मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : करवीर नगरी देशाला दिशा दाखवणारी नगरी. शाहू महाराज यांनी चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला नाही. शाहू महाराजांनी सत्ता सर्वसामान्यांसाठी वापरण्याचा आदर्श दिला. मला जन्म देणारी माता कोल्हापूरची. ढोंगी विचारांना शाहू महाराजांनी जागा दाखवली. इस्त्रोचं चांद्रयान ३ चंद्रावर उतरलं, या त्यांच्या यशाचं अभिनंदन. लोक महागाई, बेरोजगाराने ग्रासलेले आहेत. केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के कर लावला, या विरोधात शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला. मी कृषी मंत्री असताना, मी कधी कांद्यावर कर लावला नाही, असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले.
इंडिया टुडे सी व्होटरचा लोकसभा निवडणुकीचा सर्व्हे आला आहे. या सर्व्हेनुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार आहे. आता जर निवडणुका झाल्यातर सर्व्हेनुसार एनडीएला 306 तर इंडिया आघाडीला 193 जागा मिळण्याची शक्यता आहे. कांदा प्रश्न आजही पेटण्याची शक्यता आहे. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसहीत अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकरी कांदा लिलाव बंद पाडण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची औपचारिक अटक करून सुटका करण्यात आली आहे. यासह राज्य आणि देशविदेशातील घडामोडी जाणून घ्या.
मुंबई : सिंग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झालीय. रात्री 9 वाजून 21 मिनिटांपासून जुईनगर रेल्वे स्टेशनवर अनेक गाड्या उभ्या आहेत. सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय.
नुकताच नवाब मलिक यांच्या मुलीने ट्विटरवर पोस्ट शेअर करत मोठे स्पष्टीकरण हे दिले आहे. शरद पवारांना नवाब मलिकांनी पाठिंबा दिल्याच्या बातमीनंतर हे स्पष्टीकरण देण्यात आलंय. नवाब मलिक यांच्या मुलीने म्हटले की, माझ्या वडिलांनी विशिष्ट गटाला पाठिंबा दिल्याबद्दल काही बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. या सर्व खोट्या अफवा आहेत.आम्ही आता सध्या फक्त वडिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत.
कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या मंगळवारी किंवा बुधवारी मुंबईत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बैठकीला उपस्थित असणार आहेत. बैठकीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, कांदा व्यापारी, बाजार समित्यांच्या सभापतींना देखील बोलवले जाणार.
नुकताच गिरीश महाजन यांनी शरद पवार यांच्याबद्दल भाष्य केले आहे. गिरीश महाजन म्हणाले की, पवार साहेब कृषी मंत्री राहिले आहेत. आपण सरकारमध्ये असताना तुम्ही किती मदत केली, हे सांगा असे थेट गिरीश महाजन म्हणाले. आपण सत्तेत असताना काय केलं ? असाही प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
पाणी जपून वापरा आणि पाण्याचे नियोजन करा अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्यात होते. अजित पवार यांनी आज बोलावली होती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आयुक्त यांची बैठक.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य भोसल्यांचं नव्हतं, ते रयतेचं राज्य होतं – शरद पवार
शरद पवार यांची कोल्हापुरात निर्धार सभा – – शरद पवार
करवीर नगरी देशाला दिशा दाखवणारी नगरी – शरद पवार
शाहू महाराज यांनी चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला नाही – शरद पवार
शाहू महाराजांनी सत्ता सर्वसामान्यांसाठी वापरण्याचा आदर्श दिला – शरद पवार
मला जन्म देणारी माता कोल्हापूरची – शरद पवार
ढोंगी विचारांना शाहू महाराजांनी जागा दाखवली – शरद पवार
इस्त्रोचं चांद्रयान ३ चंद्रावर उतरलं, या त्यांच्या यशाचं अभिनंदन – शरद पवार
लोक महागाई, बेरोजगाराने ग्रासलेले आहेत – शरद पवार
केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के कर लावला, या विरोधात शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला – शरद पवार
मी कृषी मंत्री असताना, मी कधी कांद्यावर कर लावला नाही – शरद पवार
कोल्हापूर | शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे
एका बाजूने ही स्थिती आहे तर दुसऱ्या बाजूने वेगळी स्थिती आहे. लोक महागाईने त्रस्त आहेत, लोक बेरोजगारीने त्रस्त आहेत.
आम्ही कष्ट करायला तयार आहोत. आम्ही घाम गाळायला तयार आहोत. आमच्या घामाला किंमत द्या. घाम गाळायची संधी द्या. बेकारीतून आमची सुटका करा, एवढी एकच मागणी या देशाचे तरुण आणि शेतकरी करत आहेत
दोन दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात 18 दिवसांमध्ये 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं. जीव देणं ही साधी गोष्ट नाही. कुटुंबाची जबाबदारी सोडून प्राण सोडायला ज्यावेळी शेतकरी तयार होतो याचा अर्थ या राज्याचा शेतकरी संकटात आहे.
शेतमालाला किंमत देत नाही. शेतमालाला किंमत देतादेता त्याच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं. ते कर्ज फेडण्याची त्याची इच्छा आहे. कर्ज फेडलं नाही तर त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढले जातात. त्यामुळे शेतकरी टोकाचा निर्णय घेतो.
कोल्हापूर :
शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे :
ज्या राजाने दिलेली सत्ता ही सामान्यांसाठी वापरायची असते याचा आदर्श आपल्यासमोर घालून दिला. दोन राजे आपल्या अंतकरणात अखंड आहे. एका राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज असे राजे होऊन गेले त्यांनी राज्य उभे केलं. पण ते राज्य कुटुंबाचं नव्हतं. देशात अनेक राजे झाले. पण छत्रपतींचं राज्य भोसल्यांचं राज्य नव्हतं. तर रयतेचं राज्य होतं. शिवाजी महाराजांनंतंर शाहू राजे या देशात होऊन गेले ज्यांनी आपली सत्ता सामान्य माणसांसाठी वापरली. एकदा शाहू महाराज कोल्हापुरात असताना, कोल्हापुरातील काही सरदार लोकांनी त्यांना सांगितलं की, कर्नाटकातील एक विद्वान माणूस येतोय त्यांना तुम्ही भेटा. तो जाणकार आहे त्याला भविष्य कळतं. शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं की, मला तशा गोष्टींवर विश्वास नाही. मी त्या व्यक्तीला भेटत नाही. पण त्यांनी खूप आग्रह केला. अखेर तो विद्वान माणूस ज्याला भविष्य कळतो तो आला, महाराजांना भेटायचा दिवस आला, महाराजांची भेट झाली, शाहू महाराजांकडे या व्यक्तीने आपल्यासोबत वाईट वागणूक दिली गेली, असं सांगितलं. शाहू महाराजांनी या माणसाला सांगितलं की, तू माझं भविष्य सांगायला आला आणि तुला तुझं भविष्य कळलं नाही.
एक व्यक्तीगत गोष्ट सांगतो, माझी आई कोल्हापूरची होती. मला जन्म दिलेली माता कोल्हापुरची होती. कोल्हापुरच्या आईच्या पोटी जन्म घ्यायचं भाग्य मला मिळालं. आजची बैठक, सभेत एका गोष्टीचा आनंद आहे. काल एक अतिशय मोठी गोष्ट केलं. सगळं जग बघत होतं. चंद्रयान ३ हे चंद्रावर उतरलं. एक ऐतिहासिक काम या देशाच्या तज्ज्ञांनी केलं. इस्त्रोच्या संघटनेने हे काम केलं. या इस्त्रोच्या संघटनेला स्थापन करण्याची भूमिका जवाहरलाल नेहरु यांनी घेतली होती. सर्वपक्षीय पंतप्रधनांच्या प्रयत्नांनी इस्त्रोला यश मिळालं आहे. डॉ. विक्रम साराभाई, सतीश धवन या सगळ्या जाणकारांनी योगदान दिलं. काही दिवसांनी आपल्याला कळेल की, चंद्रात पाणी किती आहे, सोनं-चांदी आहे का, या सगळ्या गोष्टींची माहिती चंद्रयानातून माहिती मिळेल.
कोल्हापूर :
राष्ट्रवादी काँग्रेस फुटला म्हणता, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही विचार आहे. तुम्ही पक्ष फोडाल, कुटुंब फोडाल, पण विचार कसे फोडणार?, असा सवाल रोहित पवारांनी आपल्या भाषणात केला.
पिंपरी चिंचवड | “जे काही केंद्राचा राज्याचा निधी आणता येईल, जिल्ह्यातील निर्णय पटापट घेता येतील. चांगले अधिकारी आयुक्त म्हणून आणता येतील. उद्याची 50 वर्ष डोळ्यांसमोर ठेवून कामं करता येतील. आता आंध्र प्रकल्पाचं आणि इतर प्रकल्पातील पाणी आपल्याला पुरणार नाही. ज्या पद्धतीने शहराची वाढ होतेय, त्यानुसार पाणी कमी पडेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या रिंगरोडला सुरुवात करतोय. त्यासाठी अधिग्रहणाचं काम सुरु केलंय”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार पिंपरी चिंचवडमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
आम्ही आमची विचारधारा सोडली नसल्याचा दावा अजित पवार यांनी केला. ते पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रमात बोलत होते. कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. पुण्यात काही जागतिक प्रकल्प गेले असले तरी नवीन प्रकल्प लवकरच येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नसल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. शरद पवार हेच अध्यक्ष आहेत. तर अजित पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते असल्याचे त्यांन सांगितले. पक्षातील काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांनी काय आरोप करावेत हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही सकारात्मक भूमिका घेऊन सरकारमध्ये करत आहोत , असे अजित पवार म्हणाले.
सर्वसामान्य लोकांचे, जनतेचे प्रश्न सोडवण्यावर आमचा भर आहे.
मला आज त्या विषयावर काहीच बोलायचं नाही. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास दिला नकार.
अजित पवार यांना एकदा संधी दिली होती, मात्र आता त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
पहाटेच्या शपथविधीनंतर ठरलं होतं असं पुन्हा करणार नाही. आता पुन्हा संधी मागू नये, असं शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादीत फूट नाही, तर त्यांची भूमिका पक्षविरोधी, अजित पवार गटाबाबत शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
अजितदादा गटाची भूमिका पक्षविरोधी आहे. वेगळ्या भूमिकेचा अर्थ फूट पडली असा होत नाही. पक्ष सोडायचा निर्णय घेतला तर त्याचा अर्थ फूट पडली असा नव्हे, असे शरद पवार म्हणाले.
अजित पवार आमचे नेते, मी असं म्हटलं नव्हतं. सुप्रिया असं म्हणू शकते, मी असं म्हटलेलं नाही . अजित पवारांच्या वक्तव्यावरून शरद पवार यांचं घूमजाव
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास सुरू आहे. राज्याची अर्थव्यवस्था वाढाली यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पिंपरी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कांदाप्रश्नी मी सरकारशी बोलण्याचा प्रयत्न केला. कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज झाले, निर्यात शुल्कात वाढ केल्याने कांद्याचे लिलाव थांबले असं शरद पवार म्हणाले. दहीवडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकशाहीत काहींनी जे निर्णय घेतले, त्यावर मी बोलणार नाही. पण लोकांनी कोणाच्या विरोधात मत दिलं आहे, याचा विचार करावा लागेल.
पंतप्रधानांनी मणिपूरमध्ये जायला हवं, असं मतही शरद पवार यांनी व्यक्त केलं.
गेले दोन-अडीच महिने माणसा-माणसामध्ये संघर्ष सुरू आहे. राज्या-राज्यामध्ये संघर्ष वाढला आहे. तेथे जाऊन परिस्थिती शांत करणे, ही देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे, असे शरद पवार म्हणाले.
शेतीमालावर कुठलंही बंधन नको असं सांगत यापूर्वी कधीच कांदा निर्यातीवर कर लावला नाही असे शरद पवार म्हणाले.
जे शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेतात, आम्ही त्यांच्या विरोधात आहोत, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते साताऱ्यातील दहीवडी येथे बोलत होते. कांदा निर्यात शुल्क वाढीवरून त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत संवाद करताना
PM Modi and Bangladesh PM Sheikh Hasina interacted at BRICS Africa Outreach and BRICS Plus Dialogue in Johannesburg, South Africa on August 24
(Photo source: Ministry of Foreign Affairs, Bangladesh_ pic.twitter.com/7AEtscn3E0
— ANI (@ANI) August 25, 2023
“आम्ही पक्ष सोडलेला नाही. आमची निशाणी घड्याळच आहे, आमचा झेंडा तोच आहे. काही मंडळी पराचा कावळा करतात. राजकारणात विकास हा महत्त्वाचा असतोच, पण भावना आणि तत्व देखील महत्त्वाचे असतात. अनेक लोकं ही भावनेने जोडली जातात. त्यासाठी मतांचा विरोध मताने करायला हवा” असं छगन भुजबळ म्हणाले.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर काही तासांनी विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आला. त्या क्षणाचा व्हिडिओ इस्रोने पोस्ट केलाय. इथे लिंकवर क्लिक करा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागत रॅलीत वाहतूक नियमांची पायमल्ली झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक बुलेट राजांनी सायलेन्सरचे फटाके वाजवले, तसेच कर्कश आवाज करत ते ताफ्यात घुसले. वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत हे घडत होतं. सर्व सामान्यांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला.
शरद पवारांचं फलटणमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आहे. दडीवडी परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी, पवारांनी संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये केल्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे.
महाराष्ट्रातील संपूर्ण जनता ही शरद पवार साहेब यांच्यासोबत आहे. रोहित पवारांनी साताऱ्यात मांडली भूमिका, शरद पवार सभा घेणार आहेत. त्या ठिकाणी रोहित पवार भेटी देत आहेत.
पावसाअभावी अक्कलकोट तालुक्यातील शेती पीकं करपण्याच्या मार्गावर आहेत. ऑगस्ट महिना संपत आला तरी अक्कलकोट तालुक्यात पावसाची दडी मारली आहे. अक्कलकोट मधील कुरनूर धरणात केवळ दहा ते पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने खरीप पिक धोक्यात आले आहेत.
पुण्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. लोहगाव भागात मॅफेड्रॉन, हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून ५८ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गोपीचंद रामलाल बिश्नोई, वय २८, सध्या रा. चऱ्होली मूळ, रा. जालोर, राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अनेक राजकीय धुरींना, मी या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं तर, त्या कायद्याच्या लढाईत कुठही अडकायचं नाही. अजित पवारांचा गट पवारांना विठ्ठल मानतात. पवार साहेब म्हणतात आमच्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पक्षाच्या विरुद्ध त्यांनी काही केलं नाही. आम्ही या संदर्भात रितसर तक्रार केलीये असं सुप्रिया सुळे म्हणाल्याचं निकल यांनी सांगितलं. मागच्या तीन वर्षापासून सामान्य माणसाला विचारात घेतलं जात नाही. दहावं परिशिष्ट अधिक कठोर करण्याची गरज आहे. यंदा तसं झालं नाहीतर, महाराष्ट्रात सुध्दा अशा प्रकारची राजकीय स्थिती कायम राहिलं.
नाशिकच्या पिंपळगाव लासलगाव आणि चांदवड बाजार समिती गुरुवारी बंद ठेवल्यानंतर शेतकऱ्यांनी आज सकारात्मक प्रतिसाद देत बाजार खुले केले आहेत. पिंपळगाव बाजार समितीमध्ये शुक्रवारी सकाळी कांदा लिलावाला सुरुवात झाली. मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर देखील नाफेडचे अधिकारी बाजार समितीत लिलावासाठी फिरकले देखील नाहीत.
स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले आहेत. ईडी आणि सीबीआयच्या धमक्यांमुळे काही जण भाजप सोबत गेले आहेत. तसेच शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य म्हणजे रणनितीचा भाग असेल, असा दावा काँग्रेस नेते आणि राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
रत्नागिरीतील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांचा दर्जा नंबर वन असल्याचे एका अहवालात समोर आलंय. असर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांचा दर्जा नंबर वन असल्याचे म्हटलं आहे. गेल्या चार वर्षापासून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांचा स्तर उंचावण्यासाठी एक गुणवत्ता कक्ष स्थापन करण्यात आला होता.
कांद्याला जो ४० टक्के कर लावला आहे, तो सरकारने कमी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. कांद्याला उत्पादन खर्च्याच्या तुलनेत काहीच किंमत मिळत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
बारामतीमध्ये काटेवाडीच्या छोट्या शेतकऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घेतली शरद पवार यांची भेट घेतली. देवांश पाथरकर हा चिमुकल्याने शेतकऱ्याच्या वेशात शरद पवार यांची भेटी घेतली.
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात 1200 रूपयांची वाढ होऊ शकते. बेस्टच्या महाव्यावस्थापकांकडून कंत्राटी कर्मचाऱ्याना तसे आश्वासन देण्यात आले आहे. रजा पगार, दिवाळी बोनस आणि न्यायालयीन केसेस देखील रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भात काही आश्वासने देण्यात आलेली आहेत.
कांदा प्रश्नावर केंद्राशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क कधीच लागले नव्हते असे मत त्यांनी व्यक्त केले. शरद पवार आज सातारा आणि कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. थोड्याच वेळात ते साताऱ्यासाठी रवाना होणार आहेत.
भंडाऱ्यात आदिवासी आश्रम शाळेतील 36 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यापैकी चौघांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील येरली येथील आदिवासी आश्रमशाळा गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. या आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण दिले जात आहे. तिथे सुमारे 325 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहे.
गोंदियामध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते स्वागतासाठी आलेले होते. प्रफुल्ल पटेल यांनी देवीचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी बाईक रैलीमध्ये सहभाग घेतला.
दुधात भेसळ करणाऱ्यांविरूद्ध राज्यावर मोहिम राबवली जाणार आहे. पशूसंवर्धन दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश दिला आहे. मोहिमेचा अहवाल रोजच्या रोज पाठवण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे. दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर आता चाप बसणार आहे. या पार्श्वभूमीवर नंदूरबारमध्ये दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. 334 लिटर दुधावर ही कारवाई करण्यात आली आहे. दुधामध्ये मोठ्याप्रमाणात पाण्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
मुंबईत गेल्या 10 वर्षात 72 टक्क्यांनी कुत्र्यांच संख्या वाढली आहे. दहा वर्षात मुंबईतील कुत्र्यांची संख्या 95 हजारावरून 1.64 लाख झाली आहे. मुंबई महापालिका लवकरच कुत्र्यांची गणना करणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
कांद्याच्या प्रश्नावरून दैनिक सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे. मिशन मून यशस्वी झालं. मिशन सनही होणार आहे. ते ठीक आहे. पण शेतकरी कांद्याला भाव मिळावा म्हणून आंदोलन करत आहेत. त्यांचा प्रश्न आता मार्गी लावा, अशी टीका ठाकरे गटाने दैनिक सामनातून केली आहे.
पुणे जिल्ह्यातील मंचर बाजार समिती शनिवार पर्यंत कांदा लिलाव बंद राहणार आहे. केंद्र सरकारने कांद्याबाबत घेतलेल्या निर्णयात शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापारी ही सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांचेही नुकसान होत आहे. आंबेगाव तालुक्यात नाफेड केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कोणताही दिलासा नाही. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी एकत्र येत शनिवारपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भीमा पाटस साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी मोठा दणका दिला आहे. कारखान्यातील साहित्य जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाचे 5 कोटी 78 लाख रुपये थकीत आहेत. त्यामुळे हे आदेश देण्यात आले असून त्यामुळे भाजपचे आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का बसला आहे.