मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : मागच्या आठवड्यात जालना येथे मराठा समाजावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी समजाचं जातप्रमाणपत्र द्या, अशी मागणी प्रमुख आंदोलक मनोज जरांडे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी समितीची घोषणा केली आहे. राज्यातील अनेक नेत्यांची पावलं सध्या जालन्याकडे वळली आहेत. राज्यातील विविध पक्षाचे प्रमुख नेते जालन्यातील आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांडे पाटील यांची भेट घेत आहेत. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांडे पाटील यांच्यासह आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्याचवेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती दौरा सुरू झाला आहे.
दरम्यान सहा राज्यांमधल्या सात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. भाजप आणि इंडिया आघाडी यांच्यापैकी यश कुणाला ? याकडे सगळ्यांच लक्ष असेल. झारखंडमधील डुमरी, केरळमधील पुतूपल्ली , त्रिपुरातील बॉक्स नगर , धनपूर उत्तराखंड मधील बागेश्वर , उत्तर प्रदेशातील घोसी आणि पश्चिम बंगाल मधल्या धूपगुरी या जागांवर आज मतदान होईल.
कोलंबो | आशिया कप 2023 मधील सहाव्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. श्रीलंकेने अफगाणिस्तानला विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलं आहे. मात्र अफगाणिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी 37.1 ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण करायचं आहे. त्यानुसार अफगाणिस्तानने 24 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 180 धावा केल्या आहेत. मोहम्मद नबी 22 बॉलमध्ये 46* आणि हशमतुल्लान शाहिदी 44 बॉलमध्ये 46 धावांवर नाबाद खेळत आहेत. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.
पुणे | दहीहंडीला मोजून अवघे काही तास बाकी आहेत. त्याआधी पुणेकरांसाठी महत्तवाची बातमी समोर आली आहे. दहीहंडीमुळे पुण्यातले पीएमपीएलचे काही मार्ग बंद असणार आहेत. शहरातले 8 मुख्य मार्ग बंद असणार आहेत. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
जळगाव | रोहित पवार यांच्या भाषणातील मुद्दे :
– पवार साहेबांची सभा पाहण्यासाठी आज पन्नास हजाराहून जास्त लोक या ठिकाणी एकत्र आलेत सभा यशस्वी झाली आहे
– शरद पवारांसोबत भाजपने जे काय केलं आणि जे निष्ठावंत शरद पवारांसोबत होते ते भाजपसोबत सत्तेसाठी गेले हे लोकांना आवडलेलं नाही
– शरद पवार यांची भीती इथल्या तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांना आहे पवार साहेबांचे सभेपूर्वी त्यांना बैठक घ्यावी लागली आणि इथल्या समस्यांबद्दल त्यांनी चर्चा सुद्धा केली आहे, लवकरात लवकर या सरकारला दुष्काळ जाहीर करावा लागणार आहे
– भाजप सरकार मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये
– आरक्षणाचा प्रश्नी जुडेशिअल इंक्वायरी व्हायला पाहिजे आणि यातूनच हा प्रश्न सुटणार, जुडीशियल कमिटी असल्यामुळे नेमकं कळेल की त्यावेळी फोन कुणाचा गेला होता कुणाच्या फोनमुळे त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला गोळीबार झाला
– लाठीमार, गोळीबार प्रकरणी भाजपच्याच व्यक्तीचा हात असू शकतो
– अजित दादांनी जी भूमिका बदलली ती महाराष्ट्रात कोणालाही पटलेली नाही त्यामुळे आम्हाला त्यावर जास्त बोलायचं नाही, म्हणून बारामती मध्ये अजित दादा परत या अशा घोषणा देण्यात आला शेवटी ते मतदार आहेत त्यांना अधिकार आहे
– सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी चेंगराचेंगरी झाली बऱ्याच जणांचा मृत्यू झाला एक जुडी शेल इन्क्वायरी व्हावी अशी आम्ही मागणी केली पण अधिकाऱ्यांची समिती नेमली गेली त्याच्यापुढे काय झालं याचा उत्तर सुद्धा राज्य सरकार देत नाही
– उन्हामुळे चुळबुळ होत होती लोक अस्वस्थ झाले होते आणि त्यामुळे यावेळी पवार साहेब स्टेजवर भाषण करत होते मी जनतेमध्ये जाऊन बसलो शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो आणि आपणही त्यांच्याच एक भाग आहोत असं त्यांना विश्वास दिला
पुणे | दहीहंडीमुळे पुणे शहरातील काही PMPL बसमार्ग बंद राहणार आहे. 7 सप्टेंबर रोजी PMPL चे बस मार्ग बंद राहणार आहेत. तर अनेक बस मार्गांमध्ये मोठे बदल होणार आहेत. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी PMPL प्रशासनाने याबाबतचा निर्णय घेतलाय. दहीहंडीच्या दिवशी शहरातील मुख्य आठ मार्ग PMPL वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. तर वाहतुकीच्या 6 मार्गांत बदल होणार आहे.
पुणे | शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीय. कोर्टानं जामीन देताना ज्या अटी-शर्थी दिल्या होत्या. त्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कोर्टानं रघूनाथ कुचिक यांचा जामीन रद्द केलाय. कोर्टाने आरोपींच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं. पोलिसांकडून रघुनाथ कुचिक यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. रघुनाथ कुचिक यांच्यावर महिलेने आरोप केले होते.
संभाजीनगर (औरंगाबाद) | राज्य सरकारचे शिष्टमंडळ मराठा आंदोलनकर्त्याना भेटून थोड्याच वेळात संभाजीनगर विमानतळावर येणार आहे. मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे. संदिपान भुमरे संभाजीनगर विमानतळावर लवकरच पोहोचणार आहेत.
पक्षाच्या आघाडीचं नाव ‘इंडिया’केलं तर ते देशाचे नाव बदलतील? देश कोणत्याही एका पक्षाचा नसून 140 कोटी जनतेचा आहे. उद्या जर इंडिया आघाडीचे नाव बदलून भारत ठेवले तर ते भारताचे नावही बदलतील का? भाजपची मते कमी होऊ नयेत म्हणून ते हे करत आहेत. हा देशाचा विश्वासघात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाला भेट देणार आहेत. उद्या संध्याकाळी जकार्ताला रवाना होतील आणि 7 सप्टेंबरला भारतात परततील. भारत आशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहे.
जरांगे पाटील अध्यादेशाच्या निर्णयावर ठाम आहेत. यासाठी त्यांनी सरकारला 4 दिवसांची वेळ दिली आहे. गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांना चर्चेसाठी मुंबईत येण्याचं आवाहन केलं आहे.
मराठी आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरुच आहे. सरकारने चार दिवसात जीआर काढावा अशी मागणी जरांगे पाटील यांनी धरू ठेवली आहे. सरकारकडून जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. सरकार जरांगे यांच्या मागणीवर 100 टक्के सकारात्मक असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. जीआरसाठी एका महिन्यांचा अवधी द्या असंही गिरीश महाजन यांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडवावे या मागणीसाठी गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे शिष्टमंडळ उपोषण स्थळी पोहचले आहे. पाटील यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण जरांगे पाटील भूमिकेवर ठाम आहेत. मी समाजाला शब्द दिल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
वेळ वाढवून देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांची मनोज जरांगे पाटील यांच्याकडे विनंती. पण जरांगे पाटील त्यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. मी सरकारला यापूर्वी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. मग आता पुन्हा वेळ कशाला मागता, असा सवाल जरांगे यांनी केला. मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आठव्या दिवशी पण सुरुच आहे. त्यांनी उपोषण सोडावे यासाठी सरकारचे शिष्टमंडळ उपोषण स्थळी पोहचले आहे. मंत्री गिरीश महाजन, संदीपान भूमरे, अतुल सावे, अर्जुनराव खोतकर, राजेश टोपे हे जरांगे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले.
सरकराचे शिष्टमंडळ जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात दाखल झाले आहे. गिरीश महाजन, संदिपान भुमरे, सावे, अर्जुनराव खोतकर हे उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. ते मनोज जरांडे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार आहेत.
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरुच आहे. मराठा आरक्षण हे सध्या राज्याच्या केंद्रस्थानी आले आहे. पोलीसांच्या लाठीमारानंतर राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले. जर सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला जात आहे. आज जर राज्य सरकारने जीआर काढला नाही तर पाणी सुद्धा घेणार नसल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का. भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांचा शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश. इतर सामाजिक कार्यकर्ते यांचा झाला पक्षप्रवेश.
शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट. नाशिकचा कांड उत्पादक शेतकरी संकटात आहे. शेतकरी भीक नाही कष्टाची किंमत मागतोय. 9 वर्षात मोदींनी काय केलं?
जळगावात शरद पवारांची स्वाभिमान सभा. शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. शरद पवार गटाचं जळगावात जोरदार शक्तिप्रदर्शन.
वनडे वर्ल्डकप टीममधून युजवेंद्र चहल याला डावलण्यात आलं आहे. आशिया कपसाठी निवडलेला संघच वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे. फक्त तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळालेली नाही. ‘टीम इंडियासाठी जो कोणी योग्य आहे त्याची निवड केली गेली आहे,’, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं आहे.
भाजपचे नेते माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आरक्षण करणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांची भूमिका समजून घेतली.
वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जालना येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी अर्धातास त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांना मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गुरुवारी भारत दौऱ्यावर आहेत. ते नरेंद्र मोदी यांच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी भारतात येत आहेत.
मराठा समाजातील बैठकीत भाषण बाजीवरून जोरदार राडा
सांगली जिल्ह्यातील मराठा समाजातील बैठकीत भाषण बाजीवरून जोरदार राडा मराठा समाजातील कार्यकर्ते एकमेकात भिडले. मुद्दे मांडण्यावरुन वादावादी झाल्याची माहिती मिळाली आहे.
धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश आंदोलन सुरु आहे. काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश आंदोलन करीत आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
यवतमाळमध्ये मराठा संघटनांचं आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलकांनी रस्त्यावर उतरुन टायर जाळले आहेत.
सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाच्या व्यापक बैठकीला सुरुवात झाली आहे. जिल्हाभरातून मराठा समाजाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहिले आहेत. मराठा समाजाला आरक्षणासाठी जालना येथे आंदोलन करणाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांचा निषेध करण्यासह आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. आरक्षणाची बाजू मांडण्याबरोबरच आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरवली जाईल.
“इंडिया आघाडीची ताकद पाहून मोदी सरकार अस्वस्थ झालं आहे. संसदेत महिला आरक्षण विधेयक आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार. भाजपाचे उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी काम करु” असं शरद पवार यांनी सांगितलं.
नाशिकमध्ये आज ‘सरकार दिव्यांगांच्या दारी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे. दिव्यांग कल्याण विभागातर्फे ठक्कर डोम इथं उपक्रम आयोजित करण्यात आलं आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न असल्याचं बच्चू कडू म्हणाले. मेळाव्याला दिव्यांग बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागणं म्हणजे एकप्रकारे कबुलीच आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीबांवर अन्याय होईल. 50 टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्याची गरज आहे असं शरद पवार म्हणाले.
इंडिया आघाडीच नाव हटवण्याचा अधिकार कोणाला नाही, असं शरद पवार म्हणाले. आधी पंतप्रधानांच्या आरोपांना उत्तर द्या असं शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला. पंतप्रधानांनी आरोप करु नये, वस्तुस्थिती सांगावी असं पवार म्हणाले.
“शासन आपल्या दारीचा वापर प्रसिद्धीसाठी नको, शेतकऱ्यांसाठी करा. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष नको” असं शरद पवार म्हणाले.
“अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक बाजारपेठ उपलब्ध नाही. सध्या पाऊस नसल्याने चिंताजनक स्थिती आहे” असं शरद पवार म्हणाले.
राज्यातल्या काही जिल्ह्यात सामान्य लोकांच्या दृष्टीने चिंताजनक स्थिती आहे. त्याचा आढावा घेऊन लोकांशी संपर्क साधावा या हेतूने हे दौरे आहेत. यापूर्वी मराठवाड्यातील बीड, त्यानंतर कोल्हापूर इथे जाऊन आलो. आज खान्देशातील स्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाऊस नसल्याने चिंताजन स्थिती आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची स्थिती बिकट आहे.
जालना लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला व्यापारी आणि व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कोल्हापूर बरोबरच हुपरी, पेठवडगावमध्येही बंदची हाक देण्यात आली आहे. सर्व ठिकाणी शांततेत बंद सुरू आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर 50 अधिकाऱ्यांचा आवश्यक बंदोबस्त नेमला आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी टीव्ही 9 मराठीला ही माहिती दिली आहे.
शरद पवार यांची आज जळगावमध्ये सभा होणार आहे. पवार आता जळगावमध्ये दाखल झाले असून त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे. वाघ कधीच म्हातारा होत नसतो, अशा आशयाचे बॅनर परिसरात लावले आहेत.
कोणत्याही परिस्थिती आरक्षण घेणार, असा मराठा समाजाने निर्धार केला आहे. आज कोल्हापूरमधील एस. टी. वाहतूकही बंद राहणार आहे.
अर्जुन खोतकर आज पुन्हा जरांगेंच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यासोबतच सरकारचं शिष्मंडळही काही वेळात दाखल होणार माहिती असल्याची खोतकर यांनी दिली. आम्ही पहिल्यापासून ओबीसी आहोत, फक्त जीआर काढा, अम जरांगे-पाटील म्हणले.
साधे गरीब लोक न्याय हक्काने लढत आहेत. 50 खोक्यांच्या सरकारपुढे ते झुकणार नाहीत, असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर 2’ सिनेमाने प्रदर्शनानंतर 26 व्या दिवशी 3.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘गदर 2’ सिनेमाने आतापर्यंत 506.86 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे सिनेमा येत्या दिवसांमध्ये किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे… वाचा सविस्तर
आज जळगाव याठिकाणी शरद पवार यांची जाहीर सभा आहे. जळगावात शरद पवार गटाचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळालं आहे. वाघ हा वाघ असतो कधीच म्हातारा होत नसतो… असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.
लाठीचार्ज सरकारपुरस्कृत होता हे सिद्ध झालं आहे.. असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. मराठी आरक्षणाबाबत तोडगा निघायलाच हवा. ओबीसीची कार्यकर्ता आहे म्हणून सांगतो मी असेपर्यंत आरक्षणाला धक्का लागू देणार नाही… मग माझा जीव गेला तरी चालेल. मराठा समाजाची सरकराने माफी मागायला हवी… असं वक्तव्य देखील विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
कोपर्डीत सकल मराठा समाजाच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे. कोपर्डीतील भैरवनाथ मंदिरात उपोषणाला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डीतील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी, कर्जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी उपोषण केले जात आहे.
जालना लाठीचार्जच्या विरोधात आज कोल्हापूर शहर बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या दसरा चौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
जालनाच्या अंतरवली येथील लाठीचार्जच्या विरोधात नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे आजपासून उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. कोपर्डीतील ग्रामस्थ उपोषण करणार आहे.
जालना मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्ज घटनेची सखोल चौकशी होऊन दोषीवर तात्काळ कारावी, अशी मागणी जळगाव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार उल्हास पाटील यांनी ही मागणी केली आहे. सरकारने केलेला लाठीचार्ज दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मनोज सक्सेना सराटी गावात जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांची ते भेट घेणार असल्याची शक्यता आहे. तसेच आंदोलन स्थळी जात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाची ते चौकशी करणार आहे.
अद्यावत उपकरणासह तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याच समोर आलय. अमरावतीच्या परीक्षा केंद्रावरून एकाला अटक करण्यात आलीय. सोमवारी तिसऱ्या सत्रात पेपर फोडणाऱ्या एका उमेदवाराला अटक करण्यात आली. अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणचा आज आठवा दिवस. उपोषण स्थळी येणारे शिष्टमंडळ आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा शासन आदेश घेऊन नाही आले, तर आजपासून पाणी पिणेही बंद करणार. शासन आदेशा बरोबर आंदोलकांवर दाखल केलेले गंभीर गुन्हे मागे घ्यावे मनोज जरांगे पाटील यांची मागणी.
जालना येथील मराठा आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला. त्या विरोधात धुळ्यात साक्री बंदची हाक देण्यात आली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गिरीश महाजन आज पुन्हा आंदोलन स्थळी जाणार. ‘सरकारच्या अध्यादेशाची वाट पाहणार, तो पर्यंत उपोषण सुरु राहणार’ असं मनोज जरांडे पाटील यांनी सांगितलं.