Maharashtra News Live Update : पुणे पालिका निवडणुकीच्या आधी भाजपनं विकासकामांचा लावला धडाका

| Updated on: Feb 26, 2022 | 12:13 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : पुणे पालिका निवडणुकीच्या आधी भाजपनं विकासकामांचा लावला धडाका
breaking
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आज शुक्रवार 25 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. रशियाकडून जोरदार हल्ले सुरुच, यूक्रेनमध्ये काय घडतंय? अमेरिकेसह नाटोची भूमिका काय?, त्याचबरोबर नवाब मलिकांना (nawab malik) ईडीने ताब्यात घेतल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीकडून होणारी आंदोलनं, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकाबाबत घडत असलेल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण आज दिवसभरात पाहणार इथं पाहणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Feb 2022 09:30 PM (IST)

    पुणे पालिका निवडणुकीच्या आधी भाजपनं विकासकामांचा लावला धडाका

    पालिका निवडणूकीच्या आधी भाजपनं विकासकामांचा लावला धडाका,

    तब्बल 2 हजार 500 कोटीच्या विकासकामांना स्थायी समितीनं दिली मान्यता,

    नदीसुधार प्रकल्पाला 1473 कोटीच्या कामाला केंद्र सरकार देणार 85 टक्के अनुदान तर 15 टक्के महापालिका करणार

    पुण्यात 100 टक्के मैलापाण्यावर होणार शुद्धीकरण 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बसवली जाणार

    स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती,

    राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपनं आखली व्यूहरचना विकासकामांचा धडाका !

  • 25 Feb 2022 08:23 PM (IST)

    सारथी संस्थेची पदप्रक्रीया महिनाभरात पूर्ण करा, मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय

    छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं घेतला निर्णय

    सारथी संस्थेची पदप्रक्रीया महिनाभरात पूर्ण करा,

    वसतिगृह सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी न्यायालयाकडे पाठपुरावा करा,

    अण्णासाहेब पाटील महामंडळातील संचालकांची रिक्त पद लवकरच भरली जाणार,

    काल वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय,

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एस ईबीसीच्या आरक्षणसंदर्भात आयोजित केली बैठक त्या बैठकीत होणार विद्यार्थ्यांचा निर्णय


  • 25 Feb 2022 07:23 PM (IST)

    मिळालेल्या संधीची माती करणार असाल तर कपाळ करंटे आहात : उद्धव ठाकरे

    पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र  सोडला तर इतर राज्यात यंत्रणांना काम नाही का?

    गुजरातमधील घोटाळा, तिकडं ड्रग्ज सापडलं तर काय, महाराष्ट्रात चिमूटभर सापडल तरी कारवाई

    महाराष्ट्र आधार भारताचा आहे, असं सेनापती बापट यांनी सांगितलं

    धाडीमागून धाडी सुरु आहेत, प्रत्येकाचे दिवस येत असतात

    संधी सर्वांना चालून येते, संधीचं सोनं करायचं की माती करायची?

    मिळालेल्या संधीची माती करणार असाल तर कपाळ करंटे आहात

    महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रकल्पांची घोषणा होईल

    मराठी भाषा ही तुमची आमची नसून ती छत्रपती शिवाजी महाराजांची मातृभाषा आहे.

    कोरोनाच्या बरोबर या पक्षांमध्ये विकृतीची साथ आलीय

    कोरोना काळात महाराष्ट्रात उत्तम काम झालं, त्यातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताय तर शोधा काय शोधताय

    आघाडीच्या काळात देशाची प्रगती झाली हे मान्य

    स्वबळावर सत्ता मिळवणं ही प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाची भूमिका असली पाहिजे

    मात्र, महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कोणत्याही पक्षाला स्वबळावर सत्ता मिळेल असं चित्र नाही

    शिवसेनेची सर्व गावांमध्ये शाखा असायला हवी

    शिवसेनेशिवाय पुढे जाता येणार नाही, अशी स्थिती असायला हवी

     

  • 25 Feb 2022 07:20 PM (IST)

    सर्व काही तुम्हाला हवंय, तर आम्ही धुणी भांडी करायची का? उद्धव ठाकरे

    देशही तुम्ही जिंकलत, राज्यही जिंकलत, सोसायट्या, ग्रामंपचायत ही तुम्हाला हवीय, मग आम्ही काय धुणी भांडी करायची आहेत.

    अनेक राज्यात बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेमी आहेत.

    आम्ही त्यांच्यावर अन्याय केला, निवडणूक लढू दिली नाही

    काहीजण दुसऱ्या पक्षात गेले, तिकडे मंत्री झाले, आता नवी पिढी आहे.

    कोणाच्याच म्हणण्याला अर्थ नसतो

    माझी आदित्य सारखी सुरुवात होती, आमच्यावर राजकारण लादलेलं नाही, घरात जन्मापासून जे वारे होते, ते अंगात भिनतात

    तु माझा मुलगा आहेस म्हणून जनतेवर आणि शिवसैनिकांवर लादणार नाही, असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं

    आता आदित्य ठाकरे त्याच्या मार्गानं पुढं जात आहे.

    शिवसेनेचा स्वभाव बदलला, पिढीप्रमाणं बदल होतात. मात्र, शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडणार नाही.

    जनतेची समाज सेवा करणार आमची सहावी पिढी आहे

     

  • 25 Feb 2022 06:46 PM (IST)

    यशवंत जाधव यांच्या घराबाहेरच्या हालचाली वाढल्या

    यशवंत जाधव यांच्या घराबाहेरच्या हालचाली वाढल्या

    इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी थोड्याच वेळात जाधव यांच्या घरातून बाहेर येण्याची शक्यता

    मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी

    सकाळपासूनच आयकर विभागाची टीम यशवंत जाधव यांच्या घरी

  • 25 Feb 2022 06:05 PM (IST)

    नवाब मलिकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नाही, सूत्रांची माहिती

    नवाब मलिकांना युरोलॉजी विभागात केलं भरती,

    किडनी विकाराचा त्रास असल्याची माहिती,

    नवाब मलिकांना डिस्चार्ज मिळणार नसल्याची सूत्रांची माहिती

    या आधी नवाब मलिकांची किडनी विकारासंदर्भात तपासणी झाल्याची माहिती …

  • 25 Feb 2022 04:40 PM (IST)

    एसटी विलीनीकरणावर 11 मार्चला सुनावणी

    कष्टकरी कर्मचाऱ्यांना भेटायला वेळ नाही सरकारला आणि दाऊद सोबत संबंध असलेल्या मंत्र्याला अटक झाली आणि हे आक्रमक झाले

    कमिटी स्थापन करण्यात आली आहे असे सांगून तुम्ही काय केले कष्टकरी शांततेनं आंदोलन करत आहेत

    आज न्यायालयात सांगितले अहवाल स्पष्ट करा विलीनीकरण ही मागणी केली या बाबतीत 2 आठवड्याची वेळ दिला

    कर्मचार्यांची मानसिकता ठिक नाही मेंटल हेल्थ ‌अॅक्ट मांडला आहे .

    11 तारखेला पुढील सुनावणी

  • 25 Feb 2022 04:34 PM (IST)

    गुणरत्न सदावर्ते आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीला

    गुणरत्न सदावर्ते आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील कर्मचाऱ्यांच्या भेटीला दाखल

    एसटी कर्मचाऱ्यांच्या घोषणा विलीनीकरण झालं च पाहिजे

  • 25 Feb 2022 03:10 PM (IST)

    मुंबई हायकोर्टात एस टी विलीनीकरणावर युक्तिवाद

    मुंबई हायकोर्टात एसटी विलीनीकरणाच्या याचिकेवर युक्तिवाद करण्यात येतोय. हायकोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

    एसटी विलीनीकरणाचा अहवाल जाहीर करता येणार नाही, अशी माहिती राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे.

    वकिलांच्या अहवाल देण्याच्या मागणीवर राज्य सरकारनं हे म्हटलंय

    अहवालाला राज्य मंत्रिमंडळाची परवानगी आवश्यक असल्याचं मत राज्य सरकारच्यावतीनं मांडण्यात आलं आहे.

  • 25 Feb 2022 02:32 PM (IST)

    अमरावती मनपा आयुक्त शाईफेक प्रकरण, रवी राणा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करणार

    -अमरावती मनपा आयुक्त शाईफेक प्रकरण

    -आमदार रवी राणा दुपारी३.३०वाजता अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी करणार अर्ज…

    -रवी राणा सध्या आहे ट्राझिंट बेलवर

    -तिन दिवसाच्या आत रवी राणा यांना अटक पूर्व जामीन मिळाला नाही तर त्यांना पोलीस करणार अटक

    -रवी राणा यांना अटक पूर्व जामीन मिळणार का याकडे लक्ष …

  • 25 Feb 2022 01:41 PM (IST)

    नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ बारामतीत रास्तारोको.

    – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर तीव्र पडसाद उमटत आहेत. आज पुणे जिल्ह्यातील बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी भाजप विरुद्ध घोषणा देखील देण्यात आल्या. यावेळी शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.

  • 25 Feb 2022 01:24 PM (IST)

    रशिया-युक्रेन युद्धाची सर्वात मोठी बातमी

    रशियाचं सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल

    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचा सर्वात मोठा दावा

    96 तासात रशिया युक्रेनवर ताबा मिळवेल- जेलेन्स्की

    ‘बंकरमध्ये लपा, युक्रेनचं नागरिकांना आवाहन’

  • 25 Feb 2022 01:22 PM (IST)

    मनसेचा वर्धापनदिन यावेळी पुण्यात होणार

    – ९ मार्चला मनसेचा वर्धापनदिन

    – पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात वर्धापनदिनाचे आयोजन,

    – मनसेचा वर्धापनदिन पहिल्यांदा मुंबई बाहेर होणार,

    – राज्यभरातील मनसे पदाधिकारी वर्धापनदिनासाठी मोठ्या संख्येने पुण्यात येणार

  • 25 Feb 2022 01:21 PM (IST)

    युक्रेनमघ्ये विमान जाण्याची स्थिती निर्माण झालीय की विमान पाठवली जाईल – नितीन राऊत

    – युक्रेनमघ्ये विमान जाण्याची स्थिती निर्माण झालीय की विमान पाठवली जाईल

    – नागपूर विदर्भातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत

    – काल राजनाथ सिंह शी बोललो

    – सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट तयार होतेय, त्यांना परत आणणार

  • 25 Feb 2022 01:19 PM (IST)

    जनसंवाद यात्रेत प्रश्न सोडवण्याचं काम अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू करत आहेत

    अकोला : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील जनसवांद यात्रेला सुरूवात….

    अकोला जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांमुळे बाधित गावांमधील नागरिकांचे पुनर्वसन व त्यांना नागरी सुविधा पुरविण्याबाबत या जनसंवाद यात्रेत उपाययोजना केल्या जाणार आहेत…..

    या जनसंवाद यात्रेत अनेकांच्या तक्रारी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू करत आहेत…..

    “घंटोका काम मिंटोमे” त्यांनी आज नायक चित्रपटतील अनिल कपूर यांची भूमिका साकारली आहे……

  • 25 Feb 2022 01:17 PM (IST)

    अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन.

    अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन….
    कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन….
    राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन….

  • 25 Feb 2022 01:16 PM (IST)

    राज्य सरकार विरोधात विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोर अभावी चे आंदोलन…

    विद्यापीठातील कायद्यातील काळ्या बदलांच्या विरोधात छात्र आसूड आंदोलन..

    बंडी वर शिक्षण मंत्री यांचा मुखवटा लावून केला निषेध..

    विद्यापीठाच्या स्वायत्तेवर नियम नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत असल्याचा आरोप…

    राज्य सरकार विरोधात विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी…

  • 25 Feb 2022 01:09 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या पुणे दौऱ्याला महाविकास आघाडी विरोध करणार

    मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महा विकास आघाडी पुणे शहरात गो बॅक मोदी कॅम्पेन राबवणार

    यासाठी महाविकास आघाडीची दोन दिवसात होणार बैठक

    राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती

  • 25 Feb 2022 12:57 PM (IST)

    वयोश्री २०२१ योजनेचा नागपुरात फायदा होणार – नितीन गडकरी

    – भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत वयोश्री २०२१ योजना

    – वयोश्री २०२१ योजनेचा नागपुरात
    फायदा होणार

    – ज्येष्ठ नागरीकांसाठी या योजनेत फायदा होईल

    – अपंगत्व वाट्याला आलेले, आणि दिव्यांगासाठी ही योजनेचा लाभ

    – या योजनेच्या यशासाठी सर्वांचं सहकार्य गरजेचं

    – व्हीलचेअर तीन चाकी, वॅाकिंग स्टीक, ब्रेल स्लेट, श्रवणयंत्र, चष्मे,
    अशा ५० प्रकरणं आहेत

    – ही उपकरण मोफत देणार

    – लोकसंख्येच्या १० टक्के अशी लोक, नागपूर जिल्ह्यात ज्येष्ठ आणि दिव्यांगांची लाखात संख्या

    – वय ६० असण्याचा वयाचा दाखला, उत्पन्न १५ हजार असलेला दाखला

  • 25 Feb 2022 12:55 PM (IST)

    ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ राजू शेट्टी यांच्या भेटीला

    ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ राजू शेट्टी यांच्या भेटीला

    महावितरण विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सोडवण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांचा मध्यस्थीचा प्रयत्न

    महावितरणकडे वेगवेगळ्या मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून राजू शेट्टी यांचं महावितरण कार्यालयाबाहेर सुरू आहे धरणे आंदोलन

  • 25 Feb 2022 12:47 PM (IST)

    ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ राजू शेट्टी यांच्या भेटीला

    महावितरण विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सोडवण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांचा मध्यस्थीचा प्रयत्न

    महावितरणकडे वेगवेगळ्या मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून राजू शेट्टी यांचं महावितरण कार्यालयाबाहेर सुरू आहे धरणे आंदोलन

  • 25 Feb 2022 12:42 PM (IST)

    यशवंत जाधव राहत असलेल्या परिसरातील दुकाने ठेवली बंद

    यशवंत जाधव यांच्या घरी झालेल्या छापेमारीनंतर माझगांव इथे व्यापार्यांनी दुकाने ठेवली बंद…

  • 25 Feb 2022 12:41 PM (IST)

    कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडी ने अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन

    कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडी ने अटक केल्याच्या निषेधार्थ आज वसई मध्ये महाविकास आघाडी च्या वतीने तीव्र निषेध आंदोलन छेडले आहे.

    केंद्र सरकारचा निषेध असो, महाविकास आघाडीचा विजय असो, अशा घोषणा देत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.

    महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वसई रोड पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात आज सकाळी साडे आकाराच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले आहे.

    महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले तेव्हा पासून, भाजपा सरकार सैरभैर झाले आहे. केंद्रीय एजन्सी चा वापर करून, खोटेनाटे आरोप करत या सरकार ला बदनाम करण्याचे काम करत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला आहे.

    भाजपातील सर्व चांगले आणि इतर पक्षातील सर्व भ्रष्ट अशी प्रतिमा तयार करून, भाजपा सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप ही यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी केला आहे.

  • 25 Feb 2022 12:22 PM (IST)

    किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांची सेशन कोर्टात एंटिसिपेटरी बेलसाठी धाव…

    – आज न्यायधिश नसल्याने सोमवारी होणार सुनावणी…

    – इओडब्यूने कोर्टात माहीती दिली की आमचा तपास सुरू आहे, अद्याप एफआयआर दाखल झाला नाहीये…

    – सोमवारी यावर पुन्हा होणार सुनावणी

  • 25 Feb 2022 12:21 PM (IST)

    आदिवासी महिलांना मनसेने केलं कूकर वाटप

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदिवासी महिलांना कुकर वाटप केले

    राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी कुकर वाटप कार्यक्रम फ्लाय फाउंडेशन ने आयोजित केला होता

  • 25 Feb 2022 12:11 PM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यातील चार विद्यार्थी युक्रेन मध्ये असल्याची माहिती.

    रत्नागिरी जिल्ह्यातील चार विद्यार्थी युक्रेन मध्ये असल्याची माहिती….

    विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता…

    रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती…

    मदतीसाठी रत्नागिरी जिल्ह्याधिकारी कार्यालयात सुरू केला सहायता कक्ष…

  • 25 Feb 2022 12:10 PM (IST)

    भाजप नगरसेविका हेमलता कांडेकर यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

    भाजप नगरसेविका हेमलता कांडेकर यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

    आयुक्त कैलास जाधव यांच्या कडे केला राजीनामा सुपूर्द

    कांडेकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

  • 25 Feb 2022 12:09 PM (IST)

    यंत्रणा चौकटीत काम करते – महापौैर

    यंत्रणा चौकटीत काम करते

    यशवंत जाधवांच्या घरी मुंबईच्या महापौर दाखल

    मुलगा निखिल जाधव याच्याही घरावर धाड

    शिवसेना कार्यकर्त्यांकडून कोणतही कृत्य घडू नये म्हणून मी त्या ठिकाणी आले आहे

    यशवंत जाधव हे धाडीला ते मदत करीत आहे

    ज्या पध्दतीने यंत्रणांचा वापर केला जातोय, त्यामुळे आम्ही घाबरणार नाही.

    भाजपाचे सगळे नेते दुधके धुले आहेत का ?

    यशवंत जाधव सक्षम आहेत, उत्तर द्यायला

  • 25 Feb 2022 11:32 AM (IST)

    अमरावतीत खाजगी बस नाल्यात पलटी…..

    अमरावतीत खाजगी बस नाल्यात पलटी…..

    काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती…..

    अमरावती वरून मोर्शी मार्गे मध्यप्रदेश मध्ये जात होती बस….

    सुदैवाने जीवित हानी नाही…सर्व प्रवासी सुखरूप…..

    बस मध्ये 40 पेक्षा अधिक होते प्रवासी….

    अमरावती -नागपूर महामार्गावरील अर्जुन नगर परिसरातील घटना…

  • 25 Feb 2022 11:31 AM (IST)

    नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला दणका

    भाजपच्या माजी उपमहापौरांसह 4 ते 5 भाजप नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार

    मुंबईत वर्षा बंगल्यावर करणार शिवसेनेत प्रवेश

    आज संध्याकाळी होणार पक्ष प्रवेश सोहळा

    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेचं भाजपवर सर्जिकल स्ट्राईक

  • 25 Feb 2022 11:31 AM (IST)

    केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात नांदेडमध्ये धरणे आंदोलन सुरू

    केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात नांदेडमध्ये धरणे आंदोलन सुरू

    महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शहरातील आय टी आय इथे आंदोलनाला सुरवात

    आंदोलनात आमदार मोहन हंबर्डे,अमर राजूरकर, यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी

  • 25 Feb 2022 11:30 AM (IST)

    बीड जिल्हाधिकारी कचेरी कार्यालय परिसरात गोळीबार

    बीड: जिल्हाधिकारी कचेरी कार्यालय परिसरात गोळीबार

    गोळीबारात दोन जण जखमी

    जिल्हाधिकारी कचेरी परिसरातील मुद्रांक विभागासमोर गोळीबार

    पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती

    गोळीबार करणारे फरार

    घटनास्थळी पोलीस दाखल

    गोळीबारातील जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

    बबन क्षीरसागर आणि फारूक सिद्दीकी गोळीबारातील जखमीचे नाव

  • 25 Feb 2022 11:29 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आदिवासी महिलांना कुकर वाटप करण्यात येणार आहे..

    मुंबईतील पवईच्या आदिवासी महिलांना शर्मिला राज ठाकरे अमित राज ठाकरे आणि रीटा गुप्ता यांच्या हस्ते प्रेशर कुकर वाटण्याच कार्यक्रम फ्लाय फाउंडेशन आयोजित केला आहे.

  • 25 Feb 2022 11:23 AM (IST)

    श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे चोरट्यांनी धुमाकूळ

    श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे चोरट्यांनी धुमाकूळ

    चोरट्यांनी एका पतसंस्थेसह सात दुकाने फोडली

    तर पतसंस्थेतील ९५ हजार ४३६ रुपयांची रोकड चोरट्यांनी केली लांपास

    चोरी करतांना चोरटा cctv कैद

    चोरट्यांनी काष्टी येथील विजय रंधवे यांचे दुकान फोडले. येथील मातोश्री हॉस्पिटलशेजारील मेडिकल, वसंतराव मोरे यांचे साई सुपर शॉपी, संदीप जाधव यांचे साई ट्रेडर्स चोरांनी फोडले.

    श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 25 Feb 2022 11:19 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील आठ विद्यार्थी युक्रेन मध्ये असल्याची माहिती….

    अमरावती जिल्ह्यातील आठ विद्यार्थी युक्रेन मध्ये असल्याची माहिती….

    विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता…

    जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती…

    मदतीसाठी अमरावती जिल्ह्याधिकारी कार्यालयात सुरू केला सहायता कक्ष…

  • 25 Feb 2022 11:18 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांमध्ये दम नसल्याने ते संजय राऊतला पुढे लावतात – किरीट सोमय्या

    किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद
    डर्टी डजनमध्ये शिवसेनेचे अनेक नेते
    मुख्यमंत्र्यांमध्ये दम नसल्याने ते संजय राऊतला पुढे लावतात
    सगळे पैसे परदेशात असल्याने ईडीला मी विनंती केली आहे
    25 घोटाळे तर मी काढणार आहे
    मुख्यमंत्र्यांच्या 19 बंगल्याबाबत काही दिवसात आम्ही जनहीत याचिका दाखल करणार
    संजय राऊतने 100 कोटींचं कॉन्ट्रक्ट दिलं

  • 25 Feb 2022 10:33 AM (IST)

    खुणाच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी झाला पसार

    गोंदियाच्या आमगाव पोलिस ठान्यातुन खंडनी आणि खुणाच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी झाला पसार आरोपीचे नाव दुर्गाप्रसाद हरिंखेडे आज सकाळी ओरोपीला सौचालया करिता लॉक अप मधुन बाहेर काढल्यावर पोलिंसाच्या हातावर तुरी देत पडाला आरोपी दोन दिवसा आधी याच आरोपीने आमगाव शहराला लागुन असलेल्या बनगावातिल १७ वर्षीय चेतन खोब्रागडे या तरुणाचे अपहरन करित केले होती हत्या १० लक्ष रुपयाची खंडनी करिता केली होती मागणी ..

  • 25 Feb 2022 10:32 AM (IST)

    औरंगाबादेत महविकास आघाडीचे आंदोलन सुरू

    औरंगाबादेत महविकास आघाडीचे आंदोलन सुरू

    नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू

    तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी

    औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात आंदोलन सुरू

  • 25 Feb 2022 10:21 AM (IST)

    नवाब मलिक यांच्यावरील कारवाई विरोधात कागलमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने

    नवाब मलिक यांच्यावरील कारवाई विरोधात कागलमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने

    ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

    कागलच्या गैबी चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटले

    काळे झेंडे दाखवत ed चा निषेध

  • 25 Feb 2022 10:12 AM (IST)

    राज्यभरातून मराठा समन्वयक आझाद मैदानावर जमणार

    छत्रपती संभाजीराजेंना साथ द्यायला आम्ही निघाले मुंबई आझाद मैदानाकडे

    मराठा समाजाच्या न्याय हाक्काच्या प्रमुख मागण्या मान्य करुन अंमलबजावणी झालीच पाहीजे

    आता ठरलं तर आझाद मैदान सोडायचं नाय. कार्यकर्त्यांची भूमिका

    राज्यभरातून मराठा समन्वयक आझाद मैदानावर जमणार

    उद्या मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे बसणार उपोषणाला …

  • 25 Feb 2022 10:11 AM (IST)

    सत्तेत येण्याची घाई यांना झालेली आहे – यशोमती ठाकूर

    केंद्राच्या एजन्सीचा दुरुपयोग करत आहे.

    सत्तेत येण्याची घाई यांना झालेली आहे..

    दमडाटी करून यांना सत्तेत यायचं आहे.महाविकास आघाडी सरकार ला हे आव्हान देत आहे..

    सत्तेच्या लालसेपोटी सर्व हे करत आहे.

  • 25 Feb 2022 10:10 AM (IST)

    मंत्री यशोमती ठाकूर यांची खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका 

    ते चिल्लरगिरी करत असतात.

    आम्ही वडिलोपार्जित जमिनी विकून राजकारण केलं आहे.

    त्यामुळे जमिनीचे गैरव्यवहार कोणाचे आहे हे त्यांनीच बघावे.

    मंत्री यशोमती ठाकूर यांची खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका

  • 25 Feb 2022 09:41 AM (IST)

    शिवसेनेचे हे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत, किरीट सोमय्यांची माहीती

    शिवसेनेचे हे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत, किरीट सोमय्यांची माहीती

    आमदार प्रताप सरनाईक

    परिवनह मंत्री अनिल परब

    खासदार भावना गवळी

    आनंदराव अडसूळ

  • 25 Feb 2022 09:30 AM (IST)

    किरीट सोमय्यांचा य़शवंत जाधवांवर आरोप

    किरीट सोमय्यांचा य़शवंत जाधवांवर आरोप – असा झाला घोटाळा –
    यशवंत जाधव यांनी मनपाच्या टेंडरमधून मिळालेले 15 कोटींचं रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग केलंय,
    य़शवंत जाधवांनी १५ कोटी रुपये रोख स्वरुपात मनी लॉण्ड्रिंग करणाऱ्या मास्टरमाईंड उदय शंकर महावारला दिल्याचा आरोप…
    हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले.
    या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला… हे सर्व व्यवहार बोगस होते.
    त्यानंतर हे 15 कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे हलवले.
    त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

  • 25 Feb 2022 09:28 AM (IST)

    यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं उघडं

    यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आलं असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांबरोबरच्या व्यवहारातून पैसे कमवल्याचा आरोप आहे. यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख, मात्र तपासात ही शेल कंपनी असल्याचं उघड. यामिनी जाधव यांनी कर्ज घेतल्याचं दाखवलेलं आहे पण हा पैसा कर्जाचा नाही तर त्यांचाच असल्याचं आयकर विभागाचं म्हणण आहे.

  • 25 Feb 2022 09:25 AM (IST)

    य़शवंत जाधव राजकीय कारकीर्द

    1. १९९७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड
    2. २००७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले
    3. २००८: बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षपदी निवड
    4. २०११ नंतर: उपनेते, शिवसेना
    5. २०१७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवड
    6. २०१७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत सभागृह नेते म्हणून नियुक्ती
    7. २०१८: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड , एप्रिल २०१८ पासून यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्ष आहेत , ही स्थायी समिती अध्यक्ष पदाची त्यांची ३ टर्म आहे

  • 25 Feb 2022 09:09 AM (IST)

    वन जमिनीच्या माध्यमातून आदिवासी शेतकरयांची उन्नती जरूर होणार

    गडचिरोली -शेतकऱ्यांनी संधीचे सोने करावे आमदार धर्मराव बाबा आत्राम मी प्रयत्न करून एटापल्ली तालुक्यातील सर्व आदिवासी यांना वन हक्क पट्टे मिळवून दिले,

    या वन जमिनीवर खूप प्रयत्न करून शेतकऱ्यांनी शेतीचा फायदा घ्यावा

    सध्या गडचिरोली जिल्ह्यात मिरचीची शेती कापसाची शेती व भाजीपाला खुप लाभ देणारी शेती ठरलेली आहे

    वन जमिनीच्या माध्यमातून आदिवासी शेतकरयांची उन्नती जरूर होणार

    एटापल्ली तालुक्यातील जवळपास आठ गावात मध्ये वन हक्क पट्टे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले

  • 25 Feb 2022 08:59 AM (IST)

    पुण्यात ओबीसी व्हिजेएनटीजन मोर्चाची महत्वाची बैठक

    आज पुण्यात ओबीसी व्हिजेएनटीजनमोर्चा ची महत्वाची बैठक

    तर मुंबईत विजय वडेट्टीवार हे पण करणार आज नवीन संघटणीची घोषणा

    वडेट्टीवार यांच्या नियोजित ओबीसी संघटनेशी व्हिजेएनटी जनमोर्चाचा संबंध नाही

    ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची माहिती

    नव्या संघटनेवरून वडेट्टीवार यांच्यावर इतर ओबीसी नाराज

    ओबीसी व्हिजेएनटी जन मोर्चाला प्रत्येक मेळाव्याला वडेट्टीवार असायचे हजर

    व्हिजेएनटी जनमोर्चा वडेट्टीवार यांच्यापासून संघटना पातळीवर कायमची फारकत घेणार

  • 25 Feb 2022 08:49 AM (IST)

    यशवंत जाधव यांच्या खात्यात २ कोटींचं ट्रांसमक्शन संशयाच्या भोवऱ्यात

    ब्रेक – यशवंत जाधव यांच्या खात्यात २ कोटींचं ट्रांसमक्शन संशयाच्या भोवर्यात….

    पत्नी यामिनी जाधव यांच्या खात्यात प्रत्येकी एक कोटींचे ट्रांसमक्शन ,

    मुलगा निखिल जाधव यांच्या खात्यात ५० लाख,

    मुलगा यतिन जाधव यांची कंपनी शौरुप ट्रेडिंग प्रा. लिमिटेडच्या खात्यातून ३ कोटींचा गैरव्यवहार

    टेसिडा कंपनीतून २ कोटी, आणि

    नातेवाईंकाच्या एका बेनामी कंपनीत ५ कोटी रुपयांचा व्यवहार आयटीच्या रडारवर…

    हे सगळे पैसे युएईला ट्रांसफर झाल्याचा आरोप,

    मनपाला लुटणेयाचं काम केल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप… या प्रकरणाच्या दोन महिन्यापुर्वी तक्रारी दिल्या होत्या…

  • 25 Feb 2022 08:40 AM (IST)

    यशवंत जाधव यांच्या घरी तपास पथक पोहोचलं

    शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी तपास पथक पोहोचलं आहे. सीआरपीएफ जवानांसह पथक त्यांच्या घरी दाखल झालं आहे. ईडीने ही कारवाई केली नसल्याचा दावा केला आहे, त्यामुळे ही इन्कम टॅक्स विभागाची धाड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना नेते असल्याचं चित्र आहे

  • 25 Feb 2022 08:28 AM (IST)

    यशवंत जाधव प्रकरणाचा किरीट सोमय्यांकडून पाठपुरावा

    यशवंत जाधव यांच्या प्रकरणाता किरीट सोमय्याच पाठपुरावा करत आहेत, आयटी अणि इडीकडे केलीये तक्रार…

    यशवंत जाधव यांनी मनपात कांट्रक्टरांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचं मनी लाॅन्ड्रींग केल्याचा इडीला संशय..

    या पैशांचे व्यवहार थेट मातोश्रीपर्यंत असल्याचा किरीट सोमय्यांचा दावा…

    यशवंत जाधव यांच्या निकटवर्तीयांचे अनेक खाते इडीच्या रडारवर…

    कांट्रॅक्टरांकडून प्रत्येक टेंडरमध्ये ४० टक्के रक्कम जमवल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप…

  • 25 Feb 2022 08:27 AM (IST)

    -पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा शनिवारी

    -पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा शनिवारी शहरात

    -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची परिवार संवाद यात्रा उद्या शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत

    -यात्रेत पाटील शहरातील पदाधिका-यांशी संवाद साधतील. पक्ष संघटनेचा आढावा घेतील. कार्यकर्त्यांना अडचणी जाणून घेऊन आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत

    -प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर मार्गदर्शन करणार आहे

    -आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न

  • 25 Feb 2022 08:27 AM (IST)

    1818 भीमा कोरेगाव वास्तचे लेखक रोहन माळवदकर याची हायकोर्टात धाव

    पुस्तक आल्यापासून वारंवार जीवेमारण्याच्या धमक्या येत होते जीवितास धोका असल्यामुळे हायकोर्टात मध्ये याचिका दाखल

  • 25 Feb 2022 08:26 AM (IST)

    नाशिक विभागाकडून 30 लाखांचा 335 किलो गांजा जप्त

    नाशिक विभागाच्या पथकाने धुळे जिल्ह्यात केली कारवाई 30 लाखांचा 335 किलो गांजा जप्त धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई तीन संशोधन विरोधात पोलिसात गुन्हा दाखल दोंडाईचा येथे झाली कारवाई

  • 25 Feb 2022 08:26 AM (IST)

    अनारक्षित रेल्वेतून पासधारकांना परवानगी

    मध्य रेल्वेने आत पासधारकांना पंचवटी एक्सप्रेससह अनारक्षित पॅसेंजर व मेमू व डेमू पॅसेंजर रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यास परवानगी दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.मात्र इतर आरक्षित गाड्यांमधून प्रवास केल्यास विनाटिकीट समजले जाणार असल्याने पासधारकांत नाराजी पसरली आहे.सर्व गाड्यांना पासधारकांना प्रवास करण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही प्रवाशी वर्गातून होत आहे.तसेच उत्तर महाराष्ट्राची जीवन वाहिनी समजल्या जाणारी गोदावरी एक्स्प्रेस बंदच आहे. अत्यल्प प्रवाशी संख्येचे कारण पुढे करून मनमाड- कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस बंद होणार असल्याच्या वृत्ताने प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

  • 25 Feb 2022 08:24 AM (IST)

    नाशिकमध्ये चोरट्याने 6 तोळ्याची चैन खेचून पोबारा केला

    नाशिक – अंबड परिसरातील ओम कॉलनीत चेन स्नॅचिंग ची घटना

    चोरांनी खेचली महिलेच्या गळ्यातील 6 तोळ्यांची सोन्याची चेन

    चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरांचा नागरिकांनी केला पाठलाग

    चोरटे झाले फरार

    नागरिकांनी केलेला पाठलाग सीसीटीव्ही कॅमेरात कैद

    पोलीसंकडून आरोपीचा शोध सुरू

  • 25 Feb 2022 08:22 AM (IST)

    अहमदनगरमध्ये दोन चंदनतस्करांना केली अटक

    कोतवाली पोलीसांनी सुगंधीत चंदनाची चोरी करणाऱ्या दोन चंदनतस्करांना केली अटक

    तर त्यांच्याकडून एकूण 18 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

    सुभाष दिलवाले आणि राजेंद्र सासवडे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं

    तब्बल 370 किलो चंदनाचे लाकूड केल हस्तगत

  • 25 Feb 2022 08:21 AM (IST)

    विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी, शाळेत वाचनवेड उपक्रम राबविला

    -पुण्यातील वाचनवेड संस्था आणि देहू अभंग प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आंदर मावळातील 24 शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके देण्याचा स्तुत्य उपक्रम भोयरे जिल्हा परिषद शाळेत पार पडला

    -प्रबोधनात्मक, चरित्रात्मक, पर्यावरणपूरक, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणाऱ्या पुस्तकांचा यात विशेष समावेश होता

    -विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी आणि त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हे वाचनवेड संस्थेचे मुख्य उद्धिष्ट असल्याने ग्रामीण भागातील शाळेत वाचनवेड उपक्रम राबविला जातोय

  • 25 Feb 2022 08:18 AM (IST)

    मनसे नेत्यांची मुंबईत पार पडली बैठक

    नाशिक – मनसे नेत्यांची मुंबईत पार पडली बैठक

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून कानपिचक्या

    पूर्ण ताकदीने निवडणुकांना समोर जा

    राज ठाकरे यांचे नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना आदेश

    पक्ष सोडून जाणाऱ्यांची गय केली जाणार नाही

    ‘ज्यांना जायचं त्यांनी आताच जा’

    राज ठाकरे यांनी केली कानउघडणी

    170 इच्छुकांची यादी राज यांच्याकडे सादर

    राज ठाकरे लवकरच नाशिक दौऱ्यावर येणार

  • 25 Feb 2022 07:46 AM (IST)

    अकोला पालकमंत्री बच्चू कडू यांची आज जनसंवाद यात्रा मूर्तिजापूर तालुक्यात….!

    अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांची आज जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यात संवाद यात्रा येत असून यात जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांमुळे बाधित गावांमधील नागरिकांचे पुनर्वसन व त्यांना नागरी सुविधा पुरविण्याबाबत या जनसंवाद यात्रेत उपाययोजना केल्या जाणार आहेत…या यात्रे दरम्यान पालकमंत्री कडू हे पोही लंघापूर, माना, जांभा व रोहणा येथील  पुनर्वसन होत असलेल्या जागांची  व नागरी सुविधांची पाहणी करतील…मौजे जांभा येथील नागरिकांसमवेत चर्चा व समस्या निराकरण करुन  नागरिकांना ताबा पावती व भुखंड वाटप, तसेच रेशनकार्ड वाटप, विविध आवश्यक प्रमाणपत्रांचे वाटप, शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देणे…पुनर्वसित गावांमध्ये कामगार नोंदणी,  आधार नोंदणी, सात बारा उतारे, आठ अ इ. उतारे,  राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ देणे, महिलांसाठी आरोग्य तपासणी, रक्ततपासणी इ. सुविधा देण्यात येणार आहेत….!

  • 25 Feb 2022 07:45 AM (IST)

    मित्राच्या निधनाने व्याकूळ झालेल्या तरुणांने संपविले जीवन

    आठ दिवसांपूर्वी आजाराने मृत्यू झालेल्या मित्राच्या विरहामुळे सोबतच्या मित्रांनी केली आत्महत्या..

    घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या..

    मला माझा मित्र बोलवत आहे मला त्याच्याकडे जायचं आहे असा हा युवक वारंवार असे बोलत..

    चेतन दिलीप बनस्वाल असे युवकाचे नाव..

  • 25 Feb 2022 07:44 AM (IST)

    900 पदांची औरंगाबाद महानगरपालिकेत होणार जम्बो भरती..

    दोन महिन्यात सुरू होणार महापालिकेची नोकरभरती..

    900 पदांची औरंगाबाद महानगरपालिकेत होणार जम्बो भरती..

    येत्या दोन महिन्यात होणार भरती प्रक्रिया..

    मनपा निवडणूक जाहीर झाल्यास भरती प्रक्रियेला होऊ शकतो विलंब..

    प्रशासकांच्या मंजुरीने बिंदूनामावलीचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवला जाणार शासनाच्या मागासवर्गीय आयोगाकडे..

    100 पेक्षा जास्त जणांना दिली जाणार पदोन्नती..

  • 25 Feb 2022 07:40 AM (IST)

    कापडणीस दुहेरी हत्या प्रकरण

    आरोपी राहुल जगताप ला आज न्यायालयात करणार हजर

    पोलिसांकडून हत्येचा पूर्ण तपास

    खून कसा केला याचा झाला उलगडा

    पोलिसांनी संशयितांकडून केला क्राईम सिन

    शांत डोक्याने राहुल जगतापने दोन्ही खून केल्याची दिली कबुली

    खून करून शेअर्स ची केली विक्री

    मृतदेहांचे मोबाईल फेकले ठाण्याच्या खाडीत

    न्यायालयाच्या आजच्या सूनवणीकडे लक्ष

  • 25 Feb 2022 07:24 AM (IST)

    नाशिकचे आणखी काही मुलं युक्रेनमध्ये अडकल्याची भीती

    आतापर्यंत फक्त दोन मुलांच्या पालकांनी साधला प्रशासनाशी संपर्क

    दोन्ही मुलांची माहिती प्रशासनाकडून राज्य सरकारकडे सुपूर्द

    इतरही विद्यार्थायच्या पालकांनी समोर येऊन माहिती देण्याच आवाहन

    शिक्षणासाठी युक्रेनला जाणाऱ्यांची संख्या मोठी

  • 25 Feb 2022 07:23 AM (IST)

    नाशिकमध्ये पोलिस हवालदाराची आत्महत्या

    नाशिक – पोलीस हवालदाराची रेल्वे खाली आत्महत्या

    पंचवटी पोलीस ठाण्यात हजेरी मास्टर म्हणून होते कार्यरत

    तानाजी जमदाडे अस आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव

    धावत्या रेल्वे पुढे उडी घेत केली आत्महत्या

    आत्महत्येच कारण मात्र अद्याप अस्पष्ट

  • 25 Feb 2022 07:23 AM (IST)

    नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीत काँग्रेस अजमावणार ‘स्वबळ’

    नाशिक – काँग्रेस मार्च मध्ये फोडणार प्रचाराचा नारळ

    मार्च च्या दुसऱ्या आठवड्यात काँग्रेसचा नाशिकमध्ये ओबीसी मेळावा

    नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार मेळावा

    मेळाव्यात काँग्रेस देणार स्वबळाचा नारा

    विजय वडेट्टीवार,के.सी पाडवी राहणार उपस्थित

    महापालिका निवडणुकीत काँग्रेस अजमावणार ‘स्वबळ’

  • 25 Feb 2022 07:22 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील ब्राम्हणीचं न्युड डान्स प्रकरण

    – अटकेत असलेल्या आरोपांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

    – या प्रकरणात उपसरपंच रितेश अंभोणे सह १३ जणांना केली होती अटक

    – १२ जानेवारीला उघडतात आला न्युड डान्सचा प्रकार

    – शंकरपटाच्या नावाखाली न्युड डान्सचं करण्यात आलं होतं आयोजन

  • 25 Feb 2022 07:21 AM (IST)

    खा. भावना गवळी यांच्या संस्थानातील घोटाळ्याचा गुन्हा कायम

    – शिवसेना खा. भावना गवळी यांच्या अडचणी वाढणार

    – खा. भावना गवळी यांच्या संस्थानातील घोटाळ्याचा गुन्हा कायम

    – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अर्ज फेटाळला, भावना गवळी यांना दणका

    – जनशिक्षण संस्था, महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील १८ कोटींच्या अफरातफरीचं प्रकरण

    – सदर प्रकरणात दाखल गुन्हा रद्द करण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

  • 25 Feb 2022 07:20 AM (IST)

    किरीट सोमय्या घेणार दिल्लीतल्या अधिका-यांची भेट

    ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे

  • 25 Feb 2022 07:19 AM (IST)

    रशिया – युक्रेन युद्धाचा परिणाम, देशात खाद्यतेलाच्या दरात अचानक वाढ

    – सोयाबीन तेलाचे दर ४ रु. किलो, तर अन्य तेलाचे दर ३ रुपये किलो वाढले

    – तेल दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खाद्यतेल, तेलबीयांच्या साठ्यावर निर्बंध

    – ९० दिवसांपर्यंतच करता येणार खाद्यतेल, तेलबीयांचा साठा

    – किरकोळ व्यापाऱ्यांना ३० क्विंटल, तर ठोक व्यापाऱ्यांना ५०० क्विंटल खाद्यतेल साठवली येईल

    – खाद्यतेल, तेलबीयांच्या साठ्यावर ३० जूनपर्यंत निर्बंध

    – केंद्र सरकारने अधिसूचना जारी करुन घातले निर्बंध

  • 25 Feb 2022 07:18 AM (IST)

    श्रीलंकन उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांची संघ मुख्यालयाला भेट

    – सरसंघचालक डॅा. मोहन भागवत यांची भेट घेतली

    – सरसंघचालकांशी विविध विषयांवर केली चर्चा

    – आद्य सरसंघचालक डॅा. हेडगेवार यांच्या निवासस्थानाला दिली भेट

  • 25 Feb 2022 06:31 AM (IST)

    बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केली कारवाई

    जात पडताळणीस विलंब करणाऱ्या अधिकाऱ्याला पाठवल सक्तीच्या रजेवर, तर विभागीय उपायुक्ताच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला

    येरवडा येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून प्रमाणपत्र मुदतीत दिले जात नसल्याच्या तसेच, जात पडताळणीची अनेक प्रकरणे प्रलंबित तक्रारी आल्यावर केली कारवाई

    जात पडताळणी विभागाचे उपायुक्त खुशाल गायकवाड यांच्याकडे सांगली जिल्ह्याचा कार्यभार असून, त्यांच्याकडे येरवडा येथील अतिरिक्त कार्यभार

    त्यांना पुण्यातून कार्यमुक्त केले असून, निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला

    तसेच, संशोधन अधिकारी संतोष जाधव यास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलं

  • 25 Feb 2022 06:30 AM (IST)

    रात्रीचे किमान तापमानही सर्वत्र सरासरीच्या पुढे गेल्याने रात्री हवेतील गारवा झाला कमी

    कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे राज्यात दिवसाच्या कमाल तापमानातील वाढ कायम असून, उन्हाचा चटका वाढला

    रात्रीचे किमान तापमानही सर्वत्र सरासरीच्या पुढे गेल्याने रात्री हवेतील गारवा झाला कमी

    तापमानातील ही वाढ पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याचा पुणे हवामान विभागाचा अंदाज

    मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आदी भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 2 अंशांनी वाढल

    तर अनेक भागात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे

  • 25 Feb 2022 06:29 AM (IST)

    2018 च्या टीईटी परीक्षेत 1 हजार 778 अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेऊन त्यांना पात्र केलाच तपासात उघड

    2018 च्या टीईटी परीक्षेत 1 हजार 778 अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेऊन त्यांना पात्र केलाच तपासात उघड

    2018 व 2019-20 अशा दोन्ही परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याने त्यात स्वतंत्र गुन्हे दाखल

    2018 च्या गुन्ह्यात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखीन 12 आरोपी निष्पन्न

    सायबर पोलिसांनी 2018 मधील परीक्षार्थींचे ओएमआर शीटची केली तपासणी

    त्यामध्ये 2018 च्या परीक्षेत 1 हजार 778 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे आढळून आल

  • 25 Feb 2022 06:26 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

    पुणे जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा

    जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी केले आवाहन

    युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता

    या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मदत कक्ष स्थापन

    केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797
    दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905
    फॅक्स 011-23088124 ई मेल situationroom@mea.gov.in

    पुणे जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक

    जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे दूरध्वनी 020-26123371
    ई मेल controlroompune@gmail.com

  • 25 Feb 2022 06:22 AM (IST)

    टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण

    टीईटी परीक्षेची 650 बोगस प्रमाणपत्र पुणे सायबर पोलिसांनी केली जप्त

    तर राज्य परीक्षा परीषदेकडे बाेगस प्रमाणपत्राबाबत 45 तक्रारी प्राप्त, 203 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचा पुरावा राज्य परीक्षा परिषदेला मिळाला

    आतापर्यंत 2019-20 च्या परिक्षेतली 400 तर 2018 च्या परीक्षेमध्ये पास झाल्याचे दाखवून 250 बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात उघड

    तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व एजंटांकडून 81 बनावट प्रमाणपत्रे जप्त

    जी ए सॉफ्टवेअर कडून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्याची पडताळणी सुरु

  • 25 Feb 2022 06:22 AM (IST)

    35 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा नवीन पायंडा

    यंदा 26 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 वाजता होणार मॅरेथॉनला सुरवात

    मॅरेथॉनच्या इतिहासात प्रथमच पुण्यातील या सर्वात जुन्या स्पर्धेचे मध्यरात्री आयोजन

    मध्यरात्री होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये परदेशातील 30 धावपटू व देशातील 2500 धावपटू होणार सहभागी

    पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे ट्रस्टी व संयोजन समिती अध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांची माहिती