मुंबई : आज बुधवार 3 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आजदेखील या दोन्ही पक्षांतील नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, उत्तराखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांमुळे (Elections) राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून राज्यातील हुडहुडी काही प्रमाणात कमी झाली आहे. या बातम्यांसह आपण सर्व घडामोडी येथे पाहणार आहोत.
आरबीआय बँकेकडून परवाना रद्द
आजपासून बँकेला कोणताही व्यवहार न करण्याचे आदेश
पुरेसा निधी नसल्याने कारवाई
पालघर मधील वाघोबा घाटात तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ .
तरुणीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज .
कोणी तरी म्हटलं की वाईन म्हणजे दारू नव्हे
महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल वरचा टॅक्स कमी केला नाही मात्र दारू वरचा टॅक्स कमी केला
रस्त्याने जाताना एखादा कॉन्स्टेबल मद्यपिला पकडतो
वाईनमध्ये दारू आहे की नाही याचा अभ्यास करावा लागेल
नितेश राणे यांना सिंधुदुर्ग पोलीस नीलम द ग्लिट्झ या हॉटेलमधून घेऊन बाहेर पडले
नितेश राणे यांची जवळपास सव्वा दोन तास येथे चौकशी झाली
संतोष परब हल्ला प्रकरणाचे या हॉटेलशी नेमके काय कनेक्शन आहे याची चौकशी सिंधुदुर्ग पोलिसांनी केली.
शेतकऱ्याच्या प्रश्नावर पोलीस अधिकाऱ्याला बच्चू कडू यांनी झापलं
पोलीस इन्फो कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून घेत नसल्याचा आरोप
पोलीस अधीकाऱ्याशी बोलताना बच्चू कडू यांनी वापरले आक्षेपार्ह शब्द
यासंदर्भात बच्चू कडू यांना संपर्क केला असता तो झाला नाही
पुण्यात आयोजित केली परीवर्तन रॅली,
उद्या नाना पटोले घेणार कार्यकर्ता मेळावा,
पुण्यात काँग्रेस स्वबळावर लढणार? उद्या नाना पटोले बोलण्याची शक्यता,
पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
नाना पटोले उद्या तर आदित्य ठाकरे 6 आणि 7 ला करणार पुणे दौरा…
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतल्या हवामानात मोठा बदल
राजधानी नवी दिल्लीत आज सकाळी पावसाच्या सरी
उत्तर प्रदेश, पंजाबमध्येही पावसाची शक्यता
30 ते 40 किलोमीटर प्रति वेगानं वारे वाहण्याचा अंदाज
हिमाचल प्रदेशमध्ये पहाटेपासून जोरदार बर्फवृष्टी
स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यातही थंडीची तीव्रता वाढणार
मुंबई – काॅमेडीयन सुनिल ग्रोव्हरला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार
बीकेसीतील एशियन हार्ट इंस्टिट्युटमध्ये सुरू होते ऊपचार
काही वेलात सुनिल ग्रोव्हर बाहेर पडणार, सध्या प्रकृती स्थिर…
पुणे : पुण्यात कार्यकर्त्यानं अजित पवारांच रेखाटलं 40 फुटाचं भित्तीचित्र
शरद पवार, राज ठाकरेंनंतर पुण्यात आता अजित दादांच भित्तीचित
येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष घेतंय वेधून
परीक्षेचा कालावधी आणि स्वरुप निश्चित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीनं लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत होणार आहेत. 31 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान घेण्यात येईल.
दहावी आणि बारावी परीक्षेच्या संदर्भात बोर्डाची पत्रकार परिषद,
माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी घेणार पत्रकार परिषद
आज दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निर्णय करणार जाहीर
पिंपरी चिंचवड -चिखलीमध्ये बैलगाडा शर्यत भरवण्याच्या तयारीत असणाऱ्यांवर गुन्हा दाखल
-चिखली गावात 2 तारखेला सकाळी 7 च्या सुमाराला भरवली जाणार होती शर्यत,
माहिती मिळताच पोलीस झाले दाखल
-बैलगाडा शर्यतीपूर्वीच गुन्हा दाखल,
राजू नेवाळे, दीपक साने यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल
परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. कायद्यापुढे सगळे समान आहेत. परमबीर सिंह आरोप आहेत. त्यांच्यावर खंडणीपासून अपहरणापर्यंत अनेक आरोप आहेत. आरोपी आपल्या बचावासाठी अनेकांचे नावे घेत असतो. विरोधी पक्षाने कितीही भांडवल केले तरी याचा काही उपयोग नाही
पुणे : पुण्यातील बाबा भिडे पुल इतिहासजमा होण्याची शक्यता
नदी सुधार योजनेंतर्गत बाबा भिडे पुल जाण्याची शक्यता
नदीपात्रातील छोट्या पुलावर येणार संक्रांत
साबरमतीच्या धर्तीवर पुण्यातही मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प राबवला जातोय
11 टप्प्यात हे काम केलं जातंय त्यापैकी 3 टप्प्याचं काम हे लवकरच सुरू केलं जाणार आहे
मुंबई : राज्यातील 2013 पासून सेवेत आलेल्या शिक्षकांची होणार टीईटी प्रमाणपत्र पडताळणी
राज्य परीक्षा परिषदेनं शिक्षणाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी करून घेण्याचे आदेश
2013 ते 2019या कालावधीत तब्बल 86 हजार 256 जणांनी टीईटी परीक्षा दिली आहे
त्यापैकी 7 हजार 800 जण पैसे देऊन पास झाल्याचं उघड झालंय
नियुक्त शिक्षकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र मागवण्यात आलीत
पुणे जिल्ह्यातील 158 जणांनी आपली प्रमाणपत्र सादर केलीत
पुणे : पुणे बार असोसिएशनचा निवडणूक कार्यक्रम झाला जाहीर
18 फेब्रुवारीला होणार मतदान आणि रात्रीच निकाल केला जाणार जाहीर
कोरोनामुळं गेल्या वर्षभरापासून बार असोसिएशनची निवडणूक पडली होती लांबणीवर
4 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना बार असोसिएशनच्या कार्यालयात जमा करता येणार अर्ज
8 फेब्रुवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल आणि 18 फेब्रुवारीला होणार मतदान
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक यांची माहिती
नाशिक – येत्या सोमवारी नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक
मनपा आयुक्त सादर करणार 2300 कोटींचे अंदाजपत्रक
बिटको रुग्णालयात मेडिकल उभारणीसाठी 25 कोटींची तरतूद
निवडणुकांच्या तोंडावर यंदा अंदाजपत्रक लवकर होणार सादर
चालू वर्षात 300 ते 400 कोटींची तूट येण्याची शक्यता
वर्षभरात वाढले 1200 कोटींचे दायित्व
अंदाजपत्रकाकडे सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
पुणे – मुळा मुठा नदीचा काठ होणार सुशोभित
– महापालिकेतर्फे पावणे पाच हजार कोटी रुपये खर्च करून नदीचा काठ सुशोभित केला जाणार,
– नदीच्या दोन्ही बाजूने पर्यावरणपूरक किनारे विकसित करणे, सायकल मार्ग, बाग यांचा समावेश
– यामुळे नदी काठचे रस्ते कायमस्वरूपी होणार बंद
नाशिक – दोर सुटल्याने शेंडी डोंगरावरून पडून 2 तरुणांचा मृत्यू
15 जणांची टीम आली होती मनमाडच्या शेंडी डोंगरावर ट्रेकिंगला
दोर तुटल्याने दोन तरुण पडले 120 फूट खोल दरीत
ट्रेकिंगसाठी आलेले इतर 13 जण मात्र बचावले
अमोल वाघ आणि मयूर म्हस्के अशी दोघा ट्रेकर्सची नावं