मुंबई : आज गुरूवार 17 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. आज राज्यात होळी साजरी करण्यात येणार असल्याने दिवसभरात आपण इतर बातम्यांसह होळीच्या बातम्या पाहणार आहोत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात अमित ठाकरे यांनी होळीच्या निमित्ताने हजेरी लावली.
कोविडच्या पार्श्वभुमीवर राजकीय , धार्मिक कार्यक्रमावर निर्बंध….
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने 17 मार्च ते 22 मार्च पर्यंत निर्बंध….
साईबाबांची गुरूवारची पालखी तसेच रंगपंचमीला निघणारी साईंच्या रथाची मिरवणुक स्थगित ….
जिल्हाधिका-यांचे पुढील आदेश येई पर्यंत स्थगित …
साईभक्तांचा मोठा हिरमोड….
-पिंपरी चिंचवड च्या मोशी मध्ये केमिकलचा बॅरल स्वच्छ करीत असताना स्फोट होऊन आग लागली.या आगीत आठ जण जखमी झाले
-मुसा मोहम्मद,शिवराज बोईगवाड,महादू पाडुळे, सुरेश बोईगवाड, पिराज बोईगवाड, मल्लू बोईगवाड,माधव बोईगवाड,बालाजी बोईगवाड अशी भाजल्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत
-मोशी मधल्या डी मार्ट समोर असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली.काही जण अडकले असल्याचेही त्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणत जखमीना तत्काळ रुग्णालयात दाखल केले
राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही
मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार काढणार
मुंबई अध्यक्षपद नगरसेविका राखी जाधव यांच्याकडे देणार
राष्ट्रवादीचे नेते मंत्री तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. काही जेलमध्ये आहेत. काही जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. यामुळं भाजप नेत्यांच्या बाबतीत तसं करता येत का हा सरकारचा प्रयत्न होता. त्यानुसार माझ्यावर सूडबुद्धीनं कारवाई करण्यात आली, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला.
प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक….
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे गेट केले बंद..
प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा….
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे चार दिवसांपासून सुरू आहे उपोषण …..
विद्यापीठ स्थापनेला 54 वर्ष उलटूनही प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न जैसे थे….
शेतकऱ्यांच्या वारसांना विद्यापीठ मध्ये नोकरीला घेतलं नसल्याने शेतकऱ्यांचे गेल्या 4 दिवसांपासून विद्यापीठ समोर उपोषण सुरू…
तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, तर पक्षाचे नेते अमित ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर असणार
मनसे यंदाही शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करणार असून, राज्यभर मोठ्या उत्साहात ती साजरी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
येत्या सोमवारी शिवजयंती निमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पक्षाने आयोजित केलेल्या भव्य सोहळ्याला स्वतः राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
अमित ठाकरे शिवजयंती दिवशी पहाटे वाजता 6 :30 शिवनेरी किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटर इथ बोलावली आहे…
या बैठकीत अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल पटेल आदी महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत…
या अगोदर शरद पवार यांची भेट घेऊन दिलीप वळसे-पाटील निघून गेले आहेत
घाबरायचं काही कारण नाही, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही…
शरद पवार यांचा त्यांच्या वाढत्या वयातही असलेला आत्मविश्वास पाहून महाविकास आघाडीचे युवा आमदार अवाक्…
महाविकास आघाडीच्या युवा आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
भुसावळ, रावेर,मुक्ताईनगर तालुक्यात तापमानात मोठ्या प्रमाणात कमालीची वाढ रस्ते झाले दुपारच्या वेळेत निर्मनुष्य त्यामुळे दुपारनंतर नागरिक देखील घराबाहेर कमी प्रमाणात पडताना दिसत आहे
भुसावळ ,रावेर ,मुक्ताईनगर व इतर तालुक्यात 42.9 सेल्सिअस तापमानाची याठिकाणी नोंद करण्यात आली आहे
वाढत्या उष्णतेचे अनुषंगाने आरोग्य विभाग देखील सज्ज झाला आहे
पुण्यातील शिवणे परिसरात प्रेमसंबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण
मुलीच्या आई ,वडील आणि भावानं केली मारहाण
मारहाणीत मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
काल रात्री 8 वाजता मारहाणीची घटना घडली होती…
भारतीय जनता पक्षावर चार राज्यातील जनतेने मोठा विश्वास दाखविला
मोदीजींच्या नेतृत्वात विकास कामाला जनतेने मत दिली
लोकं जात पात बघत नाही, जाती पाहून मत जनता देत नाही, तर जनता विकासाला मत देतात. त्यामुळे कोणीही जाती पातीच राजकारण बंद करा
राज्यात आणि देशात काम केलं तसं महापालिकेत करावं लागणार आहे.
शहराच्या विकासाची अनेक काम आपण केली.
आमचे अनेक विरोधक देव पाण्यात घालून ठेवले होते – देवेंद्र फडणवीस
गोव्यात युती केली, सांगितलं आम्हीचं निवडून येणार…
त्यांची लढाई आमच्याशी नाही, नोटाशी आहे
नोटापेक्षा अधिक मतं मिळाली नाही
आता लढाई एका शिगेला पोहचतं आहे
आमच्या नेत्याला फसवलं जातंय
तुमचा भ्रष्टाचारी चेहरा आम्ही लोकांच्या समोर आणणार
महापालिकेत आम्ही आमची सत्ता आणणार
त्यांना आता काश्मीर दिसतंय, काश्मीर फाईल सिनेमा आल्यावर त्यांना काश्मीर आठवलं, 32 वर्षे कुठे होते हे लोक, हा फार संवेदनशील विषय आहे,
लोकांनी मोदींना यासाठी मत दिलेले आहे की पाकव्याप्त काश्मीर भारतात आणून अखंड हिंदुस्थान निर्माण करू असे त्यांनी सांगितले होते, त्याची आम्ही अजूनही वाट बघत आहोत,
तो चित्रपट जर कोणाचा पोलिटिकल अजेंडा बनत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे,
पण बाळासाहेब ठाकरे हे एकमेव असे नेते होते की काश्मिरी पंडितांना हातात शस्त्र द्या, ते आपलं रक्षण करतील, तेव्हा त्यांना अश्या प्रकारे वक्तव्य केले म्हणून विरोध करणारे केंद्रातील भाजप नेते होते,
अमरनाथ यात्रा उधळून देण्याची धमकी देणाऱ्या लोकांना सांगितलं की तुमची हजला जाणारी विमान मी उडू देणार नाही, त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली, वैष्णव देवी यात्रा पार पडली,
काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी 5 टक्के राखीव जागा इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांमना देणारे बाळासाहेब ठाकरे होते,
कोणत्या विषयाचे राजकारण कारायवै याचे भान महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला नसेल तर हे गंभीर आहे,
संजय राऊत
सरकारने काही नियम ठेवले असतील तर राज्याच्या हितासाठी विरोधी पक्षाने विरोधाला विरोध करू नये, एखाद्याला वैफल्य येऊ शकत सत्ता येत नसल्याने, पण ते वैफल्य अश्या टोकाला जाऊ नये की आपल्याच राज्यात आपल्याच लोकांचे बळी जावे, आणि त्याच भविष्यात राजकारण करण्यात यावे,
इतकं टोकाचं राजकारण, इतकं क्रूर राजकारण महाराष्ट्रात आज पर्यंत कोणी केले नव्हते, आणि करू नये
खरं म्हणजे वकील मी नाही, वकील स्वतः देवेंद्रजी आहेत, आम्ही कार्यकर्ते आहोत, मी माझ्या पक्षाचे मत मांडतो, आम्ही कोणाची वकीली करत नाही, मी भूतकाळात काय घडले होते हे सांगायचा प्रयत्न केला आणि जर सत्य पचवता येत नसेल तर नाविलाज आहे, आम्ही अनेकदा काश्मीरला जाऊन आलो आहोत, राजकारणासाठी नाही तर, अमन आणि शांती साठी,
काश्मीरी मुलांना आम्ही भेटलो, आम्ही फक्त टुरिजम साठी गेलो नाही, त्याचे राजकारण कधी आम्ही केले नाही,
बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मीरी पंडित यांसाठी जे केले ते कोणत्या राज्याने केले नाही,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली जी घोषणा केली होती, की कश्मीर अखंड करून हिंदुस्थानात परत आणू, ते करा, आणि कश्मीरी पंडित यांची घर वापसी जे तुमचे वचन आहे, ते बोला, कधी जात आहेत कश्मीर पंडित पुन्हा घरी? कधी घेऊन जात आहे? कशाला सिनेमे काढता?
आम्ही ठाकरे चित्रपट बनवला त्यावर देखील टॅक्स फ्री केला नाही
काश्मीर राजकार आम्ही केले नाही
बाळासाहेबांनी पाहिले नेते होते
तेव्हा कुठे होती केंद्र सरकार
अमरनाथ यात्रा धमकी देत होते टेरेरिस्ट
तेव्हा कोणाच्या केसाला धक्का लागला तर हज पर्यंत तुमचे विमान उडणार नाही अशी धमकी दिली होती
या काश्मीर चित्रपट बाबत कशी बनली त्याबाबत मला माहिती आहे
पुण्यात आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांच लसीकरण सुरळीत
कॉर्बेव्हँक्स या लसीला कालपासून सुरुवात झालीये..
आज कोव्हीन अँप सुरळीत
मात्र मुलांची संख्या मर्यादित !
20 मुलांच रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय व्हायल फोडली जाणार नाही
अन्यथा चार तासानंतर लसीची परिणामकारकता संपणार
12 ते 14 या वयोगटातील लसीकरण संथ गतीने मुलांचा प्रतिसाद नाही ..
याचाच कमला नेहरू लसीकरण केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी ..
– मुळचा सोलापूरचा जवानाचा छत्तीसगढमध्ये उपचारादरम्यान मृत्यू
– छत्तीसगडमधील रायपूर येथे पाटदुखीने त्रस्त असलेल्या जवान रामेश्वर काकडे यांच्यावर सुरू होते उपचार
– रामेश्वर काकडे असे मृत जवानाचे नाव
– रामेश्वर काकडे हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगावचे रहिवासी
– छत्तीसगढ येथील रायपूर येथे सीमेवर कार्यरत असताना पाटदुखीमुळे होते त्रस्त
– दोन दिवस त्यांच्यावर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार
– मात्र काल पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला
– रामेश्वर काकडे बीएसएफ मध्ये होते कार्यरत
– आज त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर होणार अंत्यसंस्कार
मला असं वाटतं की हे सगळं नागपूरकरांचं प्रेम आहे. आज जो काही सत्कार स्विकारतोय, मोदीजींच्या वतीने आणि टीम गोव्याच्या वतीने प्रातनिधीक स्वरूपात स्विकारतोय. जी काही संधी मिळाली त्याचं सोन करण्याचा प्रयत्न केला. संपुर्ण देशात भाजपाला आणि मोदीजींना जो काही अर्शिवाद मिळाला त्याचं हे प्रत्यतंर आहे. हे आपल्या लोकांचं प्रेम आहे. 2024 मध्ये भाजपाचं महाराष्ट्रात सरकार असेल.
गोव्यातील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं नागपूरात जंगी स्वागत, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
नागपूरात फडणवीसांचं जंगी स्वागत
चंद्रशेखर बावनकुळेंसह अनेक मान्यवर उपस्थित
अनेक मान्यवर रोड शो ला उपस्थित
नागपूर विमानतळावर लोकाची गर्दी
सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे
भाजप नं एकचं राहणार – फडणवीस
फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूरात शक्तिप्रदर्शन
देवेंद्र फडणवीस थोड्याचवेळात नागपूरात होणार दाखल
नागपूरात विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
रोड शो चे नियोजन
कार्यकर्ते विमानतळावर दाखल
-कांद्याचे दर कोसळले, दहा दिवसांत प्रति किलो 14 रुपयांची घट,शेतकऱ्यांना फटका
-कांद्याचे दर कोसळू लागलेत, चाकणमध्ये आज 10 ते 13 रुपये प्रति किलोचा दर मिळाल्याने शेतकरी चिंतेत आलाय
-5 मार्चला हाच दर 27 रुपये प्रति किलो इतका होता.दहा दिवसांत थेट 15 रुपयांनी दर खालावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतोय
-होळी निमित्ताने परप्रांतीय मजूर घरी गेलाय.त्यामुळे कांद्याची पोती लोडिंग-अनलोडिंग करायला मजुरच नाही. त्यामुळे कांदा बाजार समितीत पडून राहिलाय, परिणामी आवक वाढली
-त्यामुळे दर खालावत गेले, याचा फटका मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय.
ग्राफिक्स कांद्याचे दर
16 मार्च 10 ते 13 रु किलो
12 मार्च 15 ते 20 रु किलो
09 मार्च 17 ते 22 रु किलो
05 मार्च 22 ते 27 रु किलो
– छत्तीसगढमधील चकमकीत सोलापूरचा जवान शहीद
– रामेश्वर काकडे असे शहीद जवानाचे नाव
– शहीद काकडे हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगावचे ते रहिवासी
– छत्तीसगढ येथील रायपूर येथे झालेल्या चकमकीत त्यांना आले वीरमरण
– शहीद रामेश्वर काकडे बीएसएफ मध्ये होते कार्यरत
कोल्हापूर उत्तर निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू होणार
आज उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियेला होणार सुरवात
24 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार
श्रावण क्षीरसागर निवडणूक निर्णय अधिकारी
काँग्रेस ची उमेदवारी जयश्री जाधव यांना जवळपास निश्चित
तर भाजप उमेदवाराच्या नावाची घोषणा दोन दिवसात होणार
महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या भूमिकेकडेही सर्वांच्या नजरा
नागपूर
बेपत्ता तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ
मंगळवार पासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
निकिता लखन चौधरी असे मृत झालेल्या तरुणीने नाव आहे.
ती एका खासगी फायनान्स कंपनी कामाला होती.
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुराबर्डी परिसरातील एका निर्जन स्थळी तिचा मृतदेह मिळून आला असून आधी आरोपीने तिची हत्या केली असावी त्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असावा असा संशय पोलिसांना आहे.
औरंगाबाद ब्रेकिंग :-
मोबाईलवर व्हिडीओ बनवत तरुणाने केली आत्महत्या
विषारी औषधांच्या तब्बल दोन बाटल्या पिऊन केली आत्महत्या
कन्नड तालुक्यातील निर्जन स्थळी बसून व्हिडीओ बनवत केली आत्महत्या
सुनील ढगे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव
भाऊ आणि भावजाईचे नाव घेऊन केली आत्महत्या
आत्महत्या करतानाचा भीषण व्हिडीओ आला समोर
विष प्राशन केल्यानंतर काही वेळातच तरुणाचा मृत्यू
वसई:- वसई विरार महापालिकेत 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी कोव्हिड 19 च्या लसीकरण सुरवात झाली आहे..
बुधवारी 16 मार्च पासून पालिकेच्या 6 आरोग्य केंद्रावर हे लसीकरण सुरू झाले असून, काल एकाच दिवसात 107 मुलांचे लसीकरण करण्यात यश आले आहे..
पालिकेच्या आरोग्य केंद्रातील लसीकरण नंतर रंगपंचमी होताच प्रत्येक शालानिहाय सर्वे करून, शाळातही सुरू होणार लसीकरण
कॉर्बेवॅक्स नावाचे 10 हजार 200 डोस वसई विरार महापालिकेला शासनाकडून उपलब्ध झाले आहेत.
वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल पवार यांनी दिली माहिती..
औरंगाबाद
मागण्या मान्य न झाल्याने वरिष्ठ डॉक्टरांच्या आंदोलनाचा आज ही निर्णय..
डॉक्टरांचा संप कायम सुरू असल्याने महत्वाच्या शस्त्रक्रिया रद्द..
डॉक्टरांच्या संपामुळे आपत्कालीन सेवा होतेय प्रभावित..
गेल्या दीड महिन्यापासून वैद्यकीय शिक्षण बंदच..
राज्यातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय कामावर बहिष्कार टाकून आंदोलन ठेवले कायम..
7 महाविद्यालयांनी रुग्णसेवा बंद ठेवून आंदोलनाची भूमिका ठेवली कायम..
विद्यार्थ्यांचे मागील 50 दिवसांपासून वैद्यकीय शिक्षण बंद..
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी
गेल्या 12 दिवसात पुण्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नाही
मृत्युदर आला 1 टक्क्यांवर
रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात घट
काल 24 तासात पुण्यात अवघे 21 रुग्ण वाढलेत..
सध्या 341 रुग्ण सक्रीय आहेत ..तर एकच रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेतोय..
मुलांच्या लसीकरणाचा पहिल्याच दिवशी खोळंबा
अवघ्या 60 मुलांना मिळाली लस
कॉर्बेव्हँक्स या लसीकरणाला कालपासून सुरुवात झाली मात्र कोव्हीन अँपवर नोंदणी होत नसल्यानं लसीकरण खोळंबलं
आणि एका व्हायलमध्ये 20 डोस असल्यानं 20 मुलं जमा झाल्याशिवाय व्हायल फोडता येत नाही
त्यामुळे पहिल्या दिवशी 29 केंद्रावर लसीकरणाचं नियोजन करूनही 60 जणांना लस देण्यात आली…
अकोला : पातूर तालुक्यातील सुकळी येथे माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली होती… याप्रकरणी रात्री उशिरा पातूर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे…राजकन्या दिनेश वांडे असे विवाहितेचे नाव असून…राजकन्या हिचा विवाहितेने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या केली आहे, यात सासर च्या मंडळींना अटक करण्यात आली आहे…
1701 अपात्र विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पास करण्यात आल्याचं सायबर पोलीस तपासात उघड
आरोपींनी मुळ निकालात 874 जणांचे मार्क वाढवून अंतिम यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली
आतापर्यंत घोटाळा प्रकरणात 101 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेत तर
5 कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालंय..
पुणे
राज्यात बूस्टर डोसचं लसीकरण जोरात
कालपर्यंत राज्यात 16 लाख 48 हजार 60 जणांना बूस्टर डोस देण्यात आलाय
ज्यामध्ये वयोवृद्ध, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करचा समावेश आहे..
पुणे
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं बांधकाम युद्धपातळीवर
ऑगस्ट 2023 पर्यंत बांधकाम पुर्ण होईल
विमानतळ प्रशासनाचा दावा
टर्मिनलचं काम पुर्ण झाल्यास 70 लाख प्रवाशी हाताळण्याची क्षमता येणार
तर 10 पँसेजर बोर्डींग आणि 72 चेक इन काऊंटर तयार केले जाणारेत..
पुणे विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढल्याने टर्मिनलचं काम जोरात सुरू आहे…
होळीला रस्त्यावर गोंधळ घालाल तर होईल कायदेशीर कारवाई खावी लागेल तुरुंगाची हवा
होळीपूर्वी नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर
पंधरा वर्षानंतर होळी आणि मुस्लिम बांधवांचा सण शब्बे बारात एकाच दिवशी येत असल्यामुळे नागपूर पोलिसांचे टेन्शन वाढले आहे.
पोलिसांचे टेन्शन कमी करण्यासाठी आणि समाजातील सर्वच घटकांचा साथ मिळावा यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नागपुरात शांतता समितीची बैठक घेतली.
बैठकीला नागपूर शहरातील सर्व पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक, डीसीपी,एसीपी तसेच सर्वधर्मीय नेते उपस्थित होते..
फेब्रुवारी महिन्यात नागपूर शहरात एक सुद्धा हत्या झाली नसली तरी मार्च महिन्यात आतापर्यंत चार हत्येचे गुन्हे नोंद झाले आहे.
होळीच्या सणानिमित्त गुन्हेगार पुन्हा आपले डोके वर काढू नए यासाठी नागपूर पोलिसांनी कंबर कसली आहे..
शहरातील केंद्रीय शांतता समितीच्या सर्वधर्मीय नेत्यांची आज पोलीस आयुक्तांनी बैठक घेतली.
पोलीस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले की होळी सणाच्या दिवशी जर कोणतीही व्यक्ती रस्त्यावर गोंधळ घालेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तर त्याला सरळ तुरुंगाची हवा खावी लागेल .
मनसे नेते अमित ठाकरे मध्य रात्री वरळी कोळीवाड्यात खास होळीसाठी हजेरी लावले.
अमित ठाकरे यांच्या हस्ते होलीका दहन करण्यात आलं. कोळी बांधव भगिनी पारंपारिक वेशभूषेत उत्साहाने होळी सण साजरी केली..
मोठ्या संख्येनी नागरिकांची गर्दी पाहायला मिळालं. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर अमित ठाकरेंच वरळीवर विशेष लक्ष दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात अमित ठाकरे यांनी होळीच्या निमित्ताने हजेरी लावले असल्याने याला विशेष राजकीय महत्व दिले जात आहे..
यावेळी मनसे नेते अमीत ठाकरे यांनी मीडियाशी बोलायला नकार दिली..