मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज. राज्यभरातून लाठीचार्जचा निषेध. खासदार उदयनराजे भोसले घेणार मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची भेट. पुण्याचा पारा चढला. सप्टेंबरमध्येच तापमानात वाढ झाल्याने पुणेकर त्रस्त. चांद्रयानानंतर आता मिशन सूर्य. आदित्य L-1 आज हओणार लॉन्च. इस्रोच्या मोहिमेकडे जगाचे लक्ष. यासह राज्य, देश आणि विदेशातील माहिती घ्या जाणून.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नुकताच मोठे विधान केले आहे. आमदार गणपत गायकवाड म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी मराठा आरक्षण मिळवून दिले. मात्र, उद्धव ठाकरे याच्या सरकार ते टिकवू शकले नाही
सत्ता गेली की आरक्षणाची मागणी करतात. मोदींच्या देशामध्ये लोकशाही राहिली नाही. हुकूमशाही सुरू झाली आहे. लाखोंचे मोर्चे निघतात त्यावेळी काय होत नाही आणि गावात लाठीचार्ज करणे चुकीचे आहे, असे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले.
बुलढाण्यात उद्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचा आक्रमक दिसत आहे. सरकारच्या निषेधार्थ रविवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजत आंदोलन होणार आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी नुकताच मोठे विधान केले आहे. आमदार राजू पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आहेत. त्यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन हा प्रश्न कसा तडीस नेता येईल, मराठा आरक्षणाचा विषय कसा मार्गी लावता येईल यात लक्ष द्यायला पाहिजे
नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाहीये. मराठा समाजाला संयम राखण्याचे आवाहन हे देखील एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले.
जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यातील झालेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोब आंदोलक जरांगेंसोबत संवाद साधल्याचं त्यांनी सांगितलं.
नोएडातील सेक्टर 24 मधील ईएसआयसी रुग्णालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी असून आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
केंद्रातील मोदी सरकारने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कायदा मंत्रालयाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये एकूण 8 जणांचा समावेश करण्यात येणार आहे.अमित शाह, अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, एनके सिंग, सुभाष कश्यप, हरीश साळवे आणि संजय कोठारी यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, देशाचे नाव इंडिया नाही तर भारत असावे. आपण सर्वजण इंडिया हा शब्द वापरणे बंद करू आणि भारत हा शब्द वापरू. आज जगाला भारताची गरज आहे.
जेट एअरवेजचे संस्थापक आणि चेअरमन नरेश गोयल यांना पीएमएलए कोर्टाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 11 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने 14 दिवसांची कोठडी मागितली होती.
मुंबईहून पोलिसांना फोन आला. त्यानंतर आंदोलकांवर बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. चर्चा होत असताना अचानक लाठीहल्ला झाला. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य समजूतदारपणाचे आहे. पण मोठ्या व्यक्तीने फोन केल्यावर बळाचा वापर झाल्याचे त्यांनी सांगितले.
आरक्षणाच्या आणि त्याला असलेल्या मर्यादेबाबत राष्ट्रवादी पक्ष लोकसभेत आवाज उठवेल, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले. आंदोलकांनी शांतेत त्यांचे आंदोलन सुरु ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
जालन्यात घडलेला प्रकार अतिशय गंभीर असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. जखमी लोकांना भेटलो. अत्यंत अमानुष लाठीमार केला. त्यात लहान मुलं, महिलांचा पण विचार केला नाही, असा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारने याप्रकरणात तातडीने दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
पक्ष वेगवेगळे असले तरी, त्यांनी आरक्षणासंबंधी एकत्र यावे. कोणीही दूजाभाव करु नये. मराठा समाजाला आरक्षण का देण्यात आले नाही, असा सवाल उदयनराजे यांनी केला. निकष कोणते लावले, असा सवाल त्यांनी केला. गायकवाड समितीने अत्यंत सविस्तर अहवाल दिला असताना मराठा आरक्षणा बाबत केवळ राजकारण झाले असा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे हे जालना येथे जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली. ते जखमींची विचारपूस करतील. सराटी गावात ते आंदोलकांची भेट घेतील. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर अनेक नेत्यांनि जालन्याकडे धाव घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही. चर्चा सुरु असताना मोठ्या प्रमाणात पोलीस आणण्यात आले. हवेत गोळीबार करण्यात आला. अंदोलकांवर लाठीमार करण्यात आला असा आरोप शरद पवार यांनी केला. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नाही, असे ते म्हणाले.
लाठीचार्जच्या घटनेची तत्काळ न्यायालयीन चौकशी करा, तसेच लाठीचार्ज करणाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला नाही. यामुळे उपोषण सुरु झाले. शिंदे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
जालना लाठीचार्ज प्रकरणी आज लातूर शहर बंद ठेवण्यात आले आहे. एसटीची बस सेवा बंद ठेवण्यात आली आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले होते.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ ही भूमिका घेतली. मोहोळमधील सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारचा निषेध करत मोर्चाही काढण्यात आला.
भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजपा. शिवसेना भाड्यावर चालत नाही, निष्ठेवर चालते. शिवसेना हिंमतीवर चालते. खालच्या पातळीवर आलात आणि हिंदुत्वाचा टेंभा मिरवता. मला देशाचा नेता व्हायचं नाही, लोकांना जागं करायचंय.
2030 मध्ये चंद्रावर देणार, अशीही घोषणा करु शकतात.
चहाचा कप एक आणि पिणारे अनेक अशी स्थिती. पोलीस तुमच्या घरी, आम्ही तुमच्या घरी ही कोणती पद्धत?
हुकूमशाही आणणारा हुकूमशहा जन्माला येऊच द्यायचा नाही. विशेष अधिवेशनात वटहुकून काढून आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा.
इंडियावर टीका करायला वेळ आहे, पण आंदोलकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. जालन्यात कार्यक्रम घ्यायचा होता, म्हणून आंदोलन मोडून काढलं. उद्धव ठाकरेंची शिंदे, फडणवीस, अजित दादांवर टीका
जालना शहरातील अंबड चौफुली येथे मराठा संघटनाच्या वतीने अंतरवाली सराटी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला. यावेळी हिंसक झालेल्या जमावाकडून खाजगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी यावेळी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ठाकरे गटाच्या कार्यशाळेचे आयोजन.
मराठा समाजाचे आरक्षणासाठी शांततापूर्ण वातावरणात आंदोलन सुरू होतं, मात्र पोलिसांनी हे आंदोलन चिघळवलं. लाठीचार्ज करणाऱ्या दोषी पोलिसांवर या सरकारने कारवाई केली पाहिजे. यासाठी मी उद्या मुख्यमंत्र्यांना बुलढाण्यात भेटून दोषींवर कारवाई संदर्भात मागणी करणार आहे.
मराठा संघटना यांच्या वतीने जळगाव शहरात आंदोलन सुरुंय. आंदोलनकर्त्यांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी सुरु आहेत. आमदार रोहित पवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
धाराशिव शहरात तणावपूर्ण शांतता असून, मराठा तरुण जिल्हाधिकारी कार्यालयात एकवटलेत. तरुणांकडून सरकार विरोधी घोषणाबाजी सुरुंय. स्वतः एसपी अतुल कुलकर्णी यांनी रस्त्यावर उतरत घटनास्थळाची पाहणी केली. गोंधळ घालणाऱ्या आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात सरपंचांनी स्वतःचीच गाडी पेटवली. फुलंब्रीचा सरपंच मंगेश साबळे यांनी हा प्रकार केला. भर रस्त्यात गाडी आडवी लावत पेट्रोल टाकून गाडी त्यांनी पेटवून दिली. आंतरवाली गावात झालेल्या लाठीचार्जच्या निषेध म्हणून त्यांनी हे टोकाचे पाऊल उललले.
जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्यात आला आहे.
तर लातूरमध्येही मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे.
जालन्यातील मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ ज्ञात तर ३५० अज्ञात आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जालना येथे जाणार आहेत. तेथे ते जखमी आंदोलकांची भेट घेऊन विचारपूस करणार आहेत.
राज्यात वीजेची मागणी वाढली असून वीजपुरवठ्याचा तुटवडा जाणवत असल्याने महाराष्ट्रासमोर सध्या लोडशेडिंगच संकट उभ राहिलं आहे.
जालना येथील घटनेनंतर एसटी बसेस वर झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनानंतर खबरदारी म्हणून सोलापुरातून मराठवाड्याकडे जाणारी एसटी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या सोलापूर विभागातील मराठवाड्याकडे जाणाऱ्या 54 फेऱ्या सकाळपासून रद्द करण्यात आल्या आहेत.
मराठा समाजाचे आंदोलन शांततेत सुरु होते. परंतु दगडफेक कोणी केली? हा प्रश्न भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी समिती नियुक्ती केली आहे. त्यातून सत्य बाहेर येणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
पुणे, सोलापूर महामार्गावर सहजपूर फाटा भागात रात्री तीन जड वाहनांना अचानक आग लागली. या घटनेमुळे पुणे, सोलापूर महामार्गावर आगीचे तांडव पाहायला मिळाले. आग लागण्याचे कारण समजले नाही. महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत सुरु झाली आहे.
संभाजीराजे जालना येथील जखमी आंदोलनाच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झाले आहे. पोलिसांच्या लाठीमारीत जखमी झालेल्या आंदोलकांची त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ पुणे शहरात आज मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
छत्रपती संभाजीनगरहून जालना येथे जाताना शरद पवार यांना मोठी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. शरद पवार यांच्या गाडीची बीडीडीएस पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.
शरद पवार जालना येथे जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेणार आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे जाऊन जखमींची विचारपूस करणार आहे. सराटी गावालाही शरद पवार भेट देणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे साठ मोर्चे निघाले. त्यावेळी कुठेही सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले नाही. कुठेही गालबोट लागले नाही. मात्र शुक्रवारी या प्रकरणास गालबोट लागले. मराठा समाजास संयमी आहे. मराठा समाजाने नेहमीच्या राज्याला प्रगतीकडे नेले आहे. यामुळे या घटनेची चौकशी केली पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
जाणीवपूर्वक लाठीचार्ज करून महाराष्ट्रात तणावाचं वातावरण, इंडिया आघाडीवरून लक्ष हटवण्यासाठी सरकारचा हा सुनियोजित कट असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा इतकं हे प्रकरण गंभीर असल्याचं संजय राऊत म्हणाले.
ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारली होती, याचा परिणाम थेट पिकांणा पाणी मिळालं नाही. त्यामुळे शेतकरी वर्गही चिंतेत होता. अशातच पुण्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली अन् पुणेकरांची तारांबळ उडालेली दिसली.
मराठा समाजाचे सर्व मोर्चे शांततेत, लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले, असा सवाल अनिल देशमुख यांनी केला आहे.
जालनामधील सराटा गावामध्ये पोलिसांनी लाठीचार केला होता. हे प्रकरण तापलं असून आंदोलकांच्या भेटीसाटी छत्रपती संभाजीराजे गेले आहेत.
सरकारनं आरक्षणाबाबत कुठल्याही हालचाली केल्या नाहीत. शांततेत आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज झाला, सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
मुंबईत आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. खूप दिवसानंतप मुंबईत पाऊस सुरु झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
लातूर जिल्ह्यातली एसटी बस सेवा आज बंद ठेवण्यात येणार आहे. पाच एसटी डेपोतून होणा-या 522 बसेसच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. लातूर बंदच्या आवाहनानंतर एसटी विभागाने हा निर्णय घेतला आहे. जालना लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ आज लातूर बंदचे मराठा क्रांती मोर्चाकडून आवाहन करण्यात आले आहे.
वातावरण सध्या गावात शांत आहे, दोषी लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आज अनेक राजकीय मंडळी त्या गावात भेट देणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि कर्जत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली आहे.
शरद पवार आज दुपारी घेणार पत्रकार परिषद घेणार आहेत. जालना लाठीचार्ज प्रकरणानंतर शरद पवार आंदोलन स्थळी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
लाठी चार्ज प्रकरणी जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संपूर्ण प्रकरणानंतर जालना पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जालना पोलिसांनी गोंदी पोलीस ठाण्यात 200 हून अधिक अज्ञातांविरुद्ध भादंवि कलम 323, 353, 332, 147 आणि 149 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कालच्या घटनेत एकूण ४५ पोलीस जखमी झाले असून त्यात १७ महिला पोलिस आहेत. त्याचवेळी मराठा आरक्षण आंदोलनात किती लोक जखमी झाले याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.
परभणी जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना अग्रीमसाठी डावलण्यात येत असल्याने 10 सप्टेंबर रोजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील घरावर परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांची पायी दिंडी काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटने दिला आहे.
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे सकाळी 9 वाजता आंदोलन स्थळी भेट देणार आहेत. संभाजीराजे आज सकाळी 9 वाजता जालना जिल्ह्यातील सराटी गावात जाणार असून आंदोलकांना जाऊन भेटणार आहेत. यावेळी ते आंदोलकांची विचारपूस करतील.
जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला आहे. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे अडीच वाजताच या आंदोलकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
जालना येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठी चार्ज प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले आज मराठा कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. उदयनराजे पुणे येथून सकाळी जालन्याकडे रवाना होणार आहेत. उदयनराजे भोसले यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून जबाबदार व्यक्तींवर कारवाईची केली आहे.
जालन्यात आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा समाजाने आज राज्यात अनेक भागात बंदची हाक दिली आहे. नंदूरबार, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी आणि लातूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेचे राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इस्रोने चंद्रावरील मोहीम यशस्वी केल्यानंतर आता सूर्यावर स्वारी करण्याची तयारी सुरू केली आहे. इस्रोचं आदित्य L1 यान आज सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. श्रीहरीकोटा येथून हे यान लॉन्च केलं जाणार आहे.