महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
पुणे :
दिवसभरात १६५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २५२ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत १६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १२.
– २११ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९६९३७.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २१६७.
– एकूण मृत्यू -८९५३.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८५८१७.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६०९७.
नाशिक :
आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 134
आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 129
नाशिक मनपा- 37
नाशिक ग्रामीण- 83
मालेगाव मनपा- 05
जिल्हा बाह्य- 04
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8595
आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 01
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00
नागपूर कोरोना अपडेट :
नागपुरात आज 12 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद
शून्य मृत्यू तर 3 जणांनी केली कोरोना वर मात
एकूण रुग्ण संख्या – 493072
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482897
एकूण मृत्यू संख्या – 10119
गेल्या पाच दिवसांमधील नागपूरमधील कोरोना रुग्णांची संख्या :
1 सप्टेंबर – 6 रुग्ण .. मृत्यू – 0
2 सप्टेंबर – 1 रुग्ण .. मृत्यू -0
3 सप्टेंबर – 7 रुग्ण …. मृत्यू -0
4 सप्टेंबर – 10 रुग्ण … मृत्यू – 0
5 सप्टेंबर – 12 रुग्ण .. मृत्यू – 0
नागपूर :
मंत्री नितिन राऊत यांची प्रतिक्रिया :
आकडेवारी पाहता पुन्हा कडक निर्बंध लावावे लागणार आहेत
सिंगल फिगर आकडा डबल होत आहे
रेस्टॉरंटच्या वेळा 8 पर्यंत आणि दुकानांच्या वेळा 4 पर्य़ंत करावं लागणार
वीकेंडला बंद ठेवावा लागणार
तिसऱ्या लाटेने जिल्ह्यात पदार्पण केलं आहे
हे निर्बंध लावण्याआधी सगळ्यांशी चर्चा करणार, त्यानंतर 3 दिवसांनंतर निर्बंध लावण्यात येतील
काही सॅम्पल आम्ही तपासणीसाठी पाठविले आहे, त्यात डेल्टा प्लस आहे का? हे अहवाल आल्यानंतर कळेल
मागच्या वेळी जे सगळं घडलं ते आता होऊ नये यासाठी आम्ही आतापासून तयारी सुरू केली
राज्याच्या मंत्रीमंडळात याविषयी चर्चा करणार
आकडे वाढत आहे ते कमी होत नाही, त्यामुळे येणाऱ्या 3 ते 4 दिवसानंतर निर्बंध लागतील
जळगाव – कामगारांचे थकलेले वेतन मिळावे यासाठी अर्धनग्न आंदोलन
संविधान आर्मीचे जगन सोनवणे यांनी दिपनगर औष्णिक केंद्रासमोर केले आंदोलन
कामगार शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी साप्ताहिक आंदोलन सुरू
बेळगाव निवडणुकीच्या निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया :
बेळगावचा निकाल अनपेक्षित, किमान 20 ते 22 जागा एकीकरण समितीच्या होत्या. बेळगावच्या निकालामागे कारस्थान आहे का? बेळगाववर महाराष्ट्राचा हक्क राहू नये यासाठी कर्नाटकाचा कट, सातारा, सांगली, कोल्हापुरातील लोक अस्वस्थ, मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटताना लाज वाटत नाही?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु, बैठकीला मंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित, सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु, बैठकीआधी राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया :
महाराष्ट्रात कोकण, प महाराष्ट्रात आलेला प्रचंड महापूर आणि नुकताच मराठवाड्यामध्ये पडलेल्या अतिवृष्टी संदर्भातल्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मला या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे. या बैठकीचे आयोजन तीन वाजता सह्याद्रीमध्ये केले गेलंय. पूरग्रस्तांना भरीव मदत मिळण्याच्या मागणीसाठी काल मी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देवून काल आंदोलन स्थगित करून आज बैठकीसाठी आलो.
( शेतकरी नेते राजू शेट्टी यांची सदाभाऊ खोत यांच्यावर टिका…)
फालतू लोकांच्या टिकेला मी उत्तर नाही देत
( प्रविण दरेकर यांच्यावरही जहरी टिका…)
प्रविण दरेकर हे कुणाची भाटगिरी करतायत. गुजरातची की महाराष्ट्राची.
आंदोलनाचं हत्यार खाली ठेवलं नाहीये, जर निर्णय झाला नाही तर आंदोलनावर ठाम.
रत्नागिरी – गुहागर तालुक्यातील साखरीआगार येथील विहिरीत पडला बिबट्या
बिबट्याला वाचण्यासाठी वन विभागाची टीम रवाना
भक्षाचा पाठलाग करतना बिबट्या विहिरीत पडला
भर नागरी वस्तीत बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये घबराट
औरंगाबाद मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी मनसेचे आज तीव्र आंदोलन
औरंगाबाद शहरातील गुलमंडी वरल्या सुपारी हनुमान मंदिर समोर होणार आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते करणार घंटानाद आंदोलन
मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त
आंदोलनादरम्यान कार्यकर्ते मंदिर उघडण्याचा करणार प्रयत्न
बीड: करुणा शर्मा यांची पोलिसात तक्रार
जमाव अंगावर आल्याचे तक्रारीत नमूद
करुणा शर्मांच्या तक्रारीवरून परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल
70 ते 80 व्यक्तींवर गुन्हा दाखल
सोलापूर – सिद्धेश्वर तलावात आढळला 25 किलोचा मासा
तलाव परिसरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत काम सुरू असल्यामुळे कमी झाले आहे पाणी
काम करत कामगाराना आढळून आला 25 किलोचा मासा
सिंधुदुर्ग जिल्हा सीमेवर आजपासून आरोग्य पथके तैनात
कणकवली तालुक्यात 10 पथके तैनात
जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांची व चाकरमान्यांची तपासणी होणार
दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश अन्यथा चेकपोस्टवर होणार रॅपिड टेस्ट
कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथे सहा,फोंडाघाट चेकपोस्ट व कणकवली रेल्वे स्टेशनवर प्रत्येकी दोन पथके सज्ज
सोलापूर – मोहोळ सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चालत्या कारने घेतला अचानक पेट
कारमधील ड्रायव्हर दोघेजण सुखरूप
हॉटेल धुलवड समोरची घटना
प्रसंगावधान राखत संज क्षीरसागर यांनी गाडीतून ड्रायव्हर सह दोघांना काढले बाहेर
पुणे
– शेवटचा सोमवार निमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहाटेची महाआरती आणि महाभिषेक करण्यात आला
– श्रावणी सोमवार निमीत्ताने मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय
– दरवर्षी लाखो भाविकांनी भिमाशंकर परिसरामध्ये भोलेनाथाच दर्शन घ्याला येत असताना मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सुद्धा ह्या परिसरात शुकशुकाट
– नागपूरसह संपूर्ण विदर्भात बैलपोळा
– कोरोना निर्बंधांमुळे सार्वजनिक पोळा साजरा करण्यावर निर्बंध
– शेतकरी घरच्या घरी बैलांची पुजा करत साजरा करणार पोळा
– सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक बैलपोळा साजरा करण्यावर निर्बंध
– मनसे नेते राजू उंबरकर यांनी निर्बंधानंतरही पोळा साजरा करण्याचा दिला इशारा
– यवतमाळ जिल्हयात वणी परिसरात मनसे पोळा साजरा करण्याची शक्यता
नाशिक –
नाशकात सातपूर परिसरात गुंडांची दहशत
सराफ व्यावसायिकाचा पाठलाग करून केली बेदम मारहाण
सातपुरच्या गंगासागर परिसरात घडली घटना
कोयते,धारदार शस्त्रांनी वार करत काढला पळ
सराफ व्यावसायिक महेश टाक यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
बेळगाव –
बेळगाव महानगरपालिकेचा पहिला निकाल हाती
बोर्ड नंबर 15 मधून भाजपच्या नेत्रा भगवती विजयी
भाजप ने खात खोलल
शीतल नगरकर यांचा केला पराभव
पुणे
मेट्रो धावण्याआधीच पुणे मेट्रोला मिळाले 30 लाखाचे उत्पन्न…
अभिनेता शाहरुख खान याच्या सिनेमाच शूट होतय मेट्रोच्या स्थानकात..
संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकात दोन दिवसापासून शूट सुरु…
चित्रपट निर्मात्या कंपनीने दिवसाला दोन लाख रुपये दिले भाडे…
30 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत चालणार शूटिंग
दोन दिवसांच शूट करुन शाहरुख खान मुंबईला रवाना…
पुणे
-पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर गहुंजे-किवळे भागात अपघात
-या अपघातात आसावरी पुरुषोत्तम जोशी आणि सागर तळशिकर अशी जखमीची नावे
-जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय
-हे जखमी प्रवासी ईर्टिका गाडीतून मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येत असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय
-अज्ञात वाहनाला मागून धडकले यात दोघे गंभीर जखमी झाले, घटनास्थळी आयआरबी कर्मचारी आणि महामार्ग पोलीस
-अपघात इतका भीषण होता की गाडी मधील चालक हे काही काळ गाडीत अडकून पडले होते
सोलापूर –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग संवाद यात्रेला सुरुवात
राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी तेरा दिवसात सव्वीस प्रभागात साधणार संवाद
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा
सोलापूर महानगर पालिकेत राष्ट्रवादीचे केवळ चार नगरसेवक
पुणे
राज्यातील 80 हजार 222 प्रलंबित आणि खोटे दावे काढण्यात आले निकाली
राज्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले हे सर्व दावे फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम २५६ आणि कलम २५८ नुसार लोकअदालतीच्या माध्यमातून काढले निकाली
न्यायालयात दावा दाखल असताना फिर्यादीचा मृत्यू झाल्यास किंवा दावा दाखल केल्यानंतरही सुनावणीसाठी फिर्यादीच हजर न राहिल्यामुळे; अथवा समोरच्या व्यक्तीला त्रास देण्याच्या हेतूने दाखल केलेले खोटे आणि प्रलंबित दावे निकालात
राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे देण्यात आली माहिती
सोलापूर – मोहोळ तालुक्यातील नरखेड परिसरात मध्यरात्री जोरदार पाऊस
पावसाने दडी मारल्याने शेतकरी होते दमदार पावसाच्या प्रतीक्षेत
दमदार पावसाने बंधारे नाले दुथडी भरून वाहू लागले
नाशिक – गणेश मूर्ती विक्री स्टॉल धारकांना दिलासा..
कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर स्टॉल लावण्यास परवानगी
शनिवारी पोलिसांनी कारवाई करून अनेक स्टॉल धारकांना हटवल्याने झाला होता गोंधळ
पालकमंत्र्यांच्या मध्यस्ती नंतर स्टॉल धारकांना मोठा दिलासा..
शहरातील डोंगरे मैदानावर गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल
– विदर्भात यंदा 14 टक्के कमी पाऊस
– इतर विभागाच्या तुलनेत विदर्भात कमी पावसाची नोंद
– कमी पावसाचा खरीपातील सोयाबीन, कापूस आणि धान पिकाला फटका
– कमी पावसामुळे सोयाबीनचं उत्पादन घटण्याची
शक्यता
– कमी पावसाचा शेतकऱ्यांना बसणार फटका
नाशिक – भाजप सेनेत कुरघोडीचं राजकारण सुरू
सेना नगरसेवकांनी घेतली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
शहरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी सेना नेते एकनाथ शिंदेंच्या घरी
भाजपाला दणका देण्यासाठी प्रलंबित विषय परस्पर मसर्गी लावण्याचा सेनेचा प्रयत्न
नोकरभरती आणि इतर विषय तात्काळ निकाली काढण्याचे एकनाथ शिंदेंचे भेटीनंतर आश्वासन
नाशिक – ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळी
प्रदेश पदाधिकार्यांना स्थानिक भांडणात हस्तक्षेप करण्याची नामुष्की
नवीन नियुक्त्याना विरोध म्हणजे सोनिया गांधींना विरोध
प्रदेश पदाधिकाऱ्यांचा नियुक्त्याना विरोध करणार्यांना इशारा
प्रदेश पातळीवर झालेल्या नियुक्त्याना काँग्रेसच्या एका गटाचा विरोध
काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी थांबता थांबेना
– नागपूर जिल्ह्यात महिनाभरानंतर कोरोना रुग्णसंख्येचा दुहेरी आकडा
– जिल्हयात गेल्या 24 तासांत 10 नव्या कोरोना रुग्णांची भर
– जिल्हयात गेल्या 24 तासांत 4402 जणांच्या चाचण्या
– जिल्हयात 47 सक्रिय रुग्ण, 10 रुग्ण आमदार निवासात
– शहरात रुग्णवाढीमुळे चिंता वाढली
नाशिक – नाशिकच्या अनिकेत झवरने जिंकला मानाचा ‘आयर्न मॅन’चा खिताब
जर्मनीतील हॅमबर्ग इथे 29 ऑगस्ट रोजी झाली स्पर्धा
जगभरातील स्पर्धकांची समावेश
15 तास 50 मिनिटांची स्पर्धा अवघ्या 14 तास 35 मिनिटात केली पूर्ण
रनिंग,स्विमिंग,सायकलिंग एकाच दमात करण्याची अत्यंत अवघड स्पर्धा..
अनिकेत झवर चे नाशिकमध्ये जोरदार स्वागत..
ढोल ताशांच्या गजरात झालं आर्यन मॅन अनिकेत झवर चे स्वागत
नाशिकचे माजी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आणि त्यांची कन्या रविजा सिंघल यांनी यापूर्वी पटकावलाय आयर्न मॅन चा खिताब
‘ईडीकडून अनिल देशमुखांविरोधात लूकआऊट नोटीस जारी’, अॅड. जयश्री पाटील यांचा दावा, माजी गृहमंत्र्यांना खरंच अटक होणार?https://t.co/e9CXtMK6Sa#AnilDeshmukh #ED #EDnotice #LookoutNotice
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 5, 2021