मुंबई : आज गुरूवार 28 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. खासदार धानोरकरांचं घर फोडल्यानंतर चंद्रपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. या बंगल्यात काहीही चीजवस्तू न सापडल्याने तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे. मुख्य दाराचे कुलूप तोडून आत चोरट्यांनी प्रवेश केला होता. खासदार बंगल्यात नसल्याची केली होती खात्री, पोलीस तपासात आणखी 2 घरफोड्या त्याच चोरट्यांचं उघडकीस आलं आहे.
आमच्या हिंदू धर्माला कोणी बदनाम करू नका
हनुमानजी आमच्यासाठी निष्ठा आणि प्रमाणिकतेच व्यक्तिमत्व आहे
राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला गर्दी होते
त्यांच्यामुळे पोलीसांवर ताण असतो,
आमच्या सभेला लोक आणावी लागत नाही काह़ीना आणावी लागतात
त्यामुळे पोलिसांवर इतरांना परवानगी देताना ताण नसतो
मात्र राज ठाकरेंच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा ,कम्युनिस्ट अशी सगळेच असतात
भाषणात काय मुद्दे येतील हे मी सांगू शकत नाही त्यांनी त्यांच काम केलंय आम्ही आमचं करू
आम्हाला कोणतीही अट जाचट वाटत नाही
सभेला अशा गोष्टी असतात, आम्हाला जरा जास्त असू शकतात
पोलिसांना सतर्क असणं गरजेचं आहे
जेवढ्या अटींच पालन करता येत असेल तेवढं करू
अडचणी कोणत्याच येणार नाही आमची टीम आहेत
त्यांच नेतृत्व हे नीतीन आणि शिरीष सावंत स्वतः करतायेत
आजचा विषय हा बैठकीचा आहे
दूसरा विषय बोलायला अवधी आहे
राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळताच सभेची जय्यत तयारी सुरू
सभेचं स्टेज बनवण्याचं काम अत्यंत वेगात सुरू
सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 15 हजार खुर्च्याही दाखल
बॅरिगेट आणि लायटिंगचेही काम जोरात सुरू
सभेला परवानगी मिळताच कामाला आली गती
– पुण्यातील महाविकास आघाडीच्या सभेबाबत खुद्द अजित पवारच अनभिज्ञ,
– या सभेबाबत मी पहिल्यांदाच ऐकत असल्याचं अजित पवारांनी केलं स्पष्ट,
– माध्यामांमध्ये हे कुणी पसरवलं हे मला माहिती नाही,अजित पवारांची प्रतिक्रिया,
– ३० तारखेच्या सभेला महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार,
– महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलं होतं जाहीर.
यवतमाळ- दारव्हा नगरपरिषदचे शिवसेनेचे नगरसेवक रवी तरटे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
शिवसेनेचे आमदार संजय राठोड याच्या मनमर्जीला आणि कार्यपद्धतीला कंटाळून राजीनामा देत असल्याचा केला राजीनामा पत्रात उल्लेख
रवी तरटे यांनी संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा म्हणून केली होती मागणी तेव्हा पासून शिवसेनेत होते चर्चेत
जिल्हा प्रमुख पराग पिंगळे कडे सोपविला राजीनामा पत्र आणि शिवबंधन
नाना पटोले
महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न 2 वर्षांपासून सुरू आहे.
भाजपचे केंद्रातील सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलं.
ते पाप लपविण्यासाठी वातावरण खराब करण्याचं काम केंद्र सरकार आणि केंद्र सरकारकडून सुरू आहे.
ज्या पक्षाचं नाव भाजपकडून घेतलं जातं त्या पक्षात काय घडतं आहे हे आम्हला कसे कळणार
अंधारात कोणाची काय खलबतं चालतात याच्याही आम्हाला काही देणं घेणं नाही
राजकारणात कोणीच कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो.
ही भूमिका पुण्यातून आलेली आहे.
आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी जो निर्णय घेतला तो आम्ही पाळतो.
काँग्रेसला दुसऱ्यांच्या घरात काय चाललयं हे डोकावून पाहण्याची सवय नाही
अमरावती:आमदार रवी राणा यांचा आज वाढदिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजापेठ चौकातील हनुमान मंदिरात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसेचे पठण करण्यात आले. तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने पाणपोईचे देखील उटघाटन करण्यात आले.
दीपक गिरे डीसीपी आणि निशीकांत भुजबळ एसीपी यांच्यामध्ये बैठक सुरू
सिपी सोबतची डिसीपींची बैठक संपली, सभेच्या परवानगी बाबत सस्पेन्स कायम
हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये बैठक सुरू
दोन डीसीपी आणि एक एसीपी बैठकीला उपस्थित
सभेसाठी लावलेल्या नियमावली बाबत चर्चा सुरू
चर्चेनंतर सभेला मिळणार परवानगी
तर औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातही पोलीस आयुक्तांची बैठक सुरू
अजूनही राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्याबाबत निर्णय नाही
आज परवानगी देण्याबाबत निर्णय घेऊ असं पोलीस आयुक्तांनी दिलं होतं स्पष्टीकरण
नागपूरच्या उंटखाना रोड वरील एका इमारती मध्ये जळलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला
इमामवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील घटना
मृतदेह महिलेचा की पुरुषाचा अद्याप ओळख पटली नाही,
पोलीस घटनास्थळी दाखल , तपास सुरू
भाजपा नेते डॉ. किरीट सोमय्या यांची उच्च न्यायालयात याचिका
आपल्यावर झालेल्या हल्ल्यांची निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी या घटनांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे ( सीबीआय ) सोपविण्यात यावा , अशी मागणी करणारी याचिका भाजपा नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे.
या याचिकेत डॉ. सोमय्या यांनी त्यांच्यावर अलीकडच्या काळात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यांच्या घटनांचा व त्या अनुषंगाने पोलिसांच्या वर्तनाचा उल्लेख केला आहे. याचिकेत म्हटले आहे की , खार पोलीस स्थानकात आपल्यावरील झालेल्या हल्ल्याबाबत आपण बांद्रा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल गेलो होतो. माझे म्हणणे नोंदवून घेतल्यावर पोलीस निरीक्षक राजेश शांताराम देवरे यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा बनावट एफआयआर ( क्र. ०५८६ / २०२२ ) दाखल केला. या एफआयआर विरोधात मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे तातडीने तक्रार दाखल केली. या बाबत आपण राज्यपालांकडेही तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांकडून आपल्यावरील हल्ल्यांची चौकशी योग्य पद्धतीने होण्याची खात्री नसल्याने हा तपास सीबीआय कडे सोपवावा , असेही डॉ. सोमय्या यांनी याचिकेत नमूद केले आहे.
ठाणे न्यायालयाने गणेश नाईक प्रकरणी 30 एप्रिल 2022 रोजी निर्णय देणार
दुपारी 3 वाजता निर्णय होणार
पुन्हा एकदा ठाणे कोर्टाने वेळेचे कारण देत तारीख पुढे ढकलली ..
सांगली शहर परिसरात वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाला जोरदार सुरवात
जोरदार वादळ वाऱ्यासह अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शहर परिसरात उकड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला
मुसळधार पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे
अयोध्येतील हिंदूत्ववादी संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला दर्शवला पाठिंबा
सभेची तयारी पुर्णपणे आम्ही करणार आहोत
स्टेजचं काम दोन दिवसात पूर्ण करणार
मनसे नेते दिलीप धोत्रेंची माहिती
तर मनसेच्या सभेला विरोध करणं हे काय ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही
ही मनसेची सभा आहे त्यांनी विरोध करू नये
भीम आर्मीला जिल्हाध्यक्ष सुमित खामकरांचा इशारा
औरंगाबाद शहरातील कलश मंगलकार्यलयात होणार बैठक
बैठकीला मनसेचे किमान 400 पदाधिकारी राहणार उपस्थित
बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत होणार बैठक
आज सायंकाळी साडे वाजता होणार बैठक
बैठकीत सभेसंदर्भात ठरवलं जाणार नियोजन
गल्ल्यांमध्ये प्रचार करण्यासाठी सायकवलर सभेचा प्रचार
औरंगाबाद शहरात सायकवरून होणार प्रचार
सायकल सभेच्या मैदानात दाखल झाल्यात
राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
सभेसाठी औरंगाबाद पोलिसांनी केली पाच डिसीपींची नियुक्ती
निकेश खाटमोडे यांच्या सह पाच डिसीपींची सभेसाठी विशेष नियुक्ती
औरंगाबाद शहरातील 3 डिसीपींनसह आणखी पाच डिसीपींची नियुक्ती
तर औरंगाबाद शहरात तब्बल 2 हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त
औरंगाबाद शहरातील संवेदनशील परिसरातही राहणार कडक पोलीस बंदोबस्त
राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
सभेसाठी औरंगाबाद पोलिसांनी केली पाच डिसीपींची नियुक्ती
निकेश खाटमोडे यांच्या सह पाच डिसीपींची सभेसाठी विशेष नियुक्ती
औरंगाबाद शहरातील 3 डिसीपींनसह आणखी पाच डिसीपींची नियुक्ती
तर औरंगाबाद शहरात तब्बल 2 हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त
औरंगाबाद शहरातील संवेदनशील परिसरातही राहणार कडक पोलीस बंदोबस्त
आमदार रवी राणांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावतीच्या साई मंदिरात अन्नदान…
अमरावती:युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांचा आज वाढदिवस दरवर्षी रवी राणा यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाने पार पडत असतो.परन्तु यंदा वाढदिवसाला मात्र आमदार रवी राणा हे कारागृहात आहे.असे असले तरी त्यांच्या अनुपस्थितीत देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला साई नगर मधील साई मंदीरात आज राणा यांच्या वाढदिवसा निमित्त गोरगरीब लोकांना अन्नदान करण्यात आले..
मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेची जोरदार तयारी
गल्ल्यांमध्ये प्रचार करण्यासाठी सायकवलर सभेचा प्रचार
औरंगाबाद शहरात सायकवरून होणार प्रचार
सायकल सभेच्या मैदानात दाखल झाल्यात..
– महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात होणार महाविकास आघाडीची सभा…
– महाविकास आघाडी आणि डाव्या ,पुरोगामी पक्ष यांच्या वतीने पुण्यात होणार सभा…
– पुण्यातील अलका टॉकीज चौकात ३० एप्रिलला होणार सद्भावना निर्धार सभा
– इंथन दर, महागाई, राज्यात वाढणाऱ्या धर्मांध सत्तेच्या विरोधात ही सभा…
– पक्षाचे महत्त्वाचे नेते या सभेला उपस्थित रहाणार असल्याचा नेत्यांचा दावा…
बाईट – प्रशांत जगताप, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे.
ठाणे मनसे परवानगी बाबत मेल
मनसे ने ठाणे पोलिस आयुक्त आणि मुंब्रा पोलिसांना मेल केला आहे हनुमान चाळीसा पठण करण्यासाठी विनंती केली आहे
राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे जर दिनांक 3 मिळेल 2022 पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरून गेले नाही तर आम्ही देखील त्या समोर हनुमान चालीसा लावणार आहेत
यासाठी औसा येथील जामा म्हणजे समोर सकाळी सकाळी 6 वाजता ,दुपारी 1 ,सायंकाळी 5 आणि रात्री 8 वाजता
हनुमान चाळीसा लाऊड स्पीकर वर लावण्याची परवानगी द्यावी अशी विनंती मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे
औरंगाबाद ब्रेकिंग :-
राज ठाकरे यांच्या सभेची तयारी सुरू
राज ठाकरे यांच्या सभेचं सामान मुंबईतून औरंगाबादेत दाखल
राज ठाकरे यांच्या सभेचं स्टेज बनवण्यासाठी आजपासून होणार सुरुवात
मुंबईतुन सामान आणि कामगार औरंगाबादेत दाखल
चंद्रपूर : घरात घुसून वाघाने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू …
सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा गावातील घटना,
तुळसाबाई परसराम पेंदाम (89) असं मृतक महिलेचं नाव,
मृतक महिला काल रात्री घरात झोपली असतांना वाघाने घरात शिरून केला हल्ला,
घटनास्थळी पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी दाखल, घटनेमुळे परिसरात दहशत
राज्यातील जवळपास 13 महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. मुंबई, पुणे नाशिकसारख्या मोठ्या महापालिकांचा यामध्ये समावेश आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्यान अजून या निवडणुकांबाबत निर्णय झाला नाहीय, मागील अधिवेशनात राज्य सरकारने सहा महिने निवडणुका पुढे ढकलण्यासाठी कायदा संमत केल्यानंतर निवडणुका कधी होणार, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आमची यंत्रणा सज्ज असल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे.
नाशिक – शहरात बर्निंग कार चा थरार..
मुंबई नाका परिसरात चालत्या कार ला लागली आग..
चालकाच्या प्रसंगावधनामुळे जीवित हानी नाही
अग्निशमन विभागाच्या मदतीने आग विझवण्यात यश
आगीचे कारण मात्र अस्पष्ट ..
मुख्यमंत्री-पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली शिवसेना खासदारांची बैठक
उद्या सायंकाळी 7 वाजता होणार बैठक
पक्ष संघटनात्मक बाबींवर होणार बैठकीत चर्चा
राज ठाकरे यांनी केलं उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक
योगी आदित्यनाथ यांचं राज ठाकरेंकडून कौतुक
ट्वीट करत राज ठाकरेंनी केलं अभिनंदन, वाचा काय म्हणाले –
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022
अन्याय हुआ, अन्याय हुआ, अन्याय हुआ असं म्हणत अजित पवारांनी नवनीत राणा यांच्यासोबत झालेल्या चुकीच्या वागणुकीच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे. पोलिसांनी नंतर समोर आणलेल्या व्हिडीओतून सगळ्या आरोपांची उत्तर मिळाली आहेत, असंही अजित पवार म्हणाले..
नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणण्याचं काम आणि जातीय तेढ निर्माण करण्याचं काम महाराष्ट्राला परवडणारा नाही
सगळ्यांनी सामंजस्यानं घेण्याची गरज आहे
यातून झालेल्या जखमा खोलवर जातात, त्याचे परिणाम गंभीर होतात
त्यामुळे प्रत्येकानं जातीय सलोखा, सामाजिक सलोख राखायला हवा
सर्वपक्षीय बैठकीत आमची चर्चा झालेली होती, भोेंग्याबाबत आम्ही चर्चा केली होती
मनसे सोडलं तर बाकीचे जेवढे पक्ष होते, तेवढ्या सगळ्यांनी सांगितंल की कारण नसताना वातावरण खराब करु नका
भाजपनं तर सांगितलं होतंच की ते बैठकीला येणार नाही
भोंगे कधी लावायचे, काय करायचं, याचे निर्देशही सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत
ठराविक वर्गासाठी एखादा निर्णय घेण्यात येऊ शकत नाही
2014च्या निवडणुकीत नवनीत राणा राष्ट्रवादीच्या उमेदवार होते
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होते
2019 ला आम्ही त्यांना पुरस्कृत केलं होतं, आमचं तिकीट न घेता त्यांनी पाठिंबा मागितला होता, त्यात त्यांचा विजय झाला होता
आपल्याकडे तशाप्रकारची काही तपासणी झालेलं नाही!
राजकारणात काही गोष्टी घडत असतं..
कुणा वाटलं होतं की काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार निर्माण होईल..
जे लोकांना वाटत नाही, ते वाटायला लागेल, असे निर्णय होतात.
हे आज नाही झालेलं.
एकेकाळी भाजपच्या सोबत असलेल्या ममता बॅनर्जी भाजपच्या विरोधात आक्रमक झालेल्या आहेत
मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली
पेट्रोलबाबत त्यांनी वक्तव्य केल्याचं त्यांनी वक्तव्य केलंय
वर्षावर मुख्यमंत्री बैठकीला व्हिसी द्वारे हजर होते
साधारण जीएसटीचे किती पैसे अजून येणं बाकी आहे, हे पुढच्या काही दोन तीन महिन्यांत येतील असा अंदाज आहे
पेट्रोल-डिझेलचा उल्लेख करत मोदींनी किंमती आवाक्यात आणण्यासाठी
आम्ही अर्थसंकल्पात कोणताही नवा टॅक्स आम्ही लावलेला नाही
गॅसचा टॅस कमी केलाय
त्यामुळे एक हजार कोटीचा टॅक्स येणं बंद झालंय, म्हणजे एक हजार कोटीचा दिलासा सरकारनं राज्यातील लोकांना दिला
कराबाबतचा निर्णय मिळून निर्णय होईल, पण त्यात पेट्रोल-डिझेलच्या कराबाबतचा विषय आजच्या कॅबिनेटमध्ये नसेल
कॅबिनेट बैठकीत व्हिसीत काय झालं, ते मुख्यमंत्री सांगेल
बाहेरुन जेव्हा इंधन येतं तेव्हा आधी केंद्र लावतं मग राज्य लावतं
केंद्रानं आधी त्यांच्याकडचा कर कमी करावा
मुंबई तर देशाची आर्थिक राजधानी आहे, इथून तर मोठा कर जातो
केंद्रानं नेहमी राज्यांवर ढकलू नये
केंद्रानं आणि राज्यानं इंधनावर किती कर लावायचाय, याचं एक धोरण निश्चित केलं करावं
2017 साली केलेल्या वक्तव्यावर आज काय विचारता?
जुनं कुठे कधी काय झालं, यात कुणालाही रस नाही, आजचे प्रश्न काय आहेत, त्यावर चर्चा व्हावी
1 मे रोजी भाजपची बुस्टर डोस सभा
भाजप आमदार आशिष शेलार यांची माहिती
देवेंद्र फडणीवीस भाजपच्या पोलखोल सभेत काय बोलणार याकडे लक्ष
माझ्यावर आरोप केलेल्या 12 आरोपांचे पुरावे द्या – सोमय्या
उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपात एक पैशाचाही पुरावा नाही- सोमय्या
उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप बिनबुडाचे
त्यांच्या आरोपांचं उत्तर मी देणार
किरीट आणि नील सोमय्यानं कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही
INS घोटाळ्याविषयी मला काही बोलायचं नाही, हे प्रकरण कोर्टात सुरु आहे
न्यायालयावर माझा विश्वास आहे- किरीट सोमय्या
नाशिक – भोंगयांबाबत माजी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे आदेश रद्द
नवनियुक्त पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी रद्द केले पांडये यांचे आदेश
3 तारखे पर्यंत भिनग्यांची परवानगी घेण्याचे पोलीस आयुक्त पांडये यांनी दिले होते आदेश
मॉर्निंग वॉक ला गेलेल्या दोन युवकांना अज्ञात वाहनाची धडक
धडकेत दोनही मित्रांचा जागीच मृत्यू, कोरपना तालुक्यातील खिर्डी येथील घटना,
राजुरा- आदीलाबाद महामार्गावर झालेल्या अपघातातील वाहनाचा पोलीस घेत आहेत शोध,
धनराज मालेकर वय – ३४, शेखर ढवस वय -३३ अशी युवकांची नावे, अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी काही काळ केला रास्ता रोको,
पोलिसांनी घटनास्थळी पोचून जमावावर मिळविले नियंत्रण
येवला येथील नगर-मनमाड महामार्गावरील कासारखेडे शिवारात लक्झरी बस व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन या अपघातात 5 जण गंभीर जखमी तर 20 ते 25 जण किरकोळ जखमी झाले असल्याची घटना घडली. रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. गंभीरबजखमींना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामध्ये ट्रक व लक्झरी चे पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
भाजप नेत्यांनी विषय भरकटवू नये, असं राऊतांनी म्हटलंय. खरंतर वेगळ्या विषयावर मोदींची बैठक होती. कोरोनाच्या बैठकीत मोदींनी पेट्रोलची तार झेडल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय.
सत्य बोललं की त्याच्यापासून पळ काढायचा आणि भूमिगत व्हायलं, हे भाजपचं धोरण आहे
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना पेट्रोल बाबत सुनावणं मोदींकडून अपेक्षित नाही…
मोदी एकतर्फी बोलल्याचं मत उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींचं म्हटलं आहे
जिथं भाजपचे मुख्यमंत्री तिथे मोदींची वेगळी भूमिका आहे
आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा सध्या कारागृहात आहे.त्यातच आज रवी राणा यांचा वाढदिवस आहे.मात्र रवी राणा हे कारागृहात असल्याने ते त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला हजर राहू शकत नाही. दरम्यान वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला राणा कुटुंबाने आमदार रवी राणा यांचा वाढदिवस त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी साजरा केला यावेळी रवी राणा यांची उपस्थिती नसल्याने त्यांच्या मातोश्री सावित्री राणा यांना अश्रू अनावर झाले होते.यावेळी रवी राणा यांचे मोठे बंधू सुनील राणा यांचा चिरंजीव याने केक कापून वाढदिवस साजरा केला.
परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
सीबीआयने तीन प्रकरणाचा तपास सुरू केल्याची माहिती
भ्रष्टाचार, गैरवर्तन आणि पदाचा गैरवापर या आरोपांची चौकशी केली जाणार आहे
मुंबई पोलिसांनी एकूण 5 एफआयआर आणि काही चौकशी परमबीर विरोधात दाखल केली होती
मात्र परमवीर सिंग यांच्या विरोधात राज्य सरकारकडून दाखल करण्यात आलेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे वर्ग केला आहे.
नागपुरात विनापरवाना वाहन चालविणारी अल्पवयीन मुले व तरुणांची संख्या वाढली
अपघाताचा धोका बळावला आहे.
गेल्या साडेतीन महिन्यांत ३ लाख २० हजार ६४९ वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले.
यात विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांची संख्या तब्बल २५ हजार ५८७ आहे.
अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विविध उपाययोजना आखल्या.
मात्र, अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहने दिल्याने चिंता वाढली आहे
अमरावती महानगरपालिकेवर मजीप्राचे 58 कोटी थकीत,73 कोटी व्याज….
थकबाकी भरण्यासाठी मजीप्रा च्या अधिकाऱ्यांची मनपा कडे विनंती…
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते अमरावती शहराची तृष्णातृप्ती…
मागील थकबाजी वर वाढले 73 कोटींचे केवळ व्याज..
मनपा कडे बिल आल्यानंतर पैसे भरले जातील आयुक्तांची माहिती…..
– नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट, नागपूरचा पारा ४४.८ अंशावर
– यंदाचा उन्हाळा पक्षांच्या जीवावर उठतोय
– नागपूरात वाढत्या तापमानाचा पक्षांना उष्माघात
– १०० पेक्षा जास्त पक्ष्यांवर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचार
– वाढलेल्या तापमानामुळे पक्षांची शक्ती कमी होणे, प्राण्यांमध्ये उष्माघातासारखा त्रास
– नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दररोज सात ते आठ पक्षी उपचारासाठी येतात
– पाळीव आणि जंगली प्राण्यांनाही उच्च तापमानाचा फटका
– भटकी जनावरे, श्वान, माकड आणि पक्षीही उष्माघाताचे शिकार
– उष्णतेमुळे सध्या पक्ष्यांना यांना मोठ्या प्रमाणावर अतिसाराची समस्या
– खार, कोतवाल, चिमण्यासह इतरही पक्षांचे उष्माघातामुळे मृत्यू झालेय
– नागपूरच्या खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला नोटीस
– महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्याला दिली नोटीस
– ठराविक वेळेत फ्लाय ऍश न उचलल्याने आणि बँक गॅरंटी जमा न केल्याने बजावली नोटीस
– ऍश पौंड मध्ये जमा असलेल्या फ्लाय ऍश मुळं प्रदूषण होत असल्यानं ती काढण्याचे दिले होते निर्देश
– मात्र ऍश न काढल्याने प्रदूषण मंडळाने बजावली नोटीस
– तीन दिवसांत उत्तर सादर न केल्यास होणार पुढील कारवाई
– नागपूरात मुलीवर अत्याचाराच्या दोन घटना
– शहरातील अंबाझरी आणि जरीपटका भागात अत्याचाराच्या
– अंबाझरी परिसरात घरात घुसून १९ वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार
– मोबाईल चार्जर देण्याच्या बहाण्याने घरात घुसला आरोपी
– अत्याचारानंतर पिडीतेला जीवे मारण्याची धमकी
– जरीपटका भागात लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षाय मुलीवर अत्याचार
– दोन्ही घटनांमध्ये गुन्हे दाखल
– पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी,
– पुणे म्हाडाच्यावतीने लवकरच जवळपास बाराशे घरांसाठी सोडत काढली जाणार,
– हि घरं वीस टक्क्यांतील अर्थात खासगी आणि नामांकित बिल्डरांच्या प्रकल्पामधील असणार,
– म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांची माहिती
– नागपूर पोलीसांकडून धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती घेण्यास सुरुवात
– धार्मिक स्थळांवर भोंगे आहे किंवा नाही, याची माहिती गोळा करायला सुरुवात
– नागपूरात ८९३ मंदिरं आणि ३८३ मशिदी
– भोंग्यावरुन जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून गृह विभाग अलर्टवर
– भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश पाळण्याचं पोलीस आयुक्तांचं आवाहन
– जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात नागपूर पोलीस आयुक्तांचा कारवाईचा इशारा
– ससून रुग्णालयाला आठवड्याभरात मिळणार नवीन अधिक्षक,
– किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात चौकशी समितीने अवयव प्रत्यारोपण समितीला स्थगिती दिली होती,
– त्यानंतर अधीक्षक पदाचा तात्पुरता पदभार उपअधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला होता,
– रुग्णालयात आता नव्या अधीक्षकांची नियुक्ती पुढील आठवड्यात केली जाणार आहे,
– ससून रुग्णालयाच्या प्रशासनाने अधीक्षक पदासाठी पाच प्राध्यापकांची नावं पाठवली आहेत.
सरसंघचालक डॉ मोहन मोहन भागवत आज अमरावतीच्या दौऱ्यावर….
साई राजेशलाल साहिबजी यांचा गरिमामय गद्दीनशीनी समारोह कार्यक्रमाला लावणार प्रमूख उपस्थिती…
सकाळी दहा वाजता डॉ मोहन भागवत लावणार कार्यक्रमाला हजेरी…
– पुण्यात सहा ते अकरा वर्षे वयोगटासाठी लवकरच लसीकरण सुरू होणार,
– महापालिकेने या वयोगटाला लस देण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू केलीय,
– लसीकरणाबाबत आल्यानंतर लसीकरणाला सुरूवात होईल,
– चार लाख सात हजार ५८५ मुला-मुलींना लस देण्याच्या दृष्टीने तयारी सुरू
औरंगाबाद ब्रेकिंग :-
औरंगाबादेत 1601 धार्मिक स्थळे मात्र एकाकडेही नाही भोंग्यांची परवानगी..
धार्मिक स्थळांनी भोंग्याची परवानगी घ्यावी पोलिसांनी केले आवाहन..
पोलीस आयुक्त कार्यालयातील रेकॉर्डनुसार एकही धार्मिक स्थळाने भोंग्याची घेतली नाही परवानगी
विश्वस्त मंडळाकडूनही भोंग्यासाठी अर्ज करण्याचे प्रमाण नगण्य
धार्मिक स्थळे विश्वस्थानी अर्ज सादर करावेत अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना
-भारत पेट्रोलियम कंपनीच्या प्रकल्पातून औरंगाबादकडे पेट्रोल घेऊन जाणार टँकर झाला पलटी..
टँकर मधून पेट्रोल गळती..
मनमाड पासून जवळ नांदगाव मार्गावरील घटना…
रस्त्यावरील खडी आणि खड्ड्यामुळे झाला अपघात
बूस्टर डोस बाबत केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये
बूस्टर डोस बाबतच अंतर कमी केले जाणार
नऊ महिन्यांवरून सहा महिन्यांपर्यंत अंतर केले जाणार ,अधिकृत सूत्रांची माहिती
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय
29 एप्रिल रोजी नवी दिल्लीत महत्वाची बैठक
देशभरात नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार