केंद्रात एनडीएचे सरकार आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये नवीन सरकार येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा शपथ घेणार आहे. कठूआमधे सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात रात्रीपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. लोकसभा जिंकल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी वायनाडला जाणार आहे. वायनाडमध्ये जाहीर सभा ते घेत आहेत. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी औषध उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परवानगीमुळे महाविद्यालयात वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ- दीप निवासस्थानी भेटीला आले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. श्रीरामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय. सलग होत असलेल्या पावसाने खरिप पेरणीला गती मिळणार आहे. यंदा मान्सूनचे वेळेत आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तसेच उकाड्यातून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दिल्लीतील जलसंकटावर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह म्हणाले की, आम्हीही पाणी सोडले आहे. हरियाणा सरकारला हरियाणा सीमेपलीकडे पाणी सोडावे लागत आहे. भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पाण्याची गरज भासल्यास आम्ही सर्व पाणी द्यायला तयार आहोत. हरियाणा हे दिल्ली आणि हिमाचलमध्ये आहे, हरियाणान पाणी का सोडत नाही हे पाहावे लागेल.
शाळेच्या परिसरातील 100 मीटर अंतरावर असणाऱ्या पानटपऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे. शाळेच्या आजूबाजूला उघडपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जातेय. त्यामुळे विद्यार्थी नशेच्या आहारी जातात. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी शाळेनजीकच्या पानटपऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, पंतप्रधान 13 जून रोजी G7 परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला जाणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच विदेश दौरा असेल. 14 जून रोजी पंतप्रधान G7 परिषदेत सहभागी होतील ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आफ्रिका हे मुख्य मुद्दे असतील. रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील परिस्थितीवरही G7 मध्ये चर्चा होणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये काल रात्रीपासून सुरू असलेली चकमक संपली आहे. सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते करहाळमधून आमदार म्हणून निवडून आले. यावेळी ते कन्नौजमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत.
कुवैतमधून मोठी बातमी समोर आली आहे. कुवैतमध्ये लागलेल्या आगीत 41 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. रहिवाशी इमारतीला लागलेल्या आगीत अनेकांना मृत्यू झालाय. त्यात 41 भारतीयांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान आगीचं कारण अजून समजून शकलेलं नाही.
अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. तर पारनेर तालुक्यातही जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे पारनेर शहरातील लोणी रोड परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांच्या अंत्यदर्शनसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीसीसीआय खजिनदार आणि भाजप आशिष शेलार हे पोहचले आहेत. अमोल काळे यांचं पार्थिव 4 ते 5 या दरम्यान राहत्या घरी पाली हिल येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन झालं. ते टीम इंडिया-पाकिस्तान सामना पाहायला गेले होते.
भाजपचे माजी आमदार मधू देवळेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या दुपारी १० वाजता सांताक्रुज स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अमोल काळे यांचं पार्थिव दुपारी 4 ते 5 या वेळात त्यांच्या घरी पाली हिल येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. अमोल काळे यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, आशिष शेलार, अमृता फडणवीस, प्रसाद लाड, रश्मी शुक्ला, श्रीकांत भारतीय उपस्थित आहेत.
नाशिक शिक्षक मतदारसंघात शेवटच्या क्षणी वेगवान घडामोडी घडत आहेत. अपक्ष उमेदवार धनराज विसपुते यांनी माघार घेतली आहे. भाजपचे राजेंद्र विखे यांनी ही घेतली माघार.
महायुतीत आता अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, शिंदे गटाचे किशोर दराडे, अपक्ष उमेदवारी विवेक कोल्हे मैदानात. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या दिलीप पाटील यांची माघार, ठाकरे गटाचे संदीप गुळवे मैदानात.
कोकण पदवीधर निवडणुकीत महायुतीकडून निरंजन डावखरे (भाजप) विरुद्ध महाविकासाघडी रमेश कीर (काँग्रेस) अशी लढत आहे. किशोर जैन (शिवसेना ठाकरे गट ), संजय मोरे (शिवसेना), अमित सरैय्या (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) यांनी माघार घेतली आहे
काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील माघारीसाठी दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यासह दाखल झाले आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात काँग्रेस आणि ठाकरे गटात दिलजमाई झाली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यासह, जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख , काँग्रेस उमेदवार विभागीय आयुक्तालयांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
अयोध्यातील दुकान आणि घर तोडल्यानंतर प्रभावित झालेल्या लोकांना 1,253.06 कोटी रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अयोध्याचे जिल्हाधिकारी नीतीश कुमार यांनी ही घोषणा केली आहे. अयोद्धेत लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारने निर्णय घेतला आहे.
पुण्यात पुन्हा गंभीर अपघात झाला आहे. मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात भरधाव ट्रकने महिलेला चिरडलं आहे. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यातील गंगाधाम चौक परिसरातील घटना आहे. पदचारी महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन केलं जात आहे. शहर विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात मेणबत्ती लावल्या आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात मेणबत्ती लावल्या. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या विरोधात ठाकरे गटाने आंदोलन केलं आहे. गेल्या काही दिवसापासून शहरात वारंवार वीज खंडित होत आहे. अनेक आंदोलन होऊन देखील कंपनीला जाग नाही. येत्या काही दिवसात वीज पुरवठ्यात हलगर्जीपणा केल्यास अजून तरी आंदोलन करण्याचा ठाकरे गटाच्या शिवसेनेने इशारा दिला आहे.
ससून रुग्णालयातील अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि खाजगी मेडिकल वाले हातमिळवणी करून रुग्णाची लूट करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नागरिकांकडून स्टिंग ऑपरेशन करत ससून रुग्णालयातील प्रकार समोर आणला आहे. उपचारासाठी ससूनमधील कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकाकडून 24000 रुपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससूनमधील या प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याची महाराष्ट्र मुस्लीम कॉन्फर्स संघटनेने ही मागणी केली आहे.
“गेला आठवडाभर वोट जिहाद बांगलादेशी मतदान झाले, त्या बाबत मी आवाज उठवला. मला धमकी मिळाली आहे. पोलिसांनी मला सतर्क राहण्यास सांगितले आहे. मोर्चा तुमच्याकडे येणार आहे. मिनी कोकण ईशान्य मुंबईमध्ये भाजप पुढे आहे. बांगलादेशी लोकांच्या मतदानामुळे उद्धव ठाकरे यांची लाज राखली गेली” असं किरीट सोमय्या म्हणाले.
नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मीटर संघर्ष समितीच आंदोलन. फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न. नागपुराती व्हेरायटी चौकात आंदोलन सुरु.
सोलापूर जिल्ह्यात मागील आठ दिवसात 180.7 मिमी. पावसाची नोंद. जून महिन्याच्या सरासरीपेक्षा तब्बल 176.3 टक्के पावसाची नोंद. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागलेत. या पावसामुळे खरीप पिकाला मोठा दिलासा मिळाला असून पेरण्यासाठी पोषक वातावरण तयार
शरद पवार पुरंदरमधील वाल्हा गावात. नेते लोकांनी या भागात बरीच गुंतवणूक केली आहे असं ऐकलं आहे. अशोक टेकवडे यांनी 500 एकर जमीन घेतली आहे. विजय शिवतारे आणि डीएसके यांनी 500 एकर जमीन घेतली आहे. शरद पवारांनी स्थानिकांकडून घेतली माहिती. बाहेरचे लोकं जर जमिनी घेत असतील तर पाणी नेमकं कुणासाठी द्यायचं मग याचा विचार करावा लागेल.
छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच… संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर भारतीय जनता पार्टीने सांगितला होता दावा… भारतीय जनता पार्टीच्या मागणीला शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी केला विरोध… शिवसेना जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत यांनी केला भाजपच्या मागणीला विरोध… संभाजीनगरचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच ठेवण्याची केली मागणी… भाजपने विनाकारण चर्चा घडवून न आणण्याचा दिला सल्ला…
शिंदे सेना किती हप्ते गोळा करते याचे आकडे घ्यावे लागतील… डोंबिवलीमध्ये पुन्हा स्फोट झाल्यामुळे संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. डोंबिवली एमआयडीसीतून शिंदे सेना हप्ते गोळा करते… असं देखील राऊत म्हणाले…
राजेंद्र विखे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार…. भाजपकडून एबी फॉर्म मिळवण्यासाठी विखे यांचे प्रयत्न सुरू… राधाकृष्ण विखे यांच्या भेटीनंतर माघार घेतात का याकडे लक्ष? नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने राजेंद्र विखे यांच्या भूमिकेकडे लक्ष.. धनराज विसपुते यांनी देखील केला आहे भाजपकडून लढण्याचा दावा…
सोलापुरातील कासेगाव परिसरात पावसामुळे ओढ्याला पूर आला आहे. ओढ्याच्या पाण्यात वाहून जाणारे 2 जण बचावले आहेत. तर एक बेपत्ता आहे. बबन जाधव, महादेव रेड्डी बचावले आहेत, तर ज्ञानेश्वर कदम अजूनही बेपत्ता आहेत.
डोंबिवली एमआयडीसीतील मालदे आणि इंडो अमाईन्स कंपनीला आग.. आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट.. फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल…
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबतीत सरकार गंभीर आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर कारवाई देखील सरकार करत आहे… असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे…
नाफेड, एनसीसीएफच्या कांदा खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. बाजार समितीच्या बाजारभावापेक्षा नाफेड, एनसीसीएफ 500 ते 600 रुपयांनी प्रति क्विंटलला कमी दर देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे. नाफेड, एनसीसीएफचा 2105 रुपये प्रतिक्विंटल दर तर बाजार समित्यांमध्ये 2600 ते 2700 रुपये सरासरी दर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे.
अंतरवाली सराटीमध्ये गर्दी करू नका, कामाचे दिवस आहे, कामे उरकल्याशिवाय इकडे येऊ नका, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आरक्षण भेटल्याशिवाय मी उठणार नाही,असा निर्धार पण त्यांनी व्यक्त केला.
नाशिक जिल्ह्यात पाणी संकट गडद झाले आहे.जिल्ह्यातील 7 धरणांनी गाठला तळ गाठला आहे. वालदेवी,भावली,माणिकपुंज, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव मध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर गंगापूर धरणात अवघा 19 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला आहे.गंगापूर धरणातून गाळ काढल्याने यंदा जास्त पाणीसाठा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक व उत्तर महाराष्ट्राला मान्सूनची प्रतिक्षा आहे.
अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जून ते 3 जुलै पर्यंत चालणार आहे. अधिवेशन काळात नव्या अध्यक्षांची निवड , राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि खासदारांना शपथ दिली जाणार आहे. तर राज्यसभेचे अधिवेशन 27 जून पासून 3 जुलैपर्यंत चालणार आहे.
सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट मिळाला आहे. काल रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. सलग सात ते आठ दिवस पडणाऱ्या कोसळधार पावसामुळे शहरातील सकल भागात पाणी साचले आहे.तर अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. सततच्या पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने महापालिकेची नाले सफाई फोल ठरल्याचे पाहायला मिळाले.
हनुमान चालीसा आणि देशद्रोहाच्या गुन्ह्यात मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आज सकाळी 11 वाजता न्यायालयात हजेरी लावणार.
जम्मू-काश्मीरमधील कठूआमधे सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात रात्रीपासून चकमक सुरु आहे. चकमकीत 5 सैनिक जखमी झाले आहे. तसेच एक दहशतवादी ठार झाला आहे. अजूनही भारतीय सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरू आहरे.
लोकसभा जिंकल्यानंतर पहिल्यांदा राहुल गांधी केरळ दौऱ्यावर जात आहे. त्यांची वायनाडला सभा होणार आहे.
सोलापुरातील कासेगावात ओढ्याच्या पाण्यात 3 जण वाहून गेले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याला पूर आला आहे. पूलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघे जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल्याची माहिती मिळाली.
एनडीए आमदारांच्या बैठकीत चंद्राबाबू नायडू यांना विधिमंडळ दलाचा नेता निवडण्यात आले. त्यानंतर त्यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला. १२ जून रोजी सकाळी 11.30 वाजता विजयवाडा येथे होणाऱ्या भव्यदिव्य सोहळ्यात चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ घेणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहे.