मुंबई : आज बुधवार 2 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळू शकतो. अमर, अकबर, अँथनीचे सरकार पाय अकडून पडेल, दानवेंचा महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे, विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात, तर सुप्रिया सुळेंनी जोडले केंद्राला हात जोडले आहेत, त्याचबरोबर ज्यांना मुलबाळ नाही त्यांना वेदना काय कळणार? नाना पटोले पुन्हा घसरल्याचे पाहायला मिळाले. नील सोमय्यांना कोर्टाचा पहिला दणका, सत्र न्यायालने फेटाळला अटकपूर्व जामीन या सगळ्या घटनांचं अपडेट आज आपण दिवसभरात जाणून घेणार आहोत.
युक्रेनमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. अशी आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
PM Narendra Modi spoke on phone today with Russian President Vladimir Putin. The leaders reviewed the situation in Ukraine, especially in Kharkiv where many Indian students are stuck. They discussed the safe evacuation of the Indian nationals from the conflict areas.
(File pics) pic.twitter.com/IUPgj0Dung
— ANI (@ANI) March 2, 2022
आज राज्यात कोरोनाचा एकही मृत्यू नाही,
1 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच शून्य मृत्यूची नोंद
राज्यभरात आज 544 कोरोना रुग्णांची नोंद
तर 38 ओमिक्रॉनबाधित रुग्णांची झाली नोंद ..
राज्यासाठी दिलासादायक बातमी..
युक्रेनियाधील अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या संपर्कात आहोत. विद्यार्थ्यांच्या परतण्याबाबत आम्ही दूतावासाच्या संपर्कात आहोत.
दिशा सालियन प्रकरणी जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, ते राज्याला शोभा देणारे नाही. ही राज्याची संस्कृती नाही
उद्या अनिल परब सभागृहात त्री सदस्यीय समितीचा अहवाल पटलवार ठेवणार – अजित पवार यांची माहिती
एस टी विलनिकरणाचा अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा
कोर्टाच्या आदेशानंतर त्रिसमिती सदस्यीय समितीनं सादर तयार केला अहवाल
एसटी कर्मचा-याचं विलिनीकरण शक्य नसल्याचं अहवालात स्पष्ट
उद्या परिवहन मंत्री अनिल परब अहवाल विधीमंडळाच्या पटलावर ठेवणार
मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे कोणाचा राजीनामा घ्यायचा की नाही ते
मागे दोन जणांचा राजीनामा घेतला त्याला कारण असावं
आता घेतला जात नाही कारण त्याला कारणही वेगळं आहे
7 मार्चला सरकार कोसळणार – चंद्रकांत पाटील
पाच दिवस कळ सोसा, अजित पवारांचा टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा वादाचा ठरणार ?
मोदींनी संसदेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागावी
आणि मगंच महाराष्ट्रात यावं,
माफी मागितली नाहीतर मोदींच्या दौऱ्यात करणार निदर्शने दाखवणार काळे झेंडे
6 मार्चच्या नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा इशारा
मोदींना दाखवणार काळे झेंडे काँग्रेसची भूमिका..
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओक येथे गेले आहेत.
कोल्हापूर
शेतीला दिवसा वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी आक्रमक
4 तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन
राजू शेट्टी यांची माहिती
सरकार कडून निमंत्रण आल्यास आंदोलन चालू ठेवुन चर्चेला जाणार
अखेर सरकारकडून स्वाभिमानाच्या आंदोलनाची दखल
गेल्या 9 दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरण कंपनी ऑफिस समोर धरण आंदोलन
विरोधी पक्ष नेत्यांचे आभार मानले पाहिजे, त्यांनी मला वस्तू स्थिती सांगण्याची संधी दिली
दीडशे कोटी रुपये महाज्योतील मिळाले आहे .
विरोधी पक्षाने भडकवलेल्या मुलांनी सांगितलं पैसे भेटले नाही
बजेट आणि संख्या लक्षात घेऊन पैसे दिले जातात
महाज्योतीचे बजेट आम्ही वाढवून घेतो, कार्यलय सुरू केले जात आहे
ओबीसीमध्ये आम्ही जन्म घेतला, आम्ही महाज्योती बंद पडू देणार नाही
मंत्री पद नंतरचा प्रश्न आहे, ओबीसी आरक्षण महत्वाचं आहे माझ्यासाठी
फार कमी मुलं आहे जे बोंबाबोंब करतात
मुद्यापासून पळण्यासाठी आरोप असतात
महाज्योती फक्त कागदावर होती, आम्ही प्रत्येक्षात उतरवले
आम्ही अनेक विधर्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवले
वेगवेगळ्या सुविधा आम्ही निर्माण करत आहोत
आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्याकडून मेट्रो 7 ची पाहणी
पहिल्या टप्प्यातील दहा स्थानकांची पाहणी
एसटीबाबत हे सरकार कोडगं आहे, 80 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या यांना दिसत नाही. अहंकार डोक्यात जातो, आम्ही म्हणजे सत्ता, असं सरकार आता वागतंय, त्याचं प्रत्यंतर त्यांना पाहायला मिळेल.
त्यांच्यातील काही लोक दाऊदची धुणी-भांडी करतात, त्यांना आधी सांगा, दाऊदपुढे झुकणार आणि महाराष्ट्र झुकणार नाही असं यांचं आहे. माझ्या पत्रकार परिषदेप्रमा्णे त्यांच्याही पत्रकार परिषद घ्या फिक्समॅच करु नका
आमच्या नेत्यांना गेले 2 वर्षे टार्गेट केलं, छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांना 5 केसेस, 353 लावल्या जातात, 25 पोलीस जाऊन रातोरात अटक होते, राणे, दरेकर यांच्यासह अनेकाना त्रास देण्याचा प्रयत्न करताहेत, यांची एक पद्धत आहे, स्वत अन्याय करायचा, आणि कांगावा करायचा की आमच्यावर अन्याय होतो. आणि एक वाक्य आहे, महाराष्ट्र झुकणार नाही, पण तुम्ही म्हणजे थोडीच महाराष्ट्र आहे, 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे, तुम्ही नाही
नवाब मलिकांचा राजीनामा न घेऊन एका विशिष्ट समाजाला जपण्याचा पोलरायजेशन करण्याचा प्रयत्न, संजय राठोडांचा राजीनामा लगेच होतो, पण देशद्रोह्यांसोबत असलेल्या वाचवण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे.
परिक्षांचे घोटाळे संपले नाही, भ्रष्टाचार चरम सिमेला पोहचलाय, सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार आहे, कारकून साहेबाला लाच मागतोय, तुम्हाला 15 लाख मिळाले, मला 2 लाख का नाही, बंदुकीचा धाक दाखवल्याचेही प्रकार झाले आहे, एकूणच सरकार पूर्णपणे फेल झालं, या सरकारला एकच घटक जवळचा वाटतो, तो म्हणजेच दारु उत्पादन करणारा, बेवड्यांना समर्पित हे सरकार आहे, बेवड्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतलेले नाही. त्यामुळे सरकारचे काळे कामं बाहेर काढू,
गाळप न झालेल्या उसाचा मोठा प्रश्न, सरकारने त्यांना मदत करावी, ही मागणी, याशिवाय पहिल्या अधिवेशनात घोषित केलेल्यांना कर्जमाफी, आणि नियमित फेडणाऱ्यांना अनुदान, याबाबतही आमचा आग्रह असणार आहे. मराठा-ओबीसी आरक्षण हे दोन्ही मोठे विषय, खरं म्हणजे छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला उपोषणाला बसावं लागणं हे वाईट, आताही सरकार ते आश्वासन पूर्ण करेल याबाबत सांगता येत नाही. आधी सुरु असलेल्या योजनाही बंद केल्या. महाज्योती बंद पाडण्याचं काम सरकारने केले आहे. ओबीसींवर सरकारचा इतका राग का आहे, हा प्रश्न पडतो. ओबीसी मोर्चा काढतात, त्यांच्या दिव्याखाली अंधार आहे, महाज्योतीला पैसा देत नाही, जोपर्यंत महाज्योतीला निधी देत नाही तोवर मागे लागणार.
नवाब मलिकांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार उभं
आम्हाला चर्चा करायची आहे, चर्चा झाली पाहिजे
ओबीसीवर चर्चा 12 आमदारांना निलंबित केलं
नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे
शेतकरी हवालदिल, वीज कापली जात आहे
दाऊद बरोबर संबंध असणा-यांना वाचवावं लागतंय
सावकारी सरकार आहे,
शेतक-यांच्या बाबतीत इतकी असंवेदनशीलता कशी काय
आम्ही शेतक-यांच्या पाठीशी उभे
शेतक-यांच्या अनेक प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे
शिवसेना विलेपार्ले विधानसभेच्या वतीने राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव अशा शिवसैनिकानी घोषणा दिल्या. आक्रमक शिवसैनिकांनी आणि महिलांनी जोडे मारो आंदोलन केलं. राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्र द्रोही राज्यपालाचे तात्काळ राजीनामा राष्ट्रपतीने घ्यावा आणि नवनियुक्त राज्यपालाची नेमणूक करावी अशी मागणी शिवसैनिकांनी यावेळी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार,ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार फौजिया खान, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार वंदनाताई चव्हाण, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे.
– ज्यांची मुलं युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांच्यासोबत बैठकीचे आयोजन
– बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद उपस्थित,
– परराष्ट्र राज्यमंत्री सर्व पालकांचे म्हणणं एकूण घेणार
– बैठकीला सुरुवात
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी आरक्षण मिळावं या संदर्भातली आजची सुनावणी उद्या होणार
ओबीसी आरक्षण संदर्भात नवीन याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्यामुळे आता उद्या म्हणजे गुरुवारी सुनावणी होणार
भारत सरकार सक्षम आहे पण तेथील विध्यार्थ्यांना आधीच का भारतात आणलं नाही.
केंद्रातील भाजप सरकारला निवडणुकीमुळे उशिरा जाग आली
त्यावेळी सर्वजण निवडणुकीत व्यस्त होते.
युक्रेन व पोलंडच्या सीमेवर विध्यार्थ्यांना लाता बुक्क्यांनी मारले जाते
उपाशी ठेवले जाते,
एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय त्याच्यावर राजकारण करत आहे
मनमोहन सिंग यांनी कुवेत च्या युद्धात 16हजार लोकांची सुटका केली होती
गाजावाजा केला नव्हता
गाजावाजा करा पण मुलांचे प्राण वाचवा
त्या ठिकाणी अमेरिका किंवा इतर देश्याचे विध्यार्थी का अडकले नाही युक्रेन मध्ये असा सवाल राउतानी केला
पीएम सी घोटाळ्यात आणि इतर बाप बेटे जर काही केलं नाही तर अटकपूर्व जामिनासाठी का धावत आहेत.
बघत रहा काय होते. आता पर्यंत तुम्ही इतरांना धमकी देत होता.
पीएमसी बँक घोटाळ्यात अटकेची भीती वाटत असेल तर सांगा
सरकारी वकिलांनी सांगितलं. त्यांच्यासाठी किडनपिंग,खंडणी या सारखे प्रकरण आहे. यात अधिकारीही जेल मध्ये जातील
काही माहिती पुराव्यासह प्रधानमंत्री कार्यालयात सुपूर्द केले आहे.
अधिवेशन संपल की मी समोर येऊन पुराव्यानिशी सांगेल
असे अनेक प्रकरणे आहेत ज्यामध्ये बाप बेटे जेल मध्ये जातील
साडेतीन नाव या साठी सांगत नाही ते अटकपूर्व जामिनासाठी जातील म्हणून नाव सांगत नाही.ते कळलच
महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रनेला झालेल्या घोटाळ्याबाबत अटक करण्याचां अधिकार आहे.
त्यात काहीच मिळाला नाही सगळं बनावट आहे.आत मी मागे हटणार नाही
आता प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्या शिवाय राहणार नाही
तुम्हाला जेल मध्ये पाठवले शिवाय राहणार नाही
थोड्याच वेळात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
आगामी निवडणुका आरक्षणासह की आरक्षणाविना ?
फैसला आज होणार
संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष कोर्टाच्या निर्णयाकडे
उत्तर प्रदेश निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नुकसान होईल – प्रवीण तोगडिया
शेतकरी आंदोलन, शेतकरी उत्पादनात हमी भाव दिला नसल्याचा फटका बसणाची शक्यता
युक्रेन-रशिया युद्धात भारताने तटस्थ राहण्याची भूमिका योग्यच
युक्रेन डमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं काम 15 फेब्रुवारी लाच सुरू करण्याची आवश्यकता होती,मात्र भारताने विलंब केल्यामुळे आज एका विद्यार्थ्यांला आपला जीव गमावला लागला
उणे 10 डिग्री तापमानात विद्यार्थी शेकडो किलोमीटर पायी चालत आहे,हे निंदनीय आहे
विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यासाठी मंत्र्यांनी तिथे जाऊन यंत्रणा राबवावी- तोगडिया
बोईसर मधील खैरापाडा परिसरातील घटना बेदम चोप देत नागरिकांनी चोरट्याला केलं पोलिसांच्या हवाली.
चोरट्याच्या बागेत आढळले मिर्ची पावडर, हातोडा , डोळ्यात मारण्यासाठी असलेला स्प्रे . बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
महिला डॉक्टरच्या सतर्कतेमुळे चोरट्याला जेरबंद करण्यात यश
– अधिवेशन वादळी असणार, असं असतेच. आत्ता जे ढग दिसतायत ते शांतेतेनं निघून जाणार
– अधिवेशनात मुळ प्रश्नाकडे ना विरोधक जात ना सत्ताधारी जात. अशी अवस्था आहे
– मुळ प्रश्नाकडे जाणं विरोधकांना जमलं नाही, उद्धवजी कमी बोलतात आणि जास्त काम करतात. त्याची प्रसिद्धी त्यांना करता येत नाही. भाजपवाले प्रसिद्धीत माहित आहे.
– भाजपवाले १०५ आमदार असून सभागृहात घेरता येत नाही. नको त्या प्रश्नाकडे ते जातात. म्हणून लोकांचा रोष वाढलाय
सुमारे 4 लाख 95 हजार रुपयांचा 99 ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ जप्त
याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले यश
शियाद ए. के (25) आणि नजब मोईद नौफर (25, दोन्ही रा. केरळ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे
त्यांच्यावर अंमली पदार्थ औषधीय मनःप्रभावी अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 22 (क) अन्वये गुन्हा दाखल
पोलीस अधिक तपास करत आहेत
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या जमीन व्यवहार प्रकरणात मागच्या आठवडाभरा पासून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक ईडी कोठडीत आहेत. त्यांची उद्या ईडी कोठडी संपणार आहे. आज त्यांची मुलगी निलोफर ही सकाळी 8 वाजता त्यांना ईडी कार्यालयात भेटायला आली होती. ईडी कार्यालयाला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. उद्या 3 मार्च ला नवाब मलिक यांना ईडी अधिकारी न्यायालयात हजर करतील. 8 दिवसाच्या तपासात काय मुद्दे समोर आले, आणि ईडी अधिकारी न्यायालयात समोर कोणते मुद्दे मांडतील हे पाहणे महत्वाचे आहे.
मालवणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांना नोटीस पाठवली आहे
दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांच्यावर एफआयआर नोंदवल्यानंतर आता मालवणी पोलिसांनी त्यांना ४ मार्च रोजी मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिशा सालियनच्या आईने एफआयआर दाखल केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे.
यवतमाळ- यवतमाळच्या वणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 147 शेतकऱ्यांची 1 कोटी 93 हजार रुपयांनी केली 2 व्यापाऱ्यांनी फसवणूक
शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करून दिला नाही चुकारा , तसेच शासनाची सुपर व्हिजन फी, अडत सुद्धा केला नाही भरणा
धीरज अमरचंद सुराणा, रुपेश कोचरे या दोघांवर वणी पोलिसात फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल
दोन्ही व्यापाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना
आपल्या छोट्या पिल्लांना जबड्यात पकडून मादी बिबटया झाली स्थलांतरित
आपल्या पिल्लाना वाचवणाऱ्या बिबट्याचा व्हिडियो सीसीटीव्हीत कैद
नाशिकच्या तळवाडे शिवारातील उसाच्या शेतात घडली घटना
ऊस तोडणी सुरू झाल्याने बिबट्याने आपल्या पिल्लाना हलवले सुरक्षित ठिकाणी
परिसरात बिबट्या सह 3-4 पिल्लं असल्याचा अंदाज
वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न
परिसरात मात्र भीतीचं वातावरण
अकोला महानगरपालिकेतील विद्यमान कार्यकारनीचा कालावधी हा 8 मार्च ला संपणार असल्याने आज होणारी सर्वसाधारण सभा ही अखेरची सभा असून पुढील सभा ही निवडणुकीनंतरच होईल….
मार्च महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होणार असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र पर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाकडून दरवर्षी अतिरिक्त बसेस सुरू केल्या जातात. यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे सध्या तरी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात अडचणीचा सामना करावा लागणार आहे…
अकोला शहरातल्या एमआयडीसी परिसरामध्ये पंधरा वर्षीय मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या नराधम पित्याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पिंपळकर यांच्या न्यायालयाने जन्मठेपेसह एक लाख 85 हजार रुपये दंड ठोठावला आहे
गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे दूध संकलनात घसरण
प्रतिदिन सोळा लाख लिटर वरून 14 लाख 50 हजार लिटर पर्यंत आलं संकलन
संकलनातील घसरणीची संघाकडून दखल
संकलन वाढीसाठी कर्मचाऱ्यांना दिला कृती कार्यक्रम
उन्हाळा होण्याआधी पुन्हा दूध संकलन वाढवण्यासाठी गोकुळ दूध संकलन करावी लागणार कसरत
विजेचा घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांनी थकवल सर्वाधिक वीजबिल
जिल्ह्यातील विजबिलांच्या थकबाकी 3109 कोटींवर
थकबाकीदरांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे तसेच सार्वजनिक सेवा आणि इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश
थकबाकीमुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी महावितरणकडून पुणे जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र
मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या वरील शाई फेक प्रकरण….
आमदार रवी राणा यांच्या अटकपूर्व जामिनासाठी आज जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार..
११ वाजता करनार अर्ज दाखल;३ वाजता होणार अर्जावर सुनावणी….
आमदार रवी राणा यांच्या वर आहे कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल….
दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने दिलेली ट्रांजिस्ट बेल तीन दिवसांपूर्वीच संपली…
आमदार रवी राणा हे आहेत सध्या मुंबई मध्ये….
– शहरात पाणी वितरणात ३५ टक्के गळती,
– जलसंपत्ती प्राधिकरणाच्या सूनावतीत महापालिकेची कबुली,
– ही गळती रोखण्यासाठी जलमापके बसविणे, जुन्या जलवाहिन्या बदलण्याच्या उपाययोजना सुरू,
– त्यानुसार पाणी वितरणातील गळती १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न,
– दररोज घेण्यात येणाऱ्या पाण्यात ५० दशलक्ष लिटर एवढे पाणी कमी घेण्यात येत आहे.
मनपाच्या पूर्व विभागाने केली एका दिवसात 12 लाखांची वसुली
25 थकबाकीदारांची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई
नोटीस बजावून थकबाकीसाठी तागादे लावत दंडात्मक कारवाई
नाशिक मध्ये रिकवरी एजंट निघाला दुचाकी चोर
गंगापूर पोलिसांनी चोरट्यांकडून केल्या दुचाकी हस्तगत
चोरट्या कडे सापडल्या चोरीच्या 20 दुचाकी
कर्जामुळे जमा असलेल्या दुसऱ्या किल्लीचा फायदा घेत
दुचाकी चोरी
ठाणे शहरास पाणी पुरवठा करणा-या भातसा धरणाच्या पाणी सोडण्याच्या दरवाजांवर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने धरणातून होणारा पाणीपुरवठा ५० टक्क्यांनी कमी झाला आहे.
त्यामुळे दि. १.०३.२२ मध्यरात्रीपासून पिसे बंधारा येथील पाण्याची पातळी कमी होणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस ठाणे शहरातील पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होईल. सदर तांत्रिक बिघाड दुरूस्तीनंतर पाणी पुरवठा सुरुळीत होईल.
नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
चार तास चाललेल्या बैठकीत दरासंदर्भात निर्णय ….
पंधरा दिवसापासून बंद असलेली जिल्हाभरातील पपई तोड आजपासून होणार सुरू…
पपईला प्रति किलो 6 रुपये 41 पैशाचा दर …..
रिफायनरीबाबत राज्य सरकार, शिवसेना सकारात्मक?
राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव जागेसाठीची अंतिम चाचपणी सुरू
केंद्र आणि राज्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती
‘रिफायनरीच्या जागा पाहणीकरता केंद्रीय पथक येणार’
रिफायनरी समर्थकांच्या भेटीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
प्रोजेक्ट फिजिबिलिटी स्टडी रिपोर्ट लवकरच तयार केला जाणार
अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत होणार गॅस लाईन चे उद्घाटन
8 महिन्याच्या आत औरंगाबाद शहरातील नागरिकांना पाईपलाईन द्वारे मिळणार घरात गॅस
265 किलोमीटरवरून औरंगाबादेत आणली जातेय गॅस पाईपलाईन
तर औरंगाबाद शहरात तब्बल 60 किलोमीटर टाकली जाणार गॅस पाईपलाईन
घरगुती वापरासह औद्योगिक वापरासाठीही दिला जाणार गॅस
आज मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार गॅस लाईनचे उद्घाटन
वीज केंद्रातून राख साठवण तलावाकडे जाणारी राखवाहिनी फुटल्याने राखयुक्त पाणी नदीत,
प्रचंड वेगाने राख युक्त पाणी नदीत जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल,
या भागातून जाणाऱ्या राखवाहिन्या जुन्या व गंजलेल्या असल्याने वारंवार होते गळती,
राख वाहिनी फुटल्याची महाऔष्णिक वीज केंद्र प्रशासनाने दिली कबुली,
मात्र काही मिनिटातच विसर्ग थांबवून राख वाहिनी गळती थांबवून दुरुस्त केल्याची दिली माहिती,
या गळतीमुळे हजारो लिटर राखी युक्त पाणी थेट नदीत मिसळल्या गेल्याने प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता
– पुणे महापालिकेच्या निवडणूक हरकतींचा अहवाल सादर करण्यास 5 मार्चपर्यंत मुदतवाढ,
– प्रारूप प्रभागरचनेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिलीय,
– २४,२५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतल्यानंतर आता त्याचा अहवाल बनविण्याचे काम सुरू आहे,
– अहवाल २ मार्चऐवजी पाच मार्च रोजी आयोगाला सादर केला जाणार.
– पुणे जिल्ह्यात वीजबिल थकबाकी ३१०९ कोटींवर,
– थकबाकी न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित होणार,
– जिल्ह्यातील ९ लाख ४३ हजार ५६४ ग्राहकांच्या वीजबिलांची थकबाकी ३१०९ कोटींवर,
– जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे.
– नागपूरात पहिली ते बारामतीपर्यंतच्या शाळा आजपासून पुर्ण क्षमतेनं
– ॲानलाईन सुरु असलेल्या शाळा आता पूर्ण क्षमतेनं ॲाफलाईन
– नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी काढले आदेश
– कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्ण क्षमतेनं ॲाफलाई शाळा सुरु
– विद्यार्थ्यी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासणं अनिवार्य
– शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं १०० टक्के लसीकरण अनिवार्य
– आता पालकांच्या संमतीपत्राची आवश्यकता नाही
महावितरण विरोधातील स्वाभिमानीच आंदोलन आज पासून आणखी तीव्र होणार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत निर्णय
शेतीपंपा ला दिवसा दहा तास वीज देण्याच्या प्रमुख मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून राजू शेट्टी यांच सुरू आहे बेमुदत धरणे
कोल्हापूर महावितरण कार्यालया बाहेर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला सरकारकडून अद्याप प्रतिसाद नाही
आंदोलनाकडे सरकारचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप
सरकारच्या वतीने चर्चा होत नसल्यान आता स्वाभिमानी आक्रमक पवित्र्यात
– नागपूरात फेब्रुवारी महिना खुनाच्या घटनेविना
– क्राईम कॅपीटलकडून सुरक्षित शहराकडे नागपूरची वाटचाल!
– नागपूर पोलीस आयुक्तांनी मानले नागपूरकरांचे आभार
– गुन्हेगार आणि अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहिम राबवल्याने यश
– नागपूरात दरवर्षी खुनाच्या १०० घटना घडतात
– फेब्रुवारी महिन्यात नागपुरात खुनाची एकंही घटना नाही
– नागपूर जिल्ह्यातील किन्ही येथील वृद्धाच्या आत्महत्येनं खळबळ
– धगधगत्या चितेत वृद्धाने त्यागला देह
– किन्ही गावातील आत्माराम ठवकर या ८०
वर्षीय वृद्धाची आत्महत्या
– सरणाजवळ ठेवला होता जळता दिवा आणि पानाचा विडा
– नागपूर जिल्ह्यातील कुही पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
– पोलीस करत आहेत आत्महत्येचा तपास
हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग..
रातोरात हॉटेल मध्ये आलेल्या ग्राहकांची झाली पळापळ..
कॅफेमधील बॉयलरने घेतला पेट,जवळील लाकडांमुळे वाढला अग्नितांडव..
रेल्वे स्टेशन जवळील लालाजी एक्झिक्यूटिव्ह नावाच्या हॉटेलच्या पाचव्या मजल्याला आग..
रात्री 11 वाजता लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेतच आगीवर मिळवले नियंत्रण.
भारतीय विद्यार्थ्यांना रोमानियातून आणण्यासाठी महाकाय एअरक्राफ्ट असलेलं सी-17 रोमानियासाठी मार्गस्थ झालंय. हिंडन एअरबेसवरुन त्यानं पहाटे उड्डान केलं.
#WATCH | Delhi: Indian Air Force’s C-17 transport aircraft takes off from its home base in Hindan for Romania to bring back Indian citizens from #Ukraine #OperationGanga pic.twitter.com/fN1aHIKNRj
— ANI (@ANI) March 1, 2022
भिवंडी शहरा लगतच्या खोणी गावात सशस्त्र दरोडा ,घरातील कुटुंबीय झोपले असता 2.30 वाजताच्या सुमारास आलेल्या 5 दरोडेखोरांनी कडी कोयंडा तोडून घरात शिरून वयस्क महिलेच्या अंगावरील सुमारे 9 तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. झालेल्या प्रकारामुळे कुटुंबीय भयभीत झाले असून दरोडेखोर नजीकच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. पोलिसांना कळविल्यावर घटनास्थळी येऊन बघून निघून गेल्याची माहिती मिळत आहे.
– तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून विषबाधा
– 125 जणांना झाली विषबाधा दुपारी प्रसाद खाल्ल्यानंतर सायंकाळी उलटी आणि मळमलिचा त्रास
– 125 पैकी काहींना उपचार करून घरी सोडले
– अद्यापही 40 जणांवर रकासवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु
– विषबाधा झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदारांसह आरोग्य प्रशासन तळ ठोकून