मुंबई | 5 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणासंदर्भात उद्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर 6 डिसेंबर रोजी पहिली सुनावणी पार पडणार आहे. यामध्ये जयश्री पाटील विरोधक आहेत. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरु आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पुणे शहरातील भिडे वाड्यावर महानगरपालिकेने ताबा घेतला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच आयपीएल लिलावासाठी यंदा मोठ्या संख्येने खेळाडूंची नोंदणी झाली आहे. राजकीय, प्रत्येक जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…
मुंबई : एक माजी मुख्यमंत्री राज्य सरकारच्या चांगल्या कार्यक्रमाला बोगस म्हणतायत हे दुर्दैव आहे. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी असे कधी म्हटलं नाही. १ कोटीहून अधिक लोकांना यातून फायदा झालाय. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधल्या निकालानंतर ‘मन मन मोदी’ असे म्हणायची वेळ आलेली आहे. माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी ही घराणेशाही त्यांच्यात आहे. सोनिया गांधीच पण तसेच आहे मी आणि माझी मुल, अशी टीका शिंदे गटाच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली.
नागपूर : तृतियपंथियांच्या राष्ट्रीय संमेलानाचे आयोजन नागपूरमध्ये करण्यात आलंय. या संमेलनात देशभरातील पाच हजार किन्नरांचा सहभाग आहे. स्थानिक खासदार म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या ‘अखिल भारतीय महा मंगला मुखी किन्नर संमेलनात’ प्रमुख पाहूणे म्हणून हजेरी लावली. “तुम्हे और क्या दू दुआ के शिवाय, तुम को हमारी उमर लग जाये” अशा शब्दात नितीन गडकरी यांना किन्नरांना आशिर्वाद दिला.
मुंबई : राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्षावरील सुनावणी निवडणुक आयोगासमोर शुक्रवारी होणार आहे. निवडणुक आयोगासमोर अजित पवार गट युक्तीवाद करणार आहे. याबाबत वकील मुकुल रोहतगी यांनी आम्ही आमचे मुद्दे मांडले आहेत. संघटमात्मकरित्या ज्या गोष्टी आहे त्या मांडल्या आहेत असे सांगितले.
गुहागर : तालुक्यातील काजळी आणि चिखली या गावांच्या हद्दीत असलेल्या माळराळ आणि जंगलांना आग लागली आहे. वणव्याच्या भीषण आगीत महाराणावरील वैरण जळून खाक झाले. आगेच्या ज्वाला मोठ्या असल्याने आग विझवताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. आंबा, काजू यासह मोठी जंगली झाडे या वणव्यात जळून खाक झाली आहेत. अजूनही येथे वनव्याची तीव्रता कायम आहे.
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली ससून रुग्णालयात शिपाई महेंद्र शेवते याला अटक करण्यात आली होती. महेंद्र शेवते हा गेल्या अनेक वर्षापासून ससून रुग्णालयात शिपाई म्हणून कामाला आहे. ललित पाटील रुग्णालयात उपचार घेत असताना शेवते याने त्याला मदत केली होती. शेवते याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. पुणे सत्र न्यायालयाने शेवते याचा वैयक्तिक जात मुचलक्यावर आणि शहर न सोडण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.
कमलनाथ मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहतील. ते 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर असतील. यानंतर काँग्रेस लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहे. कमलनाथ राज्यातील दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.
आतापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी करावी लागेल, असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे. काही उणिवा राहिल्या होत्या, आत्मपरीक्षणही होईल. काय कमी आहे यावर चर्चा होईल.
तेलंगणामध्ये काँग्रेसचे रेवंत रेड्डी 7 डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. त्यांच्यासोबत एक उपमुख्यमंत्री आणि दोन ज्येष्ठ मंत्री शपथ घेऊ शकतात.
मी दिल्लीला जाणार नाही, उद्या छिंदवाडा येथे जाईन, जिथे आम्ही सातही जागा जिंकू शकलो नाही, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. लोकसभेच्या सर्व 29 जागा जिंकण्याचा माझा संकल्प आहे. नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचे आहे.
राजस्थानमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाच्या नावावरून भाजपमध्ये खलबतं सुरु झाली आहेत. राजस्थान भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी किंवा रविवारी होऊ शकते. बैठकीतच मुख्यमंत्र्यांच्या नावावर आमदारांचे मत घेतले जाणार असल्याची माहिती आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांमधून पुढचा मुख्यमंत्री निवडला जाऊ शकतो, अशीही बातमी आहे. मात्र, अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील.
वाशिम | मनोज जरांगे पाटील यांना दाखवले काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील तामसा फाट्यावरील हा सर्व प्रकार घडला. मनोज जरांगे पाटील यांना काठा इथं हे काळे झेंडे दाखवण्यात आले. पोलिसांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या ओबीसी कार्यकर्त्यांना रोखलं.
परळी | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच केंद्र सरकारसोबत बैठक घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस बीडमधील परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते. सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
अमरावती | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी संकटात आहे आणि सरकार इव्हेंट करण्यात गुंतलंय, अशा शब्दात जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लोबल केलाय. तसेच सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्यात, असंही जयंत पाटील म्हणाले. तसेच सोयाबीनला 8 हजार आणि कापसाला 14 हजार रुपये भाव मिळावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी यावेळेस केली.
बीड | राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. बीडमधील परळीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात अजित पवार यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय. तसेच लोकांच्या दारी जात लाभ देणं हे शासनाचं धोरण असल्याचंही उपमुख्यमंत्री म्हणालेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे नांदेड विमानतळावरुन हेलिकॉप्टरने परळीकडे रवाना झाले. विमानतळावर भाजप आ. तुषार राठोड ,आ. राजेश पवार ,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर हेलिकॉप्टरने परळीकडे रवाना झाले.
सातारा कराड महसूल विभागाच्या रेकॉर्ड रूममध्ये कुणबी दाखले नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. आजपर्यंत 3 लाख 86 हजार नोंदी तपासून दहा हजार 333 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. यामुळे कुणबी नोंदी तपासण्याचे काम थांबले असल्याच्या जरांगे पाटील यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले आहे.
पुण्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कावड मोर्चा काढण्यात आला. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात पुण्यात कावड मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सदाभाऊ खोत यांनी पुण्यात आंदोलन केले.
मंदिर विश्वस्त पदी ग्रामस्थांना संधी न मिळाल्याने आळंदी ग्रामस्थांनी पुकारलेल्या बंद मागे घेतल्यानंतर आळंदी मधील जनजीवन पूर्वत सुरू झाले आहे. सर्व दुकाने दुपारनंतर उघडली गेल्याने आळंदीमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे.
मुंबई : अंधेरीनंतर दहिसर मध्ये मुंबई मेट्रोचे काम सुरू असताना बीएमसीची पाण्याची पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. सध्या पालिकेचे पथक पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम करत आहेत. अंधेरीतील पाण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम 50 तासांनंतर संपले, दहिसर पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम 1 तासात पूर्ण होणार असून, लोकांना पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे बीएमसी जलविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई : सरकारने हिंमत असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी. मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहू नका. उद्धव ठाकरे यांचं भाजपला थेट आव्हान
मुंबई : कुणीही पाहिलं नसेल इतकं प्रदुषण मुंबईत आहे. धारावीकरांना हक्काची घरे मिळाली पाहिजे. आहे त्या ठिकाणीच घरे मिळावी. मुंबईतील वीज बिलंही वाढली आहेत – उद्धव ठाकरे
मुंबई : धारावीकरांना ४०० ते ५०० फूट जागा मिळाली पाहिजे. धारावीचा विकास सरकारने करावा. अदानीचं भलं व्हावे याचा विचार सुरु आहे. उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका
मिचोंग चक्रीवादळाचा दक्षिण भारतात मोठा फटका बसला आहे. चेन्नई विमानतळ पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. विमानसेवा कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. विमानतळावर आणि रनवेवर दोन फुटांपेक्षा अधिक पाणी साचल्याने विमानसेवा ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शासन आपल्या दरी कार्यक्रमात संपूर्ण देशातील कलासंस्कृतींचे दर्शन… पंजाबपासून कन्याकुमारी पर्यंतच्या वेगवेगळ्या कला आणि वाद्यांचे दर्शन… कार्यक्रमा सुरुवात पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांचं सुरू …
दहिसरमध्ये मुंबई मेट्रोचे काम सुरू असताना बीएमसीची पाण्याची पाइपलाइन फुटली आहे. पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याची माहिती समोर येत आहे. दहिसर पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पुलाखाली पाणी साचलं आहे. मुंबई मेट्रोच्या खोदकामात पाईपलाईन फुटली. सध्या बीएससीने पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम सुरू केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बीड दौऱ्यासाठी निघाले आहेत. बीडच्या श्री क्षेत्र परळी वैजनाथ मंदिराच्या विकास कामे भूमिपूजन करत शासन आपल्या दारी कारेक्रमाला उपस्थित राहाणार आहेत.
तीन राज्यांत भाजपची एकहाती सत्ता आल्याने अजितदादा गटात उत्साह वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पवार आमच्यासोबत येतील असा विश्वास अजितदादा गटाच्या आमदारांनी व्यक्त केला आहे.
‘सीआयडी’ फेम फ्रेड्रिक्स म्हणजे दिनेश फडणीस याचं निधन झालं. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते गंभीर आजारी होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव पर्यटक नितीन उले यांनी वाघांच्या लढतीचा थरारक क्षण टिपला. सफारीदरम्यान रस्त्यावरून तारू नावाच्या वाघामागे जात असताना अचानक दाट झुडुपातून शंभू वाघ पुढे आला. क्षणार्धात तारू आणि शंभू यांनी एकमेकांविरोधात पर्यटकांपुढेच पवित्रा घेतला. काही काळ जोरदार संघर्षानंतर दोघेही आपापल्या वाटेने निघाले.
मात्र थोड्या थोड्या वेळाने दोघेही डरकाळ्या फोडत प्रतिस्पर्ध्याची ताकद जोखत राहिले. अचानक झालेल्या संघर्षाने ताडोबा सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना थरारक अनुभव मिळाला.
बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे सहभागी होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या बॅनरवर पंकजा मुंडे यांचा फोटो असल्याने ही चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंकजा मुंडे कार्यक्रमासाठी येतील अशी चर्चा सुरू आहे.
नागपूर वर्धा रोडवर आज पहाटे चारच्या सुमारास गहू आणि तांदूळ भरलेल्या ट्रकला आग लागली. या आगीत संपूर्ण ट्रक आणि त्यातील साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ट्रकमालकाचं मोठं नुकसान झालं.
पुण्यात महाडांच्या घरासाठी आज सोडत, घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या गृहखरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे. म्हाडाच्या पुणे लॉटरी 2023 च्या सोडतीला उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 5863 फ्लॅटसाठी सुमारे 60 हजार अर्ज आले आहेत. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज शुभारंभ होणार आहे.
समाजापेक्षा पक्ष मोठा ठरवायचा असेल तर मग 24 तारखेला बघू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आमची आरक्षणाची मागणी ओबीसी प्रवर्गातून आहे. गाव-खेड्यातील ओबीसी समाज आमच्या पाठिशी आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
गजानन महाराजांचे दर्शन घेऊन जरांगे पाटील यांचा दौरा सुरू झाला आहे. अकोला, वाशिम आणि हिंगोलीत जरांगे पाटील यांची सभा होणार आहे.
गोदा पात्रात प्रक्रिया न केलेलं दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात येत आहे. नाशिककरांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. एसटीपी प्लांट बंद असल्याने दुर्गंधीयुक्त पाणी थेट गोदापत्रात सोडण्यात येत आहे. 2018 मधील तपोवन परीसरातील एसटीपी ची मुदत संपली आहे. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गोदापत्रातील याच दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुढे शेती आणि पिण्यासाठी वापर होतो.
अखिलेश यादव नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. इंडिया आघाडीच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे सहभागी होतील, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. काँग्रेसने ४० टक्के मतदान खेचले आहे. अशा परिस्थितीत ही चांगली कामगिरी म्हणावी लागेल, असे ते म्हणाले. राज्यात तिघांचा संसार सुरु आहे. खालच्या पातळीवरील लोक खालच्या पातळीची टीका करतात, असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. शिवसेनेमुळे भाजप गावोगावात पोहचली, याची कृतज्ञात त्यांनी ठेवावी, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने अपार आयडी कार्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील विद्यार्थ्यांचे हे ओळखपत्र आहे. ‘ एक राष्ट्र, एक विद्यार्थी कार्ड’ या संकल्पनेवर ते आधारीत आहे. केंद्र सरकार नवीन राष्ट्रीय शिक्षा धोरण घेऊन आले आहे. त्यातंर्गत हे कार्ड तयार करण्यात येत आहे. येत्या काळात मुलांना हे कार्ड विविध शाळेतील प्रवेशापासून ते नोकरी लागेपर्यंत उपयोगी ठरणार आहे.
अमरावतीत आज शरद पवार गटाचा शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता अमरावतीच्या नेहरु मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत हा मोर्चा निघेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार,महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या मोर्चात असतील. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक तसेच सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर शरद पवार गट आक्रमक झाला आहे. मोर्चात शेतकरी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व शेकडो ट्रॅक्टर देखील सहभागी होणार. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.
सोने-चांदीचा आलेख सातत्याने उंचावत आहे. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात सोने-चांदीची तुफान घौडदौड सुरु आहे. दिवाळीदरम्यान सोने-चांदी वधारले होते. किंमतींमधील वाढीला मोठा ब्रेक लागलेला नाही. उलट किंमती सातत्याने वाढत आहे. या दोन आठवड्यात किंमतींनी सलग दरवाढीची सलामी ठोकली आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,281 रुपयांवर पोहचली. तर चांदी 76,430 रुपये किलो आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज कार्तिकी सोहळ्याला काही वेळात सुरुवात होणार आहे. हेबतबाबाच्या पायरी पूजनाने ह्या सोहळ्याला सुरुवात होईल. विश्वस्त आणि वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज मुख्यद्वारावर असलेल्या हेबतबाबा यांची पायरी पूजनाला आले आहेत. काही वेळात पायरी पूजन सुरु होईल
मनोज जरांगे पाटील यांचा मराठा संवाद दौऱ्याचा आज पाचवा दिवस आहे. शेगाव येथील गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन जरांगे पाटील यांच्या आजच्या दौऱ्याला सुरुवात होत आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चरणगाव, वाशीम जिल्ह्यातील काटा, आणि हिंगोली येथे जरांगे पाटील यांच्या सभा होणार आहेत. मराठा संवाद दौऱ्यात जरांगे पाटील यांनी आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आरक्षण नसलेल्या मराठा समाजाच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर अवकाळीने मोठे संकट निर्माण केले आहे. कारण अवकाळी पावसामुळे आता द्राक्षाच्या घडात कुज होऊ लागली आहे . त्यामुळे हे घड द्राक्षे मजुरांच्या कडून काढून ओढ्यात टाकण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांच्यावर आली आहे. तासगाव तालुक्यातील खुजगाव येथील शेतकरी महेश पाटील या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेला अवकाळीचा फटका बसल्यामुळे द्राक्ष बागेतील द्राक्ष काढून ओढ्यात टाकावी लागत आहेत.
गोंदियात दुचाकीला धडक देत दुचाकीला आग लागली. काही अंतरापर्यंत दुचाकी फरकटत नेली. दुचाकी चालक थोडक्यात बचावला मात्र दुचाकी जळाली. आग लागल्याचे लक्षात येताच ट्रक चालकाने काही अंतरावर जाऊन ट्रक थांबविलं. नागरिकांनी ट्रक थाबावित आग विझविली. ट्रक चालक दारू पिऊन ट्रक चालवत असल्याचे समोर आलं आहे . पोलिसांनी ट्रक व ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे.
ललित पाटील प्रकरणी आता येरवडा कारागृह प्रशासन रडारवर आहे. कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी दोघे ही अटकेत आहेत. सुधाकर इंगळे मार्फत डॉ. संजय मरसळे यांना पैसे मिळाले. सुधाकर इंगळे आणि डॉ संजय मरसळे या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
आज मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात १० वाजता विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. आजपासून सभागृहात होणाऱ्या विधेयकांवर विरोधी पक्षांची भूमिका काय असावी यासाठी चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली आहे. बैठकीला सगळे विरोधी पक्षांचे खासदार उपस्थित राहणार आहेत. १० वाजता ही बैठक होणार आहे.
ललित पाटील प्रकरणात पुन्हा एका बड्या अधिकाऱ्याला अटक झाली आहे. ससून रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी प्रवीण देवकाते याला पुणे पोलिसांकडून अटक झाली आहे. ललित पाटील प्रकरणात ललित पाटील ला मदत केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला आधी निलंबित करण्यात आलं होतं. निलंबित झाल्यानंतर काल या अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटीलला त्याच्या आजारात आणि पळून जाण्यास देखील देवकाते यांनी मदत केल्याचा पुणे पोलिसांचा आरोप आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडले. यामुळे नाशिक शहरावर पाणी कपातीचे संकट आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट असणार आहे. यामुळे प्रशासनाकडून आत्तापासूनच पाण्याचे संकट टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
नाशिक महापालिका विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार आहे. शहरातील 148 अतिक्रमण महापालिका हटवणार आहे. सर्वाधिक अतिक्रमण नाशिकच्या सिडको आणि नाशिक रोड परिसरात आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांचा देखील मोहिमेत समावेश आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात दाखल केलेल्या क्युरिटीव्ह पेटिशनवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. उद्या १.३० वाजता हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून लिस्टेड करण्यात आले आहे. यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात उद्याच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
देवस्थानच्या विश्वस्त पदावरून स्थानिकांना डावलल्यामुळे आळंदी बंदची हाक देण्यात आली आहे. आज आळंदी बंद पुकारला असून सकाळी 10 वाजता चाकण चौक येथून निषेध मोर्चाला प्रारंभ होऊन संत ज्ञानेश्वर महाराज महाद्वार चौक येथे सभेत सांगता होईल.
पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्याची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे महानगरपालिकेकडून भिडे वाड्याची संपूर्ण जागा ताब्यात घेण्यात येत आहे. यासाठी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेकडून कारवाई सुरू आहे.