मुंबई | 27 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा न निघाल्याने जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवलं आहे. इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यात ओलीस ठेवलेले 50 नागरिक मारले गेल्याचा हमासने दावा केला आहे. मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेली शिंदे समिती आज धाराशीवमध्ये येणार असून नागरिकांकडून कुणबी असल्याचे दस्ताऐवज घेणार आहेत. डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ईडीने रात्री उशिरा कारवाई केली असून वाधवान बंधूंची 70 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यासह राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
सांगली | “आमचा मराठा आरक्षणाचा विरोध नाही. मराठा समाजाला कोर्टात टिकणारेच आरक्षण आम्ही देणार आहोत. समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने करावे. आरक्षणाचा विषय संपवण्यासाठी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये याबाबत मागणी करणार”, असं कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले.
आइजोल, मिजोरम: भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा ने मिजोरम विधानसभा चुनाव 2023 के लिए भाजपा का घोषणापत्र जारी करते हुए कहा, "आजकल कई राजनीतिक दल अपने विज़न दस्तावेज़, मिशन दस्तावेज़ और घोषणापत्र के साथ सामने आते हैं लेकिन हमें वे महज़ कागज़ के टुकड़े लगते हैं क्योंकि उन्हें… pic.twitter.com/r2DckeGdqR
— ANI_HindiNews (@AHindinews) October 27, 2023
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील रामनगर-बलंध रोडवर मिनीबसला अपघात होऊन सात प्रवासी जखमी झाले. पोलिसांनी जखमींना रामनगर रुग्णालयात दाखल केले आहे.
जम्मू-कश्मीर के उधमपुर जिले के रामनगर-बलंध रोड पर एक मिनीबस के दुर्घटनाग्रस्त होने से 7 यात्री घायल हो गए। पुलिस ने घायलों को रामनगर के उप अस्पताल में भर्ती कराया है। आगे की जांच जारी है: अनवर-उल-हक, अतिरिक्त पुलिस अधीक्षक, उधमपुर pic.twitter.com/q7Yze8RMom
— ANI_HindiNews (@AHindinews) October 27, 2023
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांकडून पाच एके रायफल आणि इतर आक्षेपार्ह साहित्यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
लखनऊमध्ये अजय सिंह यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 370 हटवल्यानंतर काश्मीरबाबत कोणतीही चर्चा नाही. आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये चर्चा आहे की तिथल्या लोकांना भारताचा भाग व्हायचे आहे. त्यांनाही भारताच्या विकासात सहभागी व्हायचे आहे.
देशाचे कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ न केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. शिर्डी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाने या टीकेला उत्तर दिले आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना 2004-2014 या कार्यकाळात गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीत 122 टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी गहू उत्पादनात देशाला समृध्द केलं. किमान आधारभूत किंमतीत वाढ केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गव्हाचे उत्पादन शेतकरी घेऊ लागले. परिणामी गहू निर्यात करून संपूर्ण जगाची अन्नाची गरज भागवण्याचं कार्य आदरणीय पवार साहेबांनी केलं. pic.twitter.com/x40kBRYLlL
— NCP (@NCPspeaks) October 27, 2023
महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणात छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला नाही. या घोटाळा प्रकरणातील गुन्हा रद्द करण्याची विनंती भुजबळ यांच्याकडून करण्यात आली होती. पण त्यांना दिलासा मिळाला नाही. समीर आणि पंकज भुजबळ यांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला. विशेष PMLA कोर्टासमोर याप्रकरणी सुनावणी सुरु होती.
विरोधकांना चूप करण्यासाठी ED, CBI आणि IT चा वापर करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना, उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. 2024 निवडणुकीपूर्वीची ही तयारी आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना ईडीने अटक केल्याचे मला आश्चर्य वाटले नसल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH दिल्ली: पश्चिम बंगाल के मंत्री ज्योतिप्रिय मलिक को ED द्वारा गिरफ्तार किए जाने पर शिवसेना(उद्धव ठाकरे गुट) की सांसद प्रियंका चतुर्वेदी ने कहा, “2024 के चुनाव से पहले जिस तरह का माहौल बन रहा है, इससे मुझे कोई आश्चर्य नहीं हो रहा है। जो भी विपक्ष के नेता हैं, जहां-जहां… pic.twitter.com/3g8VPIAYf8
— ANI_HindiNews (@AHindinews) October 27, 2023
50 टक्के जागा देशातील खुल्या प्रवर्गासाठी आहे. या जागा मी कमी होऊ देणार नाही. त्या जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यासाठी मी लढा देईल. त्या कमी होऊ देणार नाही, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. असे हल्ले करुन कुणीही मला शांत करु शकत नाही, मी तात्विक वाद घालणारच, असे सदावर्ते यांनी स्पष्ट केले.
परभणी : 155 उमेदवार मैदानात असल्याकारणाने राज्य निवडणूक आयोगाने पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव येथील पोटनिवडणूक रद्द केली आहे, एकाच जागेसाठी तब्बल 202 मराठा उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननी अंती तब्बल 155 उमेदवार रिंगणात असल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केली. निवडणूक आयोगाला केवळ 60 उमेदवारांचा बॅलेट पेपर तयार करण्यात येत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने पत्रामार्फत कळवले आहे. चाटे पिंपळगाव येथे एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत तब्बल 202 मराठा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
शिरूर/पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अपशब्द उच्चारणाऱ्या सदावर्तेचा शिरूर तालुक्यातील धामणी येथे मराठा समाजाच्या वतीने जोडे मारून निषेध व्यक्त केलाय. धामणी येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची आज मराठा समाजाविषयी आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या गुणरत्न सदावर्ते तसेच मराठा समाजाच्या विषयी अश्लील आणि बेताल वक्तव्य सदावर्ते च्या फोटोला जोडे मारून तसेच पायाखाली तुडवून सकल मराठा बांधवांनी हा निषेध नोंदवला. यावेळी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच सदावर्तेच्या निषेधार्थ घोषनाबाजी करण्यात आली
सोलापूर : सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यातील ओबीसी आरक्षण बोगस असल्याचा बॅनर मराठा समाजाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलंय. मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण ओबीसी लाटत असल्याचं या बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय. राज्यात ओबीसी हा केवळ 32 टक्के आहे मात्र 64% फुगीर आकडेवारी दाखवत मराठा समाजाचे आरक्षण घेत असल्याचा आरोपही यावेळी झालाय. राज्यात मराठा समाज 32 टक्के आणि ओबीसी समाज 32 टक्के आहे. त्यामुळे आरक्षणाच्या नियमाप्रमाणे जेवढा समाज असतो त्याच्या 50 टक्के आरक्षण देता येते. यावेळी सोलापुरातील वकिलांनी देखील मराठा समाजाला पाठिंबा दिला आहे.
धाराशिव : मराठा कुणबी आरक्षण समितीचे अध्यक्ष न्यायमुर्ती संदीप शिंदे यांना काळे झेंडे दाखवून मराठा आंदोलक यांनी विरोध दर्शविला आहे. यावेळी आंदोलकांनी वेळकाढू समितीचा धिक्कार असो, गो बॅक गो बॅकची घोषणाबाजी केली. संदीप शिंदे यांच्या गाडी समोर येऊन काळे झेंडे दाखवून निषेध केला आहे. तर मराठा आरक्षण देण्याची मागणी
आंदोलकांनी केली.
अंबादास दानवे पिंपरीच्या वायसीएमला पोहचताच मराठा क्रांती मोर्चाने काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देतानाच पिंपरी चिंचवडमध्ये मराठा नेत्यांना कार्यक्रम अन सभा घेऊ देणार नसल्याचं तसेच आमच्या आंदोलनात ही त्या राजकीय नेत्यांना सहभागी होण्यापासून रोखू अशी आक्रमक भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलनाची सुरवात करतानाच अशी घोषणा त्यांनी केली आहे.
रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा थांबवावी, असं मराठा वनवास यात्रेचे योगेश केदार यांनी आवाहन केले आहे. उद्या यात्रा थांबवली नाही तर जाऊन यात्रा थांबवणार, असेही योगेश केदार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आता युवा संघर्ष यात्रेवरून राडा होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन सोहळा हा खूप महत्त्वाचा असल्याचे शरद पवार म्हणाले. रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रमक आहे. अनेक मान्यवरांकडून महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम झाल्याचे शरद पवार म्हणाले.
राजकारणातील गद्दारांना टकमक टोक दाखण्याची गरज, उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर निशाणा
आमच्यात कधीही कुणी सुडाचं राजकारण केलं नाही. आताच्या राजकारणातील चित्र वेगळं आहे. अलिबागमधून उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर हल्लाबोल
बारामती : माळेगाव संचालक आणि आंदोलकांची बैठक निष्फळ ठरली आहे. उद्या होणारा गळीत हंगाम शुभारंभ अजितदादांच्या हस्ते नको, अशी आंदोलकांनी मागणी केली आहे. तर आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी आंदोलकांची भुमिका आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने उद्याच्या माळेगावच्या कार्यक्रमाबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.
भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी भाजपाला सोडचिट्ठी दिली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये रविवारी ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे विनायकराव पाटील यांनी म्हटलं आहे.
नेते चुलीत गेले तरी चालेल, पक्ष चुलीत गेला तरी चालेल पण आम्हाला आरक्षण द्या. राहेरी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी आमदार, खासदारांसह पुढाऱ्यांना गावबंदी केली. आरक्षण मिळेपर्यंत गावात आल्यास अपमान करू, गावाच्या वेशीवर लावला गावंबंदीचा फलक लावला आहे.
यंदाच्या वर्षी ऊसाला प्रति टन 4 हजार रूपये भाव द्या, अशी ठाकरे गटाने मागणी केली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली साखर आयुक्तांची भेट घेतली आहे. निवेदन देत पहिली उचल 4 हजार रुपये मिळाली पाहिजे, अशी मागणी दानवेंनी साखर आयुक्तांसोबत घेतलेल्या बैठकीत केली.
कल्याण पूर्वेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला भाजप आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते. गेल्या काही दिवसापासून कल्याण पूर्वेत शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वाद या विषयावरतीही चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठीचा दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 30 दिवसांचा वेळ मागितला होता. मराठ्यांनी त्यांना चाळीस दिवसांचा वेळ दिला. तील दिवसात आरक्षण देता येत नव्हतं तर मग वेळ कशाला मागितला? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठ्यांचे पोरं मोठे होवू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी षड्यंत्र रचलंय असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रात येवून मराठा आरक्षमाबद्दल कुठलेली भाष्य केले नाही. याचा अर्थ आता त्यांनी गोरगरिबांची गरज राहिलेली नाही अशी तिखट प्रतिक्रीया मनोज जरांगे यांनी दिली आहे. मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांबद्दल द्वेश नाही असं असतं तर शिर्डीत त्यांच विमानही उतरू शकलं नसतं असं मनोज जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला पंतप्रधान मोदींना भेटायला गेले होते, मात्र त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणासाठी मोठा लढा उभा असल्याचे सांगितले नाही अशी शंका आहे, आणि सांगीतले असेल तर मग पंतप्रधान जाणून मराठी आरक्षणाबद्दल बोलले नाही का? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. काल पंतप्रधान शिर्डी येथे विकास कामांच्या उद्धघाटनासाठी आले होते. पंतप्रधानांनी भाषणात मराठा आरक्षणाबद्दल कुढलेच भाष्य केले नाही.
आमच्या गावात तुमचं काहीच काम नाही. तुमच काम संसदेत आहे. तीथे जावून मराठा आरक्षणाचा लढा लढावा. आमच्या दुःखावर मीठ चोळण्यासाठी गावात येऊ नका. असे खडेबोल जरांगे पाटील यांनी सुनावले. अधिवेशनात जा आणि आमच्याकडून दोन गुलाबजाम जास्त खा पण आम्हाला आरक्षण द्या असं म्हणत त्यांनी मिश्किल टोलाही नेत्यांना लगावला.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली वेळ संपलेली आहे. त्यांमुळे मराठा आंदोलन आता अधिक तिव्र करण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांच्या पोरांचं कल्याण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तातडीनं एक दिवसाचं आंदोलन बोलवावं आणि मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा. अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहे. आम्ही तुमच्या दारात आलेलो नाही तुम्हीही आमच्याकडे येऊ नका अशा कडक शब्दात त्यांनी नेत्यांचे कान टोचले. यापेक्षा तुम्ही तातडीनं अधिवेशन भरवा आणि सभागृहात आरक्षणासाठी आवाज उठवा.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्याशी सरकारने संवाद साधायला हवा. आणि त्यांच्या मागण्या ऐकाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
ललीत पाटील बेवारस कारप्रकरणात माजी महापौर विनायक पांडे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. विनायक पांडे दुपारी 2 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात माहिती देण्यासाठी जाणार आहेत. विनायक पांडे यांच्या चालकाच्या ओळखीने ललित पाटील याने त्याची गाडी एका गॅरेजवर दुरुस्तीसाठी दिली होती. ही गाडी काही दिवसापूर्वी नाशिक पोलिसांनी जप्त केली आहे.
ठाण्यात आदिवासी समाजाकडून विराट मोर्चा काढण्यात येत आहे. जना करो सो मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव एकत्र आले आहेत.
वसई विरार महापालिकेवर पाण्यासाठी मनसेचा भव्य मोर्चा निघाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आहे. विरार पूर्व आर जे नाका ते वसई विरार महापालिका मुख्य कार्यालया पर्यंत हा मोर्चा निघाला आहे. या मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
केईएम रुग्णालयातील परिचारिकांचे आंदोलन सध्या परिचारिकांना 30 दिवसाला 8 सुट्ट्या दिल्या जातात. पण कोविड पूर्व काळात असलेला सुट्टीचा पॅटर्न जो 30 दिवसाला 6 सुट्ट्यांचा आहे. तो राबवण्यात येणार आहे. याला परिचारिकांचा विरोध आहे. सध्याचा 8 दिवसांचा पॅटर्नच राबवण्यात यावा अशी परिचारिकांची मागणी आहे.
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ पुण्यातील सिंहगड रस्त्यावर मराठा बांधवांनी उपोषण केलं आहे. मराठा समजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सिंहगड रस्त्यावर उपोषण सुरु झालं आहे. मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
ठाकरे गटाचे परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्या कार्यक्रमात मराठा युवकांनी गोंधळ केला आहे. परभणीच्या मानवत गावातील ही घटना आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत कार्यक्रम बंद पाडला. आमदार राहुल पाटील परभणीच्या मानवत येथे किसान कृपा दूध संकलन केंद्राच्या कार्यक्रमासाठी मानवत इथं आले होते. मराठा युवकांनी चालू कार्यक्रमात घोषणाबाजी करत कार्यक्रम बंद पाडला.
कोल्हापुरात मराठा आंदोलकांकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घेराव घालण्यात आला. मंत्री मुश्रीफ यांच्याकडे राजीनाम्याची मागणी करण्यात आली. गारगोटी इथं आजपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून साखळी उपोषणाला प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री पाटगाव इथं नियोजित कार्यक्रम निमित्ताने जात असताना आंदोलकांनी त्यांच्या गाडीचा ताफा अडवून राजीनाम्याची मागणी केली.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अहमदनगरच्या अकोला इथं त्यांचा जन्म झाला होता. 1981 मध्ये राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदी त्यांची निवड झाली होती.
आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला झोपू देणार नाही. 1967 ला व्यवसायावरून आरक्षण दिलं. व्यवसायावरून आरक्षण दिलेल्यांचा आणि आमचा व्यवसाय एकच आहे. सरकारला आता नाक नसल्यासारखं झालंय, अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात आरक्षणाविषयी चांगली भावना होती. 10 हजार पानांचा पुरावा असतानाही मराठा समाजाला आरक्षण नाही. समितीने तपासलेल्या कागदपत्रात काय हेसुद्धा तुम्ही सांगितलं नाही. मराठा पोरांच्या विरोधात सीएस, डीसीएमचं षडयंत्र आहे,” असं जरांगे पाटील म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मराठा आरक्षणाविषयी काहीच बोलले नाहीत. दिल्लीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली असं वाटलं होतं. पण तसं झालेलं दिसत नाही. पंतप्रधान मोदी आरक्षणाचा विषय स्वत: बघतीस असं वाटलं होतं,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जालन्यात आज मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद आहे. आज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा हा दुसरा टप्पा आहे. सरकारला 40 दिवस वेळ देऊनही मराठा समाजाला आरक्षण न दिल्याने जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे.
कोल्हापुरात पाहावं ते नवलच….कोल्हापुरात चोरट्याने चक्क तेलाचा डब्बा चोरला आहे. दुकानदारांचे लक्ष नसताना चोराने तेलडब्यावर डल्ला मारला आहे. तेलडबा चोरतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
सोलापूरच्या माढ्यातील जामगाव याठिकाणी मराठा आरक्षणासाठी मालोजी चव्हाण या दिव्यांग तरुणाने आक्रमक आंदोलनाला सुरुवात केली. स्वतःला कमरे पर्यत गाडून अर्ध समाधी घेत तरुणाने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. जोपर्यत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळत नाही..जोवर मराठा आरक्षण सरकार जाहीर करीत नाही तोपर्यंत अर्ध समाधी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलक मालोजी चव्हाण यांनी घेतला आहे…
ससूनमध्ये ललित पाटीलवर डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्या कडूनच उपचार सुरु होते. ससून रुग्णालयातील आरोपींच्या रजिस्टरमध्ये नोंद असल्याची माहिती देखील समोर येत आहे. ललित पाटील याच्या हर्नियाच्या आजारासाठी उपचार सुरु होते.
शरद पवार गटाच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक सुरु झाली आहे. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेत्यांची ऑनलाईन बैठक सुरु झाली आहे. राज्यातील आगामी निवडणुका आणि पक्ष संघटनेसंदर्भात बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे.
भाजप दुतोंडी पक्ष… असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. कृषीक्षेत्रात शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे. कृषीमंत्री म्हणून पवार यांनी गुजरातला मदत केली. गेल्या १० वर्षांत सर्वात जास्त शेतकऱ्यांनी स्वतःलं संपवलं. हे आपलं अपयश आहे. भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधित शेतकऱ्यांनी अत्महत्या केल्या आहेत… असं देखील संजय राऊत म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण विदर्भात पोहचले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिरपुल्ली गावात गावबंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यत नेत्यांना गावबंदी असणार आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर गावाचा बहिष्कार असणार आहे.
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. त्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाघोली शहरातमध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. वाघोली गावामध्ये देखील राजकीय पुढार्यांना गाव बंदी घालण्यात आली आहे.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची रात्री तोडफोड करण्यात आली. नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावातील रात्री उशिराची ही घटना आहे. खासदारांसह त्यांच्या सोबत असलेल्या वाहनांची देखील यावेळी तोडफोड करण्यात आलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे यांनी राजकारणात इतकी टीका चालतेच. यापूर्वी अनेकवेळी मोदी यांनी पवार साहेबांच्या कामाचे कौतूक केले, असे म्हटले. हिरे व्यापारी गुजरातमध्ये जात आहे, महाराष्ट्र सरकार काय करत आहे? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुणे महानगरपालिकेच्या नोकर भरती प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला आहे. आझाद समाज पार्टीने या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. या भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला असून भरती प्रक्रियेची चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
ड्रग्जमाफिया ललित पाटील पलायन प्रकरणी महिला पोलीस शिपाई सविता हनुमंत भागवत निलंबित. 16 नंबर वॉर्डात ड्रग्जमाफिया ललित पाटील याला भागवत या बंदोबस्त कामी हजर असताना एका संशयित इसमाने काळ्या रंगाच्या बॅगमधून दिले होते मोबाईल फोन. महिला पोलीस सविता भागवत यांनी कामात हलगर्जीपणा केल्याने पुणे पोलिसांनी केली कारवाई.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणात माजी महापौर चौकशीच्या फेऱ्यात. ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांना पोलीस चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता. ललितची अपघातग्रस्त कार दुरुस्त करण्यासाठी महापौरांच्या ड्रायव्हरची मध्यस्थी ? आपण कोणत्याही चौकशीला तयार – असं विनायक पांडे यांनी सांगितलय.,
सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करणाऱ्या मंगेश साबळे यांचं आज जंगी स्वागत. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात मंगेश साबळे यांचं जंगी स्वागत. मंगेश साबळे यांच्या स्वागताला क्रांती चौकात मोठ्या प्रमाणात समाज जमण्याची शक्यता. मंगेश साबळे यांच्या गावातही होणार स्वागत. गावकरी गावात फुले उधळून मंगेश साबळेचं करणार स्वागत.
अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. पूर्व सीरियामधील दहशतवादी तळांना अमेरिकेने लक्ष्य केलं. इराण समर्थित दहशतवादी गटावर अमेरिकेने ही कारवाई केली आहे.
रत्नागिरीला ऑक्टोबर हिटचा फटका बसला आहे. तापमानाच्या बाबतीत रत्नागिरी जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुरुवारी जिल्ह्याचे तापमान 36.4 अंश सेल्सिअस होते. तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज सकाळी सकाळीच पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल 4 ते 5 मिनिटे उशिराने धावत आहेत. मात्र स्थानकात प्रवाशांची गर्दी नाही. खार ते गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासाठी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाड्या रद्द केल्यामुळे पश्चिम मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे, परंतु सध्या सर्व काही सामान्य आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून स्थापन करण्यात आलेली शिंदे समिती आज धाराशीवमध्ये येणार आहे. या समितीने नागरिकांना त्यांच्याकडील दस्ताऐवज देण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन शासकीय पुरावे, कागदपत्रांची ही समिती पाहणी करणार आहे.
वाधवान बंधूंना ईडीने मोठा झटका दिला आहे. डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ईडीने रात्री उशिरा मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ईडीने वाधवान बंधूंची 70 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.