मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर येत्या 31 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. शिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. ऑपरेशन अजय यशस्वी. इस्रायलमधून 212 भारतीय मायदेशी परतले. यासह राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
मुंबई | चेंबूर वाशी नाका येथील अनिकगाव म्युनिसिपल (बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या) शाळेमधील 16 विद्यार्थ्यांना आज सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या मध्यान भोजनातून विषबाधा झालेली आहे. या प्रकरणात आता भोजन पुरवणाऱ्या शांताई महिला संस्थेवर कारवाई करत त्यांना काही काळाकरता मध्यान भोजन पुरवठा करण्यास बंदी घातलेली आहे. या शांताई महिला संस्थेतर्फे 24 शाळांमधील तब्बल 6 हजार हून अधिक मुलांना मध्यान्न भोजन पुरवलं जात होतं. चेंबूर वाशी नाका येथील आणि गाव बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये फक्त 16 मुलांना विषबाधा झालेली आहे.
सोलापूर | सोलापूर शहरामध्ये दोन पाळीव कुत्र्याने युवकाचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील लक्ष्मीनारायण टॉकीज परिसरातील एका उद्योजकाच्या घरी ही धक्कादायक घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आसिफ मुल्ला असे या जखमी युवकाचे नाव असून तो गंभीर जखमी झालाय. आसिफ हा युवक काही कारणाने या उद्योजकाच्या बंगल्याच्या कुंपानातून आत गेल्यानंतर दोन कुत्र्यांनी त्याचे लचके तोडायला सुरुवात केली. या हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आक्रमक झालेत. शहरात पाळीव आणि भटक्या कुत्र्यानी हल्ला केल्याच्या घटना सातत्याने वाढत असून याविरोधात महापालिकेत कुत्रे सोडण्याचा इशारा दिलाय.
मुंबई | या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भुजबळांना दुपारपासून फोनवरुन अज्ञातांकडून धमकीचे फोन केले जात आहेत. मराठा आरक्षणाला विरोध कराल तर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात येत आहे. दरम्यान यानंतर राष्ट्रवादीकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मुंबई | एमएमआरडीएची इमारत पुन्हा खुली करण्यात आली आहे. इमारतीत कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे इमारत पुन्हा खुली करण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या इमारतीतील पार्किंग भागातील एका गाडीत संश्यास्पद काही असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र त्या भागत काहीही धोकादायक नसल्याची माहिती ही बॉम्ब शोधक नाशक पथकाने दिली आहे.
नवी दिल्ली | “सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचा अनादर होणार नाही.तसेच विधिमंडळातील नियमांशी कोणतीही तडजोड होणार नाही. संविधानाच्या नियमानुसारच निर्णय घेतले जातील”, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी निर्णय देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं जाईल, असंही नार्वेकर यांनी म्हटलं.
मुंबई | अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचारासाठी जातील, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केलं आहे. बारामती जिंकण्यावरुन मुश्रीफ यांनी हे विधान केलंय. बारामती आम्हीच जिंकणार असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर कुणीतरी लढलंच पाहिजे असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांना लगावला. त्यानंतर मुश्रीफ यांनी हे विधान केलं.
मुंबई | मुंबईच्या वांद्रे येथून मोठी बातमी समोर आलीय. वांद्रे येथील एमएमआरडीएच्या कार्यालयात संशयास्पद वस्तू आढल्या आहेत. त्यामुळे या परिसरात बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक पोलीस, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालंय.
अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होतील ही काळया दगडावरची पांढरी रेष आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 145 चा जादूचा आकडा लागतो आणि जोपर्यंत एखाद्या पक्षाचे 145 आमदार निवडून येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री होता येत नाही. पण अजित पवार हे आपल्या स्वकर्तृत्वावर 145 चा आकडा गाठतील आणि मुख्यमंत्री होतील, असे डॉ राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले.
तिलकनगर रेल्वे स्टेशनवर सीबीआयने एका टीटीला अटक केलीये. बाहेर गावावरून मुंबईला येणाऱ्या लोकांकडून पैसे वसुली करण्याच्या आरोप हा टीटीवर करण्यात आलाय.
मुंबई विमानतळावरून ५.६८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आलंय. तीन परदेशी महिलांना केली डि आर आय ने अटक. सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून केली जात होती कोकेनची तस्करी. ५६८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला जाणाऱ्या वाहनाकडून टोल वसुली करू नका आमदार संतोष बांगर यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांनीच सांगितले की जरांगे यांच्या सभेला जाणाऱ्या वाहनांकडून टोल वसुली करू नका, असा दावा आमदार बांगर यांनी केलाय.
ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान चेन्नई विमानतळावर उतरले.
#WATCH ऑपरेशन अजय के तहत इजरायल में फंसे भारतीय नागरिकों को लेकर विशेष विमान चेन्नई के हवाई अड्डे उतरा। pic.twitter.com/yRbC1uP4nu
— ANI_HindiNews (@AHindinews) October 13, 2023
इस्रायल-हमास संघर्षादरम्यान इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांची भेट घेतली.
#WATCH इजराइल-हमास संघर्ष के बीच इजराइल के रक्षा मंत्री योव गैलेंट ने अमेरिकी रक्षा सचिव लॉयड ऑस्टिन से मुलाकात की।
(वीडियो स्रोत: रॉयटर्स) pic.twitter.com/jPnM41O2P9
— ANI_HindiNews (@AHindinews) October 13, 2023
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी फायबरनेट घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार देणाऱ्या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणी 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाला उपस्थिती राहणार आहेत. शनिवारी संध्याकाळी 5 वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल. ऑलिम्पिक समितीचं अधिवेशन जिओ वर्ल्डमध्ये 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने संजय सिंह यांच्या याचिकेवर ईडीकडून उत्तर मागितले आहे. दिल्ली उच्च न्यायालय 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता या प्रकरणाची पुढील सुनावणी करणार आहे.आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ईडीविरोधात तक्रार दाखल केली आहे. अटक बेकायदेशीर असल्याचं आव्हान दिलं आहे.
नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालयाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. याविषयीचा निर्णय छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली होती. राज्य सरकारने आज या विषयीच्या निर्णयाची घोषणा केली. या शासन निर्णयाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांना दिली.
मराठा आरक्षणासाठी 14 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा त्यांच्या गावी होत आहे. या सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. मराठा समाज या सभेसाठी एकवटला आहे. सभेच्या जागेवर साफसफाईची कामे सुरु आहेत. स्टेजची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागातून मराठा समाज येथे पोहचणार आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे ही सभा होणार आहे.
मराठा समाजाला आमचं सरकार न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला न्याय देणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयात ते टिकले. पण महाराष्ट्र विकास आघाडीला हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, तर उद्रेक होईल असा इशारा यशवंत सेनेने दिला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रभर विविध आंदोलने, निदर्शने झाली. चौंडीमध्ये तर २१ दिवसांचे उपोषण झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे नाहीतर रस्त्यावर उतरू असा अल्टीमेटम यशवंत सेनेचे प्रमुख माधवभाऊ गडदे यांनी ठाण्यातील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
“आम्हाला विश्वास आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ. मराठा सरकारला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. काही राजकिय पक्षांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर असं वाटतं यांना महाराष्ट्र शांतच राहू द्यायचा नाही. हे समाजाला एकमेकांसमोर उभं करणार आहेत. पण आम्ही असं होऊ देणार नाही,” असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.
“एक पोलीस आमच्या घरी आले होते. ते म्हणाले की पोलीस आणि राजकारणी मिळून तुमच्या मुलाचा एन्काऊंटर करणार आहेत. पोलीस आमच्या घरी येऊन तपास करत आहेत. आमच्या घरी सोनं वगैरे काही सापडलं नाही. घरात फक्त माझं मंगळसूत्र आहे. सध्यां ललित कुठे हे आम्हाला माहीत नाही. अभिषेकला मी ओळखत नाही. फक्त एक दोनदा तो घरी आला होता,” अशी माहिती ललित पाटीलच्या आईने दिली.
“ओबीसी आणि VJNT साठी आम्ही 30 जिआर काढले आहेत. त्यापैकी 26 मी काढले आणि 4 शिंदे साहेबांनी काढले आहेत. ज्या ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृहमध्ये जागा मिळाली नाही. तर आम्ही स्वधारच्या माध्यमातून त्याची व्यवस्था करतो आहे. पुढच्या 3 वर्षात 10 लाख घर ओबीसी आणि VJNT साठी बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे,” असं देवेंद्र फडणवीस करतेय.
नागपूरात खाजगी, सहकारी दूध संघाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. दूध उत्पादकांना 34 रूपये लिटरचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आदित्य ठाकरे यांची आज दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते राजकीय विषयांवर भाष्य करणार आहेत.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 31 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने दाखल केलेल्या या याचिकेवर सुप्रिम कोर्टात ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
टोल वसुलीवर राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता डिजीटल बोर्डद्वारे आतापर्यंत किती टोल वसूली झाली याची माहिती सर्व सामान्यांना मिळणार आहे.
शिवसेना अपात्र आमदार प्रकरणात सोमवारपर्यंत वेळापत्रक सादर करावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणी पुढच्या निवडणूकापर्यंत तरी निर्णय घ्या. राष्ट्रवादी आमदार प्रकरणात मंगळवारपर्यंत वेळापत्रक द्यावे असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. विधानसभा अध्यक्ष पद घटनात्मक असले तरी आम्ही आदेश देऊ शकतो असेही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
राज्यात पाच महिन्यात 19,553 महिला बेपत्ता असल्याची आकडेवारी बाहेर आली असून ती धक्कादायक आहे. या प्रकरणी गृहमंत्रालयाने योग्य तपास करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
मला बारामती जिंकायची आहे, कामाला लागा असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती मतदार संघाच्या बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांना केले आहे.
राऊतांच्या मालकाच्या मुलाची ड्रग्ज मध्ये पीएचडी. राऊतांनी मातोश्रीवर मोर्चा काढावा – नितेश राणे
पुण्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सरकार विरोधात काढणार मोर्चा. सरकारच्या शिक्षण आणि शिक्षक धोरणांच्या विरोधात शिक्षक कृती समिती आक्रमक. पुण्यातील शनिवार वाडा येथून मोर्चाला होणार सुरुवात. सरकारच्या आदेशाची होळी करत पुण्यात शिक्षक काढणार मोर्चा.
छोटी भाभी कोण आहे? तिला कोण पोसतंय? आम्ही नाशिकचा नागपूर होऊ देणार नाही. 20 ऑक्टोबरला ठाकरे गटाचा नाशिकमध्ये विराट मोर्चा. नाशिकचा उडता नाशिक होतोय. फडणवीस गृहमंत्री झाल्यावर गुन्हेगारी वाढली. नाशिक शहराला आम्ही ड्रग्जची वाळवी लागू देणार नाही. नाशिकला वाचवण्यासाठी ठाकरे गटाचा लढा. ड्रग्ज हा विषय राजकारणाचा नाही – संजय राऊत
ड्रग्ज प्रकरणात नाशिकचं नाव खराब होतंय. गेल्या वर्षभरात नाशिक गुन्हेगार, ड्रग्ज माफियांचा अड्डा बनतोय. नाशिकमधील शाळा महाविद्यालयांना ड्रग्जचा विळखा. ड्रग्ज माफियांमुळे नाशिकचं नाव खराब होतंय. नाशिकचा उडता नाशिक होतोय. ड्रग्ज मुळे नाशिकमध्ये अनेक तरुणांनी आत्महत्या केलीये. गुजरातमधून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येतंय – संजय राऊत
कराड बाजार समिती परिसरात तणावपूर्ण वातावरण. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात. आदेश नसताना रस्ता करणे बाबत मुख्याधिकारी यांची भुमिका संशयास्पद. व्यापारी बाजार समितीचा आरोप. लेखी आदेशाची गरज नसल्याचे मुख्याधिकारी शंकर खौदारेंचे स्पष्टीकरण.
कराडमध्ये शेतकरी- नगरपालिका संघर्ष पेटला. शेती उत्पन्न बाजार समितीतून रस्ता देण्यास व्यापारी, शेतकऱ्यांचा विरोध. नगरपालिकेचे अधिकारी रस्ता करण्यासाठी आले असताना व्यापारी, शेतकऱ्यांनी लेखी आदेशाशिवाय कारवाई करू नये अशी केली मागणी. लेखी आदेशाशिवाय कारवाई करू देणार नसल्याची बाजार समिती प्रशासन, शेतकरी यांची मागणी.
आमदारांच्या अपात्रते संदर्भात थोड्याच वेळात सुनावणी. सुनावणीपूर्वी ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि अनिल परब सुप्रीम कोर्टात दाखल. सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड कोर्टात दाखल.
टोल माफी हा विषय नाही, मात्र टोलचे पैसे कुठे जातात ? हे कळायला हवं असं राज ठाकरे म्हणाले.
काही टोलनाक्यांवर मनसेतर्फे स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात येणार अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टोलनाक्यावरील बसलेल्यांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली.
या मागण्यांवर टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होताना दिसेल, असं मंत्री दादा भुसे म्हणाले.
टोलनाक्याजवळ राहणाऱ्या नागरिकांसाठी सवलतीत पास मिळणार.
चारचारी वाहनांवरील टोलदरवाढ रद्द करण्यासाठी सरकारला १ महिन्याचा अवधी दिला.
फास्टटॅग चालला नाही तर एकदाच पैसे घेतले जातील.
डिजीटल बोर्ड लावून किती टोलवसूली झाली याची माहिती दिली जाईल.
नागरिकांना तक्रारींसाठी टोलनाक्यावर नंबर पुरवला जाईल.
उड्डाणपूल , भुयारी मार्गांचे आयआयटीकडून ऑडिट केले जाणार.
PWD चे 29, तर MSRDC चे 15 जुने टोलनाके बंद करण्याची मागणी करण्यात येईल. आनंदनगर किंवा ऐरोली एकाच ठिकाणी टोल भरावा.
टोल नाक्यावर पोलीस तैनात केले जातील. 4 मिनिटांच्या पुढे एकही गाडी टोलनाक्यावर थांबणार नाही. मंत्रालयात टोलसंदर्भात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार.
पुढच्या पंधरा दिवसात सर्व एन्ट्री पॉईंटवर राज्य सरकार आणि मनसेकडून कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
९ वर्षांनंतर टोलच्या मुद्यासाठी काल सह्याद्रीवर गेलो. टोलच्या संदर्भात अनेक सुधारणा झाल्या नाहीत, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
परभणी शहरातील हनुमान मंदिरातील तीन दानपेट्या चोरट्यांनी फोडून मोठ्या प्रमाणावर रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
मुंबईतील रस्त्याचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेतर्फे नोटीस पाठवण्यात आली आहे. रस्त्याच्या कामांची रखडपट्टी होत असल्याची तक्रार दक्षिण मुंबईतील भाजप लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर ही नोटीस पाठवण्यात आली.
विधीमंडळ समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. अजित गटातील सदस्यांच्या नवांची प्रतीक्षा… भाजप, सेनेकडून नावांची यादी विधीमंडळाला सादर… एकूण समित्यांमधील ५० टक्के समित्यांवर भाजपचा दावा
स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्याच्या स्थापनेला भारताने पाठिंबा दर्शविला आहे. हमास हल्ल्याचं समर्थन नाही, पॅलेस्टाईन सार्वभौम.. परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताची भूमिका जाहीर…
कांदिवलीतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई ते बोरिवली या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. मालाड ते कांदिवलीपर्यंत सुमारे दोन किलोमीटर लांब वाहतूक कोंडी आहे. कांदिवलीतील समतानगर येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पुलाचे काम सुरू आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे
टोमॅटोला एक ते तीन रुपये इतका कवडीमोल बाजार भाव. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार हिवरगाव येथे संतप्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकले. काही टोमॅटो शेळ्या मेंढ्या पुढे फेकून देत केला टोमॅटो बाजारभावाचा निषेध. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार कधी ऐकणार ?. सरकारला आता तरी फुटणार का टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाझर ?
मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटी गावात साखळी उपोषण सुरू. 46 दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण आणि साखळी उपोषण आंदोलन सुरू. 17 दिवस आमरण उपोषण तर 29 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू. उद्या होणार मनोज जरांगे यांची जाहीर सभा, जाहीर सभेपूर्वी मनोज जरांगे साखळी उपोषण आंदोलनात सहभागी
महादेव कोळी समाजाला एसटीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी महादेव कोळी समाज उतरला रस्त्यावर. आठ दिवसात जर महादेव कोळी समाजाला एसटीचे प्रमाणपत्र मिळाले नाही, तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाची महापूजा करू देणार नसल्याचा दिला इशारा.
भाजपा हे परदेशातून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे आणणार असल्याचं वारंवार विधान करतायत. परंतु, ती वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत का? असा प्रश्न विचारत त्या ठिकाणी ती वाघ नखे ही छत्रपती शिवाजी महाराज यांची असण्याची शक्यता आहे असं लिहिल्याचं छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटल आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी त्या म्युझियममध्ये जाऊन ती वाघ नखे बघितली होती
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. अजितदादा आज पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तसेच आमदारांच्या गाठीभेटीही घेणार आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. राऊत यांचा दोन दिवसांचा नाशिक दौरा आहे. आज ते पत्रकार परिषदही घेणार आहेत.
शिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे, अशी माहिती युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय झाला. दसरा मेळावा मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आणि या मेळाव्याला बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं वाटा असा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिॅदे यांनी सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला असल्याचं म्हात्रे म्हणाले. यावेळी प्रत्येक कार्यकर्त्यावर ट्रॅफिक, मॅनेजनेंट अशी वेगवेगळी जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.
शिवसेना पक्ष आणि त्याच्या चिन्हाबाबत येत्या 31 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी ही सुनावणी होणार होती. ती टळली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचा ताबा शिंदे गटाला दिला आहे. त्याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
इस्रायल आणि हमास दरम्यान युद्ध सुरू आहे. त्यामुळे या युद्धात इस्रायलमध्ये 212 भारतीय अडकले होते. या सर्व भारतीयांना ऑपरेशन अजय अंतर्गत यशस्वी मायदेशी परत आणण्यात आले आहे. इस्रायलमध्ये अजूनही 18000 भारतीय अडकले असून सर्वांना टप्प्या टप्प्याने मायदेशी आणलं जाणार आहे.