मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथ्या दिवशीही आहे. मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा न निघाल्याने जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवलं आहे. इस्रायल आणि हमास यांचे युद्ध सुरु आहे. इस्त्रायलने गाजावर रात्री बॉम्ब हल्ले केले. रोहित पवार यांनी सुरु केलेली युवा संघर्ष यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल राज्य शासनाला दिला आहे. कल्याण लोकसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा अचानक दौरा केला. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. सह राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
कोल्हापूर : अचानक कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी करता मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला.
ठाणे : मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात मराठा समाजाने कॅन्डल मार्च काढला. ठाणे पूर्वेतील कोपरी भागात हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सहा वाजेपर्यंत अपेक्षित होती. मात्र, राज्य सरकारकडून कोणतीही उत्तर न आल्यामुळे हा कॅन्डल मार्च काढण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलकांनी जयभवानी नगर परिसरातून मंत्री अतुल सावे यांना पिटाळून लावले. एका कार्यक्रमासाठी मंत्री अतुल सावे आले होते. त्यांना पाहून मराठा आंदोलक आक्रमक झाले. घोषणाबाजी करून या तरुणांनी अतुल सावे यांना पिटाळले. त्यामुळे मंत्री अतुल सावे यांना मोटारसायकलवर बसून पळ काढावा लागला
कल्याण | कल्याण पश्चिमेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आहेत. कल्याण टिळक चौक परिसरात सुरू असलेल्या कार्यक्रमावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत काही जण काळे झेंडे घेऊन दाखल झाले. काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विरार : वसई-विरारच्या पाण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी MMRDA अधिकाऱ्याला फोन केल्याची माहिती समोर आली आहे. 8 दिवसात सूर्या धरणाचे पाणी सुरू नाही झाले तर मला तिथे जावं लागले असा, इशारा राज ठाकरेंनी दिलाय. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रावरी पाण्यासाठी वसई विरार महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. 8 दिवसात जर पाणी नाही आले तर वसई विरारकरांसाठी मी स्वत:च्या अंगावर केस घ्यायला तयार आहे, असा इशाराच शर्मिला ठाकरे यांनी प्रशासनासह सरकारला दिला होता. पत्नीच्या दशाऱ्या नंतर स्वत: राज ठाकरे यांनी आज MMRDA अधिकारी यांना फोन केल्याने लवकरच वसई-विरारकरांना पाणी मिळेल, असा आशावाद निर्माण झालाय.
लासलगाव (नाशिक) : कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. कांद्याचे बाजार भाव वाढताच अघोषित निर्यात बंदी सुरु झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. कारण कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकाराच्या वाणिज्य मंत्रालयाने निर्यातीवरील मूल्य वाढवले आहे. कांदा निर्यात मूल्य प्रति मेट्रिक टन 800 डॉलर वर गेलं आहे. हे दर 31 डिसेंबर पर्यंत राहणार आहेत. त्यामुळे कांद्याचे बाजार भाव घसरणाची शक्यता आहे.
जळगाव | “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव आमचे पंतप्रधान असताना आजच्यापेक्षा सुद्धा खूप जास्त होते. मात्र सध्या कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. मित्रोंच्या माध्यमातून सर्व देश विकायचा प्रयत्न या भाजप सरकारचा सुरू आहे. 20हजार कोटी रुपये अदानीच्या खात्यात आले कुठून?”, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे, असा आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला.
भाजपाची कृती शेतकरी संपवण्याची
छत्तीसगड: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, “दोन प्रकारची सरकारे आहेत, एक सरकार जे गरीब, शेतकरी, बेरोजगार तरुणांच्या मदतीसाठी आपली शक्ती पणाला लावते. दुसरे सरकार जे अब्जाधीश, अदानी सारख्या लोकांना मदत करण्यात कुठलीही कसर सोडत नाहीत. पंतप्रधान येतात आणि मोठमोठी आश्वासने देतात. सगळ्यांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे बोलले होते. एकही आश्वासन पूर्ण केले नाही.
काँग्रेस कधीच काही सकारात्मक पाहत नाही. हे भाऊ-बहीण (राहुल-प्रियांका) देशभर फिरत राहतात आणि काय झाले ते विचारत राहतात, बरं त्यांना समजणार नाही कारण त्यांची मुळं भारतातील नाहीत तर इटलीतील आहेत.
दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय 30 ऑक्टोबर रोजी निकाल देणार आहे. सिसोदिया सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत.
लोकं सातत्याने कंटेंट शेअर करत असतात. सोशल मीडियावर तुम्हाला सातत्याने कंटेंट द्यावा लागतो. खरं तर हा व्हिडीओ शेअर करण्याची आवश्यकता नव्हती. पण जे लोकं हे सांभाळतात त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. त्यांना याचं गांभीर्य लक्षात आलं नाही. त्यानंतर बरीच चर्चा रंगली. पण कोणाला जरा सत्तेत यायचं असेल तर तो हा व्हिडीओ शेअर करून येईल का? म्हणून मी बौद्धिक दिवळखोरी म्हंटलं..
मराठा आरक्षणाप्रश्न राज्यात गेल्या तीन दिवसांत 6 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. पण नेते याप्रकरणात काहीच बोलत नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाच्या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात गेल्या ३ दिवसांत ६ तरुणांनी आत्महत्या करूनही नेते त्याकडं केवळ मूकपणे पाहणार आहेत का?
केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे भाजपची सत्ता असल्याने दोन्ही सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाच्या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणावी.…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 28, 2023
मुंबईत रस्ते तयार करताना महाघोटाळा गेल्यावर्षी जनतेसमोर आणला. त्यामुळे मुंबई महापालिकेचे किमान एक हजार रुपये वाचले. अन्यथा खोके सरकारने हा पैसा कंत्राटदाराच्या घशात घातला असता, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या कामासाठी आगाऊ मोबदला द्यायचा आणि नंतर कामाचा खर्च वाढवायचा असा राज्य सरकारचा डाव मोडल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मिंधे-भाजप राजवटीतील @mybmc चा रस्ते महा घोटाळा गेल्या वर्षी जनतेसमोर आणून आम्ही पालिकेचे किमान एक हजार कोटी रुपये वाचवले. अन्यथा हे पैसे खोके सरकारने कंत्राटदाराच्या घशात घातले असते.
या कामांसाठी आगाऊ मोबदला द्यायचा आणि कामाचा खर्च वाढवण्याचा त्यांचा डाव आम्ही मोडून काढला.
हा… pic.twitter.com/gMYwsQe5jQ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 28, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच आगामी निवडणुका होतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मी पुन्हा येईन हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर तो काढण्यात आला. त्यानंतर राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु झाल्या. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर त्यावर पडदा पडला आहे.
डॉक्टरांकडून उपचार घेण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या हातून जरांगे पाटील हे केवळ पाणी प्यायले आहे. सरकारचं ऐकून मराठा समाजाविरोधात कोणी जाऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडण्याचा प्रयत्न केला.
अण्णा हजारे यांचे आंदोलन असेल किंवा इतर वेळी भाजप हा गिरीश महाजन यांचा संकट मोचक म्हणून उपयोग करायचा. पण आता याच संकटमोचक महाजनांची परिस्थिती गंभीर आहे, असा चिमटा काढत नाना पटोले यांनी टोला लगावला.
गिरीश महाजन यांचं कुणीच ऐकायला तयार नाही, उलट आंदोलन तीव्र होत आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथं सराफा व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा टाकून सोनं आणि पिस्तूल पळवणाऱ्या तिघांना तीन वर्षानंतर अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींकडून 18 लाख रुपयांचे सोनं आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आली.
मराठवाड्यातील शिवसेना आमदार सोमवारी यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात ही भेट होणार असल्याचे समजते.
आमचं महायुती सरकारच मराठा आरक्षण देणार आहे पण त्यासाठी आंदोलकांनीही संवादाची भूमिका ठेवली पाहिजे… आम्ही आंदोलकांचा उद्रेक समजू शकतो पण जरांगे पाटलांनी शासनाशी डायलॉग सुरू ठेवायला हवा, असं उदय सामंत म्हणाले. विरोधकांना या विषयावर फक्त राजकारणच करायचं आहे अशी टीकाही त्यांनी केली.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांचं गुहागर विधानसभा मतदार संघात जंगी स्वागत करण्यात आलं. भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात चित्रा वाघ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. या मेळाव्यासाठी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणाचा विषय येत्या 1-2 दिवसात सुटेल अशी मला आशा आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, केंद्रातले नेते उपोषण आणि स्तिथीवर बारीक लक्ष ठेवून आहेत यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे, असं आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित यांची गाडी फोडली. पंडित हे मोही माता यात्रेसाठी गेले होते मादळमोही येथे त्यांची संतप्त मराठा तरुणांनी गाडी फोडली. गाडी फोडल्यानंतर काही काळ तणावाचं वातावण झालं होतं.
तुम्ही ज्यांना विठ्ठल म्हणत होता त्याला तुम्ही डिक्टेटर म्हणता. विकासासाठी गेला पण ही विचारांची लढाई, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता अजीत पवारांवर टीका केलीये.
हत्ती उसकावण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर हत्तीने केलेल्या प्रतिहल्ल्यात वन कर्मचारी प्रकाश पाटील जागीच ठार झाला आहे. आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे ही घटना घडली आहे. गेले आठ दिवस घाटकरवाडी परिसरात घातला आहे हत्तीने धुमाकूळ घातला होता.
मराठा आरक्षणासाठी कोणीच आत्महत्त्या करू नये. मराठ्यानी लढून हे आरक्षण मिळवाचे आहे. मराठा आरक्षणाचा लढा हा शांततेतच लढायचा आहे असं जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजा प्रमाणेच धनगर आणि मुस्लिम समाजालाही आरक्षणाची गरज आहे मात्र सरकारणे गोडगोड बोलून या समाजालाही आरक्षणापासून दूर ठेवलं आहे. धनगर आणि मराठा समाज एकत्र आल्यास दोघांनाही न्याय मिळू शकतो.
मराठा आंदोलन हे दिवसंदिवस तिव्र होत जाणार आहे. या आंदोलनाचा गांभिर्यानं घ्या अन्यथा पुढे जावून तुम्हाला हे आंदोलन खुप महागात पडणार आहे. असा इशारा मनोज जरांगो पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सरकारला विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर येण्यासाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा वेळ मागितला आहे. सरकार जनतेशी किती प्रामाणिक आहे हे आज दिसून येणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा तीसरा दिवस आहे. त्यांनी आंदोलनाची पुढची दिशा ठरविली आहे. 31 ऑक्टोबरपासून आंदोलन तिव्र करण्यात येणार आहे. यामध्ये ठिकठीकाणी हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक आमरण उपोषणाला बसणार आहेत.
राज्यातील सरकार कायदेशीर काम करीत आहे. संजय राऊत यांनी वकीलांकडे ट्यूशन लावावी. येत्या निवडणूका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील असे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
“अजित पवार काही समाजापेक्षा मोठे नाहीत. समाज मोठा आहे आणि अजित पवार यांना दुःख झालं का? त्यांनी कार्यक्रम रद्द केला तर काय झालं? मराठा पोरं जीव देत आहेत. समाजाच्या काळजावर जखमा झाल्या आहेत,” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्यात जाणं टाळलं, त्यावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मंत्री दीपक केसरकरांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
“आमरण उपोषणाला मोठ्या संख्येने मराठा समाज बसणार आणि हे देशातील मोठे आंदोलन असणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन 31 ऑक्टोबरला ठरणार आहे. उपोषणामुळे पोटात त्रास होत आहे. परंतु माझ्या समाजाच्या पोरांनाही त्रास होत आहे. आज सहा वाजेपर्यंत सरकारकडून उत्तराची वाट पाहीन. माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन सरकारने प्रामाणिकपणा दाखवावा. मला अजूनही सरकाच्या वतीने फोन किंवा निरोप नाही,” असं जरांगे पाटलांनी सांगितलं.
अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्यात जाणं टाळलं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या विरोधामुळे अजित पवारांनी जाणं टाळलं. अजित पवार गळीत हंगामा शुभारंभाला जाणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे.
“कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने आपल्या गावात यायचं नाही आणि आपणही कोणा नेत्याच्या दारात जायचं नाही. आमरण उपोषणात कोणाच्या जीविताला धोका झाला तर त्याला राज्यसरकार जबाबदार सरकार राहील,” असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.
साखळी उपोषण सुरू आहे त्याठिकाणी आमरण उपोषण सुरू करा. संपूर्ण गावांनी उपोषणात सहभागी व्हावं. कोणत्याही मराठा नेत्यांना गावात येऊ देऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा संघटनांना केलं आहे. कुणीही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशीही विनंती त्यांनी केली.
धनगर समाजाने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. यशवंत सेनेचे पदाधिकारी अंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीला गेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला आहे.
मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील बोहाळी गावात कॅण्डल मार्च काढत राजकीय नेत्यांना गाव बंदी केली आहे. आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचे आणि राजकीय नेत्याला गावात येऊ न देण्याची गावकऱ्यांनी शपथ घेतली आहे. बोहाळी गावात कॅण्डल मार्च काढून सरकारचा निषेध करण्यात आला. बोहाळी गावातील सर्व मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आहे.
नवीन कांदा बाजारात आला नसल्याने कांद्याचे भाव वाढले. किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलोने विक्री होत आहे. जर नवीन कांदा लवकर बाजारात आला नाही तर कांद्याचे भाव आणखी वाढू शकतात. पुण्यातील मंडईत कांदा चढ्या दराने विक्री होतेय.
जर एकनाथ शिंदे अपात्र झाले आणि दुसर कोणी भाजपचा मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. भाजप बहुजनांचा उपयोग करून घेतो आणि नंतर त्यांना फेकून देतो हे सरकार अवैध मार्गाने आले आहे, असं म्हणत भाजपने केलेल्या भाजपच्या कालच्या ट्विटवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समाजामध्ये समाजामध्ये भांडण लावण्याचे काम भाजपच्या वतीने केलं जात आहे, असा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं. त्यानंतर जालना जिल्ह्यात 309 गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 120 गावात साखळी उपोषण सुरु आहे. तर 119 गावात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला.
सोशल मीडियावर अश्लील पोस्ट लाईक करणं, अपराध नाही, असा निर्णय अलाहाबाद हायकोर्टाने दिला आहे. या निर्णयाने मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरच्या एका गुन्ह्यासंदर्भात अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय दिलाय. अश्लील पोस्ट लाईक करणे अपराध नाही मात्र शेअर करणे किंवा पुन्हा पोस्ट करणे हा मात्र अपराध आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाची सोशल मीडियातही चर्चा आहे.
पश्चिम रेल्वे 5 ते 8 मिनिटे उशिराने धावत आहे. परंतु नेहमीप्रमाणे रेल्वे गाड्या धावत असल्याची माहिती मिळत आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाकडून साखळी उपोषण केलं जात आहे. मराठा समाजाचे आजपासून राज्यभर साखळी उपोषण… जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यभर साखळी उपोषण
अजित पवार माळेगाव साखर कारखान्यात जाणार की नाही अशी चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमाचं अजित पवार यांना निमंत्रण आहे. पण अजित पवार यांच्या हस्ते मोळीपूजन करण्यासाठी मराठा आंदोलकांचा विरोध आहे.
नाशकात कांद्याने उच्चांकी गाठली आहे. आवक घटल्याने कांदा भावात तेजी पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात कांद्याची 50 रु ते 70 किलोने विक्री होत आहे. साठवणुकीतील कांदा सडल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली. आणखी काही दिवस भाव असेच तेजीत राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून माहुल येथील इंधन निर्मिती करणाऱ्या उद्योगांना पर्यावरण नियमांचे उलंघन केल्याप्रकरणी 27 ऑक्टोबर रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मर्यादित, मे. टाटा पॉवर कंपनी, एजिस लॉजिस्टिक्स व सिलॉर्ड कंटेनर्स या आस्थापनांचा समावेश आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन म्हणून 350 गडकिल्ल्यावर तिरंगा आणि भगवा फडकवला जाणार. 26 जानेवारीला प्रत्येक गडकिल्ल्यावर राबवणार मोहीम. गिर्यारोहण महासंघाने केली घोषणा.
नाशिक पोलिसांकडून सोलापूरमधला एमडी ड्रग्स कारखाना उद्धवस्त. सोलापूरमध्ये एमडी ड्रग्सचा कारखाना सुरू असल्याची मिळाली होती माहिती. कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्स आणि कच्चा माल पोलिसांनी घेतला ताब्यात. सोलापूरच्या मोहोळ एमआयडीसीमधील कारखान्यावर केली कारवाई. नाशिक पोलिसांच्या तीन पथकांनी सोलापूरमध्ये जाऊन केली कारवाई.
वाशिमच्या कारंजाजवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आग लागली. या आगीत ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडली. ट्रकने समृद्धी महामार्गावरील दुभाजकाला धडक दिली. त्यामुळे ट्रकचे टायर फुटल्याने ट्रकला आग लागली.
मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीला कुणबीचे आणखी पुरावे सापडल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे समितीला आत्तापर्यंत दहा हजार कुणबी पुरावे सापडल्याची माहिती आहे. यापूर्वी समितीकडे पाच हजार कुणबी पुरावे मिळाले होते.
मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला आहे.
कल्याण लोकसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दौरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. साहेब आपण सत्तेत असताना पोलिस आमच्यासोबत दुजाभाव करत आहेत. प्रशासन डावलतय असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
युवकांच्या प्रश्नांसाठी आमदार रोहित पवार यांनी राज्यात सुरू केलेली युवा संघर्ष यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली.