आज रविवार दिनांक 14 ऑगस्ट 2022 जाणून घेणार आहोत राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडी जुन, जुलेै महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस पडला होता. पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर एक ऑगस्टपासून पावसाने थोडी उघडीप दिली. परंतु त्यानंतर 4-5 ऑगस्टला पाऊस पुन्हा सक्रिय झाला. अजूनही काही भागांत पाऊस सुरूच आहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून, धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीडे आज देखील राजकारणात काही महत्त्वाच्या घाडामोडी घडण्याची शक्यता आहे.
विनायक मेटे यांच्या जाण्याने मराठा समाजाचं मोठं नुकसान – राणे
विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू अतिशय दुर्दैवी घटना
नारायण राणेंनी वाहिली मेटेंना श्रद्धांजली
जे. जे. हॉस्पीटलमध्ये मेटेंच्या पार्थिवावर शवविच्छेदन पूर्ण
दुपारी चारनंतर मेटेंचं पार्थिव बीडला नेणार
एअर अॅम्ब्यूलन्सने पार्थिव बीडला नेणार
विनायक मेटे यांची अपघातग्रस्त गाडी घटनास्थळावरून रसायनी पोलीस स्टेशनला हलवली
नवी मुंबई, रायगडची फॉरेन्सिक टीम रसायनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल
अपघाताच्या चौकशीसाठी आठ पथकांची नियुक्ती
महाराष्ट्रातील एक कर्तबगार आणि लढवय्ये नेते काळाच्या पडद्याआड गेले
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे विनायकराव मेटे गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली
विनायकराव मेटे यांना भाजपा आमदार सुभाष देशमुख यांची मेटेंना श्रद्धांजली
मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये अतिशय हिरहिरीने सहभाग घेणारे मराठा समाजाची उन्नती व्हावी यासाठी सातत्याने आवाज उठवणारे विनायक मेटे आपल्यात आता नाहीत. सकाळीच त्यांच्या निधनाची बातमी ऐकली मराठा समाजाच्या हितासाठी काम करत असताना मेटे यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली, मराठा समाजाचा एक मोठा नेता आपल्यात नाही याचे आम्हाला दुःख वाटतं. मराठा समाजातील मुला मुलींची उन्नती होईल त्यांच्या हाताना रोजगार मिळेल तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवू हीच मेटे यांना श्रद्धांजली असेल अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्या हायवेची जबाबदारी असणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही यावेळी नितेश राणेंनी केली आहे.
अपघाताच्या चौकशीसाठी आठ पथकांची नेमणूक
मेटेंचे चालक एकनाथ कदम यांची चौकशी होणार
एकनाथ कदम यांची मेडिकल तपासणी होणार
पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू
विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणबाबत मोठे काम केले आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते मोठा नेता अशी मजल त्यांनी आपल्या कामातून गाठली. विनायक मेटेंनी शून्यातून विश्व निर्माण केल्याचे भाजप नेते गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.
विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक,अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने शिवस्मारक, मराठा आरक्षण तसेच महाराष्ट्रातील इतर विषयांकरिता आंदोलन करणारा एक बुलंद आवाज हरपला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो. भावपूर्ण श्रद्धांजली! असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक,अध्यक्ष,माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने शिवस्मारक,मराठा आरक्षण तसेच महाराष्ट्रातील इतर विषयांकरिता आंदोलन करणारा एक बुलंद आवाज हरपला.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो.भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/P0HuzfSaZs
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 14, 2022
भास्कर जाधव यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विनायक मेटे यांनी मराठा समाजासाठी मोठं काम केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक समुद्रात व्हावं यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. विनायक मेटे त्यांच्या ध्येयाशी ठाम होते. त्यांचं असं दुर्दैवी निधन होईल असं वाटलं नव्हतं, या आघातातून त्यांच्या कुटूंबाला सावरण्याची शक्ती द्यावी असं मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच आज निधन झालं, विनायक मेटे यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. अतिशय सामान्य गरीब कुटुंबातून पुढे आलेले विनायक मेटे हे लढवय्या नेते होते. कष्ट करून सामाजिक चळवळीतून ते पुढे आले. शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सातत्याने संघर्ष केल्याचंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधान पारिषदेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विनायक मेटे यांचे अपघाती निधन क्लेशदायक आहे. महाविद्यालयीन काळापासून माझा त्यांच्याशी असलेला ऋणानुबंध आज डोळ्यांपुढे तरळला आहे. केवळ मराठा समाजच नव्हे तर सर्व समाजातील सर्वसामान्य माणसाला ताकद देण्यासाठी त्यांनी अहोरात्र घेतलेले कष्ट कायम स्मरणात राहतील, असं शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
विनायक मेटे यांचे अपघाती निधन क्लेशदायक आहे. महाविद्यालयीन काळापासून माझा त्यांच्याशी असलेला ऋणानुबंध आज डोळ्यांपुढे तरळला आहे. केवळ मराठा समाजच नव्हे तर सर्व समाजातील सर्वसामान्य माणसाला ताकद देण्यासाठी त्यांनी अहोरात्र घेतलेले कष्ट कायम स्मरणात राहतील.#VinayakMete
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 14, 2022
विनायक मेटे यांचं आज अपघाती निधन झालं, त्यांच्या निधनावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दु:ख व्यक्त केले आहे. विनायक मेटे म्हणजे मराठा समाजाच्या प्रश्नासाठी स्वत: वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व होतं. ते एक आदर्श व्यक्तिमत्व तसेच कुशल संघटक होते. त्यांच्या अपघाती निधनाने चळवळीतला एक कार्यकर्ता महाराष्ट्राने गमावलाय आहे. विनायक मेटे यांच्यात चैतन्य निर्माण करण्याची क्षमता होती. ते
एखादी गोष्ट दुसऱ्याला सहज पटवून द्यायचे अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या विकासातील योगदान मोठे आहे. दिवंगत श्री मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे
विनायक मेटे यांच आज कार अपघातात निधन झालं, मेटे यांच्या निधनाची बातमी समजतात बीडमध्ये असलेल्या शिवसंग्राम भवनमध्ये कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याचे दुःख अनावर झाले असून, अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. विनायक मेटे यांच्या जाण्याने मराठा आरक्षणाचा आवाज हरपला आहे. विनायक मेटे यांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठा आरक्षणासाठी पणाला लावले होते. कालच त्यांनी मला फोन करून प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. भाजप आणि शिवसंग्राम नेहमीच सोबत राहतील असं त्यांनी मला म्हटलं होतं. मात्र आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी येण हे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
आज अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. विनाय मेटे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात विनायक मेटे यांनी मोलाची कामगिरी केली. मराठा समाजासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केलं. ते सामाजिक प्रश्नाची मांडणी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असत, त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघातात निधन झालं आहे. विनायक मेटे यांचं असं अकाली निधन धक्कादायक आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी विनायक मेटे यांना यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मेटे यांनी अहोरात्र मराठा समाजाचा विचार केला. विनायक मेटेंच्या जाण्यान मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवेर विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये विनायक मेटे यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. आमदार दीपक केसरकर यांनी विनायक मेटेंच्या निधनाने दु:ख झाल्याचे म्हटले आहे. विनायक मेटे यांच्या निधनाने महाराष्ट्र एका उमद्या नेत्याला मुकला. त्यांचं मराठा समाजासाठी मोठं योगदान असल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे पोलिसांच्या वतीनं 10 किलोमीटर दौडचं आयोजन
थोड्याच वेळात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या उपस्थित होणार बक्षिस वितरण
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे पोलिसांचा अनोख उपक्रम
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकर आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ट्रक आणि टँकरचा चालक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती.