Maharashtra Marathi News LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार का?

| Updated on: Sep 12, 2023 | 11:03 PM

Manoj Jarange Patil Five Important Demands | महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर. आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे.

Maharashtra Marathi News LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार का?
Follow us on

मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 14 वा दिवस आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काल मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली व त्यांना सर्वपक्षीयांच्यावतीने उपोषण मागे घेण्याच आवाहन करण्यात आलं. सरकार आज मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतं? ते पहाव लागेल. दरम्यान काल आशिया कप टुर्नामेंटमध्ये भारत-पाकिस्तान सामना झाला. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत एकतर्फी विजय मिळवला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Sep 2023 11:01 PM (IST)

    मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री यांची फोनवर चर्चा

    मुंबई | मंत्री उदय सामंत यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोनवर चर्चा घडवून आणली. जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना उपोषणस्थळी येण्याची विनंती केली आहे. एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आल्यास आपण आरक्षण सोडू, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 12 Sep 2023 09:38 PM (IST)

    नवी मुंबईत एका दुकानाला भीषण आग

    नवी मुंबई | बेलापूर सेक्टर 15 येथील चावला प्लाझामधील एका दुकानाला आग लागली होती. मात्र अग्निशमन यंत्रणेला योग्यवेळी आग विझवण्यात यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.


  • 12 Sep 2023 09:19 PM (IST)

    ‘मराठा आरक्षणासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत’, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

    जळगाव | “राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठा आरक्षणासाठी कोणतेही पाऊल उचलले तर आम्ही एकत्र आहोत. आम्ही सकारात्मक निर्णयाच्या पाठीशी आणि सरकार सोबत असू”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काल झालेल्या सर्वपक्षीय मराठा आरक्षण बैठकीवर दिली.

  • 12 Sep 2023 09:00 PM (IST)

    Gautami Patil | परभणीत गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमात राडा

    परभणी | प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमात राडा झाला आहे. दहीहंडीच्या निमित्ताने परभणीत गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात हा जोरदार राडा झालाय. या कार्यक्रमादरम्यान जमावाने खूर्च्या फेकून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलाय. गोंधळानंतर आयोजकांनी कार्यक्रम आटोपला आहे.

  • 12 Sep 2023 08:20 PM (IST)

    Richest Mp in India | देशात सर्वात श्रीमंत खासदार कोणत्या राज्यात

    नवी दिल्ली | देशातील 763 खासदारांकडे 30 हजार कोटींची संपत्ती असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म म्हणजेच ADR ने दिली आहे. त्यानुसार भाजप खासदारंकडे सर्वाधिक संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. भाजप खासदारांची संपत्ती 7 हजार 51 कोटी आहे. तर BRS च्या 16 खासदारांची संपत्ती 6 हजार कोटी आहे. वायएसआर च्या 31 खासदारांची 4700 कोटी आहे. काँग्रेसच्या 81 खासदारांची 3169 कोटी संपत्ती आहे. आपच्या 11 खासदारांची संपत्ती 1318 कोटी इतकी आहे. तर देशात सर्वात श्रीमंत खासदार खासदार हे तेलंगणा राज्यातील आहेत.

  • 12 Sep 2023 06:57 PM (IST)

    अमित शाह हैदराबाद मुक्ती दिवस सोहळ्याला उपस्थित राहणार

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

  • 12 Sep 2023 06:50 PM (IST)

    केंद्र सरकारने हिमाचल पूर ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी: प्रियंका गांधी

    काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी मंडी येथे सांगितलं की, हिमाचलमध्ये आपत्ती आली तेव्हा प्रत्येक रहिवाशाच्या मनात एक भावना निर्माण झाली होती की या आपत्तीचा आपण एकत्रितपणे सामना करू. आमचे सरकार रात्रंदिवस काम करत आहे. तुमचे जे काही नुकसान झाले आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण मदत मिळेल. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांनाही सरकार भरपाई देणार आहे. हा संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित केल्यास बराच दिलासा मिळू शकतो.

  • 12 Sep 2023 06:40 PM (IST)

    कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो दिल्लीहून रवाना, दोन दिवसांपूर्वी विमान झालं होतं खराब

    G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या विमानाची दुरुस्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान ट्रुडो त्यांच्या विमानाने कॅनडाला रवाना झाले आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे ते गेल्या दोन दिवसांपासून भारतात अडकले होते.

  • 12 Sep 2023 06:25 PM (IST)

    देशातील 40 टक्के खासदारांवर गुन्हे दाखल: ADR अहवाल

    देशातील सुमारे 40 टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 25 टक्के खासदारांवर खुनाचे आणि महिलांविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे एडीआरच्या अहवालातून समोर आले आहे.

  • 12 Sep 2023 06:07 PM (IST)

    लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के, तीव्रता 4 रिश्टर स्केल

    लेह लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 एवढी मोजण्यात आली. भूकंपामुळे आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. लडाखमध्ये भूकंप होण्यापूर्वी फिलिपाइन्सची राजधानी मनिलामध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. तिथल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजली गेली आहे.

  • 12 Sep 2023 04:52 PM (IST)

    V. K. Singh News : पाकव्याप्त काश्मीर भारतात आपोआप विलिन होईल

    पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होईल, असे मोठे वक्तव्य सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी केले आहे. काश्मीरसंबंधी सध्याच्या केंद्र सरकारने मोठे निर्णय घेतले आहे. 370 कलम रद्द करुन केंद्र सरकारने सर्वांनाच खणखणीत इशारा दिलेला आहे. त्यानंतर आता सिंह यांनी पाकिस्तान आणि चीनला धडकी भरवणारे वक्तव्य केले आहे.

  • 12 Sep 2023 04:41 PM (IST)

    Ajit Pawar News : फडणवीस यांनी चूक नसताना माफी मागितली

    जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला होता. याप्रकरणी फडणवीस यांची चूक नसताना माफी मागितल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ही पोलीस अधिकाऱ्याची चूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासंबंधी मार्ग काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 12 Sep 2023 04:25 PM (IST)

    Congress News : रावेर मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

    रावेर लोकसभेच्या जागेवर काँग्रसने दावा सांगतिला आहे. ही जागा पूर्वीपासून काँग्रेसची होती आणि आता ही ती काँग्रेसची असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. रावेर लोकसभा मतदार संघाबाबत तडजोड करण्यात येणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

  • 12 Sep 2023 04:18 PM (IST)

    Dhangar Reservation : पुण्यात धनगर समाजाचं आंदोलन

    मराठा समाज आरक्षणासाठी राज्यात जागोजागी आंदोलनं, धरणे, मोर्चा, उपोषण करत आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात धनगर समाजानं आरक्षणासाठी आंदोलन केले आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.

  • 12 Sep 2023 04:16 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांना जोकरचा पोषाख पाठवणार – चित्रा वाघ

    मुंबई : उद्धव ठाकरे यांना जोकरचा पोषाख पाठवणार. उद्धव ठाकरे हे विदूषक असल्याचं म्हणत चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. भाजप प्रदेश कार्यालय येथे पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी जोकरला कपडे घालून नाचवलं. हेच कपडे उद्धव ठाकरे यांना पाठवणार असे भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या.

  • 12 Sep 2023 04:06 PM (IST)

    Manoj Jarange News : साखळी उपोषण सुरुच ठेवणार

    मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडणार असलो तरी आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. आरक्षणासाठी त्यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा कालवधी दिला आहे. अहवाल सकारात्मक येवो अथवा नकारात्मक येवो, आरक्षण द्यावंच लागेल, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.

  • 12 Sep 2023 03:44 PM (IST)

    LIVE UPDATE | मनोज जरांगे पा यांची भूमिका समजून घेऊन निर्णय घेतो – मुख्यमंत्री

    मनोज जरांगे पाटील व त्यांच्या शिष्ट मंडळाशी बोलतो असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर केलं आहे. सरकार मराठा आरक्षणावर सरकारात्मक आहे. सर्वपक्षीय बैठकीत देखील मराठा आरक्षणावर चर्चा झाली आहे. मनोज जरांगे यांची भूमिका समजून घेऊन निर्णय घेतो.. असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 12 Sep 2023 03:28 PM (IST)

    LIVE UPDATE | प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ मोठ्या संकटात

    फ्लॅटच्या एका व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने नुसरत जहाँ यांची चौकशी सुरु केली आहे. 2 खोल्यांचा फ्लॅट देण्यासाठी 500 लोकांकडून पैसे घेण्याचा आरोप आहे.  बशीरहाट येथून नुसरत जहाँ खासदार आहेत. त्यांनी फसवणुकीचे आरोप फेटाळून लावले आहेत…. वाचा सविस्तर 

  • 12 Sep 2023 03:15 PM (IST)

    manoj jarange patil : 12 ऑक्टोंबरला मराठा समाजाची सर्वात मोठी सभा

    मराठा समाजाची सर्वात मोठी सभा 12 ऑक्टोंबरला घेण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी महिन्याभराची मुदत दिली आहे.

  • 12 Sep 2023 03:02 PM (IST)

    manoj jarange patil : मनोज जरांगे पाटील यांच्या या पाच मागण्या

    • अहवाल कसाही येवो आरक्षण द्यावे लागेल
    •  महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल तेवढे मागे घ्या
    •  लाठीचार्ज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करा
    • उपोषण सोडायला, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळ आणि छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे आले पाहिजे.
    •  सरकारच्या वतीने हे सर्व लिहून द्यावे
  • 12 Sep 2023 02:58 PM (IST)

    manoj jarange patil : मनोज जरांगे पाटील यांची सरकारला महिन्याभराची वेळ

    मराठा समाजाने एका महिन्याचा वेळ दिला आहे. राज्यभरात अहिंसक आंदोलन करा. समितीचा अहवाल कसाही आला तरी ३१ व्या दिवशी मराठा समाजातील सर्वांना जात प्रमाणपत्र द्यायचे.

  • 12 Sep 2023 02:53 PM (IST)

    manoj jarange patil : मनोज जरांगे पाटील यांची सरकारला महिन्याभराची वेळ

    जात बदनाम होऊ नये, म्हणून दोन पावले मागे हटत आहे. मी आमरण उपोषण सोडण्यास तयार आहे. पण जागा सोडणार नाही. महिन्याभरात सरकारने आरक्षण दिले नाही तर सरकार तोंडावर पडेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

  • 12 Sep 2023 02:46 PM (IST)

    manoj jarange patil : मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत घरी जाणार नाही

    सरकारला वेळ दिला तरी माझे आंदोलन थांबणार नाही. मी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला. आतपर्यंत आपण ४० वर्ष दिली आता एक महिना देऊ या. यानंतर टिकणारे आरक्षण मिळेल, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

  • 12 Sep 2023 02:37 PM (IST)

    manoj jarange patil : एक महिन्याचा वेळ दिला तर सरकारची जबाबदारी

    मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे. आम्ही आरक्षण देतो, एक महिना द्या, असे सरकारने म्हटले आहे. एक महिन्याचा वेळ दिला तर जबाबदारी सरकारची असणार आहे. सरकारला महिन्याभराचा वेळा द्यायचा की एक दिवसाचा जीआर घ्यावा.

  • 12 Sep 2023 02:33 PM (IST)

    manoj jarange patil : एका दिवसांत जीआर काढला तर टिकाणार नाही

    मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर एका दिवसात काढला तर तो न्यायालयात टिकणार नाही. त्याला न्यायालयात आव्हान दिले जाईल. आम्ही आरक्षण देतो, एक महिना द्या, असे सरकारचे म्हणणे आहे. टिकणारे आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

  • 12 Sep 2023 02:27 PM (IST)

    manoj jarange patil : मराठा आरक्षणामागे सरकार उभे राहिले

    मराठा आरक्षणामागे सरकार प्रथमच उभे राहिले आहे. ज्यांनी महिलांवर लाठीचार्ज केले, ते सर्व निलंबित होणार आहे. सरकारच्या या विषयावर दोन बैठका झाल्या आहेत.

  • 12 Sep 2023 02:23 PM (IST)

    manoj jarange patil : मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन सामंत जालन्याकडे

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन सामंत जालन्याकडे रवाना झाले आहे. विशेष विमानाने उदय सामंत रवाना झाले आहे. हा संदेश काय आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 12 Sep 2023 02:20 PM (IST)

    manoj jarange patil : सरकार आपल्यासमोर झुकले

    आपण एकत्र आल्यामुळे सरकार आपल्यासमोर झुकले. प्रथमच सर्व पक्षांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणसंदर्भात ठराव करण्यात आला. त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या प्रश्नावर प्रथमच सर्व पक्ष एकत्र आले, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

  • 12 Sep 2023 02:00 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार का ? संपूर्ण राज्याचं लागलं लक्ष

    मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा १५ दिवस असून अर्जुन खोतकर, संदीपान भुमरे जरांगे यांच्या भेटीसाठी दुसऱ्यांदा आले आहेत. सर्वपक्षीय बैठकीतील ठरावाची प्रत जरांगे यांना देण्यात आली.

    आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार, ते उपोषण मागे घेणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

  • 12 Sep 2023 01:51 PM (IST)

    वंचितचे नेते डॉ. संजय भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

    वंचितचे नेते डॉ. संजय भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला.

  • 12 Sep 2023 01:37 PM (IST)

    अमित ठाकरे आज पुण्यात, मतदारसंघाचा घेत आहेत आढावा

    अमित ठाकरेंकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला ते कसबा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

  • 12 Sep 2023 01:31 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अजित पवार जळगावात दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

    ‘शासन आपल्या दारी ‘ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगावातील पाचोरा येथे दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले असून शिंदे व अजित पवार यांच्यावर पुष्पवृष्टीदेखील करण्यात आली.

  • 12 Sep 2023 01:23 PM (IST)

    भाजप आमदार गणेश नाईक यांनी भरवला जनसंवाद

    नवी मुंबईत भाजपा आमदार गणेश नाईक यांनी जनसंवाद भरवत नागरिकांच्या व माजी नगरसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या. या जनसंवाद कार्यक्रमात पालिकेचे अधिकारी देखील सहभागी झाले होते. सांगितलेल्या समस्यांचे लवकर निवारण करा, अशी सूचना नाईक यांनी पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

  • 12 Sep 2023 01:15 PM (IST)

    जळगावमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते झाले आक्रमक, मुख्यमंत्र्यांविरोधात केली घोषणाबाजी

    जळगावातील पाचोरे येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र तेथेच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.

    घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • 12 Sep 2023 01:09 PM (IST)

    मनसेकडून राज्यातील लोकसभा निवडणूकीची तयारी सुरू

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 48 लोकसभा मतदारसंघात निरीक्षक नेमले आहेत.

    हे निरीक्षक मतदारसंघाचा अहवाल देणार असून तेथील परिस्थिती पाहून लोकसभा निवडणूकीची रणनीती आखली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

     

  • 12 Sep 2023 01:04 PM (IST)

    आरक्षणासाठी दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध

    नांदेडच्या शंकर नगर येथे मराठा आरक्षणासाठी दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांनी केलं आंदोलन. राज्य सरकार उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचाही केला आरोप.

  • 12 Sep 2023 11:59 AM (IST)

    Maharashtra News : आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाच्या आमदारांची सुनावणी होणार

    आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाच्या आमदारांची सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 14 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये सुनावणी होणार आहे.

  • 12 Sep 2023 11:52 AM (IST)

    Maharashtra News : बुलेट ट्रेनच्या कामासाठी आज BKC मधील काही मार्ग आज बंद

    बुलेट ट्रेनच्या कामासाठी आज BKC मधील काही मार्ग आज बंद राहाणार आहे. डायमंज जंक्शन ते जेएसडबल्यू कार्यालय, रोड प्लॅटीना जंक्शन ते ड्रेड सेंटर दरम्यान वाहतूक बंद असणार आहे.

  • 12 Sep 2023 11:45 AM (IST)

    Ganeshotsav 2023 : लालबागचा राजा मंडळाचा तब्बल 26.5 कोटींचा विमा

    लालबागचा राजा मंडळाचा तब्बल 26.5 कोटींचा विमा काढण्यात आलेला आहे. दोन महिन्यासाठी हा विमा काढण्यात आलेला आहे. संपूर्ण देशभतातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात. दरवर्षी कोट्यावधींचे दान भाविक श्री चरणी अर्पण करतात.

  • 12 Sep 2023 11:36 AM (IST)

    Ganeshotsav 2023 : मुंबईत शाडूच्या गणपतीला विशेष मागणी

    मुंबईत शाडूच्या गणपती मुर्तीला विशेष मागणी आहे. यंदा अनेकांची पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भर आहे. नवी मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक स्टॉलवर शाडूच्या गणेश मुर्ती विक्रीला

  • 12 Sep 2023 11:31 AM (IST)

    Devendra Fadanvis Rajasthan : देवेंद्र फडणवीस यांची आज राजस्थानमध्ये सभा

    Devendra Fadanvis Rajasthan : देवेंद्र फडणवीस यांची आज राजस्थानमध्ये पदयात्रा सभा आहे. 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान ही पदयात्रा होणार आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस राजस्थानमध्ये आहेत. मुख्यमंत्री शिंदेनंतर आता देवेंद्र फडणवीससुद्धा राजस्थान दौऱ्यावर आहेत.

  • 12 Sep 2023 11:20 AM (IST)

    Maharashtra Politics : विधीमंडळ सचिवांकडून ठाकरे गटाच्या 12 आमदारांना नोटीस

    विधीमंडळ सचिवांकडून ठाकरे गटाच्या 12 आमदारांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. 14 तारखेला दुपारी बारा वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

  • 12 Sep 2023 11:14 AM (IST)

    India Alliance : शरद पवार यांच्या घरी उद्या इंडीया आघाडीची बैठक

    शरद पवार यांच्या घरी उद्या इंडीया आघाडीची बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे. या बैठकीत जागावाटपा बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणूकीची रणनितीही ठरवली जाणार आहे.

  • 12 Sep 2023 11:01 AM (IST)

    सरकार हा शब्द पाळणार असल्याचा शब्द मी तुम्हाला देतो – संभाजी भिडे

    आरक्षण मिळेपर्यंत आम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत. मनोज दादांच्यासोबत आम्ही आहोत. त्यामुळे त्यांच्यासोबत लाखो लोकांची ताकद आहे. सरकार हा शब्द पाळणार असल्याचा शब्द मी तुम्हाला देतो असा विश्वास संभाजी भिडे यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे,

  • 12 Sep 2023 10:49 AM (IST)

    आरोग्य विभागाच्या नव्या 46 वाहनांचा लोकार्पण सोहळा

    पुण्यात आरोग्य विभागाच्या नव्या 46 वाहनांचा लोकार्पण सोहळा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते पुण्यात पार पडणार आहे. लोकार्पण सोहळ्याला कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे.

  • 12 Sep 2023 10:39 AM (IST)

    संभाजी भिडे आणि जरांगे पाटील यांच्यात आंदोलनस्थळी चर्चा

    संभाजी भिडे आणि जरांगे पाटील यांच्यात आंदोलनस्थळी चर्चा सुरु आहे. उपोषण मागे घ्यावे असं आवाहन संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्याचबरोबर जरांगे यांनी पुढची जबाबदारी माझ्यावर टाकावी असं देखील संभाजी भिडे यांनी सांगितलं आहे.

  • 12 Sep 2023 10:35 AM (IST)

    manoj jarange patil : आंदोलनाचा शेवट आरक्षणाने झाला पाहिजे

    मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा शेवट मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर झाला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम राहतील, असा विश्वास शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी व्यक्त केला.

  • 12 Sep 2023 10:29 AM (IST)

    संभाजी भिडे पाठिंबा देण्यासाठी आल्याने मला आणखी बळ मिळालं आहे – जरांगे पाटील

    संभाजी भिडे पाठिंबा देण्यासाठी आल्याने मला आणखी बळ मिळालं आहे – जरांगे पाटील

     

  • 12 Sep 2023 10:19 AM (IST)

    संभाजी भिडे जरांगेंच्या भेटीला

    आता मागे वळून पाहायचं नाही, जसं पाहिजे तसं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं संभाजी भिडे यांनी जरांगे पाटील यांना भेट घेऊन सांगितलं आहे. जरांगे तुमचं आम्हाला कौतुक वाटतं आहे. तुमचा विजय नक्की होणार आहे.  तुम्ही उपोषण थांबवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. फडणवीस, शिंदे आणि अजित दादांचं संभाजी भिडे यांच्याकडून कौतुक केलं आहे. त्याचबरोबर ही मंडळी फसवणूक करणारी नाही असं सुध्दा ते म्हणाले आहेत.

  • 12 Sep 2023 10:16 AM (IST)

    खोतकर, भुमरेंची जरांगेंसोबत चर्चा,

    अर्जुन खोतकर, संदीपान भुमरे जरांगेंच्या भेटीला, त्या उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करणार आहेत. चर्चेतून काही तोडगा काढणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतर मान्यवरांच्या आम्ही जरांगे पाटील यांना विनंती करण्यासाठी इथं आलो आहे असं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. ज्यांनी गोंधळ घातला, त्यांच्यावर लवकरचं गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सरकारने कालच्या बैठकीत अनेकत हिताचे निर्णय घेतले आहेत.

  • 12 Sep 2023 10:05 AM (IST)

    खोतकर, भुमरेंची जरांगेंसोबत चर्चा,

    अर्जुन खोतकर, संदीपान भुमरे जरांगेच्या भेटीला, त्या उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करणार आहेत. चर्चेतून काही तोडगा काढणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

  • 12 Sep 2023 09:55 AM (IST)

    तिवसामध्ये काँग्रेसची आज जनसंवाद यात्रा

    काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात आज काँग्रेसची जनसंवाद यात्रा होणार आहे. गाडगेबाबांची निर्वाणभूमी असलेल्या वलगाव मधून जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. जनसंवाद यात्रेत यवतमाळमधील कलावती बंदूरकर सहभागी होणार आहेत. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या अत्याचाराची,महागाईची आणि पापाची हंडी फोडणार आहोत, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.  कुऱ्हा येथील जाहीर सभेत कलावती बंदूरकर आपलं मत मांडणार आहेत.  कलावतीला आम्ही घर बांधून दिलं, असं अमित शाहा यांनी म्हटल्यानंतर कलावती बंदुरकर पुन्हा चर्चेत आल्या होत्या.

  • 12 Sep 2023 09:45 AM (IST)

    Manoj Jarange Patil : सरकारचे प्रतिनिधी मनोज जरंगे यांची घेणार

    सर्वपक्षीय बैठकीनंतर सरकारचे प्रतिनिधी मनोज जरंगे यांची घेणार भेट आहेत. संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर मनोज जरंगे यांची भेट घेणार आहेत.  मनोज जरंगे आज आंदोलन मागे घेणार का? याची सर्वत्र चर्चा आहे.  संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर उपोषण सोडवण्यासाठी आज प्रयत्न करणार आहेत. आज अकरा वाजता संदीपान भुमरे अर्जुन खोतकर मनोज जरंगे यांची घेणार भेट घेणार आहेत.

  • 12 Sep 2023 09:30 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या महिन्यामध्ये लंडन दौऱ्यावर जाणार आहे.  जर्मनी आणि लंडन असा हा दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहेत. तंत्रज्ञान आणि उद्योग संदर्भातली मुख्यमंत्री यांचीही महत्त्वाची लंडनवारी असणार आहे. हजारो कोटींचे उद्योग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येताना परत आणणार असल्याची माहिती आहे.

     

     

  • 12 Sep 2023 09:16 AM (IST)

    कालच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मराठा समाजाला सोबत घेऊन चर्चा करणार- मनोज जरांगे

    मनोज जरांगे पाटील हे १० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. तेव्हा ते त्यांची अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत. त्याआधी त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. सर्वपक्षीय बैठकीत काय निर्णय झाला माहीत नाही.सह्याद्रीवर बैठक झाली. त्याबाबत माहिती घेऊन बोलणार आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचे पत्र मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी ठाम भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

     

  • 12 Sep 2023 08:58 AM (IST)

    Maharashtra News : फिरत्या हौदावर मनपा करणार दीड कोटींचा खर्च

    पुणे महापालिका यंदा फिरत्या हौदावर करणार दीड कोटींचा खर्च करणार आहे. कोरोना काळात पुणे महापालिकेने फिरत्या हौदाची सोय केली होती. आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊनही महापालिकेने एवढा खर्च का केला? असा सवाल उपस्थित केला जातोय.

  • 12 Sep 2023 08:45 AM (IST)

    Shard Pawar : शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीची बुधावारी बैठक होणार आहे. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची ही बैठक होणार आहे. बैठकीत आघाडीच्या लोगोसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.

  • 12 Sep 2023 08:35 AM (IST)

    Maharashtra News : यंदा खरीप हंगाम पूर्ण धोक्यात

    नाशिक जिल्ह्यात यंदा खरीप हंगाम पूर्ण धोक्यात आला आहे. कमी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यंदा रब्बी पीक लागवडीचे क्षेत्र एक लाख हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. मका, बाजरीचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी आहे.

  • 12 Sep 2023 08:22 AM (IST)

    Maharashtra News : शिक्षक, कर्मचाऱ्यांना शाळेत मोबाईल बंदी

    नाशिकमधील मनपा शाळांमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांना शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी केली आहे. मनपा शिक्षण विभागाने यासंदर्भात आदेश काढले आहे. शिक्षकांना मुख्याध्यापकांच्या मोबाईलवरूनच संवाद साधता येणार आहे.

  • 12 Sep 2023 08:09 AM (IST)

    Maharashtra News : आप लढवणार राज्यातील सर्व निवडणुका

    आप महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे. पुणे महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आप लढवणार आहे. आपचे खासदार संजय सिंह यांची पुण्यात ही घोषणा केली.

  • 12 Sep 2023 07:59 AM (IST)

    Earthquake : भूकंपात आतापर्यंत 2800 नागरिकांचा मृत्यू

    मोरक्कोमध्ये मागच्या आठवड्यात मोठ्या रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. या दुर्घटनेतील मृताचा आकडा अजूनही वाढतोय. आतापर्यंत 2800 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरु आहे.

  • 12 Sep 2023 07:28 AM (IST)

    Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे आज उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देणार?

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगांव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी ते जळगावात येणार आहेत. यावेळी होणाऱ्या सभेत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला ते उत्तर देऊ शकतात.

  • 12 Sep 2023 07:20 AM (IST)

    Maratha Reservation : औषध उपचार घेण्यास तयार

    मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराठी येथील महिलांनी वैद्यकीय उपचार घेण्या संदर्भात विनवणी केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी औषध उपचार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना सलाईन लावण्यात आले.

  • 12 Sep 2023 07:19 AM (IST)

    Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील काय बोलणार?

    मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका मांडणार आहेत.