महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी. ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) पार्थिवावर आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल (गुरुवारी) हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थचे निधन झाले होते. सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.
भिवंडी : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली भिवंडी शहरात म्हाडा तर्फे 20 हजार घरे उभारण्याची घोषणा महानगरपालिकेतील आढावा बैठकी नंतर पत्रकार परिषदेत केली आहे . तर शुक्रवारी सकाळी स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतास 5 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली .
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यात यंदा मोठा आणि तान्हा पोळा भरणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी जारी केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने सण साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पोळा सणाला ग्रामीण भागात विशेष महत्त्व असते. यानिमित्ताने ठिकाणी यात्रा मेळाव्याचे देखील आयोजन होते कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिक रित्या साजरा करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे.
हे दोन्ही सण सार्वजनिकरीत्या साजरे झाल्यास कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यामुळे प्रशासनाने मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास प्रतिबंध घातला आहे.
हा सण घरीच साजरा करावा बैलांच्या मिरवणूका काढण्यात येऊ नये. आरती, पुजा व अन्य धार्मिक कार्यक्रमात गर्दी होणार नाही. तसेच ध्वनीप्रदुषनाच्या नियमांचे पालन करावे. बैलांची पुजा करतांना शारीरिक अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच कोरोना विषाणु प्रादुर्भावासाठी शासनाने केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी विमला आर. यानी कळविले आहे.
मुंबई : गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला
मुंबई सेशन कोर्टातील विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
गिरीश चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत
गिरीश चौधरी यांना 7 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे
त्यांना ईडीने अटक केली आहे
तेव्हा पासून ते कोठडीत आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.
त्यावर सुनावणी पूर्ण झाली होती
कोर्टाने आज निकाल दिला.
गिरीश चौधरी यांनी जामिनासाठी अर्ज केला होता
आपला या गुन्ह्याशी काही संबंध नाही. या प्रकरणात सरकारचं काही नुकसान झालेल नाही. असे मुद्दे त्यांनी मांडले होते.
नाशिक कोरोना अपडेट
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 209
आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 128
नाशिक मनपा- 35
नाशिक ग्रामीण- 89
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 04
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8591
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 04
नाशिक मनपा- 02
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00
मुंबई : एकनाथ खडसे जमीन घोटाळा प्रकरण
जमीन घोटाळा प्रकरणात ईडीतर्फे आरोपपत्र दाखल
आरोप पत्रामध्ये 5 लोकांचे नाव
एकनाथ खडसे , मंदाकिनी खडसे ( पत्नी ) , गिरीश चौधरी ( जावई ) आणि 2 इतर लोकांचे नाव
गोंदिया : गोंदिया जिल्हात अनेक दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने देवरी आणि सडक अर्जुनी तालुक्यात हजेरी लावली. या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट बघत होते. मात्र आज आलेल्या पावसाने दोन्ही तालुक्यातील नागरिक तसेच शेतकऱ्यांना काही प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.
चंद्रपूर : शहरात पावसाची मुसळधार हजेरी
आज दुपारपासून कडक उन्हामुळे त्रस्त होते शहरवासी
गेल्या अर्ध्या तासापासून चंद्रपूर शहरात बरसतोय मुसळधार पाऊस
कापूस- सोयाबीन-धान पिकांना पावसाची नितांत आवश्यकता
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्येही अपुरा पाणीसाठा
जिल्ह्यातील पावसाची सरासरी गाठण्यासाठी या पावसाची गरज
मुसळधार पावसाने चंद्रपूरकर सुखावले
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेत्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबत बैठक
सह्याद्री अतिथिगृह इथ चार वाजता बैठक
मंत्री -विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, नाना पटोले सह्याद्रीवर दाखल
पुणे-पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात बेवारस गाईंना बेशुद्ध करून पळविण्याचा प्रकार समोर
-इंजेक्शन देऊन गाईंना बेशुद्ध कसं केलं जातं हे सीसीटीव्हीत कैद झालंय
-गोप्रेमींनी ही बाब पोलिसांच्या नजरेस आणून दिली आहे. तशी तक्रारदेखील लोणावळा पोलिसांकडे केली आहे.
-असा निर्दयीपणा करणारे हे भामटे कोण आहेत आणि ते या गाई कुठं घेऊन जातात, शिवाय आत्तापर्यंत किती बेवारस गाई घेऊन ते गेलेत याचा तपास करण्याची मागणी गोप्रेमींनी केलीये.
– लासलगांव राम मंदिर ट्रस्टी विष्णू निकम यांच्या घरी घरफोडी
– 10 ते 12 तोळे सोन्याची दागिने तसेच अंदाजे 3 ते 4 लाख रुपये रोख रुक्कम असा एकूण 8 ते 10 लाख रूपयांचा मुद्देमाल चोरन नेत चोरट्यानी केला पोबारा
– अज्ञात सहा चोरटे जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
– सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने लासलगांव पोलिसांच्या तपास सुरु
रत्नागिरी – खवल्या मांजराची तस्करी प्रकरणी 3 आरोपी ताब्यात वन विभागाची कारवाई
जिवंत खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना एका आलिशान कारसह वनविभागाने घेतले ताब्यात
वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद
गुहागर तालुक्यातील धोपावे येथील घटना
महेश महीपत पवार संदेश शशिकांत पवार मिलिंद जाधव या आरोपींकडून जिवंत खवले मांजर हा प्राणी तसेच महिंद्रा कंपनीची लोगन चार चाकी वाहन जप्त
वसई – वसईच्या समुद्र किनाऱ्यात संशयास्पद आढळलेल्या बोटीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश
वसईच्या भुईगाव आणि कळंब परिसरातील समुद्रात ही संशयास्पद बोट आढळून आली आहे..
भाईंदर उत्तन येथील स्टील लॉन्च करणारी ही बोट असून रापटर काळूखे असे बोट मालकाचे नाव आहे.
वसई पोलीस, कोस्टल गार्ड, मेरिटाईम बोर्ड यांच्याकडून संयुक्त कारवाही करत या बोटीचा तपास करत आहेत.
सोलापुरात गणेश प्रतिष्ठापनेपूर्वी महानगर पालिकेने केली विसर्जनाची तयारी
शहरातील दोन्ही ठिकाणी गणेश विसर्जनावर महानगरपालिकेने घातली बंदी
सिद्धेश्वर तलाव परिसर आणि कंबर तलाव परिसरामध्ये गणेश विसर्जनावर बंदी
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कामे सुरू असल्याने हिपरगा तलाव परिसरात गणेश विसर्जन करण्यास परवानगी देण्याची शक्यता
– उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीला सुरुवात
– बैठकीला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त उपस्थित
– पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीणचा आढावा घेणार.
अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण गुलाबराव काळे यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
विनयभंग, बळजबरीने कार्यालयात प्रवेश करून दमदाटी करणे या कारणास्तव गुन्हा दाखल
काळे यांनी एमआयडीसी येथील आयटी पार्कला नुकतीच भेट दिली होती.
यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या वर अनेक आरोप केले होते
मात्र आयटी पार्क मध्ये बळजबरीने प्रवेश करून येथील तक्रारदार महिलेचा हाथ पकडून ओढले आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, तसेच कार्यालयातील महिलांना दमदाटी प्रकरणी झाला गुन्हा दाखल
अंबरनाथमध्ये मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा
येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ, गाड्या अडवून हुज्जत
गोविंद पूल ते लोकनगरी नवीन रस्त्यावरील प्रकार
तासभर धिंगाणा घालून तरुणी झाली पसार
तरुणीच्या धिंगाण्याचा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित
सोलापूर – ओबीसी निर्धार मेळाव्याच्या आयोजकांसह 170 जणावर गुन्हा दाखल
31 ऑगस्टला मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थित झाला होता ओबीसी भटके-विमुक्त निर्धार मेळावा
मेळावा घेऊन कोरोना संसर्ग विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याने आयोजकासह 170 जणांवर गुन्हा दाखल
विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
– उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर,
– महाराष्ट्र सहकार परिषदेच्या कार्यालयाला सदिच्छा भेट
नागपूर शहरातील 4 लाख 1 हजार 406 मालमत्ता धारकांकडे मालमत्ता कराचे 650 कोटी थकीत
यातून वर्षानुवर्षे कर थकीत असलेल्या 9 हजार 745 लोकांना महापालिका कर विभागाने वॉरंट बजावले
तर नोटीस देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या 2 हजार 595 थकबाकी दारांची मालमत्ता जप्त करण्यात आली
495 मालमत्ता लिलाव करून वसुली करण्यात आली
कर संकलनासाठी महापालिका उचलत आहे कठोर पावलं
कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कामाची झाडाझडती
सुरक्षारक्षक दहा वर्षे प्रभारी व्यवस्थापक पद यासह विविध प्रकरणांची केली चौकशी
काही प्रकरणांमध्ये बचावली कारणे दाखवा नोटीस
लॉकडाऊन मध्ये मंदिर बंद असताना 60 च्या वर खाजगी सुरक्षा रक्षकांवर रेखावार यांचा आक्षेप
समितीचे सचिव विजय पवार यांना केलं कार्यमुक्त
नवीन नियुक्ती होईपर्यंत सचिवपदाचा कार्यभार धर्मादाय अधीक्षक शिवराज गायकवाड यांच्याकडे
– नागपूर शिवसेनेतील एकाधिकारशाही मोडीत काढण्याचा पक्ष नेतृत्त्वाचा प्रयत्न
– शिवसेना संपर्कप्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदींचे पक्षानं पंख छाटले?
– निर्णय घेण्यापूर्वी संपर्कप्रमुखांना चार जणांच्या घ्याव्या लागणार स्वाक्षऱ्या
– आ. आशिष जैसवाल, खा. कृपाल तुमाने, समन्वयक प्रकाश वाघ यांची घ्यावी लागणार संमती
– शेखर सावरबांधे प्रकरणानंतर शिवसेनेनं घेतलं धडा
– शिवसेनेवर हिंदी भाषिकांचा कब्जा झाल्याचा होतोय आरोप
पुणे –
– जिल्ह्यातील ग्रामीण भागात सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ
-जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात,
– आजअखेर जिल्ह्यात एकूण ९ हजार ३२७ सक्रिय कोरोना रुग्ण,
– पुणे शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या घरात,
– ग्रामीण भागात रोज सरासरी किमान पाचशेहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळून येत आहेत.
– नागपूर मनपा आयुक्तांकडे 150 कोटींच्या फाईल्स प्रलंबित
– महानगरपालिका सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरेंचा गंभीर आरोप
– ‘आयुक्तांनी फाईल्स मंजुर न केल्यास संघर्ष करणार’
– भाजप नेते अविनाश ठाकरे यांचा इशारा
– ‘राज्य सरकार अनुदान देत नाही, आयुक्त विकास कामांसाठी निधी देत नाही’
– महानगरपालिका सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी व्यक्त केला संताप
सोलापूर – तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे गरजेपेक्षाही तिप्पट ऑक्सिजन साठवण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन
ऑक्टोबरपूर्वी शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याच्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना
सध्या जिल्ह्याला लागणाऱ्या ऑक्सिजनच्या क्षमतेपेक्षा तीन पट अधिक ऑक्सिजन उपलब्ध करण्यात येणार
जिल्ह्याला सध्या आठ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता
नवीन ऑक्सिजन प्रकल्पामुळे 32 मेट्रिक टन ऑक्सिजन होणार उपलब्ध
भविष्यात ऑक्सिजन अभावी कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची घेतली प्रशासनाने दक्षता
पुणे –
– दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस
– पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय,
– इयत्ता बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींबरोबरच आता दहावीच्या मुलींना बक्षीस दिले जाणार,
– या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या मुलींच्या बॅंक खात्यावर त्यांच्या बक्षीसाची रक्कम जमा केली जाणार,
– यासाठी अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद,
– जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांची माहिती
वसईच्या समुद्रात एक संशयास्पद बोट काल पासून अडकलेली आहे
वसई भुईगाव ते कळंब परिसरात 15 माईल्ड अंतरावर ही बोट अडकलेली आहे
कोस्टल गार्ड, वसई पोलीस या बोटीचा तपास करीत आहेत
रात्री अंधार पडल्याने या बोटीचा तपास होऊ शकला नाही.. मात्र रात्रभर पोलीस समुद्र किनाऱ्यावर गस्तीसाठी ठेवण्यात आले होते
सोलापूर – दारु पिणाऱ्या ऐवजी विक्रेत्यांचा बंदोबस्त करणार
सांगोला तालुक्यातील सोमेवाडी ग्रामपंचायतीने केला ठराव
दारुड्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या ग्रामस्थ ,महिलांनी गावात दारूबंदी बंदी करावी असी केली होती मागणी
सरपंच ,उपसरपंच, सदस्य महिला ग्रामस्थांनी एकमताने ठराव
ठरावाच्या प्रती पोलीस निरीक्षक व तहसीलदार सांगोला यांच्याकडे केले सुपूर्द
त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईकडे महिला व ग्रामस्थांचे लागले लक्ष
कोल्हापूर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कामाची झाडाझडती
सुरक्षारक्षक दहा वर्षे प्रभारी व्यवस्थापक पद यासह विविध प्रकरणांची केली चौकशी
काही प्रकरणांमध्ये बचावली कारणे दाखवा नोटीस
लॉकडाऊन मध्ये मंदिर बंद असताना 60 च्या वर खाजगी सुरक्षा रक्षकांवर रेखावार यांचा आक्षेप
समितीचे सचिव विजय पवार यांना केलं कार्यमुक्त
नवीन नियुक्ती होईपर्यंत सचिवपदाचा कार्यभार धर्मादाय अधीक्षक शिवराज गायकवाड यांच्याकडे
– नागपूर शिवसेनेतील एकाधिकारशाही मोडीत काढण्याचा पक्ष नेतृत्त्वाचा प्रयत्न
– शिवसेना संपर्कप्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदींचे पक्षानं पंख छाटले?
– निर्णय घेण्यापूर्वी संपर्कप्रमुखांना चार जणांच्या घ्याव्या लागणार स्वाक्षऱ्या
– आ. आशिष जैसवाल, खा. कृपाल तुमाने, समन्वयक प्रकाश वाघ यांची घ्यावी लागणार संमती
– शेखर सावरबांधे प्रकरणानंतर शिवसेनेनं घेतलं धडा
– शिवसेनेवर हिंदी भाषिकांचा कब्जा झाल्याचा होतोय आरोप
नाशिक – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आज नाशिकमध्ये बैठक
आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर पालिकेतील प्रलंबित भरतीच्या निर्णयाकडे लक्ष..
भाजपाला शह देण्यासाठी नगरविकास मंत्री काय घोषणा करतात याकडे लक्ष
बैठकीत महापालिकेच्या हाती काय लागणार हे बघणे महत्वाचे
महापालिका आयुक्त,महापौर, विरोधी पक्ष नेते राहणार उपस्थित
– नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाईल ट्रॅकर’ लागणार
– ‘फाईल ट्रॅक झाल्याने भ्रष्टाचाराला आळा बसणार’
– जिल्हा परिषदेचे सीईओ योगेश कुंभेजकर यांचा फाइलला ट्रॅकर लावण्याचा निर्णय
– नागपूर जिल्हा परिषदेतील फाईल्स चा लागणार ठाव ठिकाण
– ग्रामीण भागातील कामांना मिळणार गती
– राज्यातील जिल्हा परिषदेमधील पहिलाच प्रयोग
सोलापूर जिल्हा परिषद शिक्षकांना आज मिळणार ऑनलाईन पदोन्नती
कोरोना महामारीच्या उपायोजना तील नियमावलीमुळे बऱ्याच दिवसापासून रखडल्या होत्या पदोन्नती
ऑनलाइन समुपदेशनाद्वारे आज मार्गी लावण्यात येणार जिल्हा परिषद शिक्षकांचा पदोन्नतीचा प्रश्न
सोलापूर जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे 3 हजार 18 रुग्ण घेत आहेत उपचार
तर 24 तासात ग्रामीण भागातील सात जणांचा कोरोनाने आणि मृत्यू
तर 262 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
नाशिक – उद्या होणार जनस्थान पुरस्कार 2021 वितरण
कुसुमाग्रज प्रतीष्ठानचा मानाचा पुरस्कार
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना, यंदाचा पुरस्कार
साहित्य क्षेत्रातील असामान्य कामगिरी करणाऱ्यांचा गौरव
दर 1 वर्षाआड,होते या पुरस्काराचे वितरण
नाशकात होणार वितरण
नाशिक – महापालिका प्रशासनाचा अजब कारभार..
कोव्हिडं सेंटर देखील देणार ठेकेदाराला चालवायला..
कोव्हिडं केअर सेंटर देखील आता ठेकेदाराच्या हातात..
अपुऱ्या मनुष्यबळाचं कारण देत महापालिकेने काढली निविदा..
डॉक्टर,आरोग्य कर्मचारी आणण्याची जबाबदारी ठेकेदारावर..
खाजगिकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवाशी खेळ..
प्रति बेड प्रमाणे ठेकेदाराला पैसे दिले जाणार
आयटी पार्क च्या जागेत उभारलेल्या 500 बेड च्या कोव्हिडं सेंटर साठी निविदा