मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचार तोफा थंडावल्या. राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होणार आहे. सोमवारी निकाल येणार आहेत. महाड एमआयडीसीमध्ये ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीत पाच कामगार बेपत्ता झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबाला दिलेले चेक बाऊन्स झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मराठा आरक्षणासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
मुंबई : देशात सध्या राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोरम, तेलंगाना आणि छत्तीसगढ या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु झालेली आहे. या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे भाजपप्रणित एनडीएचे स्टार प्रचारक नेते ठरले आहेत.
पुणे : पुण्यात १२ ठिकाणी महामेट्रो वाहनतळ उभारणार आहे. तर मार्चमध्ये स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मार्गावर मेट्रो धावणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रोने हे पाऊल उचललं आहे. पीसीएमसी, संत तुकारामनगर, फुगेवाडी, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, स्वारगेट, आयडियल कॉलनी, गरवारे महाविद्यालय, मंगळवार पेठ, वनाज डेपो, रेंजहिल कॉर्नर, नळस्टॉप या १२ ठिकाणी वाहनतळ उभारण्यात येणार आहे.
सांगली : सांगलीमध्ये शनिवारी भरणाऱ्या बाजाराला बसण्यास बंदी घातल्यामुळे संतप्त विक्रेत्यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीवर दगडफेक केली. यामध्ये अग्निशमन गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत . घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दगड फेकणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
हिंगोली | मराठा आरक्षणासंदर्भात साखळी उपोषणात एकाचा मृत्यू झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील सिदगी गावातील घटना आहे. चक्कर आल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रकाश मगर वय वर्ष 55 अस मृताचं नाव आहे.
अहमदनगर | मोठी बातमी समोर आली आहे. सत्ताधारी आमदार निलेश लंके संतप्त झाले आहेत. जिल्ह्याची परिस्थिती पाहता जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त भागात करावा यासाठी लंकेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलंय. शासनाने केलेला सर्वे चुकीचा असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ऐकले नाही तर न्यायालयात जाणार, असा इशाराही निलेश लंके यांनी दिलाय. तसेच जिल्ह्यातील इतर नेत्यांना गरज नसेल मात्र शेतकऱ्यांना आणि जिल्ह्याला दुष्काळ यादीत समावेश करण्याची गरज आहे, असं म्हणत लंकेंनी विखेंचं नाव न घेता टोला लगावला.
वर्षावर येणाऱ्या प्रत्येक माणसाची माहिती नसते. आमदार, खासदार, मंत्री यांच्यासोबत लोक जात असतात. त्याचं एव्हढं भांडवल करण्याची गरज नाही. सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर का जायचे याचा खुलासा संजय राऊतांनी करावा. वाझेंच्या खंडणी प्रकरणावर संजय राऊत गप्प का?. एल्विश यादव दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अगदी थोड्यात वेळात आमदार रोहित पवार हे पोहचतील. मागील काही दिवसांपासून चाललेल्या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आणि प्रशासनाकडे विचारपुस करण्यासाठी रोहित पवार येणार असल्याची माहिती.
एसटी विलिनीकरण्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांची नेत्यांवर नाराजी. पडळकर-सदावर्ते यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी सहा महिने संप लांबवला. मात्र सत्तेत आल्यावर ते बोलायला तयार नाहीत. तत्कालीन एसटी कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी आमचा वापर करून घेतला त्यामुळे आता त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, असे काही संघटनांनी म्हटले आहे.
अहमदनगर लाच प्रकरण गंभीर आहे. उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची गरज नक्कीच आहे.
भ्रष्टाचारी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, असेही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.
आमदार प्रकाश सोळंके हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. आंदोलनादरम्यान निर्माण झालेला गैरसमज दूर करणार असल्याचे सांगितले जात आहे.
हिवाळी अधिवेशन आता तोंडावर आले आहे. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेप्रमाणे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होईल. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. रविभवन परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी, रंगरंगोटी सुरु आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन रणकंदन होण्याची दाट शक्यता आहे.
संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांना लागलीच दवाखान्यातून सुट्टी देण्यात येऊ नये, जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत, अशी विनंती त्यांनी केली. 9 दिवसांचे उपोषण सोडल्यानंतर जरांगे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल त्यांच्या यकृतावर सूज असल्याचे समोर आले होते. पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांना गेल्या काही दिवसांपासून सतत धमक्या देणारे अखेर पकडल्या गेले. पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना 27 ऑक्टोबर रोजी 20 कोटींच्या खंडणीसाठी पहिला ई-मेल आला. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल. त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी 200 कोटींची मागणी करण्यात आली. तिसरा मेल 30 ऑक्टोबर रोजी आला. त्यानंतर त्यांना चौथ्यांदा पुन्हा ईमेल करुन धमकावण्यात आले होते. 400 कोटींची खंडणी मागण्यात आली होती.
ललित पाटील, एल्विश यादव यांना राज्यकर्त्यांचे संरक्षण मिळत आहे. त्यांच्याकडून प्रोटेक्शन मनी घेतल्या जात असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. तर दुसऱ्यावर आरोप करण्याअगोदर स्वतःचे घर काचेच असल्याची आठवण ठेवावी असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
30 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडे चार वाजता माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरावर दगडफेक करण्यात आलेली. गळ्यात गमजा आणि पाठीवर बॅग असलेल्या काही तरुणांनी हातात दगड घेवून मारा करत होती. ही सर्व दृष्ये सीसीटिव्हीत कैद झाली आहेत. बेधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी ही दगडफेक केलीय. मात्र यांची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस याच तरुणाचा शोध घेत आहेत.
जालना जिल्ह्यातील महावितरण मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यापासून वेतन रखडले आहे. याच मागणीसाठी आज या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत काम बंद केले. जर वेतन दिले नाही तर हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशार या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
पुण्याच्या खेड तालुक्यातील चिंबळी येथे केली आत्महत्या. चिंबळी येथे व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी गळफास घेतला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करत असल्याचे पत्र लिहुन आत्महत्या केलीये. सिद्धेश सत्यवान बर्गे असे आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव.
मराठा आरक्षणासाठी तारखेचा घोळ कायम आहे. चर्चेच्या चिठ्ठीत तारखेचा उल्लेखच नसल्याची माहिती. आरक्षण 24 डिसेंबरला देणार की 2 जानेवारीला याचा उल्लेखच नसल्याची माहिती समजत आहे. मनोज जरांगे आणि सरकार मध्ये झालेल्या चर्चेत तारीख ठरली का नाही याबाबत अद्यापी संभ्रम आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण 24 तारखेला मिळणार की 3 जानेवारीला हा पेच कायम आहे.
शेतकऱ्यांना पैसे नाही मिळाले तर आमची दिवाळी शिमग्या सारखी होणार, आमचा शिमगा होणार असेल तर कारखानदारांना दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजु शेट्टी यांनी साखर कारखानादारांना दिला आहे.भडक आणि हिंसक आंदोलन केल्याशिवाय सरकार जागे होत नाही, पण आम्ही साखर आणि ऊस अडवून कारखानदारांचे नाक दाबात आहोत. साखर चोरी प्रकरणी साखर कारखानादारांची जीएसटी आणि इन्कम टॅक्स विभागाकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
जरांगे पाटील यांना बळ देण्यासाठी आपण त्यांच्या भेटीला आलो आहोत. गरीब मराठ्यांना लवकर न्याय मिळायला पाहीजे. जरांगे यांच्या योग्य मार्गावर असून त्या लवकरच मान्य होतील असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे 7 आणि 8 नोव्हेंबरला दोन दिवसांचा कोकण दौरा करणार आहेत. सिंधुदुर्गातल्या दोडामार्गपासून रत्नागिरी जिल्ह्यातील खेडपर्यंत आदित्य ठाकरे दौरा करणार आहेत. पदाधिकारी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत.
मागास न ठरवता आरक्षणाचा जीआर काढणं चूक. मराठा समाज मागास नाही सर्वोच्च न्यायालयाकडून मान्य. काल जे मराठा होते तेच आज कुणबी. कुठल्याही आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवलं नाही. संविधानिकदृष्ट्या मराठा आरक्षण देता येत नाही – गुणरत्न सदावर्ते
मराठा आणि कुणबी एकच आहेत यासंदर्भात ब्रिटीशकालीन पुरावे आहेत, त्यावेळी आरक्षण नव्हते. देशात ओबीसी 52 टक्के असताना त्यांना 27 टक्के आरक्षण मिळते, त्यात मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही. ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देणे राजकीय अडचण आहे, सर्वच पक्षांना ते अडचणीचं आहे. मनोज जरांगेच्या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळाली, अवस्थ मराठा तरुण बाहेर पडला. मी मराठा आरक्षणाचा समर्थक मात्र आता मराठा तरुणांनी जिकडे नोकरी मिळेल तिकडे नोकरी केली पाहिजे, आरक्षणाची वाट न पाहता – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड
गोंदियात प्रधानमंत्री आवास योजनेचे शेवटचा हप्ता न मिळाल्यामुळे लाभार्थी नाराज. घरकुल विक्री करण्याची नगरपंचायतीला केली मागणी. शेवटचा हप्ता शासनाकडून प्रलंबित असल्याचे नगरपंचायतची माहिती.
जळगावातील मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. चाळीसगाव तहसीलदारांना सकल मराठा समाजाकडून निवेदन देण्यात आले आहे. जे नेते आरक्षणासाठी लढले त्यांच्या जीवाचे बर वाईट झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी सकल मराठा समाजाने केल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापुरातील मुस्लिम विद्यार्थी उतरले रस्त्यावर आहेत. कोल्हापूरच्या दसरा चौकात मुस्लिम विद्यार्थ्यांकडून एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी दिली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत मराठा आरक्षणासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांनी मागणी केली.
भाजप नेते मोहित कंबोज यांना न्यायालयाने दणका दिला आहे. सेंट्रेल बँक ऑफ इंडियाच्या फसवणूक प्रकरणात हा दणका दिला आहे. सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टाने फेटाळला आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यानं पेपरात लिहिलं ‘एक मराठा, कोटी मराठा’ असं लिहिलं आहे. सहामाही परीक्षेत विद्यार्थ्याने पहिल्या पानावर ‘एक मराठा, कोटी मराठा’ असं लिहिलं आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ गावातील श्री. गणेश विद्यालयातील विद्यार्थ्यांने असं लिहिलं आहे.
उर्फी जावेद व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी दोन महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे.
अकोला पश्चिम मतदारसंघाचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी भाजपचे जेष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
अकोला पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते सलग सहा वेळा निवडून आले होते. सर्वसामान्यांचा नेता म्हणून गोवर्धन शर्मा यांची जिल्ह्यात ओळख.
नांदेड महापालिकेत गेल्या महिन्यात आरोग्य विभागात कंत्राटी पद भरती झाली. मात्र या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. महापालिकेच्या निवड समीतीने प्रयोग शाळा तंत्रज्ञ पदासाठी पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र लोकांची निवड केली असा मनसेचा आरोप आहे.
पालिकेची निवड समिती बरखास्त करून गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसे कडून करण्यात आली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.
राज्य सरकारकडून वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जात आहे. त्याच कामाची पाहणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तेथे पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या.
संपूर्ण मराठा समाजाला न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे. समिती राज्यभर काम करत आहे, याचा मला अभिमान आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षणाबाबत समितीचं काम वेगात सुरू आहे. पुन्हा मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये हीच सरकारची भूमिका आहे, असे संदीपान भुमरे म्हणाले.
अतुल सावे, संदीपान भुमरे यांच्यासह सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचलं. सरकारने दिलेला जीआर जरांगे यांनी वाचला.
मराठा समाजाला न्याय देण्यावर भर आहे, अर्धा-एक दिवस, पुढे-मागे होऊ शकतो, असे संदीपान भुमरे म्हणाले.
सांगोला तालुक्यातील चिक महूद ग्रामपंचायतची निवडणूक लढवत असलेले उमेदवार किसन सोपान यादव यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
प्रचार करत असतानाच त्रास जाणवू लागल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
संदीपान भुमरे मनोज जरांगेच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. राज्य सरकारने काढलेला जीआर मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
नाशिक पोलिसांकडून पुन्हा सोलापूरमध्ये एक मोठी कारवाई केली गेली आहे. MD ड्रग्स कारखाना उध्वस्त पोलिसांनी केला आहे. याआधी देखील नाशिक पोलिसांनी सोलापूरच्या मोहोळ एमआयडीसीमध्ये कारवाई केली होती. करोडो रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. कारवाईमध्ये काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
अकोला पश्चिम मतदारसंघाचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं प्रदीर्घ आजाराचे निधन झालं आहे. गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोल्याला येणार आहे. घराच्या आवारात अत्यंदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आलंय. अकोलेकर सकाळपासून अंत्यदर्शनासाठी येत आहेत. दुपारी 2 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. अकोला येथील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सलग सहा वेळा अकोला पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते निवडून आलेत. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्री मंडळात त्यांनी राज्यमंत्री पद भूषवलं आहे. सर्वसामान्यांचा नेता म्हणून गोवर्धन शर्मा यांची जिल्ह्यात ओळख आहे.
सरकरचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचलं आहे. संदीपान भुमरे, मंगेश चिवटे आणि सहकारी मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. राज्य सरकारने काढलेला जीआर मनोज जरांगे यांना देणार असल्याची माहिती आहे. सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत. मनोज जरांगे यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्याबाबत यावेळी चर्चा सुरु आहे.
आता केडीएमसी हद्दीतील पार्किंग नसलेल्या इमारतीत राहणाऱ्या राहिवाशांच्या पार्किंगची चिंता मिटणार आहे. महानगर पालिका आता पार्किंग स्लॉट निश्चित करून पार्किंग नसलेल्या गाड्याच्या मालकाला पार्किंग पास देणार आहे. दिलेल्या जागेवर गाडी पार्क न केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांनी ही माहिती दिलीय.
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच. नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉक मधून पंचवीस रुपये किलो दराने विक्री सुरु झाल्याचा परिणाम. दोन लाख मेट्रिक टन कांद्याचे मुंबई, दिल्लीसह उत्तरेकडील मोठ मोठ्या शहरांमध्ये पंचवीस रुपये किलो दराने वाटप सुरू. कांद्याच्या सरासरी दरात गेल्या आठ दिवसात 1250 रुपयांची घसरण…
महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई. एक कोटी रुपये लाच घेतल्या प्रकरणी एमआयडीसीचे दोन अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने नगरमध्ये मोठी कारवाई केल्याने खळबळ. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नगर कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड आणि धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ असे लाजखोर अधिकाऱ्यांची नावे. अहमदनगर एमआयडीसीच्या नगर कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला लाचलुचपतच्या नाशिक पथकाने घेतले ताब्यात
सरकरचे शिष्टमंडळ 8.30 वाजता घेणार मनोज जरांगे यांची भेट. संदीपान भुमरे, मंगेश चिवटे आणि सहकारी घेणार मनोज जरांगे यांची भेट. राज्य सरकारने काढलेला जीआर मनोज जरांगे यांना देणार. सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांच्या तब्येतीची करणार विचारपूस. मनोज जरांगे यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्याबाबत होणार चर्चा. थोड्याच वेळात शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची घेणार भेट
नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. या भूंकपामध्ये मोठी वाताहात झालीय. आतापर्यंत 129 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक घर जमीनदोस्त झाली आहेत.
नाशिकमध्ये अनधिकृत फटाके स्टॉल्स आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी प्रशासनाला यासंदर्भात आदेश दिले आहेत. महापालिकेच्या १४८ स्टॉल्सचे लिलाव पूर्ण झाला आहे.
दिवाळीसाठी ८ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत एसटी महामंडळाने दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आगाऊ तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांनाही दहा टक्के दरावाढीनुसार तिकीट मिळणार आहे.
महाड एमआयडीसीमध्ये ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीला भीषण आग लागली होती. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही पाच कामगार बेपत्ता आहे. पाच तासानंतर ही आग आटोक्यात आली आहे.
राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सुरु असलेला प्रचार शुक्रवारी संध्याकाळी थांबला. या निवडणुकीतून लोकनियुक्त सरपंच निवडण्यात येणार आहे.