मुंबई : संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. बुधवारी विधानसभेत या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. संभाजी भिडे यांना अटक करावी, अशी विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसची मागणी आहे. काल सोलापूरात जमलेल्या धारकऱ्यांवर लाठीचार्जही करण्यात आला. कालचा दिवस कला क्षेत्र, बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टीसाठी धक्कादायक होता.
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपलं जीवन संपवलं. कर्जतमध्ये त्यांनी उभारलेल्या एन.डी.स्टुडिओमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्जाचा डोंगर डोक्यावर असल्याने ते आर्थिक विंवचनेत होते. त्यातून त्यांनी हे टोकाच पाऊल उचललं.
राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला घेतला आहे. शासकीय रुग्णालयात मोफत मिळणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि कामगार वर्गाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातून वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि तडाखेबंद फलंदाज तिलक वर्मा या दोघांनी पदार्पण केलंय. विंडिजने या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय.
मुंबई | हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. वाढत्या अपघाताचं प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार आहे. विधानसभा कामकाजादरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली.
राज्य सरकारचा मोठा निर्णय
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याचे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) @dadajibhuse यांनी सांगितले.#विधानसभाकामकाज pic.twitter.com/QvAdbFUOoI
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 3, 2023
मुंबई :
राज्याचे हिवाळी अधिवेशन तीन आठवडे होण्याची शक्यता आहे. 7 डिसेंबर ते 22 डिसेंबर या दरम्यान हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अधिवेशन तीन आठवडे करण्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई |
मुंबईतील मागाठाणे विधानसभा क्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय जाहीर केलाय. झोपडपट्टी पुनर्विकासाच्या बाबतीत ऐतिहासिक निर्णय घेतला. महाकाली येथील झोपडपट्टी पुनर्विकास एमएमआरडीए करणार आणि देवीपाडा येथील प्रक्लपबाधिताना दोन वर्षाचं आगाऊ भाडं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील इतर रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. दहशतवाद्यांकडून सुधीर मुनगंटीवार तसेच इतर नेत्यांनादेखील धमकीचे फोन येत आहेत. तसेच आपल्यासोबत घातपात घडवण्याचा मोठा कट देखील आखण्यात आला होता, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. आपल्या वाहनाचे नोट बोल्ट लूज केल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे शहरातील पंप चालकांनी 10 ऑगस्टपासून टोरेंट सीएनजी पंपांवर CNGची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील विक्रेत्यांना ट्रेड मार्जिनची मोठी थकबाकी आहे. ही थकबाकी सुमारे ७ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. यामुळे पंपचालकांनी सीएनजी विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील पेट्रोल डीलर्स अससोसिएशन तेल कंपन्या आणि टोरेंट गॅस यांना अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा थकबाकी मिळाली नाही. यामुळे बंदचे हत्यार असोसिएशनने बाहेर काढले आहे.
जगातील अब्जाधीश एलॉन मस्क याची टेस्ला कंपनी भारतात येण्यासाठी उत्सूक आहे. या कंपनीच्या भारतीय कंपनीने पुण्यात नवीन ऑफिस भाड्याने घेतले आहे. पंचशील बिझनेस पार्कमधील बी विंगच्या पहिल्या मजल्यावर हे कार्यालय आहे. टेस्लाने 60 महिन्यांसाठी हा करार केला आहे. 11.65 लाख रुपये मासिक भाडे असेल आणि अनामत रक्कम 34.95 लाख रुपये द्यावी लागेल. दरवर्षी किरायात 5 टक्के दरवाढीला सहमती देण्यात आली आहे.
ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या अमानवीय कृत्यामुळे खळबळ उडाली आहे.
काश्मिरी हिंदुंवर भाजपा अन्याय करत आहे, असा आरोप हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी केला. भाजपकडून सतत काश्मिरी पंडितांना फसवलं जातंय. 370 हटवल्यापासून एकही हिंदू काश्मीरमध्ये राहायला जाऊ शकला नाही. 370 काढून डोमिसाईल लॉ का आणला, असा सवालही दवे यांनी केला आहे.
महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी यांची मदत घेऊन बडोदावाला पुण्यातील दिवे घाटात बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण देत होता. झुल्फिकार हा दहशतवादी प्रकरणातील पाचवा आरोपी असून, त्याला 11 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.
सत्ताधाऱ्यांकडे २०० संख्याबळ असताना विरोधी पक्षनेतेपदी माझी निवड झाली आहे. परंतु संख्याबळावर विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करु नका. मी खुर्चीवर असेपर्यंत प्रामाणिक राहील, असे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते विजय वडट्टेवार यांनी विधानसभेत सांगितले.
इंदापुरातील म्हसोबावाडी येथील विहिरीच्या मातीत दाबले गेलेले चार कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत. सुमारे 40 तासांपासून चार कामगार मातीखाली दाबले गेले आहेत. त्यांना काढण्यात अजूनही यश आले नाही. दुर्घटनास्थळी मृतांचे नातेवाईक आणि पोलिसांत काहीकाळ तणाव निर्माण झाला आहे.
पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी मेट्रो सेवेचा वापर करता यावा, यासाठी पीएमपीएमएलकडून दोन मार्गावर फिडर सर्विस सुरू केली आहे. पुणे मेट्रोच्या या दोन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
विरोधी पक्षनेतेपद मिळणे ही एक संधी आहे. या पदावर विजय वडेट्टीवार चांगले काम करतील, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच विजय वडेट्टीवार यांच्या अनुभवाचा सभागृहास फायदा होणार असल्याचे सांगितले.
नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून कसून होत आहे. त्यांच्या एनडी स्टुडिओतील सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यासाठी पोलिसांनी कॅमेरा टीमला बोलावलं आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस पुढील तपास करणार आहेत. ज्याठिकाणी देसाई यांनी आत्महत्या केली, तिथलाही सीसीटीव्ही तपासला जाणार आहे.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड झाली आहे. सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर अजित पवार बसल्यावर राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं होतं. मात्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर स्पष्टीकरण देताना निरर्थक चर्चा करू नका असं म्हणत या चर्चांणा पूर्णविराम दिला आहे.
नितीन देसाई यांच्या निधनानंतरही आज (गुरूवार) काही पर्यटक एनडी स्टुडिओ पाहण्यासाठी आले आहेत. शिर्डी, अहमदनगर इथून हे पर्यटक स्टुडिओ पाहण्यासाठी आले. नितीन देसाई यांच्या निधनाची माहिती नसल्याचं या पर्यटकांचं म्हणणं आहे. तर पुढील 15 दिवस एनडी स्टुडिओ पर्यटकांसाठी बंद असल्याची माहिती एनडी स्टुडिओच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
नितीन देसाई यांच्या स्टुडिओचे कशा पद्धतीने संवर्धन करण्यासंदर्भात किंवा शासन ताब्यात घेऊ शकेल का? याबाबत कायदेशीरबाबी तपासण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नितीन देसाई यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जयपूर मुंबई एक्सप्रेस ट्रेनमधील घटनेचे काही सस्पेन्स अजूनही कायम आहे. रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 5 वाजून 5.25 मिनिटांनी ट्रेनमध्ये नेमकं काय झालं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंगने तिन्ही प्रवाशांची हत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन सिंग तपासात सहकार्य करत नाहीये. जयपूर-मुंबई एक्स्प्रेस दुर्घटनेच्या चौकशीसाठी, रेल्वेने उच्चस्तरीय एसआयटी टीम तयार केली आहे. जी या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 20 जणांचे जबाब घेतले आहेत. तसंच आरोपी चेतन सिंगच्या कुटुंबीयांचीही त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली जाणार आहे.
मालेगावात अपर जिल्हाधिकारी कार्यालय समोर वडनेर खाखुर्डी रामनगरमधील नागरिकांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. या आंदोलनात लहान मुलांचा देखील समावेश आहे. चार दिवसापासून मुक्काम आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने मालेगावकरांचं लक्ष वेधलं आहे.
इंदापूरधल्या म्हसोबाचीवाडी दुर्घटनेतील कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत. मंगळवारी रात्री विहिरीची रिंग कोसळून अपघात झालाय. अपघातात चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आज पुन्हा एनडीआरएफकडून शोधकार्याला सुरुवात झाली आहे. एनडीआरएफचे जवान विहिरीत जाऊन शोध घेत आहेत. कामगारांच्या शोधासाठी विविध मशिनरीज घटनास्थळी दाखल झाली आहे.
मनोरा आमदार निवास इमारतीचे भूमिपूजन आज झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. त्यांच्यासाठी असलेल्या खुर्चीवर अजित पवार यांना बसण्याची विनंती करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाचे स्टीकर काढल्यानंतर अजित पवार त्या खुर्चीवर बसले.
चिपळूणमध्ये संभाजी भिडे येण्यापूर्वीच पोलीस बंदोबस्तात प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. संभाजी भिडे आज चिपळूणमध्ये कार्यक्रमानिमित्त येणार होते. बीड यांच्या कार्यक्रमाला पोलीस आणि प्रांत यांनी परवानगी नाकारलेली आहे. मात्र खबरदारी म्हणून चिपळूण पोलिसांनी शहरात विविध भागांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर त्यांनी उभारलेल्या एनडी स्टुडिओच्या परिसरातच अंत्यसंस्कार व्हावेत, अशी इच्छा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार आज (गुरुवार) किंवा शुक्रवारी चौक इथं अंत्यविधी केले जातील, अशी माहिती देसाई कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिली, वाचा सविस्तर..
आत्महत्येपूर्वी नितीन देसाई यांनी एका व्हॉइस रेकॉर्डरमध्ये आपलं मनोगत मांडलं होतं. त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे, याचा तपशील समोर येत आहे. नितीन देसाई यांचे 11 ऑडिओ क्लिप्स पोलिसांच्या हाती लागले आहेत. या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी सर्वप्रथम लालबागचा राजाला अखेरचा नमस्कार असं म्हटलं आहे. दरवर्षी ते लालबागचा राजासाठी सुंदर देखावा निर्माण करायचे, वाचा सविस्तर..
प्रसिद्ध कवी, गीतकार ना.धों. महानोर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी कवी ना. धों महानोर यांनी अखेरचा श्वास घेतला.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून वसई विरार क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी ही बरसत आहेत. मात्र सध्या तरी शहरातील कुठल्याही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली नाही.
समृद्धी महामार्गाच्या मुद्यावरुन सुनील केदार, मंत्री दादा भुसे यांच्यात खंडाजंगी झाली. महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या मुद्यावरुन ही खडाजंगी झाली.
समृद्धी महामार्गावर अपघातासंदर्भातील माहिती मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिली. समृद्धी महामार्गावरील चार चाकी गाड्यांचा वेग आता १२० किलोमीटर प्रतीतास असणार आहे. बुलढाणा येथील अपघात डिझेल टँकरने पेट घेतल्यामुळे झाला असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा खून झाला आहे. API सुरज चंदनशिवे असे खून झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी गेल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी पाठीमागून हल्ला करत त्यांचा खून केला आहे.
‘समृद्धी’ महामार्ग हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असेलही, पण तुमचे हे ‘स्वप्न’ निरपराध्यांसाठी ‘काळस्वप्न’ ठरत आहे, त्याचे काय? राज्यकर्त्यांनी स्वप्न बघायचे आणि त्याची किंमत निरपराध्यांनी आपल्या ‘मृत्यू’ने चुकवायची, असेच समृद्धी महामार्गाबाबत सुरू आहे. वाचा सविस्तर….
Asia Cup 2023 Team India | आशिया कपआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. 2 खेळाडू हे आशिया कपला मुकणार आहेत. वाचा सविस्तर….
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा संसार मोडला आहे. ते पत्नी सोफीपासून वेगळे होणार आहे. इन्स्टाग्रामवरुन त्यांनी पत्नीपासून विभक्त होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या लग्नाला 18 वर्ष झाली आहेत.
गौतमी पाटीलच्या नगरच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी घटना घडली आहे. तुम्हाला कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा असेल, तर नक्की या पण हुल्लडबाजी चालणार नाही, असं गौतमी पाटीलने स्पष्टपणे म्हटलय.
हरयाणामध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 166 जणांना अटक झाली आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दंगलखोरांकडून सर्व नुकसानीची किंमत वसुली केली जाईल असं म्हटलं आहे.