मुंबई : आज गुरूवार 31 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळानं एकमताने हा निर्णय घेतला आहे. आगामी सण उत्साहात साजरे करण्यासाठी महाराष्ट्राला मोकळं केलं आहे. गुढीपाडव्याला शोभायात्रा जोरात काढा, असा संदेश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेटने महाराष्ट्राला दिला आहे. असंय की ज्या माणसाला मास्क लावावा असं वाटत असेल, तर लावावा. ज्या वाटत असेल की नाही लावावा, त्यांना लावू नये. कुठलंही बंधन आता राहिलेलं नाही, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
यवतमाळ- महागाव तालुक्यातील जनुना आणि आमनी खुर्द परिसरातील ई-क्लासच्या जमिनीवरील जंगलात पेटला वणवा
109 हेक्टर आर ई -क्लासची या परिसरात जमीन
त्यातील काही भागात लागली आग
शेतकऱ्यांनी शेतातला कचरा पेटविल्याने वणवा पेटल्याची प्राथमिक माहिती
या भागातील शेतकऱ्यांना शेतातील गुरे दुसरीकडे नेण्याच्या तहसीलदार विश्वंभर राणे यांच्या सूचना
आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न
जिल्ह्यातील 24 तासतली आगीची ही तिसरी घटना
वसई:- आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात आज वसईत तीव्र आंदोलन केले आहे.
दिल्लीत अरविंद केजरीवाल ह्यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच प्रवीण दरेकर यांच्या मुंबई बँक घोटाळ्याचा निषेध व्यक्त केला आहे.
वसई च्या बस आघारात शेकडो आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन केले आहे.
मुंबईतील वाकोला येथे माझे अस्तित्व सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित महिला बचत गट मेळाव्यात पोहोचलेले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, वकील सतीश उके आणि माझे नाते आहे, ते रश्मी शुक्ला प्रकरणात माझे वकील होते, माझे कोणतेही घरगुती संबंध नाहीत. केंद्र सरकारला सतीश उके यांच्या माध्यमातून माझ्याकडे यायचे आहे.
पाकिस्तान एका निर्णयाक घडीतून जातो आहे..
मला जे म्हणायचं, ते जाहीर करण्याआधी मला सांगायचं की माझ्यासारखा माणूस राजकारणात आलाच का..? हे मला स्पष्ट करायचं..
मी राजकारणात येण्याआधी राजकारणाशी माझ्याशी कोणताही संबंध नव्हता…
माझ्या सगळंकाही होतं.. जेवढी गरज होती, तेवढा पैसे होते.. देवानं मला सगळं दिलंय.
मी पाकिस्तानची पहिली पिढी होतो.. स्वतंत्र पाकिस्तानचा मी हिस्सा होता..
स्वतंत्र पाकिस्तान माझ्यापेक्षा पाच वर्ष मोठा आहे..
पण माझ्या आईवडिलांनी गुलामी पाहिली…
जवळपास दीड तास चालली बैठक
संजय राऊत ‘वर्षा’तुन निघाले
संजय राऊत फक्त एवढंच म्हणाले की, मुख्यमंत्र्यांशी संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली !
यवतमाळ- यवतमाळ अमरावती मार्गावर बस आणि बोलेरो मध्ये भीषण अपघात
अपघातात 7 जण जखमी
यवतमाळ हुन सोनवाढोना कडे मजूर घेऊन जाणाऱ्या बोलेरो अमरावती हुन यवतमाळ कडे जाणाऱ्या बसला रेल्वे क्रोसींग जवळ समोरासमोर धडक दिल्याने झाला अपघात
रत्नागिरीतील राजापूरजवळ भीषण अपघात,
मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक
ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
दीड तासापासून ग्रामस्थांनी मुंबई महामार्ग रोखून धरला
महामार्ग रोखून धरल्यानं वाहतुकीची कोंडी
ऍड. सतीश उके यांना ईडी कडून अटक
उके यांना ईडीने सकाळी त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते
सतीश उके यांना ईडीने मेडिकलसाठी शासकीय रुग्णालयात नेलं
नंतर मुंबईत न्यायालयात हजर करून घेणार ईडी कस्टडी
जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रातील कोविड निर्बंध हटवण्यात आल्याची माहिती देणारं ट्वीट केल्यानंतर राम कदम यांनी निशाणा साधलाय. भाजपनं इशारा दिल्यानंतर सरकारला सद्बुद्धी कशी आली? असं राम कदम यांनी म्हटलंय.
आम्ही इशारा दिल्यावरच सरकार म्हणून तुम्हा तीन पक्षाना सद्बुद्धि कशी काय येते ? आम्ही ठणकावून सांगितल तुमचे निर्बंध चुलीत घालू … म्हणून का होईना सरकारला हिन्दू बांधवांची आणी आंबेडकरी बांधवांची आठवण झाली.. दोन दिवसा पुर्वी सरकारने निर्बंध लादणार असे जाहीर करताना सरकारने https://t.co/619v9S4tQQ
— Ram Kadam (@ramkadam) March 31, 2022
मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत महाराष्ट्रातील जनतेला कोविड निर्बंधमुक्त करत असल्याची माहिती दिली आहे.
गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 31, 2022
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करताना राजेश टोपे यांनी म्हटलंय की,…
आरोग्य विभागात काम करणारे वय वर्ष 40 ते 50 या दहा वर्षांचे जे शासकीय कर्मचारी आहे, ते जवळपास 22 लाखाच्या दरम्यान आहेत. या सगळ्यांसाठी आपण दोन वर्षात एकदा पाच हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेपर्यंत त्यांना ज्या काही त्यांच्या आवश्यक चाचण्या असतील, ज्या त्यांच्या निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहेत, त्या करणार आहोत. प्रतिबंधात्मक किंवा प्रीवेन्शच्या दृष्टीकोनातून या सगळ्या चाचण्या त्यांना आपण करण्यासाठीची मान्यता दिलेली आहे. त्यासाठी 105 कोटी रुपये खर्च येतो. 50 ते 60 वर्ष वयाच्या लोकांना दरवर्षी अशा चाचण्या करुन घेणं बंधनकारक केलेलं आहे. आणि या दोन्हीचा मिळून हा 105 कोटी रुपयांचा खर्च हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सरकारकडून केला जाणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ चांगलं ठेवण्यासाठी झालेला हा निर्णय सांगताना मला आनंद आणि समाधान वाटतय.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय… @rajeshtope11 pic.twitter.com/SLqx2m5XjW
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 31, 2022
राज्यातील कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आले असले, तरिही प्रत्येकाला काळजी आणि खबरादारी ही घ्यावी लागणारच आहेत. कुणीही बेजबाबादारपणे वागू नये. काळजी घेत राहावी लागणारच आहे. – राजेश टोपे
महामारीत लावण्यात आलेले दोन महत्त्वाचे कायदे अखेर मागे घेण्यात आले आहेत. आता निर्बंध कोणतेही असणार नाही. – राजेश टोपे
माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी हटवले आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळानं एकमताने हा निर्णय घेतला आहे. आगामी सण उत्साहात साजरे करण्यासाठी महाराष्ट्राला मोकळं केलं आहे. गुढीपाडव्याला शोभायात्रा जोरात काढा, असा संदेश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेटने महाराष्ट्राला दिला आहे. असंय की ज्या माणसाला मास्क लावावा असं वाटत असेल, तर लावावा. ज्या वाटत असेल की नाही लावावा, त्यांना लावू नये. कुठलंही बंधन आता राहिलेलं नाही.
जितेंद्र आव्हाड
गृहनिर्माण मंत्री
मास्क घाला किंवा नाही, ते ऐच्छिक असेल-जितेंद्र आव्हाड
गुढी पाडवा निर्बंधमुक्त होणार
बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीलाही कोणतेही निर्बंध नाहीत
रमजान मोठ्या उत्साहात साजरा होणार
आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले ……
गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा
रमजान उत्सहात साजरा करा
बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2022
मास्कबाबत अजूनही निर्णय नाही
इतर सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत
कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने मोठा निर्णय
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक सुरु
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सहयाद्री अतिथीगृह येथे सुरुवात. उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्रॉी उपस्थित#UddhavThackeray #AjitPawar #Maharashtra pic.twitter.com/2P9pKrz20Z
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2022
गडचिरोलीत नवेगाव खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना नेणारी व्हॅनला पंचर झाल्यानंतर दुरुस्तीसाठी उभी असतांना..
छत्तीसगडहुन येणा-या ट्रकने वॅनला दिली धडक नौतर व्हॅनला पलटली..
त्या वॅनमध्ये असलेले दहा विद्यार्थी जखमी झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..
चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर जखमी
यूपीएससी परीक्षार्थींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
कोरोनामुळे मुख्य परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यूपीएससीला विद्यार्थ्यांबाबत दोन आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनामुळे मुख्य परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेसाठी अतिरिक्त संधी देण्याची मागणी केली
विद्यार्थ्यांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी 24 मार्च 2022 रोजीच्या संसदीय समितीच्या अहवालाचा संदर्भ दिलाय
अखेर बबनराव लोनिकरांनी भरलं वीजबिल
3 लाख 21 हजार आणि 67 हजार रकमेचं वीजबिल भरलं
ऑडिओ क्लिपची चर्चा झाल्यानंतर वीजबिल भरलं
ठाणे जिल्ह्यातील मेट्रोचे काम आणि ठाणे महापालिका एम एसआरडी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असतील आणि रस्त्यावर त्या कामामुळे खड्डे पडले तर अधिकाऱ्यावर कारवाई होणार
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करा एकनाथ शिंदे चा आदेश
डिसेंबर 2023 ला कासारवडवली ते वडाळा मेट्रो च काम पूर्ण होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रो दोन आणि सात सहा लोकार्पण गुढीपाडव्याला होणार
खासदार बाळू धानोरकर बाईट
मी मध्यस्थी नाही केली कर्तव्य केलं
25 आमदारांनी हायकमांडची भेट मागितली त्याबाबत मी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले
संग्राम थोपटे यांचे शक्तिप्रदर्शन नाही
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत आमदारांची मागणी आहे
याबाबत सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे
खा बाळू धानोरकर यांचे स्पष्टीकरण
उष्णतेची लाट , भंडारा जिल्ह्याचे तापमान 40 पार.
रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे , तर दुपारी जणू सूर्य आग ओकत आहे
मार्च महिन्यातच सूर्य आतापासूनच आग ओकत असल्यामुळे एप्रिल व मे महिन्यात तापमानाचे सर्व रेकॉर्ड तुटतील काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभाग प्रमुख निलंबित होण्याची शक्यता
सायंकाळपर्यंत निलंबित करण्याचे आदेश काढण्याची शक्यता
निलंबित करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना विद्यार्थ्यांनी घातला होता घेराव..
विद्यार्थ्याला मागितली हाती 25 हजारांची लाच.
लाच प्रकरणी उज्वला भडंगे यांना निलंबित करण्याची शक्यता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली माहिती
जाणीवपूर्वक कारवाई अशी ठरलेली वक्तव्य येत असतात
आपल्या पर्यत कारवाईची धग लागते म्हणून या कारवाई आहेत
दुटप्पी भूमिका या ठिकाणी कॉंग्रेर्स घेत आहेत
प्रवीण दरेकर ऑन युपीए
गरज सरो वैद्य मरो अशी भूमिका संजय राऊत यांची आहे
आधी सोनिया गांधी यांची गरज होती त्यावेली पायघड्या घातल्या
आता शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे
शिवसेनेचा सातबारा राष्ट्रवादीच्या नावावर केला की काय
: दरेकर ऑन संजय राऊत
संजय राऊत यांना तुसडे पणाने बोलल्याशिवाय काही येत नाही
बाळासाहेबांची भूमिका आठवा ना?
पवार साहेबांसोबत गेल्याने बाळासाहेबांच्या भूमिका विसरत आहे
शिवसेनेचा सातबारा राष्ट्रवादीच्या नावावर
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका
गृहमंत्री मुख्यमंत्री यांचा आदेश मानत नसतील
ते समजयस भूमिका घेत आहेत म्हणून मुख्यमंत्री यांच्यामध्ये वैफल्य आले असावे
पालिकेच्या घोटाळ्याची लक्तरे मांडली आम्ही मांडली
म्हणून ही कारवाई सुरू आहे
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर देखील तुम्ही कठोर पणे वागत आहेत
ही हुकूमशाही आहे.. सरकारने समवयातून मार्ग काढावा
कर्मचारी सरकारचे ऐकणार नाही
मेट्रोची ठाणे मधली काम सुरू आहेत यात नेमका कोणता अडथळा येत आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी करत आहोत मेट्रोच्या कामाची प्रगतीचा आढावा घेत आहेत
याच बरोबर ठाणे शहरातल्या विकासकामांमुळे होणारी वाहतूक कोंडी याचाही आढावा घेत आहे
पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर ठाणे शहरात कुठले खड्डे राहू नये यासंदर्भात पालिका अधिकारी आणि एमएमआरडीए एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना त्यापद्धतीचे आदेश देण्यात येत आहेत
रस्त्यावर डेब्रिज की समस्या वाढली आहेत ती त्वरित हटवावी
कंत्राटदारांना अगोदरच निधीचं वाटप झालेला आहे काम अर्धवट राहिले आणि काही चूक असेल तर कंत्राटदारांवर कारवाई होईल
कामाची प्रगती कशामुळे थांबली आहे या संदर्भात आढावा घेण्यात येत आहे
ठाणे शहरातील पोलिस वसाहत संदर्भात दखल घेण्यात आली आहे कोणालाही वाऱ्यावर सोडण्यात येणार नाही ते कायद्याचे रक्षण करते आहे
त्यामुळे त्यांच्या घराची समस्या निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत
निधींच्या वाटपा संदर्भातली नाराजी मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात दखल घेतलेली आहे
महाविकास आघाडी चं काम मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित सुरुआहे इडी ची कारवाई सुरू आहे
केंद्र सरकारच्या एजन्सीमार्फत सुरू आहे बहुमताचा सरकार आहे
सरकार असतील करण्याचं प्रयत्न सुरु आहेत पण हे सरकार बहुमताचे सरकार आहे
-करन्सी प्रेसच्या आवरत आग लागल्याची माहिती
-करन्सी प्रेस मध्ये छापल्या जातात नोटा
-प्रेसच्या आवारात असलेल्या गवताला आग लगल्याची प्राथमिक माहिती
-आग आटोक्यात आणायचा प्रयत्न सुरू
अजितदादांचा अल्टिमेटम कर्मचाऱ्यांनी धुडकावला
न्यायालयाने पाच तारखेपर्यंत वेळ दिली असताना कामावरून काढून टाकण्याची धमकी कशासाठी
एसटी कर्मचाऱ्यांचा सवाल
पुढच्या काही दिवसात अजितदादा ही अनिल देशमुख यांच्या जोडीला जेल मध्ये असतील
एसटी कर्मचाऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया
कर्मचाऱ्यांची भूमिका सातत्याने मांडल्याबद्दल टीव्ही नाईनचे मानले आभार
तुम्ही आता ईडीचा पंचनामा केला आहे
त्याचे मोबाईल आणि फायली जप्त केल्या आहेत
ईडीचा कायद्याचा दुरूपयोग
वकीलांच्या फायली जमा करण्यासाठी ईडीची फौज
ईडीची कारवाई कोणावर केली पाहिजे
सुप्रीम कोर्टाने त्या प्रकरणात हस्तक्षेप झाला आहे
निरपराध लोकांना जेलमध्ये टाकल जातंय
लोकतंत्र वाचलं पाहिजे
भाजपमध्ये किती लोक नाराज आहेत
आम्ही एकच लोहा मारू
भाजप जे कट कारस्थान करतंय
सत्तेचा दुरूपयोग सुरू आहे
भाजपाला नंतर काही गोष्टी समजतील
आता भाजपाला जनता धडा शिकवणार
मला पोकळ घोषणा करायची नाही
माझं स्टाईलनुसार असेल
प्रत्येकाला वाटतं आपल्या मतदारसंघाची काम व्हायला हवी
युपीएचं अध्यक्ष कॉग्रेस होईल
कोण युपीएचं अध्यक्ष सध्या ही वेळ नाही
आमच्या पक्षाात काय करायचं
आम्ही स्वागत करू
जनतेचे प्रश्न बाजूला करू नका
सत्तेची गुर्मी भाजपाला आली आहे.
नाणार प्रकल्पाला अनेक वर्षाचा वाद आहे,
दोन बाजू पाहायला मिळतात
भाजपाच्या विरोधात जे कोणी बोलेल त्यांच्यावरती अशी कारवाई करण्यात येईल
वकीलांच्या घरात फायली मिळाल्या
धुळे – धुळ्याजवळील मोराने येथील सूत गिरणीला सकाळी साडेदहाच्या सुमारास सूतगिरणीतील मिक्सिंग विभागाला वेस्टिंग कापूस वेचणी करतांना मशीनच्या घर्षनाने ठिणगी पडून आग लागल्याची घटना घडली. मनपाच्या दोन अग्नीशामक बंबाच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणली आहे. या लागलेल्या आगीत दोन लाख रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची माहिती सूत गिरणीचे कार्यकारी संचालक विश्वास राव ठाकरे यांनी दिली आहे. सदरची सूतगिरणी ही धुळे ग्रामीण चे आ. कुणाल पाटील यांच्या मालकीची आहे.
पारनेर तालुक्यातील हिवरे बाजार परिसरात डोंगराला भीषण आग…
हिवरे बाजार शेजारील दैठणे गुंजाळ हद्दीत 500 हेक्टर तर हिवरे बाजार हद्दीतील 3 हेक्टर क्षेत्राचे नुकसान…
शेतकऱ्याने बांध पेटवल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती…
घटनेची माहिती मिळताच हिवरे बाजार येथील शेकडो नागरिकांची घटनास्थळाकडे धाव…
तब्बल चार तास सुरू होती आग…
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश…
या परिसरात मोठ्या प्रमाणावर हरणं , ससे, मोर, कोल्हे या सारख्या वन्य प्राण्यांचा वावर…
तुम्ही केजरीवाल यांच्या घरावर दगड मारले,आम्ही मोदी प्रतिमेवर फुले मारली – आम आदमी पार्टीचे गांधीगिरी आंदोलन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करून दगडफेक केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने उस्मानाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर बेशरमाची व इतर फुले फेकून गांधीगिरीने आंदोलन केले. काश्मीर फाइल्स यावरून केजरीवाल यांनी वक्तव्य केले होते त्यावरून वाद झाला आहे, काश्मीर पंडित यांचे पुनर्वसन् प्रकरणी भाजपने काही केले नाही. लोकशाहीत तुम्ही हल्ले केले तरी आम्ही फुले मारू असे आपने सांगोतले त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी संतोष जाधव यांनी
यंदा दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता
विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या पेपर तपासायला नकार
अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने शिक्षक आक्रमक
राज्यातील 25 हजार शिक्षक आंदोलनात सहभागी
तपासण्यासाठी आलेले पेपरचे गड्डे परत पाठवले
कारवाई झाली तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत पेपर तपासणार नाही
आंदोलक शिक्षकांची भूमिका
गृहखात्याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री योग्य पद्धतीनं बोलू शकतील
बबनराव लोणीकर यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरू
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार चौकशी सुरू
वीज बिल आणि ऑडिओ क्लिपची चौकशी सुरू
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदवले यांच्या मार्फत चौकशी सुरू
व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदवले यांनी दिली tv9 कडे माहिती
पुणे ..
पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात उन्हाळ्यानिमित्त हत्तींची घेतली जातीये विशेष काळजी
दिवसातून दोन वेळा हत्तींना घातली जाते अंघोळ
अंघोळीसाठी हौदाची निर्मिती
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दोन हत्ती पर्यटकांच विशेष आकर्षण आहे..
उन्हाळ्यानिमित्त पर्यटकांची गर्दी वाढली !
– गुढीपाडव्याला पेट्रोल पंप बंद ठेवू नका, भुजबळांचं पेट्रोल पंप चालकांना आवाहन
– पेट्रोल पंप चालकांच्या मागण्यांबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा करून तोडगा काढू
– भुजबळांचं पेट्रोल पंप चालकांना आश्वासन
भुजबळ ऑन सतीश उईके अटक
– राज्यातल्या जनतेने लक्षात घेतलं पाहिजे, जनता सुप्रीम आहे जनतेने आवाज उठवला तर इतिहास होतो
– तुम्ही किती छळणार? नाना पटोले त्यांना जे वाटत ते बोलत आहे
– यंत्रणांना दुसरं काम आहे की हिंदुस्थानमधील सर्व यंत्रणा, लोक इथेच आले आहेत
– भाजपचे सगळे धुतल्या तांदळासारखे आहे का?
– हर्षवर्धन पाटील यांनी उघड सांगितलं की भाजपमध्ये गेल्यामुळे रात्री कोणी उठवायला येत नाही
– यंत्रणा काम करतोय, कोर्ट निर्णय घेईल, मात्र संबंधित व्यक्ती भरडला जातोय, वाईट भावना निर्माण होते
– आज जनत गप्प असली तरी मतपेटीतून व्यक्त होईल
– भाजपला याचा फायदा होईल की नाही माहीत नाही
– उठ सूट इडीच्या धमक्या
भुजबळ ऑन बबन लोणीकर
– मीटरचे पैसे भरले नसेल म्हणून कारवाई झाली असेल
– कारवाई केली म्हणून इन्कम टॅक्स धड टाकण्याची धमकी देणार का
– याचा अर्थ त्यांचे लोक बोलतात, तसे यंत्रणा काम करतात
– त्यांचे दोन लोक चौकशीला गेले की ते आरडाओरड करतात
– मोदी, शाहांनी यात लक्ष घालायलां हव
भुजबळ ऑन शिवसेना नेते नाराजी
– आम्ही सगळे एकत्र आहोत
– पवार साहेब, मुख्यमंत्री, सोनिया गांधी आम्ही सगळे एकत्र आहोत
– UPA मध्ये काँग्रेस मोठा पक्ष आहे त्यांच्याकडे नेतृत्व जातं
– मात्र बाहेर इतर घटक पक्ष आहे ते एकत्रत
झाल्याशिवाय भाजपला दूर करू शकत नाही
– तृणमूल असो की कोणी इतर पवार साहेब सर्वांना एकत्र करू शकतात
माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात कोल्हापुरात महिलांच आंदोलन
ताराराणी चौकात काळे कपडे परिधान करून महिलांनी केला महाडिक यांच्या वक्तव्याचा निषेध
भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा प्रचारादरम्यान महाडिक यांनी महिलांच्या कर्तृत्वावर उपस्थित केला होता सवाल
महाडिक यांच्या वक्तव्याने महिलांचा अपमान झाल्याचा आरोप
सतीश उकेंना ईडीने चौकशीसाठी घेतलं ताब्यात
मोठी पोलिस फौज सकाळी दारात आली
कारवाईसाठी आलो आहोत कारवाई करीत आहेत
देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक केसेस केल्या आहेत
दोन दिवसात एका केसचा निकाल लागला आहे
लॅपटॉप आणि मोबाईल ताब्यात घेतलं
देवेंद्र फडणवीसांची लोक आमच्याकडे आली होती.
त्यांना आता घेऊन जातोय, तिथं गेल्यानंतर चौकशी करू
सुडबुध्दीने कारवाई होत आहे
काय पुरावे गोळा केले
मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले आहेत
सतीश उके हे मला भेटले होते
सगळ काही कायद्याने होत आहे
न्यायाचा तराजू एका बाजूला झुकत आहे
कायदा सगळ्यांसाठी समान आहे
भाजपाच्या बाबतीत हा तराजू एका बाजूला झुकलेला आहे
महाराष्ट्राला विरोधा
देशाच्या राजकारणातून एनडीए बाहेर पडली
अकाली दल सुध्दा बाहेर पडलं
अकाली दलाच्या नेत्यांनी काल माझी भेट घेतली
युपीएच्या मजबूतीसाठी प्रयत्न केले नाहीत
या देशातले सगळे भाजपविरोधी पक्ष त्यामागे जातील
अनेक नेत्यांनी मी चर्चा करतोय
युपीए कोणतीही जागा घ्यायला तयार नाही
केसीआर राव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून गेले आहेत
देशातल्या 22 कोटी मुस्लीमांचा महत्व समजलं आहे
मातृभूमीला वंदन करणाऱ्यांचा देश आहे
या देशाचं हिंदुत्व पक्क आहे
शिवसेनेला जनाब सेना का म्हणतात
आपल्या पाच वर्षाच्या काळात
कायद्याने ज्या कारवाया व्हायच्या आहेत त्या सुरू आहेत
महागाईच्या विरोधात भाजपाच्या रस्त्यावर उतरायला हवं
बुलडाणा
जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये अग्निशमन यंत्रनेशिवाय,
अग्निशमन विभागाच्या नोटिसला केराची टोपली,
आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतरंगत रुग्णालयमध्ये अग्निशामक यंत्रणा आवश्यक,
जिल्ह्यातील रुग्णालय प्रशासन करतेय दुर्लक्ष
रुग्णालयांना अनेक वेळा नोटीस ही बजावल्या
– ॲड सतिश उके यांच्या घरावर ईडी ची धाड
– पहाटे पाच वाजता टाकली धाड
– ॲड सतिश उके यांनी नुकतीच शिवसेना नेता संजय राऊत यांची भेट घेतली होती
– संजय राऊत यांची नागपूरात तीन वेळा घेतली भेट
– सध्या ॲड सतिश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके घरी आहेत
– सीआरपीएफ च्या जवानांच्या तैनातीत धाड सुरु
– ॲड सतिश उके यांच्या घरच्या सर्च ॲापरेशनचे चार तास झाले
– अजूनंही धाड सुरुच
बुलडाणा
मेहकर येथील तहसील इमारती ला आग
निवडणूक खोली सह इतर कक्षा तील साहित्य जळाल्या ची प्राथमिक माहिती,
आगीवर नियंत्रण साठी अग्नीशमन दलाचे प्रयत्न
आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही
बडतर्फी रद्द करण्यासाठी केवळ 25 कर्मचाऱ्यांचे च अर्ज
संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा पेच कायम
एसटी च नेमकं होणार तरी काय
संपावर गेलेल्या नागपूर विभागातील 386 कर्मचाऱ्यांना करण्यात आले होते बडतर्फ
त्यापैकी फक्त 25 कर्मचाऱ्यांनी केले अर्ज
सरकार आणि एसटी महामंडळाच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद
31 मार्च पर्यंत रुजू होण्याचं करण्यात आलं आवाहन
अमरावती शहर पेट्रोल-डिझेल दर..
कालचे दर….
डिझेल 101.61
पेट्रोल 117.36
आजचे दर….
डिझेल 102.46
पेट्रोल 118.21
झालेली वाढ…
डिझेल 85 पैसे ने वाढ
पेट्रोल 85 पैसे ने वाढ
वाळूज परिसरात दुर्लभ कश्यप गॅंगचा धुमाकूळ
भर रस्त्यात चार ते पाच जणांना एकाला केली बेदम मारहाण
भर रस्त्यात मारहाण केल्यामुळे परिसरात खळबळ
दुर्लभ कश्यप गॅंगचा बंदोबस्त करण्याची मागणी
दुर्लभ कश्यप गॅंगच्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अकोल्यात 195 मोबाईल टॉवर कंपन्यांना मनपाने बजावली 21 कोटीची डिमांड नोटीस….
अकोला शहरात महापालिका प्रशासनाच्या नियम,अटींना ठेंगा दाखवित विविध मोबाइल कंपन्यांनी खासगी मालमत्तेवर मोबाइल टॉवर अनधिकृतपणे उभे केले आहेत…
दरवर्षी मोबाइल टॉवरचे नुतणीकरण करणे अनिवार्य आहे…
मात्र,221 पैकी 195 मोबाइल टॉवर कंपन्यांनी नुतणीकरण न केल्याने….
त्यांना महापालिका प्रशासनाने तब्बल 21 कोटींची डिमान्ट नोटीस जारी केली आहे….
त्यापैकी रिलायन्स जीयो कंपनीने त्यांच्या 61 मोबाइल टॉवरचा 3 कोटी 4 लक्ष रूपयांचा भरणा प्रशासनाकडे केला आहे….
संसद परिसरात काँग्रेसचे आंदोलन
इंधनदरवाढी विरोधात काँग्रेस खासदार करणार आंदोलन
विजय चौकात इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस खासदार करणार आंदोलन
सकाळी साडे नऊ वाजता होणार
वकील सतीश उकेंच्या घरावर ईडीची धाड
नागपूरात सतीश उकेंच्या घरावर ईडीची धाड
उकेंच्या घरी त्यांचे कुटुंबिय आहेत
जमिनीचं प्रकरण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
नाना पटोलेंच्या जवळचे वकील असल्याचे म्हटले जाते
सीआरपीएफ जवान ईडीच्या पथकासोबत आहे
धाड का टाकली आहे यांचं कारण अद्याप अस्पष्ट
सतिश उके यांनी देवेंद्र फडणवीस विरोधात निवडणुक याचीका दाखल केली होती
ॲड सतिश उके यांनी नाना पटोले यांच्या निवडणूक याचीकेत मांडली होती बाजू
-लोणावळ्याच्या कुणेगाव परिसरात दरीत उडी घेऊन सतरा वर्षीय तरुणीन आयुष्य संपवलय
-प्रतीक्षा जगताप अस तरुणीच नाव असून ती पुण्याच्या बालेवाडीत कुटुंबासह राहात होती
-ती गेल्या दोन-तीन दिवसांपासून बेपत्ता होती. तशी तक्रार चतुशृंगी पोलिसात देण्यात आली होती
-लोणावळाच्या कुनेगाव परिसरातील दरीत तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडालीय
-तिने आत्महत्या केली असल्याचं लोणावळा पोलिसांकडून सांगण्यात आलंय
– नागपूरात 24 तासात दोन खुनाच्या घटना
– हुडकेश्वर आणि हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत खुन
– अंतर्गत वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती
– मार्च महिन्यात 11 खुनाच्या घटना
– पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकरकडून खून
कमरेपासून शरीराचे दोन तुकडे करून केली निर्घृण हत्या
औरंगाबाद जिल्ह्यातील शफेपुर गावातली घटना
संदीप मोकशे असं दोन तुकडे करून खून झालेल्या व्यक्तीचे नाव
सुनील हरणकाळ आणि छोटू मोकशे असं अटक करण्यात आलेल्या आरोपचे नाव
नाशिक – नाशिकच्या वादग्रस्त सिडको उड्डाणपूला विरोधात मनसेची जनहित याचिका
भाजप पाठोपाठ मनसेने देखील केली याचिका दाखल
उड्डाणपुलाचे काम बेकायदेशीर व अनियमित असल्याचा केला दावा
तीनशे कोटी रुपयांची अवाजवी उधळपट्टी थांबवत उड्डाणपूल रद्द करण्याची याचिकेत केली मागणी
मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी केली याचिका दाखल
न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
नाशिक – तीन दिवसात 10 कोटींची थकबाकी वसुली
प्रशासकांच्या दणक्यानंतर कर वसुली विभाग ऍक्शन मोडवर
महापालिकेच्या घरपट्टी वसुलीचा आकडा प्रथमेश 143 कोटींवर
मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत असल्याने कर विभागाला जास्तीत जास्त कर वसूल करण्याचे आदेश
चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप
जळगाव न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकल
आठ वर्षाच्या मतिमंद चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप शिक्षा आणि दंडाची शिक्षा असा निकाल जळगाव जिल्हा न्यायालयाने दिला
नाशिक – गंगापूर धरणातून साडेतेरा किलोमीटरची पाईपलाईन
पंधराव्या वित्त आयोगातून शासनाला 224 कोटींची मागणी
गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन
प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागणार
औरंगाबादेत एमआयएम आणि भारतीय जनता पार्टीत श्रेयवादाची लढाई सुरू
इम्तियाज जलील आणि भागवत कराड यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू
प्रधानमंत्री अवास योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू
इम्तियाज जलील आणि भागवत कराड यांच्यात आरोप सुरू
योजना मंजूर करून आणल्याचा इम्तियाज जलील यांचा दावा
तर योजना भाजप सरकारने मंजूर केल्याचा भागवत कराड यांचा खुलासा
अमरावती शहरात रामनवमी,हनूमान जयंती,महावीर जयंतीला मिरवणूका, शोभायात्रा वर बंदी नाही.
अमरावती शहरात आगामी उत्सव कोरोनाचे नियम पाळून साजरे करावे लागणार..
कोव्हिडं नियमांचे पालन करून काढाव्या लागणार मिरवणूका…
आगामी गुढीपाडवा, रामनवमी, रमजान ईद, महावीर जयंती,हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय..
अमरावती शहर पोलीस आयुक्तांनी काढला सुधारित आदेश…
राज्य सरकारच्या कोव्हिडं नियमाचे उल्लंघन झाल्यास होणारं कारवाई.
अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे पोलिसांचे शहरवासीयांना आवाहन….
– आता नागपूर मनपाच्या सर्व केंद्रावर मिळणार तिन्ही लस
– सोमवार ते बुधवार कोव्हिशिल्ड आणि गुरुवार, शुक्रवार कोव्हॅक्सीन
– शनिवारी १२ ते १४ वयोगटासाठी कोर्बेव्हॅक्स लसीचं लसीकरण
– मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रावर १ एप्रिलपासून तिन्ही लस उपलब्ध
– शहरातील अजूनही लस न घेतलेल्या पात्र नागरिकांनी लसीकरण करण्याचं आवाहन
– उद्यापासून मनपाच्या ३५ आणि शासकीय ८ केंद्रावर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत लसीकरण
– लसीकरणाला गती देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे प्रयत्न
कोल्हापूर – बंगरुळ विमानसेवा बंद
प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतानाही तांत्रिक कारणांमुळे बंद झाली सेवा
मुंबई-अहमदाबाद पाठोपाठ आता बंगरूळ ची ही विमानसेवा बंद
नव्या मार्गावर विमानसेवा सुरू होण्या ऐवजी आहेत त्याच सेवा बंद होत असल्याचं चित्र
तीन महत्त्वाच्या मार्गावरील विमानसेवा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय
– मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पीएमआरडीएच्या 2 हजार 419 कोटी रुपये महसूली आणि भांडवली खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता,
– बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते,
– या अंदाजपत्रकात पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आलेले गृहनिर्माण प्रकल्प, रिंग रोड, विविध नगररचना योजनांसाठी भरीव तरतूद,
– शिवाय बैठकीत इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन या वित्तीय संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली.
रत्नागिरी – बारसुमधील रिफायनरीला विरोध होत असताना मुंबई मंडळाकडून प्रकल्पाचे स्वागत
रिफायनरी समन्वय समितीला प्रकल्प समर्थनार्थ पत्र
रोजगार, प्रदूषण विरहित प्रकल्प झाल्यास मंडळ ग्रामस्थांचा पाठींबा मिळवून देण्याकरता तयार
04 मार्च रोजी मुंबई मंडळाचे रिफायनरी समन्वय समितीला पत्र
अमरावती शहरात आगामी सण उत्सवात शोभायात्रा मिरवनूका काढता येणार….
नियमांचे पालन करून काढाव्या लागणार मिरवणूका…
आगामी गुढीपाडवा, रामनवमी, रमजान ईद, महावीर जयंती,हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर काढता येणार शोभायात्रा…
अमरावती शहर पोलीस आयुक्तांनी काढला सुधारित आदेश…
– डिझेल दरवाढीमुळे नागपूरातील आपली बसला वर्षाला १० कोटींचा फटका
– आपली बसचा महिन्याला ८६ लाखांचा खर्च वाढणार
– बसचा तोटा कमी करण्यासाठी प्रवाशी भाड्यात वाढ होण्याची शक्यता
– आपली बसच्या ताफ्यात डीझेल, सीएनजीवर चालणाऱ्या ४३५ बसेस
– डिझेल आणि सीएनजीचे दर वाढल्याने आपला बसचा तोटा वाढला
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी उद्यापासून सुरू होणार
उद्या जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची जाहीर सभा
बाळासाहेब थोरात, जयंत पाटील उदय सामंत यांची एकत्रित सभा
मिरजकर तिकटी इथं सायंकाळी सात वाजता होणार सभा
डेक्कन क्वीन एक्स्प्रेस धावणार नव्या रंगात आणि नव्या कोचेससह
22 जूनपासून डेक्कन क्वीनला येणार एल एस बी कोचेस
तर अहमदाबादमधील नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेत तिची रंगसंगती निश्चित करण्यात आलीये
फॉरेस्ट ग्रीन, पिवळा आणि लाल असे तीन कलर डेक्कन क्वीनच्या डब्यांना देण्यात आलेत
22 जूनपासून कोचेस जोडण्यात येणार आहेत..
डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा 1 जूनला वाढदिवस साजरा केला जातो मात्र 22 तारखेपासून कोचेस जोडण्यात येणार असल्यानं प्रवाशांची नाराजी…
– महावितरणकडे वीज मिटरचा तुटवडा!
– नवं वीज कनेक्शन घेण्यासाठी बाजारातून मिटर घ्या
– महावितरणकडून ग्राहकांना बाजारातून मिटर घेण्यास सांगितले जाते
– ग्राहकांना दामदुप्पट दराने ४००० रुपयांत खरेदी करावं लागतं थ्री फेज मिटर
– महावितरणकडून ९४४ रुपयांला मिळणारं सिंगलफेज मिटर १८०० रु. घ्यावं लागतं
– मिटरच्या तुटवड्यामुळे नविन जोडणीसाठी राज्यात १०.५७ लाख अर्ज प्रलंबित
पुढील चार दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार हवामान विभागाचा अंदाज
तर चंद्रपूर देशात सर्वाधिक गरम ..काल चंद्रपूरात 44 . 2 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद
मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपूरात नोंदवलं गेलंय..
जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये चंद्रपूर हे तिसऱ्या क्रमांकावर आहे
पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढता राहिल
पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज
पुण्यात आजही पेट्रोलच्या दरात वाढ
पेट्रोलचा आजचा दर 116 रुपये 20 पैशांवर गेलाय
काल पेट्रोल 115 रुपये 36 पैशांवर होतं..
एक रुपयांची वाढ झाली आहे..
तर डीझेलच्या दरातही 80 पैशांची वाढ झाली आहे
दिवसेंदिवस वाढत्या पेट्रोलच्या किमतीनं पुणेकर हैराण ..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक
बैठकीत 2022-23 साठी प्राधिकरणाच्या 2 हजार 419 कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आलीये..
मेट्रो लाईन- ३ मार्गिकेतील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पाडण्यात आलेल्या पुलाच्या ठिकाणी मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम आवश्यक खर्चास मान्यता देण्यात आली.
विविध विकासकामांसाठी आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आली आहे..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पीएम आरडीएचे अध्यक्ष आहेत…
पुण्यात आज पेट्रोल डिझेलसह सीएनजीचेही भाव वाढले
सीएनजीच्या भावात तब्बल अडीच रुपयांची वाढ
आजचे दर
पेट्रोल 116 रुपये 20 पैसे
पॉवर पेट्रोल 120 रुपये 70 पैसे
डिझेल 98 रुपये 94 पैसे
सीएनजी 68 रुपये 50 पैसे
कालचे दर
पेट्रोल 115 रुपये 36 पैसे
पॉवर पेट्रोल 119 रुपये 87 पैसे
डिझेल 98 रुपये 11 पैसे
सीएनजी 66 रुपये