मुंबई | 2 डिसेंबर 2023 : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला. आता उद्या रविवारी मतमोजणी होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नागपूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आज 111 वा दीक्षांत समारंभस त्या उपस्थित राहणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण घेणारच असल्याचे म्हटले आहे. अजित पवार गटाच्या राज्यस्तरीय शिबिरानंतर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना सल्ला दिला आहे. एसी हॉलमध्ये बसण्यापेक्षा जनतेत जाऊन कामे करा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.भारताने ऑस्ट्रेलियाविरोधात टी 20 सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. राजकीय, प्रत्येक जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…
मुंबई : आज महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत. सरकारचं अपयश असल्याचे विधीमंडळात दाखवणार आहोत. शासन काहीही करण्यास तयार नाही. बेरोजगारी वाढलेलेली आहे. अमली पदार्थाच्या आहारी तरुण जाताना पाहायला मिळतोय. आम्ही कुठल्याही बाबतीत चर्चा केलेली नाही. या सगळ्या विषयावर सभागृहात चर्चा होणार असे कॉंग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
जालना : राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी लोणीकर गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दिलीप मोरे, सिद्धार्थ सोळंके आणि कैलास शेळके यांच्यासह 10 ते 15 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश टोपे यांचा वाहनचालक कृष्णा शिंदे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
गाझा : युद्धबंदीनंतर सुरू झालेल्या युद्धात इस्रायली लष्कर गाझामध्ये कहर करत आहे. आकाश आणि जमिनीवरून एकाच वेळी हल्ले केले जात आहेत. गेल्या 24 तासांत गाझामधील 400 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 178 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, हमासनेही इस्रायलवर पुन्हा रॉकेट डागण्यास सुरुवात केली आहे. मात्र, लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच इस्रायल रॉकेटविरोधी क्षेपणास्त्रांनी त्यांना नष्ट करत आहे.
जळगाव : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पहिल्यांदाच जळगावमध्ये येत आहेत. त्यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मराठा समजाच्या काही कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे राजा आहेत आणि आम्ही त्यांचे मावळे आहोत अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुंबई : आंबा, काजू, संत्रा ही फळपीके आणि रब्बी ज्वारीसाठी शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेत यावा यासाठी पिक विमा पोर्टल दिनांक चार आणि पाच डिसेंबर २०२३ रोजी सुरू राहणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. कोकणातील आंबा, काजू, संत्रा, रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असा होता. मात्र ही मुदत पाच डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.
सोलापूर : माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी येथील क्रीडा संकुलाला दुसऱ्या टप्यात ३ कोटीचा निधी मंजुर करुन आणला. परंतु, पहिल्या टप्यात १ कोटी आणलेल्या निधीतून झालेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. क्रिडा विभागाकडून रनिग ट्रॅक्र, मैदाने केल्याचे सांगण्यात आले. मात्र, केवळ संरक्षक भिंत, कार्यालय इमारत, प्रवेश द्वार उभारले आहे. संरक्षक भिंती ठिकठिकाणी पडलेल्या आहेत. एकुणच क्रिडा संकुलाची दयनीय अवस्था झाली आहे. काटेरी झुडपे, केरकचरा याने मैदान व्यापले गेले आहे.
पिंपरी चिंचवड : आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. शरद पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याच्या हातातून पक्ष काढून घेणं, हे देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने फार शहाणपणाचे ठरेल असे वाटत नाही. सध्या आमच्या वकिलांनी जे फॅक्टस मांडलेले आहेत, हे पाहता. शरद पवारांनी हा पक्ष स्थापित केला. हे पाहता त्यांच्या हयातीत तरी त्यांचा पक्ष निवडणूक आयोग काढून घेणार नाही.
मुंबई : वडापाव पाहिला की आताच्या सरकारची आठवण येते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील अजित पवार वडा आहेत असा टोला मनसे अध्यक्ष राज ठकारे यांनी लगावला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे मुंबईतील गोरेगाव येथे वडापाव महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, आम्ही सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहोत. लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन आहे. सरकारला एकूण 19 विधेयके आणायची आहेत.
दिल्ली महसूल घोटाळ्यात ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. संजय सिंह आणि इतर आरोपींविरुद्ध राऊस अॅव्हेन्यू कोर्टात 60 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे. मतांची टक्केवारी भाजपच्या बाजूने आहे. यावेळी भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली असून काँग्रेसची मतांची टक्केवारी कमी झाली आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बसपाने पुन्हा देशात जात जनगणना करण्याची मागणी सरकारकडे केली, असे ट्वीट बसपा प्रमुख मायावती यांनी केले आहे. केंद्र सरकारने याबाबत तातडीने सकारात्मक पावले उचलावीत.
मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी ट्विट केले की, ३ डिसेंबरला मध्य प्रदेशात नवी पहाट होणार आहे.
प्रिय साथियो,
यह उत्साह और आत्मविश्वास का समय है। मध्य प्रदेश विधानसभा चुनाव की प्रक्रिया करीब डेढ़ महीने पहले प्रारंभ हुई थी और कल 3 दिसंबर को मतगणना के साथ यह संपन्न हो जाएगी। आपने हर चरण पर मन, वचन और कर्म से पार्टी और लोकतंत्र की जो सेवा की है, वह अतुलनीय है।
कल इसी एकाग्रता…— Kamal Nath (@OfficeOfKNath) December 2, 2023
संजय राऊत यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांचे मानसिक संतुलन ठीक नाही. ते सकाळी उठल्यापासून सुपारी घेतल्यासारखे बोलतात अशी घणाघाती टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील काही भागात दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे. तर काही भागात अतिवृष्टी आहे. यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. हे प्रश्न विधानसभेत मांडले जातील पण महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी केली. त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार,खासदारांची बैठक बोलावली होती.
डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील कावेरी चौकातील शगून हॉलला आग लागली. आगेत संपूर्ण हॉल जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला सहकार्य करावे, अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती नोंदवली. आगामी अधिवेशनात होणाऱ्या कामकाजाचा प्राथमिक आढावा या बैठकीत घेतला गेला. यावेळी बोलताना खासदार शेवाळे यांनी मराठा आणि धनगर आरक्षण या दोन प्रलंबित मागण्यांमुळे राज्यातील सामाजिक वातावरण गढूळ झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना दिली. ओबीसी आराक्षणाला धक्का ना लावता मराठा समाजाला आणि एस टी प्रवर्गाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याची आग्रही मागणी केली.
साखर घोटाळा प्रकरणी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, पवनराजे निंबाळकर यांच्यासह अन्य जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील साखर घोटाळाप्रकरणी सर्वांवर आरोप होत. तत्कालीन चेअरमन पवनराजे निंबाळकर, माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची धाराशिव न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली. 2002 साली सीआयडीने तपास केला. या प्रकरणात तब्बल 21 वर्षानंतर निकाल लागला.
येत्या हिवाळी अधिवेशनात सरकार मराठा समाजासह धनगर आणि इतर आरक्षणावर सकारात्मक चर्चा करेल, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. कोणाचं तरी काढून कोणालातरी दिले जाईल असा एक गैरसमज सध्या जात आहे. कोणाचाही काढून न घेता आणि कायदेशीर दृष्ट्या टिकणारी आरक्षण हे सरकार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनात दगडफेक,जाळपोळ,पोलिसांवर हल्ले झाले तर वेगवेगळ्या नियमानुसार कारवाई होत असते. सरकार जाणीवपूर्वक कठोरपणे कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दावर मनोज जरांगे पाटील यांचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील भोकरदन तालुक्यातील कोलते पिंपळगाव मध्ये दाखल झाले आहेत. भाजपचा प्रभाव असलेले आणि रावसाहेब दानवे यांचे वर्चस्व असलेल्या परिसरात जरांगे यांची सभा होत आहे. नारायण कुचे यांच्या मतदार संघातील कोलते पिंपळगाव मध्ये जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे. जरांगे पाटील रावसाहेब दानवे आणि नारायण कुचे यांच्या वर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहाटेचा शपथविधी पक्षाचे धोरण नव्हते, असे थेट शरद पवार यांनी म्हटले आहे.
पक्ष कोणाचा हे सांगण्याची गरज नाही, असे विधान पत्रकार परिषदमध्ये शरद पवार यांनी केले आहे.
बारामतीमधील उमेदवार जयंत पाटील ठरवतील, असे शदर पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
बारामतीमध्ये त्यांनी निवडणूक लढवली तर तक्रारीचे काहीच कारण नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
त्यांनी राजकिय निर्णय घेतला हा त्यांचा निर्णय असल्याचे शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या बोलण्यामध्ये सत्यता नाहीये. शरद पवार यांनी मोठे खुलासे केले आहेत.
भाजपसोबत जायला नको ही आमची सामुहिक भूमिका होती, असे मोठे विधान शरद पवार यांनी केले आहे.
त्यांची भूमिका आमच्या विचारांशी सुसंगत नव्हती, माझ्याकडून त्यांना बोलवलं नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
अजित पवार यांनी बोललेल्या बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच कळाल्या, असे मोठे विधान शरद पवार यांनी केले आहे.
राज्याच्या अधिक भागामध्ये दुष्काळी स्थिती, अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
कराडमध्ये भरदिवसा युवकाचा खून करण्यात आल्याची घटना घडलीये. शुभम रवींद्र चव्हाण ( वय 22) असे मृत युवकाचे नाव आहे. युवक कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर येथील आहे. रस्त्यावर धारदार शस्त्रानी केले वार
विरोधक आता थेट पवार साहेबांवरच वैयक्तिक हल्ले करायला लागले आहेत. याचा अर्थ त्यांच्या पायाखालती वाळू सरकली आहे.राजकारणात यापूर्वी असे कधी होत नव्हते असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
जालना – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. हल्ला झाला त्यावेळी या गाडीत केवळ ड्रायव्हर होता. आमदार राजेश टोपे घटनास्थळी नव्हते. या हल्ल्यामागे मराठा आंदोलक नसल्याचे म्हटले जात आहे.
पुणे – वेगळं वातावरण तयार करण्याचं काम कुणी करत असेल तर मात्र महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचं काम तुम्ही करा- शरद पवार
जेव्हा लोकांमध्ये जाणार तेव्हा काही प्रश्न लोकं विचारणार म्हणून ते आज बोलत आहेत. सत्ता येते आणि जाते, सामान्य लोकांचा पाठींबा महत्वाचा आहे. तुमचा कार्यक्रम काय होता, तुम्ही कुणाचं नेतृत्व स्वीकारलं होतं आणि आता कुणासोबत गेला आहात, अशी प्रश्न लोक विचारणार. लोकसभेची निवडणूक ३ ते ४ महिन्यावर आली आहे. – शरद पवार
पुणे : तुम्हा सर्वांना नवीन संधी मिळाली आहे. जो काही विचार शेवटपर्यंत पोहचवण्याचे काम करूया. नेतृत्वाची नवी फळी तयार करण्याची तुमच्यात क्षमता आहे. काही लोकानी नवे प्रश्न तयार केलेत – शरद पवार
पुणे – सामान्य लोकांमध्ये भूमिका मांडण्याची गरज आहे. भीती बाळगण्याचे काही कारण नाही. जे काही घडलं त्याची चिंता करण्याची गरज नाही, उलट संघटना स्वच्छ झाली नवीन लोकांना संधी मिळाली आहे. विधानसभा जाहीर होतील तेव्हा राष्ट्रवादीची नवी फळी तयार होणार आहे. असं शरद पवार यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर – मनोज जरांगे पाटील यांची लाडसावंगी येथे जाहीर सभा होणार आहे. लाडसावंगी गावात जरांगे पाटील दाखल होताच मराठा समाजाकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. फटाके वाजवत आणि पुष्पवृष्टी करत जरांगे यांचे स्वागत करण्यात आले.
शरद पवार गट लोकसभेच्या १४ ते १५ जागा लढवणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे बारामतीतून अजित पवार गट सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध उमेदवार देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुणे : पुण्यात शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांची बैठक होत आहे. या बैठकीनंतर शरद पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी केलेले दावे शरद पवार खोडून काढणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मनोज जरंगे पाटील यांच्या स्वागताला तब्बल 35 जेसीबीमधून फुलांचा वर्षाव होणार आहे. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथे तब्बल 35 जेसीबी आणि शेकडो किलो फुलांचा हार टाकण्यासाठी एक क्रेन लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण जेसीबी एकाच लाईन मध्ये एकाच ठिकाणी लावण्यात आले आहेत. यातून जरांगे पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव केल्या जातआहे.
दादर : महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी व शिवाजी पार्क मैदान परिसरात पालिकेची तयारी सुरू आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायीना सोयी-सुविधा पुरवण्या साठी पालिकेसह इतर आस्थापनाची कामे जोमाने सुरू आहेत.
मालेगाव : संजय राऊत यांच्यात ताफ्यात पालकमंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांनी दुचाकीवर एन्ट्री केली. सोयगाव रोडवर आविष्कार भुसे दुचाकीवर येताच पाहून उपस्थित लोकं झाले अचंबित. प्रतिक्रिया देणार नाही, मात्र मालेगावमध्ये राऊत यांचे स्वागत आहे. असं त्यांनी म्हटलं.
भिमाशंकर साखर कारखाण्याची उसाची पहिली उचल 2950 प्रति टन करण्यात आली आहे. तर सह्यांद्री कारखाण्याकडून उसाचा पहिला हप्ता जाहिर करण्यात आला आहे. 3100 रूपयांचा पहिला हप्ता जाहिर करण्यात आला आहे.
यंदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता कमी असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यंदा डिसेंबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली होती. त्यांना आता जामिनावर सोडण्यात आले आहे. आज ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
मालेगावमध्ये भुसे बदनामी प्रकरणात संजय राऊत आज कोर्टात हजर झाले होते. त्यांना न्यायालयाकडून तुर्तास दिलासा देण्यात आलेला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही तीन जानेवारीला होणार आहे. सध्या मालेगावात संजय राऊत यांचे शक्तीप्रदर्शन सुरू आहे. या प्रकणात आपण माफी मागणार नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत.
मालेगावात संजय राऊतांचं शक्तीप्रदर्शन सुरू आहे. भुसे बदनामी प्रकरणात मालेगाव कोर्टाकडून राऊतांंना तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. मोठ्या संख्येने शिवसैनिक संजय राऊत यांच्या सोबत आहेत.
खारघरमध्ये टाकलेल्या छाप्यात 30 लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. ओम पॅलेस सोसायटीमध्ये मध्यरात्री गुन्हे शाखेनं छापा टाकला आहे. यामध्ये जुगारासाठी वापरण्यात येत असलेली 30 लाखांची रक्कम जप्त करण्यात आही आहे. या छाप्यात 45 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जालन्यातील कोलते पिंपळगावात मनोज जरांगे यांची 100 एकरावर सभा होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांची ही चौथ्या टप्प्यातील सभा आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येने लोकं येणार आहेत.
कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट आजपासून बंद करण्यात आले. सद्यस्थितीत कोयना नदीमध्ये दुसऱ्या विद्युत गृहातून 1050 क्युसेक्स विसर्ग सुरुच राहणार आहे. सांगली पाटबंधारे विभागाची सिंचनाच्या पाण्याची मागणी कमी झाल्यामुळे धरण व्यवस्थापनाचा निर्णय
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आले आहेत. राज्यातील टोल नाके आणि दुकानावरील मराठी पाट्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. याठिकाणी राजू पाटील देखील याठिकाणी आहेत.
कोल्हापुरातील संपकरी केएमटी कर्मचाऱ्यांनी घेतली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट… संध्याकाळपर्यंत प्रशासनाशी बोलून मागण्यांवर तोडगा काढू…मंत्री हसन मुश्रीफ यांचं संपकरी केएमटी कर्मचाऱ्यांना आश्वासन… केएमटीकर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘वर्षा’वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मनसे आमदार राजू पाटील हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत आहेत.
संजय राऊतांकडून फक्त काड्या घालण्याचं, भांडणं लावण्याचं काम सुरू आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
राऊतांनी भाजपावर स्क्रिप्टचा आरोप करू नये, असेही ते म्हणाले.
आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं, या मागणीचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला. निष्पाप मराठ्यांना अटक करणं थांबवा, असंही ते म्हणाले.
मराठा बांधवानी रॅली बंद करावी असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
अजित पवार यांचा संभाजीनगरमधील गंगापूरचा दौरा रद्द, हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
मराठा संघटनेनही अजित पावर यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला होता.
राऊतांच्या तोंडून पवार बोलत आहेत. त्यांची वक्तव्यं म्हणजे राजकीय चोमडेपणा आहे.
दोन्ही पक्षांची जी अवस्था झाली आहे, ती त्यांच्या कर्मामुळेच झाली आहे. खरी राष्ट्रवादी अजित पवारांसोबत आहे, असे आशिष शेलार म्हणाले.
ठाकरे गटाने राजकारणात गलिच्छपणा आणला. त्यांनी आम्हाला धोका दिला, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
करवीरच्या 5 गावांतील लघु पाटबंधारे तलालावर उपसा बंदी लागू केली जाणार आहे. उद्यापासून 18 डिसेंबरपर्यंत आणि त्यानंतर अनिश्चित काळासाठी उपसा बंदी राहणार आहे.
तलावाच्या पाण्यावर अवलंबून असणारं पीक त्यामुळे धोक्यात येईल.
मुंबई मेट्रो प्रकल्पाचं खोदकाम सुरू असताना अंधेरी पूर्व इथं सीप्झ गेट क्रमांक 3 आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मुख्य जलवाहिनी गुरुवारी फुटली. या जलवाहिनी दुरुस्तीचं काम आज सुरु करण्यात येणार असून सकाळी साडेआठ वाजल्यापासून 24 तासांसाठी अंधेरी, जोगेश्वरी पश्चिमेकडील पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे. तर वांद्रे ते गोरेगाव परिसरात अनेक ठिकाणी पाणी येणार नाही.
धुक्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल पहाटेपासूनच 30 ते 40 मिनिटं विलंबाने धावत आहेत. त्यामुळे याचा फटका नोकरदार, व्यावसायिकांना बसतोय. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ विभागात पहाटे दाट धुकं पडल्याने दृश्यमानता कमी झाली आहे. यामुळे मोटरमन आणि लोको पायलटला रेल्वेमार्ग दिसणं अवघड झालं आहे.
छत्रपती संभाजीनगर : सुकना नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या उद्योगांचे परवाने रद्द करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. चिकलठाणा आणि शेंद्रा एमआयडीसी इथले कारखाने आणि सुकना नदी काठावरील नागरिकांकडून थेट नदीपात्रात दूषित पाणी सोडण्यात येतं. यामुळे नदी दूषित होत आहे. यामुळे अशा उद्योगांचे परवाने रद्द करा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. तसेच प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या नागरिक आणि कारखाने यांच्यावर कठोर कारवाई करावी, नदीपात्र आणि काठावरील अतिक्रमणे तात्काळ काढावी असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
शिवसेना उपनेते दत्ता दळवी यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर विक्रोळीत शिवसैनिकांनी बॅनरबाजी केली. बॅनरवर ‘टायगर इज बॅक’ असा उल्लेख केला आहे. माजी महापौर आणि शिवसेना उपनेते दत्ता दळवी यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यासाठी त्यांना न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. कालच दळवी यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्या विक्रोळी विभागात शिवसैनिकांनी बॅनरबाजी केली.
अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. गंगापूर तालुक्यातील दोन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध करणाचं पत्र त्यांनी दिलं होतं. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत गंगापुरात न येण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी अजित पवार आज गंगापुरात आहेत.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शाळांमध्ये भोजन वाटप केलं जातं. मात्र शाळेमध्ये वारकरी आणि इतर वेगवेगळे संप्रदायाचे विद्यार्थी आहेत. तसेच काही विद्यार्थी हे शाकाहारी आहेत. यामुळे शाळेमध्ये अंडे वाटप केले तर शाकाहारी विद्यार्थ्यांची वेगळी रांग आणि अंडे खाणाऱ्यांची वेगळी राग अशी केल्यामुळे लहानपणापासूनच मुलांमध्ये वेगळेपणाची भावना निर्माण होईल. यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अंड्यांचं वाटप नको, अशी भूमिका उद्धव ठाकरे गट आणि काही जैन संघटनांनी केली आहे. याबाबत शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांची भेट घेऊन याबाबत मागणी केली आहे.
कोल्हापुरातील एमटी कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेली चर्चा रात्री उशिरा फिस्कटली. कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने कर्मचारी दुसऱ्या दिवशी ही संपावर आहेत. उपनगरातील केएमटी सेवा सलग दुसऱ्या दिवशी ही ठप्प आहे.
पुण्यातील मावळात दुसऱ्या दिवशीही धुक्याची चादर पाहायला मिळतेय. धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. तालुक्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही स्वायत्त महाविद्यालयांनी विद्यापीठाचे शुल्क थकवल्याची बाब समोर आली आहे. संबंधित स्वायत्त महाविद्यालयांनी शुल्क न भरल्यास आता त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. यावरुन विद्यापीठाचा कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न थकल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार स्वायत्त महाविद्यालयांनी विद्यापीठाला परीक्षा शुल्क, संलग्नता शुल्क आणि इतर शुल्क त्वरित देणे अनिवार्य आहे. मात्र या महाविद्यालयांनी विद्यापीठाचे शुल्क थकवल्याचे नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतून पुढे आली.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाचे आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांना पदवाटप समारंभ होणार आहे. अजित पवारांच्या बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात आज शरद पवार गट शक्ती प्रदर्शन करणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शनिवारी मालेगाव न्यायालयात हजर राहणार आहे. मंत्री दादा भुसे यांनी त्यांच्यावर बदनामी केल्याचा खटला दाखल केला आहे. त्यासाठी त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे.
अजित पवार गटाकडून शुक्रवारी राष्ट्रवादीतील संघर्षाबाबत अनेक गौप्यस्फोट करण्यात आला. त्यानंतर शनिवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद बोलवली आहे. शरद पवार यामध्ये काय खुलासा करणार? याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची आंतर जिल्हा बदलीसाठी आता राज्याच्या ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे शिक्षकांना गावा जवळ बदली घेता येणार आहे. ३० जून २०२३ला बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना ऑनलाइन संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.