मुंबई : आज गुरूवार 24 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. देशात दोन वर्षांपूर्वी करोनाच्या शिरकावानंतर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध 31 मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असली तरी मास्क आणि काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.
लखनऊ-योगी आदित्यनाथ यांचा उद्या शपथविधी
दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम उपस्थित राहणार
योगी आदित्यनाथ यांच्याकडून विशेष आमंत्रण दिल्याची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच काश्मीर फाईल्सची टीम उद्या शपथविधीला लखनऊ मध्ये उपस्थित राहणार
लवकरच राज्यात एमपीएससी मार्फत भरती होणार
राज्य सरकारच्या विविध विभागात गट अ गट ब आणि गट क च्या जागा भरण्यासाठी दिलं मागणीपत्र
तब्बल 6 हजार 356 जागांच दिलं मागणीपत्र
एमपीएससी आयोगाला राज्य सरकारने दिलं मागणीपत्र
कोणत्या विभागात किती जागा भरणार परिपत्रक केलं प्रसिद्ध
लवकरच होणार भरती
नवाब मलिक यांच्याबाबतीत एवढा हट्ट का
राजीनामा का घेतला जात नाही
सरकारच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होत आहे
समान्य मानसाच्या मनात हाच प्रश्न आहे
मलिकांचा राजीनामा घेत परंपरा पाळली पाहिजे
तुमचे आमच्यावर आमचे तुमच्यावर आरोप होत आहे, आम्हीही कोर्टात जाऊ
न्यायालय एकतर्फी न्याय देते या आरोपाची नोंद कोर्टाने घेतलीय
सध्या अर्जावर अनेक मालमत्ता आपल्या नावावर जमीनी करून घेतल्या
यांनी जमिनी विकल्या आणि परत घेतल्या
फरीद मोहमद्द अली वेल्डर याला पैसे दिल्याचे दाऊच्या भावाने सांगितलं होतं
चौकशीनंतर सात दिवसात त्याचा मृत्यू झाला
एकेचाळीस लाखांना हीच प्रॉपर्टी त्याने विकत घेतली
तीच संपत्ती आता पुन्हा इसाक बागवान यांना फरीदच्या मुलाने बक्षीस पत्र म्हणून दिली
यात एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केली
नसीर बागवानच्या भावाने हे स्टिंग ऑपरेशन केलंय.
या नेत्याने बारावीला जाऊन मध्यस्थी केली
फडणवीसांनी पुन्हा एक पेनड्राईव्ह काढला
फॉरेन्सिक ऑडिटशिवाय आरोप करणार नाही
इसाक बागवान यांच्या बंधुंची त्यांच्याबाबत एक तक्रार
पण त्यांचं बारामती कनेक्शन आहे
हे सेवेत असातना त्यांनी संपत्ती जमा केली
एकट्या बारामतीत यांची बेचाळीस एकर जमीन आहे
एवढी जमीन अजित पवारांचीही नसेल
नसीर बागवान आणि इतर परिवाराच्या नावावर या जमिनी खरेदी केल्या
पुण्यात एक गुन्हा घडला त्यातून अनेक कनेक्शन समोर आले
अनेकांचे दाऊदसाठी फंडिंग करणाऱ्यांशी संबंध
अशा लोकांची ३५ लोकांची यादी
या लोकांची लिंक सलीम मर्चंटपर्यंत जाते
याचा तपास कुणाच्या दबाबाने थाबला माहीत नाही
पोलिसांनी ही केस एनआयएला दिली पाहिजे, किंवा सीबीआयला दिली पाहिजे
हे प्रकरण आठ राज्यात पसरलंय
याठिकाणी टाकलेले पैसे काश्मीरात काढले जातात
प्रवीण चव्हाण यांचा मुद्दा मी मांडला
तुम्ही एकाच केसमध्ये राजीनामा घेतला
इतर केसमध्ये राजीनामा नाही घेतला
सीआयडीच्या अनेक केसेसचे तेच वकील आहेत
यात न्याय मिळणार नाही
धुळ्यात धुलिवंदन साजरे करत असताना
अचानक दगडफेक सुरू झाली
तलवारीने हल्ला झाला
भयानक मारहाण करण्यात आली
पोलिसांनी दोन्हीकडील लोकांवर गुन्हे दाखल केले
मात्र हल्ला करणारे फरार आहेत
ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना पोलिसांनी अटक केली
या राज्यात रामचं गीत ऐकणं गुन्हा नाही
यात कडक कारवाई करण्यात यावी
शिवसेना पदाधिकारी रघुनाथ कुचेंना बलात्काराचा आरोप होऊन अटक नाही झाली
महिलेला लग्नाचे अमिष देऊन अत्याचार केला
घरच्यांवर दबाव आणला जात आहे
फडणवीसांनी चॅटिंगबाबतही सांगितलं
सत्ता पक्षातील व्यक्तीने काहीही केलं तर चालतं का
हा गुन्हा दाखल झाल्यावर अटक होण्याचा नियम आहे
मात्र अजूनही कोणतीच कारवाई नाही
फेक माथाडीची पुणे जिल्ह्यात मोठी वसुली सुरू
पुण्यातले उद्योग धास्तावले आहेत
काम न करण्याचे त्यांना पैसे द्यावे लागतात
चक्क आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे बनावट आदेश काढले
सरकारला शेवटी तक्रार करावी लागली
अधिकाऱ्यांना मोबाईलवर याचे मसेज मिळाले
अजित पवारांचा नंबर फोर्च करून खंडणी मागितली
करायचा तर दुसऱ्या कुणाचा तर करायचा, पण अजित दादांचा का?
राजेंद्र राऊतांच्या मुलाचा जीव धोक्यात
मी मोर्चा काढून पोलीस स्टेशनला घेराव घालीन
कारण पोलिसांना असे संरक्षण देणे योग्य नाही
काही नागरिक तक्रार करायला गेले तर पोलीसच दारू पार्टी करत होते
त्यांनी नागरिकानाच मारहाण केली
नाशिकच्या आयुक्तांना तक्रार देऊनही कारवाई नाही
सभागृहात बोलणाऱ्या आमदारावर खुन्नस धरतात
त्यांना तक्रारी केल्यानंतर टार्गेट करतात
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न
अनेकदा निलंबित झालेले पीआय तिथे दिले
मी त्याच पीआयची तक्रार केली
राऊत अपक्ष निवडणून आल्याने कारवाई होत नाही
गृहराज्यमंंत्र्यांनी छातीवर हात ठेवून बैठकीत काय झालं सांगावं
सोलापुरातही एक सचिन वाझे आहे
हा महिन्याला लाखो रुपये गोळा करतो
महिती अधिकार कार्यकर्त्याने ही क्विप दिली
ते सांगतात वर पैसे द्यायला लागतात
मात्र ते गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचत नाहीत
मी त्यांना पंधरा वर्षापासून ओळखतो ते तसे नाहीत
धुळ्याच्या उपनिबंधकाला वरीष्ट लिपीकाने लाच मागितली
अधिकारी एकमेकांना पैसे मगायला लागले
तुम्ही पैसे नाय दिले तर बदली करीन
विनयभंग करवण्याचीही धमकी दिली
मात्र मांडवली झाल्यानंतर पैसे देताना पकडला
दहावीच्या मुलांच्या टॅब खरेदीच्या नावावर टेंडर पे टेंडर काढले
याचाच परिणाम यशवंत जाधवांकडे मोठं घबाडं मिळालं
दोन वर्षात 38 मोठ्या संपत्तीचा गठ्ठा सापडला
असे प्रशिक्षण घेऊ नका, अन्याथा अर्थड रोडवर जावं लागतं
एकिकडे लोक कोरोनाने मरत होते दुसरीकडे हे मालमत्ता घेत होते
शेवटच्या सभेतही 6 हजार कोटींचे प्रस्ताव 30 मिनिटात मंजूर केले
मात्र यात नालेसफाईचा एकही विषय नाही
मी पेनड्राईव्ह दिल्यावर लोकांना राग येतो
मात्र त्या दिवशी लागलेल्या लाईनचाही पेनड्राईव्ह मी द्याला तयार आहे
राणी बागेतल्या टेंडरच्या किंमतीही वाढवल्या
आम्ही याची तक्रार गुन्हे शाखेकडे केली आहे
मुंबईत सर्रास लूट सुरू आहे
हायवे कंपनीवर एवढी मेहरबानी का
पिंजरा बनवणारे शाळेत जलशुद्धीकरण यंत्र पुरवत आहेत
अभय आझाद यांना अटक झाली
तो पर्यावरण प्रेमी आहे
गुन्हेगारासारखे त्याला मारलं आणि बंद केलं
त्यानं फक्त झाडं कापण्याची परवानगी विचारली
मिठार विभागानेही याचिका दाखल केली आहे
मुंबई महानगरपालेला जास्त दर कसे
सर्वोच्च न्यायालयाने यावरून चपराक लावली
आजही मी दाव्याने सांगतो, आजचे इस्टिमेटही जास्त किमतीची आहे
मुद्दाम काही गोष्टी वाढव्या
अनावश्यक गोष्टी त्यात वाढवल्या
टेंडरच्या किंमती मुद्दाम वाढवल्या जातात
मुंबईची लूट होत असल्यास न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार
पंचवीस हजार कोटींचं टेंडर काढलं
सामान्य साणसाचे बिल थकलं तर वीज कापता
मात्र बिल्डरांकडे 2300 कोटी रुपये थकले
हा भेदभाव का?
सर्व नेत्यांनी या गोष्टीचा विरोध केला
विरोधी पक्षनेते बोलत असताना म्यूट करायचे
हजारो कोटींचे टेंडर काढले
349 कोटी रुपये जमिनीला देऊनही बिल्डर समाधानी नाही
आता बिल्डर 900 कोटी रुपये मागतोय
हे उद्या तेही देतील
अनबिल्डेबल जागा पालिकेने घेतले
तसेच त्याला निवासी प्रकल्पचे आरक्षण दिलं
अल्हा मेहबान तो गदा महेरबान असे शासनाचे काम
अनेक फाईली अजूनही प्रलंबित आहेत
लोकांना औषधं मिळेनात
फडणवीसांनी पेंडेंग कामांची यादी वाचली
महापालिकेला पेंग्विनमध्ये रस
मलबार हिल एरियात रोज काहितरी नवीन दिसतं
चांगली गोष्ट आहे, मुंबई चांगली दिसलीच पाहिजे
मात्र त्याचवेळी रुग्णलयात साहित्य मिळालं पाहिजे
अंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातं अशी अवस्था
वजन पडल्याशिवाय फाईली मंजूर व्हायच्या नाहीत
अनेकदा पाठपुरावा करूनही औषध मिळाली नाहीत
यांची आपआपसात भांडणं झाली
फाईल गहाळ झाल्याची तक्रारही दिली नाही
फडणवीसांनी रोलर कोस्टल फाईल काढली
माझ्याकडे सर्व घोटाळ्यांची फाईल
हायवे नावाच्या कंपनीला एकच उरलीय समजून कंत्राट दिलं
ही हायवे कंपनी पेंग्विन आणतात, पिंजरे बांधतात
साधा यांच्याकडे जीएसटी नंबर नाही
हे डिपार्टमेंटल स्टोर्सचा नंबर वापरतात
ऑक्सिजन प्लांट उभारणीतही घोटाळा झाला
ज्या कंपन्यांना कंत्राटं दिली त्या ब्लॅकलिस्टेड होत्या
एका दिवसात कंपनीने कोर्टातून ऑर्डर आणल्या
ज्या कंपनीला 15 दिवसात हकललं
त्यांनाच पाच कंत्राच मुंबईत दिली
घोटाळ्यावर कोणतीही कारवाई होत नाही
मुलुंड कोवीड सेंटरमध्येही घोटळा
आशा कॅन्सर ट्रस्ट संस्थेच्या नावाखाली भ्रष्टाचार केला
फक्त लेटरपॅड तयार केलं
महिनाभरात या कंपनीविरोधत तक्रार केली
पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना कंत्राट दिली
घोटाळे करतानाही हे गडबडीत होते
मुंबई महापालिकेने अनेक घोटाळे केले
अनुभव नसणाऱ्या लोकांना काम दिलं
पेशंट आला नाही तरी त्यांना पैसे दिले
सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक कोविड सेंटर चालवत होते
मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे. त्यांचा फायनान्सियल रिसोर्स मॅनेजमेंटचा आकडा 45 वर आहे. आपल्यापुढे नवी मुंबई, पुणे, नागपूरसुद्धा आहे. कशाप्रकारे महापालिकेचं बजेट लुटून नेण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथं फक्त लुटीचं काम सुरु आहे.
सफाई कामगाराच्या नावावर आपल्या तिजोऱ्या कशा भरल्या हे अमित साटम तुम्हाला व्यवस्थित सांगतील. जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा, एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. यूएनने कौतुक केलं, कोर्टानं कौतुक केलं, पण हा भ्रष्टाचार, हे घोटाळे त्यांच्यासमोर जायला हवेत.
मुंबई मेली तरी चालले असे प्रशासन वागत आहे
यावर आम्ही बोललो तर आम्हाला शत्रू म्हणतात
आणि मराठी माणसाला दैवत बनून लुटणार
मुंबईतल्या माणसाच्या लक्षात आलंय की प्रेताच्या टाळूवरचं लोणी कुणी खाल्लं
कोरोनाकाळात मुंबईतलं एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही
हे घोटाळे कोर्टापुढे गेले पाहिजेत
कौतुक केल्यावर पाठ थोपटून घेता
फडणवीसांनी घोटाळ्यांची यादी वाचली
मुख्यमंत्र्यांचं भाषण चांगलं होतं
मात्र देण्याच्या नावाखाली तुम्ही घेताय
मुंबई महापालिकेचं बजेच शिवसेने लुटलं
सफाई कामगारांच्या नावावर तुम्ही तुमच्या तिजोऱ्या भरल्या
देशात पंचेचाळीसाव्या नंबरवर मुंबई आहे
नागपूर मुंबईच्या पुढे गेली आहे
पालिकेतली सत्ता हवी म्हणून फक्त मुंबईकडे पाहिलं
मुख्यमंत्र्यांना फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर
मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांएवढा कुणी केला नव्हता
मुंबईचा विचार सोन्याचं अंड कोबंडी म्हणून विचार केला गेला
काही योजना करायच्या आहेत पण आपल्या हातात नाही
धारावी पुनर्विकास करण्याचं मनात आहेत
धारावीचा विकास व्हायला पाहिजे
केद्रासोबत आमचं बोलणं सुरू आहे
रेल्वेच्या जागा हस्तारिंत संदर्भात बोलणं सुरू
रेल्वेच्या जागा अजून हस्तारिंत होत नाही
आमदारांना आपण घर देणार आहोत
जोपर्यंत आपण अपार्टमेंड अॅक्टमध्ये बदल करत नाही
तोवर हा बदल होणे शक्य नाही
ज्या तरतुती आपण कॉपरेटिव्ह अॅक्टमध्ये केल्या
त्याच तरतुदी अपार्टमेंट अॅक्टमध्ये कराव्यात
आघाडी सरकार काम करून दाखवत
फक्त घोषणा करत नाही
आम्ही दिलेला शब्द पाळतो
केंद्राच्या जागेचा वादही सोडवणार
सफाई कामगार, नोकरदारांना दिलासा देणार, सर्वांंना घरं मिळणार
शहरातील जनतेचा या योजनेत विचार
मुंबईत आमदारांसाठी 300 घरं बांधणार,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा,
सेना आमदाराच्या मागणीवर निर्णय
हक्काची घरं लोकांना मिळवून देणार
या योजना आणल्याबद्दल मंत्र्यांचे आभार
मुंबई सोन्याची कोंबडी, तिचं अंडे दुसरे नेत आहेत
महाविकास आधाडी नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर येणार
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावरून चित्रा वाघ यांची राष्ट्रवादी आणि जयंत पाटलांवर टीका,
– एक महिला म्हणून मला खुप वाईट वाटते, एक व्यक्ती एक पद असा जर न्याय असेल तर त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचाही राजीनामा घ्यायला पाहिजे मग,
– आमच्या काळात महिला आयोगाच्या अध्यक्षांकडेही राष्टीय पातळीवर पद होते म्हणून आम्ही राजीनामा घेतला नाही, एक महिला म्हणून खुप वेदनादायी आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप,
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत उघड झाली बाब,
125 कोटी रुपयांच्या एकूण कामांमधील 50 टक्केही काम झाले नसल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा दावा,
या कामात दोष दाखविणारा थर्ड पार्टी ऑडिट संस्थेने दिलेला तपास अहवाल देखील फेरफार केल्याचा आरोप,
शेतकऱ्यांसाठी राबविली गेलेली ही योजना त्यांच्यापर्यंत न पोहोचल्याने आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी
साक्षीदार क्रमांक 243 फितूर घोषित,
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात सुरू आहे सुनावणी
आरोपींना ओळखत नसल्याचं साक्षीदारानं न्यायालयासमोर कबूल केलं
साक्षीदारानं ATS वर केलेत गंभीर आरोप
पुण्यातील नवी पेठेत मनसे आणि शिवसेनेचं कार्यालय शेजारी शेजारी
मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं होतं
तर अलीकडे शिवसेनेच्या प्रसाद काकडे यांनी कार्यालय सुरु केलंय
निवडणुकीच्या तोंडावर कार्यालयात नेत्यांची हजेरी वाढलीये
मात्र शिवसेना आणि मनसेचं कार्यालय शेजारी शेजारी असल्यानं चर्चांना उधाण आलंय
मनसे आणि शिवसेना एकत्र येणार का.? अशी चर्चा सध्या सगळीकडे रंगतीये…
या सरकारचे पुतण्या मावशीचे प्रेम आहे – प्रवीण दरेकर
पालिकेत 150 उमेदवार आहेत त्याना इंग्रजीत शिक्षण घेतले म्हणून नाकारले
मराठी माध्यमाची पटसंख्या घटत आहेत
मराठी शाळा वाचवण्यासाठी काय भूमिका घेतली
सुभाष देसाई म्हणतात याला पालक जबाबदार
जर तुम्ही चांगली यंत्रणा दिली तर कुणीही पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणार नाहीत
मराठी शाळासाठी काय करणार हे सांगा? आणि त्या 150 उमेदवाराना सेवेत घ्या
इंधन दरवाढी विरोधात परभणीत युवक काँग्रेस आक्रमक ,
युवक काँग्रेस कडून पेट्रोल पंप येथे दरवाढी विरोधात साखर वाटून अनोखा आंदोलन ,
5 राज्यांच्या निवडणूका संपल्या की अपेक्षित इंधन दरवाढ सुरू झाल्याने काँग्रेस कडूम आंदोलन .
विदर्भासाठी स्वतंत्र कार्यालय सुरु करण्याची शिवसेना कार्यकर्त्यांची मागणी …
या कार्यालयात शिवसेनेच्या वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी उपस्थित राहिल्यास पक्ष वाढीस मदत होईल,
शिवसंवाद यात्रेसाठी चंद्रपुरात आलेल्या खासदार हेमंत गोडसे यांची माहिती,
मुंबई आणि विदर्भात खूप अंतर असल्याने प्रत्येक निर्णयासाठी मुंबई ला जावं लागू नये अशी कार्यकर्त्यांची भावना
कर्नाळा नागरी सहकारी बॅंक घोटाळा
विवेक पाटील यांना ईडी ने अटक केली असून ते न्यायलाईन कोठडीत आहेत
5 लाखांच्या ठेवीचे संरक्षण आहे त्यामुळे त्यांचे पैसे मिळाले मात्र अजूनही 170 कोटी देणं बाकी आहेत
विवेक पाटील यांच्या मालमतेचा लिलाव झाला पाहिजे
त्यातून ठेविदारांचे पैसे परत मिळाले पाहिजे
– इडीच्या कारवाया करा, काही लोकांचं म्हणनं आहे की या कारवायांचे कागदपत्र २०१७ रोजीच दिल्लीत गोळा झाले… असं असतानाही शिवसेनेनं मविआत येण्याचा धाडसी निर्णय घेतला…
– महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झूकला नाही, इडी आणि एजंसीचा जो मारा होतोय ते पाहून लोक शांत बसणार नाही…
– 1600 पेक्षा जास्त केसेस झालेया पण ९ निकाली लागल्या… नाव खराब करण्याचं षडयंत्र, राजकिय फायदा होईल, पक्ष घाबरेल म्हणून कारवाई, महाराष्ट्र झुकत नाही…
– मविआचे सर्व घटक पक्ष आहेत त्यांना विचारलं तर आम्हाला निवडणुका नकोत , मध्यावधी भाजपला हवीये, सरकार चालताना ते बघावत नाही.. ताकत लावत आहे.. अजून अडीच वर्ष हेच करणार… पुढील पाचवर्षही प्रयत्न करावे लागतील…
– राज्यात चर्चा आहे की जलयुक्त घोटाळा, टिईटी घोटाळा, नोकरभरती घोटाळ्यात काय घडलं, याबद्दलही सत्य जनतेसमोर यायला हवं… लोक विचारत आहेत याची ऊत्तरं का मिळत नाही… मग काय सत्य आहे ते ऊघड व्हायला हवं.. ही लोकांची भावना… (सुचक वक्तव्य)… मागच्या सरकारच्या ज्या चुका आहेत त्या समोर येत असतील तर चुक काय imp
– कीतीही मारा, हल्ला करा, मविआचा आमचा किल्ला मजबूत, महाराष्ट्र ऊत्तर प्रदेश, बिहार नाही, जनता सुज्ञ..
– लोकांचे प्रश्न मांडत नाही… भाजप फकित राजकारण करतंय…
यंदाच्या आयपीएल मॅचवर दहशतवादाचं सावट ?
वानखेडे स्टेडियमची दहशतवाद्यांकडून रेकी ?
ट्रायडेंट हॉटेल परिसराची दहशतवाद्यांकडून रेकी ?
एटीएसच्या चौकशीत दहशतवाद्यानं कबुली दिली – सुत्र
गेल्या 28 महिन्यात अनेकवेळा आशा धमक्या दिल्या गेला
अश्या धमक्यामुळे तुमची प्रकरण काढण थांबवणार नाही
जयंत पाटील यांनी कोणती प्रकरण दिली माहीत नाही
या आदी दोन प्रकरण दिली त्यात ते तोंडावर पडले
एक विषय देवस्थान समिती जमिनीचा होता पण त्यात काहीच झालं नाही
त्यांना काय करायचं ते करू दे
प्रसाद लाड माझ्यावर असे अनेक प्रयोग झाले
बावनकुळे च्या बाबतीत पण असच झालं आहे
पुण्यातील दत्तनगर , भारतनगर, महादेव नगर भागात पाणी येत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन
महापालिकेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं
प्रशासक विक्रम कुमारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली
लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय..
यावेळी महिला कार्यकर्त्या हंडा घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या
महादेवनगरमधील पाण्याच्या टाकीजवळ हे आंदोलन करण्यात आलं..।
नाशिक – महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रं रमेश पवार यांच्याकडे
कैलास जाधव यांच्या तडकाफडकी बदलीनंतर पवार यांनी घेतला चार्ज
म्हाडाच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आयुक्त कैलास जाधव यांची झाली बदली
प्रशासकीय राजवट असताना नवीन आयुक्तांनी घेतला चार्ज
नवीन आयुक्त रमेश पवार मातोश्रीच्या जवळचे असल्याची चर्चा
महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार निलंबित
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची विधानसभेत घोषणा
भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी उगारला बडगा
अन्य भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्धही चौकशी व कारवाईचे उर्जामंत्र्यांनी दिले संकेत
मुंबई : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक आणि महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार यांच्यावर भ्रष्टाचार व नैतिक अधःपतनाच्या गंभीर आरोपांची दखल घेत त्यांना निलंबित करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज विधानसभेत दिले.
बेपत्ता असलेल्या इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ
बेपत्ता असलेल्या चेतन खंदारे या 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळूनआला विहरित .
पालघर – बोईसर रस्त्यावरील उमरोळी येथील मोहरे ब्रिज जवळ आढळून आला मृतदेह .
तीन मार्च पासून चेतन बेपत्ता असल्याची बोईसर पोलीस ठाण्यात होती तक्रार दाखल .
चेतन पालघर मधील सेंटजॉन्स कॉलेज मधील सिव्हिल इंजिनिरंगचा शेवटच्या वर्षातील विद्यार्थी .
चेतन ची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप .
पालघर पोलीस घटनास्थळी दाखल .
– श्रीधर पाटणकर यांची एक संपती जप्त केल्याची माहितीत मिळत आहे ना, पुर्ण माहिती मिळाली की बोलू
– तेलाच्या किंमती वाढत आहे. काल संसदेत महागाईवर चर्चा झाली आणि सभागृह चालू दिलं नाही
– आता निवडणूका संपल्या, हेच भाजपचं धोरण आहे. चाल आहे. लोक यात फसतात
– देशात पुन्हा एकदा महागाईवर एक महौल बनणार, खरी समस्या रशीया युक्रेन, हिजाब, काश्मिर फाईल नाही, देशाची खरी समस्या बेरोजगारी आणि महागाई आहे
– मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अनेक वेळा आमदारांना जेवायला बोलावलं जाते, ही परंपरा आहे.
– महाराष्ट्रात, आणि बंगालमध्ये राज्यपाल दोन्ही सरकारवर निशाना साधतात. आणखी राज्यात राज्यपाल आहे. आणखी इतर राज्यात ईडीचे कार्यालय असू शकतात.
– जिथे भाजपचं सरकार नाही तिथे राज्यपाल आम्हाला टार्गेट करतात. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या
– विदर्भात प्रतिनिधीत्व देण्याबाबत मुख्यमंत्री गांभीर्याने विचार करत आहे. विदर्भाला लवकरंच प्रतिनिधीत्त्व मिळेल
– केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं सुडाच्या भावनेनं, बंगल्याच्या भावनेनं कारवाई करत आहेत. त्यात पद्धतीनं महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचं गृहमंत्रालय कधीच करणार नाही.
– महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची प्रतिष्ठा, परंपरा आहे. विरोधीपक्ष नेते कितीही बोंबलले की सुडाच्या कारवाया सुरु आहे. जर आम्हाला सुडाच्या करायच्या असले तर आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. आम्हाला त्याची आवश्यकता नाही
– निल सोमय्यांबाबत सरकारकडे काही पुरावे देण्याचं की केलं, त्यापुढचं काम तपास यंत्रणांना करायचं आहे. पुराव्यात काही दम असेल तर पोलीस कारवाई करतील, माझा आणि सरकारचा दबाव नाही. तपास यंत्रणा स्वतंत्र आहे
– मला भिती वाटते की आमच्या एखाद्या शिवसैनीकाची वडापावची गाडी असेल त्याच्यावर सुद्धा ईडी कारवाई करेल
– कर्नाटकात काही मंदिराबाहेर मुस्लीमांना दुकान लावण्याची मनाई हे चुकीचं आहे. राजकीय स्वार्थासाठी असं वातावरण निर्माण केलं तर देशात स्वातंत्र्यापुर्वीची परिस्थिती निर्माण होईल
उत्तर प्रदेश मधून डोंबिवलीत गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे घेऊन येणाऱ्या तरुणाला बाजार पेठ पोलिसांनी कल्याण गोविंदवाडी परिसरातून अटक केली आहे. महेश पवनीकर असे या तरुणाचे नाव असून तो डोंबिवली आजदेपाडा मधील रहिवासी आहे. आपल्यावर हल्ला होणार असल्याने स्वसरक्षणासाठी गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस आणल्याचा दावा आरोपीने केला आहे . प्रत्यक्षात त्याने हे कट्टा कशासाठी कोठून आणले याचा पोलीस शोध घेत आहेत.दरम्यान उत्तर प्रदेश मधून येणाऱ्या आरोपीकडे घातक अग्निशस्त्र सापडू लागल्याने पोलिसाची डोकेदुखी मात्र वाढली आहे .
पुण्याचं विमानतळ कुठेही हलवलं जाणार नाही
याच ठिकाणी आम्ही आणखी जागा घेऊ आणि यालाचं आंतरराष्ट्रीय दर्जाच बनवू
बारामतीत चार विमानतळ झाली तरी हरकत नाही
पण हे विमानतळ कुठेही जाणार नाही
खासदार गिरीश बापटांची माहिती
शरद पवार आणि अजित पवारांवर अप्रत्यक्ष टिका
शरद पवार जर आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात जर केंद्रीय मंत्र्यांना भेटणार असतील आणि सरकारने जर बोलावलं तर मी जाणार
मात्र विमानतळ विस्तारीकरणाने विमानांची संख्या वाढणार आहे आणि प्रवाशांचीही संख्या वाढणार आहे
13 एकळ जागेत विस्तारीकरण होणार
पुरंदर विमानतळ टेक ॲाफ करण्याची वेळ असताना महाराष्ट्र सरकारनं अडचण आणली
खासदार प्रकाश जावडेकर
पुण्यातील होऊ घातलेल्या विमानतळ संदर्भात ज्योतिरादीत्य सिंधिया यांची भेट घेतली
सध्याच्या एअरपोर्ट मधील कार्गो हब हलवण्यासाठी डिफेन्सनं जागा देऊ केली आहे.
पुणे विमानतळ टर्मिनल हवे आणि जोडले जाईल.
पुणे विमानतळ अडचणी सांगितल्या. त्या सोडवण्याचे सिंधियांनी मान्य केली.
पुरंदरची जागा संदर्भात सर्व परवानग्या मिळाल्या होत्या परंतु सरकार बदलल्यानंतर विनाकारण लांबवण्याचा खेळ चालू आहे.
पूर्वी मंजूर केलेल्या जागेवर लगेच कार्यवाही सुरू करता येईल. महाराष्ट्र सरकारनं मूळ प्रस्तावाला मान्यता द्यावी.
आडकाठी आणण्याचं काम महाविकास आघाडी करतंय.
महाविकास आघाडी सरकारनं पाप केलंयः विनय सहस्त्रबुद्धे
राज्य सरकारने विमानतळाबाबत सहकार्य करावं मुरलीधर मोहोळ
मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक म्हणून कुणावर कारवाई झालेली नाही
कंपन्यांमध्ये अनियमितता यामुळे कारवाई झाली आहे
युक्रेनमधून विद्यार्थ्यांना भारतात सुरक्षित आणल्याबद्दल मी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच अभिनंदन केलं
रामदास आठवले यांची प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज घेतली मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट
राज्यात राजकीय टोळी युद्ध सुरू आहे
शेतकरी ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडून राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांचे कपडे उतरविण्यात रंगले आहेत
आम्ही एफआरपी चा मुद्धा घेऊन लढत आहो शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव निश्चित होणे गरजेचे आहे त्यासाठी आमची लढाई सुरू आहे
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही आम्ही मात्र शेतकर्यांना न्याय दिल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही
शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळाली पाहिजे
रात्री वीज दिली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री काम करावं लागतं त्यांच्या वर जंगली प्राण्यांचे हल्ले होतात शेतकऱ्यांचा जीव जातो
गडचिरोली पोलीस दलातील 416 रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिली
150 पोलीस शिपाई, 161 पोलीस शिपाई चालक आणि 105 सशस्त्र पोलीस पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश
गृह विभागाकडून तसे आदेश जारी करण्यात आले असून थेट पोलीस घटक स्तरावरून ही पदे भरण्याचे निर्देश गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकाना देण्यात आलेले आहेत.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या अनेक तरुण आणि तरुणींना मोठा दिलासा मिळाला
गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे नक्षलग्रस्त भागातील तरुण-तरुणींना मोठी संधी मिळणार
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
2021 च्या एमपीएससी गट अ परीक्षेतील 8 प्रश्न आयोगानं केले रद
उत्तरतालिका प्रसिद्ध होताचं 8 प्रश्न रद्द करण्यात आलेत
प्रश्न ऐनवेळी रद्द केल्यानं विद्यार्थी आयोगावर नाराज आहेत
रद्द केलेल्या प्रश्नाचा 1 मार्क देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे
390 पदांसाठी ही पुर्व परीक्षा घेण्यात आली होती ..त्यामधील हे 8 प्रश्न रद्द करण्यात आलेत.
– शिवाजीनगर परिसरातील नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार,
– ओळख असल्याचा बहाणा करुन ११ वर्षाच्या मुलीला शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार,
– घटना शिवाजीनगर परिसरातील एका मुलींच्या शाळेत सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडलीय,
– याप्रकरणी डेक्कन परिसरात राहणार्या एका महिलेने दिली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद.
नागपूरच्या वाठोडा परिसरात हत्या,
मोबाईल फोडण्याच्या शिल्लक कारणावरून हत्या,
सल्लूराम उर्फ रिंकू कुमार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव,
प्रदीप कुमार असं आरोपीचं नाव,
डोक्यावर दंडा मारून केली हत्या
शिवसेना नेते विनायक राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघात
या पडलेल्या धाडी नसून पाडलेल्या धाडी आहेत
सध्या देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे
आघाडी सरकारमधील नेत्यांच्या कुटुंबाना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे
हा सरकार पाडण्याचा केंद्र सरकारचा कुटील डाव आहे
मी येईन म्हणणाऱ्या नेत्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत
महविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे आणि पुढची पाच वर्षे टिकणार आहेत
स्वतंत्र भारतात सर्वात जास्त यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे
ब्राम्हण समाजाची भावना दुखावली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो
– नंदकिशोर कुठे हे आदित्य ठाकरेंना विचारा… त्यांच्याच कंपन्यांत गुंतवणूक…
– अनेक कंपन्या टेक एन्हर केल्या… त्यांना बहूतेक वर्षा किंवा मातोश्री इथे लपवलं असेल…
– कर्जतला असेलेली हिंदू देवस्थानची जमिन श्रीधर पाटणकर यांनी घेतलीये… अनेक जमिनींचे घोटाळे केलेयत, पैसे ब्लॅकचे व्हाईट केले ,
– मन्सुख हिरेनला वाझे आणि शर्माने मारलं… मन्सुख हिरेनची हत्या केल्यानंतर ठाकरे कुटूंबाला लाज वाटली पाहीजे… नंदकिशोर चतुर्वैदीचं माफीया सेना काही करू शकते… ठाकरे सरकारने कितीही प्रयत्न केला तरी नंदकिशेर चतुर्वेदीला शोधून काढणार…
– चंद्रकांत पटेल आणि ऊद्धव ठाकरे हे खूप जवळ आहे… महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात येणार की हे माफिया सरकार आहे…
– एक माफिया दुसर्या माफियाला वाचवतो… काल ऊद्धव ठाकरेंनी एनसीपी कांग्रेसला बोलावून सांगितलं की मी अडचणीत आहे, मला वाचवा… म्हणून संजय कदमला पुढे केलं, आम्ही थांबणार नाही, चलो दापोली , शणिवारी मोठं आंदोलन करणार…
– माझ्यावर आरोप झाले, राकेश वाधवानशी संबंध, ७ जणांचे स्टेटमेंट रेकाॅर्ड केले, कोर्टाने सांगितलंय की नील सोमय्यांविरोधात काही संबंध नाही… तो निर्दोष आहे, स्वताचं सरकार हसं करून घेतंय, जितेंद्र नवलानीचंही प्रकरण लवकरच बाहेर येणार…
– सरकार मुर्खाच्या स्वर्गात … डर्टी डजनवर कारवाई होतच राहणार…
केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन
पुण्यातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ आंदोलन
कार्यकर्ते जमायला सुरुवात !
पीएमपीतील 89 चालक आता होणार कंडक्टर
कंडक्टरची संख्या अपूरी असल्यानं पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला निर्णय
कंडक्टरसाठी आवश्यक असणारं बँच व लायसन्स काढून घेण्याच्या दिल्या सूचना
कंडक्टर नसल्याने गाड्या विविध मार्गावर सोडण्यास अडचणी येतायेत
त्यामुळे पीएमपी प्रशासनाने हा निर्णय घेतलाय…
इडीने धाडसत्र राबवलेल्या काही कंपन्यांना इओडब्ल्यूने पाठवल्या नोटीस
– वरळीतील सेना नेते अरविंद भोसले यांच्या तक्रारीनंतर इकोनाॅमिक आॅफेंस विंग सक्रिय…
– छोपेमारीच्या नावाखाली वयुलीचं रॅकेट इडीकडून सुरू असल्याचा तक्रारीत ऊल्लेख… याची सखोल केली चौकशीची मागणी…
– इडीने धाडसत्र राबवलेल्या काही कंपन्यांना इओडब्ल्यूने पाठवल्या नोटीस…
– जितेंद्र नवलानीच्या साथिने इडीने अनेक व्यापार्यांना मनी लाॅंड्रींग केसमध्ये अडकवण्याच्या नावाखाली खंडणी ऊकळल्याचा आरोप…
– २०१५ ते २०२० या कालावधीत ६० कोटीं रुपये कंसल्टंसी फिस च्या नावाखाली घेतल्याचा मुख्य आरोप..
– तपासात तथ्य आढळल्यास होणार इडी अधिकार्यांच्याही चौकश्या
एसटीच्या विलीनीकरणासाठी स्थापन केलेल्या समितीनं हायकोर्टात अहवाल केला सादर
समितीच्या अहवालात विलीनीकरण शक्य नसल्याचं म्हटलंय
तरीही एसटी कर्मचारी आपल्या संपावर.ठाम आहेत
जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत माघार नाही कर्मचाऱ्यांची भूमिका
स्वारगेट डेपोत बाहेरच्या डेपोतील येणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त
मात्र स्वारगेट आगारातील कर्मचारी अजूनही संपावर
– लग्नाचे अमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
– सोलापुरातील जोसभावी पेठ पोलिस स्टेशनमध्ये पोक्सो कलामांतर्गत गुन्हा दाखल
– 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस 22 वर्षाच्या आरोपीने लग्नाचे आमीष दाखवत केला अत्याचार
– आरोपीने जानेवारी महिन्यात मोहोळ येथे नातेवाईकाच्या घराशेजारील पत्र्याच्या खोलीत केला अत्याचार
– घडलेला प्रकार मुलीच्या आईला कळल्यानंतर जोडभावी पेठ पोलिस स्टेशनमध्ये दिली फिर्याद
– झिरो क्रमांकाने गुन्हा दाखल करुन मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा वर्ग केला जाणार असल्याची माहिती
नाशिक – शिंदे टोलनाका बंद करा
संगमनेर जवळील हिवरे पावसा मधील टोल नाक्यात समाविष्ट करा
शिंदे टोल नाक्यामुळे 18 वर्ष नागरिक वेठीस धरले जातील
नितीन गडकरी यांच्या घोषणे नंतर शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांची मागणी
महामार्गावरील 60 किलोमीटरच्या आतील टोल बंद करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
एनडीएत जाणाऱ्या मुलींसाठी महत्वाची बातमी
खडकवासला या ठिकाणी असलेल्या एनडीएमध्ये जूनपासून मुलींसाठी पहिल्या तुकडीचं प्रशिक्षण सुरू होणार
पहिल्यांदाच एनडीएत मुलींची भरती होणार .
एकुण 19 जागा यासाठी आहेत आर्मीसाठी 10 जागा एअर फोर्ससाठी 6 जागा तर नेव्हीसाठी 3 जागा आहेत.
एनडीएकडून ही माहिती देण्यात आलीये जूनपासून प्रशिक्षणाला होणार सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला आणखी एक दणका ?
श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील श्री साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेडवर मंगळवारी कारवाई केल्यानं तर, ईडीने पचपाखाडी भागातील त्यांच्या दुसऱ्या मालमत्तेवरही कारवाई करण्याची तयारी सुरू केलीय.
ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी काल या गृहनिर्माण प्रकल्पाला भेट दिल्याने श्रीधर पाटणकर यांच्यामागे कारवाईचे शुक्लकाष्ठ कायम राहील असे बोलले जात आहे.
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना खंडपीठाच्या दणका
निविदेशिवाय कार्यकर्त्याला प्लॉट देणे पडले महागात
शशिकांत वडाळे या कार्यकर्त्याला निविदा प्रक्रिया न करता दिला होता प्लॉट
एमआयडीसीतील प्लॉट केला होता ऍलोट
सुभाष देसाई यांच्या शिफारशीनंतर देण्यात आला होता प्लॉट
औरंगाबाद खंडपीठाने प्लॉटचा ताबा घेण्यास केली मनाई
पंजाबचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणार
भगवंत मान घेणार नरेंद्र मोदी यांची भेट
दुपारी एक वाजता होणार मोदींची भेट
प्रोटोकॉल प्रमाणे भगवंत मान यांची कोरोना टेस्ट
रिपोर्ट निगेटिव आल्यानंतर मान मोदींना भेटणार
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच घेणार पंतप्रधानांची भेट
सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एकाची कोयत्याने वार करुन हत्या
पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय
मारुती लक्ष्मण ढेबे (वय 20, सध्या रा. वारजे, मूळ रा. धनगरवस्ती नांदेड ता. हवेली.) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असण्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.
पाच ते सहा जणांनी कोयत्याने सपासप वार केले..आरोपींचा शोध सध्या घेतला जातोय..
बुलडाणा
जिल्ह्यातील 200 ग्रामपंचायत सदस्यांचे पदावर गंडांतर येण्याची शक्यता,
निर्धारित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते,
जिल्ह्यातील 862 ग्रामपंचायत सदस्यांनी जात प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी यांनी कारवाईचा ईशारा दिला होता
आता त्याची मुदत संपली असून 200 सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही
प्रदूषणामुळे २०२१ मध्ये मुंबईतील ९१०० नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादाय माहीती ऊघड…
जगातील ६,४७५ प्रदूषित शहरांमध्ये मुंबई १२४व्या स्थानावर आहे. ‘
आयक्यू एअर’ या संस्थेने मंगळवारी जाहीर केलेल्या २०२१च्या ‘जागतिक हवा गुणवत्ता अहवाला’तून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे…
मुंबईत २०२० या वर्षांत ४१.३ मायक्रोग्रॅम घनमीटर एवढे ‘पीएम २.५’चे प्रमाण होते.
त्यात वाढ होऊन २०२१ साली हे प्रमाण ४६.४ मायक्रोग्रॅम घनमीटर एवढे झाले.
त्यामुळे मुंबई हे जगातील ६,४७५ प्रदूषित शहरांपैकी १२४व्या क्रमांकाचे शहर ठरले आहे.
नवी मुंबई ही मुंबईपेक्षा अधिक प्रदूषित असून ७१व्या स्थानी आहे.
चंद्रपूर ११३व्या, पुणे १९६व्या, नाशिक २१५व्या स्थानी आहे…
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त
कोविड रुग्णालय आणि गृहविलगीकरण कक्षात एकही रुग्ण नाही
जिल्हा आरोग्य प्रशासनाची माहिती
कोरोनाचे नियम पाळा मास्कचा वापर करा असे रत्नागिरीकरांना आरोग्य विभागाचे आवाहन
नाशिकच्या राणे नगर येथील उड्डाण पुलावरती तीन वाहनांचा अपघात
मुंबईकडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांना पाठीमागून धडक
अपघातात रस्त्याच्या डिव्हाडर वरती झोपलेल्या एकाचा मृत्यू
घटनास्थळी अंबड पोलीस दाखल
-देहूरोडच्या शिवाजीनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा
-याची तक्रार देहूरोड कन्टोन्मेंट बोर्डाला अनेकदा केली मात्र त्याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकाचा आरोप
-नेमकं दूषित पाणी कोठून येतंय याचं निदान लागत नसल्याने नागरिकांना दूषित पिण्याचे पाणी पिण्याची वेळ आलीय
-या परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर याचा शोध लावावा आणि पिण्यायोग्य पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
बारावीची परीक्षा देण्यासाठी जामिनावर बाहेर आला अन खून केला
सांगलीत रोहन नाईक या तरुणाच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीबद्दलची माहिती समोर
एका खून प्रकरणी हा आरोपी कारागृहात होता मात्र बारावी परीक्षा देण्यासाठी तो जामिनावर आला होता
परवा संध्याकाळी सांगली स्टॅंडकडे जाणाऱ्या रोडवर रोहन नाईकचा झाला होता खून
आतापर्यंत या खून प्रकरणी दोघेजण अटकेत असून या मुख्य संशयिताचा अद्याप शोध सुरूय
रत्नागिरी- कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाची तपासणी अंतिम टप्यात
विदुयतीकरणाच्या तपासणीचा आजचा शेवटचा दिवस
रत्नागिरी ते वेर्णा या विद्युतीकरणाची सुरक्षा यंत्रणेकडून दोन दिवसांपासून होतेय तपासणी
सुरक्षा यंत्रणेनी ग्रिन सिग्नल दिल्यास कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या विजेवर धावणार
वर्षाला कोकण रेल्वेचा २०० कोटींची बचत
मुंबई ते वेर्णापर्यत कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पुर्ण
ह्यावर्षी 35 टक्क्यांनी खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वाढणार ,
वार्षिक पत आराखडा अंतिम टप्प्यात,
मागील वर्षीच्या पत आराखडा कमी होऊन 3 हजार 710 कोटींचा झाला होता,
परिणामी जिल्ह्याच्या स्थूल उत्पन्नावर झाला होता परिणाम,
मात्र ह्यावर्षी त्यात वाढ होणार आहे
– नागपूर महानगरपालिका स्टेशनरी घोटाळ्यात आरोपपत्र दाखल
– नागपूर पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं १८०० पानांचं आरोपपत्र केलं देश
– स्टेशनरी घोटाळ्यातील पाच आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल
– स्टेशनरी घोटाळ्यात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता
– मनपा कार्यालयात स्टेशनरी न पुरवतात उचलले कोट्यवधी रुपयांचे बिलं
– महानगरपालिकेच्या चार विभागात तीन कोटींचा घोटाळा झाल्याची शक्यता
पुणे
महापालिकेनं महा मेट्रोला दिलं पत्र
पत्राला महा मेट्रोनं दाखवली केराची टोपली
शहरातील मेट्रोच्या कामासाठी पाणी महापालिका मोफत देत आहे फक्त पाणी वाहतुकीचा खर्चे मेट्रोला करायचा आहे
मात्र एसटीपीद्वारे शुद्ध केलेलं पाणी मेट्रोसाठी वापरण्यात यावं अशी मागणी पालिकेनं केली होती
मात्र यावर कोणताचं प्रतिसाद मेट्रो प्रशासनाने दिला नाही..
50 टक्के अकोलेकर झाले पूर्ण लसवंत…तर 50 टक्के अजूनही बाकी…
अकोला : कोविडपासून सुरक्षा म्हणून सुमारे दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जात आहे…
याअंतर्गत आतापर्यंत 50.99 टक्के अकोलेकरांनी लसीचे दोन्ही डोस घेत स्वतः आणि कुटुंबीयांना सुरक्षा कवच प्रदान केले…तर
अजूनही 50 टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही….
पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 77.85 टक्के असून…अजुनही सुमारे 22.15 टक्के नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही…
महापालिका आयुक्त प्रशासक विक्रम कुमार यांच्या कामाचा धडाका सुरूच
अतिक्रमणानंतर आता मोर्चा खाजगी जागेत झालेल्या विकासकामांकडे
1 मार्च आधी निघालेल्या वर्क ऑर्डरची केली जाणार तपासणी
कोणी नगरसेवकानं खाजगी जागेत विकासकामं दाखवून निधी उचलला आहे का ? याची केली जाणार चौकशी
महापालिकेच्या दक्षता समितीवर दिली ही जबाबदारी !
– नागपूरात १२ ते १४ वयोगटातील मुलांना शाळेतच मिळणार लस
– लसीकरणाला गती देण्यासाठी नागपूर मनपाचा निर्णय
– मुलांना मनपा, शासकीय, निमशासकीय शाळांमध्ये लसीकरणाची सोय
– लसाकरणासाठी मुलांना शाळेतंच उपलब्ध होणार कोर्बेव्हॅक्स लस
– १५ मार्च २०१० पर्यॅत जन्मलेली मुलं लसीकरणास पात्र
– आतापर्यंत नागपूरात अवघ्या २७५० मुलांनी घेतली लस
विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या महाउपोषणाला 20 दिवस पूर्ण….
शेतजमिनीच्या वाढीव मोबदला मिळण्याबाबत अद्यापही तोडगा नाही…
संतप्त आंदोलक शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना लिहले शेकडो पत्र….
आंदोलन स्थळी आता गुरे ढोरे बांधन्याचा शेतकऱ्यांचा इशारा….
अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू आहे आंदोलन…
वाढत्या डीझेल दरवाढीचा फटका पुणेकरांना बसण्याची शक्यता
पीएमपीच्या तिकीट दरात 5 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे
पीएमपी प्रशासनाचा डीझेल खरेदीचा खर्च वाढला असून तिकीट दरवाढ होण्याची शक्यता आहे
या आधी दरवाढीचा प्रस्ताव हा संचालक मंडळानं फेटाळला.होता
मात्र आता महापालिका मुदत संपल्यानं पालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त आहेत
पालिका आणि पीएमपी प्रशासनात चर्चा होण्याची शक्यता आहे
दरवाढ झाली तर 10 लाख पुणेकरांना याचा फटका बसेल
पुण्यातील राष्ट्रीय स्मारक असलेल्या आगाखान पँलेसमधील पाणीपुरवठा महापालिकेनं केला सूरळीत
तब्बल 2 कोटीची पाणीपट्टी पुरातत्व विभागाकडे थकीत असल्यानं केला होता पुरवठा बंद
पाण्याअभावी पँलेसमधील झाडं जळून जाण्याची शक्यता होती
मात्र पुरातत्व विभागानं टप्प्या टप्प्याने पाणीपट्टी भरण्याचं आश्वासन दिल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आलाय…
– औष्णिक वीज प्रकल्पातून निघणाऱ्या १०० टक्के राखेचा उपयोग करा
– केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या महाजेनकोला सुचना
– वीज केंद्रातून निघणारी राख, आणि गाळ प्रदुषणाचं मुख्य कारण
– प्रदुषणाला आळा बसावा म्हणून १०० टक्के राखेचा उपयोग करण्याच्या सूचना
– कोराडी, खापरखेडा परिसरात ‘फ्लाय ॲश’मुळे प्रदुषणात वाढ
वसई:- instagram वर सुपरस्टार बनण्यासाठी उत्तर प्रदेशहून वसईत आलेल्या दोन मुलींना शोधून माणिकपूर पोलिसांनी सुखरूप त्यांच्या वडिलांच्या ताब्यात दिले आहे.
उत्तर प्रदेश च्या प्रयाग नगर गणपत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ह्या दोन मुली होत्या. 26 डिसेंबर 2021 पासून या दोन मुली घरातून बेपत्ता होत्या.
गणपत पोलीस ठाण्यात या दोन्ही मुली बेपत्ता असल्याची त्यांच्या आई वडिलांनी तक्रार दाखल केली होती. पण त्या मिळून येत नव्हत्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज अमरावती दौऱ्यावर…
मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे सायंकाळी राजू शेट्टी कार्यकर्त्यांना संबोधित करनार….
स्वाभिमानीचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर पक्षाअंतर्गत कारवाई करण्या संदर्भात राजू शेट्टी आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता…..
राजू शेट्टी आणि आमदार देवेंद्र भुयार यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर….
देवेंद्र भुयार आमदार झाल्यापासून संघटनेत सक्रीय नसल्याचा राजू शेट्टींचा आरोप….
शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या भूमीकेकडे सर्वांचे लक्ष….
हिरवखेड मध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भातही राजू शेट्टी बोलणार….
तहसील कार्यलायत उपोषणास बसलेल्या सौ.वाघ यांची तब्बेत खालावली..
पुढील आंदोलन अजून तीव्र करण्याचा वाघ परिवाराकडून इशारा..
स्वस्त धान्य दुकान प्रकरणात तहसीलदार अडवणूक करत असल्याचा आरोप करत अंतिम अलटीमेंटम नंतर आंदोलनास बसलेल्या सौ.वाघ यांची तब्बेत खालावली..
उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल, परिवार मात्र आंदोलनावर ठाम असुन रात्रीही सह परिवार मुक्काम सुरू ठेवल्याने प्रशासनासमोर आंदोलन कर्त्यांचे मोठे आव्हान ठाकले असून लवकरात लवकर तोडगा कडून दुकान सौ. वाघ यांच्या ताब्यात देण्याची मागणी होत आहे. पुढील आंदोलन अजून तीव्र करणार असल्याचे सचिन वाघ यांनी सांगितले.
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील गोराणे येथील मधुकर पंडित देसले यांच्या शेतात उसतोड सुरू असतानाच बिबट्याचे मादी पिल्लू आढळून आल्याने एकच घबराट पसरली. वनकर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्याच्या पिलाला ताब्यात घेतले आहे. उसाच्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळून येताच उसतोड कामगार सैरभैर झाले होते सटाणा वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पिलाला ताब्यात घेतले.सायंकाळी पुन्हा त्याच ठिकाणी कॅमेरे लावून बिबट्याच्या पिल्लाला मादीच्या स्वादिन केले जाणार आहे.