Maharashtra Breaking News Live : बचाव मोहिमेच्या यशाने सर्वांनाच भावूक केले: पंतप्रधान मोदी

| Updated on: Nov 29, 2023 | 7:22 AM

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील.... राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी.... तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील आज घडणाऱ्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या... वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : बचाव मोहिमेच्या यशाने सर्वांनाच भावूक केले: पंतप्रधान मोदी
Follow us on

मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : राज्यात अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरु आहे. सलग दोन, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंगळवारी पुन्हा गारपीट होण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या घडामोडी आज होणार आहे. छत्रपती संभाजीराजे केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहे. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. आजपासून ऊस वाहतूक रोखणार आहे. तसेच एक डिसेंबर रोजी राजारामबापू कारखान्यासमोर आंदोलन करणार आहे. राजकीय, प्रत्येक जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Nov 2023 09:30 PM (IST)

    बचाव मोहिमेच्या यशाने सर्वांनाच भावूक केले: पंतप्रधान मोदी

    उत्तरकाशीमध्ये बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया समोर आली आहे. पीएम मोदी म्हणाले की, आमच्या कामगार बांधवांच्या बचावकार्याचे यश सर्वांनाच भावूक करणारं आहे. बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आणि चांगले आरोग्य मिळावं यासाठी प्रार्थना करतो.

  • 28 Nov 2023 05:55 PM (IST)

    तेलंगणात सरकार येताच सहा हमी पूर्ण केल्या जातील : प्रियंका गांधी

    काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हैद्राबाद, तेलंगणात रोड शो करत असताना राज्यातील सत्ताधारी पक्ष बीआरएसवर हल्लाबोल केला आहे. गेल्या दहा वर्षांच्या केसीआर आणि बीआरएस सरकारमुळे तुम्हाला रोजगार मिळाला का? केसीआर यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मंत्री केले. राज्यात काँग्रेसचे सरकार येताच आम्ही आमचे सहा आश्वासन पूर्ण करू.


  • 28 Nov 2023 05:45 PM (IST)

    आप खासदार संजय सिंह यांच्या याचिकेवर न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली

    मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेल्या आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या जामीन अर्जावर राऊस एव्हेन्यू कोर्टाने ईडीला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने नोटीस बजावली असून ईडीकडून 6 डिसेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे.

  • 28 Nov 2023 05:30 PM (IST)

    ऋषिकेश एम्सचे डॉक्टर अलर्ट

    ऋषिकेश एम्समध्ये 41 मजुरांसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. तसेच, उत्तरकाशीतील कामगारांच्या तब्येतीत काही समस्या दिसल्यास त्यांना ऋषिकेश एम्समध्ये पाठवले जाईल. जिथे वैद्यकीय उपचाराची तयारी करण्यात आली आहे.

  • 28 Nov 2023 05:24 PM (IST)

    युतीमध्ये जो उमेदवार देतील तो निवडून आणू : भरत गोगावले

    लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून अनंत गीते यांचं नाव निश्चित झालं आहे. हरकत नाही, युतीतीन तीन पक्ष जो उमेदवार देतील तो आम्ही निवडून आणू.

  • 28 Nov 2023 05:17 PM (IST)

    चिनियालीसौडमध्ये चिनूक हेलिकॉप्टर तैनात, लवकरच 41 कामगारांची होणार सुटका

    उत्तरकाशी : सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे. सीएम पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट केले की, बोगद्याच्या आत पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच सर्व कामगारांची सुटका केली जाईल.

  • 28 Nov 2023 05:11 PM (IST)

    राज्य मागासवर्ग आयोगासोबत सकारात्मक चर्चा : संभाजीराजे

    मागासवर्ग आयोगासोबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे. समाजाचे प्रश्न आम्ही आयोगासमोर मांडले. जरांगेंच्या मागणीनुसार पुरावे सापडत आहेत. त्यामुळे मागासवर्ग आयोगाची जबाबदारी असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं.

  • 28 Nov 2023 04:54 PM (IST)

    उत्तराखंड बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु

    उत्तराखंड : बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एकामागून एक कामगारांना बोगद्यातून बाहेर काढले जात आहे. सीएम पुष्कर सिंह धामी हे सिल्कियारा बोगद्याला पोहोचणार आहेत. खाण पथकाने उत्खननाचे काम पूर्ण केले आहे. यानंतर पथकाने कामगारांची भेट घेतली.

  • 28 Nov 2023 04:51 PM (IST)

    अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा होणार, उपसभापती निलम गोऱ्हे यांची माहिती

    मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा होणार अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. उपसभापती गोऱ्हे यांनी अधिवेशन पूर्वतयारीची आढावा बैठक घेतली. कामकाज सल्लागार समितीची बैठक उद्या होणार आहे. तसेच, यावेळी विधीमंडळ परिसरात हिरकनी कक्ष उभारणार आहे असेही त्यांनी सांगितले.

  • 28 Nov 2023 04:34 PM (IST)

    छगन भुजबळ यांच्या आरोपाला मनोज जरांगे यांनी पुरावा दाखवत दिलं प्रतिउत्तर

    संभाजीनगर : छगन भुजबळ यांनी मराठा कुणबी नोंदी पेनाने केल्या जात असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाला मनोज जरांगे यांनी पुरावा दाखवत प्रतिउत्तर दिलंय. माळी समाजाची नोंद ही सुद्धा पेनाने लिहिलेली आहे असा पुरावा मनोज जरांगे यांनी उघड केला. अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील पेनाने लिहिलेली नोंद आहे ती कागदपत्रे मनोज जरांगे पाटील उघड केली.

  • 28 Nov 2023 04:17 PM (IST)

    फळबागबाबत निकष बदलले पाहिजे, मंत्रिमंडळात चर्चा करणार, मंत्री अनिल पाटील यांची माहिती

    नाशिक : राज्यात २६ तारखेला जी गारपीट झाली, त्यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले. नाशिकमध्ये जवळपास ३४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान दिसत आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. ४ दिवसात पंचनामे होतील आणि आयुक्त अहवाल सादर करतील. पिकविम्यासह अनेक निकष बदलण्याची गरज आहे. फळबागबाबत निकष बदलले पाहिजे. याबाबत कृषिमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार आहे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा विषय ठेवणार, यात मंत्रिमंडळात चर्चा करू, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

  • 28 Nov 2023 03:54 PM (IST)

    शरद पवार पावसात भिजले हा 2024 साठी शुभ शकुन- अनिल देशमुख

    शरद पवार पावसात भिजले तेव्हा राष्ट्रवादीची दोन शकले झालीत. मात्र आता पुन्हा भिजल्यानंतर राष्ट्रवादी लोणच्या एव्हढी शिल्लक राहणार नाही अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. साताऱ्यामध्ये 2019 मध्ये शरद पवार पावसात भिजले त्यामुळे भाजपा सरकार सत्तेत येऊ शकले नाही आणि आमचे सरकार आल्यानंतर एजन्सीचा दुरुपयोग करून त्यांनी पक्ष फोडला. परवा पवार साहेब ठाण्यामध्ये भिजले हा 2024 साठी शुभ शकुन आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी वाशिम येथे माध्यमांशी बोलताना दिली.

  • 28 Nov 2023 03:44 PM (IST)

    मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचे ठरले- चंद्रशेखर बावनकुळे

    सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचे ठरले, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मराठा समाजाला जास्त फायदा कशात हे सर्व मराठा नेत्यांनी एकत्र बसून विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.आरक्षणावरुन समाजासमाजात वाद होऊ नये. मनोज जरांगे यांना मागणी करण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले.

  • 28 Nov 2023 03:15 PM (IST)

    अवकाळीमुळे मोठे नुकसान, सरकार मदत कधी करणार

    राज्य सरकारच्या उपया योजना अपुऱ्या पडत आहेत. सरकार बनवाबनवी करत असल्याचे आता उघड झाले आहे. आता अधिवेशानाची वाट न पाहता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यात अवकाळी पावसाचा तडखा बसला. सरकारने केवळ घोषणा करु नये मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यातील शेतकरी उद्धवस्त करण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे. विमा कंपन्यांना चाबकाचे फटकारे दिले पाहिजेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

  • 28 Nov 2023 03:07 PM (IST)

    हे सरकार तर नुसतं तोंड वाजवायलाच -राज ठाकरे

    बाळासाहेबांचे विचार विचार म्हणतात आणि मग कारवाई का करत नाहीत, बाळासाहेबांचे विचार असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शिंदे सरकारचा नाही का असं म्हणत सारखे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार म्हणता मग कारवाई का करत नाही असा सवाल शिंदे सरकारला केला प्रकरणावर बोलतानाही त्यांनी पोलिसांना 24 तास मोकळीक दिली तर ते सर्व मोडीत काढतील असं राज ठाकरे म्हणाले पण यामध्ये कोण आहे हे समजत नसल्याचे सांगताना त्याचा पैसा सर्वत्र येतो की काय अशी शंका येते असेही ते म्हणाले पुण्यामध्ये पाषाण भागात मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते..मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील प्रश्न विचारले असता उत्तर न देताच ते निघून गेले.

  • 28 Nov 2023 02:55 PM (IST)

    अस्मानी संकटामुळे द्राक्ष आणि कांदा शेतीचे मोठे नुकसान

    निफाड : 26/11 च्या अस्मानी संकटामुळे द्राक्ष, कांदा शेती उध्वस्त. नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे सुरू. निफाड तालुक्यात द्राक्ष आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान.

  • 28 Nov 2023 02:41 PM (IST)

    ग्रँड हयात हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी वाकोला पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

    वाकोला पोलिसांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मराठी पाट्यासंदर्भात मनसे कार्यकर्ते आज ग्रँड हयात हॉटेलमध्ये जात होते. सध्या मनसे कार्यकर्त्यांना वाकोला पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.

  • 28 Nov 2023 02:37 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका

    गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसला आहे. कापणी झालेल्या भातपिकासह रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.

  • 28 Nov 2023 02:22 PM (IST)

    उत्तराखंड बोगद्यातील अडकलेल्या मजुरांना थोड्याच वेळात बाहेर काढलं जाणार

    उत्तराखंडमध्ये बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना थोड्याच वेळात बाहेर काढले जाणार आहे. बचाव कार्य अंतिम टप्प्यात असून रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत.

  • 28 Nov 2023 02:16 PM (IST)

    एका दिवसात ठाकरे काय दौरा करणार आहेत – शंभुराज देसाई

    सहनही होत नाही आणि सांगता ही येत नाही अशी ठाकरेंची अवस्था आहे. मातोश्रीवर फ्रीज भरुन काय जात होतं हे सांगायची वेळ आणू नका. अशी टीका ही शंभुराज देसाई यांनी केली आहे.

  • 28 Nov 2023 02:14 PM (IST)

    सरकार शेतकऱ्यांना तातडीने मदत करेल – शंभुराज देसाई

    आम्ही नुकसानग्रस्त भागाचा आढावी घेत आहोत. मुख्यमंत्री शिंदे हे शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते आहेत. त्यांचं  संपूर्ण राज्यात लक्ष आहे. सरकार शेतकऱ्यांना तातडीने मदत करेल. असं शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.

  • 28 Nov 2023 02:11 PM (IST)

    मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज मेगा ब्लॉक 

    मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज मेगा ब्लॉक असणार आहे. खोपोली ते पाली फाटा रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून 50 टन वजनाचे गर्डर टाकण्याचे काम सुरू. 46 मीटर लांबी असलेलं गर्डर 72 चाकाची ट्रॉली वरून या ठिकाणी आणण्यात आले असून एकूण 6 क्रेनच्या साह्याने हे गर्डर बसवणार आहे.

  • 28 Nov 2023 01:55 PM (IST)

    Uddhav Thackeray : तेलंगणात जावून कोणत्या भाषेत बोलणार?- उद्धव ठाकरे

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तेलंगणा दौऱ्यावर आहेत. तेलंगणा येथे निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे आज येथे आले आहेत. या दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाना साधला आहे. तेलंगणात जावून कोणत्या भाषेत बोलणार? असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तसेंच मुख्यमंत्री स्वतःचं घर सोडून इतरांच्या घरात डोकावत असल्याची टिकाही त्यांनी केली आहे.

  • 28 Nov 2023 01:45 PM (IST)

    Eknath Shinde Telangana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तेलंगणाच्या दौऱ्यावर

    तेलंगाणा येथील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस आज तेलंगणा येथील प्रचार दौऱ्यावर आले आहे. भाजपचे प्रविण दरेकर देखील या रॅलीमध्ये सामिल झाले आहेत.

  • 28 Nov 2023 01:41 PM (IST)

    Maharashtra News : गँगवार या शब्दावरून सुनिल तटकरे यांची संजय राऊत यांच्यावर टीका

    गँगवार हा शब्द संजय राऊत यांच्या जीवनाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे त्यांनी असा शब्द वापरला, मात्र आपला पक्ष सांभाळावा आमची चिंता करू नये असे म्हणत सुनिल तटकरे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे.

  • 28 Nov 2023 01:36 PM (IST)

    Maharashtra News : अवकाळी पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यात पूर

    विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालूक्यात अवकाळी पावसामुळे नदीला पूर आला आहे. या परिसरातील कापूस आणि भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे. सकाळपासून या मार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली आहे.

  • 28 Nov 2023 01:30 PM (IST)

    Maharashtra News : गोंदिया जिल्ह्यात तापमाणात घट

    विदर्भात अवकाळी पावसामुळे तापमाणात मोठी घट झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान 15.3 अंशापर्यंत घसरले आहे. विदर्भात अवकाळी पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

  • 28 Nov 2023 01:24 PM (IST)

    Maharashtra News : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट

    नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आज सुनावणी होणार होती मात्र कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. काँग्रेस नेते सुनिल केदार हे नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष असताना 152 कोटी रूपयांचा घोटाळा झाला होता.

  • 28 Nov 2023 01:19 PM (IST)

    Maharashtra News : लातूरमध्ये उसाच्या शेताला आग

    लातूलमध्ये 15 एकरवर उसाच्या शेताला आग लागली आहे. या आगिमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • 28 Nov 2023 01:15 PM (IST)

    Maharashtra News : काँग्रेसचा वनमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

    गडचीरोलीमध्ये काँग्रेसने वनमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. विविध मागण्यासाठी वनमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या पदाधीकाऱ्यांनी सांगितले.

  • 28 Nov 2023 01:09 PM (IST)

    Maharashtra News : कोकण रेल्वे मार्गावर आजपासून जादा रेल्वे सोडणार

    कोकण रेल्वे मार्गावर आजपासून जादा रेल्वे सोडण्यात येणार आहे. नविन वर्ष आणि नाताळाच्या निमित्त्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नाताळाच्या सुट्ट्या आणि नविन वर्षानिमित्त अनेक चाकरमाने कोकणात आपल्या स्वगावी जातात. या दिवसात रेल्वेला मोठी गर्दी असते. प्रवाश्यांचे हाल टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

  • 28 Nov 2023 12:58 PM (IST)

    आठ दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या बोट बंद

    मालवणातमध्ये आजपासून आठ दिवस जलक्रीडा आणि प्रवासी बोट वाहतूक बंद. वॉटर स्पोर्टस् बंद असल्याने नेहमी पर्यटकांनी फुलून जाणाऱ्या मालवणात शुकशुकाट. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत राहणार समुद्री पर्यटन बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येणार नाही.

  • 28 Nov 2023 12:45 PM (IST)

    गरीब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे शरद पवारच- गोपीचंद पडळकर

    तुमच्या माहिती करता स्वराज्याची स्थाना नी गरीब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच शरद पवार नी गरीब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच शरद पवार आहेत, असं ट्विट करत गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये त्यांनी रोहित पवारांना टॅग केलं आहे.

  • 28 Nov 2023 12:30 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईन संपल्यानंतर ही इंग्रजी पाट्या न हटवल्याने मनसे आक्रमक

    अल्टिमेटनंतर नवी मुंबईतील नेक्सेस ग्रँड सेंटर मॉल मधील दुकानदारांनी इंग्रजी नावाच्या पाट्या झाकल्या. सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईन संपल्यानंतर ही इंग्रजी नावाच्या पाट्या दुकान, हॉटेल आणि मॉलवरती लागल्याने नवी मुंबईत मनसे आक्रमक झाली आहे.

  • 28 Nov 2023 12:15 PM (IST)

    काँग्रेस नेते बाबासाहेब थोरातांच्या बालेकिल्यात भाजपचे शक्ती प्रदर्शन.

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बावनकुळेंचा अहमदनगर दौरा आहे.  शिर्डी लोकसभा मतदारसंघात जनतेशी संवाद साधत आहेत. बावनकुळेंचा जनतेशी संवाद कार्यक्रम संपर्क से समर्थन अभियान सुरू आहे. सहा तालुक्यातील युवा वारीयर्सशी संवाद साधणार आहेत.

  • 28 Nov 2023 11:50 AM (IST)

    Live Update : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटली बातमी

    धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बस उलटल्याची बातमी समोर येत आहे. अहमदाबादवरून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसचा चाळीसगावातील मेहुनबारे गावाजवळ अपघात झाला आहे. अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी आणि झालेली नाही. या अपघातात तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे…

     

  • 28 Nov 2023 11:40 AM (IST)

    Live Update : रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्णाने रेल्वे प्रवासी वाहतूक केली ठप्प

    नंदुरबार रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्णाने रेल्वे प्रवासी वाहतूक ठप्प केली. मनोरुग्ण व्यक्ती रेल्वेच्या हाय टेन्शन लाईन वर चढल्यामुळे वीज पुरवठा करण्यात आलाय खंडित.. वीज पुरवठा खंडित असल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद…रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल…भुसावळ ते सुरत दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत…

  • 28 Nov 2023 11:25 AM (IST)

    Live Update : मराठीत पाठ्या लागल्या नसल्याने मनसे नवी मुंबईत मनसे आक्रमक

    सर्वोच्च न्यायालयाने दिलेली डेडलाईन संपून आस्थापनावर मराठीत पाठ्या लागल्या नसल्याने मनसे नवी मुंबईत मनसे आक्रमक… नवी मुंबईच्या नेक्सेस ग्रँड सेंटर मॉल आस्थापनेवरील इंग्रजीत लावलेल्या पाट्या या मराठी करण्या साठी मनसे कार्यकर्ते मॉल प्रशासनाला घालणार घेरावा… कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात मॉलच्या परिसरात पोलीस बंदोबस्त

  • 28 Nov 2023 11:15 AM (IST)

    Live Update : अनिल पाटील यांच्या नाशिक दौऱ्याला सुरवात

    मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या नाशिक दौऱ्याला सुरवात झाली आहे. अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानीची निफाड परिसरात पाहाणी सुरु झालीआहे. पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री अनिल पाटील आढावा बैठक घेणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तात्काळ मदत करणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष

  • 28 Nov 2023 11:00 AM (IST)

    नाशिक : रेल्वे प्रवासात प्रवाशांचे मौल्यवान साहित्य, बॅग चोरी करणाऱ्याला अटक

    नाशिकरोड रेल्वे येथील रेल्वे स्थानकात प्रवाशाचे मौल्यवान साहित्य असलेली बॅग चोरीची घटना घडली होती. रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही फुटेजचा आधारे नाशिक पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने नाशिक शहरातून या संशयित चोरट्याला मुद्देमालासह ताब्यात घेतलं.

  • 28 Nov 2023 10:49 AM (IST)

    लातूर जवळ ऊसाच्या शिवाराला आग लागून १५ एकरावरील ऊसाचे नुकसान

    लातूर जिल्ह्यातल्या शिरूर-अनंतपाळ तालुक्यातल्या दैठणा शिवारात ऊसाला अचानक आग लागली. सहा शेतकऱ्यांच्या १५ एकरावरील ऊसाचे यामुळे नुकसान झाले आहे. तातडीने शिरूर-अनंतपाळ येथून अग्निशमन पथक बोलाविण्यात आले. या पथकाने आग विझवली आहे. मात्र ऊसाला ही आग नेमकी कश्यामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

  • 28 Nov 2023 10:38 AM (IST)

    गडचिरोली – 30 नोव्हेंबर रोजी काँग्रेस करणार वनमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

    गडचिरोलीमध्ये 30 नोव्हेंबर रोजी काँग्रेसतर्फे वनमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. नरभक्षक वाघ आणि हत्तीचा बंदोबस्त करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आंदोलन.

    निष्पाप नागरिकांचा जीवही जात आहे . अनेक गावांची आणि शेतीचे नुकसान होत असल्याने जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आगे. काँग्रेसच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.

  • 28 Nov 2023 10:24 AM (IST)

    1 तारखेच्या सभेत मी सगळ्यांचा समाचार घेणार – मनोज जरांगे पाटील

    1 तारखेला जालन्याच्या सभेत मी सगळ्यांचा समाचार घेणार आहे. पोलीस कुणाला अटक करणार नव्हते मग अटक का केली ? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.

  • 28 Nov 2023 10:10 AM (IST)

    कमी बोला असे निर्देश न्यायालयाने नार्वेकरांना दिले आहेत – संजय राऊत

    अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून सरकारची वकिली करू शकत नाहीत. कमी बोला असे निर्देश न्यायालयाने नार्वेकरांना दिले आहेत, असे टीकास्त्र राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर सोडले.

  • 28 Nov 2023 10:08 AM (IST)

    कोण पुरूष, कोण युगपुरूष ते 2024 साली कळेलच – संजय राऊत

    कोण पुरूष, कोण युगपुरूष ते 2024 साली कळेलच. युगपुरूष हे जनता ठरवते, असा टोला संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना लगावला.

  • 28 Nov 2023 10:04 AM (IST)

    चाळीसगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा

    जळगाव जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता सोसणाऱ्या चाळीसगाव तालुक्याला देखील अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यात दहा गावांमधील 415 हेक्‍टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

    तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली तसेच महत्त्व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी देखील शेतकऱ्यांशी फोनवरून संवाद साधत त्वरित पंचनामे करून मदतीचे आश्वासन दिले आहे.

  • 28 Nov 2023 09:59 AM (IST)

    पश्चिम विदर्भाला अवकाळीचा फटका, सर्वाधिक नुकसान एकट्या बुलडाणा जिल्ह्यात

    पश्चिम विदर्भाला अवकाळीचा फटका बसला आहे. अमरावती विभागात ३५ हजार हेक्टरमधील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक नुकसान एकट्या बुलडाणा जिल्ह्यात झाले आहे. वाशिम जिल्ह्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. कपाशी, तूर, फळपीक आणि भाजीपाला पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिला आहे.

  • 28 Nov 2023 09:45 AM (IST)

    मंत्रालय परिसरामध्ये आज विकसित भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेचा प्रचार-प्रसार

    मुंबईतल्या मंत्रालय परिसरामध्ये आज विकसित भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेचा प्रचार-प्रसार होणार आहे. चार मोठ्या ट्रकला एलसीडी स्क्रीन लावून मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांची माहिती गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आहे. पण ही योजना मुळात फसवी आहे आणि गोरगरीब जनतेला भाजप मूर्ख बनवण्याचे काम करत आहे अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे. लोकांना मूर्ख बनवण्याचे काम भाजप सरकार करत आहे आणि पुढच्या वेळी त्यांचा डिपॉझिट जप्त होईल, त्यांचा बिगूल वाजणार नाही अशी टिका आमदार नितीन देशमुख यांनी करत शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

  • 28 Nov 2023 09:30 AM (IST)

    “राष्ट्रवादीने जर सरकार पाडलं नसतं, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असता”

    “राष्ट्रवादीने जर सरकार पाडलं नसतं, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असता,” असं मोठं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. “शिवाय राज्य सहकारी बँकेबाबत कडक निर्णय घ्यावा लागला आणि त्याची राजकीय किंमत मोजावी लागली,” असं पृथ्वीराज चव्हाण पुण्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यात म्हणाले. “मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीने आमचं सरकार पाडलं,” असंही ते म्हणाले.

  • 28 Nov 2023 09:15 AM (IST)

    मराठा आरक्षणासाठी आज दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली, संभाजीराजे दिल्लीमध्ये दाखल

    मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ केंद्रिय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात सुरु ठेवलेल्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नुकतेच छत्रपती संभाजीराजे आणि शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्व स्थरावर संभाजीराजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाठीशी दिसून येत आहेत. सोबतच कायदेशीर प्रक्रिया संभाजीराजेंना माहिती असल्याने ते विषेश पुढाकार घेताना दिसत आहेत.

  • 28 Nov 2023 08:57 AM (IST)

    रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस

    शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.  सोयाबीन , कापूस प्रश्नासाठी रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलन करत आहेत. चिखली तालुक्यातील सोमठाणा गावात आंदोलन सुरू आहे. अन्नत्याग आंदोलनाने तुपकर यांची तब्येत खालावली आहे.  तुपकर थोड्याच वेळात कार्यकर्त्यांसह मुंबईला निघणार आहे.  उद्या 29 नोव्हेंबरला घेणार मंत्रालयवर त्यांचा मोर्चा पोहोचेन.

  • 28 Nov 2023 08:45 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत.  पुण्यातील सुतारवाडीत राज ठाकरे करणार मनसे कार्यालयाचं ते उद्घाटन करणार आहेत.  सकाळी ११ वाजता हे उद्घाटन होणार आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी पुण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. शिवाय संध्याकाळी मनसे नेत्याच्या मुलाच्या लग्नालाही हजेरी लावणार आहेत.

  • 28 Nov 2023 08:30 AM (IST)

    छगन भुजबळ आज पुणे दौऱ्यावर

    मंत्री छगन भुजबळ आज पुणे दौऱ्यावर आहेत. छगन भुजबळांच्या हस्ते होणार समता पुरस्काराचं वितरण होणार आहे.  महात्मा फुले स्मारकात पुरस्कार वितरण होणार आहे. भुजबळांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त आहे.  10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.  कालच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर सर्किट हाऊस परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. भुजबळ समर्थक सर्किट हाऊस बाहेर जमायला सुरुवात झाली आहे.

  • 28 Nov 2023 08:15 AM (IST)

    अवकाळी पावसाने पुणे जिल्ह्यात 19 हजार शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान

    पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने 19 हजार शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहेत.  दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील 11 हजार 227 हेक्टर क्षेत्रावर 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालंय.  जिल्ह्यातील 13 तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली.  यात भात, बटाटा, ज्वारी, कांदा, मका, भाजीपाला, द्राक्ष यांचं मोठं नुकसान आहे.  सर्वाधिक 4817 हेक्टर नुकसान शिरूर तालुक्यात झालंय.  तहसील पातळींवर पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.

  • 28 Nov 2023 07:59 AM (IST)

    Marathi News | नागूपरमध्ये रिमझिम पाऊस सुरु

    नागपूरसह परिसरात ढगाळ हवामान आहे. मंगळवारी सकाळी रिमझिम पाऊस सुरु झाला आहे. अवकाळी पावसामुळे नागपूरातील तापमानात ५ ते ६ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. पावसाळी वातावरणामुळे गारठा वाढला आहे.

  • 28 Nov 2023 07:45 AM (IST)

    Marathi News | गोंदियात गंगा महाआरती सोहळ्याचे आयोजन

    गोंदिया येथे गंगा महाआरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 5000 दिव्यांची आरस दाखवून महाआरती करण्यात आली. 450 महिलांनी महाआरतीमध्ये सहभाग घेतला. गेल्या दोन वर्षापासून गोंदियात माहआरती सोहळ्याचे आयोजन केले जात आहे.

  • 28 Nov 2023 07:31 AM (IST)

    Marathi News | ऊस दरासाठी स्वाभिमानी पुन्हा आक्रमक

    ऊस दरासाठी स्वाभिमानी पुन्हा आक्रमक झाली आहे. आजपासून ऊस वाहतूक रोखली जाणार आहे. तसेच एक डिसेंबर रोजी राजारामबापू कारखान्यासमोर आंदोलन करणार आहे.

  • 28 Nov 2023 07:15 AM (IST)

    Marathi News | मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या घडामोडी

    मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या घडामोडी मंगळवारी दिल्लीत होणार आहे. आज छत्रपती संभाजीराजे घेणार केंद्रीय मागासवर्ग आयोगाची नवी दिल्लीत भेट घेणार आहे.