मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा या राज्यांतील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात जिल्हा बँकेच्या (District Bank Election) निवडणुका सुरु आहेत. यामुळे जिल्हा पातळीवरच्या राजकारणातही रंग चाढलाय. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू,
– महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची नावं प्रदेश कार्यालयाला देण्याच्या पक्षाकडून सूचना,
– यासंदर्भात राज्यातील जिल्हा काँग्रेस कमिटीला काँग्रेस पक्षाकडून पत्र
– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून स्वबळाची तयारी सुरू
जिल्ह्यातील ब्रम्हपुरीच्या मालडोंगरी येथे खळबळजनक प्रकार घडला आहे. दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसर हादरून गेला आहे. पती-पत्नी दरम्यान सतत वाद होत असल्याने जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, परंतु खरे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.
मला ठाण्याला वेड्याच्या रुग्णालयात दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही 500 चौरस फूटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना करमाफी देण्याची मागणी,
– येत्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता,
– मुंबई महापालिकेने नुकतेच महापालिकेच्या हद्दीतील 500 चौरस फूटा पर्यंतच्या घरांना करमाफ केला आहे,
– पुण्यातही असा निर्णय झाल्यास या मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळ्णार.
सिंधुदुर्गात बैलागाडा शर्यतीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी चालवली बैलगाडी
ब्युटी पार्लर आणि जिमवरील निर्बंधात शिथिलता, 50 टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्यास परनगी
जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते भागवत कराड यांनी केली आहे.
औरंगाबाद : चेंबूरमध्ये कांग्रेसचे नेते आमने सामने
कांग्रेस ऊपाध्यक्ष चंद्रकांत हांडोरेंचा पक्षातील नेत्यांवर मोठा आरोप
कांग्रेस पक्षाने कारवाई करावी अशी मागणी
– कांग्रेस पक्षातील एका दलीत मंत्र्याचा पोटात पोटशुळ ऊठल्याचा केला आरोप
माझ्या हत्येच्या मास्टरमाईंडला पोलिसांनी शोधावं
अन्यथा समाज रस्त्यावर ऊतरेल असा इशारा
– कार्यकर्त्यांकरवी आखला होता हत्येचा कट
डंपरने ऊडवण्याचा होता कट
– टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पोलीस फरार आरोपी निलेश नानचेचा घेत आहेत शोध
– पोलिसांकडून तपासाला सुरवात
औरंगाबाद : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने औरंगाबादमधील प्रसिद्ध भोजनालय केले सील
हॉटेल भोज असं या प्रसिद्ध हॉटेलचे नाव
50 % क्षमतेपेक्षा जास्त नागरिक आढळले हॉटेलमध्ये भोजन करताना
मास्क न लावता कर्मचारी बनवत होते खाद्यपदार्थ आणि स्वयंपाक
कोरोनाचा प्रादुर्भाव असताना हॉटेल चालक करत होते नियमांची पायमल्ली
कोरोनाचा संसर्ग पाहता रेस्टॉरंट आणि हॉटेल जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर
पुणे – हडपसर पोलिसांची मध्यरात्रीनंतर मोठी कारवाई
– पुणे-सोलापूर रोडवर गुटखा वाहतूक करणाऱा आयसर, टेम्पोसह गुटखा जप्त
– अंदाजे टेम्पोसह दिडकोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त
– गुटख्याचा टेम्पो पुण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती
नागपूर : हवामान विभागाचा अंदाज ठऱला खरा
नागपूरसह परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात
– विदर्भाच्या काही भागात आज आणि उद्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
– काल दुपारपासून ढगाळ वातावरण
– अवकाळी पावसाचा रब्बी पिकं आणि भाजीपाल्याला फटका
– वेचणी न झालेला कापूस शेतात भिजला
नागपूर : नागपूर विभागात एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
– खासगी एजन्सीकडून ड्रायव्हर हायर करुन काढणार बसेस
– नागपूर गणेशपेठ आगारात आजपासून 15 पेक्षा जास्त खासगी एजन्सीचे ड्रायव्हर रुजू होणार
– नागपूर आगारातून थोड्याच वेळात एजन्सीचे ड्रायव्हर काढणार बसेस
– नागपूर विभागात ड्रायरवरसाठी नेमली खासगी एजंसी
– संपामुळे एसटी कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
सिंधुदुर्ग- कोकणातील पहिली बैलगाडी शर्यत आज वैभववाडीत
माजी खासदार निलेश राहणार उपस्थित
शासनाच्या 27 अटी व कोरोनाचे सर्व नियम पाळून ही स्पर्धा संपन्न होणार
काल पासूनच अनेक स्पर्धक, बैलजोड्या उपस्थित
कोल्हापूर, रत्नागिरी, कराड, डोंबिवली, बेळगाव व सिंधुदुर्गातील बैलजोड्या होणार सहभागी
वैभववाडी-नाधवडे माळरानावर दुपारी रंगणार थरार
पिंपरी चिंचवड-पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरात एका भंगारच्या गोदामाला आज पहाटे भीषण आग लागली
-अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली
-ही आग पावणेसहाच्या सुमाराला लागली ती 7 च्या सुमाराला आटोक्यात आलीय
-सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र नुकसान झाले आहे
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा अखेर रद्द
देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला
पंतप्रधान कार्यालयाकडून दौरा रद्द झाल्याचं पुणे प्रशासनाला कळवण्यात आले
पुणे मेट्रो उद्घाटन, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या नावाचे कलादालन, पालिकेतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन तसेच विविध कार्यक्रमात मोदी उपस्थित राहणार होते
मात्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता
सूत्रांची माहिती
मुंबई : पुढील चार दिवस मराठवाडा, विदर्भात पाऊस, गारपीटीचा इशारा
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येतायत आद्रतायुक्त वारे
त्यामुळे भारतात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे
मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात आज आणि उद्या पावसासह गारपिटीची शक्यता
तर विदर्भात आज काही ठिकाणी पावसासह गारपिटीची शक्यता आहे
नाशिक – एसटीचे आणखी 10 कर्मचारी बडतर्फ
13 डेपोतून आतापर्यंत 95 कर्मचारी बडतर्फ
वारंवार सूचना देऊन देखील कामावर हजर न झाल्याने कारवाई
आतापर्यंत 110 बसेस धावल्याचा एसटी प्रशासनाचा दावा
आतापर्यंत 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस
नागपूर – नायलॅान मांजा विकणाऱ्यांवर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची धडक कारवाई
– पोलिसांनी पावणेतीन लाख रुपयांचा 400 बंडल नायलॅान मांजा केला जप्त
– एकाच दिवशी बारा जणांना पोलिसांनी केली अटक
– गुन्हे शाखेनं 12 ठिकानी धाडी टाकून केली कारवाई
– नायलॅान मांजा विकणाऱ्या 12 जणांवर गुन्हे दाखल
– गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 32 धाडी, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
– नागपुरात नायलॅान मांजाचा भंडारा आणि नाशिकमधून होत होता पुरवठा
– भंडारा आणि नाशिक येथील पुरवठादारालाही पोलिसांनी केली अटक
नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र
जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी
श्रीनगरसह अनेक जिल्ह्यात जनजीवन ठप्प, अनेक मार्ग बंद
आज सकाळपासून अनेक राज्यात पावसाची शक्यता
पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये पावसाची शक्यता
राजधानी नवी दिल्लीमध्येही पावसाची शक्यता
महाराष्ट्रातही पुढच्या 2 दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात थंडी वाढणार