मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांची भेट ही आजची सर्वात मोठी बातमी आहे. मुंबई ते दिल्ली या भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण आलंय. यमनची राजधानी साना येथे पैसे वाटपाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 78 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 13जण गंभीर जखमी आहेत. नाशिकच्या मालेगाव बाजार समितीचे चित्र आज स्पष्ट होणार. आमदार नितीन देशमुख यांची संघर्ष यात्रा अडवण्यासाठी नागपुरात पोलीसांचा फौजफाटा तैनात. नक्षलसमर्थक प्रा. जीएन साईबाबा यांना निर्दोष सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. नांदेडमध्ये रात्री अवकाळी पाऊस. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. यासह इतर राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
परभणी :
परभणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस,
अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ,
रमजान ईदच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ.
चंद्रपूर :
पोंभुर्णा येथे सुरु असलेलं आदिवासींचं आंदोलन अखेर मागे
उपविभागीय अधिकारी संजय डवले आणि तहसीलदार शुभांगी कनवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र आंदोलकांना दिल्यावर आंदोलनाची झाली सांगता
आंदोलकांच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासनाकडून ठोस आश्वासन
पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी बहुल गावांना पेसा अंतर्गत सामील करण्याची कारवाई पुढील 2 महिन्यात पूर्ण
ठाणे:
ठाण्यामध्ये दोन गटांमध्ये वाद
फेसबुकवर पोस्ट टाकल्याने वाद
माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने वाद
दोन्ही गट कोपरी पोलीस मध्ये तक्रार दाखल करण्याचे दाखल
प्रमोद चव्हाण हा भाजपचा कार्यकर्ते असल्याची माहिती
मुंबई :
मराठा आरक्षणाच्या या सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्याचं वृत्त निराश करणारं आहे.
मविआ सरकारने प्रयत्नांची शिकस्त केल्यानंतरही मराठा आरक्षणाचा निकाल लागला, तेव्हा विरोधातील भाजपाने मविआवर निष्क्रियतेचा आरोप करत राजकारण केलं.
हाच न्याय लावायचा झाला, तर आजच्या निकालाची जबाबदारीही निर्विवादपणे सध्या सत्तेवर असलेल्या राज्य सरकारला घेऊन स्वतः निक्रिय असल्याचं कबूल करावं.
पण तरीही राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने केला तर त्यांना सहकार्यच राहील.
मराठा आरक्षणाच्या या सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्याचं वृत्त निराश करणारं आहे. #मविआ सरकारने प्रयत्नांची शिकस्त केल्यानंतरही #मराठा_आरक्षणाचा निकाल लागला, तेंव्हा विरोधातील भाजपाने मविआवर निष्क्रियतेचा आरोप करत राजकारण…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 20, 2023
#WATCH उत्तर प्रदेश: लखनऊ में 2 बदमाशों ने असलाह दिखाकर महिला से दिनदहाड़े चेन छीनी।
(वीडियो सीसीटीवी का है) pic.twitter.com/nyutyupIFa
— ANI_HindiNews (@AHindinews) April 20, 2023
महाराष्ट्रात कोरोनाचे 1113 रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत 24 तासात 207 रुग्ण आढळलेअसून एकाचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत कोरोनाच्या 1603 नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
Delhi reports 1,603 fresh #COVID19 cases and 1,526 recoveries in the last 24 hours. Active cases 6,120
Today’s Covid Positivity 26.75% pic.twitter.com/zi8QzOK1hy
— ANI (@ANI) April 20, 2023
24 कॅरेट ते 14 कॅरेटपर्यंत सोने म्हणजे काय
सोन्याचे बदलते रुप समजून घ्या
पिवळेधम्मक सोने नाही फसवणार
सोन्यात कशी होते फसवेगिरी, वाचा ही बातमी
तुमचा सन्मान करताना होतो का तोटा
सरकार कापत तर नाही नाही ना तुमचा खिसा
सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा फायदा काय
गुंतवणूकदारांची कसा मिळतो लाभ, वाचा एका क्लिकवर
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक
गेल्या 24 तासात सात नवीन रुग्ण
83 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू
41 जणांवर उपचार सुरू
सहशिक्षिकेच्या शोषणामुळे शिक्षकाची आत्महत्या
हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील घटना
ब्लॅकमेल करून पैशांची वारंवार मागणी
शिक्षकाची शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या
सांगलीसह मिरज शहरात काही भागात गारांचा पाऊस
विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी
उकाड्याने हैराण झालेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा
अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेकांची उडाली तारांबळ
42 रुपयांचा शेअर थेट 4 रुपयांत
खरेदीची संधी, खरेदीदारांच्या उड्या
कंपनीवर एक छदाम ही कर्ज नाही
गेल्या पाच दिवसांत शेअरमध्ये वाढ
गेल्या 12 वर्षांत कया शेअरमध्ये घसरण, वाचा सविस्तर
बैठकीला विदर्भातील भाजपचे आमदार आणि खासदार उपस्थित
संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये मार्गदर्शन केले
सरकारने केलेली काम जनतेपर्यंत कशी पोहोचवायची यावर मंथन
काही भागात चांगला तर काही भागात मात्र रिमझिम पाऊस
नरखेड, काटोल तालुक्यात काही गावांमध्ये चांगला पाऊस
काही ठिकाणी गारपीट झाल्याने संत्र्याच्या पिकांचे नुकसान
संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली
राऊत-शरद पवारांमध्ये अर्धा तास बैठक
सरकारी बँकांची खास योजना
5 लाख घरांचा करणार मोठा लिलाव
देशातील चांगली मालमत्ता खरेदीची संधी
एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतील बेस्ट डील
त्यासाठी बँकांनी शोधला हा उपाय, वाचा सविस्तर
माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची पक्षात हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव
शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय विभुते यांची माहिती
माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणजे शिवसेना नाही,
घोरपडे यांनी जाहीर रित्या उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे असल्याचे जाहीर करावं
माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी शिवसेना ठाकरे गटाशी केली गद्दारी – जिल्हाप्रमुख संजय विभुते यांचा आरोप
उद्धव ठाकरे यांचे बाळासाहेव ठाकरे स्मारक पाहाणी दौरा नाट्य
MMRDA चे चेअरमन श्रीनिवासन यांच्यावर उद्धव ठाकरे खूप संतापले
पाहणी दौरा श्रीनिवासन यांच्याशी संपर्क करून, वेळ ठरवून निश्चित केला होता
पण ठाकरे-शिंदे राजकीय संघर्षामुळे श्रीनिवास यांनी ऐनवेळी पाहणीला जाणं टाळलं
त्यांनी CM-DCM शासकीय बैठकीत असल्याचे कारण दिले
शिंदे-ठाकरे संघर्षात श्रीनिवास यांची कोंडी
मिलिंद नार्वेकर हे सुरुवातीपासून मोबाईल फोनद्वारे श्रीनिवासन यांच्या संपर्कात होते
उशिरा का होईना पण स्मारकाच्या कामाच्या पाहाणी दौऱ्यात श्रीनिवासन यांना आणण्यात मिलिंद नार्वेकर यांनी महत्वाची भूमिका बजावली
ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी
उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेही उपस्थित
लवकर बाळासाहेबांचं स्मारक खुलं होईल – उद्धव ठाकरे
संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला
राऊत सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल
वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती
महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची समिती
समिती एक महिन्यात अहवाल सादर करणार
केवळ 10 मिनिटांत केली 233 कोटींची कमाई
शेअर बाजारातील उलटफेरचा मोठा फायदा
या कंपनीचे शेअरने काही मिनिटांतच केले मालामाल
या शेअरमध्ये यापूर्वी वाढवली होती गुंतवणूक
गुंतवणूक वाढविण्याचा निर्णय पडला पथ्यावर, वाचा बातमी
गोंदिया तापमान 41 डिग्री सेल्सिअस
काल 43 अंशावर पाहोचला होता तापमान
यंदाचे सर्वाधिक तापमान
धाराशिव नाव वापरण्याबाबत उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश
उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा
पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार असुन 10 जून पर्यंत उस्मानाबाद हे नाव वापरा
धाराशिव हे जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव शासकीय व इतर कामकाजासाठी वापरू नये
महसूल व जिल्हा परिषद विभागाकडून उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव धाराशिव असे वापरले जात होते त्याबाबत आजच्या सुनावणीत पुरावे व प्रशासकीय पत्रव्यवहार कोर्टात सादर करण्यात आला त्यानंतर कोर्टाने सूचना केल्या
संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचे व उस्मानाबाद तालुका नाव बदलण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून आक्षेपावर सुनावणी सुरु
केवळ उस्मानाबाद शहराचे नाव हे धाराशिव केले आहे त्यामुळे शहरासाठी धाराशिव हे नाव वापरता येणार
जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव वापरू नये, ते उस्मानाबाद असे वापरावे असे नमूद केले
याचिकाकर्ते याचे वकील ॲड प्रज्ञा सतीश तळेकर यांची माहिती
उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा
पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार असून 10 जूनपर्यंत उस्मानाबाद हे नाव वापरा
धाराशिव हे जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव शासकीय व इतर कामकाजासाठी वापरू नये
सर्वसामान्य भाविकांना आता थेट करता येणार विठ्ठल मंदिरात सेवेकरी म्हणून काम
सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या इच्छुक भाविकांची लवकरच सुरू होणार मंदिर समिती मार्फत नोंदणी प्रक्रिया
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या बैठकीत आज झाला निर्णय
समिती कर्मचाऱ्यांवरील ताण व हंगामी कर्मचाऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी केला सेवेकर यांचा उपाय
अकोट मार्गावर असलेल्या उन्हाड नाला परिसरात रानटी डुकराने एका वृद्ध महिलेवर हल्ला चढविला ..
या हल्ल्यात वृद्ध महिला घटनास्थळावरच ठार झाली
या घटनेत मृत्यू झालेय महिलेचे 60 वर्षीय जनाबाई रामचंद्र इंगळे असे नाव आहे
तेलंगणा ते दक्षिण तामिळनाडू इथंपर्यंत गेलंय
त्यामुळे हवेतील दमटपणा कमी झाला आहे
मात्र पुढील चार दिवस कमाल तापमानात वाढ होईल
आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी
कोकणात हवामान कोरडं राहणार
पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज
भाजपची पहिली बाजार समिती बिनविरोध
बाजार समितीवर भाजप आमदार सुरेश धस यांचं वर्चस्व
महाविकास आघाडीला मोठा धक्का
पुढील तीन तास राज्यातील काही भागात पावसाची शक्यता
काही ठिकाणी विजा, गारा आणि वाऱ्यासह पाऊसाची शक्यता
हवामान खात्याचा अंदाज
पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली , बीड, छ. संभाजीनगर , जालना, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर
या जिल्ह्यांना पुढील तीन तासासाठी इशारा
माणसांसह प्राणी देखील हैराण
कात्रज प्राणी संग्रहालयात प्राण्यांना थंड पाण्याने स्नान
सत्ता बदलानंतर भाजप आमदार राम शिंदे यांनी दिला रोहित पवारांना धक्का
कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकीर भाजप आमदार राम शिंदे यांच्या गटात
बाजार समितीच्या पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शामिल झाल्याने एकच खळबळ
कल्याण डोंबिवली उन्हाचा पारा वाढला
आज कल्याण डोंबिवली 40°c तापमान
गर्मीमुळे नागरिक हैराण
अमरावती शहराजवळील कठोरा बुजरूक गावात तणावपूर्ण शांतता
गावातील दिशादर्शक फलक काढल्याने गावात निर्माण झाले होते तणावाचे वातावरण
गावात चौकाचौकात पोलिसांचा तडगा बंदोबस्त
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी लावले होते दिशादर्शक फलक
मध्यरात्री काही लोकांनी फलक काढल्याने गावात निर्माण झाला तणाव
पंचशील नगरातील ग्रामस्थांनी केली नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
ज्याठिकाणी फलक होते त्याच ठिकाणी पुन्हा फलक लावण्याची पंचशीलनगर मधील लोकांची मागणी
फलक काढल्याने वाद निर्माण झाल्यानंतर ग्रामपंचायत घेणार फलक लावण्यासंदर्भात ठराव…
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे भीषण आग
स्क्रॅपच्या कचऱ्याला अज्ञात व्यक्तीने लावली आग
विजेच्या खांबाभोवती स्क्रॅपचा मोठा ठीक
लोकवस्तीत असलेल्या सक्रॅपच्या ढिगार्याला लागली
आगीमुळे पसरले सर्वत्र धुराचे साम्राज्य
अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू
आराध्या बच्चनच्या याचिकेबाबत दिल्ली हायकोर्टात सुनावणी
दिल्ली हायकोर्टाने गुगलसह युट्यूब चॅनेल्सला जाहीर केला समन्स
अकरा वर्षीय आराध्या बच्चनच्या प्रकृती विषयक दोन यूट्यूब चैनल आणि एका वेबसाईटने खोटी बातमी दिली होती
बच्चन कुटुंबियांकडून दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती
न्यायाधीश सी हरीशंकर यांच्या समोर झाली सुनावणी
आराध्या बच्चन बाबत यापुढे कोणतेही व्हिडिओ प्रसारित करण्यावर बंदी – दिल्ली हायकोर्टाचा आदेश
शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट झाल्याचा धक्कादायक
सांगली जिल्हा बँकेच्या कवठेएकंद शाखेतील प्रकार
या प्रकरणात बँकेकडून चौकशी सुरु करण्यात आलीये
तक्रारदार शेतकऱ्यांना बँक तात्काळ घट झालेले पैसे देणार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ याची माहिती
नाशिक बांधकाम व्यवसायिकांवरील छापेमारीचे कलेक्शन इगतपुरीत
नाशिक येथील 15 बांधकाम व्यवसायिकांवर छापेमारी झाली.
आता त्याचे कनेक्शन इगतपुरीत पाहायला मिळत मिळत आहे.
येथील बालाजी ट्रेडिंग म्हणून असलेल्या एका फर्मवर आयकर विभागाने छापेमारी केली
सकाळी 7 वाजेपासून आयकर विभागाचे 7 ते आठ अधिकारी कार्यवाही करत आहेत.
साधारण सहा तास उलटून गेल्यावरही अजून चाैकशी सुरु आहे.
मनमाड बाजार समितीच्या निवडणूकीला गालबोट
अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी दोन गटात धक्काबुक्की
शिवसेना शिंदे गट व मविआ गटात धक्काबुक्की
अर्ज माघारी घेण्याच्या कारणावरून झाला वाद
बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यादा थेट सभागृहात झाली हाणामारी
6 मेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कोकणात आमने सामने
उद्धव ठाकरेंची महाड येथे जाहीर सभा
राज ठाकरेंची रत्नागिरीत जाहीर सभा
मालेगाव : बाजार समिती मालेगाव निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित,
मालेगाव जिल्ह्यातील बाजार समितीची निवडणूकीत चुरशीची लढत,
सोसायटी आणि ग्रामपंचायत पॅनल मधील यादी जाहीर,
मालेगावात महाविकास आघाडीचा पॅनल जाहीर,
पालकमंत्री दादा भुसे यांना आव्हान देण्यासाठी अद्वय हिरे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात,
अद्वय हिरे यांच्या मविआ विरुद्ध पालकमंत्री भुसे यांच्या पॅनल मध्ये सरळ सरळ होणार लढत.
ठाणे : 27 गावांच्या न्याय हक्कासाठी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती आणि ग्रामस्थांची केडीएमसी वर धरणे आंदाेलन
पालिकेने लावलेला मालमत्ता कर वाढ रद्द करावी आणि अन्य विविध मागण्यांसाठी केडीएमसी मुख्यालय बाहेत धरणे आंदाेलन
सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
नाशिक : मालेगाव शहराचे तापमान 42°
मालेगावच्या तापमानात वाढ, प्रशासन अलर्ट मोडवर
मालेगाव सामान्य रुग्णालयात 20 बेडचा उष्माघात कक्ष
डॉक्टरांकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
चंद्रपूर : उन्हाची झळ बसू नये म्हणून नागरिक घेऊ लागले काळजी
चंद्रपूरमधील तापमानात वाढ, 42. 8 वरुण 43.8 असे उच्चांकी तापमान
चंद्रपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून गणले गेले
शहराच्या विविध भागात दुपारी बारा ते चार दरम्यान शुकशुकाट
नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टाने गुगलसह यु ट्यूब चॅनेल्सला जाहीर केला समन्स
अकरा वर्षीय आराध्य बच्चनच्या प्रकृती विषयक दोन यूट्यूब चैनल आणि एका वेबसाईटने खोटी बातमी दिली होती
बच्चन कुटुंबियांकडून दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती
न्यायाधीश सी हरीशंकर यांच्या समोर झाली सुनावणी
आराध्या बच्चन बाबत यापुढे कोणतेही व्हिडिओ प्रसारित करण्यावर बंदी – दिल्ली हायकोर्टाचा आदेश
छत्रपती संभाजीनगर : डॉक्टर नसतानाही शासनाची फसवणूक करणाऱ्या सिल्लोडच्या तरुणावर गुन्हा दाखल
वैद्यकीय शिक्षण नसताना तब्बल ५ वर्षे आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी
एवढेच नव्हे तर रुग्णही तपासले आणि अनेकांवर उपचार केले
काही दिवसांपूर्वी कागदपत्रांच्या तपासणीत हा प्रकार प्रशासनासमोर आला
त्यानंतर मोहसिन खान शेरखान पठाण याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई : नगर विकास खात्याच्या शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत नागपूर महानगर पालिकेला प्रथम क्रमांक
ठाणे महानगर पालिका दुसऱ्या स्थानावर तर तिसऱ्या स्थानावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा क्रमांक
कोल्हापूर : घटनेमुळे रुग्णालय परिसरात खळबळ,
सीपीआर रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाबाहेरील पत्र्याच्या शेड जवळ आढळली अर्भक,
मृत अर्भक कुठून आली याबाबत संभ्रमावस्था,
सीपीआर रुग्णालयाच्या वैद्यकीय कचऱ्यातून कुत्र्यांनी दोन्ही अर्भक आणली असण्याचा संशय,
ही अर्भक बाहेरून कोणी आणून टाकली का याबाबतही शोध सुरू,
लक्ष्मीपुरी पोलिसांकडून केला जातोय घटनेचा तपास.
मुंबई : सहा ते सात तास काहीही खाल्लेले नव्हते,
काही श्री सदस्यांनी पाणीही पिलेले नव्हते,
खारघर मृत्यू प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आला,
चाळीशीच्या वर पारा असल्याने उष्माघात झाल्याचे म्हंटले आहे.
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार.
भाजपा विरोधात जिल्ह्यातील महाविकास आघाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत एकवटली.
जत, कवठेमहांकाळ, मिरज हे तालुके मिळून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 15 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे
कॉग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे अविनाश पाटील, मनोजबाबा शिंदे यांच्या उपस्थितीत झाली घोषणा
अंगणवाडी सेविकांना मोबाईल हँडसेट देण्यासाठी इतका वेळ का लागत आहे ?
या अंगणवाडी सेविकांना चार महिन्यांमध्ये मोबाईल हँडसेट द्या असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यात उष्माघात वाढला आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट पडत आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरीता अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने घेतला आहे.
राज्य शासनातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या एप्रिल २०२३ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये जमा करण्यात येईल, असा निर्णय अधिकारी महासंघाने घेतला आहे. याबाबत महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली.
सुमारे दोन तास या दोघांमध्ये चर्चा झाली.
अन्य कोणताही नेता या भेटीदरम्यान उपस्थित नव्हता अशी माहिती मिळत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती आर. डी. धनुका यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांचा समावेश असलेल्या कॉलेजियमने न्यायमूर्ती धनुका यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली होती.
सध्या प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारसही या कॉलेजियमने केली होती.
अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला नव्हता – संजय राऊत
अजित पवार भाजपासोबत जाणार नाही असे म्हणालो होतो- संजय राऊत
महाविकास आघाडी मजबूत राहावी यासाठीच आमचे प्रयत्न राहातील- संजय राऊत
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. मृतांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला असून यामधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
– मृतांपैकी 12 जणांनी मृत्यूपूर्वी 6 ते 7 तास काहीही खाल्ले नव्हते.
– मृत्युमुखी पडलेल्या काही जणांना हायपर टेन्शन, डायबिटीस, हृदयरोग अशा व्याधी होत्या.
– वेळेवर अन्न, पाणी मिळणे नाही त्यातच ऊन जास्त झाल्याने 14 जणांचा मृत्यू
– उन्हात बसलेल्यांना पाण्यासह सावलीचीही गरज होती.
– कार्यक्रमात असलेले पाणी लोकांपर्यंत पोहचले नाही त्याचा मोठा फटका बसला
महाराष्ट्र भूषण सोहळ्यात लोकांना पाणी न मिळाल्याने मृत्यू- संजय राऊत
नितीन देशमुखांच्या अटकेवर संजय राऊत यांची टिका
कार्यकर्त्यांना अटक करून अज्ञात ठिकाणी नेले- संजय राऊत
कर सवलतीचा तर पडेल पाऊस
दुप्पट फायदा मिळविण्यासाठी करावे लागेल हे काम
गुंतवणुकीवर मिळते सरकारकडून हमी
ही योजना ई-ई-ई श्रेणीत, असा होईल फायदा, बातमीसाठी येथे क्लिक करा
विदर्भाच्या काही भागात आज गारपिटीची शक्यता
उत्तरेकडून थंड तर दक्षिणेकडून दमट वारे महाराष्ट्रात भेटत असल्याने वातावरणात बदल
लोकसंख्या वाढीची करु नका चिंता
चीनला मागे टाकत भारत आघाडीवर
कसा होईल लोकसंख्ये वृद्धीचा फायदा
भारतीय अर्थव्यवस्थेला कसा मिळेल बुस्टर डोस
तज्ज्ञांनी मांडले काय गणित, बातमी एका क्लिकवर
पन्नास श्री सदस्यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गप्प
या प्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा
खोके देऊन लोकांची तोंड बंद केली जात आहेत- संजय राऊत यांचा आरोप
फडणवीस यांची माणुसकी मेली का? श्री सदस्यांच्या मृत्यूवर बोलत का नाही
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे गेल्या पाच-सहा दिवसांपासून ग्रामपंचायत प्रशासनातर्फे करण्यात येणारा पाणीपुरवठा हा पिवळसर व दुर्गंधीयुक्त होत आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न इथे उद्भवत आहे साथीच्या आजाराची भीती नागरिक व्यक्त करत आहे त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थ या ठिकाणी करत आहे.
साईबाबा संस्थानच्या दानपेटीतील नाण्यांमुळे बँका मेटाकुटीला
साईबाबांच्या दानपेटीत दर आठवठ्याला सरासरी ७ लाख तर वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची नाणी होतात जमा
नाणी स्विकारणे बँकांना झाले कठीण
शिर्डीतील १२ हून अधिक तर नाशिकच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत साई संस्थानचे खाते
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी.
सुमारे 1 ते दीड किलोमीटर वाहनाच्या रांगा.
अमृताजन पुलाकडून बोरघाट पोलीस चौकी ते खोपोलीच्या दिशेने वाहनाच्या रांगा.
एनआयएने पुण्यात केलेल्या कारवाईवरून भाजप नेते मुरलीधर मोहोळाची काँग्रेसवर टीका
मोदी आणि अमित शाह यांच्या कणखर नेतृत्वाखाली दहशतवादी कारवायांना सतत आळा घालण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत,
काँग्रेस सरकार असताना पुण्यात २ वेळा बॉम्ब ब्लास्ट झाला होता,
मोदी सरकार आल्यापासून आता नागरिकांना सुरक्षित वाटत आहे.पुणेच काय पण सर्व देशात सुरक्षिततेची भावना आहे.
दहशतवादी कृत्यासाठी वापर होत असल्याने पुण्यातील शाळेचे २ मजले सिल करण्यात आले आहेत.
नाशिक शहरात गॅस पाईपलाईनसाठी जागोजागी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आल्याने नागरिक देखील त्रस्त झाले आहे. या सर्व खोदलेल्या रस्त्यांचे 30 मे पूर्वी डांबरीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच आगामी काळात पावसाळा लक्षात घेता, 30 एप्रिलनंतर शहरातील कोणताही रस्ता फोडला जाणार नाही, अशी तंबी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलीय. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अपघात झाल्यास संबंधित अभियंत्यांना जबाबदार धरण्याचा इशारा देण्यात आलाय.
सोने-चांदी इतके वधारले
अक्षय तृतीया महागाईचा मुहूर्त गाठणार
पेपर गोल्ड, डिजिटल गोल्डचा ही पर्याय
सोने खरेदीचे ग्राहकांसमोर अनेक पर्याय
तज्ज्ञांनी दरवाढीविषयी काय केला दावा, वाचा सविस्तर
कर्नाटक विधानसभा निवडणूक
रामदुर्गचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित गाडीत आढळली एक कोटी 54 लाखांची रोकड
पोलिसांनी रोकड केली जप्त, अनधिकृत रोकड प्रकरणी चिक्करेवन्ना यांच्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाकडून पुढील कारवाई सुरू
इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड सापडल्याने खळबळ
पुणे शहराच तापमान आज 39 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता
पुण्यात आज ऊनाचा कडाका वाढणार
काल देखिल पुण्यात कमाल तापमानाची नोंद
काल मध्यवर्ती पुण्यात 40 अंश सेल्सिअस डिग्रीच्यावर तापमान
पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये सर्वात जास्त 42 अंश डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद
तर पुणे जिल्ह्यात विचार करता सर्वाधिक तापमानाची नोंद तळेगाव ढमढेरे मध्ये
तर वाढत्या तापमानामुळे प्रशासकीय यंत्रणा देखिल सज्ज
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू
आकांक्षाचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
38 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाली, वाचा सविस्तर..
एसटी महामंडळाच्या ‘शिवनेरी’ बसने मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा
या मार्गावर इलेक्ट्रिक एसटी बस अर्थात ‘ई-शिवनेरी’ सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
सध्याच्या तिकीट दराच्या तुलनेत याचे तिकीट दर कमी असेल.
आराध्या बच्चनने दिल्ली उच्च न्यायालयात घेतली धाव
आराध्याने काही युट्यूब चॅनलविरोधात उच्च न्यायालयात मागितली दाद
तिच्या प्रकृतीविषयी खोटी बातमी दिल्याबद्दल उचललं हे पाऊल
याप्रकरणी आज (20 एप्रिल) होणार सुनावणी, वाचा सविस्तर..
मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात 4 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीतील 25 दिवसांत समुद्रात 4.51 मीटर ते 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
जून महिन्यात ५ दिवस, जुलै महिन्यात ६ दिवस, ऑगस्ट महिन्यात ८ दिवस तर सप्टेंबर महिन्यात ६ दिवस असे एकूण 25 दिवस समुद्रात साडेचार मीटरपेक्षाही जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
जर त्याच दिवशी अतिवृष्टी झाल्यास मुंबईत 26 जुलै 2005च्या पूरस्थितीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये… अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ शकते असे भाकीत केलं जातंय
आज आणि उद्या मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा
हवामान खात्याकडून पावसाचा इशारा
मुंबईसह कोकणात दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता
दोन डॉलर प्रति बॅरल भाव झाले कमी
पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच जाहीर केले भाव
राज्यातील अनेक शहरात आज वाहनधारकांना दिलासा
उन्हाळ्यात पेट्रोल-डिझेलची मागणी घटण्याची शक्यता
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय, जाणून घ्या
साहिल खान आणि त्याच्या मित्राविरोधात एका महिलेनं केला गुन्हा दाखल
धमकावणं, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा केला आरोप
साहिल खानविरुद्ध आयपीसी कलम 500, 501, 509, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही
देवळाली कॅम्प पोलिसांनी घेतले ताब्यात
मिलिटरीमध्ये भरती होण्याचे स्वप्न भंगल्याने हौस पूर्ण करण्यासाठी घातले होते कपडे
जवानांना संशय आल्याने त्यांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
अमृत 2 योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठवलेल्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता
अंतिक मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला
शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणे आणि त्यांची क्षमता वाढविणे असा आहे हा प्रस्ताव
विनोद भानुशाली यांच्या बीकेसीमध्ये असलेल्या भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि हिट्स म्युझिकसह विनोद भानुशाली यांच्या गृह
कार्यालयात बुधवारपासून सर्च ऑपरेशन
याशिवाय आणखी तीन प्रॉडक्शन हाऊसवर सर्च ऑपरेशन
आर्थिक अनियमितता आणि करचुकवेगिरीमुळे आयटीची शोध मोहीम सुरू
संतोष शंकरराव यादव असं या शिक्षकाचं, वाई तालुक्यातील ढेबेवाडी पाटण येथील रहिवासी
कसणी तालुका पाटण येथील प्राथमिक शाळेत ते शिक्षक होते
काल सायंकाळी वीजासह वादळीवाऱ्याच्या पाऊसात घाटातुन प्रवास करत होते
याप्रकरणी ढेबेवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत
75 पैकी 9 अल्पवयीन आरोपीनाही पोलिसांनी घेतले ताब्यात
सर्वच आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी
हर्सूल कारागृहात तब्बल 65 आरोपींना केले जेरबंद
किराडपुरा राडा प्रकरणाचा अजूनही कसून तपास सुरू
अजूनही आरोपी निष्पन्न करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरूच
205 वाचनालयांची मान्यता काढताच ग्रंथालयात उडाली खडबड
शासकीय मान्यता असूनही सार्वजनिक वाचनालया बाबत दिली नव्हती कोणतीही माहिती
ग्रंथालय विभागाने 205 सार्वजनिक वाचनालयांची मान्यता रद्द करण्याचा घेतला निर्णय
मागील तीन वर्षांपासून वाचनालयाचे ऑडिट रिपोर्ट सादर केले जात नसल्याची खळबळजनक माहिती
प्रा. जी.एन. साईबाबा याच्यासह चारजणांना निर्दोष सोडण्याचा नागपूर उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द
प्रा साईबाबा प्रकरण कायदा आणि गुणवत्ता विचारात घेऊन नव्याने निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयाकडे परत पाठविण्यात आलेय
त्यामुळे निर्दोष सुटलेला प्रा. साईबाबाच्या अडचणीत वाढ होणार आहे.
या आरोपींविरोघात गडचिरोली सत्र न्यायालयामध्ये देशाविरुद्ध दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांतर्गत खटला चालविण्यात आला होता
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उपचारांची दिशा, औषधांची उपलब्धता, याबाबत शासनातर्फे जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकार्यांना दिल्या मार्गदर्शक सूचना
शहरातली आरोग्य केंद्रांमध्ये तसेच दवाखान्यांमध्ये उष्माघातबाधित व्यक्तींच्या उपचारांसाठी औषधांचा मुबलक साठा ठेवणे, सर्व दवाखाने आणि इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट करण्या बाबतचे प्रशासनाकडून आदेश
आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांना उष्माघात काळातील कार्यवाहीबाबत देखिल दिले जाणार प्रशिक्षण, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
दत्तवाडी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात
राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही बोलावल्या
आ. नितीन देशमुख यांची संघर्ष यात्रा नागपूरला येण्यापूर्वीच अडवणार