मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यावर आज निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू. सिक्कीममधील पुरात अजूनही 120 नागरिक बेपत्ता. बेपत्ता लोकांचा शोध सुरूच आहे. आजपासून इंडिगोतून प्रवास करणं महागणार. इंडिगो विमानाच्या तिकीटात 300 ते 1000 रुपयाने वाढ. सीरियात सैन्य अकादमीवर ड्रोनने हल्ला. हल्ल्यात 100 हून अधिक लोक ठार झाले आहेत. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
मुंबई | उद्धव ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स ही फ्रस्ट्रेशन कॉन्फरन्स होती, असा टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी लगावला आहे. ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणताही मुद्दा स्पष्ट केला नाही. तसेच भ्रष्टाचाराबाबत उद्धव ठाकरे यांनी सांगू नये, असा पलटवारही संजय शिरसाट यांनी केला.
हैदराबाद | पाकिस्तानने नेदरलँड्सवर 81 रन्सने विजय मिळवलाय. पाकिस्तानने नेदरलँड्सला 205 धावांवर ऑलआऊट करत वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केली आहे. नेदरलँड्सने चांगली झुंज दिली. मात्र उलटफेर करण्यात यश आलं नाही.
अहमदनगर | आरक्षण अंतिम टप्यात आलं आहे. त्यांनी एक महिना मागितला आपण 40 दिवस दिले. सरकार आरक्षण देणार आणि आपण घेणार. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आणि मरेपर्यंत मी गद्दारी करणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. ते जामखेडमध्ये बोलत होते.
“तसेच सरकारने कितीही डाव टाकले तरी मागे हटणार नाही. आपली ताकद पाहून सरकारला आरक्षण द्यावे लागेल. आरक्षणासाठी जाळपोळ उद्रेक करू नका. कोणी आत्महत्या करू नका”, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी समाजबांधवाना केलं.
लोकसभा निवडणुकांसाठी मनसेची तयारी. पुणे लोकसभेचा मनसेचा उमेदवार निश्चित झाला आहे. मनसे नेते वसंत मोरेंच्या नावावर पुणे लोकसभेसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. वसंत मोरे पुणे शहरातील मनसेचे कट्टर सैनिक आहेत.
सोलापूर उत्तर विधानसभेत राष्ट्रवादीचे पवार साहेबांचे उमेदवार निवडून आले पाहिजे. फक्त गर्दी करून उपयोग नाही तर प्रत्येक बूथवर काम करणारे 15 कार्यकर्ते हवेत. अजून 1 वर्ष आहे. तुम्हाला खूप वेळ आहे. बूथवर तीनचार महिला त्यात असाव्यात, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
मी महिला पुरुष मानत नाही. मी एक खासदार आहे. तुम्हीही पोलिस म्हणून काम करणार आहात तर महिला पुरुष असे मनात आणू नका, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
आंदोलन करताना कोणीही उग्र किंवा जाळपोळ करू नका. मराठा समाजाच्या पोराने आरक्षणासाठी आत्महत्या करू नयेत. सरकारचे 24 ऑक्टोंबरला चाळीस दिवस पूर्ण होत आहेत. 14 तारखेला अंतरवली जाहीर सभा आहे.सर्वांनी यायचं आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
आम आदमी पार्टीने केंद्र सरकार भ्रष्टाचाराच्या विरोधात नसून I.N.D.I.A आघाडी स्थापन केल्यानंतर ईडी, सीबीआयचा वापर करून आघाडीच्या नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा करणारी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत राहुल गांधी, सोनिया गांधी, केपी चिदंबरम, शरद पवार, एमके स्टॅलिन, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि संजय सिंह यांच्यासह 13 नेत्यांवर ईडीची तारीख आणि कारवाईचा उल्लेख आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबरला राजस्थानला भेट देऊ शकतात. ते श्रीगंगानगरमध्ये जाहीर सभेला संबोधित करू शकतात.
शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, त्यांनी निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी त्यांची बाजू पूर्णपणे ऐकून घेण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी आयोगाने सविस्तर सुनावणी करणार असल्याचे सांगितले. 9 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोग या प्रकरणी पुन्हा सुनावणी घेणार आहे.
#WATCH शरद पवार जी हमारे साथ खड़े हैं…चुनाव आयोग के समक्ष मुख्य रूप से 2-3 बातें हुई हैं… हमने कहा कि पहले प्राथमिक रूप से हमें सुनें और फिर निर्णय करें कि कोई विवाद है या नहीं…उनकी दलीलों पर सुनवाई अब सोमवार को होगी: 'असली' NCP तय करने पर चुनाव आयोग की सुनवाई के बाद… pic.twitter.com/ihcsYVNax6
— ANI_HindiNews (@AHindinews) October 6, 2023
राहुल गांधी सातत्याने महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर भाजपवर टीका करत आहेत. यामुळे भाजपा अस्वस्थ झाली आहे. यासाठीच राहुल गांधींवर अत्यंत खालच्या थराला जाऊन टीका केली जात आहे. यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे निषेध करतो. या आंदोलनासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार संजय निरूपम, माजी आमदार मधु चव्हाण, अशोक जाधव, महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते सचिन सावंत आणि असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी गोरेगाव जय भवानी एसआरए बिल्डिंग आग प्रकरणातील जखमींची भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. जखमींना बाळासाहेब ठाकरे सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
#WATCH मुंबई: महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोरेगांव में जय भवानी SRA बिल्डिंग में लगी आग में घायल लोगों से बालासाहेब ठाकरे सेंटर में मिले। pic.twitter.com/YHMeCxDelb
— ANI_HindiNews (@AHindinews) October 6, 2023
गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागल्याची घटना घडली. भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत केली जाणार आहे. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
०६-१०-२०२३ 📍मुंबई पत्रकारांशी संवाद.. https://t.co/bTnJzErfm3
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 6, 2023
जयपूरमध्ये वकील जसवंत गुर्जर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधींच्या रावणावरच्या पोस्टवर आक्षेप घेण्यात आला आहे. वास्तविक, ते भाजपच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आले होते.
मुंबई | गोरेगावमध्ये आज सकाळी लागलेल्या आगीत अनेक जण जखमी झाले होते. जखमी झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री गोरेगाव येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झालाय. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी 5 लाखांची मदत जाहीर केलीय. तर मुख्यमंत्र्यांनी जखमींची भेट घेवून विचारपूस केलीय.
मुंबई | माझी नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या उमेदवारांना माझ्या सहीनेच एबी फॉर्म देण्यात आले. जर मी बेकायदेशीर असेल तर उत्तर महाराष्ट्रातून सगळे निवडून आलेले आमदार देखील बेकायदेशीर ठरवण्याचा काहीतरी डाव दिसतोय. मी निवडणुकीने निवडून आलेलो आहे, मी निवडून आल्यानंतर प्रफ्फुल पटेल यांनीच मला पत्र दिले. संख्याबळबाबत आमचे वकील युक्तिवाद करतील, कालच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली आहे, त्यामध्ये 24 राज्यांपेक्षा जास्त अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिलाय, अशी पहिली प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी सुनावणीवर दिली.
नवी दिल्ली | राष्ट्रवादीची चेहरा हे शरद पवार हेच आहेत. याचिकाकर्त्यांचे दावे चुकीचे आणि खोटे आहेत, अशी प्रतिक्रिया वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.
नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याबाबतची निवडणूक आयोगातील पहिल्या दिवसाची सुनावणी अखेर संपली आहे. आता पुढची सुनावणी सोमवारी ९ ऑक्टोबरला संध्याकाळी चार वाजता होणार आहे, अशी माहिती वकील मानिंदर सिंह यांनी दिली.
नवी दिल्ली | अजित पवार गटाकडून शिवसेनेच्या निर्णयाचा दाखला देण्यात आलाय. शिवसेनेच्या शिंदे गटाकडे जास्त संख्याबळ होतं. त्यामुळे शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यात यावं, अशी मागणी प्रतिज्ञापत्रात केली गेलीय.
नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँँग्रेसच्या दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय. निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका. चिन्ह आमच्याकडे असूद्या, अशी विनंती शरद पवार गटाने केलीय.
अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड ही बहुमताने 30 जून रोजी झाली आहे. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवत असल्याचा युक्तीवाद यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय पक्षाचा दर्जासाठी संख्याबळ आवश्यक असल्याचा दावा ही अजित पवार गटाने केला.
जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा युक्तीवाद अजित पवार गटाने सुनावणीदरम्यान केला आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जासाठी संख्याबळ आवश्यक असल्याचा दावा करण्यात आला. तर शरद पवार गटाने यापूर्वी चिन्ह आणि पक्षावर दावा सांगताना पक्षाच्या घटनेचा दाखला दिला आहे.
निवडणूक आयोगात दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाड हे पण शरद पवार यांच्यासोबत निवडणूक आयोगात दाखल झाले आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष यावर सुनावणी होत आहे. दोन्ही गटाचे वकील निवडणूक आयोगात पोहचले आहेत.
राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दोन्ही गटाने दावा सांगितल्यानंतर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. त्याचवेळी सुनील तटकरे यांची मुंबईत पत्रकार परिषद सुरु आहे. त्यांनी या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना चिमटे काढले. तसेच निवडणूक आयोग आमच्या बाजूने निकाल देईल, असा दावा केला.
राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा यावर आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु होत आहे. शरद पवार निवडणूक आयोगात दाखल झाले असून ते सुनावणीसाठी हजर असतील. राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह नेमकं कोणाचा हा तिढा सुनावणीअंती सुटेल.
विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी ससून रुग्णालयाला भेट दिली आहे. ससूनचे डिन संजीव ठाकूर यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे. आरोपी ललित पाटील ससूनमधून पळून गेल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
पुण्यातील तरुणाईचे आकर्षण केंद्र असणाऱ्या मुंढवा-कोरेगाव पार्क इथल्या दोन क्लब्सवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. यापैकी ओरिला या क्लबवर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या कारणास्तव पालिकेने कारवाई केली असून बुलडोजरच्या साहाय्याने तो जमीनदोस्त करण्यात आला आहे. तर त्याच्या शेजारीच असणाऱ्या वॉटर्स या क्लबला जागा मोकळी करून देण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. राज्यातील एका बड्या नेत्यामुळे वॉटर्स या क्लबवरील कारवाई रोखण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
लोकशाही मध्ये बहुसंख्य कोणाकडे आहेत हे पाहिलं जातं. पक्षातील बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी, दादांसोबत आहेत, मोठ्या संख्येने लोक दादांसोबत आहेत त्यामुळं पक्ष चोरणं या वर मला काही बोलायचं नाही. जयंत पाटील यांच्या टिकेला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अशा शब्दात उत्तर दिले आहे.
माझ्याकडे असताना अजितदादा कधी नाराज नव्हते. अजित दादांमुळे जे नाराज व्हायचे त्यांच्या उरावर जाऊन दादा बसले आहेत. राज्यातील जनतेला विश्वास देणारे कोणी नाही. सरकारकडे जाहीरातीसाठी पैसे आहेत. नांदेडच्या रुग्णालयात टास्क फोर्स घेऊन जात भेट का दिली जात नाही अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सरकारवर बरसले आहेत.
गुजरात, गुवाहाटीमध्ये जावून खर्च करायला सरकारकडे पैसै आहेत. गोव्यात जावून टेबलवर नाचायला त्यांच्याकडे पैसे आहेत. पण महाराष्ट्रातील रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत…
दुर्दैवी घडत आहेत, मुख्यमंत्री कुठे आहेत? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नांदेडला जायला हवं होतं. राज्यातील सरकारमध्ये दलाल बसले आहेत. सध्या जी साथ आहे ती भ्रष्टाचाराची साथ आहे. कोणाचे दलाल बसले आहेत का याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे…’ असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोना काळात डॉक्टर नर्स एका योद्ध्याप्रमाणे लढले पण आता त्यांना बदनाम केलं जात आहे. कोरोना काळात औषधांची कमतरता भासली नाही. आपण औषधं कानाकोपऱ्यात पोहोचवली… उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य
आरोग्य यंत्रणेचे तीन – तेरा वाजले आहेत… असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. संकटाचा सामना यशस्वीपणे केला, पण आताच्या सरकारने आरोग्य यंत्रणेचे तीन – तेरा वाजले आहेत. याच आरोग्य यंत्रणेने कोरोना काळात उत्तम काम केलं होतं…
निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादीसंदर्भात सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी शरद पवार हजर राहाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षचिन्हाबाबत आज दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे.
घड्याळ हे चिन्ह अजित दादा यांच्याकडेच राहील… असं वक्तव्य शेखर निकम यांनी केलं आहे. विकासाचा पर्व पाहून आम्ही दादांकडे गेलो शरद पवार अजित पवार यांच्याशी संबंध चांगले आहेत. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात आपल्या विरोधात कोणी उभे राहिला तरी काही फरक पडत नाही. असं देखील शेखर निकम
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअम बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून लॉरेन्स बिश्नोई याला सोडवण्याठी 500 कोटींची खंडणीची मागणी करण्यात आली आहे.
खिचडी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून संदीप राऊत यांची चौकशी सुरू आहे. यावर बोलताना, आम्ही कोरोना काळात मोफत खिचडी वाटत असल्याचं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत लवकरच तुरूंगात जातील त्यांच्या अडचणी वाढणार, बाहेर आलेयामुळ् त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. ते लवकरच तुरूंगात जातील नाही तर आम्ही पाठवू, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. पीक विम्याच्या हप्त्यासाठी 628 कोटींची मंजुरी मिळाली आहे.
हप्त्याची रक्कम न भरल्याने विम्याच्या मदतीमध्ये अडचणी येत होत्या.
नाशिक छ.संभाजी नगर राज्य मार्गावर निफाड तालुक्यातील विष्णूनगर नजीक विंचूरकडून निफाड कडे जाणाऱ्या मार्गावर एकामागोमाग चार वाहने एकमेकांवर धडकली. या विचित्र अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणीही जखमी नाही.
कल्याण स्टेशनवर डेक्कन क्वीन ट्रेन पकडताना अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसरा इसम गंभीर जखमी.
गोरेगावमधील इमारतीत लागलेली आगीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्याप्रकरणी प्रशासनाच्या, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
भारतीय जनात पक्षासोबत जाण्याचा निर्णय मी किंवा जितेंद्र आव्हाड यांनी घेतला नव्हता. प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावरू जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं.
आमदार गेला म्हणजे पक्षही जातो, हे चुकीचं आहे, कोर्टानेच तसं सांगितलं आहे, असे जयंत पाटील म्हणाले. निवडणूक आयोग योग्य निर्णय देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशातील २४ पेक्षा जास्त राज्याचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारही शरद पवार यांच्यासोबत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
लिंगायत आरक्षणाच्या मागणीसाठी वीरशैव लिंगायत समाज आक्रमक भूमिका घेणार आहे. मोहोळ ते सोलापूर पदयात्रा काढत लिंगायत आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. लिंगायत समाजाला आरक्षण न मिळाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
मोफत अन्न दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही कोरोना काळात हजारो लोकांना मोफत अन्न दिले. परंतु अशा गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही, असे शिवसेना ठाकरे गटाटे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोने चांदी दागिने वितळवण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली आहे. भक्तांनी 2009 पासून 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली आहे. हे सोने वितळविले जाणार आहे.
पिंपरी- चिंचवडमधील वाकड येथे आदिवासी मुलींच्या शासकीय वस्तीगृहात विद्यार्थिनी झोपेत असताना त्यांच्या डोक्यात स्लॅपचा प्लास्टर कोसळल्याने विद्यार्थिनी जखमी झाली. अनिता पथवे असे जखमी विद्यार्थिनींच नाव आहे. तिला तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.
सांगलीच्या विश्रामबाग येथे तब्बल साडेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. वाहिद रफिक पठाण, जमीर बागवान, संतोष हाताळे असे आरोपींची नावे आहेत.
नागपुरात सायकलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. सायकल स्पेअर पार्टच्या गोडाऊनला भीषण आग. आगीत 2 हजार सायकल जळून खाक.
गोरेगाव पश्चिम येथील जय भवानी एस आर ए बिल्डींगला मध्यरात्री 3 च्या सुमारास आग लागली. यामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. काहीजण जखमी झाले आहेत.
ट्रामा केअर हॉस्पिटल येथे पचार घेत असलेले रुग्ण
1) 12 पुरुष
2) 16 महिला
3) 01 मुलगी
4) 01 मुलगी
एकूण 30 जण उपचार घेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर दावा केल्यानंतर आज पासून निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात. आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगात प्रत्येक्ष सुनावणीला होणार सुरुवात. दोन्ही गटांकडून कागदपत्र यापूर्वीच केली आहेत सादर. दोन्ही गटांचे प्रमुख प्रमुख नेते या सुनावणी वेळी प्रत्यक्ष उपस्थित नसतील. मात्र वकील आणि दुसऱ्या फळीतील नेते सुनावणीला उपस्थित असतील. अजित पवार 2 जुलैला सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा करत आयोगात याचिका दाखल केली होती
गोरेगाव येथे काल रात्री भीषण आग लागली. काल रात्री 3 वाजता गोरेगाव पश्चिम येथील जय भवानी बिल्डींगला अचानक आग लागली. या आगीत 31 जण जखमी झाले असून त्यापैकी 14 जण गंभीर आहेत. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत नक्षलग्रस्त भागातील राज्यांचा आढावा घेताल जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही बैठक बोलावली असून या बैठकीला हजर राहण्यासाठी फडणवीस दिल्लीत जात आहेत.
16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण अजून लांबणीवर गेलं आहे. येत्या 9 ऑक्टोबर रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार होती. आता त्यावर 3 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तब्बल एक महिना ही सुनावणी पुढे गेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या संगणक प्रणालीमध्ये या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख 3 नोव्हेंबर दाखवण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना दिलासा मिळाला आहे.
गोरेगाव पश्चिमेच्या उन्नत नगरमध्ये असलेल्या समर्थ सृष्टी इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली आहे. पार्किंगमधील चिंधी कपड्यांमुळे ही आग लागली. आग इतकी भीषण होती की ती तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे या इमारतीत अनेक रहिवाशी अडकून पडले. तर काहींनी इमारतीच्या बाहेर धाव घेऊन स्वत:चा जीव वाचवला. अग्निशमन दलाच्या जवानांनी या इमारतीतील 40 ते 50 रहिवाशांची सुटका केली आहे. या आगीत सहा जमांाच मृत्यू झाला आहे.
राष्ट्रवादी पक्ष कुणाचा या मुद्द्यावर आज निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार आहे. आज दुपारी 3 वाजता ही सुनावणी होणार आहे. यावेळी शरद पवार गटाकडून अभिषेक मनू संघवी बाजू मांडणार आहेत. तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंग बाजू नांडणार आहेत. या सुनावणीला शरद पवार जाणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.