मुंबई : आज बुधवार 9 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत.राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. निफाड परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी उकाडा देखील जाणवेल असं हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
नक्कल केली चांगील गोष्ट आहे. नक्कल मोठ्या माणसांची करतात. तुम्ही बोला, तुम्ही बोललं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे अशी स्थिती आहे. ईडीनं आम्हाला बोलावलं म्हणून गप्प बसलेलो नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. जे सत्य आहे त्यावर शिवसेना बोलणार डुप्लिकेट काही नाही. आमचं राजकारण नकलांवर उभं नाही. आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर उभं आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांबद्दल उद्या पाहावं लागेल. काही लोक आजारी नसताना ही सक्रीय नसतात. मुख्यमंत्र्या इतक कुणीच सक्रिय नाही, म्हणून तर राज्य पुढं चाललंय, असं संजय राऊत म्हणाले.
बारामती तालुक्यातील मोरगाव परीसरात सायंकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या . यामुळे शेतातील काढणी केलेल्या ज्वारी , हरभरा , गव्हाचे पावसापासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
गेल्या दोन दिवसाच्या उकाड्यानंतर मोरगाव , तरडोली परीसरात अवकाळी पाऊस कोसळला . पावसाच्या सरी हलक्या ते मध्यम सुरु झाल्यामुळे गृहीणींसह , शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
शेतात नुकतीच काढणी केलेले हरभरा, गहु , करडई , ज्वारी ही वाळवणासाठी उन्हात टाकली आहे. मात्र अचानक मेघगर्जना सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली .
खोपोली त अवकाळी पाऊस
खोपोलीत आज दुपारनंतर अवकाळी पाऊस झाल्याने बाजारात सगळ्यांची तारांबळ उडाली,तर वीटभट्टी मालकांची धावाधाव सुरू झाली,रायवली आंब्याला आलेल्या मोहोराला या अवकाळी पावसाने धोका निर्माण झालाय
सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला लागलेत, विरोधक म्हणतात हे आम्हाला संपवायला लागले, मग उरलं कोण आपण
किती बोलतात, शिव्या काय देतात
संजय राऊत किती बोलतात
राऊतांची नक्कल केली
किती बोलतो
प्रश्न बोलण्याचा नाही
आपण काय बोलतो कस बोलतो
भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या बघतायेत आणि तुम्ही म्हणताय लोकांनी तुम्हाला मतदान करावं
एस टी कधी सुरु होणार यावर बोलत नाही
आजचं भाषण टीझर, पिक्चर 2 एप्रिलला शिवतीर्थावर
सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपावयला निघालेत
विरोधक म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत
राहिलं कोण
टेलिव्हिजनवरुन शिव्या दिल्या जातात काय चाललंय
हे जर विधानसभेत बोलत असतील तर ग्रामपंचायतीपर्यंत काही बोलत असतील
राज ठाकरेंकडून संजय राऊत यांची नक्कल करुन टिकास्त्र
व्हीवर शिव्या देतायत.. काय भाषा… येणाऱ्या भावी पिढ्यांना राजकारणाचं काय शिकवतोय आपण.. भविष्यात काय होईल.. तोंडाला येईल ते फक्त बडबडायचं.. आणि किती बोलतात..
ते संजय राऊत….
किती बोलतात.. सगळ्यात एकऍक्शन असतो.. (राऊतांची एक्टिंग करुन दाखवली..)
चॅनल लागलं की हे सुरु.. कॅमेरा हटला की नॉर्मल सगळं.. कसं काय बरंय ना..
आपल्या आयुष्यात काय चाललेय
लोकांना रील्स बनवायचं वेड लागलंय
इतक्या वेगवेगळ्या स्थित्यंतरानंतर हाताला काही लागत नाही अशी स्थिती आहे
मी अशी स्थिती कधी पाहिली नाही
ही दोन वर्ष कधीचं विसरता येणार नाहीत
मला तर ही स्थिती कधीच विसरता येणार नाही
साहेबांचं वजन वाढलेलं दिसतं बोलता की नाही, कुणाला सांगू नको पण बोलता की नाही
हल्ली घराघरामध्ये डॉक्टर झालेत, हे खाऊ नको ते औषध घे असं सागतात
राज ठाकरे यांच्याकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका
बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट केलं गेलं
शिवाजी महाराज यांनी रामदास स्वामी गुरु होते असं म्हटलेलं नाही,
रामदासांनी शिवाजी महाराज शिष्य होते, असं म्हटलेलं नाही
आमच्याकडं योगी सापडत नाही, ईडीची धाड पडली की कळतं श्रीमंत आहे ते
आमच्याच लोकांना महापुरुषांना बदनाम करायचं, युवकांची माथी भडकवायची असले उद्योग सुरु आहेत
त्यावेळी लहानपणी लग्न व्हायची, अजून तुमचं झालं नाही,
नको तिथं बोट घालायची हे समजत नाही
आपको क्या लगता है, आपको लगता है असं म्हणत सगळे झुंजायला लागले
आता निवडणुका होत नाहीत असं कळलं की सगळे शांत
निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरपासून सांगत होतो
मार्चमध्ये निवडणुका होतील असं वाटत नाही
निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते, बरोबर समजलं आता तुम्हाला निवडणूक चढायला लागली
वातावरणात निवडणूक यायला लागते, मला वातावरणात निवडणूक दिसत नाही
ओबीसी आरक्षणाबद्दलचं कारण पुढं करण्यात आलं
पण यांना निवडणूक घ्यायची नव्हती
कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही
तीन महिने आम्ही निवडणुका पुढं ढकलतोय पण लोकांना त्याची काही पडलेली नाही
ज्यांना उभं राहायचंय त्यांनाच पडलीय निवडणुकीची
कित्येकांना निवडणूक लढवण्यात रस नसतो, तुला तिकीट देतो म्हणलं की कमाईला सुरुवातचं करतो
या निवडणुका होऊच नयेत प्रशासक नेमावा दोन्ही बाजूनं विनविन परिस्थिती
या निवडणुका मार्च एप्रिलला लागल्या असत्या तरी सगळी कुटुंब दोन वर्ष घरात होती
दहावी बारावीच्या परीक्षा झाल्या की सगळी गावाकडे जातील
मत कुणाकडे मागायची, आता तीन महिन्यानंतर निवडणुका म्हणतील पण त्या दिवाळीनंतर होतील
यूक्रेनचं काय होईल, अरे गधड्या तुझ्या घरचं बघ पहिलं
प्रत्येकाला बॅडपॅच आला
एकच व्यक्ती ज्याला आयुष्यात बॅडपॅच नाही आला
ती म्हणजे लता दीदी
ग्राफ कायम चढता राहीला
पण त्यासाठी प्रचंड कष्ट घेतले
आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 16 वर्ष पूर्ण होतात. त्याबद्दल शुभेच्छा देतो
आगामी काळात मनसे जोरदार लढेल, अशी खात्री देतो
तुमच्या घोषणा बंद करा, सगळं भाषणं संपली की एकदम ओरडा, कुणी विचार केला नसेल की या प्रकारचे दिवस आपण पाहू,
रस्त्यावर शुकशुकाट आहे, घरच्या घर घरात घाबरून बसलेले आहेत
सहज स्पर्श करायला पण भीती वाटायला लागली
घरातील माणसानं दिलेला पाण्याचा ग्लास उचलावा की न उचलावा असं संशयाचं वातावरण निर्माण झालं
23 मार्चला लॉकडाऊन लागलं,
शिवाजी पार्क समोर होतं, मला फक्त पक्षांचे आवाज ऐकू येत होते. इतकी शांतता मला त्यावेळी अनुभवायला मिळाली
गावाकडे निघालेलो असताना तशा प्रकारची शांतता अनुभवायला मिळतो
नरेंद्र मोदींना पत्र लिहावं वाटतं की महिन्यातले दोन दिवस लॉकडाऊन लावा
भयानक शांतता होती. शांतता भीतीदायक होती पण बरी होती
त्या सर्व वातावरणात भीती होती पण कुटुंब जवळ आली, एकमेकांबरोबर जेवायला लागले, गप्पा मारायला लागले
या सगळ्या वातावरणातून आपण जात होतो
सगळ्या जगावर संकट येत होती,
माझ्यावर, आपल्या पक्षावर संकंट चालू होती
संकट हातात हात घालून धुमाकूळ घालत येतात, जाताना ती एकटी जातात
संकटाचे प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतात, आपण त्यातून काय घेतलं? हे महत्त्वाचं
आजचा आपला 16 वा वर्धापनदिन
शुभेच्छा देताना मनापासून आनंद वाटतोय
पुणे मुंबईतली परिस्थिती पाहिली
वातावरण बदलतय
साहेब ज्या ज्या ठिकाणी जातात तिथं वातावरण बदल याचा अर्थ सोळाव वरिस धोक्याचं,….
कोणासाठी विरोधकांसाठी तर मनसेसाठी मोक्याच
अमित ठाकरे यांना विद्यार्थी सेनेच अध्यक्ष केलं यासाठी राज ठाकरे यांचे मनापासून धन्यवाद
हम होंगे कामयाब, मन में हे विश्वास
आमच्याकडे आमदार खासदार नसला तरी निर्माता आमच्याकडे, आम्हाला गरज नाही कोणाची
साहेब आता फक्त तुम्ही बाहेर पडा आणि आम्हाला लढा म्हणा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला करतायेत पुष्पहार अर्पण
बाबासाहेब पुरंदरे आणि लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण
गणेश कला क्रीडा केंद्र मनसे सैनिकांनी तुडुंब भरलं
तलवार भेट देत अमित ठाकरे यांचा सत्कार
अमित ठाकरे यांनी उपस्थित मनसैनिकांना केला नमस्कार
मला अजूनही वाटतं त्यापद्धतीचं आकडे पाहतो तसे निकाल येणार नाहीत
अखिलेश यादव आणि त्यांची आघाडी भाजपला टक्कर देतेय
अखिलेश यादव आणि त्यांची आघाडी 175 क्रॉस करेल
भाजपच्या 125 जागा कमी होतील
देशात एक्झिट पोलवर नागरिकांचा विश्वास राहिला नाही
विरोधी पक्षाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, ते विरोधी पक्षाचं काम आहे
आगे बढो आणि संघर्ष कशासाठी,
लोकसभेतील विरोधी पक्षनेता पंतप्रधानांवर हल्ला करतो
विधानसभेतील विरोधी पक्ष नेता मुख्यमंत्र्यांवर हल्ला करेल
105 आमदार असताना मुख्यमंत्रिपद खेचून घेतलंय त्यामुळं त्याची खंत समोर येतेय
बाळासाहेबांशी तुमचा काय संबंध,
फालतू राजकारण करुन नका. त्यांचे आशीर्वाद आम्हाला आहेत.
कमळाविषयी बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण सदृश्य लाभ मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीकडून विलीनीकरण होण शक्य नसल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण सदृश्य लाभ देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्वपक्षीय बैठकीत संपावर तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगाप्रमाणां लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झालीय.
पुणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 16 वर्धापनदिन
गणेश कला क्रीडा रंगमंचा येथे पार पडतोय वर्धापनदिन सोहळा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार यावर मनसैनिकांचे लक्ष
राज ठाकरे यांच्या भाषणा अगोदर माझे गाणे अक्षय गाणे या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
पोलिसांचा घातपात करण्याचा विचार होता की काय अशी शंका होती
जस नाक्यावरचे चोर दरोडो यांना पकडतात
तसे आम्हांला नेल
5 मि च अंतर पाउणतासावर गेलं
मध्येच ब्रेक मारणं वैगरे आतमध्ये सगळे एकमेकांवर आदळत होते
भाजप नेत्यांना यलो गेट पोलीस ठाण्यात नेलं
मेट्रो सिनेमा जवळ पोलिसांनी भाजप मोर्चा अडवला
आम्हाला पोलिसांना सोडलंय मात्र आमचा संघर्ष सुरु राहिल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय
चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर यांना ही पोलिसांनी ताब्यात घेतलं
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
भाजपचा मोर्चा आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात मोर्चा
पोलिसांशी संघर्ष न करण्याचा भाजप कार्यकर्त्यांना सूचना
मोर्चात देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, किरीट सोमय्या सहभागी
आशिष शेलार, अतुल भातखळकर यांचाही सहभाग
मोर्चाला मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते उपस्थित
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मोर्चा
भाजपच्या मोर्चाला आझाद मैदानातून सुरुवात
भाजपचा धडक मोर्चा आझाद मैदानातून निघाला
नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा भाजपची मागणी
हा सगळा पैसा जमा झाल्यानंतर बॉम्बस्फोट झाले आहेत
टेरर फंडींग करण्यात आलं
नवाब मलिकांचा राजीनामा द्या
उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राजीनामा देणार नाहीत असं म्हणत आहेत
आमचा संघर्ष असाच सुरू राहील,
अनिल देशमुख, राठोडांचा राजीनामा घेतला मग मलिकांचा का नाही
दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही
हा मोर्चा फक्त संघर्श आहे, मंत्र्याचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरु राहणार
नरेंद्र मोदी वैश्विक नेते झाले आहेत, त्यांना एकवटून संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आमचे संबंध हे गुन्हेगारांशी नाहीत
कालचा तर पहिला बॉम्ब होता
या सरकारमधून आम्हाला लोकांना मुक्त करायचं आहे – सुधीर मुनगुंटीवार
काँग्रेस हटाव म्हणण्याची वेळ आली आहे
सरकारला इशारा देण्यासाठी इथं आलोय
दळभद्री सरकारपासून लोकांना मुक्त करायचं
राजीनामा तुमच्या बापाला द्यायला द्यावं लागेल
निरपराध लेक मुत्यूमुखी पडले
१२ मार्चला १२ बॉम्बस्फोट झाले
आज या लढाईतून एक घेऊन जा ही लढाई थांबणार नाही
आक्रोश आणि व्यथा मांडणार मोर्चा आहे – अशिष शेलालं
अशिष शेलारांनी सांगितला बॉम्बचा इतिहास
दाऊदने या देशावर आक्रमण केलं
तुषार प्रिती देशमुख आई बॉम्बस्फोटात संपली
त्यातल्या आरोपींना फाशी झाली पाहिजे यासाठी तुषार मागणाी केली
तुषारचं मतं कुणीही ऐकलं नाही
मला तिच्या पार्थिवाचं सुध्दा दर्शन घेता आलं नाही,,
– लाखोंच्या संख्येनं लोक आझाद मैदानावर येत आहेत, दहशतवाद्यांशी साटंलेटं असणार्यांना हा देश , राज्याची जनता माफ करणार नाही…
– फडणवीस यांनी या सगळ्यांचा पर्दाफाश केलाय, त्यामुळे यांचा खरा चेहरा ऊघड पडलाय, भगवं वादळ आलंय, सरकारला धारेवर धरल्या शिवाय आम्ही थांबणार नाही
– काही केल्या आम्ही थांबणार नाही… हा विरोध आणखी तीव्र होणार
– नवाब मलिक हटाव देश बचाव हा आमचा नारा… दशहतवाद्यांच्या विरोधात आमचा हा मोर्चा… अकही क्षण नवाब मलिक यांना खुर्चीवर बसू देणार नाही.,.
– शरद पवार, संजय राऊत दशतवाद्यांशी संबंध असलेल्यांची बाजू घेतात, आमच्या नेत्यांचा विरोधात कुबांड रचतात… हे योग्य नाही…याचं ऊत्तर यांना दिलं जाईल…
– जर चोरी केली? भ्रष्टाचार केला तर कारवाई ही हेणारच…
– शरद पवार हे मोठे नेते त्यांना सगळं माहीत असतं…
– निवडणुका येत आहेत, या सगळ्यांना जनता ऊत्तर देईल, हे परिवर्तनाचे वारे…
मालिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचं आंदोलन
देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आणलं
आझाद मैदानातून मेट्रोकडे जाणार मोर्चा
राज्यातून भाजपचे अनेक कार्यकर्ते आझाद मैदानात
– नवाब मलिक यांना हटवलंच पाहीजे… ज्या दाऊद इब्राहीमने बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट रचला होता, त्या लोकांशी संबंध ठेवणार्यांना हे सरकार पाठिशी घालत आहे…
– हे चालणार नाही, खपवून घेणार नाही, यांना राजिनामा घ्यावाच लागेल…
– फडणवीस यांनी बांम्ब फोडला पण सत्य काय ते सांगितलं, आमच्या विरोधात मविआ सरकार कुबांड रचतंय, गिरीश महाजन , मला स्वताला फसवण्याचा प्रयत्न झालाय,
– दिशा सालियान प्रकरणात सरकार कुणाला तरी वाचवण्याच्या प्रयत्न करतंय, आमची चौकशी करून वारंवार विचारलं जातंय की माहीती कुठून येतेय, कुणाला तरी त्रास होतोय,
– दिशा सालियान प्रकरणात माझ्या सोबत काय झालं हे लवकरच मी सांगणार आहे… यासाठी पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार…
– आम्ही गप्प बसणार नाही, सडेतोड ऊत्तर देणार हेच आमच्या रक्तात आहे…
– पिंपरी चिंचवड भाजपमधील गळती सुरूच भाजपच्या आणखी दोन नगरसेवकांचा राजीनामा
-भोसरी प्रभागाचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे,चिखली प्रभागाचे नगरसेवक संजय नेवाळे यांचा राजीनामा
-पिंपरी चिंचवड भाजप मधील आता पर्यंत सहा नगरसेवकानी दिले राजीनामे
-गेल्या काही दिवसांपासून भाजपाला मोठी गळती सुरु असल्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप आपला गड शाबूत कसा ठेवणार हा मोठा प्रश्न आहे
नवाब मलिकांच्या विरोधात पुरावे असल्याने आम्ही राजीनामा मागतोय असं अशिष शेलार यांनी सांगितलं. आझाद मैदानात अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रातून आले आहेत. तिथं काहीवेळात देवेंद्र फडणवीस भाषण करतील
नवाब मलिकांचा लवकरातं राजीनामा घ्यावा यासाठी आमचं आंदोलन
अनिल देशमुख हिंदू आहे म्हणून तुम्ही राजीनामा घेतला का तुम्ही
रोहित पवार उद्या पुतिनला सुध्दा सल्ला देतील
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
आझाद मैदानात घोषणा
राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप ठाम
आम्ही राजीनामा घेणारचं
जोरदार घोषणाबाजी
भारतमाता की जयच्या घोषणा आझाद मैदानात
नवाब मलिक राजीनामा द्या – कार्यकर्ते
प्रवीण चव्हाण हे सरकारी वकील आहेत,
पुण्यातील डीएसके घोटाळ्यात सरकारी वकील म्हणून काम पाहतायेत
बीएच आर रायसोनी घोटाळा आणि पुण्यातील मोक्का लागलेला रवींद्र बराटे यांची केसही सरकारी वकील म्हणून काम पाहतायेत
प्रवीण चव्हाण हे मुळचे जळगावचे आहेत मात्र पुण्यात सरकारी वकील म्हणून काम पाहतायेत….
विधानभवनाच्या पाय-यांवर भाजपाची घोषणाबाजी
नवाब मलिक कोण है
नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा म्हणून भाजप आक्रमक
विधानभवनाच सभागृह अर्ध्यातासासाठी तहकूब
फडणवीसांसह अनेक नेते आझाद मैदानाकडे रवाना
आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा इथपर्यंत भाजप पायी मोर्चा करणार…
– सभा संपल्यानंतर होणार पायी मोर्चा…
– विश्वास नागरे पाटील यांनी परवानगी दिल्याची माहीती…
चंद्रपूर : अस्वलाने वाघासमोर केले आपल्या आक्रमक मुद्रेचे प्रदर्शन…
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आमोरा-समोर आलेल्या वाघ आणि अस्वलाचा व्हिडिओ व्हायरल,
लखनऊ च्या नमन अग्रवाल या पर्यटकाने कॅमेऱ्यात कैद केले दृश्य,
सोमवारी दुपारी टायगर सफारी दरम्यान ची घटना, आक्रमणाच्या मुद्रेत असलेला वाघाला अस्वलाने दोन्ही पायावर उभं होत दिला प्रतिहल्ल्याचा इशारा,
आक्रमणाच्या इशारा मिळताच वाघ झाला शांत, त्यानंतर अस्वलाने धरली आपली वाट
भाजपच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी उत्तराखंडचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र सरकार न नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात हटवले पाहिजे ही आमची मागणी
– सोलापुरात दरोड्यात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू तर चारजण जखमी
– दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी-दर्गनहळ्ळी गावच्या वेसीवरील घटना
– दरोड्याला विरोध करणाऱ्या वृध्दावर धारदार हत्याराने केला हल्ला
– सात जणांच्या टोळक्याने केला दरोड्याचा प्रयत्न
– बापू कल्लप्पा हिरजे असे मृत व्यक्तीचे नाव तर शरणप्पा पाटील असे जखमीचे नाव
– दरोड्याला विरोध करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात दगड आणि धारदार शस्त्राने हल्ला करत दरोडेखोरांने केली हत्या
– सोलापूर ग्रामीण पोलिस स्टेशनची टीम घटनास्थळी दाखल
महाराष्ट्राचे पोलीस असे कधीच करत नाही महाराष्ट्राच्या पोलिसांना एक चांगलं प्रशिक्षण आहे
राज्याच्या पोलिसांना यासाठी प्रतिष्ठा आहे की ते खोट्या दबावाखाली कारवाया करत नाहीत
यासाठी आणि कुंभांड करायचं असेल तर त्यासाठी आम्हाला त्यांना ई डी आणि सीबीआयकडे पाठवावा लागेल प्रशिक्षण घेण्यासाठी
खोटे पुरावे खोटे साक्षीदार कसे उभे करायचे हे केंद्रीय तपास यंत्रणांचे काम आहे
हे स्क्रिप्ट कोणी लिहिलेला आहे भाजपाचे सलीम-जावेद कोण आहेत त्यातली पात्र कोण आहेत नेपथ्य कोणाचं आहे दिग्दर्शन कोणाचं आहे त्याच्या खोलाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेन ड्राइव्ह घेऊन समोर येईल
पुरावे सादर करायला अभ्यास किंवा संयम लागत नाही ती तेवढ्यापुरती सळसळ असते आणि खळबळ असते खळबळ माजवन हाच जर हेतू असेल विरोधी पक्षाचा, तर ती खळबळ देखील माजलेली नाही
काल मी जी ई डी वरती पुराव्यासह काही आरोप केले आहेत ते खळबळजनक आहेत केंद्रीय तपास यंत्रणा मुंबई आणि महाराष्ट्रात काय काम करत आहेत त्यांच्या खंडणीखोरी ची प्रकरणे समोर आलेली आहेत त्यावर फडणवीस का बोलत नाहीत राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाईंचा अपमान केला त्यावर काही भूमिका घेतली असती तर त्यांच्या कालच्या पेन ड्राईव्ह ला काही महत्त्व आलं असतं तुम्ही एक तर्फी काम करत आहात विरोधी पक्षनेता हा राज्याच्या जनतेची भूमिका मांडत असतो हे विरोधी पक्षनेते विसरलेले दिसत आहेत
काहीवेळात आझाद मैदानातून मोर्च्यााला होणार सुरूवात
पवारांवरती आरोप करून घाणेरडं राजकारत आहेत – रोहित पवार
वरीष्ठ नेते योग्य निर्णय घेतील
मी एक नवीन आमदार
अजून आरोप सिध्द झालेले नाहीत
मुंबई कशा पध्दतीचं राजकारण सुरू आहे
महापुरूषांच्या अपमानाबद्दल भाजप का गप्प
सोयीचं राजकारण कायम भाजपाकडून होत आहे
आझाद मैदानात मोर्च्याचं नियोजन पाहण्यासाठी आशिष शेलार, प्रसाद लाड, पोहोचले… प्रसाद लाड यांची शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर टिका…
– संजय राऊत हे फुसका बार आहेत, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही, शरद पवार जेष्ठ नेते आहेत, त्यांनीच ठरवावं की त्यांच्या पक्षातल्या कुणाचा यात सहभाग आहे… अनिल गोटे जे आधी आमच्याकडे होते ते आत्ता तिथे आहेत, आॅफिस त्याचं यंत्रणा त्यांची त्यांनी पाहावे
भाजपच्या धडक मोर्चा आजाद मैदान ते मेट्रो सिनेमा निघणार आहे त्यामुळे भाजपने मेट्रो सिनेमा, फेशन स्ट्रीट, आजाद मैदान या परिसरात बॅनरबाजी आणि भाजपचे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केलाय
व्यक्तिशा या गोष्टीत माझा कुठलाही संबंध नाही. आमची एक तक्रार आहे. कुणी तरी तक्रार करायची आणि त्या तक्रारीतून लोकप्रतिनधींवर वेगवेगळ्या एजन्सीची मदत घेऊन त्यांना नामशेष केलं जात आहे. बंगाल आणि महाराष्ट्रात त्याची संख्या अधिक आहे.
उदाहरणच द्यायचं झालं. अनिल देशमुखाची तक्रार पोलीस अधिकाऱ्याने केली. देशमुख तुरुंगात आहे. ज्यांनी तक्रार केली त्यांच्या चौकश्या सुरू आहेत. देशमुख यांना तुरुंगात टाकल्यानंतर चौकशी कशा पद्धतीने किती वेळा केली जाते. सत्तेचा गैरवापर करून कशी केली जाते त्याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे
देशमुख कुटुंब, नातेवाई, चार्टड अकाऊंट, नातेवाईक, सहकारी कर्मचारी, प्रायव्हेट सेक्रेटरी अशा ९५ लोकांवर रेड झाल्या. २०० लोकांना बोलावून चौकशी केली. ईडीचे ५०, सीबीआय २० इन्कम टॅक्सचे २० छापे असे ९० छापे एका व्यक्तीबाबत घातले. प्रशासनात असं मी ऐकलं नव्हतं. ९० छापे. एवढे छापे पाडून काही हाती लागत नाही म्हणून त्यांना त्रास दिला जात आहे.
ते खरं आहे की नाही ते सिद्ध झालं पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार चौकशी करेल. त्याची सत्यता असत्यता तपासेल. त्यात माझंही नाव घेतलेलं दिसतं. माझं कधी या संबंधात कुणाशी बोलणं व्हायचं कारण नाही. कधी काळी वर्ष सहा महिन्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या सहकाऱ्याबाबत तक्रार आली होती. मी त्यांना कळवली. त्यांना सांगितलं त्यात सत्यता किती तुम्ही पाहा. तुमच्या सहकाऱ्याबाबतची ही तक्रार आहे. एखादी व्यक्ती सार्वनिक जीवनात कार्य करते तेव्हा त्यावर शहानिशा न करता बोलणं योग्य नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर त्यांच्याकडून मला एवढंच कळलं की तुम्ही सांगितलेल्या लोकांच्या तक्रारीत मी लक्ष घातलं. अशाप्रकारच्या गोष्टी होता कामा नयेत याची काळजी घेईल. हा प्रश्न माझ्याबाबत तिथे संपला.
सर्व आरोपांची सरकारनं चौकशी करावी – शरद पवार
ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. मी कौतुक वाटलं एका शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधीत १२५ तासांची रेकॉर्डिंग हे करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले ही कौतुकास्पद बाब आहे
१२५ तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब आहे. १२५ तास रेकॉर्डिंग काम करण्याचं काम खरंच असेल तर शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा एजन्सी या फक्त भारत सरकारकडे आहेत. त्यामुळे राज्यात जाऊन राज्यात जाऊन राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात जाऊन तास न् तास जे काही काम केलं टेप केलं रेकॉर्ड करायला ते यशस्वी झाले.
– आयकर विभागाच्या कारवाईची कुणकुण लागल्यावर बजरंग खरमाटे यांनी केली प्रॉपर्टीची विक्री,
– बजरंग खरमाटे यांचे सख्खे भाऊ साहेबराव खरमाटे यांच्या नावावर असलेली जमिनीची विक्री,
– बारामतीच्या रुई परिसरात होती प्रॉपर्टी,
– ३ आणि ४ रोजी या दोन झालीत तब्बल ३१ दस्त.
यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील आयता गावात गॅस सिलेंडर चा स्फोट
गॅस सिलेंडर च्या स्फोटात एकाच कुटूंबातील 2 जण ठार
आयता गावातील जयस्वाल नामक व्यक्ती च्या घरी गॅस सिलेंडर चा स्फोट झाला यात सम्पूर्ण घर जळून खाक झाले तर या आगीत
आई आणि मुलीचा होरपळून झाला मृत्यू
साताऱ्याचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. साबळे वाडी येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्या अजिंक्यतारा कारखान्याबाबत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे तर आमदार शिवेंद्रराजे यांनीही याला प्रत्युत्तर देत खासदार उदयनराजे यांची बुद्धी भ्रष्ट झाले असल्याचे सांगत त्यांनी कधीही उसाची शेती केली नसुन फक्त ते डोंबाऱ्याचा खेळ करत असल्याचे प्रत्युत्तर दिलंय.
राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार?
– केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर काय भाष्य करणार,
– मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याबाबत मनसेची भूमिका स्पष्ट करणार,
– राज्यातील महाविकास आघाडीच्या 2 वर्षाच्या कारभारावर,
– ओबीसी आरक्षणासंदर्भात मनसेची पुढील भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता,
– मनसे – भाजप युतीसंदर्भात स्पष्टीकरण
– महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो रे नारा देण्याची शक्यता.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपाने धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठीची वातावरण निर्मिती आझाद मैदानावर करण्यात आली आहे. मुंबईच्या आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा सिग्नल पर्यंत हा मोर्चा निघणार असल्याची माहिती मिळतेय. आझात मैदानात हजारो पदाधिकारी बसतील अशी आसनव्यवस्था करण्यात येत आहे. एकूणच भाजपाचा आजचा मोर्चा हा आक्रमक असे चित्र आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज मालेगाव शहरासह ग्रामीण भागात अवकाळी रिमझिम पाऊस सुरू. त्यामुळं रब्बीतील काढणीला आलेल्या गहू,हरभरा पिकांचं नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे….
कोल्हापूरची थेट पाईपलाईन योजना मे अखेरीस पूर्ण होणार
पाईपलाईनचे काम पूर्ण, कळमवाडी धरणातील जॅकवेलच काम ही प्रगतीपथावर
प्रशासक कादंबरी बलकवडे यांची माहिती
425 कोटींचा थेट पाईप लाईन योजनेच्या पूर्णत्वाची कोल्हापूरकरांना आहे प्रतीक्षा
या आधी तारखा देऊन ही काम झालं नव्हतं पूर्ण
आता तरी वेळेत काम पूर्ण होणार का याची उत्सुकता
औरंगाबादेत वंचित बहुजन आघाडी आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता
कर्नाटकातील हिजाब धारी मुलीच्या सत्कारावरून भाजप आणि वंचित आघाडीत पडणार ठिणगी
कर्नाटकातील हिजाब धारी बेबी मुस्कान खान हिचा 14 तारखेला सत्कार
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर करणार सत्कार
हिजाब धारी मुस्कान हिच्या सत्काराला भाजप करणार विरोध
सत्कार केला तर रस्त्यावर उतरण्याचा शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी दिला ईशारा
पोलीस आयुक्तांना पत्र देऊन कार्यक्रम रद्द करण्याची भाजप करणार विनंती
कार्यक्रमाला परवानगी दिल्यास वातावरण चिघळण्याची दिला ईशारा
नवी दिल्ली राहुल गांधी यांचे संजय राऊत यांना पत्र
खासदार संजय राऊत यांच्या पाठीशी राहुल गांधी उभा राहणार
खासदार संजय राऊत यांनी मानले राहुल गांधी यांचे आभार
लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या आमच्या प्रयत्नात, आम्हाला एकत्र लढावे लागेल – राऊत
केंद्रीय एजन्सी एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत – राऊत
केंद्रातील काही एजन्सीकडून राऊत कुटुंबीयांची झाली आहे चौकशी
टीईटी घोटाळा प्रकरणात आणखी एका आरोपीला नाशिकमधून सायबर पोलिसांनी केली अटक
मुकुंद जगन्नाथ सुर्यवंशी असं या आरोपीचं नावं आहे..
मुकुंद सुर्यवंशी आणि इतर दलालांनी किती अपात्र विद्यार्थ्यांना पात्र केलं याचा केला जाणार तपास
14 तारखेपर्यंत न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
आतापर्यंत 7 हजार 880 अपात्र विद्यार्थ्यांना पात्र केल्याचं पोलीस तपासात उघड
सर्वाधिक उमेदवार हे नाशिक जिल्ह्यातील 2770 एवढे आहेत
या गुन्ह्यात या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
खडकवासला धरणसाखळी क्षेत्रातील पाणीसाठा 60 टक्क्यांवर
चार धरणात मिळून पाणीसाठा 17.35टीएमसीवर
गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.60 टक्के इतका पाणीसाठा कमी
खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो
शहराला दिल्या जाणाऱ्या पाण्यात कपात केली जाणार नाही जलसंपदा विभागाचं पालिकेला आश्वासन
नागपुरातील पाचपावलीत बांधणार नवीन उडाणपूल
राज्य शासनाची भूमिका , 650 कोटी खर्च अपेक्षित
पाचपावली परिसरातील उडान पुलाची झाली आहे दुरावस्था
या बाबत नागरिकांच्या होत्या मोठ्या तक्रारी
या तक्रारी ची दाखल घेत जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन उडान पूल बांधण्याच अस्वासन राज्य सरकार ने दिल
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्याल उत्तर देताना दिलं
मनसेचा आज पुण्यात वर्धापन दिन
राज ठाकरे काय बोलणार ? महाराष्ट्राला उत्सुकता
राज ठाकरे मनसैनिकांना काय आदेश देणार ?
स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंचात होणार मनसेचा मेळावा.
6 वाजता राज ठाकरे करणार संबोधित…
अमरावतीच्या अचलपूर शहरातील एकाच विहरीत आढळुन आले दोन भावांचे मृतदेह….
मंगळवारी रात्रीच्या सुमारास विलायतपुरा बैलजोडी चौकातील विहरीत आढळले मृतदेह…
दोन भावांची हत्या की आत्महत्या;पोलिसांचा तपास सुरू…
प्रभात मिश्रा वय 65 व अरुण मिश्रा वय 50 वर्ष अशी दोन भावांची नावे..
महापालिकेने पाठविलेला प्रस्ताव नगर रचना विभागात प्रलंबित
झोपडपट्टी वासीयांना पट्टे देण्यासाठी जमिनीच्या फेरबदलाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता
मात्र मंत्रालयात या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाली नसल्याने पट्टे वाटप अडले आहे
झोपडपट्टी धारकांना मात्र करावी लागणार प्रतीक्षा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या अध्ययन व दर्शनासाठी भंडारा जिल्ह्यातील चमू खासदार सुनील मेंढे यांच्या सौभाग्य वती असलेल्या शुभांगी मेंढे यांच्या नेतृत्वाखाली रायगडाच्या दिशेने रवाना झाली.