Maharashtra News Live : रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

| Updated on: Oct 14, 2021 | 12:03 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News Live : रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Oct 2021 09:03 PM (IST)

    रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड, उद्या अधिकृत घोषणा होणार

  • 13 Oct 2021 08:56 PM (IST)

    दुकानदारांकडे 50 लाखांच्या लाचेची मागणी, भिवंडीत ACB कडून नगरसेवकाला बेड्या

    भिवंडी : 

    50 लाख रुपयांची लाच स्वीकारताना भिवंडी पालिका काँग्रेस स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना लाच लुचपत प्रतिबंधक ठाणे यांनी केली अटक. पद्मानगर येथील भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने शासकीय जागेवर उभारलेल्या शॉपिंग मॉल संदर्भात पालिकेकडे कारवाई करण्याची मागणी करीत सदर दुकाने वाचविण्यासाठी दुकानदारांकडे दुकानांवर कारवाई टाळण्यासाठी 2 कोटी अथवा फार्म हाऊस नावावर करून देण्याची काँग्रेस स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी दुकानदाराकडे केली होती मागणी,
    तेथील व्यापाऱ्याकडून पद्मानगर येथे 50 लाख स्वीकारताना एसीबी ठाणे यांनी रंगेहाथ पकडले


  • 13 Oct 2021 08:54 PM (IST)

    पुण्यात अल्पवयीन कबड्डीपट्टू मुलीची हत्या, 12 तासात आरोपींचा छडा, कठोर कारवाई होणार : गृहमंत्री

    पुण्यातील बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन कबड्डीपट्टू मुलीची हत्या झाली ही घटना निंदनीय

    पुणे पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपींचा छडा लावला,

    चार आरोपींना अटक केलीये,

    आरोपींना कठोर शासन होणार,

    त्या पद्धतीने पुणे पोलीस कार्यवाही करतायेत,

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची ट्टीट करून माहिती

  • 13 Oct 2021 08:37 PM (IST)

    उस्मानाबादेत येरमाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि पोलीस पाटील यांच्यावर ACB ची कारवाई

    उस्मानाबाद

    येरमाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश मुंढे व पोलीस पाटील यांच्यावर अँटी करप्शन विभागाची कारवाई

    निनावी अर्जावर कार्रवाई न करण्यासाठी 1 लाख रुपयांची मागितली लाच

    70 हजार रुपयांची तडजोड अंती स्वीकारण्याचे केले मान्य

    येरमाळा पोलिसात गणेश मुंडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

    लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक, उस्मानाबाद विभागाची कारवाई

  • 13 Oct 2021 07:39 PM (IST)

    जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणूकीत नवा ट्विस्ट, काँग्रेसचा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा

    जळगाव – जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणूकीत नवा ट्विस्ट

    काँग्रेसचा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा

    भाजप सोबत सर्व पक्षीय पॅनलमध्ये सहभाग घेण्यास नकार

    महाविकास आघाडीने पॅनल तयार करण्याची मागणी

    काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती

  • 13 Oct 2021 07:37 PM (IST)

    माजी पंतप्रधान मनमोहनसिंग एम्समध्ये दाखल, श्वास घेण्यात अडचण

    माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत मंगळवारी अचानक बिघडल्यामुळं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं आणि छातीत दुखत असल्यामुळे त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात AIIMS मध्ये भरती करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग यांच्यावरील उपचारासाठी एम्सकडून एक टीम बनवली जात असून त्याचे प्रमुख हे डॉ. रणदीप गुलेरिया असणार आहेत.

  • 13 Oct 2021 06:23 PM (IST)

    ‘कोरोना काळात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा न झाल्यामुळे वयोमर्यादा पार झालेल्या उमेदवारांना अतिरीक्त संधी मिळावी’

    कोरोना काळात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा न झाल्यामुळे वयोमर्यादा पार झालेल्या उमेदवारांना अतिरीक्त संधी मिळावी,

    अशोक चव्हाणांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली मागणी

    राज्य सरकार एमपीएससी विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी सकारात्मक

    पुढील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची अपेक्षा

    मंत्री अशोक चव्हाणांनी ट्टीट करून दिली माहिती

    पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार ? एमपीएससी विद्यार्थ्यांना अतिरीक्त संधी मिळणार का ?

  • 13 Oct 2021 06:20 PM (IST)

    दृश्यमानता कमी असल्याने चेन्नईहून आलेले विमानाचं थेट मुंबईला लँडिंग

    दृश्यमानता कमी असल्याने चेन्नईहून आलेले विमानाचं थेट मुंबईला लँडिंग
    शिर्डी विमानतळावर आजच चेन्नईहुन आलेलं विमान ( दुपारी 4 वा. येणारे विमान ) उतरलं नाही
    विमान लँड करताना 4000 मीटर दृश्यमानता असल्यानं विमान थेट मुंबईकडे रवाना
    विमान लँडिंग करण्यासाठी 5000 मीटर पर्यंत हवी होती व्हिजिबिलिटी
    विमानात 126 प्रवासी असल्याची माहीती.
    शिर्डी विमानतळ व्यवस्थापक सुशीलकुमार श्रीवास्तव यांचा दुजोरा

  • 13 Oct 2021 05:53 PM (IST)

    के पी गोसावी विरोधात पुणे पोलिसांची लूकआऊट नोटीस जारी

    नोकरीचं आमिष देऊन तरुणांना फसविल्याचं प्रकरण
    के पी गोसावी विरोधात पुणे पोलिसांची लूकआऊट नोटीस जारी
    एनसीबीकडून क्रूझ ड्रग्ज पार्टीत सुरु असलेल्या कारवाई दरम्यान के पी गोस्वामी तिथे हजर होता

  • 13 Oct 2021 05:37 PM (IST)

    आर्यन खानची जामीनाची सुनावणी पुन्हा उद्यावर

    आर्यन खानच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार, त्यामुळे आर्यनला आजची रात्रदेखील जेलमध्ये काढावी लागणार, वकील अनिल सिंग युक्तीवाद करणार, विशेष म्हणजे तीन ते चार तास सेशन एनडीपीएस विशेष कोर्टात आज सुनावणी झाली, पण ही सुनावणी आता उद्या ढकलण्यात आली आहे, एनसीबीकडून वकिल अद्वैत सेतना व अनिल सिंग हे बाजू मांडली तर आर्यन खानकडून ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि सतीश माने-शिंद यांनी युक्तीवाद केला

  • 13 Oct 2021 04:59 PM (IST)

    मावळमध्ये राज्यकर्त्यांचेच पोलीस होते ज्यांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला : देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

    पवार साहेबांची नेमकी कशाकरता होती हेच माझ्या लक्षात आलं नाही. याचं कारण ते आज वेगवेगळ्या विषयासंदर्भात बोलले. केंद्र सरकारच्या संदर्भात किंवा उत्तर प्रदेशात जी घटना घडली त्यासंदर्भात ते जे काही बोलले ते असं म्हणाले की मावळमध्ये गोळीबार पोलिसांनी केला होता. मी त्यांना आठवण करुन देतो इच्छितो की जालियनवाला बाग हत्याकांडाच्यावेळी ब्रिटिशांचे गव्हर्नर जनरल डायर गोळीबार करायला गेले नव्हते. पोलिसांनीच गोळीबार केला होता. पण गव्हर्नर जनरलच्या आदेशाने गोळीबार झाला होता. त्यामुळे मावळचा गोळीबार ज्यावेळेस आम्ही म्हणतो की जालियनवाला बाग सारखा गोळीबार होता कारण तिथे तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी तो गोळीबार केला नव्हता. तर त्यांचे पोलीस तिथे होते. सगळ्यात महत्त्वाचं असंय उत्तर प्रदेशात जी घटना घडते त्यावर तुम्ही महाराष्ट्रात बंद करता. इथे धुडगूस घालतात. पोलीस यावेळी बघ्याची भूमिका घेत आहेत.

    शिवसेना शामिल असल्यानंतर काय होतं हे पवारांनीच सांगितलं ही तशी समाधानाची गोष्ट आहे. पण रोज गेले दोन दिवस सगळे चॅनल आणि सोशल मीडियावर जे व्हिडीओ समोर येत आहेत त्यामध्ये हा बंद किती शांततेत झाला ते आपण बघतोय. पोलीस संरक्षणामध्ये मारामारी, धमकावणं चाललं आहे, आमदार धमकवत आहेत, तर एवढंच नाही काही दुकानदाराचे माल घेऊन यांचे लोकं पळत आहेत. या सगळ्यात पोलीस बघ्याची भूमिका करत आहेत. त्यामुळे आज स्टेट पॉनर्सड भीती निर्माण करुन केलेला बंद होता.

    अनिल देशमुख यांच्यावर जी कारवाई झाली ती उच्च न्यायालयाच्या आदेशावर झाली आहे. उच्च न्यायालयात या संदर्भात सीबीआय चौकशीचा निर्णय दिला आहे. राज्यात सरकार आला नंतर सीबीआयने राज्यात चौकशीच करु नये, असं सांगितलं. त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्राचे पैसे बुडवले किंवा देशाचे पैसे बुडवले असे 80 बँक फ्रॉडचे प्रकरणं सीबीआयला मान्यता न दिल्याने धुळखात पडलेली आहेत. उच्च न्यायालयाने स्वत: या प्रकरणात निर्णय दिला आणि सीबीआयला चौकशीसाठी अनुमती दिली. शरद पवारांना उच्च न्यायालयावर विश्वास आहे की नाही? ज्या प्रकारे या संस्थांशी वागणूक सुरु आहे ते आक्षेपार्ह आहे.

    फरक एवढाच आहे की मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. चाळीस वर्षानंतर सलग पाच वर्षे मी मुख्यमंत्री राहिलो. पवार साहेब मोठेच नेते आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले. पण कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाहीत. राहिले असते तर बरंच झालं असतं. त्यांनी चांगलंच काम केलं असतं. पण त्यावेळेच्या परिस्थितीमुळे कधी दोन वर्ष, दीड वर्षे मुख्यमंत्री पदावर राहता आलं. एका गोष्टीचं समाधान आहे. मी विरोधी पक्षनेता म्हणूनही समाधानी हे बघून आख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झाली आहे. हीच माझ्या कामाची पावती आहे.

  • 13 Oct 2021 04:06 PM (IST)

    येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील कॉलेज सुरु होणार, मंत्री उदय सामंत यांची घोषणा

    येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील कॉलेज सुरु होणार, मंत्री उदय सामंत यांची घोषणा

    उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    20 ऑक्टोबर पासून राज्यातील कॉलेज सुरु होणार
    लसीचे दोन्ही डोस घेणं विद्यार्थ्यांना आवश्यक
    वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली असणार
    विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबवा

    ज्या विद्यार्थ्यांना हजर राहता येणार नाही त्यांची ऑनलाईन शिक्षणाची सोय कॉलेजने करावी

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री सचिव यांच्याशी बैठक झाली

    विद्यापीठ महाविद्यालय वर्ग 50% पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असतील

    विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण असावेत

    ऑक्टोबर पासून महाविद्यालय सुरू होणार

    कोरोनाचा प्रदूर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असतील

    डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत

    वस्तीग्रह सुरू करण्याचा आदेश देण्यात आलाय

    शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक यांच लसीकरण पूर्ण झालं पाहिजे

  • 13 Oct 2021 03:02 PM (IST)

    जरंडेश्वर कारखाना खरेदी करताना अजित पवारांनी नियमांचं उल्लंघन केलं : किरीट सोमय्या

    किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    27 हजार सभासदांचा जरंडेश्वर कारखाना काढून घेतला

    मी तेव्हा पासून विचारतोय कारखान्याचा मालक कोण?

    ही कागदपत्र मी सादर करतोय

    उच्च न्यायालयाने जरेंडेश्वर खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचे म्हटलय

    कारखाना खरेदी करताना अजित पवारांनी सगळ्या नियमांचं उल्लंघन केलं आहे

    म्हणून त्यांना उपमुख्यमंत्री पदी राहता येणार नाही

    धाडीनंतर अजित पवारांनी भावुक स्टेस्टमेंट केलं
    माझ्या बहिणीच्या घरी धाडी टाकल्या
    जरंडेश्वर घेतलेल्या कंपनीत एक संचालक विजया पाटील यांचे पती मोहन पाटील आहेत

    आता तुम्ही सांगा का बहिणींच्या घरी धाडी पडल्या

    बहिणीच्या नावाने बेनामी संपत्ती करणं हे दुर्दैवी आहे

    जरंडेश्वर चे 90 टक्के शेअर्स 27 लेअर नंतर शेवटी स्पार्किंग सोईलकडे आहेत आणि त्याचे मालक आहे सुनेत्रा अजित पवार अन अजित अनंतराव पवार

    या कंपन्यांच्या गुंतवणूकीत 57 नामी बेनामी कंपन्या आहेत

    अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही सगळ्यात मोठी आयकर विभागाची धाड आहे

    यावर नेटफिलक्सने सिरीयल बनवली तर अजित पवारांना कमीत कमी 2 ते 3 कोटी रॉयल्टी मिळू शकते

    यातला सिझन 1 हा अजित पवार असेल

    पवार म्हणजे महाराष्ट्राचे गुरु, त्यांना गुरू म्हणतात

    मंत्र्यांच्या व्यवसायावर प्रतिबंध नाही, पद पदाचा फायदा घेऊन स्वतःच्या संस्थांना फायदा पोहोचवत राहणं गैर

  • 13 Oct 2021 02:52 PM (IST)

    3 वाजता पवार कुटुंबाचा हिशोब चुकता करणार, शरद पवारांच्या वक्तव्याला किरीट सोमय्यांच उत्तर

    शरद पवारांच्या वक्तव्याला किरीट सोमय्यांच उत्तर,

    3 वाजता पवार कुटुंबाचा हिशोब चुकता करणार

    किरीट सोमय्यांच पवारांना आव्हान

    3 वाजता सोमय्यांची पत्रकार परिषद .

  • 13 Oct 2021 02:19 PM (IST)

    शरद पवार नेमकं काय-काय म्हणाले?

    एक महिन्यापूर्वी राजनाथ सिंह यांनी मला आणि ए.के. अॅन्टोनी यांना बोलावलं. भारत-चीन सीमेवर जे काही सुरु आहे त्याबाबत चर्चा झाली. राजकारणाच्या मुद्द्यावर अनेकदा वाद होतील. पण देशाच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही संरक्षण विभागाच्या पाठीशी राहू, हा आमचा शब्द आहे. दिल्लीत गेल्यावर काही सहकाऱ्यांशी चर्चा करु.

    सगळ्या तपास यंत्रणांचा वापर राजकीय दृषीनं केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांबद्दल त्यावेळचे मुंबई पोलीस आयुक्तांनी आरोप केले होते. त्याबाबत मलाही त्यांनी माहिती दिली होती. त्यांच्या आरोपामुळे वातावरण तयार झालं त्यामुळे देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. आरोप करणारे कुठे आहेत त्याचा आज पत्ता नाही. जबाबदार अधिकारी बेछुटपणे आरोप करतो हे राज्यात पहिल्यांदाच घडत आहे. देशमुखांनी जबाबदारी ओळखून राजीनामा दिला. ते बाजूला झाले आणि हे गृहस्त गायब झाले. हा फरक आहे.

    आता अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचं काम सुरु आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा टाकला. मला कौतुक वाटतं त्या एजन्सीचं. पाच वेळा एकाच घरात चौकशी करणं किती योग्य याचा विचार जनतेनंच करायला हवा

    उत्तर प्रदेशातील बातम्या आपण वाचतो, पाहतो आहोत. लखीमपूरच्या घटनेचे काही व्हिडीओ सुदैवानं समोर आलं. त्यातून एक दिसलं की शांतपणे जाणाऱ्या जमावावर काही लोकांकडून गाडी घातली जाते. त्यात चार शेतकऱ्यांची, काही लोकांची आणि एका पत्रकाराची हत्या होते. काही लोकांनी सांगितलं की केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे चिरंजीव त्या गाडीत होते. ते नाकारलं गेलं. पाच-सहा दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक करावी लागली आणि हे सर्वोच्च न्यायालयानं प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर घडलं.

    अपेक्षा अशी होती की शेतकऱ्यांची हत्या झाली, जरी सत्ताधारी पक्षातील नेत्यावर आरोप झाला तरी सत्ताधारी पक्षानं काही भूमिका घ्यावी. पण सत्ताधारी पक्षाकडून फक्त बघ्याची भूमिका घेतली गेली.

    केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना आपल्या पदावरुन मुक्त व्हावं. आज त्याची गरज आहे. जेणेकरुन कायदा-सुव्यवस्था, यंत्रणेवर लोकांचा विश्वास राहील.

    लखीमपूरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं. त्यांनी विचारलं की मावळमध्ये काय घडलं. त्यांनी विचारलं ते फार बरं केलं.
    मावळमध्ये शेतकरी मृत्यूमुखी पडेल. पण त्यांच्या मृत्यूला जबाबदार नेते नव्हते. आरोप पोलिसांवर होता. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी काही पाऊल उचललं.

    मावळच्या शेतकऱ्यांवर जो गोळीबार झाला. त्याबाबत लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांवर मोठी नाराजी होती. तीच स्थिती आज लखीमपूरमध्ये आहे. मावळमधील आता चित्र बदललं आहे. लोकांना वस्तुस्तिथी कळाली. या तालुक्यात सातत्यानं जनसंघ आणि नंतर भाजप होतं. रामभाऊ म्हाळगी हे नेहमी मावळचे प्रतिनिधी होते.

    त्या मावळमध्ये लोकांना भडकावण्याचं काम कुणी केलं हे लक्षात आल्यानंतर त्या मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार 90 हजाराच्या फरकानं निवडून आले. मावळमध्ये संताप असता तर एवढ्या फरकानं राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले नसते. त्यांनी मावळची स्थिती समजून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल.

  • 13 Oct 2021 02:09 PM (IST)

    ईडी, सीबीआय यांचा गैरवापर सध्या सुरुय : शरद पवार

    शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    जयंत पाटलांचे चिरंजीव संध्याकाळी पॅरीसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोझ केला. त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळाली. आम्ही केवळ इस्लामपूर वगैरे आहे

    दोन्ही मुलं मुली डोमेस्टिक आहेत. लग्न इथंच होईल. आम्हाला काळजी घ्यावी लागेल. आमची मुलं काय करतील हे सांगता येत नाही.

    चीनबरोबर आपली चर्चा अयशस्वी होतेय

    काश्मीरमध्ये वेगळी प्रतिक्रिया येतेय
    हे जे घडतेय ते चिंताजनक आहे

    याबाबत सामुहिक भूमिका घेण्याची गरज आहे
    चीनबद्दल माझ्याबरोबर राजनाथ सिंग यांनी चर्चा केली

    केंद्र सरकार काही संस्थांचा गैरवापर करत आहे

    सीबीआय, ईडी, एनसीबी याचा वापर राजकीय दृष्टीनं केला जातोय असं चित्र आहे

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्तांनी आरोप केले त्यातून देशमुख यांनी राजीनामा दिला. ज्यांनी आरोप केले ते अधिकारी कुठेय याचा‌पत्ता लागत नाही

    परमवीरसिंग आता गायब का झाले?
    अनिल देशमुख यांच्या घरी पाचव्यांदा छापा पडला
    पाच वेळा छापा हा सीबीआयनं छापा टाकला हा विक्रम आहे

    लाखीमपूर इथे जो हिंसाचार झाला तो पूर्वी कधी झाला नाही

    त्या शेतकऱ्यांची हत्या झाली आहे त्या घटनेत एक पत्रकार सुद्दा मृत्यू पावले आहेत हे मला वृत्तपत्रातून कळलं आहे

    लखमीपूरमध्ये जी घटना घडली तशी घटना कधीच घडली नव्हती
    आधी केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा यात होता हे आधी नाकारलं गेलं
    पण नंतर कोर्टानं दखल घेतल्यानंतर‌ त्यांना अटक करावी लागली

    यात सत्ताधारी भाजपनं काहीतरी भूमिका घ्यायला हवी होती

    फडणवीसांनी सांगितलं की मावळात काय घडलं
    पण मावळात पोलिसांकडून घडना घडली होती
    तिथं राजकीय नेत्यांनं किंवा त्याच्या मुलानं काही केलं नव्हतं

    लखीमपूर येथील घटनेनंतर उत्तरप्रदेशमधील लोकांचा शासन व्यवस्थेसंदर्भात विश्वास उडाला आहे

  • 13 Oct 2021 01:57 PM (IST)

    डोंबिवलीत सोसायटीच्या जागेच्या वादातून भाजप नगरसेवकाची दहशत

    डोंबिवलीमधील धक्कादायक प्रकार

    सोसायटीच्या जागेच्या वादातून भाजप नगरसेवकाची दहशत

    सोसायटीच्या जागेच्या वादातून भाजप नगरसेवकाने सोसायटीतील वृद्ध सदस्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत दिली धमकी

    वृद्ध सदस्याची विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार

    सोसायटीच्या सीसीटीव्हीत भाजप नगरसेवक रंजीत जोशी व त्याचे सहकारी येता जाताना कैद

    रणजीत जोशी यांनी सुद्धा केली सोसायटीत अधिकाऱ्यांविरोधात तक्रार

  • 13 Oct 2021 01:09 PM (IST)

    15 ऑक्टोबरला मी सावरगाव भक्ती गडावर वाट पाहत आहे, पंकजा मुंडे यांचे आवाहन

    औरंगाबाद –

    ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांची दसरा मेळाव्यासाठी भावनिक हाक

    2021 च्या दसरा मेळाव्यासाठी सर्वांनी येण्यासाठी पंकजा मुंडे यांचे सोशल मीडियावर आमंत्रण

    तुम्ही सांगायचे आणि मी करायचे असे पंकजा मुंडे यांचे ब्रीद

    पंकजा मुंडे यांची दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु

    15 ऑक्टोबरला मी सावरगाव भक्ती गडावर वाट पाहत आहे – पंकजा मुंडे यांचे आवाहन

  • 13 Oct 2021 01:08 PM (IST)

    रावण दहन आणि पूजन यावरून पालघरमधील दोन आदिवासी संघटना आमनेसामने

    पालघर

    रावण दहन आणि पूजन या वरून पालघर मधील दोन आदिवासी संघटना आमनेसामने .

    रावण दहन प्रथा बंद करून पूजा करण्याचं आदिवासी एकता परिषदेची मंगणी

    तर आदिवासी एकता मित्र मंडळाने रावणाची पूजा ला विरोध करत रावणाचा दहनच होण्यासाठी साठी दिले पत्र .

    पालघर जिल्हाधिकारी आणि पालघर पोलीस अधीक्षक यांना दोन्ही संघटनांच पत्र

  • 13 Oct 2021 01:07 PM (IST)

    किरीट सोमय्या एसीबीच्या कार्यालयात दाखल

    पुणे

    किरीट सोमय्या एसीबीच्या कार्यालयात दाखल,

    हसन मुश्नीफांविरोधात सोमय्या देणार जबाब…

    हसन मुश्नीफांविरोधात एसीबीला कोणती कागदपत्र आणि पुरावे सोमय्या देणार ?

    पुण्यातील एसीबी कार्यालयात मोठा बंदोबस्त तैनात…

  • 13 Oct 2021 11:49 AM (IST)

    शिवसेना खासदार संजय 12:30 वाजता घेणार पत्रकार परिषद

    – शिवसेना खासदार संजय 12:30 वाजता घेणार पत्रकार परिषद,

    – संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर,

    – पुणे दौऱ्यात सेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार,

    -आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा पुणे दौरा

  • 13 Oct 2021 11:33 AM (IST)

    किरीट सोमय्या पिंपरी चिंचवडमध्ये वकिलांच्या भेटील

    पिंपरी चिंचवड

    किरीट सोमय्या पिंपरी चिंचवडमध्ये वकिलांच्या भेटील,

    अँड. सचिन पटवर्धन यांच्याशी किरीट सोमय्या करतायेत सल्ला मसलत

    आज अजित पवारांच्या सहीचा कागद दाखवणार किरीट सोमय्यांनी केलंय स्पष्ट,

    वकिलाची भेट उरकून सोमय्या पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांची घेणार भेट,

    तर पुणे लाचलुचपत विभागाकडे 1500 कोटी रुपये घोटाळ्यासंदर्भात स्टेटमेंट नोंदवणार

  • 13 Oct 2021 11:32 AM (IST)

    गोव्याचा किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा पूर्णत्वास नेण्यासाठी मुदत

    गोवा –

    किनारपट्टी आराखडा वादात सापडण्याची शक्यता

    गोव्याचा किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा पूर्णत्वास नेण्यासाठी मुदत

    राष्ट्रीय हरित लवादाने 31 डिसेंबरपर्यंतची दिली मुदत

    गोवा राज्य सरकारला दिली मुदत

  • 13 Oct 2021 11:32 AM (IST)

    जिल्हा प्रशासनाकडून प्रवाशांना मोठा दिलासा, महाराष्ट्र आणि गोव्यातून प्रवेश करताना कुठलीही सक्ती नाही

    बेळगाव –

    जिल्हा प्रशासनाकडून प्रवाशांना मोठा दिलासा

    महाराष्ट्र आणि गोव्यातून प्रवेश करताना कुठलीही सक्ती नाही

    RTOCR चाचणी मध्यरात्रीपासून बंद

    बेळगाव जिल्हा प्रशासनाचे आदेश

    महाराष्ट्र गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना आता कुठलीही अट नसणार

    महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरचे चेक पोस्ट हठवले जाणार

  • 13 Oct 2021 11:31 AM (IST)

    पुण्यात मिलटरी इंटेलिजन्स ट्रेंनिग स्कुलमध्ये आलेल्या 43 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या

    – पुण्यात मिलटरी इंटेलिजन्स ट्रेंनिग स्कुलमध्ये आलेल्या 43 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या,

    – वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल,

    – आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही,

    – लेफ्टनंट कर्नल पदाच्या एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ

  • 13 Oct 2021 11:31 AM (IST)

    भाजप नेत्या पंकजा मुंडे अंबाजोगाईत पोहोचल्या

    अंबाजोगाई : भाजप नेत्या पंकजा मुंडे अंबाजोगाईत पोहोचल्या

    योगेश्वरी देवीसमोर पंजा मुंडे नतमस्तक

    योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन आंदोलनाकडे जाणार

    अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा

    बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर पंकजा मुंडेंचं धरणे आंदोलन

  • 13 Oct 2021 10:50 AM (IST)

    मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक, रायगडपासून पुन्हा राज्याचा दौरा करणार

    कोल्हापूर –

    मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक

    रायगडपासून पुन्हा राज्याचा दौरा करणार

    राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर काहीही केलं नाही

    सारथी सोडलं तर इतर मुद्द्यावर दिलेलं आश्वासन राज्य सरकारने पाळलं नाही

    25 ऑक्टोबर पासून हा दौरा काढला जाणार आहे

    राज्य राज्याची जबाबदारी पाळत नाही

    सरकारला अल्टिमेटम दिलं होतं पण त्यानंतर त्यांनी आश्वासन पाळले नाहीत

    आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही, आता आणखी काय चर्चा करायची

    कुणी टीका करत त्याकडे मी लक्ष देत नाही

    टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा

    सातारा गादी आणि कोल्हापूरची गादीमध्ये कोणताही मतभेद नाही

    उदयनराजे नेमकं काय म्हटले हे मला माहित नाही

    मराठा आरक्षणाची मशाल चुकीच्या व्यक्तीच्या हातात असल्याची टीका उदयनराजे यांनी केली होती

  • 13 Oct 2021 10:50 AM (IST)

    राहुल गांधी राष्ट्रपतींना भेटणार

    नवी दिल्ली –

    राहुल गांधी राष्ट्रपतींना भेटणार

    थोड्याच वेळात काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला

    लखीमपूर दुर्घटनेप्रकरणी काँग्रेस राष्ट्रपतींकडे काय मागणी करणार ?

    राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते शिष्टमंडळात असणार

    काही वेळातच राहुल गांधी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रवाना होणार

  • 13 Oct 2021 10:45 AM (IST)

    बिबवेवाडी हत्या प्रकरण, चारही आरोपी अटकेत

    अमिताभ गुप्ता, पुणे पोलीस आयुक्त –

    – चारही आरोपी अटकेत आहेत

    – काल मयत मुलगी कबड्डी सरावासाठी यश लॉन्स परिसरात आली होती त्याचवेळी आरोपी ने तिच्यावर हल्ला केला

    – दोन दिवस आधी आरोपी ने स्पॉटवर मुलीवर पाळत ठेवली होती

    – पाच वर्षांपासून आरोपी मुलीच्या संपर्कात होता

    – आरोपी हा मयत मुलीचा नातेवाईक होता

  • 13 Oct 2021 10:40 AM (IST)

    5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तलावातली कार बाहेर काढली, अपघातातील तीन व्यक्तींचा मृत्यू

  • 13 Oct 2021 10:10 AM (IST)

    रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेला भाजपचीही साथ

    रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेला भाजपचीही साथ

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय सहकार पॅनेलची घोषणा

    निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि भाजप एकत्र

    सहकारात राजकारण नको यासाठी बँकेची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न – पॅनल प्रमुख आणि विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे

    सहकार पॅनलच्या 21 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर

  • 13 Oct 2021 10:08 AM (IST)

    वेंगुर्ले-खवणे येथील आकाश फिश मिल कंपनीतील दोन परप्रांतीय कामगारांनी खवणे येथील शाळकरी मुलींचा पाठलाग करुन काढली छेड

    सिंधुदुर्ग –

    वेंगुर्ले-खवणे येथील आकाश फिश मिल कंपनीतील दोन परप्रांतीय कामगारांनी खवणे येथील शाळकरी मुलींचा पाठलाग करुन काढली छेड

    शाळकरी मुली काल दुपारी पाट हायस्कूल येथून घरी जात असताना घडला प्रकार.

    छेड काढल्याची माहीती गावातील नागरीकांना समजताच संतप्त लोकांनी फिश मिल कंपनीत धडक.

    छेड काढणाऱ्या त्या दोन परप्रांतीय कामगारांना मुलींनी दिला चांगलाचं चपलांचा चोप.

  • 13 Oct 2021 10:04 AM (IST)

    69 गावांच्या लॉकडाऊननंतर कोरोना रुग्ण संख्या घटली मात्र एकाच दिवसात 26 मृत्यू

    अहमदनगर –

    69 गावांच्या लॉकडाऊन नंतर कोरोना रुग्ण संख्या घटली मात्र एकाच दिवसात 26 मृत्यू

    काल दिवसभरात 325 रुग्ण तर 26 मृत्यू

    आतापर्यंत एकूण मृत्यू 6 हजार 950

    आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 3 लाख 40 हजार 928

    तर उपचार सुरू असलेली रुग्ण सांख्य 2 हजार 674

  • 13 Oct 2021 09:54 AM (IST)

    देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी वाढ, सक्रिय रुग्णसंख्येत मात्र मोठी घसरण

  • 13 Oct 2021 09:53 AM (IST)

    लातुरमध्ये भाजपला धक्का, निलंगेकरांचा विश्वासू सहकारी शिवसेनेत, आदित्य ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन

  • 13 Oct 2021 09:47 AM (IST)

    महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत पुण्यात

    पुणे –

    महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत पुण्यात,

    काल रात्री उशीरा शिवसेना पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक,

    महापालिका निवडणूकीबरोबरचं पक्षसंघटनेवर चर्चा,

    राऊत आजही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक,

    संजय राऊत पुणे महापालिकेसाठी मोर्चेबांधणी करण्यासाठी पुण्यात,

    गेल्या दोन महिन्यातला संजय राऊतांचा तिसरा पुणे दौरा,

    काल रात्री पुण्यात बैठक झाली सूत्रांची टिव्ही 9 मराठीला माहिती .

  • 13 Oct 2021 09:36 AM (IST)

    नाशिक ग्रामीण पोलिसांपाठोपाठ उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

    नाशिक –

    नाशिक ग्रामीण पोलिसांपाठोपाठ उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

    नाशिकच्या सायखेडा परिसरात सुरू असलेला अवैध दारूचा कारखाना उध्वस्त

    पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केलेले अनधिकृत दारू कारखाने संजय दाते यांच्या मालकीचे

    संजय दाते हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी

    राजकीय वरदहस्ताने वेगवेगळ्या भागात बनावट दारू कारखाने सुरू असल्याची चर्चा

    अवघ्या २४ तासात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांची बनावट दारू हस्तगत

  • 13 Oct 2021 09:36 AM (IST)

    नागपूर विमानतळावर वाढणार विमानांच्या फेऱ्या

    नागपूर विमानतळावर वाढणार विमानांच्या फेऱ्या

    28 विमानांचे होणार टेक ऑफ

    प्रवाश्यांना मिळणार दिलासा

    18 तारखे पासून प्रवासी क्षमतेचे निर्बंध हटणार असल्याने विमान कंपन्यांनी केली तयारी

    कोरोना मुळे काही निर्बंध घालण्यात आले होते त्यामुळे , घरगुती विमान संख्येत कमी आली होती

    18 तारखे पासून निर्बंध हटणार असल्याने प्रवासी आणि विमान कंपन्यांना दिलासा

    सध्या नागपूर विमानतळ वरून 22 विमानांचे आगमन आणि उडान होते , त्यात आता वाढ होणार

  • 13 Oct 2021 08:44 AM (IST)

    तब्बल 3 कोटी 50 लाख रुपयांचा चोरीला गेलेला मुद्देमाल नाशिक पोलिसांनी नागरिकांना केले परत

    नाशिक –

    तब्बल 3 कोटी 50 लाख रुपयांचा चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी नागरिकांना केले परत

    नाशिक पोलिस आयुक्तालयात घेतलेल्या एका खास कार्यक्रमाच्या माध्यमातुन मुद्देमाल करण्यात आला परत

    सोन्याचांदीचे दागिने,रोखरक्कम,मोटारसायकल आणि मोबाईल या वस्तूंचा होता समावेश

    गेल्या वर्षभरात नागरिकांच्या वेगवेगळ्या वस्तू गेल्या होत्या चोरीला

    चोरीला गेलेले आपल्या वस्तू पुन्हा परत मिळाल्याने काही नागरिकांना अश्रू अनावर

    पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न नागरिकांनी मानले पोलीस आयुक्तांचे आभार

  • 13 Oct 2021 08:44 AM (IST)

    नागपुरात संघाच्या मुख्य विजयादशमी सोहळ्या सह वेगवेगळ्या 50 ठिकाणी होणार सोहळा

    नागपुरात संघाच्या मुख्य विजयादशमी सोहळ्या सह वेगवेगळ्या 50 ठिकाणी होणार सोहळा

    कोरोना स्थिती मुळे मुख्य सोहळ्याला गर्दी न करता विभाजन करण्यात आले

    मुख्य सोहळा रेशीमबाग मधील स्मृती भवनात होणार

    सरसंघचालक मोहन भागवत याला मार्गदर्शन करणार आहेत

    तर इतर ठिकाणी ऑनलाइन स्वयंसेवक मार्गदर्शनाचा लाभ घेतील।

    विजयादशमी सोहळा संघाच्या दृष्टीने महत्वाचा सोहळा असतो

  • 13 Oct 2021 08:43 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली चौंडेश्वरी देवीचे मंदिर देखील उघडण्यात आले

    भंडारा

    भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली चौंडेश्वरी देवीचे मंदिर देखील उघडण्यात आले आहे.

    नवसाला पावणारी देवी अशी ओळख असल्याने या मंदिरात नवरात्रीच्या निमित्ताने लाखो भाविक दर्शन घेत असतात.

    या वर्षी मंदिरात 1468 घटानची स्थापना करण्यात आली आहे.

    या मंदीर परिसरात असलेल्या पूजेच्या साहित्यांची दुकाने देखील दीड वर्षांपासून बंद होती त्यामुळे दुकानदारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. मात्र आता मंदिर सुरू झाल्याने या दुकानदारांना रोजगार मिळाला आहे.

    त्यामुळे आता परीसरातील दुकानदारांनी आनंद व्यक्त केला आहे

  • 13 Oct 2021 08:42 AM (IST)

    कबनूर येथील दत्तनगर परिसरातील एका घरांमध्ये गॅसच्या भडक्यात एक महिला गंभीर जखमी

    इचलकरंजी –

    कबनूर येथील दत्तनगर परिसरातील एका घरांमध्ये   गॅसच्या भडक्यात एक महिला गंभीर जखमी

    कबनूर दत्तनगर अंगणवाडी सेविका महिला गंभीर जखमी गॅसच्या  गॅसच्या भडक्यात कांचन  स्वामी गंभीर जखमी

    कबनूर दत्तनगर अकरा गल्ली मधील घटना घराचे मोठे नुकसान

    घरावरील पत्रे उडून शेजारी  घरात पडले त्यामुळे भीतीचे वातावरण

  • 13 Oct 2021 08:42 AM (IST)

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेला भाजपचीही साथ

    रत्नागिरी-जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेला भाजपचीही साथ

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय सहकार पॅनेलची घोषणा

    निवडणुक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि भाजप एकत्र

    सहकारात राजकारण नको यासाठी बँकेची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न – पॅनल प्रमुख आणि विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे

    सहकार पॅनलच्या 21 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर

  • 13 Oct 2021 07:57 AM (IST)

    औरंगाबाद महापालिकेत जुनी पेंशन योजना रद्द

    औरंगाबाद –

    औरंगाबाद महापालिकेत जुनी पेंशन योजना रद्द

    नव्याने भरती झालेल्या 187 कर्मचाऱ्यांना झटका

    महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी घेतला निर्णय

    2020 मध्ये भरती झाले होते 187 कर्मचारी

    भरती होताच लागू करण्यात आली होती जुनी पेन्शन योजना

    पण या योजनेला शासनाची मान्यता नसल्यामुळे पेन्शन योजना केली रद्द

  • 13 Oct 2021 07:57 AM (IST)

    जन माहिती अधिकाऱ्यांना तब्बल 2 कोटींचा दंड

    औरंगाबाद –

    जन माहिती अधिकाऱ्यांना तब्बल 2 कोटींचा दंड

    राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने केली कारवाई

    औरंगाबाद खंडपीठाअंतर्गत येणाऱ्या पाच हजार अधिकाऱ्यांना ठोठावला दंड

    माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी केला दंड

  • 13 Oct 2021 07:56 AM (IST)

    बार्शीचे 26 कैदी पाठविले सोलापूरच्या तुरुंगात

    सोलापूर – बार्शीचे 26 कैदी पाठविले सोलापूरच्या तुरुंगात

    बार्शीच्या सब जेल मध्ये कैदी ठेवण्यास जागा पडु लागली अपुरी

    26 कैदी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात वर्ग करण्याबाबतचे  बार्शी अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिले होते आदेश

    बार्शी सब जेल मध्ये 20 ची क्षमता  असताना 58  कैदी ठेवल्यामुळे होत आहे सुरक्षतेच्या प्रश्न निर्माण

    सबजेल मध्ये क्षमतेपेक्षा तिप्पट कैद्यांचा भरणा

  • 13 Oct 2021 07:55 AM (IST)

    कोजागिरी पौर्णिमेला तुळजापूरला पायी चालत जाण्यास भाविकांना बंदी

    सोलापूर – कोजागिरी पौर्णिमेला तुळजापूरला पायी चालत जाण्यास भाविकांना बंदी

    जे भावीक जातील त्यांना सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर थांबवून त्यांना  परत पाठविण्यात येणार

    दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविक तुळजापूरला जात असतात पायी

    मात्र कोरोनामुळे यंदा त्यावर बंदी

    पोलीस अधीक्षकाकडून  काढण्यात येणार लवकरच  आदेश

  • 13 Oct 2021 07:31 AM (IST)

    धक्कादायक, नागपुरात दर महिन्याला 18 महिलांवर अत्याचार

    – धक्कादायक, नागपुरात दर महिन्याला 18 महिलांवर अत्याचार

    – 2021 मध्ये आठ महिन्यात शहरात 339 महिला अपहरणाची नोंद

    – नागपूरात महिलासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ

    – माहितीच्या अधिकारात धक्कादायक वास्तव समोर

    – उपराजधानीत महिलांवरील गुन्ह्यांचा वाढता आलेख

    – गेल्या पावणेतीन वर्षांत नागपूर शहरात दोन हजारच्या वर महिलांवरील गुन्हे

    – वाढत्या गुन्ह्यांमुळे नागपूरात महिला सुरक्षित आहेत?

  • 13 Oct 2021 07:30 AM (IST)

    सोलापूर जिल्हा निवडणूक कार्यालयाने मागवली विधानपरिषदेच्या पात्र मतदारांची माहिती

    सोलापूर –

    जिल्हा निवडणूक कार्यालयाने मागवली विधानपरिषदेच्या पात्र मतदारांची माहिती

    विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह राज्यातील आठ विधानपरिषद आमदारांची मुदत 15 डिसेंबरला संपत आहे

    विधान परिषदेसाठी महापालिका नगरपालिकेचे नगरसेवक जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सभापती मतदार

    एकुण मतदार संख्या 75 टक्के मतदार पात्र असतील तर निवडणूक घेता येते
    सोलापूरसह आठ मतदारसंघातील मतदारांची माहिती राज्य सरकारने मागवली

  • 13 Oct 2021 07:30 AM (IST)

    अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे धरणे आंदोलन

    बीड: अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा

    भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे धरणे आंदोलन

    आज दुपारी जिल्हाधिकारी कचेरीसमोर मुंडे यांचे धरणे आंदोलन

    आंदोलनापूर्वी पंकजा अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीला होणार नतमस्तक

    12 वाजता बीडमध्ये होणार आंदोलनाला सुरुवात

  • 13 Oct 2021 07:29 AM (IST)

    बिबवेवाडीतील कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी तीन संशयित चौकशीसाठी ताब्यात

    पुणे –

    – बिबवेवाडीतील कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी तीन संशयित चौकशीसाठी ताब्यात,

    – रात्री उशिरा बिबवेवाडीतुन ताब्यात घेण्यात आलं,

    – मात्र मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदार अद्यापही फरार,

    – आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या टीम तयार

  • 13 Oct 2021 06:49 AM (IST)

    पीएमपीएमएल काही गाड्यांना डिझेल तुटवड्याअभावी ब्रेक लावण्याची शक्यता

    – पीएमपीएमएल काही गाड्यांना डिझेल तुटवड्याअभावी ब्रेक लावण्याची शक्यता,

    – गेल्या आठवड्याभरात लांब पल्ल्यावरील गाड्यांमधील डिझेल संपल्याच्या दोनदा घटना घडल्यात,

    – पिंपरी-चिंचवड मार्गावर सध्या ६० च्यावर गाड्या आहेत. यासाठी दररोज साडेतीन ते चार हजार लिटर डिझेल लागते.

    – मात्र ११ ऑक्टोबरला वाहनांमधील डिझेल संपल्याने गाड्या जागेवर ठप्प राहिल्यात,

    – पीएमपीचे वेळापत्रक बिघडल्याने काही अंशी पीएमपी प्रशासनाला आर्थिक तोटा.

  • 13 Oct 2021 06:48 AM (IST)

    पुणे शहर परिसरात रिक्षा भाड्यात वाढ होण्याची शक्यता

    – पुणे शहर परिसरात रिक्षा भाड्यात वाढ होण्याची शक्यता,

    – साधारणपणे तीन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे,

    -भाडेवाढीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली,

    – येत्या दोन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार,

    – शहरात २०१५ मध्ये शेवटची भाडेवाढ झाली होती. यानंतर भाडेदरात वाढ झालेली नाही.

  • 13 Oct 2021 06:46 AM (IST)

    राज्य शासनाकडून कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत

    – राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यात जमा असून, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून विविध निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

    – तसेच, करोना काळात बंद करण्यात आलेल्या इतर बाबी देखील पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे.

    – मात्र, करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

    – या पार्श्वभूमीवरच आता राज्यभरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे हे देखील पुन्हा सुरू होत असून, याबाबतची कार्यपद्धती व नियमांचा अध्यादेश शासनाकडून जारी करण्यात आला आहे.

    – याशिवाय, बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेतील कार्यक्रमांना देखील नियंत्रित स्वरूपात सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

  • 13 Oct 2021 06:44 AM (IST)

    पूर टाळण्यासाठी पुणे महापालिकेने घेतली ५५ कोटींची योजना हाती

    पुणे –

    – पूर टाळण्यासाठी महापालिकेने घेतली ५५ कोटींची योजना हाती,

    – धानोरी, विश्रांतवाडीसह शहराच्या पूर्व भागात पुराचा फटका बसल्यानंतर या भागातील पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना,

    – यामध्ये पावसाळी गटारांसह, सांडपाणी वाहिन्यांचे काम केले जाणार,

    – तसेच पाणी साचणाऱ्या ६६ ठिकाणी उपाययोजना करण्याचा निर्णय,

    – यापार्श्‍वभूमीवर आयुक्त विक्रम कुमार यांनी बैठक घेऊन पूरस्थिती टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.