मुंबई : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा रोमांच आता संपला आहे. भारत स्पर्धेत उपविजेता ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? यासंदर्भात दिल्लीत निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीस शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची सभा आता मुंबईत होत आहे. कल्याण पश्चिममधील पोटे मैदानात सायंकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही पहिली सभा असल्याने मराठा समाजाकडून बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३० नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या दीक्षांत संचलन समारंभाला राष्ट्रपती उपस्थित रहाणार आहेत. देश, राज्यातील आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर…
धाराशिव | पैलवान शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. महाराष्ट्र केसरी फायनल सामन्याचं आयोजन हे धाराशीवमधील गुरुवर्य के टी पाटील क्रीडा नगरीतील तुळजाभवानी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. महाराष्ट्र केसरी फायनलमध्ये गादी गटातील पैलवान शिवराज राक्षे याने माती गटातील हर्षवर्धन सदगीर याला मैदानात लोळवलं.
अकोला : अकोला शहरातील 13 वर्षीय मुलीच्या अत्याचाराचे प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. आम्ही सदैव तुमच्यासोबत असल्याचा धीर सुषमा अंधारे यांनी कुटुंबीयांना दिला. यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी सुषमा अंधारे यांच्यासमोर टाहो फोडला.
धाराशिव : धाराशिव येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना पार पडतोय. मागील वर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम स्पर्धा होत आहे. शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजनांना गती दिली आहे. याअंतर्गत सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करुन ते पाण्याने धुवून काढण्याची कामे वेगाने केली जात आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
धाराशिव : मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण सभा आयोजीत करणाऱ्या आयोजकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भुम तालुक्यातील ईट येथे जरांगे सभा झाली होती. या सभेचे आयोजन करणारे संदीपान कोकाटे आणि आप्पासाहेब देशमुख या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांचे जमाव बंदी आदेश लागु असताना सभा घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महारांजांच्या काळात मराठा शब्दच नव्हता. त्याचा १२ बलुतेदार आणि १८ पगड जाती होत्या नंतर शाहू महारांजांनी आरक्षण द्यायला सुरूवात केली. माझी जबाबदारी अजून वाढली आहे. मराठा समाजाबद्दल मी नेहमीच बोलतो. पण, बारा बलुतेदारांना न्याय मिळाला पाहिजे. ही आता माझी जबाबदारी आहे. आज महाराष्ट्रात सामाजिक समतोल ढासळला आहे. हे लोक खालच्या स्तराची भाषणे करतात, अशी टीका संभाजी राजे छत्रपती यांनी केली.
नवी दिल्ली : २६ ॲाक्टोबर रोजी अजित पवार गटानं एका पदाधिका-यांचे प्रतिज्ञापत्र दिले. पण ते बनावट असल्याचं आम्ही सांगितलं. बनावट कागदपत्रांची २४ वर्गवारी तयार केली आहे. काही शहरात राहत नाहीत. काही विमा एजंट आहेत. अजित पवार गटाने लाजिरवाणे काम केले आहे. त्यामुळे त्यांना कोणताही दिलासा देऊ नये. तसेच, मॅजिस्ट्रेट समोर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही केलीय अशी माहिती वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.
नवी दिल्ली | राजकीय विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी कुणाची? याबाबतची आजची सुनावणी संपली आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी ही 24 तारखेला होणार आहे.
मुंबई | एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास थेट कारवाई होणार आहे. इतकंच नाही, तर हेडफोन घालुन ही गाणी ऐकता येणार नाही, तसेच चालकांना व्हीडिओही पाहता येणार नाही. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई होणार आहे. एसटी महामंडळाकडे चालकांबाबत विविध तक्रारी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
धाराशिव | मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण सभा आयोजीत करणाऱ्या आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीपान कोकाटे आणि आप्पासाहेब देशमुख यां दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुम तालुक्यातील ईट येथे ही सभा पार पडली होती. जिल्हाधिकारी यांचे जमाव बंदी आदेश लागु असताना सभा घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे कलम 188 सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणातील जगतियाल येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना सांगितले की, आम्ही ठरवले आहे की आमचे सरकार स्थापन होताच आम्ही 4 टक्के मुस्लिम आरक्षण काढून टाकू आणि ते एससी, एसटी आणि ओबीसींमध्ये वितरित करू. त्याचवेळी ओवेसी तुष्टीकरणाचे राजकारण करतात, असा आरोपही त्यांनी केला.
अरुणाचल प्रदेशातील चांगलांगमध्ये भूकंप झाला आहे. दुपारी 1:48 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.6 इतकी होती.
ज्ञानवापी प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षकारांना त्यांच्या युक्तिवादाची संक्षिप्त नोंद सादर करण्यास सांगितले आहे. 1 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. शृंगार गौरीची नियमित पूजा करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने शृंगार गौरी प्रकरण सुनावणीस योग्य मानले होते.
उत्तरकाशीतील निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यात येत आहे. दरम्यान, 9 दिवसांनंतर संघाला मोठे यश मिळाले आहे. 6 इंची पाइप कामगारांपर्यंत पोहोचला आहे. 52 ते 53 मीटर अंतरावर 6 इंची पाईप टाकण्यात आला आहे. 41 लोकांपर्यंत अन्न आणि इतर गोष्टी पोहोचवण्यासाठी त्याची मोठी मदत होणार आहे.
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा ३ दिवसांची दिली वाढ केली आहे. त्यांना 22 तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी मकाऊ येथे कसिनोत एका रात्रीत तीन तासांत साडे तीन कोटी रुपये उडविले आहेत. सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करु, आमच्याकडे 27 फोटो आणि काही व्हिडीओ आहेत ते बाहेर काढले तर तुम्हाला दुकान बंद करावे लागेल असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली मावळ येथील जनरल मोटर्स कामगारांच्या उपोषणाला भेट दिली आहे. पन्नास दिवसांपासून परिवार सोबत बसलेल्या कामगारांच्या आंदोलनाला जरांगे पाटील यांनी दिला पाठिंबा दर्शविला आहे.
शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले आहे. थोड्याच वेळात त्यांच्या जामिनावर सुनावणीला सुरुवात होणार आहे.
बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रमाला भीम आर्मीने विरोध केला आहे. पुण्यातील संचेती चौकात भीमआर्मी काळे झेंडे दाखविणार असल्याने पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता सध्याच्या सरकारवर प्रचंड नाराज आहे. शेतकरी चिंताग्रस्त आहे. तरुण वर्ग हतबल झाला आहे. वंचित घटकातील प्रश्न सोडविण्यासाठीच युवा संघर्ष यात्रेच आयोजन करण्यात आला आहे. राज्यात सध्या पाणी प्रश्न ऐरणीवर आहे. लाखो कोटी रुपये बुलेट ट्रेन वर खर्च करण्यापेक्षा तो पैसा पाणी प्रकल्पासाठी वापरण्यात यावा. राज्याला बुलेट ट्रेनची सध्या गरज नाही.
नाशिकमधील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा वाद सुरु आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. परभणी येथील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट गंगापूर धरणावर पोहचले.
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको आंदोलन. सर्वपक्षीय नेत्यांनी जालना रोड रोखला. रास्तारोको करणारे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून रास्ता रोको. रास्तारोकोमुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा.
धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात मोठी बातमी. आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी सरकारने अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केली नऊ सदस्यांची समिती स्थापन. मध्य प्रदेश, बिहार आणि तेलंगणा राज्यात नेमकं आरक्षणाची अंमलबजावणी कशी केली याचा समिती करणारा अभ्यास. चौंडी येथील उपोषण स्थळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार राम शिंदे यांनी दिली भेट. आंदोलनकर्त्यांना शासन निर्णय देऊन उपोषण सोडण्याची केली विनंती. या संदर्भात योग्य तो विचार करून निर्णय घेणार असल्याची बाळासाहेब डोलतडे यांची माहिती.
आजच्या सुनावणीला शरद पवार उपस्थित राहणार. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार उपस्थित राहणार. शरद पवार दिल्लीत दाखल, निवडणूक आयोगात आज संध्याकाळी चार वाजता होणाऱ्या सुनावणीवेळी पवार उपस्थित राहणार.
पुण्यात बागेश्वर धाम सरकार यांच्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलनासाठी पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी आहे. युवक काँग्रेस विरोध करणार होती. आजपासून बागेश्वर धाम यांचा कार्यक्रम होणार आहे.
“मी विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क केला. पण माझा संपर्क झाला नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी आमची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील हे माझ्या विषयात कुठे तरी गरळ ओकत होते, घाणेरडं बोलत होतं. त्याविरोधात बोलणं आवश्यक होतं म्हणून मी बोललो. त्यांनी 14 सभा घेतल्यानंतर मी एक सभा घेतली. त्याअगोदर मी बोललो नाही. जरांगे यांनी मलाच का टारगेट केलं हे समजलं नाही,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
राजस्थानच्या निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एण्ट्री झाली आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्टार प्रचारक म्हणून जाणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेकडून राजस्थानमध्ये माजी मंत्री राजेंद्र गुढा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुढा यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे हे राजस्थानला जाणार आहेत. राजस्थानमध्ये बहुतांश मराठी बांधव हे व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. तर मुंबईत व्यवसायासाठी स्थायिक झालेले व्यापारी हे मतदानाकरता राजस्थानला जातात. या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री राजस्थानमध्ये प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती आहे.
जायकवाडी धरणात नगर-नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको करण्यात येत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी जालना रोड रोखला असून सर्व बाजूने ट्रॅफिक जॅम करण्यात आला आहे. सर्वपक्षीय नेते या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले आहेत.
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. म्हणून पोलिसांनी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं. राड्याप्रकरणी आतापर्यंत 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला झाला होता राडा…
मराठा समाजाने स्वतःचं आरक्षण दुसऱ्याला दिलं… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे. ‘मराठा समाजाने कधीही जात पाहिली नाही… मराठा समाजाने नेत्यांना मोठं केलं. आज तेच नेते मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं. कोणी मराठ्यांच्या लेकरांच्या मदतीला येत नाहीत..’ असं देखील जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजानं कधी जातीवाद केला नाही. प्रत्येकाचा सुख, दुःखात माझा मराठा धावून गेला. मराठ्यांनी कधीच कोणाची जात शोधली नाही. मराठा समाजानं प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं.. असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा दौऱ्यासाठी मुबाईतून रवाना झाला आहेत. दुपारी एक वाजता मुख्यमंत्री शासन आपल्या दारी कार्यक्रम राहणार उपस्थित राहणार आहेत.
आमदार रविंद्र धंगेकर पुणे पोलीस आयुक्तकांच्या भेटीला… ललित पाटील प्रकरणात पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली त्याबाबत घेणार आढावा… यासंदर्भात धंगेकर पोलीस आयुक्तांना निवेदन देणार
भोगावती सहकारी साखर कारखाना मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे. विरोधी गटाच्या शिव शाहू परिवर्तन आघाडीने मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने दोन्ही गटाचे समर्थक आमने सामने आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मतमोजणी पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे.
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी भाजपातर्फे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. निवडणूक प्रमुखांना दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी हे प्रशिक्षण शिबीर पार पडेल.
पुण्यातील खराडी येथे मनोज जरांगे पाटील यांची आज जाहीर सभा होणार आहे. खराडी येथील महालक्ष्मी लॉन्सवर सभा पार पडणार असून सभेच्या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून मोठी तयारी करण्यात येत आहे. जरांगे पाटील यांच्या सभेसाठी गर्दी जमायला सुरुवात झाली असून, सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
जालन्यातील ओबीसी मेळाव्यातील मंत्री छगन भुजबळांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. नाशिकमध्ये बॅनरवरील छगन भुजबळांच्या फोटोला फासला पांढरा रंग.
स्वागतासाठी नाशिक येथीक पाथर्डी फाटावर लावलेल्या बॅनर वरील भुजबळांच्या फोटोला अज्ञात व्यक्तीने हा रंग ऱासला आहे. यामुळे आता पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी वाद नाशिक मध्ये चिघळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. 50 ते 60 जणांविरोधात पोलिसांनी दाखल केले गुन्हे.
कपिलदेव यांनी भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून दिला. त्यांना आणि त्यांच्या टीमला बोलावलं नाही, पण बाकी सगळ्यांना बोलावलं. हा कुठला न्याय ? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.
भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये उत्तम खेळला, पण आपण हरलो. विश्वचषक आपणच जिंकणार अशा थाटात, भाजप होतं, पण पराभवाने सर्व तयारीवर पाणी फेरलं गेलं. आम्ही भाजपच्या दु:खात सहभागी आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
अजित पवार आज दिल्लीला येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. निवडणुक आयोगात राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबत आज सुनावणी आहे. आजच्या सुनावणीला अजित पवार राहणार का, याकडे राजकिय वर्तुळाचं लक्ष आहे. दुसरीकडे शरद पवार देखील दिल्लीत थोडयाच वेळात दाखल होणार आहेत. आजचा सुनावणीला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
मनोज जरांगे पाटील आज छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी अभिवादन करणार आहेत. स्वागतासाठी तुळापूर सकल मराठा समाजाकडून स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रस्त्यावर फुलांचा सडा टाकून जरांगे पाटलांचं स्वागत होणार आहे. काही वेळात जरांगे पाटील समाधीस्थळी येतील.
जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आज रास्ता रोको करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते या रास्ता रोकोत सहभागी होतील. गोदावरी पाटबंधारे महामंडळासमोर हा रास्ता रोको केला जाणार आहे. मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढारी उपस्थित राहणार आहेत. 11 वाजता जालना रोडवर रास्ता रोको केला जाणार आहे.
छठपूजा संपल्यानंतर जुहू परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छठपूजेसाठी जुहू बीचवर मोठ्या संख्येने लोक आले होते. छठपूजा संपल्यानंतर आता सर्वजण आपापल्या घराकडे निघाले आहेत. तर दुसरीकडे रस्त्यावर पूर्ण वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. जुहूच्या या संपूर्ण रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. दुसरीकडे वाहतूक क्लियर करण्यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस ठिकठिकाणी तैनात आहेत.
सभेसाठी पुण्यातून थोड्याच वेळात निघणार बाईक रॅली. पुण्यातून सकल मराठा समाजाची बाईक रॅली. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी पुण्यातून थोड्याच वेळात बाईक रॅलीला होणार सुरुवात. लाल महाल येथून निघणार मराठा समाजाची बाईक रॅली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार याची नियमीत सुनावणी आज सोमवार 20 नोव्हेंबरपासून केंद्रीय निवडणूक आयोगात होणार आहे. शेवटची सुनावणी 9 नोव्हेंबरला झाली होती, या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाने बोगस कागदपत्र दिल्याचा आरोप केला.
पुण्यात किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार. बाणेरच्या महाबळेश्वर हॉटेलजवळ थरार. घटना मध्यरात्री घडली असून याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल. जखमी झालेला तरुण स्वतःहून कासारसाई येथील एका रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल. आकाश पोपट बाणेकर असे जखमीचे नाव आहे. रोहित ननावरे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला
आज शेतकरी नेते रविकांत तूपकरांचा एल्गार महामोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार हजारो शेतकरी, शेतमजूर. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोर्चा. मागील 15 दिवसांपासून सुरू आहे एल्गार रथयात्रा. 5 नोव्हेंबरला संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन रथयात्रा केली होती सुरू.
कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे व समिती सदस्य विदर्भ दौऱ्यावर जाणार आहे. ही समिती अमरावती आणि नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान शिंदे समितीचे अध्यक्ष अमरावती नागपूर दौऱ्यावर जात आहे.
पुणे शहरात आज मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडणार आहे. पुण्यातील खराडी भागात त्यांची सभा पार पडणार आहे. सभेच्या निमित्ताने पुणे नगर रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. आज दिवसभर नगर रोड जड वाहतुकीस पूर्णपणे बंदी राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची की अजित पवार यासंदर्भात निवडणूक आयोगात दाखल असलेल्या याचिकेवर आजपासून नवी दिल्लीत सुनावणी होणार आहे. यासाठी शरद पवार दिल्लीत जाणार आहे. यावेळी शरद पवार गटाची बैठक होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या ३० नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या दीक्षांत संचलन समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात द्रौपदी मुर्मू लष्करी वैद्यकीय महाविद्यालयास भेट देणार आहेत.