मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींच्या किचनचं बजेट कोलमडणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी मध्यप्रदेशाच्या दौऱ्यावर. आज शाजापूरमध्ये जनसभेला संबोधित करणार. महिला आरक्षण विधेयकाचं कायद्यात रुपांतर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर येथील ओबीसी आंदोलकांचं उपोषण सोडणार आहेत. त्यासाठी फडणवीस आज चंद्रपूरला येणार आहेत. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
ठाणे : आम्ही गुवाहाटीला होतो आणि इकडे यांनी कॅबिनेट घेतली. अल्पमतात आलेले सरकार कशी काय कॅबिनेट घेऊ शकतो. अडीच वर्षे काही नाव घेतले नाही आणि कोणी नाव ठेवतील म्हणून कॅबिनेट घेतली. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. आम्ही अधिकृत छत्रपती संभाजीनगर करून घेतलं. उस्मानाबाद धाराशिव करून घेतलं. जे करायचे ते ठोस करायचं टेम्परवारी काम आम्ही करत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. ‘महाराजांनी वाचली गाथा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मराठवाड्याच्या चरणी ठेवतो माथा, आमच्या उठावामध्ये मराठवाड्याची लागली मला साथ, विश्वास ठेवा तुमच्याबरोबर उभा राहील हा एकनाथ; अशा शब्दात त्यांनी मराठवाड्याचे आभार मानले.
मुंबई : आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे परिवार कोणाच्या पैशाने स्वित्झर्लडला जातात याची माहिती काढावी लागेल असा इशारा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलाय. आम्ही कोणाच्या पर्सनलमध्ये जात नाही, पण, आमच्या नेत्याच्या संदर्भात बिनबुडाची विधानं येत असतील तर जावे लागेल. आपण महापालिकेच्या खर्चातून काय करता आणि परदेशात कोणाच्या खर्चाने काय करता हे एक दिवस महाराष्ट्राला सांगावं लागेल अशी टीका त्यांनी केली.
नाशिक : सरकार फक्त घोषणा करत आहे. शेतकऱ्यांना पाडण्याचे काम हे सरकार करत आहे. शेतकऱ्याला मदत वेळेवर मिळत नाही. ज्या कार्यक्रमांची गरज नाही ते कार्यक्रम हे सरकार करत आहे. मोठ्या घोषणा केल्या पण पैसे द्यायला सरकारला वेळ नाही, शेकडो कोटी रुपयांचा चुराडा होत आहे. गतिमान म्हणणारे सरकार प्रत्यक्षात गतिमंद सरकार आहे अशी टीका माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नाशिकमध्ये केली.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्य पेक्षा कार्यामध्ये मग्न राहायला बरे वाटते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे तीनही नेते चांगले काम करत आहे. कार्यमग्न असे हे सरकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा खरा सैनिक कोण असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत. आनंद दिघे यांचे नाव पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री यांनी ठरवले तर ते काम करतात आणि कार्यक्रमास येतात असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
मुंबई : मुस्लिम समाजाच्या जुलूसमध्ये विक्रोळी येथे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची छेड काढण्यात आली होती. छेड काढणाऱ्या आरोपींना अटक करावी अशी मागणी करत हिंदू संघटनेने विक्रोळी पार्क साईड पोलिस स्टेशनला घेरावा घातला होता. DCP पुरुषोत्तम कराड यांनी आंदोलकांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
उद्धव ठाकरे हे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. त्यासाठी आम्हाला आज बोलवण्यात आले. पक्षाचे प्रमुख हे सर्वस्व आहेत हे असे प्रकार लपून छपून होत नाहीत हे सर्व पूर्ण ठिकाणी घोषित होते. आता आम्ही इंडियामध्ये आहोत इंडियामधून जी नाव आहे ती नाव घेऊन उद्धव ठाकरे ते नाव घोषित करतील, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.
कांदिवली पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बसवले होते. तब्बल तासाभरानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना सोडून दिलं. मराठी महिलेला न्याय मिळावा यासाठी मनसे कार्यकर्ते डीसीपींची भेट घेणार होते. मात्र कांदिवली पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बसवले होते.
कल्याण छत्रपती शिवाजी चौक परिसरात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीये. मुलीचा नंबर मागीतल्याचा आरोप करत तीन ते चार जणांच्या टोळीने ही मारहाण केलीये. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीये.
कॅन्टोन्मेंट परिससरात धोबीघाट जवळ मनसेने आंदोलन केले. धोकादायक रस्ता दुभाजक काढण्याची मनसेची मागणी आहे. धोकादायक दुभाजकामुळे गेल्या काही दिवसांपासून परिसरात अपघात होत असल्याचे सांगितले जातंय.
सांगली जिल्ह्यात तासगावमध्ये खासदार आणि आमदार यांच्यात पुन्हा जुंपली आहे. पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील यांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलाय. यावर भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी टीका करत पुत्र प्रेमासाठी ही राजकीय नौटंकी असल्याची टीका केलीये.
आदित्य ठाकरे हास्यास्पद नेते होत आहेत, असे थेट सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. आदित्य ठाकरे गंभीर नेते होण्याऐवजी हास्यास्पद नेते होत आहेत, असे कोणी ट्विट केल्याने कोणाचे दौरे रद्द होत नाहीत. तुम्हाला वाटते मी खूप वजनदार आहे की मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही कारणास्तव दौरे रद्द केले त्यामुळे आपण वाघ मारला असा आव आणण्याचं कारण नाही असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) मुझफ्फराबाद शहरात वाढत्या वीज बिलांवर लोकांनी निदर्शने केली.
#WATCH पाकिस्तान के कब्जे वाले कश्मीर (PoK) के मुजफ्फराबाद शहर में लोगों ने बढ़ते बिजली बिलों को लेकर विरोध प्रदर्शन किया। pic.twitter.com/tmDqQdBwAD
— ANI_HindiNews (@AHindinews) September 30, 2023
मुंबईतील गिरगाव परिसरात एका 14 मजली इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी आग आटोक्यात आणली. 27 जणांना वाचवण्यात यश आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अव्वल मानांकित भारताने शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या सांघिक स्क्वॉश स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा रोमहर्षक लढतीत पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
#WATCH … मेरे पास शब्द नहीं हैं… हम इसलिए ही शायद त्याग करते हैं, मैं 25 साल का हूं और मैं अपनी उम्र के कई लोगों से बिल्कुल अलग जिंदगी जीता हूं … : स्क्वैश पुरुष टीम स्पर्धा में स्वर्ण पदक जीतने के बाद अभय सिंह, हांग्जो, चीन#AsianGames pic.twitter.com/bJWiYbIrOt
— ANI_HindiNews (@AHindinews) September 30, 2023
आरबीआयने 2000 च्या नोटा जमा करण्यासाठी मुदत वाढवली आहे. आता 7 ऑक्टोबरपर्यंत सर्वसामान्यांना 2000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत. यापूर्वी आरबीआयने नोटा जमा करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 निश्चित केली होती.
गौतमी पाटीलचा डान्स शाळेत भरवणाऱ्यांना घरी जावं लागेल, असं शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील जिल्हा परिषद शाळेत गौतमी पाटील हिचा डान्सचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी आणि बदलवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एका आठवड्याची मुदतवाढ दिली. नागरिकांना 7 ऑक्टोबरपर्यंत या नोटा बदलविता येतील. त्यांना या नोटा बँकेत जमा करता येतील अथवा या नोटा बँकेत जाऊन त्या बदलवून घेता येतील.
परदेशातून देशात काही महिन्यांसाठी आणल्या जाणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली नाहीत, असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. ती वाघनखे महाराजांनी वापरली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्य शासनाने वाघनखांविषयीची दिशाभूल थांबवावी असे आवाहन त्यांनी केले.
देशाचा एक्स रे काढणे आवश्यक आहे. आता ती वेळ आली आहे. 90 टक्के अधिकारी देश चालवत आहेत. त्यातील ओबीसींचा वाटा केवळ 5 टक्के आहे, मग देशात ओबीसींची लोकसंख्या केवळ 5 टक्केच आहे का, असा सवाल त्यांनी केला. विशेष अधिवेशनात पण त्यांनी हाच मुद्दा लावून धरला होता. देशाच्या प्रशासनातील मोठ्या पदावर ओबीसींचे प्रमाण नगण्य असल्याने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी असा मुद्दा त्यांनी ऐरणीवर आणला आहे.
#WATCH कांग्रेस सांसद राहुल गांधी ने कहा, “…अब वह समय आ गया है कि हमें हिंदूस्तान का एक्स-रे करना है। यह पता लगाना है कि अगर 90 अफसर देश को चला रहे हैं और उसमें OBC की भागीदारी 5% है तो क्या OBC की आबादी 5% है?… देश में एक ही मुद्दा है जातिगत जनगणना। OBC कितने हैं और उनकी… pic.twitter.com/itR3B9QpAS
— ANI_HindiNews (@AHindinews) September 30, 2023
जालना | मनोज जरांगे पाटील परतूर येथे पोहोचले आहेत. त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे.
जरांगे यांच्या भाषणातील मुद्दे :
आमचे आंदोलन शांततेत सुरू होते
आमच्या महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला
असे आम्ही काय पाप केले काय गुन्हा केला?
त्या जखमी महिला म्हणाल्या काही झाले तरी आरक्षण घ्यायचे
आता संधी आली, 10 पिढ्या बरबाद झाल्या
मराठा समाजाची एकी आणि ताकत वाया जाऊ देणार नाही
मला एकच किडनी असल्याचे सांगण्यात आले. पण तपासणीमध्ये दोन किडन्या आढळून आल्या
माझ्याकडे वंशावळीची नोंद नाही
मला म्हणायचे कोपऱ्यात बोलू पण मी बोललो नाही
त्यांनी शासन आदेश आणले, मी फेटाळले
मातब्बर मंत्री आमच्याकडे आले
एक मंत्री म्हणाला 4 दिवसात आरक्षण देऊ, पण टिकणार नाही
माझ्या शेजारी मंत्री आला की तुम्हाला वाटायचे मी फुटतो काय?
कुठलीही जात आरक्षणमध्ये घालायची तर तो मागास पाहिजे
मराठा समाजाला तुम्ही बधिर समजता का?
सांगली | सांगलीत जखमी मोरास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरून उपचार करण्यासाठी नेले. कर्मचाऱ्यांनी वन विभागाची गाडी तात्काळ उपलब्ध नसल्याने जखमी मोरास कुपवाडमधील वन विभागाच्या कार्यालयात दुचाकीवरून उपचारास नेले. पण दुचाकीवरून जखमी मोरास नेल्याने प्राणीमित्रांकडून संताप व्यक्त केला जातोय.
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यात हॉकफोर्स सोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झालाय. ठार झालेला नक्षली गोंदिया येथील तांडा दरेकसा दलममध्ये सक्रिय होता. त्याच्यावर 3 राज्य मिळून 14 लाखांचे होते बक्षीस होते. मध्यप्रदेशात झालेल्या चकमकीने गोंदियात खळबळ उडाली आहे.
पनवेल : पनवेल येथे मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडलीय. कळंबोली ते पनवेल ट्रॅकवर ही घटना घडलीय. पनवेलकडून वाशीकडे जाणारी मालगाडीला अपघात झालाय. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या घटनेमुळे सध्या पनवेल मार्गावरून जाणारी एक्सप्रेसची वाहतूक ठप्प झालीय. सुदैवाने लोकल वाहतुकीला याचा फटका बसलेला नाही.
राज्याच्या पैशावर सहली करण्याचा डाव सरकारचा होता. या दोन सहली आदित्य ठाकरे यांच्यामुळे रद्द झाल्या. जाती पाती मध्ये भेद निर्माण करून सत्तेत यायचं अस घाणेरडं राजकारण सुरू आहे. मतदारसंघाचा आढावा बैठका मध्ये घेतला जातोय. लोकांच्या समस्या काय आहेत त्या समोर आल्या पाहिजे. भाजप महाराष्ट्रातल्या आमदारांना लोकसभेसाठी उभ करू शकतात ही वेळ केव्हा झाली आहे मध्य प्रदेशातल्या निवडणुकांसाठी ही तयारी केली जाते त्यामध्ये तुम्ही बघताय ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मुंबईतले आमचे नगरसेवक कुठेही जाऊद्यात उद्धव ठाकरे यांनी सांगितले ज्यांना जायचं त्यांनी जा जनता आमच्या सोबत आहे निष्ठावंत शिवसैनिक आमच्या सोबत आहे – खासदार अरविंद सावंत
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव मध्ये कांदा व्यापाऱ्यांची बैठक सुरू. कांदा लिलाव सुरू करायचे का नाही याबाबत बैठकीत चर्चा. नाफेड धोरण आणि कांदा निर्यात दर विरोधात व्यापाऱ्यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचे घेतला निर्णय. मुंबई आणि दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर देखील व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने व्यापारी काय भूमिका घेतात याकडे लक्ष. गेल्या 11 दिवसापासून जिल्ह्यातील कांदा लिलाव आहेत ठप्प.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. बँकेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शांततेत सभा पार पडली. कोणी विनाकारण जर आडवं येत असेल तर आम्ही आहोतच. जर पाणी पाजून कोणी म्हणत असेल की विष पाजता तर विष काय असते ते त्यांना पाजावं लागेल. बच्चू कडू यांचा बँकेतील विरोधकांना इशारा.
सांगलीतील दौऱ्यावर असताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना भावी शिक्षकांनी घेरत घोषणाबाजी केली. यावेळी मंत्री केसरकर याना भावी शिक्षकांनी निवेदन दिले. शिक्षक भरती जलद गतीने करा, समूह शाळा पद्धती बंद करा, कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया करू नये आदी मागण्या केल्या. दरम्यान, शिक्षक भरती गतीने राबविली जाईल आणि कोणत्याही शाळांचे समुहीकरण केले जाणार नाही आणि अशा अफवावर विश्वास ठेऊ नका असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.
आल्बर्ट संग्रहालयाबरोबर महाराष्ट्राचा 3 ऑक्टोबरला तीन वर्षांचा करार, महाराष्ट्रात 16 ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र हा लढवय्या आहे त्यामुळे तो कोणत्याही संकटात कायम लढतो. मनमोहन सिंह यांनी भूकंपानंतर कोट्यवधी रुपयांची रक्कम वर्ल्ड बँकेतून मिळवून दिली. त्यावेळी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव येणार होते पण मी सांगितले तुम्ही अजिबात येऊ नका. नंतर त्यांना मी घेऊन आलो आणि पाहणी केली.. असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
अनुष्का शर्मा – विराट कोहली यांच्या घरी दुसऱ्यांदा हलणार पाळणा? ‘त्या’ एका गोष्टीमुळे चर्चांना उधाण… सध्या सर्वत्र विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा… लवकरच विराट – अनुष्का होणार आई बाबा? वाचा सविस्तर
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द झालेला आहे. घाना देशात राष्ट्रकुल संसदीय परिषदेला राहूल नार्वेकर हजेरी लावणार होते, मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे. दौरा रद्द होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आदित्या ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यांनी पत्रकार परिषदेतून लोकांवर निशाना साधला आहे. घटनाबाह्य सरकार संविधान विरोधी असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. सरकारच्या परदेश दौऱ्यातून काय साध्य होतंय असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जनतेच्या पैशावर सरकारचे विदेश दौरे होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जे आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले ते सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा शरद पवार गटाचे नेते जयंत पवार यांनी केला आहे. जे झालं ते चुकीचं झालं असं प्रत्त्येक आमदार सांगत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून चिन्ह आणि पक्षावर दावा करण्यात आलेला आहे. 6 ऑक्टोबरला राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षावर सुनावणी होणार आहे.
नागपूरात लोकसभा निवडणूकीची आढावा बैठकीला सुरूवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे.
महाराष्ट्रातील भाजपचे सात आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. यासाठी चाचपणी सुरू आहे. सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, राहूल नार्वेकर यांना खासदारकीचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली आहे. गणेश उत्सवादरम्यान एक मार्गीका चाकरमान्यांसाठी खुली करण्यात आली होती.
शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याबद्दल खासदार संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकच शिवसेना आहे. ज्याची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली. जर कोणी असं म्हणत असेल की मी खरी शिवसेना किंवा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आहे, तर हे चालेल का? तुमच्याकडे सत्ता आणि निवडणूक आयोग असेल तर तुम्हाला हवं ते करू शकता का? शिवाजी पार्कातच शिवसेनेचा दसरा मेळावा होईल.”
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी गणपती दर्शनाला का गेले नाही, या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित दादा त्या दिवशी खूप व्यग्र होते. त्यांना कार्यक्रमांना खूप उशीर झाला होता. मुख्यमंत्री यांनी संध्याकाळी साडेसहा वाजताचं निमंत्रण दिलं होतं. परंतु त्यांना उशीर झाला असेल म्हणून ते गेले नसतील. त्यातून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही”, असं ते म्हणाले.
रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्रीवादळ स्थिती निर्माण झाल्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मच्छीमारीवर परिणाम झाला आहे. पुढील 24 तासांत चक्रीवादळाची ही स्थिती आणखी वाढणार आहे. म्हणूनच गोव्यापासून कोकण किनारपट्टीवर आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्याच्या खेड तालुक्यात बेमुदत साखळी उपोषणाची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या धर्तीवर खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण करणार आहे. एक ऑक्टोबरपासून राजगुरू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू होणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातून उपोषणकर्ते सहभागी होणार आहेत. या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील आणि खासदार छत्रपती संभाजी राजे भेट देणार आहेत.
पक्षात जी भूमिका दिली जाते, त्या अनुरूप काम करावं लागतं. तिकीटासाठी जीव टाकणारे लोकं भाजपमध्ये नाहीत. हायकमांडचा जो आदेश असेल त्यानुसार आम्ही काम करू, उद्या त्यांनी राजकारण बंद करायला सांगितलं तर तेही करू अशी भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली.
शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली का ? सत्ता तुमच्या ताब्यात आहे म्हणून वाट्टेल ती मनमानी कराल तर ते चालणार नाही, असे सांगत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. दसरा मेळाव्यावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांनासवाल विचारला आहे.
शिवसेना एक आहे, बाकी चोर आणि लफंगे आहेत, अशी टीकाही राऊतांनी केली.
अजित पवार आणि माझ्यात काहीही मतभेद झाले नाहीत, ओबीसी बैठकीत झालेल्या वादाच्या चर्चेवर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं. आमच्यात अंतर्गत वाद वगैरे काहीही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आश्वस्त केलं. इतर मागण्यांसंदर्भातही राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. सरकारने जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्यात येतील असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले
रवींद्र टोंगे यांनी उपोषण सोडल्यानंतर ओबीसींचे राज्यभरातील आंदोलनही मागे घेण्यात आलं आहे.
आरक्षण देण्यासाठी सरकारची सकारात्मक भूमिका आहे. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठा ओबीसी वाद निर्माण होणार नाही याची सरकारतर्फे काळजी घेण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
शरद पवार लातूरमध्ये दाखल झाले आहे. लातूरमधून शरद पवार किल्लारी या ठिकाणी जाणार आहे. १९९३ साली किल्लारीत भूकंप झाला असताना शरद पवार मुख्यमंत्री होती. त्यावेळी त्यांनी भूकंपग्रस्तासाठी मोठे काम केले होते. यामुळे कृतज्ञता सोहळा या ठिकाणी होत आहे.
मुलुंड टोलनाक्यावर मनसेने आंदोलन सुरु केले आहे. या ठिकाणी टोलच्या दरात वाढ करण्यात येत असल्यामुळे हे आंदोलन सुरु झाले आहे. वाढीव टोल रद्द न केल्यास उपोषणही करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील मुकणे धरण परिसरात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास धरण क्षेत्रात तुफान पाऊस झाला. सुदैवाने परिसरात परिस्थिती नियंत्रणात आहे.
गोदिंया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाचे 4 गेट तर शिरपूर धरणाचे 3 गेट उघडण्यात आले. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे नदीकाठच्या गावाना सतर्कतेच्या इशारा दिला आहे. नदी काठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा इशारा दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. पिंपळगावला दुपारी ३ वाजता ही बैठक होणार आहे. केंद्र सरकार व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेत नसल्याने पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे.
वर्ल्ड कपआधीच्या सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. टीम इंडिया आज इंग्लंड विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना का महत्त्वाच आहे? ते जाणून घ्या. वाचा सविस्तर….
स्विफ्टमधून आले, अन स्कॉर्पियो चोरून गेलेय. नाशिकच्या खुटवड नगर मधील घटना. पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर घडली घटना. घटनेचा सीसीटीव्ही आला समोर. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. चोरांकडून पोलिसांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न.
ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पवित्र्यात. 2 ऑक्टोबरला स्वाभिमानीकडून कारखान्यांच्या दारात ढोल ताशा वाजवून आंदोलन केलं जाणार, दोन तारखेच्या आंदोलनानंतर सायंकाळी राजू शेट्टींची पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेत राजू शेट्टींकडून मोठ्या आंदोलनाची घोषणा होणार. गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये देण्याची शेतकरी संघटनेची मागणी. चारशे रुपये मिळत नाहीत तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्पष्ट भूमिका
देवेंद्र फडणवीस नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते रवींद्र टोंगे, विजय बलकी आणि प्रेमानंद जोगींच उपोषण सोडवणार आहेत. फडणवीस आज चंद्रपुरातील ओबीसी आंदोलकांच उपोषण सोडवणार.
लातूरमधील किल्लारीच्या भूकंपाला आज 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. 30 सप्टेंबर 1993ला हा भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यामुळे शरद पवार आज किल्लारीत जाणार आहेत. यावेळी कृतज्ञता सोहळा पार पडणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत. यावेळी ते शाजापूर येथील विशाल जनसभेला संबोधित करणार आहेत. मध्यप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मध्यप्रदेशात जाणार आहेत.
चंद्रपूर येथे सुरू असलेलं ओबीसी आंदोलकांचं उपोषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोडवणार आहेत. देवेंद्र फडणवीस आज सकाळी 9:30 वाजता चंद्रपुरात येणार आहेत. त्यानंतर ते या आंदोलकांचं उपोषण सोडवणार आहेत. रवींद्र टोंगे यांच्या उपोषणाचा आज 20वा दिवस आहे. तर विजय बलकी आणि प्रेमानंद जोगी यांच्या उपोषणाचा आहे आज 8 वा दिवस आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. वाटाणा, कोबी, फ्लॉवर, भेंडीसह इतर ही भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सततच्या पावसाचा परिणाम देखील भाज्यांवर झाला आहे.बाजारात आवक चांगल्या प्रमाणात होत असली तरी भाज्यांच्या दारात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.