कोरोना काळात जळगाव जिल्ह्यात औषधी खरेदी व रुग्णालय साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला असून, याबाबत शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी देखील चौकशीची मागणी केल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना खडसे म्हणाले की, या गैरव्यवहाराप्रकरणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पाठपुरावा न झाल्याने अखेर दिनेश भोळे व माधुरी अत्तरदे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेऊन कारवाईची मागणी केली होती. यासंदर्भात सत्र न्यायाधीशांनी पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक व अन्य अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. दरम्यान खडसेंच्या खुलाशानंतर राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
– पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर,
– काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता पुणे महापलिका निवडणुकित लक्ष घालणार,
– या निवडणुकीसाठी आपली रणनीती व फौज उभारण्यासाठी पुणे शहर कॉंग्रेसला एक कोअर कमिटी करून देण्यात आलीय,
– कोअर कमिटीचे मुख्य समन्वयक म्हणून भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नियुक्ती
पुण्यातील सहकारनगर परिसरात कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या गँगची पोलिसांनी काढली धिंड
हातात कोयते घेऊन तरुणांना धमकावण्याचे सुरू होते प्रकार.
एका तरूणाला दोन दिवसांपुर्वी केली होती मारहाण
सलमान शेख आणि त्याच्या सहा साथीदारांना पोलिसांनी केली अटक
सहकारनगर पोलिसांनी आरोपींची काढली धिंड..
राउतांचा “अपमान” हा महाराष्ट्राचा अपमान असतो परंतु राउतांची संपत्ती ही “महाराष्ट्राची संपत्ती” नसते !??
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 6, 2022
-पिंपरी चिंचवडमधील मोशीच्या कचरा डेपोला भीषण आग
-आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
-सहा ते सव्वा सहाच्या सुमारास ही घटना समोर आली
-सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाची पाच वाहनं दाखल आहेत.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे
चंद्रपूर : पंतप्रधान मोदी यांच्या सोबत झालेल्या बैठकीवर शरद पवार यांनी केलेल्या खुलास्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया,
पवारांनी महाराष्ट्रातल्या 13.5 कोटी लोकांच्या भल्या साठी चर्चा केली असती तर बरं झालं असतं,
मात्र पवारांसाठी राज्य गौण आहे आणि काही लोकांचे विषय हे जास्त महत्त्वाचे आहे.
राज्यपाल नियुक्त आमदार झाले नाही तर राज्य काही मागे जाणार नाही,
पवार साहेबांनी पंतप्रधान मोदींचा वेळ या कामासाठी खर्च करायला पाहिजे होता
प्रबळ दावेदार किरण भगतला पराभवाचा धक्का
दादा शेळकेचा सनसनाटी विजय
4-3 ने मिळवला विजय
– दोन वाजता शिवसैनिक एयरपोर्टवर करणार शक्ती प्रदर्शन…
– इडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसैनिक मोठ्या संख्येत एयरपोर्ट इथे पोहचणार…
– संजय राऊत यांचं होणार सेना स्टाईलने जंगी स्वागत…
– एयरपोर्ट ते भांडूप असा रुट ठरल्याची प्राथमिक माहीती…
– इडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊतांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची जंबो प्लानिंग
मला माझ्या पक्षातील सर्वांचा पाठिंबा उद्धव ठाकरे सतत माझ्या संपर्कात
प्रियंका गांधी यांचाही मला फोन आला
अनेक नेत्यांचा मला पाठिंबा मिळतोय
आमच्यात घाबरण्या मनाई आहे, मी लढणारा माणूस
शरद पवार मोदींना का भेटले याची जास्त माहिती माझ्याकडे
माझ्यासरख्या माणसाला बोलू देत नाही
बोलल्यावर आम्ही कारवाईला सामील जातोय, आम्ही बलिदान द्यायला तयार आहे.
आम्ही लढणारी लोकं आहोत
पवारांनी पन्नास वर्षे राजकारण पाहिलं आहे
त्यांना या कारवाई बघून अस्वस्थ वाटले
पवारांचं मोदींशी बोलनं सर्वांसाठी महत्वाचे
खरं बोलण्याची हिंमत तशीच ठेवण्यासाठी हे महत्वाचं
मविआ नेत्यांवर दबावासाठी कारवाई सुरू
आयएनएस विक्रांतचा मोठा घोटा
हा सर्वात मोठा घोटाळा वाटतो
देशद्रोहाचा गुन्हा यांच्यावर दाखल झालं पाहिजे
फडणवीस या घोटाळ्याचे समर्थन करत होतं
हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
अनेक सैनिकांचं बलिदान विक्रांतने पाहिले आहे
पाकिस्तानची फाळणी विक्रांतने पाहिली
पुरावे असातना विरोधी पक्षनेते नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते बाजू घेतात
सलग तिसऱ्या दिवशी सांगली सह मिरज शहरात आणि ग्रामीण भागात जोरदार वादळीवारे आणि गारांचा पाऊस
अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला, पिकांचं नुकसान होण्याची भीती
लांजा आणि राजापूर मध्येअवकाळी पाऊस
कालपासून हवामान खात्याने दिला होता कोकणाला ऑरेंज अलर्ट
अवकाळी पावसामुळे हवेत गारवा, आंबा बागायतदार धास्तावले
गुन्हेगारांना लगाम लावायचा आहे, तर इतक्या वर्षात ते का सापडले नाहीत
102 वर्षा पूर्वीचा कायदा तुम्ही बद्दलताय, तर या कायद्याचे समर्थन करावं लागेल
नव्या कायद्याने मूळ एजन्सीला ताकद मिळेल
मुस्लीमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही त्यांची जबाबदारी आमची
राज ठाकरेंवर महाविकास आघाडीनं कारवाई करण्याची केली मागणी
उच्चवर्णीय ब्राम्हण भडकावून बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करतात
वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरणार
मात्र जर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना सांगण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला ?
महाविकास आघाडीनं पुरोगामीत्वाची चादर पांघरलीये तर संधी आहे राज ठाकरेंवर कारवाई करा
मस्जिदच्या बाजूला भोंगे लागतील या वक्तव्यावर आक्षेप कारवाई व्हायला हवी
संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करू नका
शरद पवार
12 आमदारांच्या मुद्द्यांवर मोदींशी चर्चा केली
12 आमदारांबाबत मोदी योग्य निर्णय घेतील
विधान परिषदेच्या सदस्यांबाबत चर्चा झाली
संजय राऊतांवरील कारवाई अन्यायकारक
राऊतांवरील ईडी कारवाईचा मुद्दा मोदींसमोर मांडला
भाजपसोबत आमचे कोणते संबंध नव्हते, नाहीत
मविआचं सरकार चांगलं सुरु आहे
मविआ सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करणार
मविआ सरकारला कोणताही धोका नाही, पुन्हा सत्तेत येऊ
मंत्रिमंडळात कोणतेही बदल नाहीत
राज ठाकरे आधी भाजपविरोधी होते आणि आता बदलले
नवी दिल्ली
शरद पवार
मोदी यांच्यासोबत दोन चर्चा
1. अडीच वर्षात विधानपरिषद सदस्य बाबत चर्चा केली
2. संजय राऊत यांच्यावर ईडी कारवाई, ते राज्यसभा सदस्य आहेत आणि ते एक पत्रकार आहेत. याबाबत मी मोदींना कल्पना दिली.
या दोन विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे
केंद्रिय तपास यंत्रणा या जबाबदार आहेत
राऊत यांच्यावर अन्याय झालाय, ही कल्पना मी मोदींना दिली
नवी दिल्ली
खासदार फैजल यांनी मोदी यांच्यासोबत लक्षद्वीप बाबत चर्चा केली – शरद पवार
नवी दिल्ली
लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल के पटेल यांचे निर्णय चुकीचे आहेत
त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांची माहिती मोदींना दिली
– मोहम्मद फैजल
नवी दिल्ली
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात 20 ते 25 मिनिटे चर्चा
मोदी भेटीनंतर शरद पवारांची पत्रकार परिषद
लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार मोहम्मद फैजलही उपस्थित
एकीकडे उष्णतेचा पारा ४३ पार जात असल्याने नागरिकांच्या खशाला कोरड पडत आहे. खशाची कोरड घालविण्यासाठी थंडगार लिंबू सरबतील मागणी वाढली असतांना उष्णतेच्या पाऱ्यापाठोपाठ लिंबूचे दर देखील उच्चांक गाठत आहेत. बाजारात लिबूला चक्क दोनशे रुपये किलो दर मिळाल्याने थंडगार सरबत महागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मधील भेट एक सामान्य बाब
अशा भेटी सामान्यतः संसद अधिवेशन काळात होत असतात
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या भेटींचा थांगपत्ता मीडियाला लागत नाही,
राष्ट्रवादी काँग्रेसशी भाजपचे असलेले संबंध कटुता पूर्ण नाहीत
शिवसेनेने भाजपशी बेईमानी केल्याने सध्या शिवसेनेशी मात्र कटुतापूर्ण संबंध असल्याची मुनगंटीवार यांची प्रतिक्रीया
अमरावती-यवतमाळ मार्गावर एसटी बस आणि ट्रकची धडक
एसटी मधील अंदाजे 18 प्रवासी जखमी 2 प्रवाशी गंभीर
नांदगाव खंडेश्वर जवळील शिंगणापूर चौफुलीवर अपघात
यवतमाळ जिल्ह्यातील पुसदवरून अमरावतीला जाणाऱ्या बसला अपघात
जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवले, घटनास्थळी गर्दी
कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली महागाईविरोधात आंदोलन
महागाईविरोधात कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे रस्त्यावर
महागाईविरोधात घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने
सिलिंडर आणि गॅस टाकी समोर ठेवत केली निदर्शने
मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एसटी कामगारांनी कामावर हजर राहावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. विलनीकरणाची मागणी मान्य न झाल्याने आता कोर्टाकडून कामगारांना हजर होण्यासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
राजधानीत आज पुन्हा डिनर डिप्लोमसी
काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्याकडून स्नेहभोजनाचं आयोजन
शरद पवार यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता
राहुल गांधी, संजय राऊत यांनाही धानोरकरांचे निमंत्रण
नितीन गडकरी यांनाही निमंत्रण दिल्याची धानोरकर यांची माहिती
राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न – वळसे पाटील
राज्यात निघणाऱ्या आंदोलन आणि मोर्चांमध्ये वाढ – वळसे पाटील
पोलिसांवरील ताण वाढला – वळसे पाटील
आजान , हनुमान चालिसा म्हणावी मात्र त्यात मर्यादा असावी – वळसे पाटील
मुंबईतील मराठी शाळांना देवनागरी लिपीतून नाव सक्तीचे
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून आदेश
प्रत्येक शाळेसमोर आता दिसणार मराठीतून शाळेच्या नावाची पाटी
INS विक्रांतसाठी पैसे जमवल्याचा सोमय्यांवर आरोप
विक्रांतच्या नावाखाली कोट्यावधी रुपये जमा केले – राऊत
विक्रांतसाठी लाखो लोकांनी पैसे जमा केले
किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले
संजय राऊतांचा सोमय्यांवर गंभीर आरोप
विक्रांतसाठी जमा केलेले पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत – राऊत
केंद्रीय तपास यंत्रणा पारदर्शक असतील तर त्यांनी चौकशी करावी – राऊत
विक्रांतसाठी जमा केलेली रक्कम कुठे गेली?
राऊतांचा भाजपाला सवाल
विक्रांतवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील देणगी दिली
ईडी, सीबीआयकडून प्रकरणाची चौकशी व्हावी – राऊत
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज शिर्डीत विविध विकास कामांचे उद्घाटन
अजित पवार , पालकमंत्री हसन मुश्रीफ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालय , पोलीस वसाहत तसेच कोपरगाव येथे खा.शंकरराव काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करणार
अमरावती जिल्ह्यात शाळेच्या वेळेत उन्हामुळे बदल
आजपासून सकाळी सात ते साडेअकरा पर्यतच शाळा
वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, खासगी शाळांच्या वेळेत बदल
कोरोनाच्या काळातील नुकसान भरून काढण्यासाठी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवण्याचा होता निर्णय
मात्र पालकांच्या मागणीनंतर शाळाच्या वेळेत बदल
अमरावतीत उन्हाच्या झळा
15 वर्षांतील सर्वोच्च तापमानाची मंगळवारी नोंद
जिल्ह्यात मंगळवारी 44.1 सेलि्सअस तापमानाची नोंद
उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे तापमानात वाढ
पुण्यात महागाईचा भडका
मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर पुन्हा वाढले
सीएनजीचे दर 62.20 रुपये प्रति किलोवरून 68 रुपये प्रतिकिलो
पेट्रल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 85 पैशांची वाढ