Maharashtra Nagar Panchayat Election 2022 मुंबई: ओबीसी राजकीय आरक्षणासाठी प्रलंबित ठेवलेल्या स्थानिक स्वराज संस्थांमधील जागांवर आज मतदान पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टातील ओबीसी आरक्षणाची सुनवाणी लांबणीवर पडली असून दोन दिवसानंतर पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळं भाजप नेते कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता असून ठिकठिकाणी आंदोलन करण्याची शक्यता आहे. पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे देशपातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, माणिपूर या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना या महाराष्ट्रातील पक्षांनी गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्येदेखील हे पक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहेत. तसेच सध्या कडाक्याची थंडी असताना वातावरणात बदल झाला आहे. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…