पंढरपूरला निघालेल्या पालखी सोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पालखी सोहळ्यासाठी पुणे आरोग्य परिमंडळातून वैद्यकीय अधिकारी, आरोग्य दूत,आरोग्य सेवक असे एकूण 3906 कर्मचारी सेवेत असणार आहे. मुंबई अन् कोकणात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल आज संध्याकाळी सहा वाजता जाहीर होणार आहे. सुट्टीतील विशेष रेल्वे गाड्यांकडून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न पुणे विभागाला मिळाले आहे. या रेल्वेंकडून 22 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी प्रशांत जगताप यांना देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण प्रशांत जगताप “भावी आमदार” म्हणून कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटस आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
ईव्हीएम मतमोजणीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. ओटीपीमुळे ईव्हीएम हॅक होत नाही, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. ईव्हीएम हॅक करणं शक्यच नाही, असं अधिकाऱ्यांनी म्हटंल.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वायबसे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आहे. पंकजा मुंडेंच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे पोपट वायबसे यांनी आपलं जीवन संपवलं होतं. त्यामुळे वायबसे कुटुंबांवर दुखांच डोंगर कोसळला आहे. अशात आता पंकजा मुंडेंनी कुंटुबियांना भेट देऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला.
मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता सलमान खान याला धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी बनवारीलाल गुजर याला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. सलमानला युट्यूबवर व्हीडिओ अपलोड करुन बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली होती.
पुणे ते नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे मालवाहू गाडीने पेट घेतल्याची घटना घडल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाच्या प्रसंगावधानाने जिवीतहानी झालेली नसल्याचे म्हटले जात आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या विरोधात अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी तरुणाला कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रवींद्र वायकर जर evm नसते तर 40 मतांनी पण निवडून आले नसते. आता तर इलॉन मस्क आणि राहुल गांधी यांनी evm बद्दल म्हटलं आहे. जगात कुठेच ईव्हीएम वापरले जात नाही तर आपण का वापरतो असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून नव्या टर्मिनलची पाहणी करण्यात येत आहे. पुणे विमानतळावर मोहोळ यांनी पाहणी केली. पाहणीनंतर मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषद घेणार आहेत.
कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा सक्रिय झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 आणि 23 जूनला बारामती येथे राज्य कार्यकारणी बैठक आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे. लोकसभेतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चाहोणार आहे. शेट्टी यांनी आज राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आहे. पराभवाने खचून न जाता आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याच्या राजू शेट्टी यांनी सूचना दिल्या आहेत.
आज दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदनवन बंगल्यावर पक्षाची बैठक होणार आहे. नेते, आमदार, खासदार, सचिव, प्रवक्ते, जिल्हाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या बैठकीत 19 जूनच्या वर्धापन दिनाचे नियोजन करण्याबाबत चर्चा होणार आहे. आज संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत परत ठाणे टीप टॉप प्लाझा येथे निरंजन डावखरेसाठी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी आयोजित केलेल्या महायुतीच्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील.
बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा कार्यकर्ता मेळावा होतोय. मेळाव्याला मोठी गर्दी झाली. या मेळाव्याला पुतणे संदीप क्षीरसागर यांचं कुटुंब उपस्थित आहे. वडील रवींद्र क्षीरसागर आणि भाऊ हेमंत यांची उपस्थिती आहे. पाच वर्षांपूर्वी दुरावलेले क्षीरसागर कुटुंब पहिल्यांदाच एकत्र आलं आहे. जयदत्त क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर सख्खे भावंडं पुन्हा एकत्र आलेत.
हात सोडून तरुणीने चालवली बाईक. रिल बनवण्याच्या नादात तरुणीकडून अजब प्रकार.पुण्यातील हडपसर भागातील घटना. तरुणीचा स्टंट करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
चिंचवड उमेदवारीवरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरूच, जगताप कुटुंबाला उमेदवारी देण्यास पक्षातून नाराजी घराणेशाहीला विरोध. दिवंगत लक्ष्मण जगतापांचा मी कट्टर समर्थक आहे, त्यांच्यासोबत राहून शहराचा विकासासाठी हातभार लावला, असे चंद्रकांत नखाते यांनी म्हटले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून आमदारांची घेतली जाणार कार्यशाळा. या आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघाकडून केलं जाणार मार्गदर्शन
प्रकाश शेंडगे यांच्यावर मी बोलणार नाही आणि त्यांना मी विरोधक मानलेला नाही. ज्या वेळेस विरोधक मानेल त्यावेळेस बोलेल. माझी लढाई त्यांच्यासोबत नाही सरकार सोबत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
“सहकारातलं सर्वात महत्त्वाचं संशोधन केंद्र पुण्यात आहे. या दर्जेदार संस्थेचं काम समजून घेतलं. ६० वर्षांपासून वैकुंठ भाई मेहता सहकार संस्था काम करत आहे. पुणे विमानतळाची आता पाहणी करायला जाणार आहे. भूसंपादन करण्यासाठी जागा लागणार आहे. त्यासाठी आढावा घेणार आहे. पुरंदर, नवी मुंबई विमानतळाचे विषय मार्गी लावणार. दिल्लीत याविषयी बैठका घेतल्या आहेत,” अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी बैठकीनंतर दिली.
पुण्यातील वैकुंठ भाई मेहता सहकार भवनात सहकार खात्याची बैठक पार पडली. मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेत सहकार खात्याची बैठक पार पडली.
पंढरपूर- आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालं असून आगामी विधानसभेला महायुतीला ते विरोध करणार आहेत. मराठा समाजाला ज्या पद्धतीने सवलती दिल्या त्याच पद्धतीने धनगर समाजाला द्याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. धनगर समाजाच्या सर्व मागण्यांचा अध्यादेश काढूनच आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेला मुख्यमंत्र्यांनी यावं, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपुरकर यांनी ही माहिती दिली आहे.
आज देशभरात UPSC परीक्षा होती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गूगल मॅपवर चुकीचं परीक्षा सेंटर लोकेशन दाखवल्यामुळे 20 ते 25 विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित रहावं लागलं आहे. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जे हॉल तिकीट देण्यात आलं होतं त्यावर विवेकानंद कला, सरदार दिलीपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर असा पत्ता देण्यात आला होता. परंतु जेव्हा हा पत्ता गूगल मॅपवर टाकण्यात आला त्यावेळी गूगल मॅपने वाळूज एमआयडीसीमधील लोकेशन दाखवलं.
नागपूर – शिवसेना ठाकरे गटाची पूर्व विदर्भाच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या बैठक होणार आहेत. नागपूरच्या चिटनविस सेंटरमध्ये बैठक होत आहे. पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे.
डोंबिवलीतील अमुदान कंपनीतील स्फोट प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अमुदान कंपनीच्या मालकांना ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर… कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहतांना जामीन मंजूर…
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जल्लोषात आनंदात उत्साहात साजरा होतोय आंतरराष्ट्रीय फादर्स डे… पेशाने शासकीय अधिकारी असलेले पण गाण्याची आवड असलेल्या काही हौशी गायकांनी याठिकाणी कार्यक्रम ठेवला होता… याच निमित्ताने ‘पापा कहते है बडा नाम करेगा‘ हे गाणं सुरू करतात बऱ्याच प्रेक्षकांची याला दाद मिळाली आणि सगळ्यांनी अचानक या ठिकाणी नाचायला सुरुवात केली…
महायुतीत पराभव झालेल्या 33 मतदारसंघाचा भाजपकडून आढावा… 22 जूनपर्यंत निरीक्षकांना आढावा अहवाल सादर करण्याच्या सूचना.. पराभवाची कारणं शोधण्यासाठी भाजपकडून नियोजन
राहुल नार्वेकर भाजपचे पॉलिटिकल एजंट… शिवसेनेबाबत नार्वेकरांनी बनावट निकाल दिला आहे… नार्वेकरांप्रमाणे लोकसभेट अध्यक्ष घटनाबाह्य निर्णय देऊ शकतात… लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्राबाबूंनी उमेदवार दिला तर पाठिंबा देऊ… असं देखील संजय राऊत म्हणाले.
सर्वत्र पोहोचलेल्या मान्सून पावसाचे पूर्व विदर्भात मात्र अद्याप दर्शन नाही…. शनिवारी नागपूरच्या तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशाची वाढ होत सर्वाधिक 41.4 अंशाची नोंद झाली… तसेच गोंदिया,चंद्रपूर,ब्रह्मपुरी सह इतर जिल्ह्यातही कमाल तापमान सरासरीपेक्षा वर आहे… ऊन व बाष्पयुक्त वातावरणाच्या दमटयुक्त उकाड्याने नागरिक हैराण… वादळ व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नैसर्गिक नाले ओढ्याना पूर येऊन ओढ्या वरील पुल वाहून गेल्याची घटना घडल्या आहे. मिरज मालगाव दिंडी वेस येथील मिरज ओढ्या वरील पुल वाहून गेल्याने सद्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. त्याच प्रमाणे रुईकर पानंद रस्त्यावरील ओढ्या वरील पुल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे.येथील विद्यार्थ्याची गैरसोय होत असल्याने ओढ्यावरील पुल केव्हा होणार असा संतप्त सवाल विद्यार्थ्यानी केला आहे.
ठाण्यातील ज्या होर्डिंगचे स्थिरता प्रमाणपत्र अजूनही आलेले नाही अशी २५ होर्डिंग ताबडतोब काढून टाकावीत. तसेच, मंजूर आकारमानापेक्षा मोठी असलेली ५३ होर्डिंगही ताबडतोब काढण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत.
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पांढऱ्या पायाचा सरकार आला आणि मराठा आरक्षण गेले. ओबीसी आरक्षण सुद्धा याच पांढऱ्या पायाच्या आघाडी सरकार मुळे गेले, असे खळबळजनक विधान बबनराव लोणीकर यांनी परभणीत केले. यंदाची लोकसभा निवडणूक विकासावर न होता जातीपातीच्या मुद्द्यावर लढवली गेली, अपप्रचारामुळे मराठवाड्यात आमचा पराभव झाला, असा दावा त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मंत्र्यांची लाईन लागली होती. पण आमच्या उपोषणाला भेट द्यायला एक मंत्री देखील आला नाही, अशी खंत शेंडगे यांनी बोलून दाखवली. येणाऱ्या विधानसभेला आम्ही आव्हान देतो जो आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल, जो सग्या सोयऱ्याचा आदेश काढेल त्यांचे आमदार आम्ही चून चून के गिरायांगे, असा इशारा प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे साहित्यिक देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीला साहित्य अकादमीच्या ‘युवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे, कोरोना काळात त्यांनी ही कादंबरी लिहली, एका शिंप्याची कहाणी यात असुन त्याचे शिवणकाम, दुःख व संघर्ष याची व्यथा यात त्यांनी मांडली आहे.
सोलापुरात बंद पडलेल्या एसटी बसला प्रवाशांनी धक्का दिला. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ही घटना घडली.सोलापूरच्या दिशेने येणारी बस ऐन शहराच्या मुख्य चौकात बंद पडल्याने वाहतुकीला अडथळा आला. मग शेवटी बंद पडलेल्या एसटीला प्रवाशांनीच धक्का देऊन बाहेर काढले.
पिंपरी-चिंचवडच्या कासारवाडी परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. किराणा मालाच्या दुकानासमोर समोर ठेवलेले दूध सकाळी चोरताना हे भुरटे चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.
नागपुरातील केडीके चौकातअपघातात भरधाव कारने 5 जणांना उडवले. त्या घटनेतील कार चालक हा अल्पवयीन आहे. गाडीचा टर्न घेताना कारच्या ब्रेक ऐवजी एकसिलेटरवर पाय पडल्याने कारच नियंत्रण सुटले. यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या भाजीच्या दुकानात कार घुसल्याने दोन दुकानदार आणि तीन ग्राहक जखमी झाले.
पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षाकरिता 100% अनुदातीत मोफत बस प्रवास पास व महापालिका हद्दीतील खाजगी शाळेतील पाचवीचे दहावीच्या विद्यार्थ्यांना 75 टक्के सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासचे वितरण सुरू करण्यात आले आहे. या पासचे अर्ज निगडी, भोसरी, पिंपरी आगार पिंपरी मुख्यालय, लोखंडे भवन व सर्व पास केंद्रावर उपलब्ध आहेत.
कळंबा कारागृहात कैद्याचा खून झाला आहे. गांजाच्या आर्थिक वादातून हा खून झाला. यामुळे कारागृहातील अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाटयावर आला आहे. कैद्याच्या मारहाणीत मृत्यू झालेला कैदी मुन्ना खान हा कारागृहात गांजाची तस्करी आणि विक्री करत असल्याची बाब समोर आली आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल आज संध्याकाळी सहा वाजता जाहीर होणार आहे. राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. परीक्षेसाठी तब्बल सात लाख २५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.