मुंबई : आज गुरुवार 27 जानेवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आजदेखील या दोन्ही पक्षांतील नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, उत्तराखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांची (Elections) घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर या राज्यांत मोठी उलथापालथ होत आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात कमालीचे बदल जाणवले असून पुन्हा हुडहुडी वाढली आहे.
मुंबई : एमपीएससी (MPSC Exam) गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलल्याची माहिती एमपीएससी आयोगाकडून देण्यात आली आहे. 5 आणि 12 फेब्रुवारीला ही परीक्षा (MPSC Mains Exam) होणार होती.
पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त ❗️
दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी ‼️
महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय ❗️
आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू ‼️
महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 27, 2022
किरीट सोमय्या मनोरंजन करणारे पात्र
आम्ही सोमय्यांना गांभीर्याने घेत नाही
किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार
नव्या शिक्षण धोरणावर कॅबिनेटमध्ये चर्चा-नवाब मलिक
जिल्ह्यातील शाळा 31 जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी संयुक्तपणे काढले आदेश
नववीचे वर्ग 31 जानेवारीपासून दररोज सुरू होणार
पहिली ते आठवीचे वर्ग 5 फेब्रुवारीपर्यंत बंदच असणार
सुरेश धस- राष्ट्रीय पक्ष म्हणून घेणाऱ्या पक्षाला 50 मतांच्या वर मतदान घेता आले नाही.
अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त आहे
गोवा, मध्यप्रदेशात निवडणूक लढण्यास निघाले आहेत
जोगेश्वरी पश्चिम-अग्रवाल इंडस्ट्रियल स्टेज समोरील एबानी क्लासिक सोसायटीला आग लागली.
घटनास्थळी दाखल झालेले अग्निशमन दल आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.
इमारतीच्या 6 क्रमांकाच्या पॅलेसमधील किचनमध्ये आग लागली आहे.
संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे,
आगीत अडकलेल्या तीन ते चार जणांना बाहेर काढण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे नवी दिल्लीतील निवासस्थानामधून बाहेर पडले
नारायण राणे सपत्नीक निवासस्थानामधून बाहेर पडले
माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास राणे यांचा नकार
नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टानं फेटाळला आहे.येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा आणि नियमित जामीन घ्या, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळल्यानं हा नितेश राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला हा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय मानला जात आहे. येत्या दहा दिवसांसाठी नितेश राणे यांना अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक माध्यामांशी बोलत आहेत. भारतीय जनता पार्टी टिपू सुलतानबाबात दुहेरी भूमिका घेत आहे. कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचे नेते येडियुरप्पा टिपू सुलतानची जयंती साजरी करत आले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी भूमिका बदलली. कर्नाटकच्या विधानसभेला जेव्हा साठ वर्षे पूर्ण झाले तेव्हा देशाचे राष्ट्रपतींनी टिपू सुलतानला एक बाहादूर शहिदाचा दर्जा आहे. देश त्यांना विसरु शकणार नाही, असे मत मांडले. टिपू सुलतान इंग्रजांसमोर कधी झुकले नाही. टिपू सुलताना लढताना शहीद झाले, त्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे
रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर महाविकास आघाडीचे चक्काजाम आंदोलन
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतदेखील आंदोलनात सहभागी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतदेखील रस्त्यावर बसून करत आहेत आंदोलन
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन
नवी दिल्ली – खलिस्तानी संघटनेकडून पुन्हा एकदा धमकी
सुप्रीम कोर्टावर खलिस्तानी झेंडा फडकवणार
ब्रिटनहुन फोन कॉल करून धमकी दिल्याची माहिती
महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ खलिस्तानी झेंडा लावणार
सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना पुन्हा एकदा धमकीचा फोन
सीख फॉर जस्टीस आणि एका दहशतवादी संघटनेकडून धमकी
नवी दिल्ली – सरोजिनी नगरमधील धक्कादायक व्हिडिओ
20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
बलात्कारानंतर पीडित मुलीची धिंड काढली
केस कापून धक्काबुक्की करत धिंड काढल्याची चर्चा
महिला आयोगाने घेतली व्हिडिओची गंभीर दखल
दिल्ली पोलिसांकडून लडकीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
अवैध दारू विक्री करणाऱ्यांकडून अत्याचार झाल्याची चर्चा
प्रजासत्ताक दिना दिवशी चा धक्कादायक व्हिडिओ टीव्ही नाईन मराठी कडे
मुंबई : संजय राऊत माध्यमांना बोलत आहेत. महाराष्ट्रात कोण दंगे करणार. कोणामध्ये हिम्मत आहे. दंगल करुन धाखवा हे ठाकरे सरकार आहे. राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आम्ही ऐकून घेऊ. केंद्र सरकारचा समाजमाध्यमांवर कोणता दाबव आहे, ते आम्ही समजून घेऊ. मग प्रतिक्रिया व्यक्त करु. पुरस्कार हे मरणोपरांत दिले जातात. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण मरणोपरांत दिला जातो. निवडणूक पाहणून पुरस्कार दिला जातो
झारखंड : रेल्वे मार्गावर पुन्हा नक्षलवाद्यांचा उपद्रव
हावडा नवी दिल्ली रेल्वे मार्गावरील रूळ नक्षलवाद्यांनी उखडून टाकले
चिचकी आणि चौधरीबंध रेल्वे स्थानकांदरम्यानचे रूळ उखडून टाकले
हावडा-नवी दिल्ली मार्गावर रेल्वेसेवा थांबवली
घटनास्थळी पोलीस आणि रेल्वेचे पथक दाखल
अकोला : अकोल्यात पारा घसरला
तापमान गेले 9 अंश सेल्सिअसवर
कालचे तापमान होते 10.06 अंश सेल्सिअस
नंदुरबार: जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी थंडीचा कहर
डोंगराळ भागात तापमान 4अंश सेल्सिअसवर
सपाटी भागातील तापमान 8 अंश सेल्सिअस
कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर परिणाम
कडाक्याचा थंडीचा फळ बागांवर परिणाम
केळी आणि पपई उत्पादक शेतकरी आडचणीत
मुंबईतील वांद्रे येथील बेहराम नगरमधील पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.
त्यामध्ये अडकलेल्या सहा जणांची सुटका करण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, बचाव पथक आणि सहा अॅम्ब्युलन्स पोहोचल्या होत्या.
– वांद्रे येथील बेहराम पाडा या झोपडपट्टीचा परिसरातील ही इमारत कोसळताच परिसरात एकच खळबळ माजली.
सुरुवातीला या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली पाच जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्यास सुरुवात करुन ढिगाऱ्याखालून सहा जणांना सुरक्षित बाहेर काढलं.
यापैकी चौघांना व्हीएन देसाई रुग्णालयात तर इतर दोघांना वांद्रे भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
नाशिक- नाशिक शहरात विना हेल्मेट चालकांवर पोलिसांचा कारवाईचा सपाटा सुरूच
–
काल दिवसभरात 400 जणांवर कारवाई
– पोलीस आयुक्तांच्या कडक हेल्मेट सक्ती मोहिमेमुळे जवळपास 75 ते 80 टक्के दुचाकी चालकांच्या डोक्यावर दिसतंय हेल्मेट