मुंबई : आज सोमवार 7 मार्च 2022. आपण राजकारण, (Politics) सामाजिक यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा आज सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आजही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विविध बातम्यांचे अपडेट आपण दिवसभरात पाहणार आहोत
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विमान अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. दोन विमानं समोरासमोर आल्याननं अपघात झालाय. ममता बॅनर्जी यांच्या पायाला आणि पाठिला दुखापत झाल्याची माहिती आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती.
– उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवन वर दाखल
– विधानसभा अध्यक्ष निवडणुक 9 मार्चला घेण्यासाठी महाविकास आघाडीनं मागितली आहे परवानगी
– या निवडणूक प्रक्रियेसाठी राज्यपालांनी,द्यावी परवानगी
– राज्यपालांची मनधरणी करण्यासाठी दोन्ही मंत्री राजभवन वर
– दरम्यान, याच निवडणुकीवर,भाजप नेते गिरीश महाजन उच्च न्यायालयात
– 10 लाख रुपये आज भरले,उद्या होणार सुनावणी
– या सुनावणी पूर्वी,राज्यपाल परवानगी देतात का ? हा प्रश्न अनुत्तरीत
महाविकास आघाडीच शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर पोहचले
विधानसभा अध्यक्षपद निवडणूक , ओबीसी आरक्षण सुधारणा विधयेक मंजुरी
या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्याच्या काही भागात गारपीट….
शहादा तालुक्यातील बामखेडा परिसरात गारपीट गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता….
जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण…
सोन्या चांदीच्या भावात विक्रमी वाढ
24 तासात सोन्याचे भाव 900 रुपयांनी वाढले
तर चांदीचे भाव 2 हजार 400 रुपयांनी वाढले
जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचा भाव 53 हजार 500 रुपयांवर तर चांदीचा भाव 72 हजार 700 रुपयांवर
युक्रेन रशिया युद्धजन्य परिस्थिती व जागतिक बाजारपेठेच्या परिणामामुळे सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी वाढ
लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी औरंगाबादेत पुन्हा कडक निर्बंध
लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय मिळणार नाही पेट्रोल डिझेल गॅस
रेशन दुकान, मॉल आणि हॉटेलमध्येही लसीचे दोन डोस बंधनकारक
सरकारी कार्यालयात सुद्धा प्रवेश करण्यासाठी लागणार लसीचे दोन डोस
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा पुन्हा एकदा महत्वपूर्ण निर्णय
धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्या सह पाऊस…
अवकाळी पाऊस मुळे वातावरण मध्ये काहीसा गारवा,
गहू सारख्या पिकांना फटका बसण्याची शक्यता
पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचा भाग तुटला
सजावटीचा भाग काढताना भाग तुटल्याचा महापालिकेचं स्पष्टीकरण
मात्र उद्घाटनाची घाई केली काँग्रेस, मराठा सेवा संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
भाजपविरोधात दिल्या घोषणा
कालचं पंतप्रधानांच्या हस्ते झालं पालिकेत उद्घाटन
शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी राजू शेट्टी ठाम
पहाटे 4 ते 6 वाजे पर्यंत
आणि दुपार ची वीज मिळावी
वीज बिल थकबाकीसाठी सक्ती राज्य सरकार कडून सुरु आहे.ती थकबाकी त्वरित कारवाई थाबवावी
वीज बिल जिल्हानिहाय वीज बिल दुरुस्त करावी
राज्य सरकारन 15 दिवसा ची सरकार न वेळ सरकारने मागितली आहे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय उद्या जाहीर करणार
कृषी पंपाची वीज बिल अवास्तव आहे ते वीजबिल शेतकऱ्यांना दुरुस्त करून द्यावं
उद्या संजय राऊत यांची पत्रकार परिषद
उद्या संध्याकाळी 04 वाजता होणार पत्रकार परिषद
सेनाभवनमध्ये होणार पत्रकार परिषद
संजय राऊत यांनी ट्विट करून दिली माहिती
1992 पर्यंत सगळे अधिकार सरकारकडे होते, त्यानंतर ते अधिकार निवडणूक आयोगाला दिले. त्यावर आज पुन्हा विचार करुन अजितदादा, दरेकर, एकनाथ शिंदे, मुश्रीफ होते, आम्ही एकमेकांनी ठरवलं, की वॉर्ड रचना, विभाग याची माहिती आता शासन गोळा करेल, आणि ती निवडणूक आयोगाकडे देऊ. त्यावर निवडणूक आयोग निवडणूक घेईल. आता हा सगळा अभ्यास आणि कार्यक्रम राबवण्यात येईल.
बाठिंया जे मुख्य सचिव होते, सेन्सस कमिशनमध्ये ज्यांनी काम केलेलं आहेत ते आहेत, टाटा कन्सन्टन्सीची मदत, इंडियन नॅशनल पॉप्युलेशन सेंटरची मदत घेऊन इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरु करत आहोत. यासाठी विधानसभेतसुद्धा विरोधक, सत्ताधाऱ्यांनी शांत राहून दोन्ही बिलं पास केली, त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो.
स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या भेटीला मंत्रालयात दाखल
राजू शेट्टींसह खासदार धैर्यशील माने,पालकमंत्री बंटी पाटील उपस्थित
शेतकऱ्यांच्या वीजतोडणी विरोधात शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. काही ठिकाणी महावितरणचे कार्यालयही जाळण्यात आल्याच्या घटना घडल्या. तसच शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी नेमक्या मागण्या समस्या जाणून घेण्यासाठी आज ऊर्जामंत्री, डॉ नितीन राऊत यांच्या मंत्रालयातील दालनात आज राजु शेट्टी यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे.
आज जे बील मंजूर झालंय त्यामुळं आतापर्यंत झालेली प्रभाग रचना, जिल्हा परिषद , पंचायत समिती, गट आणि गण असो, महापालिका असेल ती रद्द झाली आहे. आता सरकार प्रभाग रचना तयार करेली आणि ती निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. आम्ही ही मागणी केली होती पहिल्यांदा आमची मागणी मान्य केली आहे. काही अधिकार निवडणूक आयोगाकडे आणि काही अधिकार सरकारकडे जातील.
या विधेयकामुळं ओबीसी आरक्षणाचा मार्ग खुला झालेला नाही. आता, राज्य सरकारला इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी काही कालावधी मिळेल. इम्पेरिकल डाटा सरकारनं तयार करुन तो सादर करावा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. प्रभाग रचनेचा अंतिम अधिकार निवडणूक आयोगाकडे जाईल. ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालंय.
सरकारला नव्यानं रचना करायची आहे. ते किती दिवसात करतात हे पाहावं लागणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्यानं विजेचं कनेक्शन कापल्यानं फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. हा प्रश्न आम्ही विधानसभेत मांडला. सरकारनं शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापावी, अशी मागणी केली. हे सरकार कोडगं, असंवेदनशील आहे. हे सरकार बिल्डरांचं आहे, हे सरकार बेवड्यांकरता धोरण तयार करतं.
शेतकऱ्यांना नापिकी आणि इतर कारणांनी वीज कनेक्शन कापू नका अशी विनंती केली होती. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी वीज कनेक्शन मे पर्यंत कापणार नाही, असं म्हटलं होतं. परंतु, उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला ऊर्जा मंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापलं जातंय. काही शेतकऱ्यांनी वीज बील थकवलं तरी डीपी काढून नेलं जात आहे. रब्बीचा हंगाम खराब झाला आता खरिपाचा हंगाम खराब होणार अशी स्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष सभागृहात मांडत होतो.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार देखील हीच मागणी करत होते. त्यांचा आवाज दडपण्यात आला. एक सुरज जाधव फेसबुक लाईव्ह करत देवाघरी गेला. आमची शेतकऱ्यांना विनंती आहे की आत्महत्या करु नका. आपण सरकारशी संघर्ष करु, अस्मानी आणि सुलतानी संकटाशी आपण सामना करु, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेतकरी विरोधी ठाकरे सरकारचा आम्ही निषेध करतोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी आहे. विधानसभेत ओबीसी विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर हे विधेयक मांडण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाचे काही अधिकार आता राज्य सरकारला मिळणार आहेत. प्रभागरचन, आरक्षण ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे घेण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडे केवळ आता निवडणुका घेण्याचे अधिकार असतील. आता सरकार प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाकडे देत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक जाहीर करता येणार नाही.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही भाजप आक्रमक
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांची घोषणाबाजी
नवाब मलिक यांचा राजीनामा येईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा
दाऊदच्या दलाल मंत्र्याचा राजीनामा घ्या, हातात बॅनर धरुन घोषणाबाजी
राजीनामा द्या, राजीनामा द्या, नवाब मलिक राजीनामा द्या, भाजपचे नारे
मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक कथित गैरव्यवहार प्रकरणात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस अडचणीत येण्याची शक्यता
मुंबै जिल्हा बॅंकेच्या कार्यक्षेत्राबाहेर नियम डावलून 27 कोटी रूपयांचं कर्ज दिल्याचा आरोप
केवळ कागदोपत्री असणाऱ्या उद्योगांना 27 कोटी रूपयांचं कर्ज
मुंबै बॅंकेकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
तत्कालीन अध्यक्ष प्रविण दरेकर आणि कर्ज घेणाऱ्या सुरेश धस आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मुंबै बॅंकेवरील सत्ता जाताच दरेकरांवर कारवाईचे संकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता अकोल्यात राज्यमंत्री बच्चू कडू यांची टीका
मी कबड्डी प्लेअर आहे, दिल्ली मुंबईतला व्हीआयपी कार्यकर्ता नाही, अभी जमीनसे जुडा हुआ हू
कबड्डीत दम आणि ताकद पाहिजे, छका मारणाऱ्याचा गेम नाहीये, असं म्हणताच उपस्थिताचा पिकला एकच हशा
कबड्डी में मारनेवाले को जिंदा भी कर सकते है हम, “जो शंकर भगवान को जमता वह हमको जमता है”, मेलेला गडी हा जिवंत केवळ कबड्डीतच होतो, मर्दानगी ही कबड्डीत आहे, राज्यमंत्री कडू यांचं अकोल्यात जाहीर भाषणात वक्तव्य
अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यातील केळीवेळी येथे श्री हनुमान मंडळ तर्फे 15 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात भाषण
नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या कौशल्य विकास आणि रोजगार विभागाच्या नवी मुंबईतील कोकण भवनवर कार्यालयावर मनसेचा आज दुपारी 1 वाजता मोर्चा
महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारांची फसवणूक केल्याचा मनसेचा आरोप
राज ठाकरेंचे पत्र विभागाच्या आयुक्तांना दिले जाणार आहे, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांची माहिती
येथे भाजप किंवा मनसेचा प्रश्न नाही तरुण बेरोजगार झाले आहेत, आम्ही विरोधी पक्षात आहोत तर आवाज उठवणार – देशपांडे
या राज्यात अराजकता पसरत चालली आहे, भाजप नेते आशिष शेलार यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र
केंद्रीय मंत्र्यांना चौकशीसाठी नऊ-दहा तास बसवून ठेवलं जातंय,
आमदारांना अटकपूर्व जामिनाचं प्रोटेक्शन असतानाही डांबून ठेवलं जातंय,
तक्रारदार म्हणून पोलिसांकडे जाणाऱ्या किरीट सोमय्या, करुणा शर्मा यांच्यावरच केस दाखल केली जात आहे,
विविध केसमधील पंचांवर मंत्रीच दोषारोप करत आहेत,
अमरावतीत शाईफेक केल्याबद्दल गुन्हा दाखल केलात, मग विरोधीपक्ष नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार हे बघायचं आहे, आशिष शेलार यांची टीका
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका
फडणवीसांवरील शरद पवारांच्या टीकेला दिलं उत्तर
राष्ट्रवादीचा स्थापनेपासून राष्ट्रवादीचा नेता आपल्याला मुख्यमंत्री म्हणून बसवता आला नाही
2019 मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप आणि शिवसेनेचे आमदार सत्तास्थापनेसाठीच निवडून आले
वंचितांच्या मुलांना राजकारणात आणलं म्हणून प्रस्थापिताचा तीळपापड होतोय, पडळकरांची टीका
फडणवीसांनी पुन्हा पुन्हा येणार असं म्हटलं, तरी आपण त्यांना येऊ देणार नाही, असं वक्तव्य काल शरद पवारांनी केलं होतं
मुंबई महापालिकेची नारायण राणे यांच्या बंगल्याला पुन्हा एकदा नोटीस
सात दिवसात उत्तरं द्यावं लागणार
नारायण राणे यांच्या जुहू तारा रोड येथील अधीश बंगल्यात बेकायदेशीर बदल केल्याचे समोर आले आहे.
त्यानुसार पालिकेने राणे यांना 351 कलमानुसार नोटीस दिली आहे.
या नोटीसमध्ये बांधकाम करताना दिलेल्या प्लानमध्ये बदल करण्यात आले आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे. या आठवड्यात 11 तारखेला मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेसाठी करातून काही सूट तसेच नवीन योजना याबद्दल उत्सुकता असेल. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकार मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर कायदा करणार असून या आठवड्यात ते विधेयक सभागृहात मांडले जाणार आहे. या नवीन कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभाग रचना तसेच निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार राज्य सरकार आपल्या हातात घेणार आहे. विरोधक पहिल्या आठवड्यात सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा आणि ओबीसीच्या मुद्द्यावर आक्रमक होते. याही आठवड्यात भाजप हे मुद्दे लावून धरणार आहे. पण त्याचसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर कामकाजात सहभागही विरोधकांकडून घेतला जाणार आहे
नागपुरातील हवाला रकमेचा तपास ईडी करणार का?
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार-परतवाडा मार्गावर भीषण अपघात
दुचाकीला ट्रकची धडक; तीन जण ठार, कुरळ पूर्णा फाट्याजवळ रात्री अपघात
घटनास्थळी दोघांचा तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
शे शागीर शे हबीब, शे तनवर शे सत्तार आणि अकिलेश सलामे अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे
तिघेही कुरळपूर्णा येथील रहिवासी