मुंबई : आज मंगळवार 22 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळू शकतो. लालूप्रसाद यांची प्रकृती गंभीर; रुग्णालयाने दिली महत्त्वाची माहिती त्याबाबत आपल्याला आज दिवसभरात अपडेट मिळत राहिल. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळं देशातील राजकीय वातावरणं तापलेलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे. त्यापैकी दोन टप्पे पूर्ण झाले आहेत.