मुंबई : आज सोमवार 21 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळू शकतो. शिवसेनेपैकी सर्वांनी वाझेंचा जयजयकार केला, वाझे शिवसेनेचे दुसरे प्रवक्ते, आपण हे पत्र 11 ऑक्टोबर 2021 ला दिलेल्या पत्राची पहिली ओळ वाचतो, प्रिय श्री करीट सोमय्याजी, भ्रष्ट्राचार शासकीय पैशाचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण उघड केली, हे राज्यावर उपकार झाले, आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावे लागले असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
जळगाव महापालिकेच्या आणखी एका भाजप नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बांधले शिवबंधन
जळगाव महापालिकेतील नगरसेवकांच्या इकडून तिकडे उड्या सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या 4 नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला होता, पुन्हा भाजपच्या नगरसेविका रुकसानाबी गबलू खान यांनी पालकमंत्री गुलाबराब पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने केलेल्या अर्जावर 25 फेब्रुवारीला सुनवणी
मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अंतरिम रिपोर्टनुसार निवडणुकांना परवानगी द्यावी असा केला होता राज्य सरकारने अर्ज
त्यावर 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या सभागृहात घेतली जिल्ह्याची उच्चस्तरीय आढावा बैठक,
विविध यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे पालकमंत्र्यांचे निरीक्षण,
महाऔष्णिक वीज केंद्राने अत्यंत आवश्यक सुरक्षा भिंत उभारली नसल्याचे आणून दिले लक्षात,
उद्यापासून शहराच्या पाच किलोमीटर परिसरातील अनावश्यक झाडोरा स्वच्छ करण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश,
वनविभागाने वाघ-बिबट्या दिसल्यास माहिती देण्यासाठी ‘टोल फ्री’ नंबर जारी करण्याचा दिल्या सूचना,
चंद्रपूर शहराकडे येणारे वाघांचे सर्व भ्रमण मार्ग रोखण्यासाठी उपाय करण्याच्या निर्णय,
नागरिकांमध्ये उद्रेक झाल्यास अधिकार्यांना दोषी ठरवत कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सूतोवाच
– लष्कर जलकेंद्राचे, रामटेकडी मुख्य जल नलिकेचे देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार,
– तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार,
– पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती
अकोला शहरात एका 25 वर्षीय युवकाची मोरणा नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या….
सिटी कोतवाली जवळील पुलावरून एका 25 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून यात त्याचा मृत्यू झाला आहे….
हा युवक कोण आहे याची माहिती मिळाली नसून युवकाचा हातावर अमर नाव लिहिलं आहे….
घटनास्थळी जुने शहर पोलीस दाखल
या युवकाने आत्महत्या का केली व हा युवक कोण आहे याचा तपास जुने शहर पोलीस करत आहेत….
– ओबीसी आरक्षण आणि इंपेरिकल डेटाच्या कामकाजासंदर्भात फडणवीस घेणार माहिती,
– पुढील आठवड्यात फडणवीस आयोगाला भेटण्याची शक्यता,
– देवेंद्र फडणवीसांनी आयोगाला फोन केल्याची माहिती.
एक आठवड्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना अटक करता येणार नाही
शहरात एवढी काम झाली आहेत त्याच कारण आम्हाला राज्य दलाली खाण्यासाठी नाही तर
लोकांची काम करण्यासाठी हवं असत
– कोव्हीडच्या काळात नाशिकवर अन्याय
– नाशिकमध्ये मात्र महापालिकेने ही जवाबदारी स्वीकारली
– राज्याने एक नव्या पैशाची मदत केली नाही
– शेवटी मी आलो आणि त्यानंतर ऑक्सिजन मिळालं
– हे जर जाऊन बसले नसते,तर नाशिकला ऑक्सिजन मिळालं नसत
– महाराष्ट्रात क9न राज्यकर्ते आहेत हेच समजत नाही
– सरकारच अस्तित्व नाही
– राज्य मुंबईच्या बाहेर देखील असत हे याना माहीतच नाही
– येत्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना पूर्ण ताकतीने उतरावं लागेल
– हे तिघे काहीही बोलले तरी आपल्या तिघांच्या विरोधात लढण्यासाठी हे एकत्र येतील
– भाजपला पराभूत करण्यासाठी हे एकत्र येतील
– राजकारणात 1 आणि 1 = 2 होत नाही
– राजकारणात अर्थमॅटिक नाही तर केमिस्ट्री चालते
– आपल्याकडे जागांची अपेक्षा असणाऱ्यांची संख्या मोठी आहे
– भाजप च तिकीट मिळणे म्हणजे विजयाची गारेती आहे
– तिकीट वाटपात नेत्यांनी नातेवाईकांचा नाही तर कार्यकर्त्यांचा विचार करायचा आहे
– कार्यकर्त्यांनी पार्टीचा विचार करायचा
– आमचा उमेदवार म्हणजे कमळाचे चिन्ह ही मानसिकता घेऊन उतरावं लागेल
– ज्या भाजपचे 2 लोक निवडून आले त्याच भाजपाचे 300 च्या वर जागा निवडून आल्या
–
दत्तक घ्याचे म्हणजे दलाली खायची असे काहींना वाटतं
आता भगव्याची जबाबदारी भाजपची
नाशिक महापालिकेवर पुन्हा भगवा फडकेल
दलाली खाण्यासाठी काहींना राज्य हवं असतं
कोरोनाकाळात फक्त भाजपने लढा दिला
-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव भागाच्या नगरसेविका चंदा लोखंडे यांनी नगरसेविका पदाचा राजीनामा दिलाय
-लोखंडे यांनी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय
-चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जात होत्या
-आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला गळती लागलीय, गेल्या आठवड्यात मोशी भागाचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी देखील राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता
पर्यटन विषयक विविध बाबींची करणार पाहणी
सिंधुदुर्ग जिल्हा माझी वसुंधरा या चर्चासत्रात देखील होणार सहभागी
नारायण राणे यांच्या मालवणातील नीलरत्न या बंगल्या संदर्भात आलेल्या नोटीसच्या अनुषंगाने आदित्य ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता
रांची: डोरंडा कोषागारशी संबंधित चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश एसके शशी यांनी हा निकाल दिला. लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा देतानाच त्यांना 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, लालूप्रसाद यांच्या वकिलांनी लालूंना जामीन मिळावा म्हणून अर्ज करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. परंतु, लालूंना जामीन न मिळाल्यास त्यांना तुरुंगातच राहावं लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या स्वभावामुळे महाविकास आघाडीत एकी
आम्ही रश्मी ठाकरेंच्या पाठीशी आहोत काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांच मोठं वक्तव्य
जिल्हा बँकेच्या निवडणूकीत आमच्या संचालकांवर ईडी लावली
तरी आम्ही निवडणूक जिंकली
उद्या सरपंचावरही ईडी लावतील केंद्राचं काय चाललंय हेच कळत नाही
आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत आम्ही घाबरणार नाही
काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही
काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूरांचा भाजपवर हल्लाबोल
तर किरीट सोमय्यांनाही प्रत्युत्तर आम्ही रश्मी ठाकरेंसोबत
– कार्यकर्ता परिवार संवाद यात्रेसाठी येतायेत मंत्री जयंत पाटील
– आजच्या पहिल्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माढा आणि मोहोळ तालुक्यासह सोलापूर शहरात घेणार बैठक
– उद्या अक्कलकोटसह दक्षिण आणि उत्तर सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद
– सोलापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व
संजय राऊत यांच मानसिक संतुलन बिघडल
हर्बल वनस्पती आणि बारामतीच्या वनस्पतीनं त्यांच संतुलन बिघडल
ही भिती चांगली आहे
किरीट सोमय्या आता संजय राऊतांच्या स्वप्नात येतात
मोहित कंबोज यांनी राऊतांना पुन्हा डिवचल
भाजपचे खासदार मनोज कोटक यांच्या मुलुंडच्या घरासमोर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांना माहिती झाल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगोदरचं कोटक यांच्या निवास्थानी पोहोचले होते. तिथं सध्या मोठा पोलिस बंदोबस्त असून पोलिसांकडून दोन्ही कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेसच्या वतीने भाजप कार्यालय समोर आंदोलन
कोरोना पसरवला असे वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याने केल्याबद्दल
काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानांनी माफी मागावी या मागणीसाठी आज भाजपा कार्यालय समोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन
काँग्रेस कार्यकर्ते व भाजपा कार्यकर्ते आमने सामने दोन्ही कार्यकर्त्याकडून घोषणाबाजी
– आयपीएस अधिकारी रवींद्र सेनगावकर यांची आयोगासमोर साक्ष नोंदवण्याचं सुरू,
– मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सुरु आहे साक्ष नोंदवण्याचं काम,
– रवींद्र सेनगावकर हे भीमा कोरेगाव हिंसाचाराच्यावेळी होते पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त
शिवसेनेपैकी सर्वांनी वाझेंचा जयजयकार केला, वाझे शिवसेनेचे दुसरे प्रवक्ते, आपण हे पत्र 11 ऑक्टोबर 2021 ला दिलेल्या पत्राची पहिली ओळ वाचतो, प्रिय श्री करीट सोमय्याजी, भ्रष्ट्राचार शासकीय पैशाचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण उघड केली, हे राज्यावर उपकार झाले, आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावे लागले,
राऊतांनी मला इंग्रजीत आणि मराठीत पत्र वाचून दाखवली.
मुख्यमंत्र्यांनी सुडाचं राजकारण करू नये
कोरोनाच्या काळात हॉटेल चालकांचे कंबरडे मोडले
सिंधुदुर्गात नुसतं येऊ नका, त्यांना काहीतरी पॅकेज जाहीर करू नका
फोटो काढण्यासाठी सिंधुदुर्गात येऊ नका
अर्थमंत्र्यांना सोबत घेऊन फिरताना आम्ही पाहिलं आहे.
नवीन खेडका सापडलातर भावाला देण्यासाठी येतोय का ?
महाराष्ट्राच्या जनतेला भेटण्यासाठी त्यांना वेळ नाही.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी
महाराष्ट्रातील मंत्री सुभाष देसाई नवी दिल्लीत
केंद्रीय संस्कृतीक राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांच्या भेटीला
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी घेतली रेड्डी यांची भेट
27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन
– ‘विदर्भात भाजपच्या भरवशावर निवडूण येणाऱ्यांनी शहानपण जास्त सांगू नये’
– ‘नागपूर मनपात शिवसेनेचे दोन पेक्षा जास्त नगरसेवक निवडूण आले नाही’
– ‘संजय राऊत यांनी विदर्भाच्या जनतेला शहाणपण शिकवू नये’
– ‘अशे संजय राऊत कित्येक येऊन गेले’
– विदर्भात भाजप सोबत लढली तेव्हा सेना वाढली, एकटी लढली नेस्तनाबूत झाली
– शिवसेना नेते संजय राऊत यांना भाजप नेते आ. कृष्णा खोपडे यांची सडेतोड उत्तर
– नारायण राणे घरात उपस्थित
– जुहूतील बंगल्यात अधिकृत बांधकाम केल्याची तक्रार
– बीएमसी पथक पोलिस संरक्षणात बंगल्यावर दाखल
– नारायण राणे अधिकृत बांधकाम केल्याची बीएसीकडे तक्रार
– सरुवातीला हे पथक पोलिस ठाण्यात गेलं होतं
– महापालिकेकडून पहिलं नोटिस देण्यात आलं होतं
– पालिकेतील 9 अधिकारी पथकात
– दोन दिवसापुर्वी दिला होतं पालिकेने अलर्ट
– कोरोना निर्बंधात शिथिलता दिल्यामुळे लग्न समारंभाना परवानगी मिळत आहे,
– मात्र निर्बंधात दिलेल्या शिथिलतेचा गैरफायदा घेतला जात आहे,
– बारबाला नाचवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल
जत मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्याच्या वादावर आज तोडगा निघण्याची शक्यता
जिल्हाधिकारी कार्यालयात या वादावर महत्त्वपूर्ण बैठक सुरू
पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, पुतळा समिती सदस्य विलासराव जगतात, जतचे विद्यमान आमदार विक्रम सावंत आणि जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख बैठकीस उपस्थित
पुतळ्याच्या वादामुळे जत शहरात मागील आठवड्याभरापासून मोठा पोलीस बंदोबस्त आहे तैनात
औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की,
-तेलंगणाचे मुख्यमंत्री भेटून आले म्हणून त्यातून फार काही होईल, असं मला वाटत नाही.
– या सगळ्या मंडळींनी मागच्या लोकसभेतही हातात हात घालून मोठी आघाडी तयार केली पण काहीच फायदा झाली नाही.
– देशाच्या वेगवेगळ्या राज्यात हा प्रयोग केला, पण कुठेच फायदा झाला नाही..
– तेलंगणात भाजपच नंबर एकचा पक्ष असेल..
राणेंच्या बंगल्यावर होत असलेल्या कारवाई म्हणाले ते की,….
– जे सूडाचं राजकार सरकारला करायचं, ते त्यांनी करवा, न्यायालया याबाबत कारवाई करेल…
– रवी राणा, नारायण राणे यांच्याबाबत काय चाललंय सरकारकडून ते दिसतंय… गावागावात शहरात सरकार कसं सूडाचं – राजकारण करतंय, ते लोक पाहत आहेत, न्यायलय यावर आपला निर्णय देत कारवाई करेल…
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी
महाराष्ट्रातील मंत्री सुभाष देसाई नवी दिल्लीत दाखल
11 वाजता केंद्रीय संस्कृतीक राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांची घेणार भेट
27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा मंत्री सुभाष देसाई महाराष्ट्राच्या वतीने केंद्र सरकारकडे मागणी करणार
दुपारी दोन वाजता सुभाष देसाई नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेणार
म्हाडाच्या पेपर घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एकाला घेतलं ताब्यात,
शरद भुसारी असं अटक केलेल्या आरोपीचं नावं,
आतापर्यंत एकूण 5 जणांवर अटकेची कारवाई,
पुणे सायबर पोलिसांची कारवाई म्हाडाच्या घोटाळ्याचा तपास वेगान सुरू…
शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्या भावानेही केली आणखी एका महिलेला मारहाण
मारहाण केल्याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..
शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी भावजयीला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असताना आणखी एक प्रकरण समोर..
शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या भावासह पुतण्याचा आणखी एक प्रताप समोर..
शेताच्या बांधाला बांध असलेल्या महिलेला केली होती लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
दोघांना मारहाण करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची दिली होती धमकी..
– शहीद रोमितच्या पार्थिवाला वडिल तानाजी चव्हाण देणार मुखाग्नी
– मुखाग्नी देण्यापूर्वी सैन्यदलातर्फे हवेत फायरिंग करुन अखेरची सलामी दिली जाणार
– वारणा नदीच्या काठावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार विधी सुरु
– गंगाबाई घाट येथील चार प्रेतांच्या अस्थी चोरीला!
– काल अंत्यसंस्कार केलेल्या चार प्रेतांच्या अस्थी चोरीला गेल्याचं नातेवाईकांचं म्हणनं
– प्रेतांच्या अस्थी नेमक्या गेल्या कुठे?
– नातेवाईक मृतकांच्या अस्थी शोधत आहेत
– जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांशी दोन हात केले
– धाडसाने, धैर्याने दहशतवाद्यांना तोंड दिले
– जो शूर धाडसी असतो तोच पुढे जातो
– वारणाकाठची परंपरा शुराची आहे
– मी शासनाच्यावतीने रोमितला आदरांजली वाहतो
– जयंत पाटील शहीद रोमित चव्हाण यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मुळगावात दाखल
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीला सुरुवात
10 जागांसाठी महविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी आहे लढत…
खा. ओमप्रकाश राजेनिंबळकर आणि आ.राणाजगजितसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला…
808 पैकी 798 मतदारांनी बजावला आहे मतदानाचा हक्क 8 टेबल वरती सुरू आहे मतमोजणी…
पुण्यात आज मागासवर्गीय आयोगाची बैठक
बैठकीला अध्यक्ष सदस्यांची असणार उपस्थिती
12 वाजता सर्किट हाऊसमध्ये बैठकीचं आयोजन,
ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरीकल डेटा गोळा करण्यासंदर्भात होणार चर्चा !
जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत पक्ष प्रवेश नको उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्यांना करावं लागणार वेट अँण्ड वॉच
आरक्षण जाहीर झाल्याशिवाय प्रवेश नको
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपचे 16 नगरसेवक प्रवेश करणार शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा दावा
मात्र तुर्तास तरी प्रवेश थांबवल्याची सूत्रांची माहिती…
-निवडणूक लांबल्याचा परिणाम,विद्यमान नगरसेवकाची मुदत संपणार
-महापालिकेची मुदत येत्या 13 मार्च अर्थात आजपासून 21 दिवसांनी संपणार आहे
-त्यापूर्वी निवडणूक होणे अपेक्षित होते मात्र अद्याप ती जाहीर झालेली नाही ,शिवाय निवडणूक जाहीर झाल्यानंतर किमान एक महिना हा मतदान प्रक्रिया पूर्ण व्हावी लागते ते 13 मार्च पूर्वी शक्य नसल्याने महापालिकेवर प्रशासक येणार हे निश्चित
– ‘आता विदर्भात लक्ष घालायला सुरुवात करतोय’
– विदर्भात शिवसेना मजबूतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत कालंच चर्चा झाली’
– ‘विदर्भात लवकरंच काही महत्त्वाचे बदल होतील’
– विदर्भात शिवसेनेच्या कोट्यातील मंत्रीपदाबाबतंही लवकरंच निर्णय होणार’
– मुख्यमंत्र्यांनी संघटनात्मक निर्णय घ्यायला सुरुवात केलीय.
– शिवसेना नेते संजय राऊत यांची ‘टीव्ही ९ मराठी’ला exclusive माहिती
24 व 25 फेब्रुवारी हे दोन दिवस पाणी पुरवठा राहणार बंद…
सिंबोरा हेडवर्क पाईप लाईन दुरुस्तीचे काम तसेच तपोवन येथील एम बी आर दुरुस्तीचे केले जाणार काम…
नेर पिंगळाई येथील बीपीटी क्रॉस कनेक्शनचे ही केले जाणार काम.
दोन दिवस पाणी जपून वापरण्याचे आवाहन…
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
मराठवाडा विभागाला मिळाले अतिवृष्टी अनुदानाचे 763 कोटी रुपये..
मागील 2 महिन्यांपासून अतिवृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रतिक्षित 763 कोटींचा निधी मिळाला..
मागील 2 महिन्यापासून मराठवाड्यातील शेतकरी होते प्रतीक्षेत..
मराठवाड्यातील 47 लाख 74 हजार 489 शेतकऱ्यांचे 35 लाख 52 हजार हेक्टरचे झाले होते अतिवृष्टीमुळे नुकसान..
– शहीद रोमित चव्हाण यांचे पार्थिव शिगावातील मुख्य चौकात दाखल
– छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठ चौकात पार्थिव गावकऱ्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवणार
– गावासह जिल्ह्यातील हजारो नागरिक अंत्ययात्रेत उपस्थित
बियर शॉपी फोडून चोरट्यांनी लांबवल्या लाखो रुपयांच्या बियर बाटल्या
औरंगाबाद जिल्ह्यातील जोगेश्वरी परिसरातील प्रकार
बियर शॉपीच्या छतावरील पत्रे उचकटून लांबवले अनेक बॉक्स
बियरचे बॉक्स पाळणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
लाखो रुपयांचे बियर बॉक्स पाळणारे चोरटे अजूनही मोकाटच
बियर शॉपी चालकाचे लाखो रुपयांचे नुकसान
देशाच्या राजकारणावर दोन नेत्यांमध्ये चर्चा
साडेचार तास के सी राव आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
राजकीय तसेच आर्थिक विषयावर दोघांच्यामध्ये चर्चा
विरोधी पक्षाने आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही
नागपूरात येऊन सर्व गोष्टींचा खुलासा करेन
या चौघांपैकी तिघांना फाशी तर एकाला जन्मठेप सुनावण्यात आलीये,
तिघे हे कोंढव्यामधील रहिवासी आहेत तर एक जण शहराच्या मध्यवस्तीत राहत होता,
2008 साली घडवलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी झाली ,28 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली
त्यामध्ये पुण्यातील मुहम्मद पिरभॉय या इंजिनिअरचाही समावेश आहे..
असिफ शेख,अकबर चौधरी,फझल रहमान खान या तिघांना फाशी
तर अनिक शेख याला जन्मठेप सुनावण्यात आलीये..
– ॲानलाईन हिवाळी परिक्षेपासून वंचित राहीलेल्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाचा दिलासा
– २२ फेब्रुवारीपासून विविध अभ्यासक्रमाच्या फेरपरिक्षा होणार
– तिसऱ्या आणि पाचव्या सत्राच्या फेरपरिक्षा उद्यापासून
– संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांना देता येणार पुन्हा परिक्षा
– बीएससी, एमएफए, एमएड, एमसीए या अभ्यासक्रमाच्या तृतीय सत्राच्या फेरपरिक्षा
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भजपला मोठे खिंडार; भाजपतील बंडखोर नेते बिज्जू प्रधानेंच्या 1 हजार समर्थकांनी दिला भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा
कोरोना पार्श्वभूमीवर शाळा होत्या बंद..
जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी काढले होते आदेश..
शहरासह ग्रामीण भागातील सर्व खाजगी व सरकारी शाळा आजपासून सुरू…
जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा दोन सत्रा मध्ये भरणार…
शाळेत स्नेहसंमेलन सह इतर कार्यक्रमावर बंदी मात्र कायम…
विद्यार्थी व शिक्षकाना मास्क,सॅनिटाईझर सह कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक…