Maratha Reservation Protest LIVE : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले….

| Updated on: Sep 02, 2023 | 6:51 AM

Maratha Reservation Protest LIVE turns Violent in Maharashtra : महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर. इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

Maratha Reservation Protest LIVE : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले....
Follow us on

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज इंडिया आघाडीकडून लोगोचं अनावरण केलं जाणार आहे. तसेच आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज वाहतुकीसाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 2 या मार्गावर विशेष ब्लॉक असल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद राहणार आहे. विदर्भात आजपासून मध्यम ते हलक्या सरी कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Sep 2023 10:38 PM (IST)

    R Madhavan FTII | अभिनेता आर माधवन एफटीआयआयच्या अध्यक्षपदी

    मुंबई | मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता आर माधवन याच्याकडे केंद्र सरकारने मोठी जबाहदारी सोपवली आहे. आर माधवन याची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

  • 01 Sep 2023 09:28 PM (IST)

    Ajit Pawar | जालना लाठीचार्ज प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

    जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या प्रकरणावरुन राजकारण पेटलंय. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “बळाचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्यात येईल”,असं अजित पवार यांनी म्हटलंय. अजित पवार यांनी याबाबत ट्विट केलंय.


  • 01 Sep 2023 07:55 PM (IST)

    Maratha Reservation Protest LIVE : जखमी आंदोलकांची भेट राजेश टोपे यांनी घेतली

    शरद पवारांच्या फोननंतर राजेश टोपे हॉस्पिटलला पोहोचले आहेत. जखमी आंदोलकांची भेट घेण्यासाठी राजेश टोपे पोहोचले आहेत. शरद पवारांनी फोनवरून घेतला होता आढावा.

     

     

  • 01 Sep 2023 07:42 PM (IST)

    Maratha Reservation Protest : विजय वडेट्टीवार यांनी केली सरकारवर टीका

    जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला देखील निषेध केला आहे. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढविल्याशिवाय आरक्षण मिळू शकणार नाही ही सत्यस्थिती असताना शिंदे -फडणवीस -अजित पवार सरकार मराठा समाजाची फसगत करत असल्याची दिली प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

     

  • 01 Sep 2023 07:29 PM (IST)

    Maratha Reservation Protest : फडणवीस तुम्ही अपयशी आहात- संजय राऊत

    अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलाय. या घटनेचा निषेध संजय राऊत यांनी नोंदवला आहे. संजय राऊत म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्थेवर हल्ला होतोय. शिवसेना या घटनेचा निषेध करते. लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. फडणवीस तुम्ही अपयशी आहात, तुमचे नैराश्य जनतेवर काढू नका, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

     

  • 01 Sep 2023 07:24 PM (IST)

    उद्या राज्यभरात ठिकठिकाणी करण्यात येणार आंदोलने

    अंतरवाली सराटी गावात उद्या मराठा समाज आंदोलन करणार आहे. मराठा समाजाने एकत्र येण्याचे आवाहन मराठा समन्वयकांनी केले आहे. उद्या राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने होणार आहेत. उद्या सराटी गावात मराठा समन्वयक मोठ्या संख्येने जमणार आहेत.

  • 01 Sep 2023 07:17 PM (IST)

    Maratha Reservation Protest : पोलीस अधिक्षकांना निलंबित करण्याची मागणी

    जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. आता याप्रकरणात जालन्याच्या पोलिस अधिक्षकांना निलंबित करण्याची मागणी NCP प्रवक्ता उमेश पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

     

  • 01 Sep 2023 07:13 PM (IST)

    Maratha Reservation Protest : किसान सभेकडून करण्यात आला तीव्र निषेध 

    जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अत्यंत निर्दयीपणे लाठीचार्ज करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने किसान सभेने याचा निषेध केला आहे.

  • 01 Sep 2023 07:05 PM (IST)

    छत्रपती संभाजी राजे यांनी दिला सरकारला मोठा इशारा

    अंतरवाली सराटी इथे लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने घडला याचा खुलासा करावा असे संभाजी राजे यांनी म्हटले आहे. अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारवर असेल असा, थेट इशारा छत्रपती संभाजी राजे यांनी दिला आहे.

  • 01 Sep 2023 06:55 PM (IST)

    पोलिसांना सूचना आल्या तसं केलं असावं- शरद पवार

    राठा आक्रोश मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निषेध केला आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पोलिसांनी सूचना आल्या तसं त्यांनी केलं असावं त्यांनी सांगितलं.

  • 01 Sep 2023 06:51 PM (IST)

    मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर नाना पटोलेंची सरकारवर टीका

    राज्यातलं आणि देशातलं मोदीशासित भाजपा सरकार जुलमी सरकारसारखं वागतं. मराठा आणि धनगरांना त्यांनी फसवलं. सत्तेत आल्यानंतर त्या लोकांना कुठले न कुठले वेगवेगळे मार्ग सांगणं. त्यामुळेच संतप्त मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं. त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचं महापाप राज्यातील सरकारनं केलं आहे. याचा आम्ही निषेध करतो, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.

  • 01 Sep 2023 06:38 PM (IST)

    जालन्यात मराठा आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आणि..

    जालन्याच्या अंतरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आक्रोश मोर्चाचं उपोषण सुरु आहे. उपोषणा दरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली. जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांकडून उपोषण थांबवण्याचं प्रयत्न सुरु होते. पोलिसांनी मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. यावेळी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये धुमश्चक्री झाली. गावकऱ्यांनी दगडफेक केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. दगडफेकीनंतर लाठीचार्ज करण्यात आला.

  • 01 Sep 2023 06:28 PM (IST)

    जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

    जालन्यात मराठा आक्रोश मोर्चाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. गावकऱ्यांकडून दगडफेक झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यात एक जण जखमी झाला आहे. अंतरवाली सराटी गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार यांना सरकारवर टीका केली आहे.

  • 01 Sep 2023 06:25 PM (IST)

    आरएसएस देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या बाजूने

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने आहे. यामुळे जनतेचा पैसा आणि देशाचा मौल्यवान वेळ वाचेल, असं सांगितलं आहे.

  • 01 Sep 2023 06:08 PM (IST)

    इंडिया आघाडीच्या समन्वय समितीत 14 नेत्यांचा समावेश

    इंडिया आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत समन्वय समितीचं गठन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून शरद पवार आणि संजय राऊत यांचा समावेश करण्यात आला आहे. शरद पवार, संजय राऊत, एम के स्टॅलिन, केसी वेणुगोपाल, तेजस्वी यादव, अभिषेक बॅनर्जी, राघव चढ्ढा, जावेद अली खान, लल्लन सिंह, हेमंत सोरेन, डी राजा, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांचा समावेश आहे.

  • 01 Sep 2023 06:03 PM (IST)

    विशेष सत्राच्या शेवटच्या दिवशी खासदारांचं पंतप्रधान मोदींसोबत फोटो सेशन

    केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष सत्र बोलवलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विशेष सत्राच्या शेवटच्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं फोटो सेशन होणार आहे. सामान्यत: फोटो सेशन पाच वर्षाच्या शेवटच्या सेशनमध्ये शेवटच्या दिवशी केलं जातं.

  • 01 Sep 2023 05:48 PM (IST)

    Rahul Gandhi Speech | मुंबई हे काँग्रेसचं महत्त्वाचं केंद्र – राहुल गांधी

    मुंबई | मुंबई आणि महाराष्ट्र माझ्या आवडीचं आहे. प्रत्येक संघटनेत काही उणेदुणे असतात. नाराजी असते. पण मुंबई हे काँग्रेसचं महत्त्वाचं केंद्र आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

  • 01 Sep 2023 05:43 PM (IST)

    Rahul Gandhi Speech | ‘काँग्रेसमध्ये दम नाही तर कर्नाटकात भाजपचा पराभव कसा झाला?’

    मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी टिळक भवन येथे गेले आहेत. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात राहुल गांधी यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाजपवर सडकून टीका केली. काँग्रेसमध्ये दम नाही असं बोलतात तर कर्नाटकात भाजपचा पराभव कसा झाला? काँग्रेसमुक्त भारत इंग्रज करु शकले नाहीत, मोदी काय करणार? असं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.

  • 01 Sep 2023 04:45 PM (IST)

    India Alliance News : प्रत्येक जण भाजप सरकारवर नाराज-शरद पवार

    भाजप सरकारवर प्रत्येक जण नाराज असल्याचा वक्तव्य शरद पवार यांनी केला. या बैठकीत 28 पक्ष सहभागी झाले. देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या समस्या आहेत. देशातील 28 पक्ष एकत्र आले आहे. इंडिया नावावर एक नवीन मिशन सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • 01 Sep 2023 04:35 PM (IST)

    India Alliance News : आम्ही सर्व एकत्र आल्याने भाजपाला निवडणूक जिंकणे अशक्य

    आम्ही सर्व एकत्र आहोत, भाजपला निवडणूक जिंकणे अशक्य असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. मोदी आणि भाजप भ्रष्टाचाराचं घर असल्याचा आणि भाजप सरकार गरिबांचा पैसा उद्योगपतींना देत असल्याचा आरोप त्यांनी केला. चीनने भारताच्या भूभागचा ताबा घेतल्याचा दावा त्यांनी केला.

  • 01 Sep 2023 04:13 PM (IST)

    India Alliance News : भाजपा हटावचा नारा-लालूप्रसाद यादव

    देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाही. देशात महागाई वाढली आहे. सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत, देशात बेरोजगारी वाढली आहे असा हल्लाबोल लालूप्रसाद यादव यांनी केला. मोदींच्या पक्षाचे सोडून सगळ्यांचं इथं स्वागत अशी कोपरखळी सुद्धा त्यांनी केली.

  • 01 Sep 2023 04:10 PM (IST)

    India Alliance News :  आतापर्यंत एवढं अहंकारी सरकार पाहिले नाही 

    आतापर्यंत एवढं अहंकारी सरकार पाहिले नाही, या सरकारचे लवकरच पतन होईल, अशी घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. आम्ही कोणत्याही पदासाठी आलो नाही तर देशाच्या विकासासाठी एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले.

  • 01 Sep 2023 04:01 PM (IST)

    India Alliance News : निवडणुका अगोदर पण होऊ शकतात- नितीश कुमार

    मोदी सरकारचा माध्यमांवर ताबा असल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला. आमच्याविषयी सुद्धा माध्यमांनी लिहावं, असे ते म्हणाले. देशात निवडणुका अगोदर पण होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला.

  • 01 Sep 2023 03:53 PM (IST)

    खर्गे यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका, दाळ महाग शिजवणार काय?

    इंडियाच्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे म्हणाले, आजची बैठक योग्य पद्धतीने झाली. सगळ्यांचा उद्देश एकच आहे. महागाई कशी कमी करता येईल. रोजगार निर्मिती कशी करता येईल. पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्या कमी झाल्या पाहिजे. मोदीची नेहमी १०० रुपये वाढवतात आणि दोन रुपये कमी करतात, असे त्यांचे धोरण आहे. गरिबांच्या विरोधात मोदी काम करतात. उद्योगपतींसाठी मोदी काम करतात, असा आरोपही खर्गे यांनी केला.

  • 01 Sep 2023 03:41 PM (IST)

    इंडियाच्या विरोधी पक्षात भीती – उद्धव ठाकरे

    इंडियाच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, देशभरातून आलेल्या नेत्यांचे स्वागत करतो. तिसरी बैठक पार पडली. इंडिया मजबूत होत आहे. इंडियाच्या विरोधी दलात भीती निर्माण झाली आहे. सभेत काही महत्त्वाचे निर्णय झाले. येणाऱ्या निवडणुकीत हुकुमशाहीच्या विरोधात लढणार. भ्रष्टाचाराविरोधात लढणार. मित्रपरिवारवादाच्या विरोधात लढणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 01 Sep 2023 03:32 PM (IST)

    इंडियाच्या पत्रकार परिषदेसाठी महत्त्वाचे नेते हजर

    इंडियाची पत्रकार परिषद सुरू होत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी तसेच २८ पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. या बैठकीत दोन ठराव पारीत करण्यात आले आहे. समन्यव समिती नेमण्यात आली आहे.

  • 01 Sep 2023 03:21 PM (IST)

    लोकसभेसाठी महायुतीचे मीशन ४८, आगामी निवडणुकीसंदर्भात बैठक

    लोकसभेसाठी महायुतीचं मिशन ४८ सुरू झालंय. महायुतीच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. आमदार, खासदार आणि पदाधिकारीही बैठकीला उपस्थित आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात ही बैठक होत आहे. यावेळी बोलताना सुनील तटकरी यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यास उशीर झाल्याचं म्हटलं.

  • 01 Sep 2023 02:47 PM (IST)

    तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीची चौथी बैठक

    इंडिया आघाडीची पुढची बैठक तामिळनाडूमध्ये होणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ही बैठक आमंत्रित केली असून इंडिया आघाडीची ही चौथी बैठक असणार आहे.

  • 01 Sep 2023 02:23 PM (IST)

    इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना, 13 जणांचा समावेश

    इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये 13 जणांचा समावेश असून महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे शरद पवार, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

  • 01 Sep 2023 02:18 PM (IST)

    इंडिया आघाडीचा महाराष्ट्राच्या निडवणुकीवर काही परिणाम होणार नाही- एकनाथ शिंदे

    पक्ष सांभाळू न शकणारा आघाडी काय सांभाळणार, इंडिया आघाडीचा महाराष्ट्राच्या निडवणुकीवर काही परिणाम होणार नाही. 2019 ला आघाडीला सुफडा शाफ केलाच, आता या स्वार्थी टोळीला जनता घरचा दाखवेल, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 01 Sep 2023 02:13 PM (IST)

    2024 ला या स्वार्थी इंडिया जनता घरचा रस्ता दाखवेल- मुख्यमंत्री

    इंडिया आघाडी मोदी द्वेषाने पछाडलेली असून स्वार्थाच्या पलीकडे विरोधकांना काही दिसत नाही. केजरावालांपासून ते लालू यादवपर्यंत सगळेच जे नेते आहेत त्यांच्यावर कोणते ना कोणते गुन्हे दाखल आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

  • 01 Sep 2023 02:04 PM (IST)

    Mallikarjun Kharge : खोटे आरोप करुन तुरुंगात टाकलं जाईल – खरगे

    सरकार यंत्रणेचा दुरुपयोग करेल. खोटे आरोप करुन तुरुंगात टाकलं जाईल, तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा असे मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीच्या बैठकीत म्हणाले.

  • 01 Sep 2023 02:00 PM (IST)

    Ajit Pawar : लोकसभेची निवडणूक हे आमचं पहिलं टार्गेट – अजित पवार

    मोदींच्या नेतृत्वात देशाचा मोठा विकास झालाय. मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही एकत्र. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यावर चर्चा.

  • 01 Sep 2023 01:54 PM (IST)

    Ajit Pawar : देशात एकच निवडणूक झाल्यास हिताचं – अजित पवार

    निवडणुका आल्यावर आचारसंहिता लागते. आचारसंहिता लागू झाल्यावर प्रशासकीय कामं थांबतात. यामुळे विकासकामांवर मोठा परिणाम होतो.

  • 01 Sep 2023 01:48 PM (IST)

    Ajit Pawar : एक देश एक निवडणूक महत्वाची – अजित पवार

    इंडिया आघाडीचं विरोध करणं हेच काम आहे. यापूर्वी जीएसटीला विरोध केला होता. केंद्राने स्थापन केलेली समिती त्यांचा अहवाल सादर करेल. आम्हाला महायुतीला अधिक मजबूत करायचं आहे. शिंदे, फडणवीस आणि मी चर्चा करणार आहोत. महायुती आणि एनडीला मजबूत करण्यासाठी बैठक.

  • 01 Sep 2023 01:46 PM (IST)

    Chandrashekhar Bavankule : चंद्रशेखर बावनकुळे यांची इंडिया आघाडीवर टीका

    घमेंडी लोक आहेत. दोनदा चपराक खाल्ली आहे. एकही निर्णय होणार नाही. विरोधी पक्ष नेताही काँग्रेस बनवू शकणार नाही. कुठल्याही पक्षाला राहुल गांधी नको आहेत. इंडी आघाडी आहे इंडिया नाही. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गरीब कल्याणाच्या गोष्टी करत आहे, हा दिखावा आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

  • 01 Sep 2023 01:45 PM (IST)

    प्रकाश आंबेडकर पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी पोहचले

    अहमदनगर : हरेगाव येथील तरुणांना झाडाला लटकवून मारहाण झाली होती. मारहाण झालेल्यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर आंबेडकर हे गावात पोहचले. श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये जखमींची विचारपूस केली. या भेटीनंतर आंबेडकर यांची राहुरी येथे सभा होणार आहेत. सभेत ते कोणावर निशाणा साधतात हे पाहावं लागेल. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील थोड्याच वेळात पीडितांची भेट घेण्यासाठी पोहचणार आहेत.

  • 01 Sep 2023 12:57 PM (IST)

    सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात

    सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलताना संयम बाळगला पाहिजे. रावणासंदर्भात बोलताना विचार करा. कारण रावणाकडे नितिमत्ता होती. देवेंद्र फडणवीसजी पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. पण आता तुमच्याकडे एकच चेहरा आहे. किती वर्षे झाले एकच चेहरा आहे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी शिवसेना-भाजपच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

  • 01 Sep 2023 12:46 PM (IST)

    18 सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन; पाहा महत्वाची अपडेट…

    18 सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनादरम्यान अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सचिव, कॅबिनेट सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय अधिकाऱ्यांना दिल्लीबाहेर जाता येणार नाही. केंद्र सरकारच्या आदेशाने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या अधिवेशन काळात केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

  • 01 Sep 2023 12:35 PM (IST)

    ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ला अजितदादांचा सपोर्ट

    केंद्र सरकार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक आणण्याची शक्यता आहे. याला  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठिंबा दिली आहे. केंद्र सरकारची ही भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आणि साह्यभूत आहे, अजित पवार म्हणालेत.

  • 01 Sep 2023 12:20 PM (IST)

    ‘एक देश एक निवडणूक’ला प्रियंका चतुर्वेदी यांचा विरोध

    एक देश एक निवडणूक हे विधेयक संसदेच्या अधिवेशानात मांडलं जाण्याची शक्यता आहे. त्याला ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी विरोध दर्शवला . आहे. आमचा विरोध वन नेशन वन इलेक्शनला आहे. लक्ष भरकटवण्याचं काम केलं जात आहे. रामनाथ कोविॅद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीये. याचा आम्ही निषेध करू , भविष्यातही विरोध कायम राहील, असं चतुर्वेदी म्हणाल्या.

     

  • 01 Sep 2023 11:32 AM (IST)

    इंडिया आघाडीच्या नेत्यांचं फोटोसेशन संपलं

    ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांचं फोटोसेशन संपलं. बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीला २८ पक्षाचे नेते उपस्थित आहेत. लोगोचं या दोन दिवसात अनावरण होण्याची शक्यता आहे. आज बैठकीचा दुसरा दिवस आहे.

     

  • 01 Sep 2023 11:26 AM (IST)

    ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्याचं फोटोसेशन

    ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांनी फोटोसेशनमधून शक्तीप्रदर्शन दाखवलं आहे. आजच्या आघाडीच्या बैठकीकडं सगळ्याचं लक्ष आहे.

  • 01 Sep 2023 11:15 AM (IST)

    कपिल सिब्बल अचानक आल्याने काही नेते अस्वस्त

    कपिल सिब्बल अचानक आल्याने काही नेते अस्वस्त झाले आहेत, देशातील २८ पक्षांचे मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आज बैठक घेणार आहेत फारुख अब्दुला यांनी कपिल सिब्बल यांना बोलावलं असल्याची माहिती मिळाली आहे.

  • 01 Sep 2023 11:10 AM (IST)

    जे. पी. नड्डा रामनाथ कोंविद यांच्या भेटीसाठी दाखल

    जे. पी. नड्डा रामनाथ कोंविद यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. समितीच्या स्थापनेनंतर नड्डा रामनाथ कोंविद यांच्या भेटीला गेले आहेत. एक देश एक निवडणूकीसाठी समिती स्थापन केली आहे.

  • 01 Sep 2023 11:10 AM (IST)

    थोड्याचं वेळात इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात होणार

    थोड्याचं वेळात इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. लालू प्रसाद यादव, ममत बॅनर्जी, अखिलेश यादव, शरद पवार, सुप्रिया सुळे ग्रँड हयात हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

  • 01 Sep 2023 10:56 AM (IST)

    इंडिया आघाडीच्या बैठकीला थोड्याच वेळात होणार सुरूवात

    इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा व शेवटचा दिवस असून थोड्याच वेळात बैठकीला सुरूवात होणार आहे. शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते ग्रँड हयात हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

     

  • 01 Sep 2023 10:32 AM (IST)

    येत्या 1 ते 2 दिवसांत इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होईल

    इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण येत्या 1 ते 2 दिवसांत होईल.  इंडिया आघाडीत प्रत्येकाला सामावून घेणार. या बैठकीत विविध निर्णयांबाबत चर्चा होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं.

  • 01 Sep 2023 10:29 AM (IST)

    एक देश, एक निवडणूकीआधी पारदर्शक निवडणूक घ्या – संजय राऊत

    देशात एक देश, एक निवडणूकीआधी पारदर्शक निवडणूक घ्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा नवा फुगा हवेत सोडला आहे, अशी टीका त्यांनी केली.

  • 01 Sep 2023 10:24 AM (IST)

    इंडिया आघाडीच्या बैठकांचा भाजपाने धसका घेतला आहे.

    इंडिया आघाडीच्या बैठकांचा भाजपाने धसका घेतला आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. अजून एक- दोन बैठकांनंतर गॅसचे दर ५०० रुपयांनी कमी होतील, असा टोलाही त्यांनी हाणला.

    ‘इंडिया’ची पुढील बैठक तामिळनाडूत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

  • 01 Sep 2023 10:19 AM (IST)

    केंद्र सरकार विचलित झालं आहे – विजय वडेट्टीवार यांची टीका

    केंद्रातील सरकार विचलित झालं आहे, त्यामुळेच एक देश, एक निवडणूकचे पाऊल त्यांनी टाकलं आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

    पराभव दिसत असल्याने भारतीय जनता पक्षाकडून पर्यायांचा वापर केला जात आहे असे ते म्हणाले.

  • 01 Sep 2023 10:16 AM (IST)

    इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकललं – विजय वडेट्टीवार

    इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आलं आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. आधी समिती आणि संयोजन नेमला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

     

     

  • 01 Sep 2023 10:11 AM (IST)

    इंडिया आघाडीच्या लोगोवरून नेत्यांचं एकमत नाही – सूत्रांची माहिती

    इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा आज दुसरा दिवस असून आज लोगोचं अनावरण केलं जाणार होतो. मात्र या लोगोवरून नेत्यांमध्ये एकमत नाही.

    लोगोमध्ये काही बदल करण्यात यावेत, अशी सूचना काही नेत्यांनी केली आहे. त्यामुळे आज लोगोचं अनावरण होण्याची शक्यता कमी आहे.

  • 01 Sep 2023 09:58 AM (IST)

    Maharashtra News : एनआयएकडून बोईसरमध्ये तिघांना अटक

    राष्ट्रीय तपास संस्थेने बोईसरमध्ये छापा टाकून तीन संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आयसिस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून हमराज शेख (२४) याला फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. त्याच्याशी या तीन व्यक्तींचा संपर्क असल्याच्या संशयावरून ही कारवाई झाली आहे.

  • 01 Sep 2023 09:50 AM (IST)

    Maharashtra News : हिंगोलीत शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

    हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. आता हळद पिकांवर तिडक्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हळदीचे पाने करपत आहेत. त्यामुळे बळीराजावर दुहेरी संकट आल्याने बळीराजा चिंतेत आहे.

  • 01 Sep 2023 09:33 AM (IST)

    Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा सत्कार होणार

    इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेल येथे पार पडत आहे. या बैठकीला देशभरातून राष्ट्रीय नेते दाखल झाले आहेत. ही बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी टिळक भवन येथे तयारी पूर्ण झाली आहे.

  • 01 Sep 2023 09:20 AM (IST)

    Nashik News : गणेशोत्सवात डिजे वाजविण्यास बंदी

    नाशिकमध्ये यंदा गणेशोत्सवात डिजे वाजवण्यास बंदी असणार आहे. तसेच गणेशोत्सवात नियम पाळणाऱ्या मंडळांना बक्षिसे मिळणार आहे. शासनाचे नियम पाळल्यास पाच लाख रुपये प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले जाणार आहे. मिरवणूक मार्गावर अतिक्रमण काढणे, रजिस्टर मंडळांना बंदोबस्त देणे, अडथळे दूर करणे, टवाळखोरांचा बंदोबस्त करणे, अशी कामे केली जाणार आहे.

  • 01 Sep 2023 09:09 AM (IST)

    Nashik News : भेसळयुक्त पनीर जप्त

    नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई केली. नाशिक शहरात भेसळयुक्त पनीर आणि मिठाईचा साठा जप्त केला. देवळाली कॅम्प येथील पेढीतून 171 किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त केला.

  • 01 Sep 2023 09:01 AM (IST)

    Ind vs Pak | उद्या रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

    श्रीलंकेच्या कॅन्डी मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना उद्या 2 स्पटेंबरला रंगणार आहे. सगळ्यांना या सामन्याची उत्सुक्ता आहे. पाकिस्तानविरूद्ध पहिली बॅटींग घ्यायची की बॉलिंग? वाचा सविस्तर….

  • 01 Sep 2023 08:50 AM (IST)

    Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे महामार्गावर मेगाब्लॉक

    मुंबई-पुणे महामार्गावर 2 तासाचा मेगब्लॉक असेल . मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद असेल. आज दुपारी 12 ते 2 दरम्यान हा मेगा ब्लॉक असेल.

  • 01 Sep 2023 08:33 AM (IST)

    Nashik News : नाशिकमध्ये गणेश मंडळांसाठी नियम पाळा, बक्षिस मिळवा

    नाशिकमध्ये यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावर बंदी कायम आहे. नियम पाळल्यास मंडळांना बक्षिस मिळणार आहे. शासनाचे नियम पाळल्यास पाच लाख रुपये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळेल. शांततेत गणेशोत्सव पार पाडण्याचे आयुक्तांनी आवाहन केलं आहे. मिरवणूक मार्गावर अतिक्रमण काढणं, रजिस्टर मंडळांना बंदोबस्त देणं, अडथळे दूर करणं, टवाळखोरांचा बंदोबस्त करणं, अशा गणेश मंडळाच्या मागण्या आहेत.

  • 01 Sep 2023 08:13 AM (IST)

    Aaditya Thackeray | इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

    मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. काल या बैठकीचा पहिला दिवस होता. त्या बद्दल उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं, त्यांनी बैठक खूप चांगली पार पडली, एवढच सांगितलं.

  • 01 Sep 2023 07:59 AM (IST)

    Pune : पदे 1 हजार, अर्ज 74 हजार 507; पुणे जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी इच्छुकांची झुंबड

    पुणे जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी 1 हजार पदांसाठी 74 हजार 507 उमेदवारांनी अर्ज आले आहेत. या ऑनलाइन अर्जातून जिल्हा परिषदेला यातून 6 कोटी 66 लाख 52 हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  • 01 Sep 2023 07:45 AM (IST)

    BJP : भाजपचं आज मुंबईत माझी माती – माझा देश अभियान, चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करणार

    भाजपने माझी माती – माझा देश हे अभियान हाती घेतलं आहे. या अबियानांतर्गत आज सकाळी 8 वाजता कुलाब्यातील सचिवालय जिमखान्या लगत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करणार आहेत.

  • 01 Sep 2023 07:34 AM (IST)

    pune mumbai expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज वाहतुकीसाठी दोन तास बंद, या मार्गावरून प्रवास करताना जपून

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज वाहतुकीसाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 2 या मार्गावर विशेष ब्लॉक असल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद राहणार आहे. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे हलकी वाहतूक वळवली जाणार आहे तर खालापूर टोल नाक्यावर अवजड वाहतूक थांबवली जाणार आहे.

  • 01 Sep 2023 07:28 AM (IST)

    india alliance : इंडिया आघाडीच्या बैठकीत संसदेच्या विशेष अधिवेशनासह वन नेशन वन इलेक्शनवर चर्चा

    इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये होणाऱ्या या बैठकीत संसदेच्या विशेष अधिवेशनासह वन नेशन वन इलेक्शन यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीककडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.