मुंबई | 09 डिसेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील स्वच्छतेची आज पाहणी करणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज पुणे शहरात सभा होणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा राज्याचा दौरा सुरु आहे. आरक्षण देण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहे. शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. तसेच क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचाही या लाईव्ह ब्लॉगमधून आपण आढावा घेणार आहोत. शिवाय टीव्ही 9 मराठी चॅनेल आणि यूट्यूब लाईव्हवरही तुम्हाला सगळे अपडेट्स पाहायला मिळतील.
तेलंगणातील भाजपच्या आठ आमदारांनी प्रोटेम स्पीकरसमोर शपथ घेतली नाही. यापूर्वी आमदार टी राजा सिंह यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर शपथ घेणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.
भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे नाव ठरवण्यासाठी निरीक्षक आज छत्तीसगडला पोहोचणार आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो.
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका 21 डिसेंबरला होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे डोळे निवडणुकीच्या तारखेवर बरेच दिवस लागले होते.
सुखदेव सिंह गोगामेडी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी हत्येशी संबंधित आरोपी आणि सूत्रधाराला अटक केली आहे. रामवीर असे आरोपीचे नाव असून तो महेंद्रगड, हरियाणाचा राहणारा आहे.
इंदापूर : अति मागास करून त्यांना सेफ ठवले आहे. आताही 27 टक्के आरक्षण आहे. पण नोकऱ्या 9.5 टक्के आहे. आधी आमचे 27 टक्के आरक्षण पूर्ण भरा, अशी मागणी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली. आमच्या आरक्षणात त्यांना आरक्षण दिले. त्यांना का दिले असे आम्ही म्हणत नाही. काही जास्त मागत नाही. पण, आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका असे भुजबळ यावेळी म्हणाले.
आता पाडापाडीची भाषा सुरू झालीय. ओबीसींच्या हितासाठी भुजबळांच्या पाठिमागे उभे राहा. एका दिवसात हजारो कुनबी दाखले वाटत आहेत. सगळी ओबीसी नेते एकत्र व्हा, असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
इंदापूर : राज्यात काही सुजाण मराठा समाजाचे नेते आहेत. मराठा समाजाचे काही मोठे नेते आहेत. पण, त्यांना बोलायला कसली भती वाटते? मतांची, मग आमच्याकडे मते नाहीत. ८० टक्के मते आमची आहेत. कोण कुणबी सर्टिफिकेट घेणार आहेत? हर्षवर्धन पाटील, मोहिते पाटील, काकडे यांना विचारा कुणबी सर्टिफिकेटपाहिजे का? कोणीही बोलायला तयार नाहीत. कारण निवडणूक आहेत असे भुजबळ यावेळी म्हणाले.
इंदापूर : राज्यात अशांतता कोण माजवत आहे. तुला 24 नंतर दाखवतो हे काय चाललं आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. आमचा विरोध झुंडशाहीला आहे. तुम्ही जर दादागिरी करणार असाल तर तुमच्या दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल, अस इशारा छगन भुजबळ यांनी दिला.
इंदापूर : जरांगे पाटील जिथे उपोषणाला बसले होते तेथे पोलिसांनी सांगितले की चला. चला म्हणताच पोलिसांवर दगडफेक सुरु केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. विधानसभेत उपमुख्यमंत्री यांनी लेखी उत्तर दिले आहे असे भुजबळ यांनी सांगितले. एकूण 80 पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झाले म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला. ही बाजू त्यावेळी पुढे आली असती तर त्याला सहानुभूती मिळाली नसती अशी टीकाही भुजबळ यांनी यावेळी केली
इंदापूर : मी काही बोललो की काही विचारवंत बोलायला लागतात/ महाराष्ट्रात जातीत तेढ निर्माण केली जात आहे. जरांगे रात्री 12, 1 दोन पर्यंत सभा घेतात. त्यांना कायदा आहे की नाही असा सवाल ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारला केला. आपण बोललो की लगेच महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरुय. ते रोज बोलतात पण आम्ही 15 दिवसात बोलतोय. सौ सोनार की एक लोहार की असा इशारा त्यांनी जरांगे पाटील यांना दिला.
इंदापूर : शिंदे, फडणवीस, अजितदादा तुमचे ड्रोन पाठवा आणि बघा इथे ओबीसी किती जमलाय. ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतोय. तुम्ही एक भुजबळ पाडाल पण आम्ही 160 आमदार पाडू. 160 पैकी जतमध्ये जाऊन मी एकच कार्यक्रम करून आलो. आता दौंडमध्ये मराठा आमदार आहे त्याचा पण कार्यक्रम करू. आता सर्व ओबीसी एकत्र झालेत त्यामुळे आता यांचा सरपंच पण निवडून येत नाही. दौंड तालुक्यात 12 पैकी 11 ओबीसी सरपंच निवडून आले फक्त एक मराठा आला, अशी टीका माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली.
इंदापूर : अंतिम सत्य हेच आहे की सत्ता हवी. दुसऱ्याच्या पक्षात बसून निर्णय घेऊ नका. नवीन पक्ष तयार करावा लागेल. निवडणूक आधी हा निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी केले. राज्यात वातावरण चांगले आहे. सत्तेत आपली माणसे बसणार नाहीत तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. खासदारापासून सुरवात करा तेव्हा कुठे आमदारपर्यंत पोहोचू. मला कुणी मालक नाही मीच माझ्या पक्षाचा मालक आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत असे आश्वासनही त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिले.
इंदापूर : इडा पिडा टळू दे, ओबीसीचे राज्य येऊ दे. ओबीसीच्या सर्व जाती जोडा आणि धन दांडग्या मराठा आमदार पाडा. जिथे जरांगे पाटील याची सभा होईल तिथला मराठा आमदार पडला म्हणून समजा असा इशारा लक्ष्मण गायकवाड यांनी इंदापूर येथील सभेत बोलताना दिला. भटके विमुक्त हे नाव दिले पण आता हे नाव काढून टाकायला हवे. संविधानात अशा कोणताही शब्द नाही असेही ते म्हणाले.
जळगाव : प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये मोठा फरक आहे. मात्र, जे देशद्रोही आहेत. त्यांचे दाऊदसोबत संबंध आहेत. ज्यांनी दाऊदसोबत मनीलॉन्ड्रीग केली ते नवाब मलिक आमच्या सोबत कदापि राहू शकत नाही, असं प्रत्युत्तर मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.
इंदापूर : आम्हाला तीन तीन महिने दाखले मिळत नाही आणि तिकडे एक दिवसात दाखले देतायत. अंबडमधील सभेनंतर म्हणाले भुजबळ साहेबांना असे करेल तसे करेल. अरे साहेबांच्या केसाला धक्का लागू देत नाही. रामोशी समाज सोबत आहेत. गावागावात सगळ्यांनी एकत्र या आणि एकजुटीने लढा द्या. आपले आरक्षण वाचवा आणि लढा द्या. नागपूर अधिवेशनात धनगर समाजाचा मोर्चा धडकणार आहे अशी घोषणा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
वुमन्स आयपीएल ऑक्शनमध्ये एनाबेल सदरलँड हिला दिल्ली कॅपिटल्स संघाने 2 कोटी रूपयांना विकत घेतलं आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये मोठी चुरस रंगली होती मात्र अखेर दिल्लीने बाजी मारली.
ज्यांच्या विरोधात बाळासाहेब लढले त्या शरद पवारांसोबत हा उद्धव जाऊन बसलाय आणि सोनिया गांधीची आता हा चाटतोय. पाय म्हणतो मी ऊगाच गैरसमज नको, असं रामदास कदम म्हणाले.
कुणी गद्दारी केली हे तुझ्या पिल्लूच्या डोक्यावर हात ठेऊन सांग तू गद्दारी केली नाही, ते पिल्लू आदित्य कुठं कुठं फिरतंय हे सगळ्यांसमोर लवकरच येईल, असं म्हणत रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
अमरावती : अमरावतीत राजमाता अहिल्याबाई स्त्री शक्ती पुरस्कार समारंभ. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यभरातील महिलांना राज्यस्तरीय स्त्री शक्ती पुरस्काराने केलं जाणार सन्मानीत, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती. विनिता सिंगल, वैशाली माडे, स्नेहल लोंढे, रक्षा पुणेकर आणि ज्योती देशमुख या कर्तृत्ववान महिलांचा केला जाणार सन्मान.
पुणे : एनआयए ची पुण्यात कोंढवा आणि मोमीनपुरा परिसरात छापेमारी. कोंढवा तालाब फॅक्टरी इथे इसेन्शिया सोसयटीमध्ये शोएब अली शेखच्या घरी छापेमारी लॅपटॅाप आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहे. मोमीनपुरा गुलमोहर सोसायटी मध्ये अन्वर अली याच्या घरी केलेल्या छापेमारीत मोबाईल लॅपटॅाप आणि एक सत्तूर जप्त करण्यात आले. २०२३ मध्ये एनआयए ने दाखल केलेल्या इसिस संबंधांतील केस मध्ये एटीएसच्या मदतीने छापेमारी करण्यात आली.
NIA च्या छाप्यातील संशयित आरोपींना दिल्लीतील कार्यालयात आणले जाणार आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना विमानाने दिल्लीत आणणार आहेतय. बोरिवली गावातून त्यांना ताब्यात घेतले गेले आहे. आज देशभरात विविध ठिकाणी NIA चे छापेमारी सुरु आहे.
मुंबई : आज पहाटे 5 वाजल्यापासून एनआयएचे पथक मुंबईतील आंतरराष्ट्रीय कार्गोवर छापे टाकत होते. दुपारी एक वाजेपर्यंत एनआयएची छापेमारी कार्गोमध्ये सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, छापेमारीत एनआयएचे २० हून अधिक अधिकारी उपस्थित होते आणि अनेकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छापेमारीच्या वेळी एनआयएचे अनेक वरिष्ठ अधिकारीही येथे उपस्थित होते. सध्या कार्गोच्या आत आता छापेमारी संपली आहे आणि NIA च्या टीमने काही लोकांना ताब्यात घेऊन सोबत घेतल्याची माहिती मिळाली आहे.
जळगावच्या चाळीसगावात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. दूधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर फेकले. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाने शासनाच्या दरानुसार दुधाला 34 रुपये भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
ड्रग्ज तस्कर ललित पाटीलसह रोहित चौधरी, झिशान शेख, हरीश पंत यांना १० दिवसांची पोलीस कोठडी नाशिक न्यायालयाने दिली आहे. १८ डिसेंबरपर्यंत त्यांची पोलीस कोठडी असणार आहे.
कांदा प्रश्नावर निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. मंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत ही बैठक होणार आहे.
ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून नगर – संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. या आंदोलनास प्रहार संघटनेचा पाठिंबा दिला आहे. ऊस दर मिळाला पाहिजे, कांदा निर्यातबंदी निर्णय मागे घ्या आणि दूध दरासाठी शेतकरी रस्त्यावर आले आहे. नेवासा फाटा येथे महामार्ग अडविल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
इंदापूर तालुक्यात आज ओबीसी आरक्षण बचाव यल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यामेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. ओबीसी महिला बचत गटाकडून भुजबळ यांच्या स्वागतासाठी तब्बल अडीचशे किलोचा हार बनवण्यात आला आहे.
कांदा निर्यात बंदी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. कांदा आंदोलनकर्ते कांद्याच्या माळा घालून निर्यातबंदीचा विरोध करीत आहेत.
घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचन याला एनआयएने ताब्यात घेतले आहे. 15 जणांना ताब्यात घेतलेल्यांपैकी साकिब नाचन याचाही समावेश आहे.
भिवंडीत एनआयएने छापेमारी केली. संशयीतांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना दार न उघडल्याचा प्रकार घडला.
एनआयएने ISIS विरोधात मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रात तब्बल 40 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या छाप्यात 15 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. 500 पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे.
नाशिकच्या लासलगावमध्ये पुन्हा कांदा लिलाव बेमुदत बंद करण्यात आला आहे. याचा परिणाम पंधरा खरेदी केंद्रावर होणार आहे.
नागपूरच्या विधानभवनावर आशा सेविकांनी मोर्चा काढला आहे. राज्यसरकारकडून 15 हजार रूपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र ते आश्वासन हे कागदोपत्रीच असल्याने आशा सेविकांनी मोर्चा काढला आहे.
भूजबळांच्या दबावामुळे भूमिका बदलू नका असे आवाहन मनोज जरांगे यांनी सरकारला केले आहे. नांदेडमध्ये नोंदी असूनही निरंक अहवाल दिला याकडेही मनोज जरांगे यांनी लक्ष वेधले. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे असंही ते म्हणाले.
24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळणार आहे असं मराठा नेते जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले. आमचं सर्व मंत्र्यांवर बारकाईने लक्ष आहे. असंही मनोज जरांगे यांनी सांगितलं.
मिरज-पंढरपूर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट वाहनाने दोन मोटारसायकल चालकांना चिरडले. या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
हिवाळी अधिवेशनामध्ये ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा करा अशी मागणी भाजपचे ओबीसी सेलचे नेते अशोक जिवतोंडे यांनी केली आहे. पुढील आठवड्यात चर्चा करण्याची मागणी.
नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरील आरोप सारखेच आहेत, मग फडवणीसांनी पटेलांबाबत पत्र का लिहीलं नाही, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक नाही, भाजपच्या नैतिकतेचं ऑडिट होणं गरजेचं आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली.
ड्रग्स रॅकेटमध्ये २ मंत्री सहभागी आहेत, सरकारनं कारवाई केली का ? ललित पाटील प्रकरणातील मंत्र्यांवर सरकारने कारवाई केली का ?
मलिक चालत नाहीत पण प्रफुल्ल पटेल कसे चालतात, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोखले ब्रिजची पाहणी केली. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला.
दिल्लीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरला आहे. सकाळच्या सत्रात दिल्लीवर धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत बाहेर पडत असाल तर तोंडाला मास्क लावून बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सकाळच्या सत्रात रस्ते दिसणंही अवघड झालं आहे. हवा प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
एपीएमसी बाजारात वाटाण्याची आवक वाढली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात वाटाण्याची आवक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. दिवसाला जवळपास 35 ते 60 गाड्यांची आवक होत आहेत. आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाटाण्याच्या दरात घसरण होत आहे,
मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी गठीत केलेल्या शिंदे समितीचे अध्यक्ष आज पुण्यात आहेत. निवृत्ती न्यायमूर्ती संदीप शिंदे आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. आढावा घेत पुणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची न्यायमूर्ती शिंदे महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीण केलेल्या समितीचे संदीप शिंदे हे अध्यक्ष आहेत. आज पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात संदीप शिंदे घेणार पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत.
छगन भुजबळांची इंदापूरात आज ओबीसी एल्गार सभा होणार आहे. सभेसाठी भुजबळ कालपासून पुण्यात मुक्कामी आहेत. भुजबळ 10 वाजता पुण्याहून इंदापूरकडे रवाना होणार आहेत. भुजबळ मुक्कामी असणाऱ्या सर्किट हाऊसबाहेर पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहेत.
पुण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जाहीर मेळावा… ठाकरे गटाच्या मेळाव्याला खासदार संजय राऊत करणार संबोधन.. ठाकरे गटाकडून पुण्यात मेळाव्याची जोरदार तयारी… मेळ्याच्या ठिकाणी ठाकरे गटाची मोठी पोस्टरबाजी… मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे गट पुण्यात करणार शक्ती प्रदर्शन… मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात… पुण्यात आज संध्याकाळी संजय राऊत यांची जाहीर सभा… आंबेडकर कॉलेजच्या मैदानावर ठाकरे गटाचा आज संध्याकाळी पार पडणार मेळावा… पुण्यातून संजय राऊत साधणार सरकारवर निशाणा
पुण्याच्या आळेफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बंद केलेलं कांद्याचे लिलाव आज पासून सुरू… कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी व्यापारी , बाजार समितीचे संचालक यांचा निर्णय… केंद्र सरकारने कांद्यावर निर्याद बंदी केल्यानंतर कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले होते… लिलाव बंद केल्याने शेतकऱ्यांचे च नुकसान होत असल्याने लिलाव सुरू करण्याची व्यापाऱ्यांची सहमती
नागपूर येथील सभेला शरद पवार यांच्यासोबत उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. १२ तारखेला शरद पवारांची नागपुरात संघर्ष यात्रेची समारोप सभा… सभेला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित… रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा होणार समारोप
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातल्या पाडळी परिसरात बिबट्याचे दर्शन… पाडळी गावातील माळ परिसरात गावकऱ्यांना दिसला बिबट्या… बिबट्याने कुत्र्या वर ही केला हल्ला… वनविभागाकडून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न… मात्र जाळीला हुलकावणी देत बिबट्याने काढला पळ
पुणे रेल्वे विभागाची एकाच महिन्यात एकूण 100 कोटी रुपयांची कमाई… पुणे रेल्वे विभागाला नोव्हेंबरमध्ये तिकीट विक्री मधून मिळाले 100 कोटी रुपयांचे उत्पन्न… दिवाळी छटपूजा अशा सणांमुळे रेल्वेच्या उत्पादनात मोठी वाढ… तर दंड वसुलीतून देखील रेल्वेची 3 कोटी रुपयांची कमाई
पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुणे जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो आणि कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 11 कोटी 38 लाख 76 हजार 625 रुपयांचे नुकसान झाले आहेत.
मुंबई महानगरपालिकेकडून डीप क्लिन ड्राइव्ह आज राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कामांची पाहणी करण्यात आली. पहाटे 7.00 वाजल्यापासून सांताक्रूझ मिलन सबवे ते टिळकनगर येथे पालिकेच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत.
मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी गठीत केलेल्या शिंदे समितीचे अध्यक्ष आज पुण्यात येत आहे. निवृत्ती न्यायमूर्ती संदीप शिंदे आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार आहे. मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी कठीण केलेल्या समितीचे संदीप शिंदे हे अध्यक्ष आहेत.
सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलांसोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची आज बैठक होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे. बैठकीसाठी तुपकर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.