर या पक्षाचं नेतृत्व करणारे 60 जिल्ह्यात तरुण होते
– राज्यामध्ये नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करण्याची आमची जबाबदारी आहे,
– तरूण नेतृत्व पुढे आणायचे आहे,
पुणे कोरोना अपडेट
दिवसभरात 95 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 106 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00.
-101 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 506201
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 823
– एकूण मृत्यू -9099
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 496279
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4842
नागपूर
वाघ नख आणि दातासह पाच जणांना अटक,
नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे वाघ नख आणि दातांची विक्री करणार असल्याची माहिती वन विभागाच्या विशेष पथकाला मिळाली.
त्यावरून सापळा लावून करवाई करत पाच जणांना अटक करण्यात आली.
यातील एक आरोपी हा वन विभागाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा सदस्य असल्याचेही पुढे आले,
यात आणखी आरोपीना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे,
मुंबई
भाजप नेते किरीट सोमय्या निकेत कौशिक आयुक्त अपराध शाखा मुंबई यांना भेटण्यासाठी CP कार्यालयात दाखल..अर्जुन खोतकर यांच्यावर जालना साखर कारखाना घोटाळा च्या आरोप किरीट सोमय्या यांनी केलीय..जालना साखर कारखाना घोटाळा प्रकरणी आयुक्त अपराध शाखा मुंबई यांना लेखी तक्रार देण्यासाठी CP कार्यालयात किरीट सोमय्या पोहचले..
महाबळेश्वर
– राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यव्यापी शिबिराचे समारोप,
– शरद पवार, दिलीप वळसे पाटील, अमोल कोल्हे यांची उपस्थिती,
शरद पवार
– 52 वर्षा पूर्वी शिबिराला आलो होतो…हळूहळू शिबिर कमी झाली
– राज्यामध्ये नगरपालिका,जिल्हा परिषद निवडणुक प्रक्रिया सुरू होणार यासाठी युवकांना जागरूक करण्यासाठी है शिबिर आहे..
– गुजरातचे वेतन महाराष्ट्र पेक्षा कमी आहे
– महाराष्ट्र पेक्षा इतर राज्यांचे वेतन जास्त आहे
– तरुणांची अपेक्षा असणार आम्हाला संधी मिळावी
राज्यात तिन्ही पक्षाच मिळून सरकार स्थापन झालाय… पुढील निवडणूकीत एकत्र लढता येईल का हे पाहणार
शशीकांत शिंदे यांनी निवणुक सिरियस घ्यायला हवी होती
जिल्हा बँकेची निवडणूक पक्ष म्हणून झाली नाही
जिल्हा बँकेत निवडून येणाऱ्या पैकी राष्ट्रवादी ची लोक जास्त…
– St संपावर-
आढावा बैठक घेतली नाही
-St प्रश्नावर आर्थिक काही बाबी होत्या..
– St अडचणीत आहे…
– St स्वतःच्या तक्तीवर आणि पॅसेंजर तक्तिवर चालत होती…
-विलिनीकरण हाय कोर्टात कमिटी ठरवेल
-विलिनीकरण काही बोलणार नाही…
– युनियन जास्तअसल्याने करार कोणाशी करायचा?
-प्रश्न चर्चेतून सुटेल पण चर्चा कोणाशी करायची
– विलिनीकरण निर्णय घेतला तर परिमाण काय होईल?
– St कर्मचारी वर्ग सरकारशी संबंधित आहे का
– असं केलं तर इतर सर्वांचा विचार करावा लागेल
– जर सरकारने पार्लमेंट मधे विषय मांडला असता किंवा राज्य सरकार ला विश्वासात घेतलं असत तर परिस्थिती वेगळी असती
जुन्नर, पुणे
-पुण्यात आणखी एक दिवसाढवळ्या धाडसी दरोडा पडलाय
-दरोड्यावेळी झालेल्या गोळीबारात एक गंभीर जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे
-अनंत पतसंस्थेत दोन अज्ञात घुसले, मॅनेजरकडे पैश्याची मागणी केली.नकार देताच त्यांच्यावर गोळीबार केला आणि दोन ते अडीच लाखांची रोकड लंपास केली
-जुन्नर तालुक्यातील कांदळी गावात ही धक्कादायक घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. नारायणगाव पोलीस त्या चोरट्यांच्या शोधात आहेत, तर जखमीला रुग्णालयात दाखल केलंय. गेल्या महिन्यात शिरूर तालुक्यातील एका बँकेत दिवसाढवळ्या दरोडा पडला होता
-ह्या दरोड्याची आणि गोळीबाराची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
पुणे ग्रामीण पोलिसांकडून नाकाबंदी सुरु
उपचारा दरम्यान बँकेचे मॅनेजर राजेंद्र भोर यांचा मृत्यू
मुंबई
विलिनीकरण हा विषय मार्गी लावावा ही आमची भूमिका – पडळकर
सकारात्मक चर्चा सुरु आहे, अधिकृत निर्णय आल्यानंतरच प्रतिक्रिया देऊ – पडळकर
1. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा सरकारकडून प्रस्ताव
2. किमान 5000 ते कमाल 21 हजारापर्यंत वेतनवाढीचा प्रस्ताव
3. कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात जास्त वाढ करमार
4. एसटी कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला वेळेत पगार मिळण्याची खबरदारी
5. प्रत्येक महिन्याच्या 5 ते 10 तारखेला पगार होण्याची खबरदारी घेणार
6. वरिष्ठ कर्मचाऱ्यांचं वेतन 50 हजाराहून जास्त असल्याल त्यांना कमी वेतनवाढ
मुंबई
परिवहन मंत्री आणि एसटी कर्मचारी शिष्मंडळामध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या
अजित पवारांच्या भेटीनंतर पुन्हा बैठक होणार
परीवहन मंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सह्याद्री अतिथिगृहातून बाहेर पडले
आज संध्याकाळी 6 वाजता एकत्र पत्रकार परीषद घेऊन ST संपा संदर्भात मोठी निर्णायक घोषणा करणार
अनिल परब प्रस्ताव घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना
बैठकीत पगारवाढीच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा, सूत्रांची माहिती
– नाशिकच्या पेठ रोड परिसरात रात्री राजेश शिंदे या भाजीपाला विक्रेत्याचा निर्घृण खून झाल्याने तणावपूर्ण वातावरण
– मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा,स्थानिकांची मागणी
– मोठा जमाव आला होता रस्त्यावर
– मात्र आता परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाल्याने वातावरण निवळण्यास सुरुवात
शरद पवार –
राज्यात पुढे महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका
कार्यकर्त्यांनी याबाबत जागृत करणं रगजेचं
अनेक तरुण नेत्यांशी मी आज संवाद साधला
शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती
शशिकांत शिंदे यांनी निवडणुकीत एका मताने पराभव
ही स्थानिक पातळीवरची निवडणूक लढवली
मविआ म्हणून आम्ही निवडणूक लढवलेली नाही
देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर
संजय राऊत, सचिन तेंडुलकरनंतर फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला
बीड :
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयाने बजावले वारंट
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यावर जामीनपात्र वारंट
नोटीस देऊनही हजर न राहिल्याने औरंगाबाद खंडपीठाकडून वारंट जारी
शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याचे प्रकरण
अवमान याचिकेत जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अमरावतीत आगमन
श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा राज्यपालांचे हस्ते होणार शुभारंभ
औरंगाबाद –
निलंबित एसटी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पेढे वाटून केली गांधीगिरी
औरंगाबाद बस स्थानकाच्या डेपो मॅनेजर ला पेढे वाटून केली गांधीगिरी
निलंबित कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना वाटले पेढे
औरंगाबाद –
एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम
औरंगाबाद बसस्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र
बस स्टँड आवारात एसटी कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू
विलनिकरणाशिवाय दुसरा कुठलाही प्रस्ताव मान्य नसल्याची कर्मचाऱ्यांची भूमिका
महाबळेश्वर –
– राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यव्यापी शिबिराचा समारोप
– शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार समारोप
– त्याआधी शरद पवार भिलार येथील जेष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी घेणार भेट
– शिबिराच्या समारोपानंतर शरद पवार मीडियाशी बोलण्याची शक्यता
कोल्हापूर
एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ प्रवासी विद्यार्थी उतरले रस्त्यावर
कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात विद्यार्थ्यांनी प्रवाशांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ला समर्थन देत जोरदार घोषणाबाजी
कर्मचाऱ्यांच्या संपला दिला पाठिँबा
लाल परी रस्त्यावर झाली पाहिजे अशी केली मागणी
गडचिरोली वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार
चुरुमुरा जंगल परिसरातील घटना जिल्ह्यातील वाघाची
एक वर्षात वाघाच्या बळीची संख्या 17 वर
सध्या गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली चामोर्शी आरमोरी देसाईगंज या तालुक्यातील परिसरात वाघाची खूपच दहशत आहे
परवाच्या दिवशी एका महिला शेतकऱ्याने वाघाच्या परतावला लावला होता
पण काल सायंकाळच्या सुमारास वाघाने एका महिलेवर हल्ला करून महिलेचा बळी काढला
इंद्रिरा उद्धव आत्राम ६० वर्षाचा मृतक महिलेचे नाव असून
शेताच्या कामातून परत येताना वाघाने केला हल्ला
गडचिरोली जिल्ह्यातील चुरमुरा जंगल परिसरातील घटना
पुणे
पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमधील बाथरूममध्ये केलं छुपं चित्रीकरण
परिचारीकेचा फोटो काढण्यासाठी कर्मचाऱ्यानं ठेवला होता छुपा कँमेरा,
बंडगार्डन पोलिसांनी आरोपीला केली अटक,
परिचारीकेचा फोटो काढल्याचं उघड,
पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमधला प्रकार
युपीएससी 2021 च्या जाहीरातीचं मुख्य परीक्षांच वेळापत्रक जाहीर,
10 ऑक्टोबरला झाली होती युपीएससीची पुर्व परीक्षा,
पुर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देता येणार मुख्य परीक्षा,
भारतीय प्रशासकीय सेवेतील विविध 719 पदांसाठी होतीये परीक्षा,
7 जानेवारी ते 9 जानेवारी आणि 15 ते 16 जानेवारी दरम्यान होणार मुख्य परीक्षा,
युपीएससीच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर
नाशिक – अवकाळी आणि ढगाळ हवामानाचा भाजी पिकांना फटका
टोमॅटो चे दर वधारल्याच चित्र
गेल्या आठवड्यात 40-45 रुपये किलो असलेले टमाटे आजण 60 रुपयांपर्यंत..
बाजारातील अस्थिरतेचा भाजी विक्रेत्यां सोबत ग्राहकांना देखील फटका
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पद वादात
संजय पांडे यांचे महासंचालक पद जाण्याची शक्यता
लोकसेवा आयोगाकडून शिफारस नसल्याचं स्पष्ट
लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या नावांमधून निवड नाही
लोकसेवा आयोगाकडून तीन नावांची शिफारस
संजय पांडे यांना लवकरच पायउतार व्हावे लागणार
नाशिक शहरात चोरट्यांनी लहान मुलांना लक्ष केल्याने नागरिकांमध्ये भीती
लहान मुलांना गाठून चोरटे सोन्या चांदीचे दागिने करतायत लंपास
नुकताच सिडको परिसरात घडलेला प्रकार बघता पोलिसांनी वेळीच चोरट्याना आवर घालण्याची गरज
मुलीने सोन्याचे लॉकेट दिले नाही म्हणून चोरट्याने मुलीच्या हातावर कट्यारने वार करून काढला होता पळ
पालकांनी लहान मुलांवर लक्ष देण्याची गरज
नाशिक – फाळके स्मारकचे पुढील 25 वर्षांसाठी खासगीकरण करण्याचे आयुक्तांचे संकेत
अनेक वर्षांपासून दुरवस्थेच्या गर्तेत सापडलेल्या फाळके स्मारकला खासगीकरणाच्या माध्यमातून उभारणी देण्याचा प्रयत्न
दिगदर्शक नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओ आणि मंत्रा एक्स्पोर्ट या दोन कंपन्या फाळके स्मारक चालवण्यास घेण्याच्या तयारीत
फाळके स्मारकसाठी 89 कोटी रुपयांच्या खर्चाचा डीपीआर
नाशकात येत्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग
मुख्य सभा मंडपाच काम अंतिम टप्प्यात
अनेक कलाकारांची नाशकात भरणार पर्वणी
मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीच्या बारीक सारीक गोष्टींवर पालकमंत्र्यांची नजर
मात्र एकीकडे मराठी साहित्य संमेलन तर दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलन त्यामुळे वादाचे संकेत
विद्रोही साहित्य संमेलनास प्रशासन मदत करत नसल्याचा आयोजकांनी केलाय आरोप
नागपूर शहरात कचऱ्याच्या ढिगाऱ्या मुळे शहर स्वच्छतेचा बट्ट्याबोळ
आचार सहिते मुळे आम सभा लांबणीवर
या साठी बनविण्यात आलेल्या समितीच्या अहवालाची सहा महिन्या पासून प्रतीक्षा
स्वच्छतेच्या बाबतीत शहर 18 नंबर वरून 23 व्या क्रमांकावर गेले
शहरात कचरा संकलनाचे काम दोन कंपन्या करतात मात्र फायदा नाही
महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज
नाशकातील ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावले
द्राक्षे उत्पादक शेतकरी चिंतेत
डाऊनी,भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला
खराब वातावरणामुळे शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका
दररोज करावी लागतीये महागड्या औषधांची फवारणी
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात ६ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू
विधान परिषद निवडणूक आणि राज्यात काही दिवसापूर्वी घडलेल्या धार्मिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केले आदेश
पाचपेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येण्यासाठी परवानगी नाही
– नागपुरात ७० रुपयांची लाच घेताना सेतूचा कर्मचारी जेरबंद
– लाच स्वीकारणाऱ्या पवन बिनेकर याला एसीबीने जेरबंद केलंय
– उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात मागीतली ७० रुपयांची लाच
– कारवाईमुळे तहसील कार्यालयात खळबळ
– सर्वात कमी लाचेची रक्कम स्वीकारताना जेरबंद झालेले पहिलेच प्रकरण असावे
औरंगाबादेत मद्यप्रेमींसाठी धक्कादायक बातमी
लस घेतली असेल तरच मिळणार दारू
लसीचा एकही डोस जर झाला नसेल तर सॉरी..!
लसीचा डोस घेतला नसेल तर दारूचा विषय सोडा
लस घेतली नसेल तर तुम्हाला औरंगाबाद शहर जिल्ह्यात मिळणार नाही दारू
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय