महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यामागे पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसात याबाबत तक्रार केली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी याबाबतचे सीसीटीव्ही फुटजे देखील मिळवल्याची माहिती वानखेडे यांनी दिली आहे. त्यामुळे वानखेडे यांच्यावर कोण आणि कशासाठी पाळत ठेवत आहे? असा प्रश्न निर्माण होतोय.
अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया :
– नितीन गडकरी यांच्यासोबत जवळपास साडेतीन तास मॅराॅथाॅन बैठक झाली
– सर्व महामार्गाबाबात सविस्तर चर्चा झाली
– भूसंपादन बाबत चर्चा झाली
– वनविभागाने तातडीने परवानगी देण्यात यावेत असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत
– नवीन जीआरनुसार भूसंपादन केले जाईल
– भुसंपादन बाबात रिटायर्ड आएएस अधिकीरी नेमण्यात येणार आहे
– समृद्धी महामार्गाला पुरक जोड देण्यात येणार आहे, औरंगाबाद आणि पुणे जोडावा
– हैद्राबादला हा मार्ग जोडला जावा, अशी मागणी केली आहे
– मुंबई गोवा महामार्गबाबत १५ दिवासांनी आढावा घेतला जाईल
– राष्ट्रीय महामार्गांवर खड्डे पडले आहेत त्याबाबत निधीसाठी चर्चा झाली
– मुंबई-गोवा महामार्ग 10 टप्यात काम केले जाणार आहे
– रेड्डी रेवस बाबात चर्चा झाली, निर्णय झाला नाही
गडचिरोली:महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशयारी गडचिरोली जिल्ह्यात सायंकाळी दाखल झाले. डॉक्टर अभय बंग व राणी बंग यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयात धानोरा तालुक्यातील सर्च या संस्थेला त्यांनी भेट दिली. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मीना कुमार व पोलीस अधीक्षक अंकित गोयल मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद व डॉक्टर अभय बंग व राणी बंग उपस्थित होते
पालघर : मुंबई – ठाण्यातील वाहतूककोंडी रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी
पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्याकडून नवीन नियमावली
गुजरातकडून महाराष्ट्रात येणाऱ्या अवजड वाहनांसाठी ठराविक काळातच मुंबई ठाण्यात प्रवेश
संध्याकाळी 6 ते सकाळी 7.30 वाजेपर्येंत व सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश राहील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातील बैठक संपली, महाविकास आघाडीच्या दिग्गज मंत्र्यांची बैठकीला उपस्थिती, बैठक 2 ताल चालली, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बैठकीत चर्चा
मुंबई, नवी मुंबई परिसरात तुफान पाऊस
ठाण्यातील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ भागातही पाऊस
औरंगाबाद :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उद्या विभागीय आयुक्त कार्यालयावर जागरण गोंधळ आंदोलन
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन
शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मनसेची मागणी
नुकसान भरपाईसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन
आठ दिवसात मदत देण्यात यावी अशी मनसेची मागणी
उद्या सकाळी 11 वाजता मनसे घालणार जागरण गोंधळ
पुणे :
दिवसभरात ८६ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १५३ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०४ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.
-१८२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०२५५१.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १३४७.
– एकूण मृत्यू -९०५४.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९२१५०.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४६५१.
सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसदर्भात महत्वाची चर्चा सुरु, याच बैठकीत मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग लवकर पुर्ण करण्यासाठी महत्वाची चर्चा होणार
बँकांच्या फसवणुकीवरुन ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक आणि अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. एसबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. 862 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर :
सीबीआयचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरातून बाहेर पडले
सकाळी आठ वाजेपासून सीबीआयच्या अधिकाऱ्यांची तपासणी सुरु
दुपारी 2 अधिकारी बाहेर पडले होते
आता बाकी अधिकारी सुद्धा बाहेर आले
अधिकारी बाहेर पडत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली
लातूर : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा या मागणीसाठी भाजपचे 72 तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरू, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन, माजी मंत्री-आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, यांच्यासह जवळपास चारशे शेतकरी या आंदोलनात सहभागी आज, उद्या आणि परवा पर्यंत चालणार आंदोलन, लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू आहे आंदोलन
नाशिक : खड्डा खोदकाम सुरू असताना एका मजुराच्या अंगावर माती पडल्याने दुर्दैवी मृत्यू
मुंबई आग्रा महामार्गवरील केके वाग महाविद्यालय जवळ घडली घटना
टेलिफोन वायर कामसाठी खड्डा खोदकाम सुरू होता
खड्ड्यात मजूर काम करत असताना अचानक वरून माती पडल्याने घडली दुर्दैवी घटना
नाशिक – नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या
गुजरातमध्ये रेकॉर्डवर असलेली टोळी नाशिकमध्ये करत होती चेन स्नॅचिंग
पोलिसांच्या कारवाईमुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
पंचवटी परिसरात घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेनंतर उघडकीस आला प्रकार
जयसिंग यादव, पंकज यादव, कुलदीप यादव, संदीप यादव यांना केली अटक
नाशिक – क्रिकेट खेळत असताना चक्कर येऊन एका लहान मुलाचा मृत्यू
नाशिकच्या सिडको परिसरात क्रिकेट बॉक्स मध्ये खेळत असताना घडली घटना
श्रेयस ढोरे या मुलाचा झाला दुर्दैवी मृत्यू..
चक्कर आल्याने मित्रानी रुग्णालयात केलं दाखल
मात्र तत्पूर्वी झाला होता मृत्यू..
दुर्दैवी घटना सीसीटीव्हीत कैद
नाशिक –
क्रिकेट खेळत असताना चक्कर येऊन एका लहान मुलाचा मृत्यू
नाशिकच्या सिडको परिसरात क्रिकेट बॉक्समध्ये खेळत असताना घडली घटना
श्रेयस ढोरे या मुलाचा झाला दुर्दैवी मृत्यू
चक्कर आल्याने मित्रांनी रुग्णालयात केलं दाखल
मात्र तत्पूर्वी झाला होता मृत्यू
दुर्दैवी घटना सीसीटीव्हीत कैद
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजप नगरसेवक संदीप आवारी यांची बिनविरोध निवड
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजप नगरसेवक संदीप आवारी यांचा आला होता एकमेव अर्ज
त्यामुळे संदीप आवारी यांची स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली
अंबरनाथ :
अंबरनाथमध्ये सोसायटीच्या पाण्याच्या वादातून सोसायटीच्या सदस्यावर प्राणघातक हल्ला
अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबर्बिया या उच्चभ्रू सोसायटीत आज सकाळी १० वाजताची घटना
हल्ल्यात सोसायटीचे सदस्य राकेश पाटील यांना गंभीर इजा
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कृष्णा रसाळ आणि त्यांच्या दोन मुलांनी हल्ला केल्याची माहिती
हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत झाली कैद
अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
भांडुप एलबीएस मार्ग शिवसैनिकांनी निदर्शेन करत बंद केला
आमदार रमेश कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली केलं आंदोलन.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पुढील दोन एनसीबीच्या कोठडीत असेल. त्यामुळे आर्यनचा मुक्काम बुधवारपर्यंत मुंबईतील आर्थर रोड जेलमध्येच राहिल. आर्यन खानच्या वतीने अॅड. अमित देसाई यांनी जामिनावर बुधवारी सुनावणी घेण्याची मागणी केली. विशेष कोर्टात आर्यनच्या जामिनावर बुधवारी दुपारी 2.45 वाजता सुनावणी होईल.
हे केंद्र सरकार मोगलांचं आहे
छत्रपतींच्या राज्यात कधीही महिलांवर कोणी हात उचलला नाही
छत्रपतींनी नेहमी महिलांचा मान सन्मान केलाय
या मोगलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार हा इतिहास देशाने पाहिलाय
अर्थातच मोगलांचं राज्य चाललं आहे
महिलांचा मान सन्मान यांच्या संस्कृतीत दिसत नाही
अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी अनिल देशमुखांची सून आणि मुलाविरोधात सीबीआयच्या अटक वॉरंटवर दिली
नागपूर –
विदर्भात परतीच्या पावसाला सुरुवात झाली
परतीच्या पावसाला सुरुवात होताच ऑक्टोबर हिटचे चटके सुरु
गेल्या काही दिवसापासून वाढलं रात्रीच तापमान
काल नागपुरात दिवसाच तापमान 35.3 एवढं नोंदविण्यात आलं
नागपुरात हत्या सत्र थांबण्याच नाव घेत नाहीये
पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून एका युवकाने 45 वर्षीय इसमाची हत्या केली
कुऱ्हाडीने वार करत केली हत्या
हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील नेहरु नगर मध्ये घडला थरार
देवदर्शन मेश्राम असे मृतकांचे नाव तर ,सूरज बागडे असे आरोपीचे नाव।
आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे
जम्मू काश्मीर दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये पहाटेपासून पुन्हा एकदा चकमक
सुरक्षा दलाच्या फायरिंग मध्ये एक दहशतवादी ठार
मृत् दहशतवाद्याची ओळख पटविण्याचे काम सुरू
अनंतनाग परिसरात सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन
अनंतनाग भागातील अनेक रस्त्यांवर नका बंदी
मृत दहशतवाद्याची ओळख पटली
इम्तियाज अहमद असं मृत दहशतवाद्याच नाव
बंदीपुरा मध्ये झालेल्या नागरिकांच्या हत्येत अहमद याचा सहभाग
जम्मू-काश्मीर चे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांची माहिती
नवी दिल्ली मुंबईत आज पुन्हा इंधन दरवाढ
नवी दिल्लीत पेट्रोल 30 तर डिझेल 35 पैशानी वाढलं
मुंबईत पेट्रोल 29 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी वाढलं
नवी दिल्ली पेट्रोल 104.44 तर डिझेल 93.17
मुंबईत पेट्रोल 110.41 तर डिझेल 101.03 रुपये
सलग 5 व्या दिवशी इंधन दरवाढ
पुणे
पुणे जिल्ह्यात काल रेकॉर्ड ब्रेक लसीकरणाची नोंद
एका दिवसात 99 हजार 71 जणांना दिली लस,
इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी जवळील धबधब्याच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू
आर्यन विजयप्रताप सहानी असे मृत युवकाचे नाव..
वेरूळ लेणीच्या धबधब्याजवळ असणाऱ्या पाण्यात 18 वर्षीय तरुणाच्या बुडून मृत्यू..
अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह काढला पाण्यातून बाहेर..
पोहण्याचा मोह आला जीवाशी,पोहण्याच्या मोहात गेला जीव…
– पुणे मेट्रो ही स्वयंचलित असून ती विनाचालक धावणार
– प्रवाशांना सवय झाल्यानंतरच मेट्रो विना चालक धावणार,
– पुणे मेट्रो ऑटोमोड असणार आहे,
– वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट दरम्यान मेट्रो विना चालक धावणार,
– या मार्गांचे नियंत्रण मेट्रोचे टर्मिनल असलेल्या शिवाजीनगर येथील धान्य गोडाऊन स्थानकावर असणार
कोल्हापूर –
कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आंबा घाटात दरड कोसळली
दखन गावाजवळ मध्यरात्री कोसळली दरड
दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक बंद
परतीच्या जोरदार पावसामुळे कोसळली दरड
दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू मात्र वाहतूक अनिश्चित काळासाठी राहणार बंदच
देशात मुबलक कोळसा
विजेच संकट नाही
केंद्रीय उर्जा मंत्री आर के सिंग यांचा दावा
एका वृत्तवाहिनीशी बोलताना केल वक्तव
सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार सुरळीतपणे सुरू
महाविकास आघाडी सरकारने आज आहे महाराष्ट्र बंद
मात्र बंदचा कृषी उत्पन्न बाजार समितीत कसलाच परिणाम नाही
कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू
महाराष्ट्र बंदचा मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये परिणाम दिसला नाही
लखीमपूर खीरी येथे मारल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे
पण नेहमीप्रमाणे दादरच्या भाजी मार्केटमध्ये आजही गर्दी दिसून येत आहे,
सकाळची वेळ असली तरी बंदचा प्रभाव इथे दिसत नाही, कदाचित वेळ निघून गेल्यामुळे बंदचा प्रभाव इथेही दिसू लागेल.