महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
अमरावती :
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर येथील सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या 20 वर्षीय आरोपीला 3 दिवसाची पोलीस कोठडी, रहिमापुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन इंगळे यांची माहिती
पुणे :
दिवसभरात १९६ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २१८ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१.
– २१७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९८१८३.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०४१.
– एकूण मृत्यू -८९७७.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८७१६५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५७५५.
चंद्रपूर:
राज्याच्या महाधिवकत्यांबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका म्हणजे नादानीची भाषा असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे मत, गेल्या दीड वर्षात महाधिवक्ता का बदलला नाही? असा विचारला सवाल, सध्याच्या राज्यकर्त्यांना राज्य कसे चालवावे हे कळत नसल्याची टीका, ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असा लगावला टोला, 100 वकिलांची फौज उभी करण्याचे आश्वासन होते, याची करून दिली आठवण, रोज सरकार वाचवण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा संकटातील जनतेला वाचवा, असे केले भाष्य
डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटल मधील वार्डबॉय व्हिडिओ प्रकरणी वॉर्डबॉयला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याला कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढील कारवाई लवकरच केली जाईल, असा खुलासा महापालिका प्रशासनाने केला आहे
जळगाव : पारोळा-कासोदा बसचा आज दुपारी सुदैवाने अपघात टळला. पारोळ्याहून कासोद्याला जाताना मंगरुळ गावापासून काही अंतरावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला चारीत गेली. सुदैवाने बस उलटली नाही. बसमध्ये प्रवासी होते. या अपघातानंतर प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासाला रवाना करण्यात आले. पारोळा आगाराची ही बस होती.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांनी साकीनाका येथे घडलेल्या घटनेची दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत पीडीत कुटुंबाला लवकरात लवकर मदत जाहीर केली जाईल, अशी माहिती राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी दिली
तसेच या प्रकरणात आता ॲट्रॉसिटी संदर्भातील कलम सुद्धा लावण्यात आल्याबाबत असल्याचं सांगितलं
मुंबई पोलिसांची कामगिरी अत्यंत चांगली, त्यांनी काही वेळातच आरोपीला अटक केली, हे कौतुकास्पद आहे
पोलिसांनी जे चांगला केलं, त्याला मी चांगला म्हणणार
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत राज्य सरकारला योग्य ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत
मात्र पीडित कुटुंबियांना नियमानुसार आर्थिक मदत, मुलांचं शिक्षण, पीडित कुटुंबाला घर मिळणार
आयोग ह्याबाबत लक्ष देणार आहे
जर काही कमतरता झाली तर आयोग नजर ठेवनार आहे
अनुसूचित जातीच्या लोकांवर जऱ कोणी अत्याचार करणार तर त्याच्यावर कडक कारवाई होणार, याची दखल अनुसूचित जाती आयोग घेणार आहे
पुणे येथे ट्रेनिंग साठी गेलेल्या १० पोलीस कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह, नागपूर पोलीस दलात खळबळ
३० ऑगस्टला नागपूर पोलीस दलातील सर्व ३१ पोलीस स्टेशन मधील गुप्त वार्ता विभागातील प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी व विशेष शाखेतील २ असे एकूण ३३ पोलीस कर्मचारी पुणे येथील महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी येथे १० दिवसांच्या ट्रेनिंग साठी गेले होते…
ट्रेनिंग आटोपून नागपुरात परत आल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याला ताप व खोकला सारखी सौम्य लक्षणे जाणवल्याने पोलीस रुग्णालयातही डॉक्टरांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना टेस्ट करण्याची सूचना दिली…
कोरोना टेस्ट शनिवारी पॉजिटीव्ह आल्याने पुण्याला गेलेल्या ३३ पैकी २० पोलिसांची टेस्ट करण्यात आली…
ज्यात १० कर्मचारी पॉजिटीव्ह आले आहेत…
या सर्व कोरोना पॉजिटीव्ह पोलीस कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवले आहे…
सोबतच उरावरची पोलीस कर्मचाऱ्यांची कॉरोन टेस्ट आज करण्यात येणार असून या सर्व कर्मचाऱ्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग वर पोलीस विभाग महापालिकेच्या मदतीने लक्ष ठेऊन आहे…
विशेष म्हणजे पॉजिटीव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी लसींचे दोन्ही डोज घेतले आहेत…
पॉजिटीव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांना कुठलाही विशेष त्रास नसून कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोलापूर –
बंजारा नृत्य करत बंजारा समाजातील महिलांनी गुलाबाच्या पाकळ्या उडवून केले आमदार संजय राठोडांचे स्वागत
आमदार संजय राठोड यांचं मुळेगाव तांडा येथे केले स्वागत
हलगीच्या कडकडात संजय राठोड यांचे केले स्वागत
सोलापूर –
माजी कॅबिनेट मंत्री आमदार संजयभाऊ राठोड मुळेगाव तांड्यावर दाखल
विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांसोबत आरक्षण,पदोन्नती मधील आरक्षण नॉन-क्रिमिलेयर, सामाजिक,राजकीय तसेच विविध विषयांवर करणार चर्चा
दक्षिण सोलापुर तालुक्यातील मुळेगाव तांडा
पुणे
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावणार !
लवकरचं कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची घोषणा,
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे येत्या दोन ते तीन दिवसात करणार घोषणा,
एकनाथ शिंदेंची फाईलवर स्वाक्षरी झाल्याची सूत्रांची माहिती,
10 मार्च रोजी महापालिकेच्या मुख्य सभेत सातव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली…
नगरविकास विभागाची सही यावरती राहिली होती..मात्र अखेर सही झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये,
येत्या दोन ते तीन दिवसात याची घोषणा केली जाईल….
अहमदनगर
नगर जिल्ह्यात लस घेण्यात युवक आघाडीवर
आतापर्यंत जिल्ह्यातील साडे सात लाख युवकांनी घेतली लस
तर जिल्ह्यात आतापर्यंत 21 लाख 90 हजार नागरिकांनी घेतली लस
18 ते 45 वयोगटात सर्वाधिक लस घेण्याचे प्रमाण
नागपूर –
नागपुरात या वर्षी कुठल्याही तलावात गणपती विसर्जन करता येणार नाही
शहरातील सगळ्या तलावाना लावण्यात आले टीन ची कठडे
सगळे तलाव झाले सील बंद
महापालिका गणेश विसर्जन साठी सज्ज
तलावांच्या बाजूला आणि शहरातील वेगवेगळ्या भागात बनविण्यात आले कृत्रिम तलाव
मागच्या वर्षी सुद्धा करण्यात आली होती तलावात विसर्जनाला बंदी
त्यामुळे तलावाची ऑक्सिजन पातळी वाढली
शहरात 248 कृत्रीम तलाव करण्यात आले
त्यातच करायचे आहे विसर्जन
भंडारा जिल्ह्यातील मोहागावदेवी या गावात गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी साकारलं कोव्हिड रुग्णालय
या गावात गणराय झाले “डॉक्टर”
मोहगाव देवी गाव करीत आहे कोरोणा व डेंग्यू संदर्भात जनजागृती.
वाशिम :
कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांच्या राहत्या घरी दरोडा
वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथे राहत असलेले कला दिग्दर्शक सावंत यांच्या घरी रात्री च्या सुमारास पडला दरोडा लाखो रुपयांचा ऐवज लंपास
घटनेची माहिती कळताच जऊळका पोलीस घटनास्थळी दाखल
रत्नागिरी – गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात 1 लाख 916 चाकरमानी दाखल
त्यापैकी 44 हजार 316 जणांनी दोन डोस घेतले चाकरमानी
तर 17 हजार 599 जणांनी जिल्हा प्रशासनाकडून आरटीपीसीआर टेस्ट
30 हजार 140 चाकरमानी कोरोना चाचणी न करता गावात
टेस्ट न करता आले सर्वजण सर्व्हेषणाखाली जिल्हा प्रशासनाची माहिती
महाराष्ट्रसह इतर 12 राज्यांच्या सीमेवरील तपासणी नाके बंद करण्याचे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून राज्यांना पत्र,
तपासणी नाक्यावर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्यानं ऑंल इंडीया ट्रान्स्पोर्ट संघटनेनं नीतीन गडकरींना लिहीलं होतं पत्र,
पत्राची दखल घेत राज्याच्या सचिवांना वाहतूक मंत्रालयाने पत्र पाठवत नाके बंद करण्याच्या दिल्या सूचना,
2017 पासून देशात वस्तू व सेवा कराची ( जीएसटी ) अंमलबजावणी झाल्याने नाके बंद करण्याचे आदेश,
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल,बिहार, केरळ, तेलंगणा,आंध्रप्रदेश ,गोवा, उत्तराखंड,छत्तीसगड, राजस्थान, या राज्यांच्या सीमेवरील तपासणी नाके बंद करण्याचे आदेश
राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यात पुणे जिल्हा अव्वल
आतापर्यंत तब्बल 90 लाख लोकांच झालं लसीकरण,
जिल्ह्यात एकुण 78 लाख 87 हजार 874 नोंदणीकृत मतदार असूनही 90 लाखाचा गाठला आकडा,
काल दिवसभरात 1 लाख 56 हजार 620 जणांच झालं विक्रमी लसीकरण,
आतापर्यंत जिल्ह्यात 90 लाख 80 हजार 970 जणांनी घेतला कोरोना लसीचा डोस
नागपूर रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाने वाचविले प्रवाशांचे प्राण
गाडी रवाना होत असताना एका प्रवाशाने चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला
मात्र त्याचा पाय घसरला आणि तो घासत पुढे गेला ,
स्थानकावर तैनात असलेल्या जवानाने धावत जाऊन त्याला बाहेर काढले आणि जीव वाचविला
मुनेश गौतम अस जीव वाचविणार्या जवान च नाव
सगळा घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद
नाशिक – एअरपोर्टच्या धर्तीवर होणार नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा कायापालट
खाजगी कंपनी खर्च करणार 800 कोटी रुपये
एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी अंडरपास बांधणार
भूमीगत पकर्किंग आणि प्रवाशांसाठी विविध सुविधा
कामाची ब्ल्यू प्रिंट तयार,लवकरच सुरू होणार काम
नाशिक शहरातील नैसर्गिक नाल्यांवर आज पासून हातोडा
सिडको परिसरातील अतिक्रमणा पासून होणार सुरुवात
पालिका आयुक्त कैलास जाधव यांचे प्रशासनाला आदेश
शहरातील 68 पैकी 22 नाल्यांचा सर्वेक्षणाचे काम पूर्ण
नैसर्गिक नल्यांवर अतिक्रमण झाल्याने शहराला प्रत्येक वर्षी पुराचा धोका
नागपूर
नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी पोलीस स्टेशनची मोठी कारवाई
1 कोटी रुपयांचा गांजा केला जप्त, तेलंगणा राज्यातून आली होती खेप
कॉफी घेऊन जाणाऱ्या ट्रक मध्ये ठेवण्यात आला होता 1105 किलो गांजा
नागपूर ग्रामीण पोलिसांना मिळाली गुप्त माहीती च्या आधारे सापळा रचून करण्यात आली कारवाई
तर एका दुसर्या घटनेत नागपुरातील एक हेड कॉन्स्टेबल ओरिसा मध्ये गांजा तस्करी करताना ओरिसा पोलिसांनी अटक केली
रोशन उगले असे त्याच नाव असून तो नागपुरातील वाथोडा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहे
तो सुट्टी वर असल्याची माहिती समोर येत आहे