मुंबई : आज शनिवार 30 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या सभेचा आणखी एक टीजर सोशल मीडियावर व्हायरल. सभेच्या एक दिवस आधी मनसे कडून टीजर जारी करण्यात आला आहे. माझ्या कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही, पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असेल तर मला राष्ट्रीयत्व जास्त मान्य आहे. तयारीत रहा, राज ठाकरे यांनी टीजर मधून आवाहन केलं आहे.
ठाकरे सरकारवर पुन्ह सडकून टीका
वीज बिलांवरून फडणवीसंनी सोडलं जोरदार टीकास्त्र
बिल न भरल्यास वीज तोडणार बोलतात
उद्या जर मी म्हटलं की उद्या देशाच्या पंतप्रधानांच्या घराबाहेर जाऊन काही वाचतो
तर सुरक्षा यंत्रणा गोळी मारतील
हे चुकीचे आहे
कोर्टानेही तुम्ही जबाबदार लोक प्रतिनिधी असल्याचे सांगितले आहे
तुम्ही आंदोलनं करा पण नियमात राहून करा
त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे लावल्याने ते देशद्रोही होत नाहीत
पण या सर्व घडामोडींवर कोर्टाचे लक्ष आहे
अजित पवार आणि फडणवीस शपत घ्यायला मला विचारून गेले होते का?
संजय राऊतांनी असे बोलायला नको आहे
हे भावांचं भांडण आहे ते दोन भावांना समोर बसवावं
तुम्ही दहा वर्षे भाजपबरोबर काय हनिमून साजरं केलं का
तुम्ही कुणाला सभेला परवानगी देत असाल तर तिथे कायदा आणि सुव्यस्था राखण्याची तुमची जबाबदारी आहे
आम्हाला आशा आहे की ते ती जबाबदारी निभावतील
आम्हाला पंचिंग बॅग बनवायची कुणाची हिंमत नाही
आम्ही भारताचे नागरिक आहोत
आता हिंदुत्वाच्या विचारधारेवरून रेस सुरू आहे
सर्वांना यात आपण पुढे असल्याचे दाखवायचे आहे
इतर ठिकाणी सभेला परवानगी दिली असती तर आमची काही हरकत नसती
मात्र हे राष्ट्रवादीकडून मुद्दाम केले गेले आहे
आता बाजार भरलेले असातात, त्यांनी हे विचार करायला हवे होते
यामुळे शहराचा महौल बिघडू शकतो
आता कायदा आणि सुव्यस्था राखण्याची जबाबदारी सरकारची
राज ठाकरेंचं राजकारण दोन घरातलं भांडण
त्यामुळे कायदा आणि सुव्यस्था बिघडली नाही पाहिजे
ही महाविकास आघाची जबाबदारी आहे
आपलीही ती जबाबदारी आहे, मात्र पहिली जबाबदारी सरकारची आहे
भाजपकडून द्वेश पसरवण्याचा प्रश्न
नियमांवर बुलडोजर भाजप सरकार फिरवत आहेत
मुस्लिम लोकांना त्या ठिकाणी सजा दिल्या जात आहेत
भाजपला पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही
थोडे मुस्लिम खवळले तर काय होईल हे एका मोठ्या अधिकाऱ्याने लिहिले आहे
यावर पंतप्रधानांनी मौन सोडले पाहिजे
देशात सुडाचं राजकारण सुरू होतं, आता धर्माचे राजकारण सुरू
नवहिंदू ओवैसींना शिवसेनेविरुद्ध लढवले जात आहे
मनसेला पोस्टर लावण्याची गरज काय, लोकांच्या भावना आहेत त्या
सकाळी 09 वाजता हिंगोलीतुन औंरंगाबाद कडे मनसे कार्यकर्ते
रवाना होणार
तीन लक्झरी, 70 फोर व्हीलर गाडयातून मनसे कार्यकर्ते होणार रवाना
जिल्हा अध्यक्ष बंडू कुटे यांची माहिती..
भाजपमधून आलेल्या 11 शिवसेनतून 3 तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेत पक्ष प्रवेश
एकुण 21 पदाधिकाऱ्यांनी केला मनसेत पक्ष प्रवेश
मनसे नेते अमित ठाकरेंच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश
अमित ठाकरेंच्या हस्ते मनसेचा झेंडा घेतला हाती
अचलपूर , अमरावती मधील दंगली मागील वास्तव शोधण्यासाठी मैत्री परिवारने केली सत्यशोधन समिती गठीत
मैत्री परिवार ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था
सहा जणांची समिती करण्यात आली गठीत
या समितीत रिटा जज , निवृत्त पोलीस अधिकारी , विधितज्ज्ञ , आणि जेष्ठ पत्रकारांचा समावेश
2ते 4 मे ला ही समिती करणार अचलपूर , अमरावतीचा दौरा
समाजातील सामाजिक सौहार्द सुदृढ राहावं या दृष्टीने हा प्रयत्न राहणार
मैत्री परिवाराने पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती
राज ठाकरेंचं जंगी स्वागत
राज ठाकरेंवर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी
ढोल तशांच्या गजरात राज ठाकरेंचं स्वागत
फटाके फोडून , पुष्पवर्षाव करून स्वागत
– विमानतळावर पोलिस प्रशासनाकडून राज्यपालांचे स्वागत करण्यात येईल
भाजप आमदार गणेश नाईक प्रकरणात केलेल्या अटकपूर्व जामीन ठाणे कोर्टाने फेटाळला
बेलापूर आणि नेरुळ पोलिसात केली होती पीडितेने तक्रार
बालविवाह करुन मारहाण केल्याप्रकरणी महापालिकेच्या सफाई कंत्राटदारावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी पिडीत मुलीच्या 36 वर्षीय आईने तक्रार दाखल
फिर्यादी महिलेच्या 15 वर्षाच्या मुलीला दोन वर्षापूर्वी दिनेश शिंदे याने पळवून नेत तिच्यासोबत बालविवाह
ती पतीसोबत सासरी नांदत असताना तिला मारहाण करुन ती अल्पवयीन असल्याचे माहिती असून सुध्दा तिच्याशी शारिरिक संबंध ठेवले
पोलीसांनी दिनेश रघुनाथ शिंदे (25), त्याचे वडील रघुनाथ मारुती शिंदे यांना अटक केली
सासू , दीर ऋषिकेश रघुनाथ शिंदे व कमलेश रघुनाथ शिंदे (सर्व रा.वैदवाडी,हडपसर,पुणे) यांच्यावर पोक्सो आणि बाल विवाहाचा गुन्हा दाखल
आम्ही केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत असं अमित ठाकरेंनी आज म्हटलंय
फक्त कार्यकर्ते जेल मध्ये जाणार, तुम्ही निवळ राजकारण करणार, शेवटी राजकारण तुमच्या पोटापाण्याचा व्यवसाय आहे
लाव रे तो व्हिडीओ
एका मनसेच्या कार्यकर्त्याला केस दाखल झाल्यावर जामीनदार मिळत नव्हता अशा आशयाचा व्हीडीओ शेअर केला
फेसबुक पोस्ट शेअर करत केली टीका
क्रांती चौकात होणार राज ठाकरे यांचे जंगी स्वागत
राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो मनसे सैनिक क्रांती चौकात दाखल
ढोल ताशांच्या गजरात होणार राज ठाकरे यांचे स्वागत
भगवे फेटे बांधून मनसे सैनिक क्रांती चौकात दाखल
4:30 वा आमदार राजू पाटील यांचे औरंगाबाद विमानतळावर होणार आगमन
शहरातील पाणी टंचाई आणि गळती शोधण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती
महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी केली भरारी पथकांची नियुक्ती
बाणेर-बालेवाडी परिसरात सध्या या पथकांकडून पाणी पुरवठ्याची खातरजमा करण्यात येत आहे
उन्हामुळे शहरात पाण्याची मागणी वाढून, 1600 ‘एमएलडी’पर्यंत झाली आहे.
कालवा समितीत पुणे महापालिका सर्वाधिक पाणी वापर करीत असल्याचा ठपका
त्याच वेळी शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना महापालिका मेटाकुटीला
शहराच्या ‘टेलएंड’ला पाणीपुरवठा तुलनेने कमी होत असल्याने तेथून सर्वाधित तक्रारी
या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पथके नेमून पाण्याची गळती शोधण्याच काम सुरु
मात्र उतरताचं पोलीस बंदोबस्त लावलेल्या पोलीसांकडे जाऊन त्यांनी विचारपूस केली
आणि सेल्फीही काढली पोलीस कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरेंसोबत फोटो काढले
मुक्काम करणाऱ्या रामा हॉटेलवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
थोड्याच वेळात राज ठाकरे औरंगाबादेत पोहोचणार
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,बाबा रामदेव, राज ठाकरे यांचा एकाच हॉटेलमध्ये मुक्काम !
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज भागवत कराडांच्या मुलाच्या रिसेप्शनला लावणार हजेरी
रामा इंटरनँशनल हॉटेलला राज्यपाल थांबणार
अमित ठाकरेंना दिलं निमंत्रण,
भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय किणीकर यांनी दिलं निमंत्रण
राज ठाकरे जाणार का ?
ढोल तासे वाजायला सुरुवात
भगवे फेटे बांधून कार्यकर्ते क्रांती चौकात दाखल व्हायला सुरुवात
राज ठाकरेंच्या आगमना आधी मनसेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक सुरू
बाळा नांदगावकर, नीतीन सरदेसाई , दिलीप धोत्रे, शिरीष सावंत, प्रकाश महाजन उपस्थित
उद्याच्या नियोजनावर चर्चा सुरू असल्याची माहिती
सभा घेणं हा राज ठाकरे यांचा छंद आहे
मात्र त्या सभेचा त्यांना कोणताही फायदा होत नाही
ते केवळ एजंट म्हणून काम करतात असा टोला शिवसेना नेते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला
छत्रपति शिवाजी महाराज पुतळ्यासमोर राज ठाकरे यांचे स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात मनसे कडून राज ठाकरे यांचं अहमदनगर मध्ये स्वागत
राज ठाकरे एजंट चे काम करतात;गुलाबराव पाटील
सभा घेणं हा राज ठाकरे यांचा छंद आहे,मात्र त्या सभेचा त्यांना कोणताही फायदा होत नाही,ते केवळ एजंट म्हणून काम करतात असा टोला शिवसेना नेते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला
-राज ठाकरेचा उपट सुंब्या म्हणुन उल्लेख-
-माळी समाजाच्या उत्कर्षासाठी
झटण्याचे काम सावता परिषद करीत आहे.
-धन्य ते अरण रत्नाची खाण-
विठ्ठलाची पालखी अरणला येते.
– सावता महाराजांचे जन्मस्थान अरण ला अ तिर्थ क्षेत्र दर्जाचा मिळण्यासाठी
१५ दिवसांच्या आत अ दर्जा
घ्यावयला लावणार-
– महापुरुषांना वाटुन टाकले जातीत.
-केंद्राच्या विरोधात लाव रे ती सीडी म्हणणारे…बरेच बदल झाले त्याच्यात
हनुमान चालिसा मंदिरा समोर म्हणा..
कुणाच्या ही घरा समोर नको.-उपट सुंब्याला महत्व देऊ नका.
-कोप लागेल तुमच्या मागे हनुमानाचा.
असे म्हणत राज ठाकरेवर प्रहार
– MIM खासदार इम्तियाज जलील यांची कॉंग्रेस, शिवसेना, मनसेवर टीका
– राज ठाकरेंना मी तुमच्या माध्यमातून आमंत्रण दिले मात्र त्यांच्याकडून अद्याप काही रिस्पॉन्स आला नाही
– इफ्तार पार्टीबाबत राज ठाकरेंकडून जर काही रिस्पॉन्स आला तर खूप चांगले होईल. चांगला मॅसेज जाईल
– रमजान ईदची नमाज होते तेव्हा सर्व अधिकारी वगैरे तिथे येतात, गळाभेट घेतात. ईद मुबारकच्या शुभेच्छा देतात
– मात्र अनेक राजकीय पक्ष आहेत जे तिथे येत नाहीत. विशेषतः मी त्यांना स्वतः निमंत्रण देतो की तुम्ही पण या. आपण सर्व धर्माचे सण एकत्र साजरे करुयात
– राजकारण हे पाच वर्षासाठी नसते. मी शिवसेनेच्या आमदारांना सांगतो की ईद निमित्त आपण सर्व आमदारांनी एकत्र यावे आणि गळाभेट करावी
– शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते की, राजकारण केवळ 6 महिन्यापुरते करायचे आणि साडेचार वर्षे समाजकारण करायचे ही शिकवण तुम्ही बाळासाहेबांकडून घेतली नाही हे दुर्दैवी आहे
हिंगोली-कॉग्रेस चे जिल्हाअध्यक्ष संजय बोढारे याचा शिवसेनेत प्रवेश
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बांधले शिवबंधन
हिंगोलीत कॉग्रेसला धक्का
उद्धव ठाकरे
देशाचे शत्रू संपवण्यापेक्षा, स्वतःच्या पक्षाचे शत्रू संपवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे.
आम्ही बनावट आणि नकली हिंदुत्ववाद्यांना पोसलं.
– राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल,
– भाजप नेते नारायण राणे व गणेश नाईकांविरोधात पदाचा गैरवापर केल्याचा चाकणकरांवर आरोप,
– इंडियन बार असोसिएशनने दाखल केली याचिका,
– चाकणकरांविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्याची याचिकेत मागणी.
गडचिरोली प्राणहिता नदीला सिंहस्थ कुंभ मेळावा संपन्न झाला या वर भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकारण तापले आहे
पुष्कार यात्रेत खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप पक्षाचे गडचिरोलीचे आमदार देवराव होळी यांनी केला
यावर शिवसेनेने प्रेस नोट काढून निधीच्या शिवसेनेशी काही संबंध नाही असा खुलासा शिवसेना पक्षाने केला
पुष्कर मेळाव्यात अंतर्गत दहा कोटी रुपये निधी मंजूर करण्याचे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते
परंतु त्या ठिकाणी फक्त 70 लाख रुपयांचे काम पुष्कर याञेत करण्यात आले तर निधी गेला कुठे असा आरोपही आमदार देवराव होळी यांनी केला
– येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची पुण्यात छापेमारी,
– पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या शिवाजीनगर परिसरातील कार्यालयावर छापा,
– रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांना अटक केल्यानंतर मुंबई आणि पुण्यात छापेमारी सुरु केली आहे.
– अविनाश भोसले यांच्यासह शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ही कारवाई,
– या सर्वांचे मोठे राजकीय कनेक्शन असून सीबीआयच्या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
– अविनाश भोसलेंच्या कार्यालयाबाहेरून लाईव्ह फ्रेम दिलीय
-बॅका साखर कारखाने नीट चालवायला शिका …असे म्हणत सोलापूर डिसीसी बॅकेच्या संचालकाचे कान टोचले-
-नविन अजेंडा घेऊन पुरोगामी महाराष्ट्रात राज ठाकरे गढुळ वातावरण करीत असुन
ज्यांना नाशिक महानगर पालिका टिकवता आली नाही १४ आमदार ही
टिकले नाहीत पक्षाचे असे म्हणत नाव न घेता राज ठाकरेंवर नविन अजिंडा घेतलाय …तो हाणून पाडा-
-वेगळी संधी राजन पाटलांना दिली जाणार-
-पुण्यातील डिसीसी बॅक कशी चालवतो आम्ही..
-जेवढी पाण्याची उपलब्धता आहे.तेवढाच ऊस लावा.
-हवामानाला पोषक आहे.तीच पिके घ्या.
-स्वतःचे कारखाने- बॅका चालवायला शिका.नीट काम झाले पाहिजे.चांगल्या दर्जाचे काम होत असेल तर मी निधीची कमतरता पडु देणार नाही.
मनसेचे नेते संदीप देशपांडे अमित ठाकरेंच्या भेटीला
दोघांमध्ये होणार चर्चा
संजय राऊतांवर बोलताना संदीप देशपांडेंची जीभ घसरली
कुत्रा जर आपल्याला चावला तर आपण कुत्र्याला जाऊन चावायचं नसतं
3 तारखेच्या अल्टीमेटवर आमही ठाम आहोत
गजनीसारखी अवस्था मुख्यमंत्र्यांची झाली आहे
उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्षपदाचा प्रस्ताव हा राज ठाकरेंनी ठेवला
हे उपकार म्हणा कींवा राज ठाकरेंची चुक ही हे त्यांनी विसरू नये
राज ठाकरेंची सभा होतीये त्यामुळे त्यांना आता आठवण आली की आपण हिंदू आहोत
पण बुंद से ग ई ओ हौद से नही आती
जेव्हा बाबरी मस्जिद पाडली गेली राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत महाराष्ट्रात फिरत होते
इम्तियाज जलीलांना काऊंटर ऑफर जर अनधिकृत भोंगे उतरवले तर घरी जाऊन श्नीखंड स्वतः भरवेन
हिंदुत्वाच्या मुद्द्यात इम्तियाज जलीलांनी पडू नये
संदीप देशपांडेंची संजय राऊत आणि शिवसेनेवर टिका
-राज ठाकरेंना भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे.हे सगळ्यांना समजतंय..
-गढुळ वातावरण करण्याचे काम हाणुन पाडावे-
-राज्यात वातावरण खराब करण्याचे काम सुरू आहे.रमजान ईद सुरु आहे.सगळे नीट सुरु असताना
हुनमान चालिसा म्हणायची तर घरीच म्हणा.घरी जागा तुमच्या कमी पडतीय का ?
-यु.पी मध्ये निर्णय घेतला त्याचा विचार करा ६ ते १२ पर्यंत परवानगी दिलिय.१५ दिवस फक्त.भोंग्याचा विषय फक्त मस्जिद ला लागु होणार नाही.नियम लावला तर साई बाबा च्या आरतीसह गावखेड्यातील सगळ्याच
धार्मिक कार्यक्रमाना लागु होईल.
-शांतता राज्यात सुरु आहे नव्याने प्रश्न निर्माण करायची गरज काय ?
याने काय साध्य होणार ? जातीय तेढ वाढवण्याचे काम सुरु आहे.
-सोलापूर जिल्ह्यातील ऊसाचा एक टिपरु ही शिल्लक राहणार नाही.
-साखर आयुक्तांना याबाबत सुचना दिल्यात.
-शेतकर्याच्या शेतात पाणी आल्याशिवाय सुबकता येणार नाही.हे माहिती आहे.म्हणुनच त्या दृष्टीने सर्व तोपरी प्रयत्न करतोय.
-ऊसाचे संकट सगळ्या समोर आहे.म्हणुनच १ मे पासुन जे कारखाने शेतकर्याचा ऊस आणतील त्याना टनाला २०० रुपये देण्याचा निर्णय काल मंत्री मंडळात घेतलाय.५० कि.मी च्या पुढे प्रती ५ रुपये देखील कारखान्यांना रिकव्हरी देणार-
–
-उष्णता वाढत आहे.काळजी घ्या.
प्रत्येकाने काळजी घ्या.-
– अनगर व मोहोळ च्या नगरपंचायत व नगरपालिकेला इमारत उभारणीला ५ कोटी रुपये मंजुर-
खंबीर व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे
जेवढी गरज आहे तेव्हढी साखर तयार करू
जास्त साखर तयार झाल्यास दंड करू
सोलापूरमधील शेतकरी मेळाव्यात अजित पवार
इतर निर्णय घेण्याची आमची तयारी आहे
सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचं प्रयत्न करायचे
दोन वर्ष कोरोनाची गेली
शेतकऱ्यासमोर ऊसाचं संकट
एक मे पासून शेतकऱ्यांना मिळणार रिकव्हरी लॉस
एक मे नंतर शेतकऱ्यांचा ऊस आणल्यास कारखान्याला द्यावे लागणार टनामागे दोनशे रुपये अतिरिक्त
अजित पवार यांची शेतकरी मेळाव्यात माहिती
राज्यात उष्णतेची लाट – पवार
नागरिकांनी काळजी घ्यावी
आजित पवारांचे जनतेला आवाहन
काही लोक जाणिवपूर्वक वातावरण दूषित करतात
अजित पवारांचा राज ठाकरे, नवनीत राणा, रवि राणा यांच्यावर निशाणा
देशात महागाई वाढत आहे
राज्य सरकारकडून जनतेला दिलासा देण्याचे काम
– केंद्राच्या योजना दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या ठरल्या.
-निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कृषी कायदा मागे घेतला.योग्य वेळी मागे घेतला असता तर शेतकर्याचे जीव वाचले असते.
-शेतकर्याच्या बांधावर दुख जाणणारा नेता म्हणुन शरद पवार.
-छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला नतमस्तक
-कवी कलश समाधीचे दर्शन घेवून संभाजी महाराज यांच्या पुतल्यास पुष्पहार
राज ठाकरेंनी पुण्यातील वढू येथे संभाजी महाराजांच्या समाथी स्थळाचं दर्शन घेतलं
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांची हिंदुत्वावरून शिवसेनेवर टिका
मुख्यमंत्री आता हिरवा शालू पांघरलेल्यांच्या बरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेत
शिवसेनेचे हिंदुत्व नामोहरम झालेलं,
राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून ते तयार झालेलं रसायन
हिंदुत्वाला फुंकर घालण्याचा काम राज ठाकरे यांनी केलं
त्याच्या आता ज्वाला भडकलेल्या आहेत. या ज्वालांमध्ये कोणकोण भस्म होतं, हे भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल
गेल्या लोकसभेमध्ये लाव रे तो व्हिडिओ असं म्हटलं की राष्ट्रवादीचे सगळे नेते हे टाळ्या वाजवत होते
आज तेच राज ठाकरे हिंदुत्वाची शाल पांघरून हिंदुत्वाची भूमिका घेतल्याबरोबर स्टेजवरची टाळ्या वाजवणारी राष्ट्रवादीची रस्त्यावर उतरून टाळ्या वाजवत फिरतायत.
तुटून पडा असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा सदाभाऊ खोत यांनी घेतला समाचार
जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा अभियानाचा दुसरा दिवस
जेव्हा आम्हाल आमचा वापर होतोय असं समजलं त्यावेळी आम्ही लाट मारली
कोण आहे आदित्य नाथ
भगवी कपडे घालणारे असं म्हणणारे आयोध्येला जाणार आहे
राज्याच्या विकासासाठी बोलता येत नाही
जास्त बोललो तर तुम्हाला बाहेर पडण मुश्कील होईल
औरंगाबादेत होणार राज ठाकरेंच जोरदार स्वागत
क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ होणार स्वागत
मनसे कार्यकर्त्यांना क्रांती चौकात जमण्याचे आदेश
राज ठाकरेंच मनसे नेते क्रांती चौकात करणार स्वागत …
अमित ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसे विद्यार्थी सेनेत पक्ष प्रवेश
साधारण 200 कार्यकर्ते करणार पक्ष प्रवेश
दूपारी 3 वाजता अमित ठाकरेंच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश
अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या विद्यार्थी सेनेचा मेळावा
औरंगाबाद शहरातल्या सिल्व्हर इन हॉटेलमध्ये होणार मेळावा
तब्बल 200 कार्यकर्ते करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश
अमित राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश सोहळा
कार्यक्रमाला विद्यार्थी सेनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती
अमित ठाकरे यांच्याकडून औरंगाबाद शहरात पक्ष बांधणीवर भर
एसडीपीओचा रायटर व अंगरक्षकाला लाच घेताना अटक
चंद्रपूर राजुरा उपविभागीय कार्यालयातील एसडीपीओ राजा पवार यांचे रायटर व अंगरक्षकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एसडीपीओ कार्यालय बाहेरील चहा टपरीवर रंगेहात अटक करण्यात आली.
रायटर राजेश त्रिलोकवार (५१) व अंगरक्षक सुधांशू मडावी (३६) असे अटकेतील पोलिसांचे नाव आहे.
तक्रारकर्त्याला दारूची वाहतूक प्रकरणी राजुरा ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यात मदत करण्यासाठी त्रिलोकवार व मडावी यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, त्याने याबाबतची तक्रार नागपूर लाचलुचपत विभागाकडे केली. पथकाने सापडा रचून दोघांना लाच घेताना रंगेहात अटक केली.
नवी दिल्ली कायदे मंत्रालयाची आज महत्वपूर्ण परिषद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेला अनुपस्थित राहणार
महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मंत्री अनिल परब नवी दिल्लीत दाखल
देशातील न्यायाधीशांसह मुख्यमंत्र्यांना परिषदेचे निमंत्रण
अमित ठाकरे मैदानाच्या ठिकाणी पोहोचले
नागपूर जिल्ह्यातील नागलवाडी भागात अगरबत्ती बनविण्याच्या कंपनीला लागली आग
आग विझविण्याचे प्रयत्न सुरू
आग नियंत्रणात
जयप्रभा स्टुडिओ जमीन विक्री प्रकरणी तीन अधिकाऱ्यांना नोटीस
सहाय्यक जिल्हा निबंधक वर्ग 1, उपविभागीय अधिकारी करवीर, आणि जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख या तिघांना बजावली नोटीस
निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव त्यांनी नोटीस बजावत अभिप्राय मागवला
सरकारी जमिनीची खाजगी नोंद कशी झाली याबाबत मागितला अभिप्राय
प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांच्या तक्रारीनंतर कारवाई
संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची देसाईंची मागणी
ऑनलाइन परीक्षेत कॉपी चा ठपका ठेवत शिवाजी विद्यापीठाने हजार विद्यार्थ्यांना ठोठावला दंड
दंडाच्या रकमेतून शिवाजी विद्यापीठाच्या गल्यात लाखो रुपये जमा होणार
पाचशे ते हजार रुपयांपर्यंत चा ठोठावला दंड
दंडाच्या नोटीसमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
एकापेक्षा जास्त मोबाईल वापरणे,हेडफोन लावणे, घरातील व्यक्ती परीक्षेवेळी मागुन फिरताना दिसली तरी ठरवला कॉपीचा प्रकार
दंडाची कृती बेकायदेशीर असल्याचा विद्यार्थी परिषदेचा आरोप
दंड मागे घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी
वर्ष वाया जाण्याची भीती असल्याने विद्यार्थी घेणार कुलगुरूंची भेट
नागपूर सुधार प्रण्यास , एन एम आर डी ए क्षेत्रात 9 हजारावर अनधिकृत बांधकामे
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आली
न्यायालयाने अनधिकृत बांधकामे पडण्याची कायदेशीर कारवाई करण्याचे ,
तसेच अहवाल येत्या जूनच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्याचे दिले निर्देश
कोल्हापूर अहमदाबाद विमान सेवा अखेर 3 जून पासून सुरू होणार
आठवड्यातून सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवशी असणार विमानसेवा
इंडिगो कंपनी कडून दिली जाणार सेवा
कोल्हापूर अहमदाबाद विमानसेवेसाठी व्यापारी वर्गातून होत होती वारंवार मागणी
राज ठाकरे यांच्या भाषणातील 10 संभाव्य मुद्दे
1) मस्जिदिवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात राज ठाकरे आक्रमक बोलणार
2) मस्जिदिवरील भोंग्यांबाबत दिलेल्या अलटीमेटम बाबत निर्णायक भूमिका जाहीर करणार
3) अयोध्या दौऱयासंदर्भात भूमिका मांडणार
4) हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल आक्रमक भूमिका मांडणार
5) औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याबाबत बोलणार
6) औरंगाबाद शहरातील एमआयएमच्या वाढत्या ताकतीबद्दल बद्दल राज ठाकरे टीकेची झोड उठवणार
7) औरंगाबाद शहराच्या विकासाबद्दल शिवसेनेवर हल्लाबोल करणार
8) औरंगाबाद शिवसेनेचा गड आहे की नाही याबाबत तुफान टीका करणार
9) इम्तियाज जलील यांच्या इफ्तार पार्टीच्या निमंत्रणाबाबत समाचार घेणार
10) हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडणार
पीक विमा योजेसाठी बीड मॉडेलला मान्यता द्यावी अशी मागणी केंद्र सरकारला केली असल्याचे राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणालेत.
यात पीक विमा कंपन्यांना 10 टक्के नफा तसेच नुकसान झाल्यास 10 टक्के जवाबदारी घेता येईल
उर्वरित जवाबदारी ही राज्याची आणि केंद्राची असेल.
या बीड मॉडेलला मंजुरी द्यावी अन्यथा मंजुरी न मिळाल्यास राज्यसरकारपुढे तीन पर्याय विचारात असून
कॅबिनेट पुढे ठेवून एक निर्णय घेऊन पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे हे म्हणाले.
मनसे प्रमुख राज ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर
दुपारी 12 वाजेपर्यंत राज ठाकरे औरंगाबादेत पोचणार असल्याची माहिती
1 मे रोजीच्या सभेसाठी राज ठाकरे औरंगाबादेत पोचणार
औरंगाबाद शहरातील बाबा पेट्रोल पपं चौकात होणार राज ठाकरे यांचं जंगी स्वागत
हजारो मनसे सैनिक राहणार स्वागताला उपस्थित
आज असणार राज ठाकरे यांचा औरंगाबाद शहरात मुक्काम
उद्या धडाडणार राज ठाकरे यांची तोफ
मनसे नेते अमित ठाकरे करणार आज सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची पाहणी
कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करणार सभेच्या तयारीची पाहणी
आज सकाळी साडे आठ वाजता अमित ठाकरे करणार पाहणी
अमित ठाकरे घेणार सभेच्या तयारीचा आढावा
राज ठाकरे यांच्या सभेचं कामकाज वेगात सुरू
मनसे नेते राजू पाटील आणि संदीप देशपांडेही आज येणार औरंगाबाद दौऱ्यावर
आज दुपारपर्यंत राजू पाटील आणि संदीप देशपांडे औरंगाबादेत येणार
राज ठाकरे यांच्या सभेसाठी दोन्ही नेते औरंगाबाद दौऱ्यावर
मनसेचे सर्वच बडे नेते आज औरंगाबादेत ठोकणार तळ
सभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेते औरंगाबादेत होणार दाखल
राज ठाकरे यांच्या सभेला आता फक्त एक दिवस बाकी
राज ठाकरे आज काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
1 मे रोजी औरंगाबादेत धडाडणार औरंगाबादेत राज ठाकरे यांची तोफ
राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत दिलेल्या अलटीमेटम नंतर राज ठाकरे यांची निर्णायक सभेला
राज ठाकरे यांच्या सभेला आता उरला फक्त एक दिवस