मुंबई : आज बुधवार 16 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे. आज सकाळी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. तर, दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा देखील पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळं राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Elections) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले घेणार भेट
विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची माहिती
चाळीसगाव तालुक्यातील चिमुकलीवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्याला जळगाव विशेष न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
चाळीसगाव शहरातील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सावळाराम भानुदास शिंदे या 27 वर्षीय नराधमास अवघ्या सात दिवसात विशेष न्यायालयाने दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा दिली आहे
चारचाकी वाहनातील स्फोटात एका जोडप्याचा मृत्यू
गंधेली परिसरातील निर्जन स्थळी थांबवली होती गाडी
निर्जन स्थळी थांबवलेल्या गाडीत झाला अचानक स्फोट
स्फोटात एक महिला आणि एका पुरुषाचा जळून मृत्यू
स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट
मात्र स्फोटात गाडीचा छत पूर्णपणे जळून खाक
स्फोट कशामुळे झाला याचा चिखलठाण ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू
मी प्रखर राष्ट्रवादी, आणि राष्ट्रभक्तच आहे-संजय राऊत
माझा मुख्यपदाच्या खुर्चीवर डोळा नाही
माझा शिवसेनेच्या विस्तारावर डोळा
येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना दिल्लीच्या तख्तावर पोहोचेल
भाजपवाले बेरोजगार होतील
राजन तेली यांच्या मुलांवर हल्ला कोणी केला हेही ऐका
प्रथमेश तेली यांना रेल्वेखाली कोण ढकलत होतं?
शिवसेनाच्या पत्रकार परिषदेचा भाग दोन व्हिडिओने गाजला
काही दिवसांपूर्वीच राणे आणि भाजपवाल्यांनी एकमेकांचे कपडे फाडले
आरएसएसची विटंबना हाफ चड्डीवाले म्हणून नितेश राणेंनी केली
नितेश राणे यांचेही सोमय्या यांच्यावर आरोप
नितेश राणेंचा व्हिडिओही दाखवला विनायक राऊतांनी
शिवसेनेचा राणेंवर जोरदार पलटवार
सोमय्यांनी केलेल्या आरोपांबाबत आम्ही ईडीला विचारणार
राणे यांनी मोदींवरही टीका केली
विनायक राऊतांनी राणेंचा मोदींवर टीका करणारा व्हिडिओच लावला
राणेंच्या पत्नीच्या नावावर कणकवलीतील निलम हॉटेल
यात अनेक बेनामी गुंतवणुकी
मायईनिंगमध्येही नारायण राणेंवर आरोप झाले
हे सर्व आरोप किरीट सोमय्या यांनी केले
राणेंच्या मोदी प्रेमचा कंठ कोडगा
बाडगा जास्त कोडगा असतो
कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आघाडीवर
एकही भाजपचा मुख्यमंत्री टॉप पाच मध्ये नाही
हे राणे यांना पाहवत नाहीये
राऊतांनी उघड बोलण्याचे धाडस केले
राणेंच्या मागे ईडी लागल्यावर चोर रस्त्याने दिलीत जाऊन शरणागती पत्करली
ईडीपासून बचाव करण्यासाठी शिवसेनेशी आणि काँग्रेसशी बेईमानी केली
राऊतांच्या बाणांमुळे भाजप घायाळ
संजय राऊत हे शिवसेनेचे नेते
बाळासाहेबांनी ज्यांना नेते केले त्यातच संजय राऊत नेते झाले
बाळासाहेबांनी नेते ही उपाधी राणेंना दिली नाही
याच्यातून नारायण राणेंची लायकी दिसते
संजय राऊत निधड्या छातीचे शिवसैनिक
अमित शाह यांना फोन करण्याची याची हिंमत नाही
याच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला आहे
जाता जाता राऊतांना राणेंना कोपरखळी
संजय राऊतांनी जाऊन मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला सांगावे
मग देशातील तपास यंत्रणा त्यांचे काम करतील
राणेंचा राऊतांना कडकडीत इशारा
आम्ही कायम विरोधी पक्षात नाही राहणार
नितेश राणेंवरून नारायण राणेंचा इशारा
आमच्या योग्य डिपार्टमेंटने त्याची दखल घेतली आहे
बोला ना विकासावर बोला, ते बोलत नाही हा माणूस, जनतेच्या प्रश्नाचे विषय, आरोग्य खात्याच्या प्रश्नाबद्दल लोकसत्ताने बातमी दिली, राज्याचा आरोग्यविभाग निधीअभावी अत्यवस्थ, अरे यावर काहीतरी बोल, राज्याची दयनिय अवस्था, प्रश्न सुटत नाही, एसटीचं आंदोलन..पण काही नाही, इंडस्ट्री मिनीस्टर पत्राचाळीतून बंगल्यात गेले, कंबोजने सांगितलं, चेक दिला संजय राऊतला. एका बाजूला पत्रकार आणि दुसऱ्या बाजूला छापखाना, आणि त्यांना माहितीय, आज ना उद्या जागा खाली होणार, आता शिवसेनेत कोण नाहीय, आधी बाळासाहेबांवर टीका केली, उद्धवजींवर टीका केली. आता एक आरोप झाला, ईडीशी बोलू नको, विडी प्यायला लावतील. मी कुणाला घाबरत नाही, तू शिवसेनेत आला कधी, शिवसेनेच्या जन्मानंतर 26 वर्षांनी आला. आम्ही शिवसेनेसाठी वाटा दिला, तू 5 पैसे तरी दिले का?
आता संजय राऊत हे विषय काढतो, लोकांना दुर्लक्षित करण्यासाठी, तुझा इतिहास बघ, वडिलांना वडिल म्हणालास का, की प्रत्येकवेळी बदलतोस. एक गोष्ट सांगतो, संजय…शिवराळ भाषा म्हणजे मर्दानी नव्हे, धमक्या देण्यासाठी काहीतरी कर…हे बंद कर..आणि भाजपच्या दिल्लीपासून ते कुठल्याही नेत्यावर आरोप करण्याआधी पुरावा दे नाहीतर ईडीला आम्ही पुरावे देऊ
अहो राऊतांना अमेरिकेच्या अध्यक्षांनीही फोन केला, ते राष्ट्रपतींना पत्र लिहतात, ते आता एवढंच सांगायचं राहिलंय, की अमेरिकेच्या अध्यक्षांनाही पत्र लिहलंय, त्यांची तपासणी करणं राहिलंय, त्यामुळे डिप्रेशनमध्ये चाललेले संजय राऊत, त्यांनी टीका करणं सोडून, त्यांच्यावर जे बितलंय ना त्याला समाोरं जावं
बाळासाहेबांबद्दल अत्यंत घाणेरडे बोलला आहे
पदासाठी याने ब्लॅकमेल केले आहे
मला साहेबांनी इशारा केला असता तर हा राहिला नसता
तू पगारी नेता आहेस
संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर
संजय राऊत पूर्ण राष्ट्रवादीचे
तुझी पूर्ण कुंडली माझ्याकडे
पूर्ण कुडली काढेन
लोकप्रभात असताना राऊतांनी उद्धव आणि बाळासाहेबांवर टीका करण्याचे सोडले नाही
तू काय विचाराचा आहेस हे आम्हाला माहीत आहे
तू पत्रकार नाही, तू संपादक नाही, तुझी भाषा त्या पात्रतेची नाही
हा काल अस्वस्थ का झाला
बेजबाबदार झाला, थयथयाट झाला
प्रवीण राऊत यांच्या ईडीच्या जबाबनंतर संजय राऊतांना काय झालं?
पत्रकार आहेस तर पुरावे देना
अलिबागमध्ये तू पन्नास एकर पन्नास लाखात घेतली
सुजित पाटकर तुझा कोण लागतो?
त्याच्या कंपनीत तुझ्या मुली डायरेक्टर कशा?
याबद्दल जरा बोल, संजय राऊतांचा राणेंकडून आरेतुरे उल्लेख
संजय राऊत जास्त आग कशी लावता येईल हे पाहतात
आव शिवसेनेच्या प्रेमाचा आणता, मात्र तुमची प्रवृत्ती वेगळी
संजय राऊत लाचार पत्रकार- हे बाळासाहेबांचं वाक्य
राऊत पैसा आणि सत्तेमागे धावतात
15 फेब्रुवारीला आपण आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेला उपस्थित होतात, त्यामुळे त्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणा, किंवा आमचे मित्र राज्यसभेतले संजय राऊत, यांची केविलवाणी परिस्थिती झालेली होती, तो घाम फुटलेला होता, तो कशामुळे फुटला, विरोधकांनी फोडला होता, हे सांगण्यासाठी मी मुद्दाम ही पत्रकार परिषद घेतली आहे. ते सांगत होते, मी घाबरत नाही, मर्दांची शिवसेना आहे, मर्द माणसाला सांगण्याची गरज लागत नाही, आम्ही विचारलं का तुम्ही घाबरता की नाही, त्यांनी कुणावर आरोप करायला घेतले होते नेमकं, जाहिरात काय, राज्यभरातले शिवसैनिक येणार, मंत्री येणार, पण साधे विभागप्रमुखही आले नाही. मुंबईचेही नेते, मंत्री नाही, पक्षप्रमुखही नाही, नाशिकची काही लोक होतं, मोजकीच, कारण संपर्क प्रमुख आहे ना म्हणून आणलेली. आता शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली, की अडचणीत आहे म्हणून घेतली? काय भगवी शालबिल घालून, त्या पत्रकार परिषदेत काय काय शब्द. एका शब्दाचा उल्लेख करतो, गांडू, आम्ही कधी तुम्हाला म्हणालो, हा शिवसेनेबद्दल बोलतो, शिवसेना, बाळासाहेब, मला आशीर्वाद आहे, याचे त्याचे…10 मे 1992 ला आला, सामनात संपादक म्हणून आला, मार्मिकमधून हाकालपट्टी झाली, मग लोकप्रभाला आला…लोकप्रभाला असताना त्यांनी जे पराक्रम केले, हा कसा पत्रकार आहे, हे मी बोलू शकत नाही
नाशिक – एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक महापालिकेच्या निवडणुका शक्य
सूत्रांची टीव्ही9 ला माहिती
तर आचारसंहिता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता
तत्पूर्वी ओबीसी आरक्षणाचा निकाल आल्यास आरक्षण रचना बदलणार
मात्र निवडणूक आणखी लांबणीवर पडणार नाही
नाशिक मनपा निवडणुकांकडे राज्याचे लक्ष
– अपघातात दुचाकीवरील पती पत्नी जागीच ठार
– अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
– नाशिक-पुणे महामार्गावरील अपघातांच्या मालिका सुरूच
शिवसेना खासदार विनायक राऊत यांचीही पत्रकार परिषद
काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आज विनायक राऊत यांची पत्रकार परिषद
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्याची शक्यता
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिका निवडणुकीची तयारी केली सुरू,
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागवली इच्छुकांची यादी
महापालिका निवडणूकीसाठी इच्छुकांची यादी 6 दिवसात सादर करण्याचे आदेश
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती
विधानसभा मतदारसंघातील निरीक्षक करणार यादी गोळा..
काल शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत हजर न राहीलेले शिवसेनेचे नेते आज संजय राऊतांना भेटण्याच्या प्रयत्नात…
– शिवसेनेतील मोठे नेते पत्रकार परिषदेत हजर राहिले नाहीत… एकनाथ शिंदे, अनिल परब, अर्जून खोतकर, आणि इतर मोठे नेते गैरहजर होते…
अमरावती जिल्हा हा तुकडोजी महाराज, गाडगे महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना माननारा जिल्हा आहे…
तरी दंगल घडली याच उत्तर पोलिसांनी दिलं पाहिजे…
19 तारखेला शिवजयंती ही शांतपणे साजरी करावी..
19 तारखेला शिवजयंती शांततेत साजरी करनार… पोलिसांना आम्ही सहकार्य करनार आहे…
मनपा मध्ये सत्ता येताच आम्ही शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणार आहे…
भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या घराबाहेर काँग्रेसचं आंदोलन
भाई जगताप यांच्या नेतृत्त्वात आंदोलन
नरेंद्र मोदी माफी मागो, अशा आशयाच्या घोषणा
काँग्रेसचा जयघोष
गोपाळ शेट्टी यांच्या समर्थनार्थ प्रविण दरेकर उपस्थित
पहिली शर्यत सुरु झाली तेव्हा संसद अधिवेशन सुरु
ज्यांनी आक्षेप घेतला त्यांची 50 टक्के उपस्थिती होती. त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी तिकडे नव्हतो
सर्वोच्च न्यायालय आणि महाविकास आघाडी सरकारचं आभार
ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळतेय
बैलगाडा शर्यतीवरुन घेरणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं
मांजरी बुद्रुक येथे अनधिकृत बांधकाम वर पीएमआरडी ची कारवाई
कार्यवाही थांबवण्यासाठी महिलांचा इमारतीवरचं ठिय्या !
पीएम आरडीएकडून अनधिकृरीत्या बांधण्यात आलेल्या इमारती पडणारच या भूमिकेवर ठाम
पीएम आरडी अधिकारी आणि नागरिकांमध्ये संघर्ष
150 वर पोलीस घटनास्थळी तैनात
ईडीच्या नावावर धमक्या , क्रिमिनल सिंडिकेट, ईडीला पैसे द्यावे लागतात, याचा लवकरच भांडाफोड होईल. काल मी 19 बंगले दाखवा म्हणलं दाखवलं का? अर्जून खोतकर यांना किती त्रास दिला. मुंबईतील बिल्डरांकडून पैसे घेतले गेले.
आठ जेवीपीडी स्कीम, सुजीत नवाब नावाचा प्लॉट आहे. किरीट सोमय्या आणि मित्र अमित देसाई या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन 100 कोटीचा प्लॉट मातीमोल किमतीत स्वत: च्या नावावर करुन घेतला. 110 कोटीची जमीन मातीमोल किमतीला घेतली.
ईडीच्या नावावर काय चाललेय हे देशाला कळायला पाहिजे. त्यातील 15 कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्याला दिले आहेत. ईडीनं त्याची दखल घ्यावी, अन्यथा ईडीनं अधिकाऱ्याची नावं जाहीर करु, असं संजय राऊत म्हणाले.
अर्जुन खोतकर, भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांना का त्रास दिला जातो.
हरियाणातील दुधवाला महाराष्ट्रात येतो, साडे सात हजार कोटी रुपयांचा मालक होतो
अमोल काळे कोण आहे त्याला बाहेर आणा,परत परत बोलायला लावू नका, अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले
अन्वय नाईक यांनी तुमची फसवणूक केली आहे असं म्हणायचं आहे का?
निल सोमय्या याचं नाव का घेताय. मी वर्षभरापूर्वी बाहेर काढलेला घोटाळा समोर आणला होता तो आता का सांगताय
कोविड घोटाळ्यासंदर्भात मी आरोप केले, पक्ष तुमच्या पाठिशी उभा राहत नाही त्यामुळं तुम्ही बोलताय
कर्जतच्या जमिनीबद्दल बोलत आहात, मी कर्जतला गेलो होतो
हिंदू देवस्थानाची जमीन मुस्लीम व्यक्तीकडून पाटणकर यांनी घेतली
मी जेलमध्ये जायला तयार आहे, खोल्या सॅनिटाईज नाही केल्या तरी चालेल
कोविड सेंटर घोटाळ्यावर कारवाई का करत नाही
सुजित पाटकर याचे संजय राऊत यांच्या कुटुंबाशी व्यावसायिक संबंध
कोविड घोटाळ्यासंदर्भात सर्वांकडे कागदपत्र आहेत
संजय राऊत आणि प्रविण राऊत यांचे संबंध काय?
आमच्यावर 10 गुन्हे आहेत, तीन पाईपलाईनमध्ये आहेत आणि एक गुन्हा दाखल होईल
प्रताप सरनाईक प्रकरणी मी आरटीआय केला होता
माहिती घ्यायला मंत्रालयात गेलो होतो, गुन्हा दाखल केला होता का अटक केली नाही
रश्मी यांनी काही वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स भरला आहे, राऊत तुम्ही जोड्याने कुणाला मारणार ?
रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी हा व्यवहार केला
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ती घरं चोरीला गेली का?
मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली
रश्मी उद्धव ठाकरे यांनी आणि मनिषा रवींद्र वायकर यांनी घोस्ट बंगलो दाखवली
घर नसताना ते कर भरत होते
अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध मी बाहेर आणला
अन्वय नाईक यांच्या सपत्तीबाबतची माहिती ठाकरे सरकारनं दिली
2008 ला अन्वय नाईक यांनी कर भरल्याची माहिती
2013 ला जागा घेतली, त्यावेळी एमओयू झाला
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ही माहिती मिळवली
रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्यातर्फे घरं जमीन नावावर करण्यासंदर्भात अर्ज
एप्रिल 2014 मध्ये रश्मी ठाकरे,मनिषा वायकर आणि अन्वय नाईक यांच्यात करार
ती घरे वन खात्याच्या जमीनीवर
संजय राऊत यांनी जोडे मारण्याची बात केली याचा उद्देश समजून घेतोय
रश्मी उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगल्याबद्दल पत्रकार परिषद घेतो
बंगले दिसले तर माफी मागू नाही दिसले तर किरीट सोमय्यांना जोडे मारू असं म्हणाले
19 बंगले कोणाच्या नावावर आहेत?
रश्मी उद्धव ठाकरे यांनी 19 बंगल्यांचा टॅक्स कोरलाई ग्रामपंचायीतला भरला
रश्मी उद्धव ठाकरे यांनी त्या आधीच्या चार वर्षाचा कर
संजय राऊत यांनी बाप बेटे जेल मध्ये जाणार टीव्ट तर त्याला उत्तर देत मोहित कंबोज भारतीय यांनी सलीम – जावेद ची जोडी जेलमध्ये जाणार अस सूचक टीव्ट केले. गेली काही दिवस कंबोज यांच्याकडून संजय राऊत – नवाब मलिक यांच्यावर आरोप केले जातात. काल राऊत यांनी ही कंबोज यावर जोरदार आरोप केले.
सलीम – जावेद दोनो जेल जाएँगे !
Wait and Watch ! https://t.co/iGYafIArfF— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 16, 2022
जम्मू-काश्मीरमध्ये आज पुन्हा भूकंपाचे धक्के
पहेलगाम भागामध्ये आज पहाटे जाणवले भूकंपाचे धक्के
3.2 रिश्टर स्केलचा भूकंप
उत्तर भारतात भीतीचे वातावरण
गेल्या महिन्याभरात चार वेळा जम्मू-काश्मीर मध्ये भूकंपाचे धक्के
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पुरंदर तालूक्यातील वीर गावच्या यात्रेवर प्रशासनाने घातले निर्बंध
वीर गावात 7 दिवस चालते शनिनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा,
कोरोनामुळं बाहेरच्या लोकांना गावात प्रवेश नाही,
कालपासून झाली यात्रेला सुरुवात,
गुलाल उधळण्यास, रेंगाळण्यास प्रशासनाची मनाई,
गावात कलम 144 केलं लागू , वीर गावात दरवर्षी जमतात हजारो भावीक
मात्र गर्दी न करण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन, उपविभागीय पोलीस अधीकाऱ्यांनी काढले मनाई आदेश….
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षांना सुरुवात
ऑनलाईन पद्धतीने कालपासून परीक्षांना झाली सुरुवात,
काल 84 विषयांची पार पडली परीक्षा 95 टक्के विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन परीक्षा,
या परीक्षेसाठी 14 हजार 599 विद्यार्थी अपेक्षित होते मात्र 13 हजार 832 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली,
ऑनलाईन परीक्षा सुरळीत पार पाडण्याचं आव्हान विद्यापीठासमोर आहे…
शिवना टाकळी धरणावर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
धरणाच्या कालव्यात गेलेल्या फळझाडांची नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न
धरणाच्या भिंतीवर चढून पाण्यात उडी मारण्याचा केला प्रयत्न
सुमारे अर्धा तास सुरू होता शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्याने माघारी घेतली जलसमाधी आंदोलन
रामेश्वर पवार असं धरणाच्या भिंतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव
बोरसर खुर्द गावातील कालव्यात गेली शेतकऱ्याची फळझाडे
नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकरी झाला आक्रमक
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे. आज सकाळी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. तर, दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा देखील पत्रकार परिषद घेणार आहेत.